जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by rohit patil
08-06-2016
rhtpatil168@gmail.com

सर कबुली नामा म्हणजे काय ते सविस्तर सांगा
हि विनंती
कृपया सविस्तर संदर्भ द्यावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, मृतुपत्र नुसार वारस फेरफार घेण्यासाठी मी प्रांत साहेबांकडे अपील केले असता वेळेत अपील न केल्याने फेटाळले आहे. आता या पुढे काय करावे याचे मार्गदर्शन करावे. तसेच मृतुपत्राची राईट आफ़ रेकॉर्ड ला नोंद करता येते का नोंद करता येत असेल तर कोणत्या महसुल अधिकारयाकडे नोंदी साठी अर्ज करावा कृपया मार्गदर्शन करावे हि आग्रहाची विनंती.
अपील फेटाळले आहे तर अप्पर जिल्हाधिकारीकडे अपील करा. मृत्यूपत्राची नोंद रेकॉर्ड आफ़ राईट ला करता येते. तलाठी यांचेकडे अर्ज करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय, कृपया आरहन व संवितरण अधिकारी (DDO) यांची अधिकार व कर्त्यव्य याबाबत माहिती चे पुस्तकाचे नाव सांगावे किंवा वेब साईट चे नाव सांगावे.
शासकीय कोषागारात चौकशी करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Ravi
07-06-2016
ravindra171282@gmail.com

आदरणीय सर प्रश्न असा आहे कि माझ्या शेत शेजारी एक त्रयस्थ व्यक्तीची शेत आहे आमचा आणि त्यांचा गठ न एका मागे पुडे जसे १४६ आणि १४७ आहे सदर त्रयस्थ व्यक्तीचा उतारा इंटरनेट वर पहिला असता त्याच्या उताऱ्या मध्ये माझ्या आजोबाचे नाव इतर अधिकार च्या कॉलंम आहे आणि पुडे तागदे आणि कंस मध्ये १ number लिहिला आहे त्याचा अर्थ काय होवू शकतो ते सांगावे धन्यवाद .. इतर माहिती असि आहे कि सदर ची आमची जमीन हि आमच्या पंजोबाने तेथे विकत घेतलेली aahe..
संबंधित फेरफारचा उतारा काढून बघावा.ता.ग.दे. चा अर्थ तारण गहाण देणार असा होऊ शकतो परतू निश्चित नाही

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,अप्पर जिल्हाधिकारी सो यांनी उपविभागीय अधिकारी सो यांनी दिलेल्या निकालाविरोधात निर्णय दिला असून त्याला अपील कालावधी किती दिवसाचा असतो.यावर कृपया मार्गदर्शन मिळावे .
निकालाची प्रत मिळाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसाच्या आत .

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by rohit patil
05-06-2016
rhtpatil168@gmail.com

सर माझे आजोबा त्यांना चार भाऊ होते ते असे भास्कर , बाबू, मोहन, भादू हे त्यांच्या नावावर एक घर होते त्या घरात आता एक म्हणजे भास्कर व त्यांचा परिवार राहत आहे व ते बाकी लोकांना तेथे राहू देत नाही त्या घरात सर्वांचे नाव आहे तरी त्यावर काही उपाय सांगावा हि विनंती .............
आपण न्यायालयात partition suit दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, १९८० पूर्वीचे घर जागेचे रेकॉर्ड उपलब्ध नसलेचे कारण सांगून सिटी सर्वे ऑफिस ते देत नाही तरी सदर रेकॉर्ड प्राप्त करणेकरिता काय करावे?
जर कार्यालयात रेकार्ड उपलब्ध असेल तर त्या कार्यालयाने तो उपलब्ध करून दिला पाहिजे . आपण सविस्तर तपशिलासह आवश्यक रेकार्ड च्या प्रमाणित प्रती साठी अर्ज करा . जर उपलब्ध होत नसेल तर माहिती अधिकार कायद्यान्वे अर्ज करा .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

