जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by रामदास सुलताने
12-10-2026
sultane.ramdas@gmail.com
जिला अमरावती, तहसील अचलपुर गांव गौरखेडा,सर्वे क्रमांक 40 प्लाट क्रमांक 21 चा 7/12 दोघांच्या नावावर दाखवला मुळात तो रजिस्ट्री प्रमाणे 21Z व 21 Y होता 7/12 पण 2810मध्ये वेगळा होता, तलाठी ने चुकीने एकत्र केला,अलग अलग करता अर्ज देऊन 50दिवस झाले,प्रश्न हा आहे की किती दिवस लागतात व कधी होईल
Question by Sachin patil
10-10-2026
udaytradingcompanymandal@gmail.com
माझ्या 7/12उतार्या वरील नावात चुक आहे ते रिपेरिंग करायचे आहे तर कसे करावे
Question by Ramesh kisan kadgaonkar
09-10-2026
kadgaonkarramesh@gmail.com
महसूल मधील तलाठ्याला त्याच्या कार्यकाळात जिथे नोकरी आहे तिथं स्वतः किंवा पत्नीच्या नावे संपत्ती घेता येते का
Question by Sushant Sonawane
09-10-2026
sushantsonawane626@gmail.com
मी मौजे करोडी, गट नं. ३७ (ता. व जि. छत्रपती संभाजीनगर) येथील जमिनीच्या वाजवी महसूल आकारणीसाठी अर्ज सादर केला होता. माझ्या अर्जाची सध्याची स्थिती (Application Status) काय आहे, हे समजेल का?"
Question by Jayesh Nair
08-10-2026
jayeshkumarnair29@gmail.com
नमस्कार सर, सर्व सहधारकांच्या संमतीने आमच्या जमिनीची पोट हिस्सा मोजणी सन २०१९ मध्ये भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करण्यात आली होती. सदर मोजणीनंतर पोट हिस्सा मोजणीचा नकाशा (क प्रत) देखील भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे. मात्र, त्यानंतर संबंधित कार्यालयाकडून पोट हिस्स्यांची पुढील फाळणी करून स्वतंत्र ७/१२ उतारे तयार करण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
दरम्यानच्या काळात एका हिस्सेदाराने त्याच्या हिस्स्यातील जमीन विक्री केली असून, त्या खरेदीखताच्या आधारे नवीन खरेदीदाराचे नाव संबंधित ७/१२ उताऱ्यावर दाखल झाले आहे. तथापि, अद्याप सदर ७/१२ उतारा स्वतंत्रपणे फुटलेला/फाळणी झालेला नाही. याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता, आता पुन्हा पोट हिस्सा मोजणीचा अर्ज करून त्यानंतर पुढील कार्यवाही करावी लागेल, असे सांगण्यात आले. मात्र, यापूर्वीच सन २०१९ मध्ये सर्व सहधारकांच्या संमतीने पोट हिस्सा मोजणी झालेली असून, त्याचा नकाशा (क प्रत) देखील उपलब्ध आहे. त्यामुळे त्यानंतरची फाळणीची कार्यवाही न होणे हा विलंब संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाकडून झालेला असल्याचे दिसून येते.
अशा परिस्थितीत, सन २०१९ मध्ये झालेली पोट हिस्सा मोजणी व उपलब्ध असलेला ‘क प्रत’ नकाशा ग्राह्य धरून पुढील फाळणीची कार्यवाही करता येऊ शकते का? तसेच, कार्यालयाच्या विलंबामुळे पुन्हा पोट हिस्सा मोजणीचा अर्ज व त्यासाठीचे शुल्क भरणे आवश्यक आहे का? याबाबत संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाने कोणती कार्यवाही करणे अपेक्षित आहे, याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
Question by श्रीराम गोरडे
08-10-2026
shriramgorde@gmail.com
एका व्यक्तीने रस्ता मागणी संदर्भात तहसीलदारांकडे अपील केले होते. तहसीलदारांनी 143 अन्वये रस्ता काढून देण्यासंदर्भात आदेश पारित केले आहेत. परंतु प्रतिवादींनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. वादीचे म्हणणे आहे की रस्त्याची नोंद तलाठी कार्यालयात एक फ ला घेण्यात यावी.
