जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सुभाष पाटील
16-02-2026
subhpt75433@outlook.com
साहेब, सातबारा वर आणेवारी किंवा हिस्सेवारी लावली म्हणजे जमिनीचे वाटणी झाली असे कायद्याने मानले जाते काय ?
Question by sagar yedage
15-02-2026
yedagesagar@gmail.com
नमस्ते सर,
माझा प्रश्न असा आहे की.... आमची जमीन वडिलोपार्जित आहे... आमचे आजोबा मयत नंतर वारसाने माझे वडील व माझे चुलते यांची एकूण सात गटा वर्ती नावे दाखल झाली...काही दिवसांनी माझे वडील व माझे चुलते यांनी एकूण चार गटातील कमी(कमी जमीन माझे वडील यांनी घेतली)जादा (जादा जमिन चुलते यांनी घेतली)जमिनीने वाटप केले...आता राहिले तीन गट .त्या तीन गटामध्ये समान समान वाटप व्हावे असे चुलते म्हणतात.... मग आम्हाला सर्वच म्हणजे एकूण सात गटा वरती समान समान वाटप होऊन मिळेल का.....त्या साठी काय करायचे......त्या चार गटाचे वाटणी पत्र रद्द होऊन सर्वच गटावर्ती समान समान वाटप होऊन मिळेल का...
आपणाला जमिनीचे वाटप व कुटुंब व्यवस्था पत्र यामधला फरक समजून घेणे आवश्यक आहे. वाटप पत्रानुसार त्या मिळकतीमध्ये हक्क असलेल्या लोकांनाच त्यांच्या हिस्स्याप्रमाणे अशा मिळकतीमध्ये वाटा मिळतो. कुटुंब व्यवस्थापत्रांमध्ये एखाद्या व्यक्तीला जरी हक्क नसला तरी वाद/ तंटा मिटवण्यासाठी त्याला मिळकतीमध्ये हिस्सा दिला जातो. . वाटप पत्राप्रमाणे समान वाटप न होता अथवा निहित हिस्स्याप्रमाणे वाटप न होता हिसा नसलेल्या व्यक्तीलाही मिळकतीमध्ये वाटा/ हिसा मिळतो . यापूर्वी झालेले वाटप होते व ते कुटुंब व्यवस्था न्हवती हे आपणाला सिद्ध करावे लागेल . त्यासाठी आपणाला न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून , असमान वाटप झाल्याचे दाखवून द्यावे लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ramchandra Mali
15-02-2026
maliramchandra51@gmail.com
file no.23/१९/५६ बाबत स्थगिती आदेश नं.RB/CW/CVI-199 दि.06 june 1957 हा कोठे मिळेल? लेटर हेड Government Of Bombay असे आहे.
या मंचाद्वारे , जमिन् विषयक जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जातो . मात्र काही प्रश्न / समस्या, ज्या वयैक्तीक असतात व ज्यामध्ये स्वःप्रयत्न आवश्यक असतात व या मंचाच्या क्षमते पलीकडील असल्यास , उत्तरे देण्यावर मर्यादा येतात . आपल्या प्रश्नात आपले स्वः प्रयत्न आवश्यक आहेत . याशिवाय प्रश्न स्वयस्प्ष्ट आसने आवश्यक आहे . आपण मागणी केलेला आदेश कोणत्या विषयाशी निगडीत आहे . स्थगती आदेश कोणी दिला आहे ? या बाबत कोणतीही माहिती दिसून येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजयकुमार अर्जुन गायकवाड
15-02-2026
4sgaikwad@gmail.com
मी १९९८ मध्ये तलाठी या पदावर नियुक्त झालो परंतु मला पहिला लाभ बारा वर्षानी देय असताना दिला नाही व संगणक परिक्षा पास नाही असे कारण दाखविले जात आहे तरी २०१० मध्ये अशी अट व तरतुद होती का मला आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती
संजयकुमार साहेब - आस्थापन शाखेकडून जाऊन माहिती घ्या . संगणक परीक्षा उत्तीर्ण होणे हि अहर्ता संन २०१० मध्ये होती .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विजय आहेर
09-02-2026
vijayaher1963@gmail.com
वारसा हक्काने असलेल्या जमिनीची बेकायदेशीर विक्री करून विकत घेणाऱ्याने त्या जमिनीत बदल अथवा विक्री करू नये म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कोणत्या कलमान्वये मनाई हुकुम घेता येई
महसूल संहितेखाली विक्री थांबवता येऊ शकत नाही . दिवाणी न्यायालयाकडे जावे लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश प्रकाश बिराजदार
24-01-2026