नमस्ते सर, २८ वर्षापूर्वी विकास सोसायटी ला ५ आर शेत्र ऑफिस बध्कामासाठी दिलेले होती महसुल न चुकता भरला आहे. पण दुष्काळी परिस्थिती व अपुरा इमारत फंड यामुळे बाधकाम डरता आले नाही व शर्तभंग होऊन पुणे अप्पर जिल्हाधिकारी yani सरकार जमा आदेश दिला आहे तर ती जमीन प्रत घेण्यासाठी काय काय करावे....मार्गदर्शन करावे
अप्पर जिल्हाधिकारीच्या आदेशाविरुद्ध अपील करा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,आमचे घराशेजारी असलेल्या खुल्या जागेतून परंपरेनुसार गेली ६५ वर्षे आमची वहिवाट आहे.ती खुली जागा आम्ही व दोन शेजारी असे तिघात सामायिक आहे.त्यातील एक शेजार्याने त्या जागेतून आमची वहिवाट बंद करणेकरिता ग्रामपंचायतीत तक्रार केली आहे.ती खुली जागा सामायिक असताना शेजार्याने केलेली तक्रार बरोबर आहे का?त्या तक्रारीस काय उत्तर द्यावे?
जमिनीविषयक कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती दर्शक उत्तर तक्रार प्राधिका र्यास द्यावे .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

आदरणीय सर, एखादे अपील करण्यासाठी विलंब झाला असेल तर विलंब माफीचा अर्ज करावा लागतो का, असा विलंब अर्जाचा नमुना कोठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे
होय विलंब माफीचा अर्ज करावा लागेल.त्यासाठी कोणताही विहित नमुना नाही .

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

कोकणातील एकत्र कुटुंब पद्धतीमुळे गावाकडची जमीन, आजोबांच्या मृत्युनंतर कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या काकांच्या नावे झाली. त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन काही जमिनीची विक्री माझ्या वडिलांची सहमती न घेत विक्री केली. सदर विक्री वैध्य आहे कि अवैध्य ?

धन्यवाद
राजेंद्र साळुंखे

Question by dn gunjal
02-06-2016
gunjaldny@gmail.com

वाटप पत्र करताना इतर अधिकार सदरी वारसांची सम्मति घ्यावी लागते का ? त्यांची सम्मती न मिळाल्यास वाटप करण्यासाठी काय करावे?
वाटपास सर्व धारकांची संमती असणे आवश्यक आहे.अशी संमती नसेल तर दिवाणी कोर्टातून हिस्से तःरवून घ्यावे लागतील

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

Question by आबा
02-06-2016
ashokmalid3@gmail.com

सर आईच्या वडिलांनी त्यांची वडिलोपाजित जमीन 2008 मध्ये 3 मामामध्ये समान वाटणीने वाटप करून दिली त्यात आईचा हक्क मिळवण्यासाठी काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन करावे
दिवाणी न्यायालयात दाद मागावी लागेल

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, नवीन वारस फेरफार घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करावयाचे आहे . परंतु तीन वर्ष वेळ मध्ये गेला आहे . त्यामुळे अपील आर.टी. एस अपील उपविभागीय अधिकारी स्वीकारतील कींवा नाही. नाही स्वीकारले तर काय करावे लागेल.
अपील करण्यासाठी लागलेला विलंब हा योग्य कारणामुळे लागला आहे याची खात्री पटल्यास अपिलीय अधिकारी विलंब माफी करून केस चालवू शकतात.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

सर आमची ३ एकर जमिन आहे आम्हाला जमिनीत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही नॕशनल हायवे पासुन ३००फुट अंतरावर आहे तर आम्हांला शेती उपयोगी औजारे आणी वाहने घेउन जाण्यासाठी रस्ता मिळू शकतो का ? कसा ?कुठुन ते सांगावे
atulpawar438@gmail. या ईमेल वरती कळवावे
नवीन रस्त्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज करा .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by satish jadhav
31-05-2016
s.jadhav231@yahoo.com

आदरणीय सर वाटप पत्र सर्व सहधारकात नोंदनीकृत झाले आहे परंतु नतर एका सहधरकस वगळले गेले असे समाजले तर नोंद टाकवि की नाही ,,,,,
सहधरकास वगळले गेले असेल तर वाटपपत्र अवैध ठरते. फेर वाटप आवश्यक

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
30-05-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर, १) ०.०९ पोट खराबा, ००.४ आर २) ०.४१ पोट खराबा, ००.४आर ३) १ हेक्टर,०.९ आर, ०.१६ पोट खराबा हे एकूण क्षेत्र एकर प्रमाणे किती होइल.
३ एकर १ गुंठा आणि ८९ पोइंत

