जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by pradeep
15-02-2016
prpatil979743@gmail.com

कुणबी दाखला काढायचा आहे त्याला कागदपत्रे कोणती आहे
कुणबी हि जात इतर मगद प्रवर्गात , १९६७ ला समाविष्ट करण्यात आलेली आहे . त्या मुले १९६७ अथवा त्या पूर्वीचा कुणबी जात नमूद असलेलें अभिलेख आपले वडिलांचे आवश्यक
१९६७ साली आपले वडील/आजोबा जेथे वास्तव्यास होते , तेथून जातीचा दाखला काढणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. जिल्हाधिकारी यांनी अधिकारी / कर्मचारी यांचे विरुद्ध चे तक्रारीवर तपासणी करून अहवाल सदर करण्यास सुचित केले आहे . समजा तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांचेविरुद्ध तक्रार असेल तर सध्याचे उपविभागीय अधिकारी हे तपासणी करू शकतात का ? कृपया मार्गदर्शन करावे ...
मा. जिल्हाधिकारी यांनी सध्याच्या उपविभागीय अधिकारी यांना अशी तपासणी करण्याचे आदेश दिले असतील तर सध्याचे उपविभागीय अधिकारी हे अशी तपासणी करू शकतात. विषय गंभीर असल्यास सध्याचे उपविभागीय अधिकारी मा. जिल्हाधिकारी यांना तसे कळवून अप्पर जिल्हाधिकारी यांनी अशी तपासणी करावी अशी विनंती करू शकतात

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

साहेब माजा प्रश्न असा आहे कि माज्या गावी वाडी लोपाजित सामाईक जमनी आहेत. त्या जमिनीनच्या सात बारावर माजे आजोबा१९७१ मध्ये वारले तेव्हा माज्या मोठ्या चुलत्यांनी कुटुंब प्रमुक म्हणून नाव लावले व गाव नमुना ६क मध्ये माज्या वडिलांचे नाव लावले आहे. तर मला माज्या वडिलांचे नाव सातबारावर लावायचे आहे मोठे चुलतेही वारलेले आहेत तर त्यांच्या कुटुंबाची वारस तपासणी त्यांचे कुटुंब करतीलच पण मी फक्त माज्या वडिलांचीच वारसतपासणी करू शकतो काय व ती कोणाकडे करू , त्या साठी कोणते पेपर लावायचे याची मला माहिती द्यावी हिच नम्र विनंती .
संबंधित फेरफार जोडून तहसीलदार कडे अर्ज करावा.

ए.कु.मॅ. ची वारस नोंद:
कायदा: हिंदू वारसा कायदा 1956.
बर्याच वेळा असे निदर्शनास आले आहे की, एखाद्या जमिनीवर एकत्र कुटूंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेला इसम मयत झाल्यानंतर त्याचे वारस, वारस नोंदीसाठी अर्ज करतात आणि त्या मयत ए.कु.मॅ. चे वारस म्हणून फक्त त्यांच्याच मुला/मुलींच्या नावाची त्याचे वारस म्हणून नोंद केली जाते. यामुळे मयत इसम ज्यांचा ए.कु.मॅ. असतो त्यांचा वारस हक्क डावलला जातो.
वास्तविक एकत्र कुटूंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेला इसम मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद करतांना अत्यंत सखोल चौकशी करणे आवश्यक असते.

मंडलअधिकारी यांनी करावयाची कार्यवाही: मंडलअधिकारी यांनी ए.कु.मॅ. च्या निधनानंतर वारस नोंदीसाठी अर्ज आल्यास गाव कामगार तलाठी यांना प्रथम मयत इसमाचे नाव ज्या फेरफार नुसार ए.कु.मॅ. म्हणून दाखल झाले होते त्या फेरफारात नमूद सर्व व्यक्तींना नोटीस बजवण्यास सांगावे. त्यापैकी जे सज्ञान झाले आहेत त्यांची नावे तसेच इतर व्यक्तींपैकी जे मयत आहेत त्यांच्या वारसांची आणि ए.कु.मॅ. चे वारस अशा सर्वांची नावे वारस ठराव करून आणि त्यानंतर गाव नमुना नं. 6 मध्ये अन्वये कब्जेदार सदरी आणणे आवश्यक असते.
अशा सखोल चौकशीनंतरच मंडलअधिकारी यांनी सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली गेली आहे याची खात्री करावी तसेच कोणताही वारस डावलला गेला नाही याची खात्री करून सदर वारसनोंद प्रमाणीत करावी. मुस्लिम कायद्यामध्ये एकत्र कुटूंब मॅनेजरची संकल्पना नाही हे लक्षात ठेवावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

