जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Bapu Eknath Rokade
27-08-2024
bapu.rokde@gmail.com
small farmer area minimu
Marginal farmer area minimum requir
According to the RBI, a ‘Marginal Farmer’ is a farmer who cultivates up to 1 hectare of agricultural land (as an owner, renter, or sharecropper) (2.5 acres).
A farmer farming agricultural land of more than 1 hectare and up to 2 hectares (as owner, renter, or sharecropper) is referred to as a “small farmer” (5 acres).
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनेश विष्णू दाभोलकर
25-08-2024
dabholkar.dinesh@gmail.com
नमस्कार सर ,
आम्ही तहसीलदार कार्यालयात कलम १५५ अंतर्गत जुनी काही नावे काढण्यासाठी दुरुस्ती अर्जे आमच्या नेमणूक केलेल्या वकिलांमार्फत ऑक्टोबर २०२३ ला सबमिट केला आहे , पण आज या गोष्टीला या ऑक्टोबर ला १ वर्ष पूर्ण होईल पण अजून काही तहसीलदार साहेबांकडून एक हि दिनांक वर हजर नाहीत फक्त आम्हाला दोन दोन महिन्याच्या पुढील दिनांक तहसीलदार कार्यालयातून देण्यात येतात.
जर सामान्य माणूस जर काही न्याय मागत आहेत तर किती दिवस आणि वर्ष वाट पाहायची , तहसीलदार साहेबानी किमान १५ दिवस पुढे दिनांक देऊन लोकांना वेळ दिले पाहिजे त्याच्या समस्श्या समजून घेतल्या पाहिजे
या वर कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
सेवा हक्क अधिनियम या नुसार कलम १५५ खालील दुरुस्त कार्यवाहीला किती कालवधी विहित करण्यात आला आहे या बाबत , नागरिकांची सनद या मध्ये कालावधी देण्यात आला आहे . नागरिकांची सनद याचे फलक , तहसील कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहेत . जर या कालावधीत आपल्या लेखन प्रमाद दुरुस्ती अर्जावर कार्यवाही झाली नसेल तर सेवा हमी कायदा या अंतर्गत आपण अपील दाखल करावे . अन्यथा आपले सरकार हे online पोर्टल वर आपली तक्रार मांडू शकता . या शिवाय लोकशाही दिन या दिवशीही मा जिल्हाधिकारी यांचेकडे गाऱ्हाणे मांडू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by स्वराज
24-08-2024
sagar06731@gmail.com
एक गट ९४ गुंठे इतका आहे त्या पैकी आमच्या आजोबांनी १९४८ साली १/२ म्हणजे ४७ गुंठे जमीन मालक कडून रजिस्टर खरेदी केली व नंतर मार्च १९६४ साली आजोबांनी उरलेल्या ४७ गुंठे जमिनीचे जमीन मालकाकडून कब्जे चे रजिस्टर साठेखत केले होते मात्र जमीन मालक ह्या जून १९६४ साली मयत झाल्याने खरेदीखत होवू शकले नाही मात्र पीक पाहणी सदरी आजोबा यांचे नाव पूर्ण ९४ गुंठे वर दिसते आहे १९६४ पासून १९९४ पर्यंत .१९७० साली मुळ मालकाच्या नातू व पत्नी यांचे नाव मुख्य उताऱ्यावर आणि दोन मुलींची नावं इतर हक्कात लागली होती.१९९४ साली माझ्या वडिलांनी उर्वरित ४७ गुंठे हे मूळ जमीन मालकाच्या एकमेव नातवा कडून खरेदी केले मात्र मुळ जमीन मालकाच्या दोन मुलींची नावे इतर हक्कात राहिले तसेच आज पर्यंत सर्व जमीन वर कब्जा वडिलांचाआहे.आज मुळ मालकाच्या दोन मुली मयत असून एका मुलीच्या वारसांनी हक्कसोड करून दिले आहे मात्र दुसऱ्या एक मुलीचे वारस हक्क्सोड देत नाही आहे व खूप जास्त मोबदला मागत आहे त्याच्या ४७ गुंठ्या पैकी १/३ हिस्यासाठी.