त्यामुळे तहसीलदाराचे आदेश मानावेत की न्यायालयात निकाल प्रलंबित असल्यामुळे नोंद घेऊ नये. कृपया मार्ग सुचवावा
Question by krishnaP
06-10-2026
krishnapuja@gmail.com
एकाच गावातील काही सातबारा मध्ये माझ्या वडिलांचे नाव आहे तर काही सातबारामध्ये माझ्या आजोबांचे नाव आहे. आजोबा जानेवरी 1967 मध्ये मयत झाले आहेत.
आजोबांचा मृत्यूचा दाखला गहाळ झाला आहे. इतर काही जुन्या फेरफारमाध्ये आजोबांच्या मृत्यूची नोंद आहे. आजोबांचा वारस तपास करण्यासाठी आणि वडिलांचे नाव सातबारावर येण्यासाठी काय करावे लागेल याचे कृपया मार्गदर्शन करावे.
Question by Ratnadip Gadade
06-10-2026
ratnadipgadade14@gmail.com
नमस्कार सर माझे पणजोबा 1950साली मयत झाल्यावर वारस रजिस्टर ला माझ्या वडिलांचे नाव नातू वय 4वर्ष (पूर्वमृत मुलाचा मुलगा ) आहे. त्यांच्या नावासोबत पणजोबांची भावांची नावे आहेत. माझ्या वडिलांचे नाव वय 4वर्ष असताना एकत्र कुटुंब पुढारी असा शेरा आहे.मंजूर फेरफारला मयतास वारस नातू रमेश असा उल्लेख आहे. कुठेही एकत्र कुटुंब पुढारी उल्लेख नाही. वारस रजिस्टर ला पणजोबांचे भावाचे वारस 6क चा वापर करून तहसीलदार कार्यालयात सारखा अर्ज करत असतात. दोन वेळा नोंद रद्द झाली आहे.. जमीन पणजोबानी 1931साली खरेदी केली आहे.
Question by Mudsseer Shaikh
05-10-2026
shaikhmudsseer@gmail.com
माझं प्रश्न असा आहे की एक ऑक्टोबर 2026 पासून जन्म दाखल्याची प्रोसेस चालू झाली आहेतर याला डॉक्युमेंट काय काय लागणार याची प्रोसेस कशी असणार एकदम व्यवस्थित तपशील ?
Question by रामदास सुलताने
05-10-2026
sultane.ramdas@gmail.com
जिला अमरावती महाराष्ट्र, तहसील अचलपुर ,गांधी गौरखेडा,शेत सर्वे क्रमांक 40 प्लाट क्रमांक 21y व 21zअलग अलग थे, रजिस्ट्रेशन भी अलग अलग, फेरफार भी अलग अलग 2010मे, लेकीन अब दोनो प्लाट के y और z हटाकर प्लांट 21 में दो नाम जोड लिये.नाम तो सही हैं लेकीन अलग अलग को एक कीया.तहसीलदार अचलपुर को दिनांक 24-08-2026को लीखित मे निवेदन कीया हैं अभितक निराकरण नहीं हुआ
Question by govind ambhure
21-09-2026
govindambhure1@gmail.com
यापूर्वी मी सासूच्या नावावरून सुनेच्या नावावर वाटणी फेरफारने जमीन हस्तांतरित करता येते का असा प्रश्न विचारला होता त्यावर आपल्याकडून नाही उत्तर मिळाले, त्यासाठी कायद्यातील या तरतूद/नियम लेखी लेटर किंवा कागदोपत्री पुरावा द्यावा ही नम्र विनंती
Question by वसीम नागणी
18-09-2026
drvasim4u@gmail.com
नझुल वर्ग ब ते वर्ग अ 02/03/2019 व 03/03/2025 चा gr copy
Question by मुसा खान
17-09-2026
k.moosa6666@gmail.com
अदिवासी भूधारकास विकास करणेकामी गैर अगैर अदिवासी विकासकास जिल्ह्य़ाधिका-यांन मार्फत पाच वर्षासाठी भाडेतत्त्वावर देता येते का ?
Question by Akhtar Sayyed
16-09-2026
sayyedakhtar53130@gmail.com
एका व्यक्तीने 4 एकर जमीन 1990 मध्ये खरेदी केली. ते गायरान जमीन असल्याचा त्याला नंतर माहिती झाले. त्यामुळे 7/12 वर त्याच्या नावाची नोंद आज पर्यंत झाली नाही. त्या खरेदीदारास शर्तभंग नियमित करण्याचा नजराणा व वर्ग एक मध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया एकाच वेळी करता येईल का?
