जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सुवर्ण TATHE
20-02-2016
dipakkedare2015@gmail.com
सर मला खुला महिला ३० टक्के आरक्षण साठी नोन क्रिमिलायेर काढ्याचे आहे . मी विवाहित असून नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्रावर वडिलांचे नाव हवे कि पतीचे...तसेच नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्रावर वडिलांचे व पतीचे दोघांचे नाव टाकून मिळेल का
Question by गणेश शिंदे
20-02-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,पत्नीच्या नावावर शेतजमिनीचा ७/१२ उतारा असल्यास शेतकरी पुरावा म्हणून पतीस त्याच्या नावे शेतजमीन खरेदी करता येईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
पत्नीच्या माहेरच्या नावावर शेतजमिनीचा ७/१२ उतारा असल्यास शेतकरी पुरावा म्हणून पतीस त्याच्या नावे शेतजमीन खरेदी करता येणार नाही. दोन कुटुंबे भिन्न आहेत
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सुवर्ण TATHE
20-02-2016
dipakkedare2015@gmail.com
सर मला खुला महिला ३० टक्के आरक्षण साठी नोन क्रिमिलायेर काढ्याचे आहे . मी विवाहित असून नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्रावर वडिलांचे नाव हवे कि पतीचे...तसेच नोन क्रिमिलायेर प्रमाणपत्रावर वडिलांचे व पतीचे दोघांचे नाव टाकून मिळेल का
Question by सुवर्ण TATHE
20-02-2016
suvarnatathe2013@gmail.com
सर मला खुला महिला प्रवार्गासाठीचे नोन क्रिमिलेयर प्रमाणपत्र काढायचे आहे माझे पती वर्ग ३ चे राज्य शासन कर्मचारी असून नोन क्रिमिलायेर च्या अर्जासोबत पतीचे मागील ३ वर्षाचे १६ नंबर फोरम जोडू कि तहसीलदार यांचे वेगळे उत्पन्न प्रमाणपत्र काढू
Question by VIKRAM YADAV
20-02-2016
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार ,
मला मुलगा नाही २ मुली आहेत ( वडील मयत) असा फेरफार नोद अर्ज करून माझा आईने फेरफार मधून माझे नाव लावलेच नाही व जमीन विकली कोर्टात दावा दाखल करून ती विकलेल्या जमिनीचा दस्त मी रद्ध करून घेतला मी मुलगा अह्हे हे आईने कोर्टात मान्य केले फुडे तडजोड होऊन विक्लेलेया जमिनेचे रक्कम मी कोर्टात भरली ( त्या साठी ३ गहिनी माझा नवे हक्क सोड पत्र कोर्टात लिहून दिले ) अप्प्ले सर्व हक्क माझा नवे सोडले म्हणून मान्य केले व कोर्ट हुकुम नामा वरून तळाती यांनी ७/१२ वर माझे नाव आत्ता आले आहे ,पुन तय आधीच
( माझी आई ,२ बहिणीने ) तीच जमीन दुस्याया पार्टीला विकली होती .दस्त सुधा बनलेला होता तयची नोंद मी ठ्बवली व ( ३ तिघींनी ) माझा नवे सोडलेले हक्क सोड पत्र तळाती ,सर्कल ,तहशिलदार साहेब ह्यांनी माझे सर्व काकड पत्र बघून माझा नवे नोद करावी असा हुकुम दिला ,तळाती साहेबा नि माझा नाव आत्ता प्रयात ७/१२ नोहते ते आत्ता ७/१२ वर आले आहे तर त्या अधिक मला नासागता माझा आई व २ बहिणीने विकलेली तीच जमीन आत्ता माझ्झा मालकीची होऊ शकते का ? पऑन समोरचा पार्टीने तय्वर प्रांत साहेब यांचाकडे अप्पील दाखल केले अह्हे .पुन मला कोणतही नोटीस पातेव्लेली नाही.तर फुडे मी काय करू.?
