जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अरविंद माधव कोहपरे
26-06-2024
arvindkohapare27@gmail.com
विषय: वाळू तस्करीविरोधात तक्रार दाखल करण्याबाबत
आदरणीय,
मी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. आपल्या लक्षात आणून द्यावयाचे आहे की, आमच्या ब्रम्हपुरी तालुक्यात वाळू तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. महसूल विभागाचा वाळू घाटाचा लिलाव अद्याप झालेला नाही, तरीदेखील रात्रीपासून सकाळी दहा वाजेपर्यंत आणि काही वेळा दिवसा सुद्धा ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळूचा अनधिकृत उत्खनन व वाहतूक होत आहे.
या घटनांमुळे शासनाचा महसूल बुडत आहे तसेच पर्यावरणीय नुकसान सुद्धा होत आहे. या समस्येची अनेक वेळा वृत्तपत्रांत बातमी आली आहे, मात्र अद्यापपर्यंत महसूल विभाग किंवा पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. काही लोकांच्या म्हणण्यानुसार महसूल विभाग व पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असल्याने या तस्करीला प्रोत्साहन मिळत आहे. हे खरे आहे की नाही हे माहित नाही, परंतु या घटनेवर कारवाई न होणे हे संशयास्पद आहे.
या तस्करीविरोधात त्वरित कारवाई करण्यात यावी, शासनाचा महसूल व पर्यावरणीय नुकसान टळावे. तसेच तस्करीची जाणीव असूनही दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
या करिता कोणाकडे तक्रार करावी, जेणेकरून सदर प्रकरणात जबाबदार असणाऱ्या सर्व लोकसेवकांवर कारवाई अवश्य होईल.
याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात यावी ही विनंती.
आपले विश्वासू,
अरविंद माधव कोहपरे
आपण जिल्हाधिकारी / जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचेकडे तक्रार द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Datta Gaikwad
25-06-2024
shrigonda.de@mahapwd.com
शासकिय जमीन भाडेपट्टयाने/कब्जेहक्काने देताना अथवा भाडेपट्टयाचे नुतणीकरण करताना करावायाचा करारनामा दस्त मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 नुसार निष्पादित करणे बंधनकारक करणेबाबत
शासन परिपत्रक क्रमांक : संकिर्ण-05/2006/प्र.क्र.43/ज-1 दि.31 ऑक्टोबर, 2006
सदर शासन परिपत्रकासोबत प्राथमिक स्वरुपाचा करारनाम्याचा नमुना पुरविण्यात आला आहे, असा उल्लेख सदर परिपत्रकात आहे. तथापी सदर परित्रकासोबत तो देण्यात आलेला नसल्याने तो करारनाम्याचा नमुना उपलब्ध व्हावा ही विनंती.
Question by Nilesh Yadav
23-06-2024
mr.nileshkisanyadav@gmail.com
Maze EWS certificate 2021-2022 sathi kadhlele hote. Sadarche certificate aatta online show krt nahi.
Me Central government madhe service la ahe, Ani sadarche certificate tehsil karyalayane issue kelele ahe ase letter me ghenyasathi gelo asta, certificate online disat nahi mhnun nakar dila jato ahe.
Me yamadhe ky karu shkto ?
तहसील कार्यालयाच्या जावक नोंदवहीत आपल्याला दिलेल्या प्रमाणपत्राची नोंद मिळू शकेल . केवळ आपले प्रमाणपत्र बनावट नाही याची पडताळणी करावयाची आहे . हि नोंद बेतली तरी हि आपणाला प्रमाणपत्र निर्गमित केल्याची नोंद भेटेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vikas Eknath Dhanwade
23-06-2024
vdhanwade88@gmail.com
1. ज्या फॉरेस्ट जमिनी निर्वाणीकरण झाल्या नाही अशा जमिनी जर केंद्रातून परमिशन घ्यायची असेल तर या संदर्भाच्या अधिकार कोणाला असतात.