साहेब आमची सामाईक जमीन ४ गुंठे आहे हि सर्व जमीन आम्ही सर्वजण गावच्या मंदिरा साठी बक्षीसपत्र करून देणार आहोत. तर आम्हाल एक प्रश्न पडला आहे कि आम्ही मुख्य हिसेदार ६ जन आहोत पण सातबारावर आमची ६ मुख्य वारस दरांची व आमचे सहहिसेदार यांची नावे आहेत यामध्ये काही अज्ञान आहेत तर बक्षीसपत्रावर सह्या सातबारावर नावे आहेत त्यांच्या सर्वांच्या घ्यायच्या कि आम्ही मुख्य ६ हिसेदारानी सह्या करायच्या, सदर बक्षीसपत्र नोंधणी करणार आहोत याचे मार्गदर्शन करावे हीच नम्र विनंती.
अज्ञानाच्या नावावर असणारी मिळकत विकण्यास हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम 1956, कलम 8 अन्वये दिवाणी न्यायालयाची पूर्व परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी असल्यास नोंद प्रमाणीत होते अन्यथा अशी नोंद दिवाणी न्यायालयाची परवानगी नाही म्हणून रद्द होते कारण असा अ.पा.क. हा त्या मालमत्तेचा मालक नसून पालक असतो.
परंतू एखाद्या मिळकतीवर संयुक्त कुटुंबातील चार व्यक्तींची नावे आहेत, त्यापैकी एक व्यक्ती अज्ञान असून इतर तिघांपैकी एका व्यक्तीचे नाव त्या अज्ञानाचा अ.पा.क म्हणून दाखल आहे. त्या अ.पा.क. असणार्‍या व्यक्तीने 7/12 वरील संपूर्ण क्षेत्राची विक्री केली तर दिवाणी न्यायालयाची परवानगीची आवश्यकता नाही. अविभक्त हिंदू कुटुंबाला किंवा संयुक्त कुटुंबाला अशा परवानगीची आवश्यकता असणार नाही असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने हिंदू अज्ञानत्व व पालकत्व अधिनियम 1956, कलम 8 व 12 याचा एकत्र अर्थ लावतांना दिला आहे.
जमिनीतील हिस्सा कायदेशीरपणे ठरवला गेला नसल्यास, मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882, कलम 44 अन्वये समाईकात नावे असणार्‍या सर्वांचा समान हिस्सा असतो हे लक्षात ठेवावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आपण अ.पा. क. आहात काय याचा खुलासा करावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

लहान पासून दत्तक वडिलांच्याकडे असणार्या मुलाला दत्तक वडील आजारी होते म्हणून आजीनी १९५० साली दत्तक वडिलांच्या मांडीवर १२ वर्षे वय असताना दत्तक घेतला आहे नंतर दत्तक वडील मरण पावले त्यामुळे धार्मिक कार्यक्रम करायचे राहून गेले तसा उल्लेख करून दत्तक घेणार्या आजीनी १९६१ साली धार्मिक कार्यक्रमानुसार दत्तक पत्र करून ठेवले त्यात त्यांनी नवरयाच्या इच्छेनुसार दत्तक घेतला आहे धार्मिक कार्यक्रम राहिला तो करून दत्तक पत्र करून ठेवले व आजीनी नंतर स्वताचे मृत्यू पत्र हि करून ठेवले असेल तर दोनीही चालू शक्तेका ? वारस नोंद जर दत्तक पत्राने असेल, तर त्याच्या वारसाबद्दल कोणी आक्षेप घेऊ शकते का ? ते मुदतीत बसते का ? व तो आक्षेप कोणी घेतला पाहिजे त्याच्या भाऊकितील लोकांनी का इतर कोणीही व्यक्ती जिच्या बरोबर आमचा जमिनीचा वाद चालू आहे अशी इतर कोणीही व्यक्ती ?
याच site वर असलेला दत्तक कायदा वाचवा. वारस नोंद जर दत्तक पत्राने असेल, तर त्याच्या वारसाबद्दल कोणीहि आक्षेप घेण्याचे कारण नाही. आक्षेप असल्यास तक्रार केस चालून निर्णय घेता येईल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,एखाद्या व्यक्तीने ग्रामीण भागात ०-०३ आर क्षेत्र खरेदी केले. त्यावेळी सदर गट नं.शेती झोन होता.परंतु आता सदर गट नं. निवासी झोन मध्ये आहे तर तुकडे बंदी कायदा लागू होईल का?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती.
खरेदी केले त्यावेळीच तुकडे बंदी कायदा शेरा ठेवला असावा. तुकडे बंदी कायदा शेती क्षेत्रासाठी लागू असतो