कोर्ट हुकुमनाम्यात वर्णन केलेली जमीन तुमच्या नावे होईल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by दत्तात्रय माळी
20-02-2016
dattatraymalidd@gmail.com
माझा असा प्रश्न आहेकी सन १९७० पूर्वी विवाह झालेला महिलांना वडिलांच्या जमिनीत किती हिस्सा बसतोय
Question by गणेश शिंदे
19-02-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,वडिलोपार्जित मिळकतीचे मृत्युपत करून ठेवता येते का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
खाली नमूद केल्याप्रमाणे जर मिळकत , व्यक्तीचे नवे वारसाने अथवा वाटपाने झाली असेल तर , मृत्य पत्र करता येयील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
वडिलोपार्जित मिळकत जो पर्यंत वाटप होऊन , व्यक्तीचे नावे "metes and bound " वाटप होत नाही अथवा coparcenar चे नावे मिल्कातीस लागत नाही तो पर्यंत , अश्या जमिनीची /मिळकतीची विल्हेवाट लावता येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
भारतीय वारसा कायदा, 1925 खालील मृत्यूपत्राच्या तरतुदी
मृत्यूपत्र न करता मरण पावलेल्या विविध धर्माच्या व्यक्तींच्या मिळकतीचे वारस कसे ठरविले जातात या विषयीच्या तरतुदी या कायद्यात दिलेल्या आहेत. काही लोक मृत्यूपूर्वी, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मिळकतीचे उत्तराधिकारी कसे ठरवावेत यासाठी मृत्यूपत्र करून ठेवतात.
भारतीय वारसा कायदा, 1925, कलम-2 अन्वयये मृत्यूपत्र-इच्छापत्राची व्या‘या खालीलप्रमाणे दिलेली आहे.
‘‘ मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणार्याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर रितीने घोषित केलेली इच्छा होय.’’
मृत्यूपत्राचे महत्वाचे निकष :
* मृत्यूपत्र’’ करणारी व्यक्ती सज्ञान असावी तसेच तिची मानसिक स्थिती चांगली असावी.
* मृत्यूपत्र स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील फक्त स्वत:च्या हिश्शाबाबत करता येते.
* मृत्यूपत्र वेडाच्या भरात, नशेत, आजारात, शुद्धीवर नसताना, फसवणुकीने, दबावाखाली करण्यात आले असल्यास ते विधीग‘ाह्य ठरणार नाही.
* मृत्यूपत्रात मिळकतीबद्दल पुरेसे व निश्चित वर्णन असले पाहिजे.
* मृत्यूपत्र नोंदणीकृत असले पाहिजे असे बंधन नाही. पण ते नोंदणीकृत असल्यास पुढे कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत.
* मृत्यूपत्रात मृत्यूपत्र करणार्याकडे मिळकत कशी आली आणि मृत्यूनंतर त्या मिळकतीची विल्हेवाट कोणी व कशी लावावी याबाबत स्पष्ट उ‘ेख असला पाहिजे.
* मृत्यूपत्र स्वतंत्रपणे व विचारपूर्वक केले असल्याचा उ‘ेख मृत्यूपत्रात असणे आवश्यक असून त्याखाली मृत्यूपत्र करणाराची सही/ अंगठा व काही साक्षीदारांच्या सह्या असल्या पाहिजे.
मृत्यूपत्राचे परिणाम :
* मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच मृत्यूपत्र अंमलात येऊ शकते.
* मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रात बदल करणे, ते रद्द करणे, नष्ट करणे, नविन मृत्यूपत्र करणे इत्यादी करण्याचे अधिकार ते करणार्या व्यक्तीला असतात. एकापेक्षा अधिक मृत्यूपत्र एकाच व्यक्तीचे असतील तर सर्वात शेवटचे केलेले मृत्यूपत्र अंमलात येते.
