जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संजय जी वाघ
15-03-2016
sanjaygwagh@gmail.gom
आदरणीय सर
हस्तलिखित ७/१२ बंद असतांनी मूळ ७/१२ ची छायाप्रत ही सत्यप्रत म्हणून मागणी केल्यास तलाठी ह्यांचेकडून मिळू शकेल काय व कोणत्या नियमानुसार
Question by संजय Jadhav
15-03-2016
spj7474@gmail.com
संरक्षित कुळाला ३२ग मिळाला त्यानंतर ३२म खारेदिप्रमाण पत्र मिळाले आहे यानंतर जे कुळ नाही अशा व्यक्तीनि अपील केले असता प्रांत अधिकारी यांनी ३२ग रद्द केला आहे तरी ३२म अनावये ७/१२ नोंद बाबत माहिती तसेच नियम काय आहे ?नोंद प्रमाणित होईल का?
३२ग नंतरच ३२म प्रमाणपत्र दिले जाते. ३२ग रद्द केला आहे तर ३२म सुद्धा रद्द झाला. नोंद प्रमाणित होणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by kiran kale
15-03-2016
kkale40@gmail.com
Respected sir,
Good afternoon!!!
I had doubt with respect to the agriculture land which was purchased by my father before 13 years ago. The same land was under Ramoshi vatan land. On the year of 2002 all formalities had been completed by both the parties except prior permission of competent authority for sale of such land. At the same time. According to the decree of Hon’ble Civil Judge Junior Division, Sale deed has been executed and registered before Sub-registrar. Now Due to the application of opposite party Hon’ble Prant (Dept. Collector) has cancelled the decree of the Hon’ble Civil Court and ordered that the land has to be submitted to the govt. As a sale Deed had been executed without permission.
Now, my father is ready to perform our part with respect to the said permission.
Kindly guide me; I would very grateful to you
Prant Adhikari (SDO ) has not cancelled the decree of the court . SDO has no authority to cancel the decree of the court . However SDO might have cancelled the mutation entry by which ,land was mutated in your fathers name .
As suggested earlier you can prefer an appeal before the Additional Collector .
Check whether permission is necessary to transfer Ramoshi watan land .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
ते खरेदीखत न्यायालयाच्या आदेशानुसार केले होते हि बाब प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या. किंवा प्रांताधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध अपील करा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सुभाष माजरेकर
15-03-2016
mjrkrganesh@gmail.com
वर्ग २ च्या जमिनीचे विक्री बाबतचे साठे खत सन २००० साली केलेले आहे. परंतु आता सदरचा पूर्वीचा जमीन मालक खरेदी खत करण्यासाठी तयार नसल्यास जमिन खरेदी खत करण्यासाठी काय करावे लागेल. आता मालकाच्या नावे सदरची जमीन वर्ग क्र. १ झालेली आहे तरी मार्गदर्शन मिळावे,
वर्ग क्र. २च्या जमिन मालकाने जमिन एखाद्याला मुत्यपत्राद्वारे दिलेली आहे. सदया ती जमिन त्याच्या एकट्याच्या नावे आहे. तर त्याच्या मुत्यू पश्चात ज्याच्या नावे मुत्यूपत्र केले आहे त्याच्या नावे ती जमिन होवू शकते का....त्यावर त्या मालकाचे वारस आक्षेप घेवू शकतात का..आता सद्या ती जमीन वर्ग १ झालेली आहे.
साठे खत नोंदणीकृत नसेल तर त्याला कायद्यात किंमत नाही. साठे खत नोंदणीकृत असेल तर दिवाणी न्यायालयात दाद मागावी.
जमीन वर्ग १ ची झाल्यावर मुत्यूपत्र केले असेल तर ज्याच्या नावे मुत्यूपत्र केले आहे त्याच्या नावे ती जमिन होवू शकते
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by किरण काळे
15-03-2016
kirankale2010@rediffmail.com
मी सुमारे १३ वर्षापूर्वी रामोशी वतन जमीन खरेदी केली होती आणि ते खरेदीखत म. दिवाणी नायादिश प्रथमवर्ग नाय्धादाधिकारी यांचे हुक्मावरून केले होती परंतु आता ताय्स सक्षम अधिकार्याची परवानी नाह्वती या कारणावरून ते खरेदी खत उपविभागीय प्रांताधिकारी यांनी रद्ध केले आहे आणि जमीन सरकार जमा करण्याचा आदेश दिला आहे. तरी आता काय करावे .पिलीज मला माहिती द्याल का ?