वरील माहिती का अनुसरून
१.आजोबांनी जे १९६४ साली जे रजिस्टर साठेखत केलं त्या आधारे वारसाची नावे कमी करू शकतो का?
२.राहिलेल्या वारसाच्या हिस्स्याचा तुकडा पडत आहे तर आम्ही तर न्यायालय किंवा जिल्हाधिकरी यांच्या कडे खरेदी चा दावा करू शकतो का?
३.अजून काही मार्ग असेल तर सुचवावे
आपल्या आजोबांनी १९६२ मध्ये जे साठे करार केलेला आहे त्या आधारे आपण न्यायालयात जाऊन जे वारस आपले लाभात हक्क सोड पत्र करत नाहीत त्यांना साठे कराराप्रमाणे खरेदीखत करणे बाबत भाग पाडण्यासाठी न्यायालयाला विनंती करा.
सदरचा दावा आपण विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम१९६३ अन्वय करू शकता.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by GOVIND ANAND LELE
19-08-2024
anandsut@gmail.com
शेत जमिनीवर शेत घर बांधण्याची अनुमती मिळवण्याचे अर्ज व लागणारी कागदपत्रे. तसेच असा अर्ज कोणत्या अधिकाऱ्या कडे दाखल करावयाचा त्याची माहिती मिळेल का ?
शेतघर बाधण्यासाठी जिल्हाधिकारी/ उप विभागीय अधिकारी / तहसीलदार यांची परवानगी आवश्यक आहे . अर्जासमवेत , प्रस्तावित बांधकामाचा नकाशा आवश्यक आहे . ७/१२ उतारा हि आवश्यक आहे . शेतघर परवानगीचे मुल अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत . काही जिल्ह्यात उप विभागीय अधिकारी अथवा तहसीलदार यांना हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by p d salunke
18-08-2024
salunkeprakash02@gmail.com
we live in khopoli muncipal area the
necessary permision for construction o f house in year 1972 was granted the land was belong to x man who was a kul. in year1990 become owner to pay all fees to revenue depart with n. a. pemision from.the bombay tenancy act 1948 collector sold this land ,till some part is his relatives name as he die. Colam 64on page 59-60.can we gate this write how if sold this land to others without asking us
प्रश्न समजून येत नाही . सुलभ व सोप्या मराठी भाषेत प्रश्न मांडा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by vasant eknath kumbhar
18-08-2024
diliparmy@gmail.com
मी सांगली येथे आमच्या गावातील गावठाण भागात 1998 मध्ये नोंदणीकृत कराराद्वारे घर खरेदी केले. घर सी.टी.एस. क्र. 685 आणि 686 वर बांधलेले आहे. मी हस्तांतरणासाठी संबंधित उप भूमि अधीक्षक कार्यालयाकडे संपर्क साधला, तेव्हा मला आढळले की, वरील सी.टी.एस. प्रॉपर्टी कार्ड घर विक्रेत्याच्या नावावर नसून हक्काचा मूळ धारक H-बिगर परवाना बिन शेती, वर्ष-1977 च्या नावावर आहे. कृपया मला मार्गदर्शन करा, मी माझ्या नावावर दोन्ही प्रॉपर्टी कार्ड कसे हस्तांतरित करावे.
