जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Ankush Nandwalkar
22-02-2025
nandwalkar10@gmail.com

सर मला दिनांक 4 किंवा 5/02/25 la मंत्रिमंडळात वन व जमीन महसूल विभागाचा भोगवटादार 2 मधून भोगवटादार 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी नजराणा रक्कम 5% असणार आहे. याचा मंजूर GR मेळावा धन्यवाद
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
या संकेत् स्थळाला भेट द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Jagadevi
20-02-2025
jagadevi6758@gmail.com

अपर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या रिव्हिजन (पुर्ननिरिक्षण) निकालाच्या अमंलबजावणी आदेशाची फेरफार नोंद घेताना सदर नोंदवर हरकत साठी 15 दिवसांचा कालावधी तलाठी ठेवू शकतात का? जर प्रतिवादीनी पुढे अपिलच केली नसल्यास / अपिल कालावधी संपल्यावर आदेशाची नोंद (आदेशाने दुरुस्ती या फेरफार प्रकारे) एका दिवसात घेता येते का? नसेल तर का नाही?
तसेच, वरील नोंद घेण्यासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागते असे तलाठी म्हणत आहेत, खरच परवानगी घ्यावी लागते का? फेरफार नोंद होण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे
संबप्पा सो. बाबप्पा टेळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य , या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 (MLRC) च्या कलम 257 अंतर्गत , उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे या कलमांतर्गत घेतलेल्या निर्णयांची अंतिमता अधोरेखित होते.


कलम 257 अंतर्गत विभागीय आयुक्ताने दिलेला निर्णय राज्य सरकार जो पर्यंत स्थगित करत नाही तोपर्यंत तो अंमलात राहतो. जर कोणत्याही पक्षाला असा निर्णय आव्हान द्यायचा असेल, तर त्यांना त्वरित संबंधित प्राधिकरणाकडे स्थगिती आदेश (stay order) किंवा पुनरावलोकनासाठी (revision) अर्ज करावा लागेल. अन्यथा, तो निर्णय अंमलबजावणीस पात्र राहतो आणि लागू केला जातो.त्यासाठी १५ दिवस वाट पाहणे आवश्यक नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बदल्यांचे अधिकार दुय्यम प्राधिकाऱ्यास सोपविण्याबाबत महसूल व वन विभाग शासन आदेश दिनांक -12/08/2024 अन्वये मा. विभागीय आयुक्त साहेब सहाय्यक महसुल अधिकारी यांची बदली त्यांच्या विभागातील कोणत्याही जिल्ह्यात करू शकतात का? व त्यांची जेष्ठता पण जात नाही किंवा कसे याबाबत मार्गदर्शन करावे.
जर सहाय्यक महसुल अधिकारी यांनी मा. विभागीय आयुक्त साहेब यांना त्यांच्याच विभागातील दुसऱ्या जिल्ह्यात बदलीसाठी अर्ज केला तर ते बदली करू शकतील का व बदली झाल्यावर जेष्ठता जाते का या बाबत मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
सर, माझा प्रश्न असा आहे की, माझी जमीन एमआयडीसी च्या सर्व्हे नंबर लगत आहे माझ्या जमिनीला येण्या जाण्या साठी रस्ता नाही तरी मला एमआयडीसी मधून रस्ता मागणी करता येईल का? माझ्या सारख्या इतर शेतकऱ्यांनाही रस्ता नाही तरी आम्हाला एमआयडीसी तून रस्ता मिळेल का? कोणाकडे मागणी करता येईल.plz मार्गदर्शन करा सर
महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र यांचे अखत्यारीतील क्षेत्रामध्ये संपूर्ण अभिन्यास / layout तयार केला जातो . त्यामध्ये रस्ते हि तयार केलेले असतात . त्याचा वापर सर्वांसाठी खुळा असतो . आपण त्याचा वापर करावा . या उप्रोक्षा रस्ता वापर करण्यासाठी कोणी हरकत / आक्षेप घेत असेल तर , MIDC यांच्या प्रादेशिक अधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमच्या कुटुंबाची काही जमीन पाझर तलावासाठी संपादित झालेली आहे आज आम्ही त्या तलावात विहीर घेऊ इच्छितात तर आमचा अधिकार राहतो का
संपादित झालेली जागा ही काही आपल्या मालकीची नाही . त्यामुळे त्या तलावामध्ये आपणाला विहीर घेण्याचा अधिकार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Jagadevi
11-02-2025
jagadevi6758@gmail.com