2. महार वतन 6ब जमिनी . केल्यानंतर वर्ग एक करून जर अशा जमिनीस रहिवासी अकृषक करण्यासाठी किती नजारांना भरावा लागतो.
१. दोन टप्प्यात परवानगी दिली जाते . दोन्ही परवानगी केंद्र शासनाकडून दिली जाते .
आपण online अर्ज करू शकता .
२. ७५ %
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vijay Shejal
22-06-2024
vijayshejal9999@gmail.com
सर कब्जा काढण्या साठी सह शुल्क पोलीस बंदोबस्त मागणी करिता उपविभागीय अधिकारी यांची परवानगी हवी आहे त्या करिता 1 सक्षम अधिकारी पण हवा आहे तर त्या साठी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे कोणत्या कलमा अंतर्गत अर्ज अथवा अपील करावे तहसीलदार यांनी परवानगी दिली आहे परंतु सक्षम अधिकारी नाकारला आहे (सदर जमीन ही शेत मिळकत आहे त्याची मालकी दिवाणी न्यायालयाने ठरवली आहे पण कब्जा असणार व्यक्ती कब्जा सोडत नाही )
प्रश्नात नमूद जमीन हि शासनाने प्रदान केली आहे का ? जर शासनाने जमीन प्रदान केलेली नसेल तर आपली जमीनही खाजगी स्वरुपाची आहे . त्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची परवानगी आवश्यक नाही . तसेच , खाजगी जमिनीचा ताबा देण्यासाठी सक्षम अधिकारी देता येत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Suraj surayawanshi
20-06-2024
surayawanshis6@gmail.com
आम्हाला पोठ हिस्सा मौजनी करायची आहे पन गाव नमूना ७/१२ वर सर्वच खातेदाराचे पैसे भरावे लागत आहेत जेने करुण त्यांचे ब टे पडलेले आहेत त्याची पन फीस भरावी लागत आहेत उदा. खड़गाव मधे गट न ३/५ मधे जमीन आहे तर आम्हाला गट न ३/१,३/२,३/३ असे ३/११ पैयंत च्या सात बारा वरील खातेदारांचे फीस भरावी लागत आहे असे भूमि अभिलेख् कार्यालयतुन सांगण्यात येत आहे तरि यावर काही शासन परिपत्रक असेल तर कळवावे हि नम्र विनंती
जमाबंदी आयुक्त यांचे परिपत्रक आहे कि , पोट-हिस्सा मोजणी करण्याकरिता , पोट-हिस्सा ज्या भूमापन क्रमांकाचा भाग आहे त्या पूर्ण भू -मापन क्रमांकाचे पैसे भरणे आवश्यक आहेत . त्यामुळे त्या भू-मापन क्रमाकातील सर्व पोट - हिस्स्यांचे म्हणजे भू-मापन क्रमाकासाठी ची पुतना फी / शुल्क जमा करावे लागणार
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pankaj Hansraj Gawali
19-06-2024
pankajgawali2012@gmail.com
प्रशासकीय बाब :
महोदय, मी शासकीय कर्मर्चचारी असून महसूल विभागामध्ये कार्यरत आहे. माझे वडील कोणत्याही शासकीय सेवेत नसून ते आजतागायत माझ्यावर अंवलबून होते. त्यांचे ह्दय विकाराने मृत पावल्याने त्यांचे वैद्यकीय देयक मी कार्यालयात सादर केले. परंतू सदर कार्यालयामार्फत वडील अवलबून असल्याचे पूरावे सादर करण्याचे तोंडी कळविलेले आहे.
महोदय, याबाबत शासकीय कर्मचारी शिधापत्रिकेत मोडत नसून कुटुंबाबाबत पूरावे नाहीत. परंतू, ‘‘कुटुंब’’ या अर्थ, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन)नियम,1982 यातील नियम 116(16) (बी) यात व्याख्या केल्याप्रमाणे असलेले ‘‘कुटुंब’’ असा होतो.
