जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by मिलिंद रमेश khot
19-03-2016
milind.khot@rediffmail.com
आमच्या गावी( देवस्थान इनाम ) वाहिवातदार या जागेत दरवर्षी दत्तजयंती सप्ताह होत असे नंतर सर्व गावकरी लोकांनी असे ठरवले कि त्या जागेवर आपण कायम स्वरूपी सभागृह बांधावे त्या साठी मुंबई मंडळ रजिस्टर केले बांधकाम पण पूर्ण झाले आता त्या जागेवर ज्या चार भोगवाटदार आहेत ती जागा संस्थेच्या नावावर करण्यास राजी नाही पहिले तोंडी परवानगी दिली होती आता देत नाही तर ती नावावर कशी करावी सर्व ग्रामस्थ संस्थेच्या नावावर करण्यास राजी आहेत तसेच सातबारा मध्ये देवस्थान मालक सरकारी आहे तर काय पर्याय आहे नावावर करण्यास ते सांगा
Question by पंकज झांबरे
19-03-2016
zambare16@gmail.com
नमस्कार साहेब मला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हवे आहे. माझे वडिलांच्या नावावरील शेत जिगाव प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. म्हणून माझ्या वडिलांनी इंजिनीअर ने दिलेले प्रमाणपत्र काढले आहे. आता पुढे काय करावे लागेल कोणती कागदपत्रे आणखी लागतील आणि कोठे अर्ज करावा लागेल कृपया सविस्तर माहिती द्या.
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन ,जिल्हाधिकारी कार्यालयआत अर्ज करावा
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन ,जिल्हाधिकारी कार्यालयआत अर्ज करावा
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन ,जिल्हाधिकारी कार्यालयआत अर्ज करावा
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by संजय जी वाघ
18-03-2016
sanjaygwagh@gmail.gom
विविध योजनेकरिता हयातीचे प्रमाणपत्र ग्रामीण भागात कोणाकडून घ्यावे.प्रमाणपत्र देण्यास सक्षम अधिकारी कोण.
Question by स्मिता गणपत KHATPE
17-03-2016
smitakhatpe87@gmail.com
माझे पती यांनी जमीन विकली आहे तरी ज्या वक्तीने ती खरेदी केली आहे ती वक्ती त्या जमिनीच्या ७/१२ असेल त्याचा फेरफार मध्ये ती ज्या किमतीला खरेदी केली आहे ती फेरफार मध्ये लिहतात का किमत कमी किव्हा जास्त टाकू शकतात ( मंझे त्यांनी जमीन जर एक लाख rupay ला घेतली असेल तर त्याचीच नोंद करावी लागते का ती वक्ती त्यापेक्षा जास्त रुपयाची नोंद फेरफार मध्ये करू शकते ) कृपया मला मार्गदर्शन करा
नोंदणीकृत खरेदीखतामध्ये जी किंमत नमूद असते ती किंमत लिहितात.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by जयेश हरेश्वर पाटील
17-03-2016
jayeshpatil0999@gmail.com
नमस्कार साहेब
मी दिनांक ०८/०३/२०१६ रोजी शेतकरी व ७/१२ किंवा कुठल्याही प्रकारची शेतजमीन माझ्या नावे नसताना देखील मी विकत घेतलेली जमीन ७/१२ व बंगला माझ्या नावे करता येईला का अशा आपले मार्गदर्शनपर प्रश्न विचारला होता. *त्या संर्दभात आपणाकडून माहितीही मला मिळाली होती.
आपण सांगितलेले होते की
(१ जानेवारी पासून महाराष्ट्र कुल वहिवाट शेतजमीन अधिनियम कायदा १९४ चे कलम ६३ मध्ये दुरुस्ती च्या GR प्रमाणे बिनशेती वापरासाठी जमीन खरेदी करण्यासाठी जर रहिवास क्षेत्रात असेल तर परवानगीची गरज नाही) असे सांगितले होते.