अपर विभागीय आयुक्तानी पुर्ननिरिक्षण प्रकरणात स्वत: दिलेल्या आदेशाला, पुर्नविलोकनात बदलण्यासाठी राज्य शासनाच्या परवानगीची घेण्याची आवश्यकता असते का नाही याबाबत माहिती द्यावी. जर गरज असेल तर किती दिवसात मंजुरी मिळते.
होय . अप्पर विभागीय आयुक्त यांना स्वताचा निर्णय पुनर्विलोकन करायचा असेल तर त्यास शासनाची परवानगी आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Priti Garade
10-02-2025
pritigarade786@gmail.com

जुन्या कोर्ट case मध्ये जर चार -पाच लोक एकत्रित होते आणि कोर्टानी त्यांची निर्दोष (acquitted) मुक्तता केली आहे.परंतु एकाची ऑर्डर कोर्ट मध्ये मिळाली आहे बाकी सर्वांची ऑर्डर कोर्टात (कार्यालयात) शोधले असता मिळाली नाही. मला शासकीय नोकरी उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य करीता नमुना Attestation फॉर्म भरायचे आहे तर मी ऑर्डर कॉपी ज्याच्या नावाने मिळाली आहे ती जोडू शकतो काय ?
आमची ऑर्डर कॉपी मिळाली नाही त्यासाटी काय करावा लागेल. कृपया मार्ग दर्शन करण्यात यावे.
निर्दोष मुक्तता चे आणखी काय काय पुरावे द्यावे लागेल.
कृपया कोर्ट कैसे acquitted चा शासकीय जी.आर. असेल तर एक जी.आर.कॉपी पाठवावे.
आपला खूप खूप धन्यवाद सर
जी व्यक्ती शासन सेवेत रुजू होणार आहे केवळ त्याविरुध्द कोणतीही फौजदारी केस असता कामा नये . त्याच्या नातेवैकांविरुध्ह असली तरी हि काही फरक पडत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sunil Garade
10-02-2025
sunilgarade786@gmail.com