तसेच याबाबत वित्त् विभाग, शासन निर्णय क्रमांक : रानियो-2022/प्र.क्र.34/सेवा-4, दि.31, मार्च, 2023 अन्वये नमुना 1 मी, दिनांक 13 फेब्रुवारी, 2023 रोजीच सादर केलेला आहे. सदर दस्ताऐवज कुटुंब म्हणून तसेच माझ्यावर अवलंबून असलेले ग्राह्य धरता येईल किंवा कसे . याबाबत मार्गदर्शन मिळावे.
महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम १९६१ मधील , कुटुंब व्याख्येप्रमाणे , आई - वडील राज्य सेवा कर्मचारी / अधिकारी यांचेवर पूर्णपणे अवलंबून असने आवश्यक आहे . आपण आपल्या कार्यालयास विचारा कोणता पुरावा द्यावा ? मला वाटते आपले प्रतिज्ञापत्र / अभिकथन - ज्यामध्ये आपले वडील आपल्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत हे पुरेसे आहे . मात्र आपल्या वडिलांना कोणतेही निवृत्ती वेतन मिळत नसावे किंवा अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसावे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
कुटुंब व्याखेत वडिलांचा समावेश होतो . त्यांना कोणता पुरावा लागेल हे विचारा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Suresh patil
19-06-2024
abhijeetspatole@gmail.com
हस्तलिखित 7/12 मध्ये नाव आहे, तरी 2 गुंटे खरेदी दस्तचा फेरफार , 7/12 वर नाव नसल्याने नोंद ना मंजूर असा शेरा दिला आहे , अधिकारी म्हणत्यात तुकडे बंदी मधी येत आहे पण फेरफार हा 7/12 वर नाव नाही आसा उल्लेख आहे काय करावे लागेल
Question by sushant vartak
15-06-2024
janardhanvartak75@gmail.com
नमस्कार साहेब मी वसई येथे राहत असून एखाद्या सातबाराचे पोट हिस्से झाले नसतील परंतु सदर पोट हिस्स्याचे गुणाकार बुक ,पोटहिस्सा बुक, फॉर्म नंबर चार यामध्ये नोंद असेल तर पोट पोट हेस याप्रमाणे किंवा गुणाकार बुक प्रमाणे आपणास सर्वे म्हणजेच मोजणी करून हद्द कायम करता येईल का
जर गुणाकार बुक , पोट हिस्सा नकाशा , फोर्म न ४ हे आहेत . कोणत्याही जमिनीचे क्षेत्र /पोट हिस्स्याचे क्षेत्र हे अधिकार अभिलेखातील क्षेत्रावरून ठरते . त्यामुळे आता या सर्व अभिलेखाचे आधारे गाव दप्तरात त्याचा अंमल देताना निच्छित उपयोग होईल . आपण भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
जर गुणाकार बुक , पोट हिस्सा नकाशा , फोर्म न ४ हे आहेत . कोणत्याही जमिनीचे क्षेत्र /पोट हिस्स्याचे क्षेत्र हे अधिकार अभिलेखातील क्षेत्रावरून ठरते . त्यामुळे आता या सर्व अभिलेखाचे आधारे गाव दप्तरात त्याचा अंमल देताना निच्छित उपयोग होईल . आपण भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
जर गुणाकार बुक , पोट हिस्सा नकाशा , फोर्म न ४ हे आहेत . कोणत्याही जमिनीचे क्षेत्र /पोट हिस्स्याचे क्षेत्र हे अधिकार अभिलेखातील क्षेत्रावरून ठरते . त्यामुळे आता या सर्व अभिलेखाचे आधारे गाव दप्तरात त्याचा अंमल देताना निच्छित उपयोग होईल . आपण भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