ते खरेदीखत न्यायालयाच्या आदेशानुसार केले होते हि बाब प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या. किंवा प्रांताधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध अपील करा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सु माजरेकर
15-03-2016
mjrkrganesh@gmail.com
सध्याच्या नवीन गावातीवल बांधकाम बाबत शासन नियमानुसार गावातील आमच्या सामाईक जमिन वरती धाक-दटपशाहीने नवीन घर तसेच जुने घर दुरूस्ती करताना कोणत्याही खात्याची परवानगी वा ग्रामपंचायतीची सुध्दा परवानगी नसताना चुलता घर बांधत आहे. त्यासाठी मी व माझे सामाईक जमिनीतील इतर हिस्सेदार कुठे तक्रार करू शकताे....तसेच सर्व नियम म्हणजेच कांदळवनाच्या कक्षेत येणारी जमिन,सीआरझेड आदिंचे नियम डावलून फक्त वकीलाच्या सल्ल्याने नवीन घर बांधत असेल तर साहेब त्यांना दंड तसेच शिक्षेची काय तरदूत आहे. कृपया माहीती देण्यात यावी,
गावठाण जागेत बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार , ग्राम पंचायातीस आहे . त्या मुले या बाबत ग्राम पंचायातुई कडे अर्ज करणे आवश्यक
ग्राम पंचायत कायदा १९५८ चे कलम ५२ प्रमाणे , ग्राम पंचायातीस अधिकार आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil Jadhav
14-03-2016
spj100@rediffmail.com
कृषक दिनी कुळ असलेल्या संरक्षित कुळाचा "३२ग" आणि यांनी "३२म" प्रमाणपत्र मिळाल्यानंतर,गाव कामगार तलाठी यांना ७/१२ सदरी नोंद करावयाचा आदेश दिला होता असा"३२ग" प्रांत अधिकारी यांनी रद्द केला असल्यामुळे, "३२म" चा आदेश "गावकामगार तलाठी " पाळत नसल्यास काय करावे ,७/१२ नोंद का होत नाही, याचा नियम काय आहे याची माहिती मिळावी
३२ग नंतरच ३२म प्रमाणपत्र दिले जाते. ३२ग रद्द केला आहे तर ३२म सुद्धा रद्द झाला. नोंद प्रमाणित होणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by abhijit
13-03-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय शासकीय सेवेत असणारा कर्मचारी जर आपल्या आई वङीलांचा सांभाळ करीत नसेल तर त्यांना मुलाच्या वेतनावर हक्क सांगण्यासाठी काही शासन निर्णय कींवा न्यायालयीन तरतुद आहे का?
याच site वरील ज्येष्ठ नागरिक कायदा वाचवा किवा याबाबत उप विभागीय कार्यालयाशी संपर्क करावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
12-03-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय भाऊसाहेब, पूर्वी सिलिंग कायदा असताना कमाल क्षेत्रा पेक्षा जादा जमीन वडिलांकडे होती म्हणून त्यांनी दोन मुलांच्या नावावर प्रत्येकी २० बिगे जमीन केली व तिसऱ्या मुलाच्या नावावर ७ बिगे जमीन केली सदर क्षेत्र वडिलोपार्जित असून वडील ह्यात नाही. ज्या मुलांच्या नावावर २० बिगे जमीन केली आहे. ते म्हणतात कि हि वाटणी पक्की असून वडिलांच्या शिल्लक जमिनी मध्ये वाटणी माघतात अशा वेळेस ७ बिगे जमीन मिळालेल्या सर्वात मोठ्या मुलाने काय करावे.