मुलाःत , जमीन ही गायरान असल्याकारणाने , ती आपल्याला मिळणार नाही अथवा आपल्या नावावर होणार नाही . त्यामुळे तर आपले नाव अद्याप अधिकार अभिलेख ( ७/१२) सदरी दाखल झाले नाही . त्यामुळे वर्ग-२ चे वर्ग -१ होण्याचा प्रश्न उद्भवत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अशोक यशवन्त मोरे
14-09-2026
aymore1952@gmail.com
माझ्या जमिनीला 57चे कुळ लागले आहे.. 1974 मधील 32 ग सूनावणीत कुळ गैर हजर राहिले न्यायाधिकरणाने कुळ खरेदी निरर्थक ठरवली् व कूळाचे नाव 7/12 कमी करण्याचा आदेश दिला कुळाला तसेच त्याच्या मुलाला व नातवाना सदर निकाल मान्य आहे आता 52 वर्षांनी पुन्हा 32ग सुनावणी होउ शकते का?
कलम ३२-ग खाली किंमत निच्छित करतेवेळी , कुळ हे सुनावणीसाठी अनुपस्थित राहिले त्यामुळे , न्यायाधीकरणाने ३२-ग किंमत निश्छिती निरर्थक ठरवली. परंतु ३२-ग किंमत निच्छित प्रक्रिया निरर्थक झाली आहे याबाबत , नोटीस / सूचना , त्या कुळाला दिलेली होती का ? अशी नोटीस दिल्याबाबतचा पुरावा / नोटीसची प्रत , न्यायाधीकरणाच्या आभिलेखात असणे आवश्यक आहे .
राजाराम तुकाराम पवार विरुद्ध मुक्ताबाई नारायण साळुंखे, 2013 (4) ALL MR 271, दिनांक १९ मार्च २०१३, विशेषतः परिच्छेद १५ ते १७ आणि २८.
या प्रकरणात, कुळाच्या अनुपस्थितीमुळे सन १९६४ मध्ये जमीन खरेदी निष्प्रभ ठरविण्यात आली होती. मात्र, सदर आदेश कुळास कळविण्यात आला नव्हता, ही बाब निर्विवाद होती.
न्यायालयाने असे ठरविले की, आदेश कुळास कळविण्यात न आल्यामुळे जमीन खरेदी निष्प्रभ ठरविणारी घोषणा प्रभावी झाली नव्हती. त्यामुळे, सुमारे २३ वर्षांचा विलंब झाल्याचा आक्षेप असूनही, त्यानंतर करण्यात आलेली खरेदी किंमत निश्चितीची कार्यवाही न्यायालयाने वैध ठरविली.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sijauddin Mujawar
09-09-2026
sijauddinm786@gmail.com
नमस्कार सर, 1952साली वारस नोद ही महसूल अधिनियमाप्रमाने केली जात होती का ? जातीनिहाय
म्हणजे हिंदू किवा मुस्लिम वारस कायद्या प्रमाणे
नोद होत होती . कारण आमचे मुस्लिम कुटूंब असताना आमच्या पूर्वी वारस नोदी मुस्लिम कायद्या प्रमाणे न होता. हिंदू कायद्या प्रमाणे एकूप, कर्ता अशी झाली आहे. आता आमच्या कीटूबातील वारस मधे वाद निर्माण झाले आहे. त्यांनी अर्जामधे असे नमुद केले आहे. की मुस्लिम कायद्या नुसार कर्ता , एकूम अशी कोणती संकल्पना नाही. त्यामुळे याचा अर्ज फेटाळण्यात यावा.
माझा प्रश्न असा आहे की, आत्ता मुस्लिम वारस मधे
जुन्या नोदीचां ए कू म , कर्ता म्हणून विचार कराता येतो का ?