गुणाकार बुक , फोर्म. न ४ किंवा त्यावेळचे पोट-हिस्सा मोजणी कागद पत्र तयार होते म्हणजे पोट-हिस्सा मोजणी झाली होती मात्र त्याचा अंमल अधिकार अभिलेख सदरी झालेला न्हवता . आकार-फोड पत्रक तयार झाले न्हवते . आता त्याआधारे मोजणी कायम करता येईल का हे अधिकार अभिलेखाप्रमाणे सह-हिस्सेदार यांचे मालकीचे क्षेत्र व प्रत्यक्षात पोट-हिस्सा मोजणीत किती क्षेत्र दाखवले यावर अवलंबून आहे . अधिकार अभिलेखाप्रमाणे मालकीचे क्षेत्र याप्रमाणे पोट-हिस्सा मोजणी होणार . पूर्वीचे अभिलेख केवळ संदर्भ म्हणून वापरता येतील . त्याआधारे पोत्त-हिस्सा मोजणी कायम करता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bablu Thombare
14-06-2024
babluthombare77@gmail.com
Namskar Sir,
AAmche gawala wadiloparjit shet aahe.Tya shetamdhe shetachya shejaril shetkari aamhala n vicharta pipeline aamchy shetatun takt hota .tyachi already ek pipelinr aamchya shetatun aahech to punha dusari navin taknyachya praytnat aahe.tyakrita aamhi complain sudha keli parantu aamchi harkat astana sudha tyala pipeline taknyachi govt kadun permission dili.Amchi yavr harkat aahe.tr aamhi yavishyi takrar kuthe karavi.
महसूल संहितेतील कलम ४९ अन्वये , इतर इसमाच्या स्वाधीन असलेलेया जमिनीतून पाण्याचे पाट तयार करण्याची परवानगी देनेबाबत तहसीलदार यांना अधिकार आहेत . त्याप्रमाणे आपल्या जमिनीतून आपल्या शेजार्याला पाण्याचा पाट / पाण्याची पाईपलाईन टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे . वास्तविक अगोदर एक असताना दुसरी पाईपलाईन टाकण्याची परवानगी दिली आहे . अशी परवानगी देताना कमीत कमी त्रास/ कमीत कमी नुकसान ज्या शेतकऱ्याच्या शेतातून परवानगी दिली आहे त्यास होणे अपेक्षित आहे .तसेच अशी परवानगी देण्यापूर्वी आपली संमती घेतली होती का ? आपल्याला सुनावणीची संधी दिली होती का ? याचा हि विचार होणे आवश्यक आहे .
आपण तहसीलदार यांचेर परवानगी आदेशाविरुद्ध , उपविभागीय अधिकारी ( महसूल /प्रांत_ ) यांचेकडे अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prashant Maruti Pawar
11-06-2024
prash.pawar30@gmail.com
1. हयात पत्र असलेली शेत जमिन खरेदी करता येते का?
2. अशा प्रकारची जमिन कशा प्रकारे 7/12 सदरी नोंद करता येईल.
Question by जयंत मुथा
07-06-2024
jayantmutha@yahoo.com
नमस्कार सर,
https://marathi.indiatimes.com/agriculture/how-to-buy-farm-land-without-name-on-satbara/articleshow/110523657.cms यातील लेखाच्या सत्यतेबाबत मार्गदर्शन मिळावे
महारष्ट्र कुलवहिवाट आणि शेत जमीन अधिनियम १९४८ व त्याखालील नियम यातील उप्बंधानुसार , महाराष्ट्रात शेत-जमीन खरेदी करण्यासाठी , खरेदीदार शेतकरी असणे आवश्यक आहे . खरेदीदार यांचे नावे भारतात कोठेही शेत जमीन असेल तरीही चालू शकते . बिगर - शेती जमिनीसाठी जमीन नावावर असण्याची अट आवश्यक नाही . हिंदू मिताक्षरा सह-दायकि मालमत्ते मध्ये , आपणास हिंदु वारसा कायदा या प्रमाणे जन्मताच हक्क प्राप्त झाला असेल तर , आपण तसे शेतकरी असल्याबद्दल प्रमाणपत्र तहसीलदार यांच्याकडून घेयून , शेतजमीन खरेदी करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rahul J Mahamuni
30-05-2024
rahulj.mahamuni@gmail.com
सरंजाम जमीन ज्यांचे नावे कुळ म्हणून होती त्यांचा मृत्यू पश्चात वारस नोंद करता येते का?