Question by Anshumol
13-08-2024
anshumol2007@gmail.com
माझ्या आजोबांची दोन लग्न झालेली होती. माझी आजी ही प्रथम पत्नी असून माझी आई व दोन मावशी अशी आपत्य असून सावत्र आजीला एक मुलगा आहे. माझ्या आजोबांनी त्यांचे मृत्युपत्र करुन ठेवले आहे. यामधे सर्व जमीन मामाच्या नावे दिली असून त्यामधे रहाते घर माझी आजी असे पर्यंत तीच्या नावे असेल व तिच्या पाश्च्यात ते मामाच्या नावे होईल असा उल्लेख केला आहे. मात्र गेल्या वर्षी माझ्या आजीला हॉस्पिटलसाठी 3 लाख रुपये खर्च आला, लोकांची देणी देणेकरीता म्हणून आजीने ते खर विकले. तर माझ्या सावत्र मामाने सदर विक्री दस्तास हरकत घेतली आहे व ज्यांना घर विकले आहे, त्यांचे नाव ग्रामपंचायतीमधे नोंद करणेस अडथळा आणत आहे. परंतू मृत्युपत्रामधे आजीने तिच्या हयातीत त्याची विक्री करु नये असा कुठेही उल्लेख नाही. तिच्या गरजेकरीता ती घराचा व्यवहार करु शकते का? याबाबत काय करावे मार्गदर्शन व्हावे.
आपल्या आजीला घर हे केवळ तिच्या हयातीतच तिला राहण्यासाठी मृत्युपत्राने दिले होते मात्र तिच्या मृत्यू पक्षात ते घर मामाला मिळणार आहे. त्यामुळे आजीला घर विकण्याचा कोणताही अधिकार नव्हता. मात्र आपण तर आता घर विकलेले आहे . जोपर्यंत जो नोंदणीकृत दस्ताद्वारे आपण विक्री केलेली आहे ते रद्द होत नाही तोपर्यंत ज्याने आपल्या आजी कडून घर विकत घेतलेले आहे त्याला कोणतीही अडचण नसावी. आपल्या मामाला जोपर्यंत दिवाणी न्यायालयात जाऊन खरेदीखत रद्द करत नाही तोपर्यंत त्याच्या नावे ती मिळकत होऊ शकत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shubham Bhosale
12-08-2024
bhosaleshubham03@gmail.com
कृपया तलाठी कार्यालयातील महत्वाच्या अर्जांचे pdf website वर अपलोड करावे. जेणेकरून लोकांना सेवा मिळवण्यासाठी सोयीस्कर होईल.
Question by Vikram Bandu Bhujbal
08-08-2024
vikram140389@gmail.com
सातबारा मध्ये इतर अधिकारात कुकडी प्रकल्पाकडे वर्ग असा शेरा असेल तर तो तहसीलदार यांना आदेश करुन काढता येतो का
Question by Mahesh sarode
08-08-2024
maheshsarode383@gmail.com
मा. साहेब
दिवाणी न्यायालयात 2016 रोजी लागलेल्या निकालाचे विरोधात अपील सुरु आहे,
सामनेवाले ह्यांनी दावा सूरू असताना 2011 मध्ये एक सर्वे नंबर विक्री केली,
दुसरा सर्वे नंबर निकाल लागल्या वर लगेच 2017 मध्ये विक्री केला,
दावा अपील सूरू आहे तर ह्या प्रकरणांत नोंदणीकृत खरेदी दस्त रद्द करणे साठी वेगळी केस दाखल करावी लागेल का?
त्या दस्त रद्द करणे साठी विलंब लागू होतो का कृपया मार्गदर्शन करावं विनंती ,
एखाद्या मिळकतीबाबत न्यायालयात दावा आहे म्हणून ती विकता येत नाही असे नाही. जोपर्यंत दावा चालू आहे तोपर्यंत मिळकतीमध्ये कोणतेही त्रस्त पक्षाची हितसंबंध निर्माण करू नयेत अथवा दाव्यात नमूद मिळकत हस्तांतरित करू नयेत असे न्यायालयाचे आदेश होत नाहीत तोपर्यंत मिळकत विकण्याला कोणतीही अडचण असत नाही. आता ज्या दस्ताद्वारे मिळते तिचे हस्तांतरण झालेले आहेत ते दस्त निश्चितपणे रद्द करून घ्यावे लागते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रफुल्ल वगळ
06-08-2024
prafull.vagal@gmail.com
रायगड जिल्यासाठी जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र बागायत 5 गुंठे, जिरायत 15 गुंठे तसेच पड /वरकस 20 गुंठे आहे त्या बाबतचा शासन निर्णय मिळेल का?