ज्यावेळी मुस्लीम व्यक्ती कोणतेही मृत्यपत्र न करता मरण पावते , त्यावेळी , मुस्लीम व्यक्तीविषयक विधी ( शरियत ) प्रयुक्ती अधिनियम , १९३७ याच्या कलम २ नुसार , कोणताही परिपाठ अथवा रूढी असल्या तरीही , शेतजमीन सोडून , तिच्या वारासंबाबत मुस्लीम व्यक्तीविषयक कायद्यानुसार निर्णय घेणे आवश्यक आहे . १९३७ च्या कायद्यानुसार , शेतजमीन मुस्लीम व्यक्तीविषयक कायद्या यातून वगळलेली आहे . त्यामुळे शेत जमिनीला मुस्लीम व्यक्तिगत कायदा लागू न होता , रूढी व परीपाठानुसार वारस निच्छित केले जातात . त्यामुळे आपली मिळकत कोणत्या स्वरुपाची आहे त्यावर , मुस्लीम व्यक्तीविषयक विधी ( शरियत ) प्रयुक्ती अधिनियम , १९३७ लागू होतो कि नाही हे निच्छित होईल . जर मिळकत बिनशेती या वर्गातील असेल तर , निच्छितच , मुस्लीम व्यक्तीविषयक कायदा- शिया अथवा सुन्नी लागू होईल .
मिळकत ही शेती स्वरुपाची असेल तर , सन १९५१ मध्ये ज्या रूढी व परिपाठ अस्तित्वात होते त्याप्रमाणे वारस निच्छित होतील . जर त्यावेळी असलेल्या रूढी व परंपरा या हिंदू वारसा कायद्याप्रमाणे असतील तर , मुस्लीम व्यक्तीची शेती मिळकत याला , हिंदू वारसा कायदा याप्रमाणे वारस निच्छित होऊ शकतात . आपले वारस सन १९५१ मध्ये निच्छित झालेले आहेत, त्यामुळे केवळ फेरफार नोंद आह्वानीत करून त्यांना उपयोग नाही . न्यायालयात जावे लागेल व वारस निच्छित करून त्याप्रमाणे ताबा मागावा लागेल.काही जे हिंदू धर्मांतरण करून मुस्लीम झाले आहेत त्यांचे वारस , रूढी आणि परंपरा नुसार , हिंदू कायद्याप्रमाणे निच्छित होतात .
मा उच्च न्यायालयाचे खालील निर्णय वाचावे .
१.Hirbai Vs Gorbai (1875) 12 Bom. H.C.R
2. Nina Anwar Merchant Vs Karim Ul Haq Meghnani & Ors.
उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे , जर हिंदू रुढीप्रमाणे , वारस निच्छित केले असतील तर , केवळ फेरफार नोंद आह्वानीत करून उपयोग होणार नाही . दिवाणी न्यायालयात सिद्ध करावे लागेल सन १९५१ मध्ये हिंदू प्रथेप्रमाणे वारस निच्छित होत न्हवते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिल्पा बोबडे
05-09-2026
shilpat.bobade@gmail.com
महसूल व वनविभाग संबंधित सर्वं शासन निर्णय व अधिसूचना
https://maharashtra.gov.in/Site/1603/Government-Decisions या संकेत स्थळावर आपणाला सर्व शासन निर्णय भेटतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by govind ambhure
04-09-2026
govindambhure1@gmail.com
सासूच्या नावावरून सुनेच्या नावावर वाटणे फेरफार ने जमीन हस्तांतरित करता येते का
Question by ALLAMBASHA RANJAN BALGAON
30-08-2026
allamabhasha49@gmail.com
मी जमीन खरेदी केली आहे ते जमीन शिलिंग ऍक्ट आहे भोगवटदार -2 आहे भोगावाटदार -1 होतो का
होय .
file:///C:/Users/Kiran%20Panbude/Downloads/Maharashtra-Agricultural-Land-Ceiling-on-Holdings-Conversion-of-ClassII-Occupancy-into-ClassI-Occupancy-Rules-2026-may072026%20(2).pdf हे नियम पहा . त्याद्वारे वर्ग-२ - जमीन वर्ग-१ मध्ये रुपांतरीत होते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ॲड दिनेश पिराजी जाधव
24-08-2026
dineshjadhao648@gmail.com
महसूल विभाग अंतर्गत कोणत्या कोणत्या पदावर भरती होता येते आणि एक वकील साठी कुठल्या जागा भरल्या जाते याची माहिती हवी आहे जेणेकरून त्याची तयारी करू शकू.