येत असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे?
फक्त सातारा येथील सरंजाम इनाम अस्तित्वात आहे . याशिवाय अजून कोठे सरंजाम आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
फक्त सातारा येथील सरंजाम इनाम अस्तित्वात आहे . याशिवाय अजून कोठे सरंजाम आहे ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्रध्दा अडगुरवार
30-05-2024
shraddhaadgurwar1@gmail.com
एका कंपनीला 129.24 हे.आर जमीन 35 वर्षाकरीता लिजवर कोळसा उत्खन्न प्रकल्पाकरीता प्राप्त झालेली आहे. त्यापैकी 70 हे.आर कोळसा उत्खन्न व उर्वरीत क्षेत्र त्यासंबंधीत उपक्रमाकरीता प्राप्त झालेली आहे. तर उर्वरीत क्षेत्राचा वापर रोड, कर्मचारी यांचे घर ,कार्यालय व इतर बाबी करीता वापर करावयाचा असल्यास त्या क्षेत्राकरीता एन.ए. /अकृषक परवानगी घेणे आवश्यक आहे काय?
सन २०१६ मध्ये , महसूल संहितेच्या प्रकरण III मध्ये सुधारणा करण्यात आली आहे . त्यानुसार आता बिन-शेती परवानगीची आवश्यकता उरलेली नाही . तथापि आपणास कर्मचारी यांची घरे व इतर बाबांसाठी , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम अंतर्गत बांधकाम ( विकास परवानगी ) घ्यावी लागेल . विकास परवानगी मिळाली म्हणजे आपणास बिन-शेती परवानगी मिळाली असा आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vishal
28-05-2024
vapunde@hotmail.com
शेती करण्यासाठी स्वतःच्या जमिनीचे सपाटीकरण केले व त्यामध्ये ३ फूट पेक्षा जास्ती खोदकाम झाले तर त्यासाठी महसूल विभागाची परवानगी लागते का ? लागत असेल तर मला रेफेरेंस GR मिळू शकेल का ?
Question by Akshay Kadam
27-05-2024
kadamakshay6834@gmail.com
आम्ही शेतात राहतो पण गाव नमुना 7 वस्तीपड ची नोंद नाही.
१. वस्तीपडची नोंद करता येते का ?
२. वस्ती पडची नोंद कधी करायची असते ?
३. वस्तीपडची नोंद कधी कधी करता येऊ शकते ?
४. सहसा किती जमीन वस्तीपड म्हणून नोंदवता येते ?