आमचे वडील, काका, मोठे वडील यांची मुक्काम पोस्ट पांढराबोडी तालुका गोंदिया डिस्ट्रिक्ट गोंदिया इथे एकत्रित शेती आहे. सदर शेती जवळून शेती मध्ये येणे जाणे करीता पांदण रस्ता आहे पण सदर पांदण रस्ता वर गावाचे ABC यांनी सण २०१४ मध्ये अतिक्रमण करून पक्के घराचे विट्याचे बांधकाम केले आहे. त्यांची तक्रार आम्ही जिलाधिकारी व तहसीलदार कडे केली होती पण त्यांनी त्याच्याविरुद्ध कोणतीही कार्यवाही केली नाही. नाईलाजाने आम्हाला सण २०१५ मध्ये कोर्टात स्वतः शासकीय रस्ता ची याचिका दखल करावी लागली. जेव्हा कोर्ट मध्ये याचिका केली होती तेव्न्हा तिथे फक्त एकच पक्के घराचे बान्धकाम होते पण आत्ता त्या ठिकाणी भरपूर दुकाने व घराचे बांधकाम पांदण रस्ता वर झाले आहे व पांदण रस्ता पूर्णच बंद झालेले आहे. यांची तक्रार आम्ही तलाठी व ग्राम पंचायत कडे केली असता ते काहीही कार्यवाही करता नाही आहे उलट ते त्यांना घर टॅक्स व दुकान टॅक्स चे पावती बनवून देत आहे.
कोर्ट मध्ये ही पेशी वर पेशी देत आहे पण निकाल काही लागत नाही आहे आणि इकडे लोकांचे बांधकाम सुरु आहे. काय करावे काय नाही हे आम्हाला आत्ता कळतच नाही आहे सर .आमचे वडील, काका, मोठे वडील आता या म्हतारपणात भरपूर थकलं आहे आणि कोर्टात वकील भरपूर फी हि घेत आहे पण निकाल काही लागत नाही आहे.
कृपया आम्हाला मार्गदर्शन करा सर आपली खूप कृपा होईल सर
धन्यवाद आपल्या आशेवर असलेले एक शेतकरी मुलगा
पानंद रस्ते दूर करणे यासाठी आपण आपल्या तहसीलदार यांचेकडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सरकारी गावठाणातील जागा आहे ती कब्जेहक्काने किंवा भाडेतत्त्वावर कशी घ्यायची .
गावठाणात सरकारी जागा आहे का ? बहुतेक गावठाणातील जागा ह्या ग्रामपंचायत कडे वर्ग झालेल्या आहेत . असो . जर जागा सरकारी असेल तर , जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करावा लागेल . अथवा ग्रामपंचायत यांचेकडे अर्ज करावा लागेल . ग्रामपंचायत स्वत निर्णय घेऊ शकत नाही . अंतिम जमीन देण्याचा निर्णय , जिल्हा परिषद घेते . स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा हि भाडे पट्ट्याने दिली जाते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी पंकज गोरख कागणे माझा प्रश्न असा आहे कि वर्ग 3 चे पदावरून वर्ग 2 चे पदावर पदोन्नती हवी असल्यास किती वर्षाची नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे कृपया मार्गदर्शन करावे खूप मोठी मदत होईल. ही नम्र विनंती.

Question by VIJAY
05-02-2025
GOMASEVIJAY@GMAIL.COM

सर, माझ्या आजोबाकडे 35 एकर शेतजमींन होती. त्याना 3 मूल आनी 2 मुली होता. 35 एकर पैकी 5 एकर ही पणजोबाकडून आलेली जमीन होती. 8 एकर आजोबांच्या बहिणी स्वता दिलेली होती आजोबाना, आनी बाकीची 22 एकर स्वता विकत घेतली होती. 1975 साली 3 मुलाना वाटणी करुन देताना ती 5 एकर जमीन ही माझ्या वडिलांच्या वाट्याला आली. आनी ४ - ४ एकर 2 काकाच्या वाट्याला गेली. 22 एकर आजोबांच्या नावी ठेवली होती. ती 5 एकर जमीन माझ्या वडीलानी मला विक्री पत्रद्वारे विकली आहे, म्हंजे मी ती खरेदी केली आहे. सर्व व्यवहार हा नगदी झालाय. माझे आजोबा, माझे वडिल आणि दोन्ही काका यांच्या मृत्यू झाला आहे. आता वडिलांच्या बहिणीने म्हंजेच माझ्या एका आत्याने त्या वाटनीस विरोध केला आहे. माझ्या नावे असलेल्या त्या 5 एकरवर दावा ठोकला आला. तिला त्या 35 एकरात्त समान वाटा हवाय. तो तिला मिलू शकतो का? दिवाणी न्यायालयात ते विक्री पत्र रद्ध करावे या साठी केस टाकली आहे. ते विक्री पत्र रड्ड होइल का?
पणजोबा यांच्या जमिनीचे वाटप झाले आहे . त्यामुळे पणजोबा यांच्याकडून आलेली जमीन हि , हिंदू सह्दायकी मिळकत/ वडिलोपार्जित , न राहता ती मिळकत आजोबांची मिळकत झाली . आजोबानानंतर ती मिळकत आपल्याकडे आली आहे . माझ्या मते आत्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी पंकज गोरख कागणे रा. घर क्रमांक 22 साई नगर किनवट ता. किनवट जि. नांदेड येथील रहिवासी आहे.
माझा प्रश्न असा आहे कि शेतजमीनी मध्ये विहीर तयार करायची आहे विहीर तयार करण्याची परवानगी कोणत्या ऑफिस मधून मिळते मी कोणत्या ऑफिस मध्ये अर्ज करू कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
महारष्ट्र भूजल ( विकास व व्यवस्थापन ) कायदा २००९ नुसार जर एखाद्या क्षेत्र अधिसूचित केलेले असेल तरच अश्या क्षेत्रात विहीर खांद्ण्यासाठी परवानगी , तहसीलदार यांची लागते . अन्यथा नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मुंबईचा तुकडेजोड तुकडीबंदी कायदा महानगर पालिका हद्दीत लागू आहे का आणि नसेल तर ते कुठे नमूद आहे ते सांगा
Maharashtra Prevention of Fragmentation and Consolidation Act is applicable for the land situated with Municipal Corporation.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nikhil Kashid
30-01-2025
nikhil888088@gmail.com