त्या प्रमाणे मी तो GR काढला होता व तलाठी कार्यलयात घेऊन गेलो होते परंतू सदरचा दुरुस्ती कायदा हा माझ्या कामा साठी लागू होत नाही.असे संगितले कारण त्यामध्ये असे नमुद आहे की कोणत्याही (सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित केलेली असेल आणि अशा संपादनाच्या परिणामी ती अशा संपादनाच्या दिनांकापासून भूमिहीन झालेली असेल अशा कोणत्याही व्यक्तीला आणि तिचे वारस यांचा समावेश होईल)असे नमुद आहे
त्यामुळे तो GR माझ्या कामासाठी लागू होत नाही आणि त्यामुळे आता काय करता येईल.जेणेकरून मी खरेदी केलेली जमीन ७/१२ व बंगला कायदेर्शीर मार्गाने माझ्या नावे करता येईल. आणि त्या ७/१२ वर "घरपड"असा उलेख आहे.
तर आता पुढे काय करता येईल साहेब याची माहिती पुन्हा आपणाकडून मिळावी.
तरी मार्गदर्शन व सहकार्याची अपेक्षा साहेब...
आपण जी आर नित वाचलेला दिसत नाही
आपणास प्रतःम आपली जमीन कोणत्या परिक्षेत्रात येते याची माहिती घेणे आवश्यक आहे
ती माहिती आपणास नगर रचना कार्यालयात मिळेल
झोन बाबत्चुई माहिती आपणास मिलालेनंतर , जर जमीन रहिवास झोन मध्ये असेल तर , आपणास परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कविता शिंदे
17-03-2016
kvt.shinde1@gmail.com
सर नमस्कार. मला माझ्या गावी शाळा व इतर सामाजिक कामासाठी जागा हवी आहे.
१. ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेली गायरान जमीन सामाजिक संस्थेला देण्याचे अधिकार कुणाला आहेत? ग्रामसभेचा ठराव पुरेसा आहे का?
२. शासनाच्या वतीने भाडेपट्टा कोण करू शकत?
३. जमीन घेण्याची इतर पध्दती कोणत्या?
- खुप खुप धन्यवाद..!
ग्राम पंचायत कायदा १९५८ चे कलम ५५ अन्वये
१. तीन वर्षापेक्षा जड कालावधीचा भाडेपट्टा
२. जमिनीचे हस्तांतरण - विक्री
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येत नाही
नुसता ठराव असून उपयोग नाही
गायरान जमीन हि ग्राम पंच्याती कडे निहित असते त्या मुले अश्या जमिनीचे भाडेपट्टा ,विक्री करण्यास शाश्नाचा सबंद नाही
शाश्नाचे वतीने , जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी भाडेपट्टा करू शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sandeep chdhri
16-03-2016
sandeepchaudhari85@gmail.com
महोदय,एखाद्या धोरणात्मक निर्णयाला महानगरपालिकेच्या महासभेची मंजूरी मिळाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते.म्हणजे तो निर्णय लागु करण्यासाठी कोणा कोणाच्या मंजूरीची गरज असते.
Question by भाऊराव काकड
16-03-2016
bhaujyoti@gmail.com
आदरणीय सर माझ्या पहिल्या प्रश्नाचे समाधान केल्याबद्दल आभारी ..........माझ्या आईचे वडील १९९० मध्ये मयत झाले नंतर आईचे नाव इतर अधिकारात आले .परंतु आईच्या नंतर तिची मुले ( म्हणजे आम्ही ) वारस ..लागू शकतो का ? इतर अधिकार सदराची आईचे नाव भोगवटदार सदरी आणण्यासाठी काय करावे लागेल .......?
बर्याुच वेळा असे दिसून येते की, मयताच्या वारसांपैकी फक्त पुरुषांची नावेच 7/12 च्या कब्जेदार सदरी नोंदवली जातात आणि महिलांची नावे (पत्नी, विवाहित/अविवाहित मुली इत्यादी) इतर हक्कात नोंदवली जातात. ही पध्दत अत्यंत चुकीची आहे. मयताच्या वारसांपैकी महिलांची नावे सुध्दा कब्जेदार सदरीच नोंदवावी. हिंदू वारसा कायदा 1956 मधील सन 2005 च्या सुधारणेनुसार मुलींनाही, मालमत्तेत मुलाइतकाच हिस्सा मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
हिंदु स्त्रीला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसाने मिळालेली कोणतीही संपत्ती मृताचा कोणताही मुलगा किंवा मुलगी ( कोणत्याही पूर्वमृत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्या अभावी, तिच्या पित्याच्या वारसाकडे प्रक्रांत होईल.