वडिलांच्या नावे शिल्लक असणाऱ्या मिळकतीसाठीच वारस नोंद होऊ शकेल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by rohit patil
12-03-2016
rhtpatil168@gmail.com
सर माझे पणजोबा नाव हरी यादव पाटील यांना मुले चार १)भादू हरी पाटील २)भास्कर हरी पाटील ३) मोहन हरी पाटील ४) बाबू हरी पाटील पण हरी पाटील हे दारू पीत होते म्हणून सर्व जमीन विकत होते म्हणून गावातील लोकांनी त्यांची जमीन १९२१ साली एक मुलगा भादू हरी पाटील हा दोन महीन्याच असताना याचा नावावर बक्षीस पत्र केले पण ते नोंदणी कुत नव्हते व १९८५ पर्यंत सवे जमीन कसत होते पण १९५५ साली भादू हरी पाटील मरण पावले व ती जमीन त्यांचा मुलगा राजाराम पाटील व एकनाथ पाटील अ पा का म्हणून आए यांची नवे लागली तर उर्वरित तीन मुलांचा त्यावर हक्क राहील का म्हणजे मोहन ,भास्कर ,बाबू यांचा
अ पा क च्या फेरफार मध्ये नमूद असणाऱ्या सर्व लोकांचा हक्क राहील तसेच हरी यादव पाटील यांच्या नावे असलेल्या मिळकतीवर सर्व वारसांचा हक्क आहे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by भारत borude
11-03-2016
bharatborude69@gmail.com
आदरणीय साहेब ,
माझा एक प्रश्न आहे तरी मला मार्गदर्शन करावे हि विनंती,
१)मला माझ्या मालकीच्या जमिनीचे(पोटखराब - अ) क्षेत्राचे सपाटीकरण करायचे आहे (जमीन खूप उंच सखोल,दगड धोंडे ,व मुरुमाची आहे),त्याच क्षेत्रातून दगड व मुरूम काढून त्याच क्षेत्रात
वापरायचे आहे ,त्यासाठी महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागेल का?घ्यावी लागेल तर कोणाची(तहसीलदार कि कलेक्टर साहेबांची) तसेच रॉयलठी भरावी लागेल का? अर्जाचा नमुना व माहिती द्याल का.
,कृपया मार्गदर्शन करावे.
कळावे,
भरत बोरुडे
Question by संदीप
11-03-2016
sandeep_chdhri@rediffmail.com
महोदय,एखादया धोरणात्मक निर्णयाला महानगरपालिकेच्या महासभेची मंजूरी मिळाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते.म्हणजे तो निर्णय लागु करण्यासाठी कुणा कुणाच्या परवानगीची गरज असते..कृपया मार्गदर्शन करावे.
Question by प्रमोद पवार
11-03-2016
pramodpawar23@gmail.com
नवीन शर्तीची जमीन आहे. शेतकरी अपंग आहे जमीन मात्र शेती लायक राहिली नाही. शेतकऱ्याने १९९३ पासून मान जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून शर्त शिथिल करून मागितले होते. त्या नंतर शर्तभंग केस चालली व मुदत देउन अकृषिक करून घ्यावी असा आदेश झाला.मात्र दरम्यान शेतकरी अपघातात पूर्ण अपंग झाला . पुढील प्रक्रिया केली नाही. जागेवर घर व दुकानाचे गाळे आहेत.
शेतकरी नझराणा भरण्यास तयार आहे दंड भरण्यास तयार आहे.तसा अर्ज हि केलाय.
असे दंड व नझराणा भरून घेण्याची तरतूद आहे काय? शासन निर्णय अथवा आदेश ,कृपया मार्गदर्शन व्हावे
दंड व नझराणा भरून घेण्याची तरतूद आहे. संबंधित कार्यालयात संपर्क साधावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by भारत borude
11-03-2016
bharatborude69@gmail.com
आदरणीय सर,
माझ्या आजोबांनी हयात असताना शेतजमिनीचे खाते फोड केले ( माझे वडील,आई,आत्या,मी व
माझा सावत्र भाऊ आणि वहिनी यांचे नावावर क्षेत्र केले आहे १९९० ला )व वडिलांनी त्यांचा काही हिस्सा विकला व काही आईच्या नावे केला ,आता वडिलांच्या नावावर काहीच जमीन नाही) आत्याची जमीन माझ्याकडे आहे २५ वर्षापासून परंतु ७/१२ सदरी ती स्वत कसते अशी नोंद आहे,मी व आई वडील एकत्र राहतो,भाऊ ३० वर्ष्यापासून वेगळा राहतो आहे.,आत्या दुसर्या गावी राहते ती आता येत पण नाही,व तिला मुलबाळ नाहीत व पती पण वारले आहेत,मला असे विचारायचे आहे कि आत्याची जमीन वडिलांच्या नावे हक्क्सोद्पत्राने करता येईल का किवा
आत्याचे मागे तिचे वारसदार कोण लागतील? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
१. आत्याचे हक्क सोड पत्र , आत्याचे संमतीने वडिलांचे लाभात करता येयील
२. अत्त्याचे मृत्युपछात , मिळकत हिंदू वारसा कायदा कलम १४ प्रमाणे
वडिलांचे वारसांना मिळेल
आत्याची आई म्हणजे आपली आजी
आपले वडील
आपले चुलते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by bharatborude
11-03-2016
bahratborude69@gmail.com
आदरणीय सर,
माझ्या बहिणीचे पती वारलेले आहेत व मुले लहान आहेत व त्यांच्या आजोबांच्या नावावर शेतजमीन व घरे आहेत ,परंतु आजोबा व त्यांची दोन मुले(एकूण तीन होते)ती शेतजमीन विकत आहेत( काही विकली आहे ) ,बहिणीला व तिच्या मुलांना वारस नोंद करता येईल का,जमीन (वाडवदिलापार्जीत आहे व काही सरकारकडून(मिलिटरी) बहिणीच्या सासर्यांना मिळालेली आहे) करता यईल तर काय करावे लागेल,कोणती कागदपत्रे लागतील.