yogeshbirajdar09@gmail.com
मला हा प्रश्न विचारायचा होता की, फेरफार मध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास जसे की भाडेकरार केलेली तारीख चुकली असल्यास दुरुस्ती करण्यासाठी त्यासाठी काय करावे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९५५ च्या कलम १५५ खाली दुरुस्ती करू शकता . तहसीलदार यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मोहन रामेश्वर महल्ले
19-01-2026
mohanmahalle@76gmail.com
मी शेत रस्ता मिळण्याबाबत तहसील आफीस ला अर्ज केला होता, त्या वर बाजुच्या शेतकरी यांना सुनावणी नोटीस बजावली आहे, आता त्या नंतर काय होईल या बद्दल माहीती हवी आहे
तहसीलदार यांचेकडून सुनावणी , आवश्यकतेप्रमाणे स्थळ पाहणी . अश्या प्रकरणात करावयाची चौकशी हि संक्षिप्त स्वरुपाची आहे . त्यामुळे दीर्घकाळ प्रकरण प्रलंबित ठेवता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Chhatrapati Bawane
15-01-2026
chhatrugan1983@gmail.com
सर माझ्या गावात गावठाण जमिनीवर गावातील जसे पाटील,सदस्य (गामपचायत)व इतर सधन लोकांनी गावाच्या उपयोगाची जमिनीवर अतिक्रमण करून शेतीसाठी वापर करतात परंतु गोरगरीबांना घरकुल बांधायला देत नाही तर ही जागा भटक्या विमुक्त जाती जमातींना कशी घर बांधायला उपलब्ध होईल कृपया मार्गदर्शन करा, सधन्यवाद ।
गावठाणातील खुली जागा जर ग्राम पंचायतीस दिली असेल तर , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ५५ व ५६ खाली मुख्य कार्यकारी अधिकारी नागरिकांना देण्याचे अधिकार आहेत . मात्र अशी खुली जागा ग्राम पंचायतीस दिली नसेल तर , त्या जागेवर शासनाची मालकी असते . आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अश्या जागेची मागणी करू शकता . या शिवाय ग्रामपंच्यातीस गावामध्ये , गावठाण विस्तार योजना राबवण्यात बाबत , जिल्हाधिकारी / प्रांताधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यास सांगा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vilas Sawant
14-01-2026
vilassawant123@gmail.com
नमस्कार साहेब,
तालुका देवगड मधे सातबारा मध्ये चुक दुरुस्त करण्या १५५ च्या आदेशाखली आवश्यक ते कागदपत्रे दिली होती pan सहा महीन पूर्ण झाल्यानंतरसुधा प्रकरण पूर्ण केले नाही.
कृपाया मार्गदर्शन करावे
Question by संजय चव्हाण
12-01-2026
ajayjchavan@yahoo.com
इनाम पत्रक मध्ये 1956 च्या फेरफार अन्वये 1.8.1955 पासून इनाम खालसा केल्याची नोंद आहे. याचा अर्थ इनाम शेरा कमी करून ७/१२ वर्ग 2 चा वर्ग 1 होऊ शकतो का?
प्रत्येक इनाम कायद्यामध्ये, देण्यात आलेले इनाम खालसा करण्यात येऊन जो अधिकृत धारक आहे त्याला शुल्क जमा करून धारण केलेली जागा परत देण्याची तरतूद आहे. सन 1955 मध्ये जर इनाम खालसा केलेले होते, तर त्याच वेळेस आपल्या पूर्वजांना/ ूर्वधिकार्यांना ही जमीन देणे अभिप्रेत होते. कदाचित इनाम खालसा करून आपणाला नुकसान भरपाई रक्कम दिलेली असेल . आता या गोष्टीला खूप दिवस झाल्यामुळे विलंबाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र आपण जिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यास कोणतीही हरकत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Devendra Tak
08-01-2026
devendratak123@gmail.com
नियमात असलेले दस्तावेजा आधारे रीतसर मोजणी फीस भरून गुंठेवारी मोजणी झाल्यानंतर लागतधारक याने दिवाणी दावा दाखल केल्यास प्रकरण न्याय प्रविष्ट सबब कारण सांगून परंतु मा. न्यायालयाचा कोणताही मनाई हुकुम अथवा Satausquo आदेश नसेल तर क प्रत अडविण्याचा अधिकार भूमिअभिलेख यांना आहे का ? नसेल तर त्या संधार्बात असलेले शासन आदेश अथवा परिपत्रक यांची प्रत देण्यात यावी .