इतर अधिकार सदरातील आईचे नाव भोगवटदार सदरी आणण्यासाठी तलाठीकडे अर्ज करावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
16-03-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,तहसीलदार साहेबांच्या निकालाविरुद्ध उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील चालू असताना पक्षकारास त्याबाबत संशय असल्यास नसल्यास सदर अपील अन्य ठिकाणी वर्ग होऊ शकते का?त्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
जिल्हाधिकारी याना अपील अन्य ठिकाणी वर्ग करणेबाबत अर्ज करावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by आजिनाथ शिंदे
16-03-2016
navnathshinde5555@gmail.com
आदरणीय सर,
मी चिखलठाण ता.करमाळा जि.सोलापूर चा रहिवासी आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर गावाचे पुनर्वसन झाले आहे. त्या मध्ये मिळालेली दुसरयाची जमिन मी घेतलेली आहे. पण त्याची खरेदी केलेली नाही. खरेदीसाठी कलेक्टर ची परवानगी आणावी लागते. असे मला सांगण्यात आले आहे. त्याची प्रोसेस काय असते व ती परवानगी मी स्वतः आणू शकतो का ? याबद्दल मार्गदर्शन करावे.
प्रकल्प ग्रस्त व्यक्तीची संपादित झालेली जमीन जर वर्ग २ ची असेल तर , अश्या प्रकल्प ग्रस्त व्यक्तीस मिळणारी जमीन अथवा भू खंड हि वर्ग २ धारणा प्रकारचा म्हणून दिला जातो .अशी वर्ग २ धरणा प्रकारची मिळकत ( भूखंड /जमीन) प्रदान झाले नंतर १० वर्ष ननतर वर्ग १ धारण प्रवर्गात वर्ग करता येऊ शकते . ( परवानगीने व अधिमुल्य जमीन करून )
मात्र जर संपादित झालेली जमीन , वर्ग १ धरणा प्रकारची असेल तर , प्रदान करण्यात येणाऱ्या जमिनीचा धरणा प्रकार वर्ग १ असतो
त्या मुले आपण ज्या प्रकल्प ग्रस्त व्यक्ती कडून जमीन खरेदी केलेली आहे , त्याची मुल संपादित झालेली जमीन कोणत्या धरणा प्रकारची होती ते पहा . त्या वरून परवानगीची गरज आहे का नाही ते ठरवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय जी वाघ
15-03-2016
sanjaygwagh@gmail.gom
आदरणीय सर
हस्तलिखित ७/१२ बंद असतांनी मूळ ७/१२ ची छायाप्रत ही सत्यप्रत म्हणून मागणी केल्यास तलाठी ह्यांचेकडून मिळू शकेल काय व कोणत्या नियमानुसार
Question by संजय Jadhav
15-03-2016
spj7474@gmail.com
संरक्षित कुळाला ३२ग मिळाला त्यानंतर ३२म खारेदिप्रमाण पत्र मिळाले आहे यानंतर जे कुळ नाही अशा व्यक्तीनि अपील केले असता प्रांत अधिकारी यांनी ३२ग रद्द केला आहे तरी ३२म अनावये ७/१२ नोंद बाबत माहिती तसेच नियम काय आहे ?नोंद प्रमाणित होईल का?
३२ग नंतरच ३२म प्रमाणपत्र दिले जाते. ३२ग रद्द केला आहे तर ३२म सुद्धा रद्द झाला. नोंद प्रमाणित होणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by kiran kale
15-03-2016
kkale40@gmail.com
Respected sir,
Good afternoon!!!