कृपया मार्गदर्शन करावे.
बहिणीचे सासरे यांचे नावावर जमीन असल्यास त्यावर बहिण व तिच्या मुलांची नावे वारस म्हणून नोंद करता येणार नाही. जमीन वडिलोपार्जित असल्यास आणि त्यामध्ये हक्क हिस्सा पाहिजे असल्यास दिवाणी दावा दाखल करावा लागेल.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Question by सतीश मासाळ
10-03-2016
satish_masal@yahoo.com
गावठाण विस्तार बाबत माहिती हवी आहे
महसूल व वन विभागाचा दिनानक १० फेबुर्वारी १९८३ चा शाषण निर्णय वाचा . ( तो माझ्याकडे नाही ) .
गावठाण विस्तार हा खालील कारणासाठी होतो
१. लोकसंख्या वाढ
२. भटक्या व मागास जातींचे पुनर्वसन
३.पूरग्रस्तांचे पुनर्वसन
ग्राम पंच्यातीने लोकसंख्या वाढी मुले गावठाण विस्त्राची गरज आहे याची तपासणी करून त्या प्रमाणे ठराव करणे आवश्यक आहे . सदरचा ठराव तहसीलदार यांचेज्कडे द्यावा .
कमीतकमी १५ सदस्यांनी ( २००० किव्न्हा कामीं लोकसंक्या) अथवा २५ लोन्कांनी , २००० पेक्षा जड लोक्सन्ह्य्क़ असल्यास , अर्ज करणे आवश्यक आहे .
शेतकरी कुटुंबास ३००० चौरस फूट तर बिन शेतकरी कुटुंबास १५०० चौरस फूट क्षेत्र जमीन दिली जाते .
सरकारी जागा उपलब्ध असल्यास , ती गावठाण विस्तारास्ठी उपयोगात आणली जाते . सरकारी जागा उपलब्ध नसल्यास , खाजगी जागा संपादित करावी लागते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राम गवाणे
10-03-2016
ram.gavhane@gmail.com
सर आम्ही आमचे बहिणीच्या पूर्ण समंती ने रीतसर मार्गाने हक्क सोड पत्र तहसीलदार कार्यालयात जावून नोंदणी Karun घेतले परंतु बहिनीच्या मुलाने हक्क सोड पत्र नोंदणी झाल्या नंतर आमचे गावाच्या तळाठी कार्यालयात जावून त्या बाबत पत्र तेवून आक्षेप नोंदवला आहे तरी माझा प्रश्न असा आहे कि तो मुलगा हक्क सोड पत्र बाबत आक्षेप नोंदवू शकतो का आणि नसेल तर काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
बहिणीच्या मुलास बहिणीने केलेय हक्क सोड पत्रकावर हरकत घेण्याचा अधिकार नाही . केवळ आपली बहिणच असी हरकत घेऊ शकते . मात्र असि हरकत तलाठी यांचे कडे घेऊन उपयोग नाही . त्या साठी हक्क सोड पत्र दिवाणी न्यायालयात आव्हानित करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रवींद्र गव्हाणे
10-03-2016
ravindra171282@gmail.com
Sanjay Kundetakar सर आपले धन्यवाद मी दिनांक 10.01.२०१६ एक प्रश्न विचारला होता त्या मध्ये ३ मुली आणि ३ मुलां मध्ये जमिनीचे वाटप कसे होयील त्या मध्ये आपण मुलां प्रमाणे मुला इतकाच हक्क असेल सांगितले होते परंतु सर मी त्या मध्ये हा उल्लेख केला नवता कि कि आमचे आत्या चे लग्न हे आजोबा १९८९ साली वारले त्या अगोदर झाले आहे परंतु सर मी तुमचा हिंदू उतराधिकार अधिनियम -१९५६ बाबत आपला ब्लोग वरती भागात वाचला त्यामध्ये आपण जमिनीच्या वाटपा बाबत उदाहरण क्रमांक १ मध्ये असे सांगितले आहे कि दिनांक 22.06.