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by sanjay
12-02-2016
sanjaytadwalkar@gmail.com

ग्रामपंचायत हदीतील आमचे घर जागेचे दक्षिण बाजूला खुली जागा असून गेली ७० वर्षे आम्ही त्या खुल्या जागेची स्वचता,झाडलोट ,निगराणी करत ती खुली जागा आम्ही वापरत आहोत परंतु आमचे शेजार्यांनी १९८१ च्या सर्वे वेळी ती खुली जागा आम्ही व इतर दोन शेजार्यांमध्ये सामायिक असे सांगून 'सामायिक खुली जागा' अशी नोंद केली.
आता आम्हास ती खुली जागा आमचे मालकीची करावयाची आहे त्या करिता काय करावे?
खुली जागा सामायिकच असते. तरीही आपण सदर नोंदिविरुद्ध अपील करू शकता

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Arjun
12-02-2016
mohanms9775@gmail.com

साहेब , x या व्यक्ती १९७३ मध्ये वारल्यानंतर x या व्यक्तिंचे वारसदार AB दोन मुले व PQR तीन मुलींचे नांव व B या व्यक्तिंचे नांव इतर हक्कात ठेवले . A या व्यक्ती कुटुंब प्रमुख होते.सदर B या व्यक्तीने १९९० मध्ये वाटणी करून घेतले , वाटणी करून घेताना B व्यक्तिंचे ७/१२ उतार वर PQR या बहिणींचे नांव आढळून येत नाही सदर PQR बहिणींचे नांव A या भावांचे ७/१२ उतार वर वारसा लावले पासून कायम आहे ,१९९७ मध्ये भूसंपादन झाल्यानंतर बहिणींचे हक्क सोड पत्र द्यावे असे बोलतात सदर तिनी बहिणींचे २००१ पूर्वी मयत झालेले आहे,बहिणींचे वारसा लावले नाही व A या व्यक्तिंचे २००१ मध्ये मृत्यू झाले नंतर त्यांचे वारसदार चे नाव लावले, सदर भूसंपादन रक्कम आजतागायत मिळाले नसून रक्कम मिळवणे साठी इतर हक्कातील व्यक्तींचे २००५ पूर्वी मृत्यू झालेने १६/१०/२०१५ या सुप्रीम कोर्ट निर्णयानुसार रक्कम मिळवणेसाथि पुढील मार्ग दर्शन मिळावे .विनंति

Question by chetan
11-02-2016
drchetanspatil@gmail.com

how to take permission in gaothan jamin which is having only gaon namuna 8 and goathan remark form panchayat only. and how to make mojani of the goathan plot from tilr office
गावठाण जमिमिनीचे पुरावे देवून सिटी सर्वे ऑफिसर कडे मोजणीचा अर्ज करा . जेतेह सिटी सर्वे अधिकारी नाही तेथे तालुका निरीक्षक ( आता उप अधीक्षक ) जमीन रेकॉर्ड येथे अर्ज करा

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

महाेदय,
मुक्काम भत्त्या वीषयी BOMBAY CIVIL SVS RULES मधील नीयम क्र ५५६ ची माहीती मीळणे वीषयी वीनंती अाहे. तसेच BOMBAY CIVIL SVS RULES ची मराठी तसेच इग्रजी अावृती साॅफ्ट काॅपी मीळणे वीषयी वीनंती अाहे.

धन्यवाद,
माे.क्. 9890952821
लातुर जिल्हा वेबसाइटवर उपलब्द आहेत

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

महाेदय,
१. सहा गठ्ठे पद्धत
२. वार्षिक प्रशासकीय अहवाल
या वीषयी सवीस्तर माहीती मीळावी ही नम्र वीनंती.

धन्यवाद
mobile no . 9890952821
याच site वर ही माहिती इतरत्र उपलब्ध आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