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

आदरणीय सर
मी सुमारे १३ वर्ष अगोदर एक जमीन विकत घेतली होती. जमीन हि रामोशी वतनआतील होती त्यावर राखीव वन अशा शेरा होता. सदर जमीन हि सक्षम अधिकार्याच्या परवानगीशिवाय खरेदी केली आहे आणि आता शर्तभंग झाला म्हणून जिलाधिकारी यांनी जमीन सरकार जमा करण्याचे असेश दिले आहेत . तरी आता काय करता येईल पिलीज माहिती द्यावी
जमिनीचा watan दर्जा संपला आहे असे वाचावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

या जमिनीवर राखीव वन असा शेरा आहे . त्यामुळे ती जमीन आता नियमानुकूल करता येणार नाही. जमीन वन आहे . जमिनीचे वन जमीन हा दरजा संपलेला आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शर्तभंग नियमित करावा म्हणून अर्ज करा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, आर.टी.एस अपिले बाबत माहिती टाकल्यास त्यातून महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमातील कलमांची बरीच माहिती मिळते. व अनेक प्रश्नांची उतरे मिळतात कृपया आर.टी.एस अपिले बाबत माहिती आपल्या साईट वर कोठे मिळेल
आर.टी.एस अपिले अनेक प्रकारची असतात. याबाबत अशी माहिती देत येणे अवघड आहे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मी माझ्या गावी अलिबागला १७.५ गुंठे शेतजमीन ९ वर्षांपूर्वी विकत घेतली आहे. त्या जमिकडे जाण्यासाठी १ truck जावू शकेल एवढी रुंद पायवाट आहे.
माझ्या जमिनिसमोर एक घर हि आहे त्यांचा स्वताचा टेम्पो हि जातो.
आता मला माझ्या जागेवर घर बांधायचे आहे.
पण माझ्या जागेकडे जाण्यासाठी main रस्त्यालगत जो वहिवाटीचा रस्ता आहे त्यावरील पहिल्या शेताचा मालक मला सामानाचा truck किंवा टेम्पो नेवू देत नाही. त्यामुळे मी घर किंवा विहीर बांधू शकत नाही. ती वहिवाट आज वर्षानुवर्षे तेवढीच आहे.
तरीही मला फक्त पाय वाटच वापरता येईल असे सांगितले जाते.
माझ्या जमिनिसमोर असलेली घरातील लोक टेम्पो ची ने आन करत असतानाही.
ह्या संदर्भात मला सहकार्य करावे.
मी नेमके काय करू कुणाकडे तक्रार करू





आपल्या १७.६ गुंठे क्षेत्राचा वापर शेतीसाठी करत असाल तर , या पूर्वी दिलेल्या उत्तराप्रमाणे आपण मामालेतदार ज्कोर्त कायद्याखाली , तहसीलदार यांचे कडे अर्ज दाखल करू शकता .
मात्र जागेचा वापर शेतीसाठी नसेल तर , आपणास दिवाणी न्यायालयात , समोरच्या व्यक्ती विरुद्ध मनाई हुकुम मिळण्यासाठी दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपली पाय वाट बंद नाहीय . पण तरीही आपल्या शेत कडे जाणारा दुसरा जुना वहिवाटीचा रस्ता उपलब्ध असेल आणि तो तुमच्या साठी बंद केला असेल तर असा रस्ता बंद केल्याच्या तारखेच्या ६ महिन्याच्या आत आपण माम्लेतदार court अधिनियम १९०६ अंतर्गत तहसीलदार यांचे कडे अर्ज करावा . मोका चौकशी करून नियमाप्रमाणे आदेश करून जुनी वहिवाट खुली करून दिली जाते .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