महाराष्ट्र धारण जमिनीचे एकत्रीकरण करणे व तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे याबाबतचा अधिनियम यामध्ये दिलेल्या अनुसूची मध्ये जिरायत बागायत तसेच भात शेती यांचे प्रमाणभूत क्षेत्र दिलेले आहे. त्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh sarode
06-08-2024
maheshsarode383@gmail.com
मा. साहेब
पोकलिस्त कुल नोंद विरुध्द केस दाखल केल्यानंतर समनेवाले ह्यांनी एकूण 9 सर्वे नंबर पैकी एका सर्वे नंबर चे 32म प्रमाणपत्र मिळवले आहे, कुळ नोंद व 32ग नोंद रद्द झाल्यावर 32म सुद्धा आपोआप रद्द होईल का? कृपया माहिती द्यावी,, त्याचप्रमाणे कोणत्या कलम, कायदा अन्वये केस दाखल करावी मार्गदर्शन करावे विनंति
32 ग ची कार्यवाही जर रद्द झाली तर आपोआपच 32 ग आधारे जे 32 प्रमाणपत्र दिलेले आहे ते रद्द होणारच. मात्र 32 ग ची कारवाई कोणी रद्द केली हे प्रथम पाहावे लागेल. कारण 32 जर कार्यवाही प्रांताने रद्द केलेली असेल तर तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमिन अधिनियम च्या कलम 74 अन्वये आपल्याला अपील दाखल करावे लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन त्र्यंबक जावळे
31-07-2024
sachin19121981@gmail.com
माननीय महोदय,
मी सचिन जावळे राहणार बदलापूर येथील रहिवासी आहे.सर्वप्रथम श्री.किरण पाणबुडे सर तसेच महाराष्ट्र सिविल सर्विसेसमधील इतर मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो.11-जुलै व 15-ऑगस्ट-2015मध्ये मला श्री.किरण पाणबुडे सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मला एक प्रकरण हाताळण्यास खूप मोठी मदत झाली,त्यांचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही.मी फेब्रुवारी-2017मध्ये बदलापूरगाव येथे बिल्डरकडे एक फ्लॅट/रूम बुक केलेला.मला नोव्हेंबर, डिसेंबर-2017पर्यंत फ्लॅट/रूमचा ताबा देण्याचे आश्वासन दिले.मी बुकिंगची रक्कम भरल्यानंतर बिल्डर म्हणतो कि बुकिंग रक्कम नॉन रिफंडेबल असते.नंतर फ्लॅट/रूमचा प्लॅन बदलणे,एरिया कमी देणे,वेळेत फ्लॅट/रूमचा ताबा न देणे,अशी फसवेगिरी बिल्डरकडून चालू झाली.आतापर्यंत सतत पुढील महिन्यात फ्लॅट/रुमचा ताबा देतो असे सांगून फ्लॅट/रुमचे कामपण बिल्डर पूर्ण करत नाही आणी फ्लॅट/रूमचा ताबापण देत नाही.आज वर्ष-2024 येऊन गेले तरी फ्लॅट/रूमचा ताबा बिल्डर देत नाही.एक व्यक्तीने त्यांच्या घरातील दाग दागिने सर्वकाही विकून फ्लॅट/रूम बुक केलेला,पण त्याची आर्थिक परिस्थिती खूपच गरिबीची असल्याने तो पुढील घराचे हप्ते भरू शकला नाही,म्हणून बँकेने त्याच्या फ्लॅट/रूमवर जप्ती आणली शेवटी त्याला नाईलाजाने सर्व घरातील सामानवगैरे विकून रडत रडत गावी जावे लागले.याव्यतिरिक्त अजून काही फ्लॅट/रूमवर बँकेने जप्ती आणली.बिल्डर बांधकामाची साईट परस्पर दुसऱ्या व्यक्तीला सोपवून स्वतः सामोरे यायला तयार नाही.बिल्डरच्या खराब व्यवहारामुळे त्या बिल्डिंगमधील सर्वांना खूप त्रास झालेला आहे. बिल्डर विरोधात पोलीस तक्रारपण केली आहे,तरी त्या बिल्डरला काही फरक पडत नाही.या प्रकरणात आमचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.रेरामध्ये केस टाकली तर वकील वगैरे लावावा लागतो का,कारण माझे घरभाडे आणी घराचा हफ्ता दोन्ही जात आहे. मला आता बिल्डरकडून माझी झालेली नुकसान भरपाई व झालेली फसवणूक करणाऱ्या या बिल्डर विरोधात कठोरात कठोर कारवाई कशाप्रकारे करता येईल,त्याबद्दल आपल्याकडून योग्य तो सल्ला मला देण्यात यावा,ही नम्र विनंती.