ताबेसाठेखाताची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात करता येते का येत असल्यास त्याबाबत काही नियमावली आहे काय अशी नोंद झाली असल्यास काय करावे
नोंद ठेवता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत:
कायदा: भारतीय नोंदणी कायदा, कलम १७; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
एखादा खातेदार दुसर्या. इसमास नोंदणीकृत दस्ताने स्वत:च्या मालकी हक्काच्या जमिनीचे नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत करून देतो. गाव कामगार तलाठी यांच्याकडे या संबंधीची कागदपत्रे प्राप्त झाल्यावर गाव नमुना नं. ६ मध्ये त्याची नोंद होते.
सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजवल्यानंतर सर्व हितसंबंधीत हजर राहून नोटीस पुस्तकावर संमतीदर्शक स्वाक्षरी करतात. १५ दिवसानंतर मंडलअधिकारी संबंधीत नोंदीवर योग्य तो निर्णय घेतात.
महत्वाचे: * काही ठिकाणी, विशेषत: सातारा जिल्ह्यात असे निदर्शनास आले आहे की, नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत याची नोंद करतांना गाव कामगार तलाठी, गहाण देणार (जमिनीचा मूळ मालक) याचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरातून कमी करून ते इतर हक्कात नोंदवतात आणि जमीन गहाण घेणार्याच इसमाचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरी नोंदवतात. ही पध्दत अत्यंत चुकीची आणि बेकायदेशीर आहे. कब्जेदार सदरी नाव आल्यामुळे जमीन गहाण घेणारा इसम त्या जमिनीची विक्री करतो, जमीनीवर मोठ्या रकमेचे कर्ज काढतो. यामुळे पुढील कायदेशीर गुंतागुंत वाढत जाते.
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५३ अ अन्वये ताबा गहाणखतामुळे जमीन गहाण घेणार्याण इसमास मालमत्ता ताब्यात ठेवण्याचा हक्क निर्माण होत असला तरीही त्यास 'मालकी हक्क' प्राप्त होत नाही. त्यामुळे ताबा गहाण खत/मुदत गहाण खतानुसार, जमीन गहाण घेणार्या' इसमाचे नाव ‘इतर हक्क’ सदरीच नोंदवणे कायदेशीर आहे. गहाण देणार (जमिनीचा मूळ मालक) याचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरीच ठेवावे.
* महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३ अ अन्वये शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेतजमीन विकता येणार नाही किंवा त्याच्याकडे शेतजमीन गहाण ठेवता येत नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

एका कर्मचारी यांचे विभागीय प्रकरणातील दोष सिद्ध झाले . त्यांना शासन सेवेतून मुक्त करण्यासाठी कोणती कार्य पद्धती अनुसरावी लागेल . कृपया शासन तरतुदी सह मागदर्शन करावे ..
सर मी वर्ग ३ चा कर्मचारी असून मला माझे नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्र काढायचे असून मी माझे उत्पन्न म्हणजे फोरम न १६ जोडू शकतो का व फोरम न १६ सोबत उत्पन्नाचा आणखी कोणता पुरावा जोडावा लागेल का
अन्य उत्पन्न्नची साधणे असल्यास त्याबाबतचे पुरावे जोडावेत

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by devendra
11-02-2016
jyotitandel82@gmail.com

Grampanchayt haditil 1995 sala pasun navin gharpatti babat GR Kay ahe tyachi mahiti krupaya dyavi
आदरणीय सर, दि. २२/०१/१६ च्या शासन निर्णय नुसार अकृषिक परवानगी देण्याचे अधिकार कोणास व किती क्षेत्रापर्यंत आहेत?तसेच शेती झोन मधून निवासी झोन करण्याचा अधिकार कोणकोणत्या अधिकाऱ्यांना आहेत?कृपया मार्गदर्शन होनेस विनंती....
सर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची पूर्ण माहिती सागा
Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme 2015-१६ is to ensure social and economic security to farmers and their families, the state government has decided to implement the Gopinath Munde Farmers Accident Insurance Scheme 2015-16. It will cover accidental death of handicap of the farmers.

This will see the ceiling on the existing accident insurance scheme for agriculturists increase from Rs1 lakh to Rs2 lakh. The tenure of the existing scheme ends on November 30.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

The scheme will extend to 1.37 crore farmers between the age of 10 and 75 years whose names are registered in the land records. It will cover road and rail accidents and eventualities like snake bite, murder, electric shocks, scorpion bites, Naxal attacks, animals attacks and lightning strikes. While accidental death, loss of two eyes or two limbs or one eye and one limb will be compensated with a payout of Rs2 lakh, partial disabilities like loss of one eye or one limb will see Rs1 lakh being granted.