Question by Pankaj shinde
03-01-2026
pankajsh765sh@yahoo.com
मी सरकारी नोकरीत आहे.मी विवाहीत आहे. माझ्या नावावर कोणतीच शेतजमीन नाही. माझ्या जन्माअगोदर आजोबांनी वाटणी केल्याने माझ्या वडिलांच्या नावावर त्यांची स्वकष्टार्जित शेतजमीन आहे. माझा असा प्रश्न आहे की मला शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला भेटू शकतो का ? ( वडिलांच्या संयुक्त कुटुंबाचा सदस्य दाखवून ) जमिन फक्त वडिलांच्या नावावर आहे,संयुक्त कुटुंबाच्या नाही.
मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
कायदेशीर / तांत्रिक दृष्ट्या आपणाला शेतकरी दाखला मिळू शकणार नाही . मात्र कुटुंबातील सदस्य म्हणून शेतकरी दाखला देण्याची पद्धत आहे . आपण अर्ज करून बघा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kiran deshmukh
01-01-2026
kirande85yk@yahoo.com
नमस्कार साहेब माझा असा प्रश्न आहे की
1] जर आजोबांना ते ह्यात असताना मुलगा आणि नातू दोन्ही आहेत. आजोबांची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल आणि त्यांनी कोणतेही मृत्युपत्र न करता वारले असतील तर हिंदू वारस कायद्यानुसार 7 12 वर मुलाचे नाव येते तेव्हाच आजोबा वारल्यानंतर वडिलांच्या बरोबर नातूचा हक्क तयार होतो काय ?
2] नातू याचा हक्क प्रस्थापित होण्यासाठी आजोबांकडे असलेली मालमत्ता ही वडिलाजिॅत किंवा वडिलोपार्जित असावी लागते ?
अलीकडे मुंबई highcourt नागपूर बेंच ने रोहित जोशी judge यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपण ते निकाल पत्र पाठवावे किंवा अवतरण सांगावे
१, प्रश्न क्र १ चे उत्तर - नाही
२. प्रश्न क्र. २ - होय
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kiran yadav
01-01-2026
kiranyada9asl@yahoo.com
नमस्ते panbude साहेब, माझा असा प्रश्न आहे की 1] महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियमातील ' संयुक्त कुटुंब ' ( अविभक्त हिंदू कुटुंब)या संज्ञेचा नेमका अर्थ काय आहे ?
2] संयुक्त कुटुंब अस्तित्वात आहे हे दाखवण्याचे कोणते कोणते कायदेशीर पुरावे आहेत ?
3] वडिलांचे संयुक्त कुटुंब आणि त्यांच्या विवाहीत मुलाचे संयुक्त कुटुंब एकच असते की वेगवेगळे असते ? आणि जर दोन्हींचे संयुक्त कुटुंब वेगळे असेल तर त्यासाठी कोणती कारणे कारणीभूत असतात ?
हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे
१. पंजोबांपासून प्राप्त झालेली मिळकत
२. स्वकष्टाधित मिळकत हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये रूपांतरित करणे
३. हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावाने संपत्ती खरेदी करणे
१. पंजोबांपासून प्राप्त झालेली मिळकत- पणजोबांपासून प्राप्त झालेली संपत्ती यामध्ये मुलाचा जन्मताच हक्क असतो . मुलाचे कुटुंब - त्याची पत्नी व मुले हे hindu अविभक्त कुटुंब
२. स्वकष्टाधित मिळकत हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये रूपांतरित करणे- स्वताची स्वकष्टार्जित मिळकत HUF मध्ये रुपांतरीत करणे . यासाठी बक्षीस पत्र / विक्री दस्त करणे . कायद्यानुसार HUF स्वतंत्र व्यक्ती आहे .
३. हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावाने संपत्ती खरेदी करणे - HUF नावाने मालमत्ता खरेदी करणे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dilawer Vajir Shaikh
31-12-2025
dhelklwadi@gmail.com
गाव नकाशा वरील शेत रस्ता अतिक्रमण काढण्याबाबत जीआर
Question by Kiran Shinde
25-12-2025
kiranshi9al@yahoo.com
साहेब , माझा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांच्या शेतजमीन वर्ग 2 शेतजमिनीवर महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे कर्ज काढले होते. कर्ज काढल्यानंतर सातबारावरील भोगवटादाराचे नाव असा जो option असतो त्या खाली वडिलांच्या नावाला [ ] असा चौकोन करुन त्या खाली महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे नाव लिहले. व वडिलांचे नाव व कर्ज माहिती इतर हक्कात लिहले होते. भोगवटादार नावामध्ये बॅक नाव लिहणे हे कधी कायदेशीर आहे का होते का ? असे केल्याने त्या काळात वडिलांच्या आणि वारसांमध्ये मालकी हक्कात काही फरक पडला असेल का ?
आपण कर्ज काढण्यासाठी जर जमीन गहाण ठेवली असेल व जे गहाणखत केले आहे ते संशर्थ विक्रीद्वारे केलेले गहान असेल तर , आपल्या वडिलांचे नावाला कंस करणे न्यायोचित आहे . मात्र अन्य गहाणखत असेल तर , गाहाण खताची नोंद इतर हक्कात होणे अभिप्रेत आहे . कोणत्या प्रकारे गहाणखत केले आहे ते पहा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Bhagyashri Devidas Kumbhalkar
25-12-2025
bhagyashrikum@gmail.com
7/12 वर दुकानाच्या नोंदी दुकान क्रमांक टाकून घेता येते का
आपणाला ७/१२ वर दुकानाची नोंद घेता येणार नाही . त्यासाठी आपणाला नगरपालिका / ग्रामपंचायत यांचे मालमत्ता नोंदवहीत दुकानाची नोंद करावी लागणार आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kiran Shinde
25-12-2025
kiranshi9al@yahoo.com
साहेब , माझा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांच्या शेतजमीन वर्ग 2 शेतजमिनीवर महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे कर्ज काढले होते. कर्ज काढल्यानंतर सातबारावरील भोगवटादाराचे नाव असा जो option असतो त्या खाली वडिलांच्या नावाला [ ] असा चौकोन करुन त्या खाली महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बैंक चे नाव लिहले. व वडिलांचे नाव व कर्ज माहिती इतर हक्कात लिहले होते. भोगवटादार नावामध्ये बॅक नाव लिहणे हे कधी कायदेशीर आहे का होते का ? असे केल्याने त्या काळात वडिलांच्या आणि वारसांमध्ये मालकी हक्कात काही फरक पडला असेल का ? वडिलांनी नंतर कर्ज फेडल्यानंतर भोगवटादार मध्ये वडिलांचे नाव व्यवस्थित आले. पण भोगवटादार मध्ये मालकाचे नाव [] कंसात लिहून त्याखाली बॅकचे नाव लिहणे कायदेशीर आहे का ? माझ्या माहितीनुसार बैंक चे नाव इतर हक्कात लिहायचे असते. कृपया मार्गदर्शन करावे.
कर्जाची फेड झाली नसेल तर बँकेने आपली जमीन जप्ती केली असेल व त्यामुळे आपल्या वडिलांच्या नावाला कंस करून , बँकेचे नाव दाखल झाले असेल . मात्र बँकेच्या कर्जाची फेड झाली असेल तर , बँकेचे नाव इतर हक्कात ठेवता कामा नये . केवळ कर्ज आपल्या वडिलांनी फेडले म्हणून आपल्या वडिलांच्या नावे भोग्वातदार हि नोंद ठेवता येणार नाही . जे सर्व भोगवटादार आहेत त्या सर्वांची नावे ७/१२ उतार्यावर अपेक्षित आहेत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Eknath patil
19-12-2025
eknath.pt8l.65@gmail.com
फक्त सातबारा ला आणेवारी लावली किंवा हिस्सेवारी लावली म्हणून मिळकतीचे वाटप झाले असे कायदा मानत नाही.1] माझा प्रश्न असा आहे की आणेवारी, हिस्सेवारी आणि जमिनीचे वाटप करणे यात काय फरक आहे ? 2] समजा ' अ ' या व्यक्तीकडे स्वकष्टार्जित जमीन आहे ( वर्ग 2 ). ' अ ' या व्यक्तीला दोन मुले आणि एक नातू आहे. ' अ ' ही व्यक्ती जमिनीचे मृत्युपत्र आणि वाटणी न करता वारले त्यामूळे जमिनीवर त्यांच्या दोन मुलांची नावे लागली.माझा असा प्रश्न आहे का ' अ ' या व्यक्तीच्या जमिनीवर नातूचा हक्क वडिलोपार्जित जमिन म्हणून आहे का ? आणि ' अ ' ची मुले ही ' अ ' च्या नातूची परवानगीशिवाय जमिन विकू शकतात का ? आणि ' अ ' च्या मुलांनी वाटप करायचे ठरवल्यास 'अ' यांच्या नातूला जमिन हक्क भेटल का ? [ 'अ' यांचे नातू समजा विवाहीत आणि जर अविवाहित असतील तर काय फरक पडेल का ?