आपण ज्या गृह-निर्माण प्रकल्पामध्ये सदनिका घेतली आहे , त्या प्रकल्पाची रेरा प्राधिकरणाकडे नोंदणी झाली असेल तर आपण रेरा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करू शकता . जर प्रकल्पाची नोंदणी रेरा प्राधिकरण यांचेकडे झाली नसेल तर , ग्राहक संरक्षण कायद्याखाली , जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nasib Ashpak Shaha
28-07-2024
shahanasib@gmail.com
Question by Anoop purushottam nandurkar
25-07-2024
anupnandurka@gmail.com
Mi akolya ch aho.
Amhala Wadilachi 3 acre koradwahu zamin ,2 bhava madhe watayachi ahe .
Kas kay karaw lagel.
महाराष्ट्र धारण जमिनीचे एकत्रीकरण करण्याबाबत व त्याचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम या नुसार , अकोला जिल्ह्यामध्ये प्रमाणभूत क्षेत्र किती आहे ? या बाबतची माहिती घ्यावी . जर कोरडवाहू क्षेत्रासाठी हे प्रमाण , दोन भावांमध्ये वाटप होऊन मिळणाऱ्या क्षेत्रापेक्षा कमी असेल तर , वाटप करून घ्यावे . वाटप तहसीलदर यांचेकडे महसूल संहितेच्या कलम ८५ खाली करता येईल अथवा आपण नोंदणीकृत वाटप करून घेयू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Prakash More
22-07-2024
paka.pm3922@gmail.com
महोदय,
मी प्रकाश भिमराव मोरे
मु. आमशी, पो. हरचंदी, ता. महाबळेश्वर, जिल्हा सातारा. येथील रहिवासी असून.
आमची वडिलोपार्जित जमीन मौजे आमशी पो. हारचंदी ता. महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे असून. ONLINE पद्धतीने सातबारा नोंद करीत असताना आमचा १ सर्वे क्रमांक सरकार जमा झाला आहे. वडिलांचे निधन झाले (जुन २०२२) त्यानंतर वारस नोदं करताना हि बाब आमच्या लक्षात आली.
व आम्ही सदरील सर्वे क्रमांक पुन्हा वडिलांचे नवे व्हावा याकरिता मा. तहसीलदारसो महाबळेश्वर यांचे कार्यालयात तक्रार वजा अर्ज सादर केला (तशी पोहोच देखील घेतली.) परंतु आमच्या अर्जावर / तक्रररीवर १ वर्ष झाले तरी काही कार्यवाही झाली नाही. सदरील अर्जाची स्थिती जाणून घेणे करीत तहसील कार्यालय महाबळेश्वर येथे भेट असता त्यांनी थातुर मातुर करणे देऊन आम्हाला तेथून जाऊ केले. व काही दिवसांनी आम्हाला संबधीत कागदपत्रे जमा करण्याकरिता पत्राद्वारे कळविण्यात आले. आम्ही संबंधित कागदपत्रे जमा केल्यानंतर देखील अजूनही सदरील सर्वे क्रमांक सरकार जमा आहे असे दिसून येते.