Dear Sir,

My Question – My father purchased land in 1985 year. That time he didn’t submit agricultural certificate. So that mention in 7/12 with 84k. Before that he purchased land in 1982 year. In that 7/12 not mention as 84k. I have both 7/12 and ferfar. What is the procesdure for remove 84k in 7/12 which is purchase in 1985 year and can I show proof of 1982 7/12 and ferfar?
Please guide me on that.
Thanks
Nikhil Kashid
You may apply under section 155 of MLRC to remove clerical error of -land subject to 84-C proceedings . IN the alternative you may file appeal before Sub-Divisional Officer under Maharashtra Land Revenue Code 1966.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, तुकडा नियमित करण्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी किती नजराणा भरावा लागतो.
आपणाला जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करावा लागेल . प्रचलित बाजार मूल्याच्या ५ % दराने शुल्क शासनास द्यावे लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by SUHAS JUVEKAR
29-01-2025
Suhasjuvekar856@gmail.com

आमची जमीन कुळ कायदयात संपादित झाली आहे कुळाने पूर्ण किंमत भरून आमचा बोझा उतरवला आहे ३२ग चा आणि त्यांना ३२ म च certifiacate देखील मिळालं आहे. अशी नोंद फेरफार वर दिसत आहे तर भूसंपादन मुले कुळाला १२.५% प्रणाम प्लॉट मिळाले पण आम्हाला काही मिळाले नाही.
यात मालकाला कायही फायदा आहे का ?
महाराष्ट्र कुलवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या उप्बंधानुसार , कुल हा कृषक दिनी मालक झालेला आहे . जमीन संपादन वेळी , आला कोणताही हक्क जमिनीत उरलेलेल न्हवता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरनीय सर ,
माझा प्रश्न असा आहे
1990 मध्ये एक व्यक्तीने भोगवटादर वर्ग -2 ची जमीन खरेदीखत करुन विक्री केली आहे. परंतू जो घेणार व्यक्तीने आज पर्यंत 7/12 वर नाव लावून घेतले नाही. आणि जो देणार होता तो व्यक्ती मरण पावला आहे.
आज घेणार यांच्या नावे 7/12 वर नाव येण्यासाठी नजराणा रक्कम कोणाच्या नावे भरावे लागेल व कोठे भरावे लागेल plz सर मार्गदर्शन करा.
भोगवटादार वर्ग २ जमीन खरेदी करण्यासाठी शासन परवानगी आवश्यक आहे . आपण अशी शासनाची परवानगी न घेता , जमिनीची खरेदी केलेली दिसते . आपणाला हा झालेला व्यवहार नियामानुकुल करून घ्यावा लागेल . जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Aruna Halkare
24-01-2025
arunahalkare52@gmail.com