१९९४ च्या पूर्वी मयत व्यक्तीची मिळकत वाटप त्या मध्ये मृत व्यक्तीस दोन मुलगे अ आणि ब आणि दोन मुली क आणि घ आहेत आणि मयताचे मरतु दिनांक १९९४ पूर्वी झाला आहे तर त्या मध्ये मयत व्यक्ती मिळकतीत तीन भाग करता येतील एक मयताचा दुसरा भाग अ चा आणि तिसरा भाग ब चा असेल , अ आणि ब ला मयताच्या मिलकतीत तीन भाग पैकी एक एक भाग मिळेल आणि उर्वरित मयताच्या भागाचे पुन्हा चार भाग होतील असे दिले आहे तर असा काही प्रकार आहे का असेल तर त्या बद्दल मार्गदर्शन करावे कश्या प्रमाणे हे वाटप घडून येते त्या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे त्या बाबत काय नियम असतील तर सांगावे मार्गदर्शन मिल
आपली कागदपत्रे पाहिल्याशिवाय आपले समाधान करणे शक्य होणार नाही. आपण एखाद्या वकिलाचा सल्ला घेणे योग्य ठरेल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
09-03-2016
ravindra.golesar@rediffmail.com
नमस्कार सर, दुष्काळ निधी वाटप बाबत शासनाचे कसे नियोजन असते ७/१२ वरील व्यक्तींना स्वतंत्र निधी दिला जातो का. किंव्हा ७/१२ वरील एकाच प्रमुख व्यक्तीला निधी दिला जातो ७/१२ वरील इतर व्यक्तीने हरकत घेतल्यास निधी दिला जात नाही तो निधी परत शासनाकडे जातो का या बाबत काही नियम असल्यास कृपया कळविण्यात येउन उचित मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
७/१२ वर एकापेक्षा अधिक व्यक्तींची नवे असल्यास , ती मिळकत सह्धाराकांची /सामायिक असते . ७/१२ वरील सर्व व्यक्तींना अशी मिळण्याचा हक्क असतो .
आपण आपला बँक खाते क्रमांक / आधार क्रमांक तलाठी यांचे द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित पाटील
09-03-2016
rhtpatil168@gmail.com
सर माझे पणजोबा नाव हरी पाटील हे सर्व जमीन विकत होते म्हणून गावातील लोकांनी त्यांची जमीन १९२१ साली एक मुलगा भादू पाटील हा दोन महीन्याच असताना याचा नाव वर बक्षीस पत्र केले व या नंतर त्याला तीन मुले झाली ते सर्व ती जमीन कसत होते पण १९५५ साली भादू पाटील मरण पावले व ती जमीन त्यांचा मुलगा राजाराम पाटील व एकनाथ पाटील अ पा का म्हणून आए यांची नवे लागली व १९८५ पर्यंत याने कासू दिली व त्या नंतर भादू पाटील चा मुलगा राजाराम पाटील याने त्याकार हक्क गाजवला व ती सर्व जमीन घेऊन टाकली तर उर्वरित तीन मुलांचा त्यावर हक्क राहील का
Question by रोहित पाटील
09-03-2016
rhtpatil168@gmail.com
सर १९२१ सालची नोंद तहसील मध्ये मिळाली नाही ते म्हणतात ती जीर्ण झाली मंग त्यावर उपाय काय
Question by abhijit
09-03-2016
abhijitkadam55@gmail.com
महोदय,
इनाम वतन जमीन नोंदवही ११८७ नुसार माझ्या गावात देवस्थान इनाम एकूण १११ एकर होता. आता तो ६० एकरच आहे. याबाबतीत बेकायदेशीररित्या जमिनींचे हस्तांतरण झाल्याचे दिसून येते. एकूण २५ एकर जमिनीस कुळ लागले आहे. तसेच कुळानेही जमिनी विकल्या आहेत. काही जमिनींचे ७-१२ खालसा केलेले आहेत. तर ती जमीन मुळ देवस्थानचे नाव करण्यासाठी शासन निर्णय किंवा न्यायालयीन निर्णय आहेत काय? त्याची कार्यपद्धती सांगा
देवस्थान जमिनीस कुल कसे लागले ?