I had doubt with respect to the agriculture land which was purchased by my father before 13 years ago. The same land was under Ramoshi vatan land. On the year of 2002 all formalities had been completed by both the parties except prior permission of competent authority for sale of such land. At the same time. According to the decree of Hon’ble Civil Judge Junior Division, Sale deed has been executed and registered before Sub-registrar. Now Due to the application of opposite party Hon’ble Prant (Dept. Collector) has cancelled the decree of the Hon’ble Civil Court and ordered that the land has to be submitted to the govt. As a sale Deed had been executed without permission.
Now, my father is ready to perform our part with respect to the said permission.
Kindly guide me; I would very grateful to you
Prant Adhikari (SDO ) has not cancelled the decree of the court . SDO has no authority to cancel the decree of the court . However SDO might have cancelled the mutation entry by which ,land was mutated in your fathers name .
As suggested earlier you can prefer an appeal before the Additional Collector .
Check whether permission is necessary to transfer Ramoshi watan land .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
ते खरेदीखत न्यायालयाच्या आदेशानुसार केले होते हि बाब प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या. किंवा प्रांताधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध अपील करा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सुभाष माजरेकर
15-03-2016
mjrkrganesh@gmail.com
वर्ग २ च्या जमिनीचे विक्री बाबतचे साठे खत सन २००० साली केलेले आहे. परंतु आता सदरचा पूर्वीचा जमीन मालक खरेदी खत करण्यासाठी तयार नसल्यास जमिन खरेदी खत करण्यासाठी काय करावे लागेल. आता मालकाच्या नावे सदरची जमीन वर्ग क्र. १ झालेली आहे तरी मार्गदर्शन मिळावे,
वर्ग क्र. २च्या जमिन मालकाने जमिन एखाद्याला मुत्यपत्राद्वारे दिलेली आहे. सदया ती जमिन त्याच्या एकट्याच्या नावे आहे. तर त्याच्या मुत्यू पश्चात ज्याच्या नावे मुत्यूपत्र केले आहे त्याच्या नावे ती जमिन होवू शकते का....त्यावर त्या मालकाचे वारस आक्षेप घेवू शकतात का..आता सद्या ती जमीन वर्ग १ झालेली आहे.
साठे खत नोंदणीकृत नसेल तर त्याला कायद्यात किंमत नाही. साठे खत नोंदणीकृत असेल तर दिवाणी न्यायालयात दाद मागावी.
जमीन वर्ग १ ची झाल्यावर मुत्यूपत्र केले असेल तर ज्याच्या नावे मुत्यूपत्र केले आहे त्याच्या नावे ती जमिन होवू शकते
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by किरण काळे
15-03-2016
kirankale2010@rediffmail.com
मी सुमारे १३ वर्षापूर्वी रामोशी वतन जमीन खरेदी केली होती आणि ते खरेदीखत म. दिवाणी नायादिश प्रथमवर्ग नाय्धादाधिकारी यांचे हुक्मावरून केले होती परंतु आता ताय्स सक्षम अधिकार्याची परवानी नाह्वती या कारणावरून ते खरेदी खत उपविभागीय प्रांताधिकारी यांनी रद्ध केले आहे आणि जमीन सरकार जमा करण्याचा आदेश दिला आहे. तरी आता काय करावे .पिलीज मला माहिती द्याल का ?