सर एका फेरफार ची नोंद प्रोबेट च्या आधारे घेण्यासाठी तलाठी कडे दिले त्याविरुद्ध उच्च स्तर न्यायालयात अपील केले परंतु प्रोबेट रद्द करण्याचे अधिकार त्यांना नसल्याने त्यांनी हायकोर्टात जाण्यास सांगितले, परंतु हायकोर्टात प्रकरण असताना तलाठने फेरफार नोंद केली. सदर प्रोबेट हायकोर्टाने रद्द केले. त्यामुळे फेर रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे कलम 247 ने अपील केले ते त्यांनी मंजूर केले. त्याविरुद्ध विरुद्ध पक्षाने जिल्हाधिकारी कडे अपील केले व ते मंजूर केले त्याविरुद्ध आम्ही विभागीय आयुक्त कडे कलम 257 ने पुर्ननिरिक्षण अर्ज केला व तो मंजूर झाला. त्याविरोधात विरुद्धपक्षाने पुर्नविलोकन चा अर्ज केला आहे. हा अर्ज जर आयुक्तांनी जर फेटाळला तर विरुद्धपक्ष राज्य शासनाकडे अपिल करु शकतो का? तसेच Review अर्ज फेटाळल्यावर आदेशाची अमंलबजावणी होईल का?
सर हे असे किती दिवस अपिल / रिव्हिव चालत राहिल?
आयुक्ताकडे अपिल दाखल असताना 14/3/24 रोजी तलाठी यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अमंलबजावणी करून नवीन फेरफार नोंद घेतली ती घेताना आम्हाला नोटिस सुध्दा बजावली नाही. व फेरफार नोंद मध्ये जे नाव पुर्वीच्या फेरफार मध्ये होते तेच नावे नवीन फेरफार मध्ये आहे.
तर तलाठीवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते का? ती कशी करावी हे सांगावे.
होय . विरोधी पक्ष अप्पर आयुक्त यांचे पुनर्विलोकन आदेशाचे ,पुनरीक्षण / फेरतपासणी व्हावी म्हणून महसूल संहितेच्या कलम २५७ अन्वये राज्य शासनाकडे जाऊ शकतात . जिल्हाधिकारी यांनी स्वत त्यांचे आदेशास स्थगती दिली नसेल अथवा मा आयुक्त यांनी स्थगती दिली नसेल तर फेरफार घेण्यास कोणतीही अडचण नाहि

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Aruna Halkare
24-01-2025
arunahalkare52@gmail.com

एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित संपत्ती (शेती, घर) मृत्यूपत्राने आपल्या मुलीला वगळून तीन मुलांना व नातूला देता येऊ शकते का? नसेल तर त्याबाबत कायदा, कलम, नियम, याबाबत सविस्तर माहिती द्यावी
वडिलोपार्जित मालमत्तेला मृत्यू पत्राद्वारे सोडले जाऊ शकत नाही, याचा अर्थ एखादी व्यक्ती वडिलोपार्जित मालमत्तेतील त्यांच्या वाट्याची विल्हेवाट लावू शकत नाही कारण तिच्यावर पूर्ण मालकी नसते; हे प्रामुख्याने हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत कोपर्सेनरी/ सहदायकी हक्कांच्या संकल्पनेमुळे आहे, जिथे सर्व कायदेशीर वारसांना अविभाजित वडिलोपार्जित मालमत्तेत जन्म हक्काने समान वाटा आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी जेथे राहतो ती बिल्डिंग निवासी आहे .मी तिसरा मजलावर रहात आहे..माझे शेजारी यांनी GALARI मध्ये पिठाची गिरणी ठेवली आहे.शेजारी यांची आणि माझी GALARI जॉईन आहे.सकाळी २ तास आणि रात्री २ तास पिठाची गिरणी चालवितात.मला सदरील पिठाची गिरणी च्या आवाजामुळे मानसिक त्रास होत आहे.माझी मुलगी ४ वर्षाची आहे तिला सुद्धा त्रास होत आहे पिठाची गिरणी मुळे आपणास विनंती आहे कि पिठाची गिरणी कायम बंद करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
त्या व्यक्तीशी संवाद साधून काही उपयोग होत नसेल तर त्याचे विरुध्द आपणास , law of Tort खाली न्यायालयात दाद मागावी लागेल . मनाई हुकुम प्राप्त करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब संरक्षित कुळामुळे वर्ग दोन असलेली जमीन माननीय तहसीलदार यांच्या परवानगीने विकत घेतल्यास तीच जमीन मला भविष्यात विकायची असेल तर पुन्हा नजराना भरावा लागेल का व परवानगी घ्यावी लागेल का
परतच्या विक्रीला परवानगीची/ नझरणा भरण्याची आवश्यकता / गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर. संरक्षित कुळ असलेली वर्ग २ ची शेत जमीन नोटरी इसारा पावती करून व्यवहार २०२३ ला ठरला आहे.
इसारा मध्ये जमीन मालकाने कुळ काढून देणार व त्या नंतर खरेदी करून देणार असे लिहून दिले आहे. पण अद्याप त्याने काही न करता ऍडव्हान्स घेत राहिला व आता मलाच सांगतो की जमीन ही तूच clear कर व ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे दे. नाहीतर मी दुसऱ्या सोबत व्यवहार करतो.
काय करावे साहेब??
एकतर कुल काढून देणे हे महाराष्ट्र कुलवहिवाट व शेत जमीन अधिनियम या तरतुदीच्या विरुद्ध आहे . त्यामुळे कुल काढणे कुलाच्या संमतीशिवाय शक्य नाही . मुळातच झालेला साठे करार हा यथोचित मुद्रांकित नाही . आपण जो पर्यंत मुद्रांक शुल्क भरत नाही तो पर्यंत अश्या कराराला कोणतेही पुरावा मूल्य नाही . जो पर्यंत आपण अश्या करारवर मुद्रांक शुल्क भरत नाही तो पर्यंत आपणाला न्यायालाय्त हि जाता येणार नाही . वकिलाच्या सल्ल्याने दिलेले पैसे परत मिळवता येतील का पहा . अन्यथा करार मुद्रांकित करून , न्यायालयात जमिनीची विक्री तुमच्या लाभात करून घेता येईल का हे पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sahil M Gadling
02-01-2025
sahilgadling1@gmail.com

मी काचुरणा गावातील रहिवासी असून मी भूमिहीन आहे .तसेच मी सरकार c क्लास जमीन कृषी कार्या करिता तसेच उपजीविका भगविण्या साठी लागवडी खाली आणली ती मला नावांनी करायची आहे त्या बद्दल माहिती द्या धन्यवाद.
आपणास जमीन प्रदान करून मिळण्यासाठी शासनाकडे अर्ज करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VISHNU THORAT
01-01-2025
vishnuthorat85@gmail.com

नमस्कार सर ,पवन चक्की कंपनी यांनी deemd N.A साठी प्रस्ताव दाखल केलाआहे.त्यांना अजून परवानी मिळालेली नाही.कंपनीने काम चालू केले आहे.असे त्यांना करता येते का.त्यांचे म्हणणे आहे की,N A ची परवागनी शासनाने एक महिन्यात देणे आवश्यक आहे व व त्या अगोदर त्यांना काम करता येते .या बाब त मार्गदरशन मिळावे ही.विनंती
परिपूर्ण अर्ज दाखल केल्यानंतर हि ९० दिवसात बिन-शेती परवानगी दिली नाही तर बिनशेती परवानगी मिळाली आहे असे मानण्याचे आहे . कंपनीला काम सुरु करता येते .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, एखाद्या प्लॉट च्या 7/12 उतरा वर कु. का. 83 लागले असेल तर त्या प्लॉट चे बक्षीस पत्र करता येते का ?
आपणाला कुलकायदा कलम ४३ असे म्हणायचे आहे असे समजतो . अश्या जमिनीचे म्र्त्युपत्र करण्यास परवानगीची आवश्यकता नाही . आपण करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3332
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 52
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3