Question by yadav uikey
20-08-2026
yadavuike@gmail.com
शेतमजूर आदिवासी ते आदिवासी वर्ग २ ची जमीन शेती प्रयोजनकरिता विक्री करायची असल्यास नजराणा किती भरावा लागणार
आदिवासी जमीन विक्रीसाठी नझराना आवश्यक नाही . मात्र जमिनीचे बाजारमूल्य विक्रेत्याच्या बँक खात्यावर जमा करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sushant vartak
13-08-2026
sushantvartak1980@yahoo.co.in
नमस्कार सर , एखाद्या सातबाऱ्यावर एकपेक्षा अधिक खाते असतील आणि एकाहून आधीक खाते हे वाटणी , खरेदी किव्हा विक्रीने न होता आणेवारी मुले झाले असतील तर त्या दोन वेगवेगळ्या खात्यामधील व्यक्ती जे सखे चुलत भाऊ असतील तर त्यांच्या मध्ये जमिनीचा हक्क सोड होऊ शकतो का .
नमस्कार सर , एखाद्या सातबाऱ्यावर एकपेक्षा अधिक खाते असतील आणि एकाहून आधीक खाते हे वाटणी , खरेदी किव्हा विक्रीने न होता आणेवारीमुळे झाले असतील तर त्या दोन वेगवेगळ्या खात्यामधील (एकच सातबाऱ्यावरील )व्यक्ती जे सखे चुलत भाऊ असतील तर त्यांच्या मध्ये जमिनीचा हक्क सोड होऊ शकतो का .
एखादा भाऊ आपल्या हिस्स्याचा एका सातबाऱ्यावरील काही भागाचा जसे (२५ ते ७५ टक्के )हिस्सा (संपूर्ण नाही) हक्क सोड करू शकतो का .
हक्क सोडणे म्हणजे जमिनीची विक्री करणे असा आहे. मुद्रांक आधीनियमामध्ये अनुच्छेद ५२ नुसार , केवळ वडिलोपार्जित मिळकतीमधील हक्क सख्या भावाच्या लाभात सोडला तरच मुद्रांक शुल्क रु.५००/- एवढे आहे . अन्यथा मुद्रांक शुल्क अनुच्छेद २५(ब) नुसार , विक्री दस्त इतके आहे . आपल्या प्रकरणात चुलत भावाच्या लाभात हक्क सोडता येणार नाही. .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar
09-08-2026
pirthanis@gmail.com
माझ्या नावावर आज रोजी असलेली जमीन ही माझ्या आजोबांनि घेतलेली होती यांच्या मृत्यु नंतर ती जमीन वारसा हक्काने त्यांच्या 2 मुलांच्या नावावर आली नंतर दोघा भावांनी ती वाटणी करून घेतली. नंतर माझ्या वडिलांचा हयातीत त्या जमिनी पैकी काही जमीन ही मला वाटून दिली व उरलेली जमीन ही माझ्या वडिलांच्या मृत्यू झाल्यानंतर ती जमीन मला वारसने मिळाली तर ती जमीन वडिलोपार्जित आहे का व माझ्या मुलांचा त्याच्यात जन्मतः अधिकार आहे का?
Question by Arjun Thoratt
03-08-2026
arjunthorattofficial@gmail.com
माझ्या हिश्याची ७/१२ हि डिजिटल ऑनलाईला दिसत नाहीये आणि गेल्या २ वर्षांपासून तलाठी "क्षेत्र जुळत नाही" हेच सांगत आहेत परंतु त्यात आजपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. आणि त्यामुळे ७/१२ ऑनलाइनला दिसत नाहीये.
Question by Bhushan Aatmaram Thakare
02-08-2026
bhushanthakare919@gmail.com
श्रीमान. आमची 0.45 आर जमीन बोर्विहिर ते नरडाणा रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन झाली आहे तर आम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळेल का ?
ठाकरे साहेब , रेल्वे आधीनियमाखाली संपादित झालेल्या जमिनींना नवीन भू संपादनाच्या तरतुदी , केंद्र शासनाने कलम ११३ खाली अडचणी दूर करण्याचा आदेश २०१५ अन्वये लागू केलेल्या आहेत . मात्र या संपादनामुळे आपण विस्थापित झाला आहात का ? त्यावर अवलंबून आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3468 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