गाव नमुना १२ मध्ये केवळ पिकाची नोंद घेणे अपेक्षित आहे . या पूर्वी अश्या घरांच्या नोंदी घेतलेल्या आहेत . जर कुळाने/ भूमिहीन कामगाराने / कारागाराने स्वताच्या पैस्यातून घर बांधले असेल तरच अश्या घराच्या नोंदी कुल कायद्या अंतर्गत घेतल्या जातात . मात्र या प्रवर्गातील जर व्यक्ती नसेल तर , वस्ती पड अशी नोंद घेता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Babasaheb Narayan patate
25-05-2024
babasahebpatare3552@gimal.com
एकत्रीकरण स्कीम व जबाब चुकीचा असल्यास तो रद्द होऊ शकतो का
त्याचा अर्ज कोठे करावा
आता इतक्या दिवसांनी एकतरी कारण योजनेमध्ये , गट बाधनी संदर्भात दिलेला जबाब आता रद्द करता येणार नाही . आपणास हा जबाब , लबाडी , कपात अथवा दबाव आणून घेतला होता हे न्यायालयात सिद्ध करावे लागेल . अप्प्नास त्यासाठी न्यायालयात , असा जबाब रद्द करणेबाबत विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम अंतर्गत दावा दाखल करावा लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by parag yengantiwar
22-05-2024
yparag123@gmail.com
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब दिनांक २२ सप्टेंबर, २०१४ नुसार वडार समाजाला 200 ब्रास च्या आंत दगड काढता येतो का
Question by Sachin
20-05-2024
venkateshaerprise22222@gmail.com
Amache panjobache jamin, tyamadhe tyana 3 mule hote, te varalya nantr tya 3 mulane jamin vatun ghetali, jamin vatun ghetana tya 3 bhavani jamin hi gatavr vatal keli, jami sagali ek sarkhi navati, kharab bhari ashi hoti, tyamule tevha ti vatap karat asatana tyani tya jaminiche gat tayar kele , kharab jaminicha, madham jaminacha ani changali jaminach, tr gat kartana, kharab jaminich gat kela tya gatat tyani jast jamil dili ani changalya jaminichya gatat kami jamin dili, ase vatap zale pan kagat partri nondi kartana, hyacha ulekh kela nahi ani sagal shetr saman saman lavale ahe, ajun tyat jamin vatal patr tayar kartana disha nusar vegale ahe ani real madhe jamin vatal vegali keleli ahe, aaj 25 years peksha jast diwas zale he asech sagal hot ani te konala mahit pan navat, tr ata tya 3 bhavache mule partekala ahet, tyatil eka bhavachya mulani kuthun tri te vatani che pepar kadale ahet 1979 che ahet te ase mantayt pan te khare ahet ka khote he pan konala mahit nahit, pan ata te bakichya bhavachya maulana mantayt ki sagal shetr saman vatun gheych, ani jas tya vatap patrat ahe tashech gheyche, 25 years peksha jast diwas zale je te aap apale parampara gat milalel shetr jamin kart ahe v development keli ahe tya madhe tr ata kase sodanar kon hya 2 mudya vishay mahiti milavi.
Muda no. 1. Gatavr vatani zaleli, halaki bhari tyanisar jamin kami jast vaparat ahe pan kagadpatri kas ky nahi tr ata
Muda no 2. Vatani zaleli shetr vegale ahe real madhe ani tich kagadpatri disha vegalya ahet
आपल्या या जमिनीचे वाटप होऊन , तिघांचे नावावर क्षेत्र दाखल होऊन , ७/१२ स्वतंत्र झाले आहेत का ? जर ७/१२ स्वतंत्र झाले असतील तर , आपणास , जमिनीच्या उत्पादकतेच्या आधारे , जमिनीचे सरस-निरस वाटप करून मिळावे म्हणून न्यायालयात दावा दाखल करावा लागेल . जर एकत्रित तिघांची नावे दाखल असतील तर , आपण जमिनीचे सरस निरस वाटप करून मिळावे म्हणून दिवाणी संहितेच्या कलम ५४ अन्वये दावा दाखल करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sijauddin mujawar
18-05-2024
sijauddinm786@gmail.com
नमस्कार सर, मागील प्रश्नांना अपना कडून मार्गदर्शन मिळाले मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.