सदरील घटनेला अर्ज / तक्रार केले पासून जवळ जवळ १ वर्षे ७-८ महिने होत आहे आहेत. यावर त्वरित कारवाई करावी यासाठी आम्ही काय करावे?
१. माहिती अधिकारातून माहिती मिळू शकेल का?
हो असलेस कुठे व कशाप्रकारे मिळेल.
२. विलंब करणाऱ्या संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी यांचे वर कारवाई होईल का ?
हो. असलेस कोण करेल.
३. आमचा सर्वे क्रमांक आम्हाला माहिती न देता होता परस्पररित्या सरकार जमा कसा झाला याचे उत्तर कुठे मिळेल.
आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आपण , आपले सरकार या online संकेत स्थळावर तक्रार दाखल करू शकता . प्रत्येक महिन्याला , जिल्हामुख्यालयाच्या ठिकाणी लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांचे अधाय्क्ष्तेखाली आयोजित केला जातो . आपण त्यावेळी हि तक्रार दाखल करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by VINOD KONDE
18-07-2024
vwk1229@gmail.com
9/3 9/4 var jat lihali asate kay 1967 che aadhicha dakhala kasa milawata yeil
Question by Kedar
16-07-2024
army101guy@gmail.com
प्रांत साहेबानी वाढीव गावठाणातील माजी सैनिकाच्या मंजूर प्लॉटचे 7/12ला नाव लावले असून आदेशामध्ये तहसीलदारांना जागेचा कब्जा देण्याबाबत लिहिलेले आहे पण अजून कब्जा मिळाला नाही. जागेवर अतिक्रमण आहे . Unsurveyed गटातील वयक्तिक प्लॉटचा सिटी सर्वे मोजणी व कब्जा यासाठी काय करावे लागेल ?
गावठाणातील भूखंड हे भूमापन केलेले असतात . तहसीलदार यांना भूखंडाचा ताबा देण्याबाबत प्रत्यक्ष भेटून - लेखी अर्ज देऊन विंनती करा . जर त्यांनी ताबा दिला नाही तर , अतिक्रमण विरहीत ताबा देण्याची जबाबदारी तहसीलदार महोदय यांची आहे . या शिवाय जिल्हास्तरावर गठीत माजी सैनिक मदत कक्ष येथे हि तक्रार मांडा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by PUNAMCHAND PITAMBAR RATHOD
12-07-2024
spr20061990@gmail.com
सर मी कोळवाडी लहान तांडा ता कन्नड जि छत्रपती संभाजी नगर चा आहे
आमची जमीन वडनेर या शिवरामध्ये आहे गट नं १६६ यामध्ये वाडीरलोपार्जीत जमीन असुन XY राठोड याच्या नावे भाऊबंद जिवंत असून त्यांची NOC न घेता त्यांच्या नावे कशी झाली आणि त्यांचा मृत्यू झाले असून आता त्यांच्या मुलांच्या नावे कशी झाली हे माहिती मिळेल का
आपली तक्रार ज्या जमिनीबाबत / भूखंड बाबत आहे त्या जमिनीच्या ७/१२ उतार्यावर , जे फेरफार नमूद करण्यात आलेले आहेत , त्याचे अवलोकन करा . आपल्या प्रश्नाचे उत्तर आपणास मिलेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dattdigambar Ghorpade
11-07-2024
ghorpade@ymail.com
Maharashtra Revenue Department's Circular No. revenue-2014/Pra.Kra.47/14 dated 24th February 2015: Needed in pdf format Thanks
Question by Gaurav Bidgar
11-07-2024
gm.bidgar@gmail.com
संपूर्ण जमीन 250 गुंठे आहे. त्यापैकी माझी जमीन 160 गुंठे व इतर 1 गुंठे आहे. 7/12 अर्क सामान्य आहे आणि त्याला इतर 8 नावे आहेत. मी माझ्या स्वतःच्या नावावर वेगळा 7/12 उतारा कसा मिळवू शकतो. कृपया प्रक्रिया आणि निकषांसह मदत करा
आपल्या नावावर जरी १६० गुंठे क्षेत्र असले तरी हि आपला वेगळा ७/१२ केल्याने अन्य सह-धारकांचे क्षेत्र , कदाचित प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी होईल , त्यामुळे वेगळा ७/१२ करण्यासाठी प्रथम आपणास जमिनीचे सरस-निरस वाटप , महाराष्ट्र धरण जमिनीचे तूकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम अंतर्गत करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Suraj
07-07-2024
surajsarvagod2015@gmail.com
Regarding compensation of land acquired by forest department of Solapur district for great Indian bustard in area of kondi, North Solapur
आपला प्रश्न नक्की काय आहे ?