मृत्यूपत्राबाबत महत्वाचे न्यायनिवाडे :
* मृत्यूपत्रासाठी कोणताही निश्चित असा नमुना कोणत्याही कायद्यात सांगितलेला नाही. (वेंकटरामा अय्यर वि. सुंदरमबाळ, ए.आर.आर- 1940 मुंबई-402)
* मृत्यूपत्र करणार्या.ने त्याच्या मालमत्तेची विल्हेवाट त्याच्या मृत्यूनंतर कशी लावावी हे स्पष्ट केल्याशिवाय ते मृत्यूपत्र पूर्णपणे कायदेशीर होत नाही. (अहमद बिन सलाह वि. मोहमद बादशहा, ए.आय.आर. 1972 एस. सी.)
* 18 वर्षाखालील व्यक्तीने केलेले मृत्यूपत्र अंमलात येऊ शकणार नाही. तसेच जर ती व्यक्ती अज्ञान असतानाच मृत झाली तर ते विधिग‘ाह्य व प्रभावशाली ठरणार नाही. (के. विजयरत्नम वि. सुदरसनराव ए. आय.आर. 1920, मद्रास-237)
* मृत्यूपत्र खरे नाही, ते खोटे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी जो तसा अरोप करतो त्याच्याकडे आहे. (चंद्रकांत मेढी वि. लखेश्वरनाथ ए.आय.आर- 1976 गोहत्ती पान - 98)
* मृत्यूपत्र हा एक पवित्र दस्त मानला गेला आहे. अशा दस्ताद्वारे मृत व्यक्ती आपल्या संपत्तीच्या विल्हेवाटीबाबतची इच्छा व्यक्त करीत असते. म्हणून मृत्यूपत्राचे एक गंभीर व पवित्र दस्त म्हणून पालन केले गेले पाहिजे. (रामगोपाल लाल वि. ऐपिनकुमार 49 आय.ए. 413)
मृत्यूपत्र व विविध धर्म.
* भारतातील मृत्यूपत्र कसे असावे किंवा मृत्यूपत्राचे वारसा कसा प्राप्त होतो यासंबंधीचा कायदा म्हणजे भारतीय वारसा कायदा, 1925.
हा कायदा भारतातील सर्वधर्मियांना म्हणजे हिंदु, ख्रिश्चन, पारशी, अँग्लो इंडियन्स इ. लागू होतो. हिंदू या संज्ञेमध्ये बौद्ध, शिख, जैन, ब‘ाह्मसमाजी, आर्यसमाजी, नंबुद्री, लिंगायत इ. चाही समावेश होतो व या सर्वांना हा कायदा अंशत: लागू पडतो. मुसलमानांना हा कायदा संपूर्णपणे लागू पडत नसला तरी प्रोबेट, लेटर्स ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन इ. साठी लागू पडतो.
* हिंदू व्यक्ती स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील फक्त स्वत:चा हिस्सा अशा एकूण मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी यासाठी मृत्यूपत्र करू शकते.
* मुसलमान धर्मीयाने मुस्लीम कायद्यानुसार आपले मृत्यूपत्र केले असेल तरच ते परिणामक्षम मृत्यूपत्र ठरते.
* थोडक्यात मृत्यूपत्राबद्दल असे सांगता येईल की, जेथे जेथे व्यक्तीगत कायद्यानुसार वारसासंबंधी प्रश्न निर्माण होत नाहीत तेव्हा मृत्यूपत्राला भारतीय वारसा कायदा 1925 च्या तरतुदी लागू होतात.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by अजित
19-02-2016
ajitpatil0225@gmail.com
आदरणीय सर नमस्कार , मागे मी प्रश्न विचारला होता कि माननीय मुख्याधिकारी यांनी कोणतीही माहिती न घेता, माननीय न्यायालयाने स्टे दिलेल्या व न्यायालय समोर असणाऱ्या जागेवर समोरील व्यक्तीस बांधकाम परवानगी दिली आहे. सर आता या प्रकरणा मध्ये आम्ही पुन्हा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडून स्टेसको मिळाला आहे व तहसीलदार यांना त्याची प्रतही दिली आहे. या मध्ये आता तरी माननीय मुख्याध्याकारी हे अनधिकृत बांधकाम थांबू शकतात का ? किंवा पुढे काय केले पाहिजे ?