ते खरेदीखत न्यायालयाच्या आदेशानुसार केले होते हि बाब प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या. किंवा प्रांताधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध अपील करा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश सु माजरेकर
15-03-2016
mjrkrganesh@gmail.com
सध्याच्या नवीन गावातीवल बांधकाम बाबत शासन नियमानुसार गावातील आमच्या सामाईक जमिन वरती धाक-दटपशाहीने नवीन घर तसेच जुने घर दुरूस्ती करताना कोणत्याही खात्याची परवानगी वा ग्रामपंचायतीची सुध्दा परवानगी नसताना चुलता घर बांधत आहे. त्यासाठी मी व माझे सामाईक जमिनीतील इतर हिस्सेदार कुठे तक्रार करू शकताे....तसेच सर्व नियम म्हणजेच कांदळवनाच्या कक्षेत येणारी जमिन,सीआरझेड आदिंचे नियम डावलून फक्त वकीलाच्या सल्ल्याने नवीन घर बांधत असेल तर साहेब त्यांना दंड तसेच शिक्षेची काय तरदूत आहे. कृपया माहीती देण्यात यावी,
गावठाण जागेत बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार , ग्राम पंचायातीस आहे . त्या मुले या बाबत ग्राम पंचायातुई कडे अर्ज करणे आवश्यक
ग्राम पंचायत कायदा १९५८ चे कलम ५२ प्रमाणे , ग्राम पंचायातीस अधिकार आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sunil Jadhav
14-03-2016
spj100@rediffmail.com
कृषक दिनी कुळ असलेल्या संरक्षित कुळाचा "३२ग" आणि यांनी "३२म" प्रमाणपत्र मिळाल्यानंतर,गाव कामगार तलाठी यांना ७/१२ सदरी नोंद करावयाचा आदेश दिला होता असा"३२ग" प्रांत अधिकारी यांनी रद्द केला असल्यामुळे, "३२म" चा आदेश "गावकामगार तलाठी " पाळत नसल्यास काय करावे ,७/१२ नोंद का होत नाही, याचा नियम काय आहे याची माहिती मिळावी
३२ग नंतरच ३२म प्रमाणपत्र दिले जाते. ३२ग रद्द केला आहे तर ३२म सुद्धा रद्द झाला. नोंद प्रमाणित होणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by abhijit
13-03-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय शासकीय सेवेत असणारा कर्मचारी जर आपल्या आई वङीलांचा सांभाळ करीत नसेल तर त्यांना मुलाच्या वेतनावर हक्क सांगण्यासाठी काही शासन निर्णय कींवा न्यायालयीन तरतुद आहे का?
याच site वरील ज्येष्ठ नागरिक कायदा वाचवा किवा याबाबत उप विभागीय कार्यालयाशी संपर्क करावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
12-03-2016
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय भाऊसाहेब, पूर्वी सिलिंग कायदा असताना कमाल क्षेत्रा पेक्षा जादा जमीन वडिलांकडे होती म्हणून त्यांनी दोन मुलांच्या नावावर प्रत्येकी २० बिगे जमीन केली व तिसऱ्या मुलाच्या नावावर ७ बिगे जमीन केली सदर क्षेत्र वडिलोपार्जित असून वडील ह्यात नाही. ज्या मुलांच्या नावावर २० बिगे जमीन केली आहे. ते म्हणतात कि हि वाटणी पक्की असून वडिलांच्या शिल्लक जमिनी मध्ये वाटणी माघतात अशा वेळेस ७ बिगे जमीन मिळालेल्या सर्वात मोठ्या मुलाने काय करावे.
वडिलांच्या नावे शिल्लक असणाऱ्या मिळकतीसाठीच वारस नोंद होऊ शकेल
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by rohit patil
12-03-2016
rhtpatil168@gmail.com
सर माझे पणजोबा नाव हरी यादव पाटील यांना मुले चार १)भादू हरी पाटील २)भास्कर हरी पाटील ३) मोहन हरी पाटील ४) बाबू हरी पाटील पण हरी पाटील हे दारू पीत होते म्हणून सर्व जमीन विकत होते म्हणून गावातील लोकांनी त्यांची जमीन १९२१ साली एक मुलगा भादू हरी पाटील हा दोन महीन्याच असताना याचा नावावर बक्षीस पत्र केले पण ते नोंदणी कुत नव्हते व १९८५ पर्यंत सवे जमीन कसत होते पण १९५५ साली भादू हरी पाटील मरण पावले व ती जमीन त्यांचा मुलगा राजाराम पाटील व एकनाथ पाटील अ पा का म्हणून आए यांची नवे लागली तर उर्वरित तीन मुलांचा त्यावर हक्क राहील का म्हणजे मोहन ,भास्कर ,बाबू यांचा
अ पा क च्या फेरफार मध्ये नमूद असणाऱ्या सर्व लोकांचा हक्क राहील तसेच हरी यादव पाटील यांच्या नावे असलेल्या मिळकतीवर सर्व वारसांचा हक्क आहे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by भारत borude
11-03-2016
bharatborude69@gmail.com
आदरणीय साहेब ,
माझा एक प्रश्न आहे तरी मला मार्गदर्शन करावे हि विनंती,
१)मला माझ्या मालकीच्या जमिनीचे(पोटखराब - अ) क्षेत्राचे सपाटीकरण करायचे आहे (जमीन खूप उंच सखोल,दगड धोंडे ,व मुरुमाची आहे),त्याच क्षेत्रातून दगड व मुरूम काढून त्याच क्षेत्रात
वापरायचे आहे ,त्यासाठी महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागेल का?घ्यावी लागेल तर कोणाची(तहसीलदार कि कलेक्टर साहेबांची) तसेच रॉयलठी भरावी लागेल का? अर्जाचा नमुना व माहिती द्याल का.