सध्या वडील हयात नाहीत .७/१२ वरती माझे व माझ्या भावाचे नाव आहे ,तर मला व माझ्या भावाला स्वतंत्र उतारे करून घ्यावयाचे आहेत .तर ते स्वतंत्र उतारे करून घेण्यासाठी किती खर्च करावा लागेल याची कृपया माहिती द्यावी .
तहसीलदार कार्यालयात अर्ज करा . प्रोसेस फी लागेल म्हणजे नोटीस काढणे ,त्याच्या पोस्टतिकीट ई. साठी . अर्ज प्रोसेस झाल्यावर रीतसर तारखेला हजर राहावे . आदेश घ्यावा व त्या प्रमाणे उपाधीक्षक ,भूमी अभिलेख कार्यालयात जागेची मोजणी मोजणी फी भरून करून घ्यावी . त्या प्रमाणे फेरफार होऊन ७/१२ चा अंमल दिला जाईल . मोजणी फी ची चौकशी तुमच्या भूमी अभिलेख कार्यालयात करावी .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by VIKRAM YADAV
27-05-2016
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर, माझा प्रश्नाची उतरे तुम्ही वेळचा वेळी देले आहेत त्या बदल धन्यवाद , पुडे माझा प्रश्न असा आहे कि अम्मचा गावी काही पडीक जागा अह्हे .आमच्या आजोबांनी खारेधी खत दोरे ८ आणायचा स्तम्पापेर वरठी माझाकुर ळीलेला अह्हे पुन त्याची ग्रामसेवक दप्तरी नोड नाही हि बाब लक्षात आल्यावर त्या नोधी साठी गरम सेवक काकडे गेलेअस्त ते नोड धरत नाही कारण तोपेपर खूप जुना अह्हे म्हणून त्याची नोड धरावी ह्यासाठी मला काय्कार्वे लागेल क्रुपय मार्ग दर्शन करा.
१०० रु च्या अधिक किमतीची मालमत्ता नोंदणीकृत दस्त असलेली पाहिजे .

Reply by श्रीमती.लीना फाळके | तहसीलदार

Question by Umesh bodake
27-05-2016
Umesh89bodake@gmail com

आदरणीय सर / मैडम , माझे वडील आणि 4 भाऊ तसेच 3 बहिण असे आमचे कुटुंब असून तीनही बहिणींचे लग्न झालेले आहे , आमची जमीन वाडीलोपार्जित असून माझे वडील आणि काकानी जमिनीचे 5 हिस्सात वाटप केले ,,, त्यात बहिणींची नावे 2 बहिनीनी हक्कासोड केले आहे , परंतु एका बहिनीचे नाव आम्ही सर्व गटांवर इतर अधिकारत कायम ठेऊन सरस व नीरस वाटप केले , वाटपाचा दस्त दुय्यम निबंधक याचेकडे यांकडे मंजूर केला त्या वेळी एक बहिण गैरहाजिर होती । परंतु आम्ही तिचे नाव इतर अधिकार सदरी तसेच ठेवले आहे । परंतु ती बहिन अता मला हिस्सा दिला नाही म्हणून तलाठी कड़े अर्ज करात आहे ,तिने हरकत घेतली आहे ।।।।।आम्ही तिचे नाव कमी केलेले नाही तरी तिने वाटपसाठी न्यायालयात जानें योग्य आहे कारण नोंदनीकृत दस्त न्यायालयात रद्द होतो ।। तरी तिने नोंदिस हरकत घेतली आहे ,,,,नोंद मंजूर होईल का ?
पाच हिस्स्यात जर जमिनीचे वाटप केले असेल तर , बहिणीस तिचा हिस्सा देणे आवश्यक आहे . त्या बहिणीचे नाव भोग्वातदार सादरी घेणे आवश्यक .
न्यायालयात जाने आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ssk
27-05-2016
ssk_8796@yahoo.com

माझा वय ८५ वर्ष आहे...माझ्या नावे वडिलोपार्जित जमीन होती... ती मी विकली ...मला २ मुले व २ मुली आहेत सर्वांची लग्न झाले आहेत..... मला आलेल्या रकमे मधून दोन मुलांना पैसे दिले... पण दोन मुलीना जास्त पैसे मागतात.... जर मी त्यांना जास्त सोडाच पण काहीच नाही देईले तर ते माझ्या वर कायदेशीर काही हरकत घेऊ शकतात का..... कारण जमीन वाद्लोपार्जीत आहे...
आपले वय 85 वर्षे आहे . आपण संगणक वापर , इंटरनेट या वयात करता या बद्दल आपले अभिनंदन .
आपण जर जमीन 20 डिसेंबर 2004 पूर्वी विकली असेल तर , मुलींना हक्क नाही.
मात्र जर त्या नंतर जमीन विकली असेल तर , आलेल्या रकमेतील ( व्याजासह ) 1/5 हिस्सा द्यावा लागणार .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Prakash adhav
27-05-2016
Jprakash.adhav@gmail.com

माझे नाव जयप्रकाश असे असून आधार कार्ड , इलेक्शन कार्ड वर सुधा जयप्रकाश आहे पण 7/12 उतारा वर प्रकाश झाले आहे , माझे उतरा वरील नाव कसे बदलाव ,,,
आपण संबंधित तहसील कार्यालयात उपरोक्त कागदपत्रे जोडून अर्ज करा.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

This page was generated in 0.42 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3