Sir, माझा प्रश्न असा आहे माझ्या शेता लागत आमच्या शेजारच्या शेता मधे 1972 साली तीन गुंठे क्षेत्रामध्ये बक्षीस पत्र करून ग्रामपंचायतने पाणी पिने साठी विहिर काढली आता त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता. शेतीसाठी अमाचे शेजारी करतात. विहिरीचा आमच्या लगतची बाजू पूर्ण ढासळत असून आमच्या शेतीचे नुकसान होत आहे. शेजारी विहिरीचे बधकामा करून घेण्यास सांगितले असता . ते टाळा टाळा करत आहे. Sir कृपया
विहीर हि ग्रामपंच्यातीच्या मालकीची आहे . आता त्याचा कोण वापर करत आहे हा गौण प्रश्न आहे . त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ग्रामपंच्यातीची आहे . विहीर बांधकाम करणे तुमच्या शेजार्याचे कर्तव्य नाही . त्यामुळे त्याचा निष्काळजीपणा आहे असे म्हणता येणार नाही . Res Ipsa Loquitur हे तत्व वापरता येणार नाही . त्यामुळे न्यायालयात दावा दाखल करून हि , आपल्या शेजार्याचा निष्काळजीपणा सिद्ध करता येणार नाही . जास्त शेतीचे नुकसान होत असेल तर , आपणच विहीर दुरुस्त करून घ्यावी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Santosh Ganesh Surjuse
16-05-2024
santoshgsurjuse91@gmail.com
सखाराम रावजी मुऱ्हेकर आणि सतीश पांडुरंग असोलकर यांनी सामाईक मध्ये 1.21 हे.आर क्षेत्र खरेदी केली सबब खरेदी खताच्या दोन वर्षाने त्यांनी कलम 85/2 अंतर्गत मा.महसूल नायब तहसिलदर साहेब यांचे कडे वाटणी करिता अर्ज केला सबब वाटणी अर्ज नायब तहसीलदरांनी मंजूर करून आदेश पारित केला तलाठी यांनी फेरफार घेतला त्यावर मंडळ अधिकारी यांनी दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या कुटुंबातील आहे वाटणी प्रमाणे मोजणी केली नाही असा शेरा मारून फेरफार ना मंजूर केला आता पुढे काय करावे
नायब तहसीलदार यांनी कलम ८५ खाली वाटप केल्यानंतर , मंडळ अधिकारी यांना नोंद रद्द करता येणार नाही . आपण मंडळ अधिकारी यांचे कृती विरुद्ध , जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करा . तसेच आपण आपले सरकार या माध्यमावर आपली तक्रार दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dinesh kawathekar
10-05-2024
dineshkawathekar7@gmail.com
कोर्टाच्या निर्णयानुसार जुन्या सातबारावर 2 हे.22.आर जमिनीचा आदेश आहे परंतु सध्या सातबारावर 2 हे.21 आर.जमिन आहे म्हणजे एक गुंठा कमी आहे.तर ती एक गुंठा जमिन घेण्यासाठी काय करावे.कृपया मार्गदर्शन करावे
कोर्टाच्या आदेशापेक्षा , जुने अभिलेख याची पडताळणी करून आपल्या भूखंडाचे क्षेत्र किती आहे याची खात्री करून घ्या. जर एक गुंठ क्षेत्र जास्तीचे असेल तर , क्षेत्र दुरुस्तीसाठी मा . जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रशांत chunarkar
05-05-2024
p.chunarkar786@rediffmail.com
7/12 वर वारस म्हणून नाव असून त्या वारसांना न विचारता शेती ठेक्याणे दिल्यास कोणती ॲक्शन घेता येते
ज्यांना ठेक्याने दिली आहे त्यांचेविरुद्ध फौजदारी / दिवाणी कार्यवाही /कारवाई आपण सुरु करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prathamesh Budhale
04-05-2024
budhalep56@gmail.com
I want a government resolution from 1902, GR No. 8030/17.11.1092, about disforestation of forest land
Question by Mukesh Mohan Manmode
04-05-2024
manmodemukesh@rediffmail.com
शंभर रुपयांच्या स्टॅम्प वरती वाटप पत्र होते का ? व त्याकरिता मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे आहे का ?
तसेच वाटप पत्र करण्याकरता दुसरा कुठला मार्ग आहे का?
रु १००/- वर वाटप पत्र होत नाही . मुद्रांक अधिनियम अंतर्गत अनुसुची मधील अनुच्छेद ४६ नुसार मुद्रांक शुल्क आवश्यक आहे . अन्यथा शेती स्वरुपाची मिळकत असेल तर , तहसीलदार यांचेकडून महसूल संहिता १९६६ च्या ८५ अन्वये वाटप लारून घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3380 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