आपल्या उदाहरणातील मालमत्ता हि अ या व्यक्तीची स्वकष्टार्जित मालमत्ता आहे . त्यामुळे त्यांचे मृत्यू नंतर केवळ त्यांच्या दोन मुलांचा हक्क त्यामिल्कती मध्ये आहे . नातूंना कोणताही हक्क नाही . हिस्सेवारी आणि आणेवारी एकाच आहे . आता आणेवारी बंद झाली आहे . जर अधिकार अभिलेख पत्रक म्हणजे ७/१२ वर हिस्सेवाई दाखवली असेल म्हणजे जमिनीचे vatap झाले आहे . हिस्स्या प्रमाणे क्षेत्र वेगळे करणे व त्याचा ताबा घेणे म्हणजे सरस निरस वाटप करणे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kiran yadav
18-12-2025
kiranyada9asl@yahoo.com
माझ्या वडिलांचे वडिल म्हणजे माझे आजोबा यांच्या नावावर काही एकर भोगवटादार वर्ग 2 जमिन होती. ही जमिन आजोबांना सरकारकडून नवीन अविभाज्य शर्तीने मिळाली होती. आजोबा 25 ते 30 वर्षपूर्वी वारले आहेत. आजोबांना 2 मुले आहेत माझे वडील आणि काका दोन्ही ह्यात आहेत.आजोबा जेव्हा वारले तेव्हा त्यांना मुले आणि नातू होते. आजोबा वारल्यानंतर त्यांच्या मोठा मुलगा नाव 7/12 वर एकुमॅ म्हणून नोंद झाली. काही वर्षानी एकुमँ वगळून फक्त आजोबांचे दोन्ही मुलांचे 7/12 वर नाव लागले. माझा असा प्रश्न आहे की जेव्हा माझे आजोबा वारल्यानंतर त्यांची शेतजमीन माझे वडिलांचे नावावर झाल्यावर ती जमिन वडिलोपार्जित म्हणून माझा लगेच जमिनीवर हक्क तयार झाला होता काय ? साहेब मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
Question by Vikas sanap
18-12-2025
vikassanap1993@gmail.com
1 सर महसूल मंत्री यांनी रिव्हिजन मध्ये दिलेला निर्णय कोणत्या कलमानुसार रिव्ह्यू मध्ये चॅलेंज देऊ शकतो माहिती मिळावी
Question by अजय जयसिंग चव्हाण
17-12-2025
ajayjchavan@yahoo.com
तलाठी, मंडल अधिकारी, लिपिक एकत्रितपणे जाणीवपूर्वक चुकीची अर्धवट कार्यवाही करत आहेत. त्यामुळे ७/१२ मध्ये 2 आदेश व 3 नवीन फेरफार नोंदी होऊन 7/12 आता 2पानी झाला आहे. तरी सुद्धा प्रकरण व प्रश्न जानेवारी 2025 मध्ये होते तसेच प्रलंबित आहे. तहसीलदार दखल घेत नाही. दप्तर दिरंगाई कायदा किंवा अन्य कायदा आहे का जेणेकरून माझे प्रकरण योग्य रित्या मार्गी लागेल व संबंधितांनावर कार्यवाही होईल.
Question by vaishnavi deepak labdhe
16-12-2025
labdhe@gmail.com
mala mazya jagechi mojani karayachi ahe
भूमी अभिलेख विभागाच्या , https://mahabhumi.gov.in/mahabhumilink संकेत स्थळावर आपणाला अर्ज करता येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Gaurav shirsath
16-12-2025
gauravshirsath95@gmail.com
वारसा व्यतिरिक्त इतर व्यक्तींना बक्षीसपत्र करून दिल्यास शेतकरी पुरावा आवश्यक आहे का??
Question by Kavindra
16-12-2025
kavindrakdm@gmail.com
पोलीस पाटील यांचे भटकी टोळीचे रजिस्टर ची नमुना पाठवा
आपण हा नमुना , आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यामधून प्राप्त करून घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