कुळाचे नवे विक्री किंमत कसी निच्छित करण्यात आली ? याचा शोध घेऊन या सर्व घटना विरुद्ध अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित जठार
08-03-2016
www.roraj8@gmail.com
आमच्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीचे मुत्युपत्र तयार केले आहे. तर तालाठीने मुत्युपत्र नोंद करण्यासाठी सर्व वारसांचे ना हरकत प्रमाणपत्र/ प्रतिज्ञापत्र जोडण्यास सांगितले आहे
तर हे सर्व वारसांचे ना हरकत प्रमाणपत्र/ प्रतिज्ञापत्र जोडावे लागते का?
तलाठी म्हणतांत हि सर्व जमीन वडिलोपार्जीत आहे . स्व:कास्ताची नाही
जमीन वडिलोपार्जित असली व तिचे वाटप अथवा वारसाने वडिलांचे हिस्स्यास आली असल्यास , इतर वारसांचे प्रतिज्ञा पत्र आवश्यक नाही .
तलाठी यांना म्हणा , वर्दी नोटीस इतर नातेवाईकांना द्या . कोणाची हरकत असल्यास , नोटीस दिल्याने लक्षात येयील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भाऊराव काकड
08-03-2016
bhaujyoti@gmail.com
आदरणीय सर
माझ्या आईचे वडील १९९० ला मयत झाले . तरी माझा आईला १ भाऊ आहे आणि ३ बहिणी आहे . ३ बहिणींचे नाव इतर अधिकार या सदरात आहे . तर नवीन कायद्यानुसार वाटप कसे केले जाईल . एक बहिण संपत्तीत वाटा मागते आहे . तर तो मिळेल का ? जमीन वडिलोपार्जित आहे तसेच अजून आईच्या चुल्त्यांचीच खातेफोड झालेली नाही .नवीन कायद्यानुसार योग्य ते मार्गदर्शन कराव्वे
वडिलांचा /आई चा मृत्य झाला असेल तर त्यांचे हिस्स्याची जमीन , बहिणीस देणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ज्योती काकड
08-03-2016
jkakad7@gmail.com
आदरणीय सर माझासाठी हे खूप मह्वाचे आहे माझा आईचे वय ७० वर्ष आहे म्हणजे जन्म १९५६ पूर्वीचा .. आईचे वडील १९९० साली मयत झाले . तसे आईचे आणि भावाचे वाद झाले . भावाने वेलीवेली जवळ जवळ ५ लाख रुपये आई जवळून उकळले . आईचे नाव इतर हक्कात आहे . तर नवीन कायद्या नुसार आईला वडिलोपार्जित जमिनीत काही वाटा मिळू सकतो का. ? मामा सांगतोय १ लाख घे आणिसही दे ... नाहीतरी कायद्याने तुझा (बहिणीचा ) काहीही हक्क नाही .. तुला काहीही मिळणार नाही .. मला सुप्रीम करताच निकाल कळलेलाच नाही .आईचे नाव इतर हक्कात असल्याने पण जन्म १९५६ पूर्वीचा असल्याने काहीउपयोग होईल का .. प्ल्झ सर लवकरात लवकर उत्तर द्यावे मी आपली आभारी असेल
सन 2005 च्या कायद्यान्वये 17 जुन 1956 ते 8 सप्टेंबर 2005 या दरम्यान जन्मलेल्या मुलींनाही, हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्मजात हक्क असेल अशी तरतुद केली आहे. परंतू अशी मुलगी दिनांक 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असावी अशी तरतूद होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 16/10/2015 रोजी दिवाणी अपिल क‘. 7217/2013 (प्रकाश आणि इतर विरुध्द फुलवती आणि इतर या प्रकरणात निकाल देऊन ‘ वडिलोपार्जित हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुलाइतकाच जन्मजात हक्क मिळणारी मुलगी आणि त्या मिळकतीत हक्क असणारा सहदायक (कोपार्सनर) हे दोन्ही दिनांक 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असावेत, मग ती मुलगी कधीही जन्मली असो.‘ असे म्हटले आहे.
तथापी, 20 डिसेंबर 2004 पूर्वी ज्या वाटण्या घडून आल्या त्यांना यामुळे बाधा येणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
सुप्रीम कोर्टाचे निकालाचा गैर अर्थ लोक काढत आहेत
आपण दिलेलेया माहितीनुसार , आई जमिनीत /मिळकतीत हिस्सा आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3460 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