The state government will pay the Rs27.24 crore premium for this scheme. Since 2005-6, when the scheme is being implemented, a total of 18,800 farmers have been given payouts worth Rs189 crore under this scheme.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

याच site वर ही माहिती इतरत्र उपलब्ध आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by bajirao patil
11-02-2016
patilbajirao45@gmail.com

सर विधवा pension योजना ची माहिती पूर्ण सागा तशेष कागदपत्रे कोणते लागतील पूर्ण माहिती सागा
कृपया आपल्या तालुक्याच्या संजय गांधी शाखेला किंवा आपल्या गावच्या तलाठी कार्यालयास भेट द्या........ त्याठिकाणी आपणास सविस्तर माहिती मिळेल

Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार

Question by bajirao patil
11-02-2016
patilbajirao45@gmail.com

सर death certificate अत्याविधी घरी आणि मूत्यू धावखानात झाला आहे तरी मला गामपंचात मध्ये मूत्यू नोद करावी लागेल का
आणि मूत्यू नोद केलावर मला death certificate medal ka
सर युनिफॉर्म सर्विस मधील कर्मचाऱ्यांचा घरी प्रॉपर्टी चे वाद न्यायप्रविष्ठ असतील तर ते लवकर निकाली निघण्यासाठी काही तरतूद आहे का?
तलाठी यांचेविरुद्ध मा. न्यायालयाने निकाल दिला आहे . सदरील निकाल कार्यालयास अप्राप्त आहे . त्यांना शासन सेवेतून काढून टाकण्याची कार्य पद्धती कोणती आहे ? कोणत्या नियमाने कार्यवाही करावी लागेल ? कृपया मार्गदर्शन व्हावे .

Question by VIKRAM YADAV
10-02-2016
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर, दि: १७.००६.२००६ मध्ये माझी आई २ बहिणीने आमची वधील पर्हरजित जमीन माझे नाव वगळून वधील मयत झालाय्वर ३ चा नावावर जमीन केली व गावातील माणसाला विकून टाकली मी तय्विरूढ कोर्टात दावा ढकल करून तो दस्त रद्ध केला व त्या माणसाला माझा आई ने व २ बहिणीने घेतलेले रुपय मी तय्ना परत केले व तय्बदल्यात कोर्टात ३ घीकडून हक्कासोद्पत्र लिहून घेतलं कि या फुडे आमचा कोणतही अधिकार त्य जमीवर राहणार नाही . पुन गावाथिल बेजबाबदार लोकांनी व अधिकार्यांनी वारावणार तो कोर्टाचा हुकुम्नाम ( तडजोड) नोद न करण्याचा सतत प्रयत्न केला व माजे नाव ७/१२ वर लागले नाही .काही वर्शनी तिच जमीन ३ बहिनीनि गावातील दलाला द्वारे परत दुस्य्र्य्य इसमास विकली कारण ७/१२ वर माझे नाव नाही . मी त्यांनी बनवलेला दस्त नोद थाब्वण्याची लेकी तकरार तलाठी/ सर्कल यांचाकडे केली व सर्व कागद पाहून टायनी ती मान्य केली व धरलेला फेरफार ची नोद रद्ध केली तय्बरोबर मी माझा नावाची नोद ७/१२ वर व्हावी म्हणून तसीलदार याचाकडे अर्ज केला व तो त्यांनी मंजूर केला आहे पुन तो कोर्टाचा हुकुम ( तअडजोडा हक्कापत्र ) मुद्रकीन करून घ्या व गाव तलाठी याचाकडे नोद धरण्य साठी द्यावा अशे सागितले ते मी मुद्रकीत केलेली हुकूमनामा नोदी साठी तलाठी याचाकडे दिला आहे .तलाठी सागतात कि आता आम्ही नोद धरू साय्कात नाही कारण जो फेरफार ची नोद धरली नाही त्या विरुद्ध प्रांथ यांचाय्कडे समोरचा पर्ठीने अप्पील केले आहे कि आम्ही त्या जमिनीचे मालक आहोत .सहेब मी इतके वर्ष केलेली महंत फुकट जाणार का ? मी ती जमीन आज सुधा कसतो आहे पुन ७/१२ वर नाव नाही मी काय करू कृपया मार्ग सांगा . धन्यवाद .
कोतवाल यांचा राजीनामा तहसीलदार मंजूर करतात कि उपविभागीय अधिकारी करतात ?

Question by swati swami
10-02-2016
swati.swami@yahoo.com

उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोणते विभाग कार्यरत असतात . विभागनिहाय कामाचे वाटप कसे असते ?
सर विवाहित महिलेने शासकीय नोकरीसाठी जात प्रमाणपत्र व नोन क्रिमिलेयेर प्रमाणपत्र कुणाच्या नवे काढावे वडिलांच्या कि पतीच्या ..mpsc ने दिलेल्या सूचनेनुसार दोन्ही प्रमाणपत्र वडिलांच्या नवेच असावीत
सर खुल्या प्रवर्गातील महिलांना किती वर्ष वैधातेचे नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्र मिळते

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3