Question by रोहित jathar
18-02-2016
www.roraj8@gmail.com
वडिलोपार्जित जमिनीचे मूत्यूपत्र तयार होते का?
सदर जमीन स्व:कष्टाची नसून त्याच्या पूर्वजांची आहे
व यास वारसांचा विरोध आहे .
Question by rohan mohan kamble
18-02-2016
rohan_24k@rediffmail.com
namaskar sir
Me ahmadnagar district madhil chichondi patil athinl rahivasie ahe.
Mala gaothan jamine vishay prashana ahe
me talthi la sangitale ke amachy gaothan surey no. pramane nakasha dyaa. tar talathi manatha gaothan che nakashe uplabdha nahi tar mi kai karu?
Question by sanjay
18-02-2016
sanjaytadwalkar@gmail.com
ग्रामपंचायत हदीतील आमचे घराचे दक्षिणेस खुली जागा असून त्या खुल्या जागेविषयी आमचे खरेदी खातात 'आमचे मालकीची खुली जागा ' असा स्पष्ट उल्लेख आहे ; परंतु आमचे शेजार्यांनी सिटी सर्वेला त्या जागेची आम्हा तीन शेजार्यांमध्ये सामायिक अशी नोंद केली आहे .सदर तीन शेजार्यांमध्ये आम्ही व आमच्या घरालागाताचे दोन शेजारी असे आहोत.
आता आम्हास सिटी सर्वेकडील नोंद रद्द करून ती खुली जागा आमचे मालकीची करायची आहे त्या करिता काय करावे?
शेजार्यांनी केलेल्या फेरफार नोंदी विरुद्ध अपील करावे लागेल
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
17-02-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,शेतजमीन कुळकायद्यानुसार ३२ एम प्रमाणपत्राद्वारे मिळालेली आहे.परंतु ७/१२ सदरील इतर हक्कात मूळ मालकाच्या बहिणींच्या मुलांची नावे असून अपाक.म्हणून त्यांच्या आईचे नाव असल्यास इतर हक्कातील व्यक्तींना काही हक्क प्राप्त होतील का?किंवा सदर नावे पोक्लीस्त म्हणून कमी करता येतील का? कृपया मार्गदर्शन होनेस विनंती....
कुळकायद्यानुसार ३२ एम प्रमाणपत्र म्हणजे मालकी हक्क असतो. ७/१२ सदरील इतर हक्कात मूळ मालकाच्या बहिणींच्या मुलांची नावे, अपाक.म्हणून त्यांच्या आईचे नाव असल्यास इतर हक्कातील व्यक्तींना काही हक्क प्राप्त होणार नाहीत. सदर नावे पोक्लीस्त म्हणून कमी करता येतील.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
तलाठी कर्मचारी यांना शासन सेवेत ६ महिन्यापेक्षा कमी कालावधी झालेला आहे . त्यांचे अपघाती निधन झाले आहे . तर त्यांचे कुटुंबातील इतर सदस्य यांना शासन सेवेत अनुकंपा तत्वावर घेता येते का ? कोणत्या शासन तरतुदीनुसार ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून माहिती मिळवावी
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
कृपया तहसीलदार यांचे मासिक डायरी चे समीक्षण करण्याबाबतचा उद्दिस्त निहाय नमुना देण्यात यावा हि विनंती
जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून माहिती मिळवावी
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
मा. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले तलाठी यांचे निलंबन आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी रद्द केले आहेत . तर त्या तलाठी यांचे विभागीय चवकशी पण रद्द होऊ शकते का ? कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती .
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
विभागीय चवकशी सुरु करण्याची कार्य पद्धती कोणती आहे ?
विभागीय चौकशीबाबतची अनेक पुस्तके बाजारात मिळतात. त्यातून सविस्तर माहिती मिळू शकेल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
ऐपत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत कि उपविभागीय अधिकारी यांना आहेत . कार्य पद्धती कोणती आहे ? कृपया मार्गदर्शन करावे .
किमतीनुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना आहेत. त्या त्या कार्यालयात चौकशी करावी
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by स्वाती स्वामी
17-02-2016
swati.swami@yahoo.com
अकृषी परवानगीसाठी अर्जदार यांनी दोन वर्षापूर्वी अर्ज केला . नाहरकत साठी कार्यालयाकडून इतर कार्यालयांना पत्र दिले आहे परंतु समन्धित कार्यालयाचे नाहरकत / अभिप्राय प्राप्त झालेले नाहीत . तर अर्जदार यांना नवीन अर्ज सदर करण्याची सूचना द्यावी लागेल का ?
नाही . इतर कार्यालयांना तत्काळ न हरकत देण्यास कायद्याने बाधा नसल्यास, न हरकत देणे बाबत कळवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by हेमंत धनाजी ताकवले.
17-02-2016
hemanttakwale@gmail.com
मा महोदय,
मी हेमंत धनाजी ताकवले मौजे धनकवडी त.पुरंदर,जी.पुणे येथील रहिवाशी असून पंचायत समिती पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडील पुरंदर तालुक्याच्या नकाशात आमच्या गावातील ग्रा.म २४० स्त्याची नोंद आहे.मी त्या रस्त्यासंदर्भात तेथे विचारणा केली कि हा रस्ता कसा मंजूर करण्यात आला.तसेच सदरील रस्ता कोणत्या सर्वे नं / गटांमधून कसा जातो.त्याचा नकाशा वगैरे मागितला असता ते ह्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाही.ते बोलले कि हा रस्ता आमच्या आराखड्यामध्ये आहे कसा आला.कोठून जातो हे माहित नाही.
तेव्हा कृपया सदरील ग्रा.म.२४० रस्त्याची माहिती म्हणजेच नकाशा,कोणत्या गटांमधून जातो.त्याची माहिती कोठे उपलब्द होईन?
कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती,
आपला कृपाभिलाषी,
हेमंत ताकवले.
सार्वजनिक बांधकाम विभाग ..कार्यकारी अभियंता यांचेसी संपक साधा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by पाटील bajirao
16-02-2016
patilbajirao45@gmail.com
सर बी पी एल रेशन कार्ड आहे वडिलाची मुत्य झाली तर मला तहसीलदार साहेबा कडून मदत मिडल का ?
Question by पाटील bajirao
16-02-2016
patilbajirao45@gmail.com
सर आमदार निधीतून वडिलाची कर्जबाजारी पणा मुडे विश प्राशन करून आकस्मात मूत्यू झाल्यास मदत मिडणार का
Question by पाटील bajirao
16-02-2016
patilbajirao45@gmail.com
सर आम आदमी विमा योजना ची पूर्ण माहिती सागा
Question by प्रमोद पाटील
15-02-2016
pramod2615@gmail.com
सर मी महसूल मध्ये वर्ग ३ पदावर असून स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी रजेवर जायचे आहे...मी ६ वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला असून मला विनावेतन रजा किती दिवस मिळेल...???
Question by VIKRAM YADAV
15-02-2016
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर ,७/१२ नोद झाली आहे . ती पक्की करण्यसाठी किती दिवसच कालावधी असतो .
७/१२ वरील नोंद पक्कीच असते , आता पूर्वी सारख्या पेन्सिल ने नोंदी ठेवत नाहीत . जर आपल्या नोंदी विरुद्ध कोणी त्यांचे नाव लावावे असे अपील केले व केस जिंकली तरच आपले नाव बदलू शकते
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
15-02-2016
ravindra.golesar@rediffmail.com
नमस्कार सर , क्षेत्राची मोजणी करण्यासाठी खाजगी मोजणी आणावी कि सरकारी मोजणी आणावी खाजगी मोजणी केली तर कागदोपत्री तसेच कोर्ट कामासाठी ग्राह्याधारली धरली जाते काय ?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