आपणास नुकसान भरपाई मिळाली नसेल तर , आपणास ज्या प्राधिकार्याकडून संपादनाची नोटीस आली असेल त्या कार्यालयास विचारणा करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Satyajeet Patare
02-07-2024
satyajeetpatare@gmail.com
महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र 6/1498/प्र.क्र./84/ल-6 दिनांक 19 मार्च 1998
सातबाऱ्यावरील इतर हक्कातील नावे भोगवटा सदरील घेणे बाबत GR हवा आहे
रत्नागिरी जिल्ह्याच्या संकेत स्थळावर आपणास उपरोक्त प्रश्नात नमूद शासन निर्णय प्राप्त होऊ शकतो .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by BALASAHEB L GAVHANE
02-07-2024
grjtraj2@gmail.com
उप विभागीय अधिकारी यांनी फेर फार रद्द करण्याचाआदेश दिला असता त्यानंतर प्रतिवादी यांनी भोगवटा वर्ग दोन चे भोगवटा वर्ग एक असा 7/12 सदरी फेरफार मंजरु करुन घेतला दिलेला फेर फार रद्द करणे बाबत परत उपविभागीय अधिकारी यांना आर टि एस अपिल दाखल करावे लागेल का? उप विभागीय अधिकारी यांच्याआदेशाची अवहेलना झाली आहे तरी या संदर्भात फेर फार मंजुर करतांना वादी यांना कुठल्याही प्रकारची नोटीस बजावविण्यात आली नाही.
Question by रईस करीम पटेल
28-06-2024
raispatelnsk@gmail.com
जमीन मालक विधवा आहे.
इतर अधिकारात कुळाचे नाव लागलेले आहे. कुळाचे नाव कमी करता येईल का?
महाराष्ट्र शेत जमीन व कुल वहिवाट कायदा हा कुळांच्या बाजूने आहे . त्यामुळे कुलाचे नाव सहजासहजी कमी करता येत नाही . मात्र खालील उपबंधाखाली आपण कुळाची वहिवाट संपवू शकता .
SEC 14 : Termination of tenancy for default of tenant
1 (1) Notwithstanding any law, agreement or usage, or the decree or order of a Court, the tenancy of any land shall not be terminated-
(a) unless the tenant-
(i) has failed to pay the rent for any revenue year before the 31st day of May thereof;
(ii) has done any act which is destructive or permanently injurious to the land;
(iii) has sub-divided, sublet or assigned the land in contravention of section 27;
(iv) has failed to cultivate it personally; or
(v) has used land for a purpose other than agriculture or allied pursuits;
(b) unless the landlord has given three months' notice in writing informing the tenant of his decision to terminate the tenancy and the ground for such termination, and within that period the tenant has failed to remedy the breach for which the tenancy is liable to be terminated.
(2) Nothing in sub-section (1) shall apply to the tenancy of any land held by a permanent tenant unless by the conditions of such tenancy the tenancy is liable to be terminated on any of the grounds mentioned in the said sub-section.]
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3380 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