,कृपया मार्गदर्शन करावे.
कळावे,
भरत बोरुडे
Question by संदीप
11-03-2016
sandeep_chdhri@rediffmail.com
महोदय,एखादया धोरणात्मक निर्णयाला महानगरपालिकेच्या महासभेची मंजूरी मिळाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते.म्हणजे तो निर्णय लागु करण्यासाठी कुणा कुणाच्या परवानगीची गरज असते..कृपया मार्गदर्शन करावे.
Question by प्रमोद पवार
11-03-2016
pramodpawar23@gmail.com
नवीन शर्तीची जमीन आहे. शेतकरी अपंग आहे जमीन मात्र शेती लायक राहिली नाही. शेतकऱ्याने १९९३ पासून मान जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून शर्त शिथिल करून मागितले होते. त्या नंतर शर्तभंग केस चालली व मुदत देउन अकृषिक करून घ्यावी असा आदेश झाला.मात्र दरम्यान शेतकरी अपघातात पूर्ण अपंग झाला . पुढील प्रक्रिया केली नाही. जागेवर घर व दुकानाचे गाळे आहेत.
शेतकरी नझराणा भरण्यास तयार आहे दंड भरण्यास तयार आहे.तसा अर्ज हि केलाय.
असे दंड व नझराणा भरून घेण्याची तरतूद आहे काय? शासन निर्णय अथवा आदेश ,कृपया मार्गदर्शन व्हावे
दंड व नझराणा भरून घेण्याची तरतूद आहे. संबंधित कार्यालयात संपर्क साधावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by भारत borude
11-03-2016
bharatborude69@gmail.com
आदरणीय सर,
माझ्या आजोबांनी हयात असताना शेतजमिनीचे खाते फोड केले ( माझे वडील,आई,आत्या,मी व
माझा सावत्र भाऊ आणि वहिनी यांचे नावावर क्षेत्र केले आहे १९९० ला )व वडिलांनी त्यांचा काही हिस्सा विकला व काही आईच्या नावे केला ,आता वडिलांच्या नावावर काहीच जमीन नाही) आत्याची जमीन माझ्याकडे आहे २५ वर्षापासून परंतु ७/१२ सदरी ती स्वत कसते अशी नोंद आहे,मी व आई वडील एकत्र राहतो,भाऊ ३० वर्ष्यापासून वेगळा राहतो आहे.,आत्या दुसर्या गावी राहते ती आता येत पण नाही,व तिला मुलबाळ नाहीत व पती पण वारले आहेत,मला असे विचारायचे आहे कि आत्याची जमीन वडिलांच्या नावे हक्क्सोद्पत्राने करता येईल का किवा
आत्याचे मागे तिचे वारसदार कोण लागतील? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
१. आत्याचे हक्क सोड पत्र , आत्याचे संमतीने वडिलांचे लाभात करता येयील
२. अत्त्याचे मृत्युपछात , मिळकत हिंदू वारसा कायदा कलम १४ प्रमाणे
वडिलांचे वारसांना मिळेल
आत्याची आई म्हणजे आपली आजी
आपले वडील
आपले चुलते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by bharatborude
11-03-2016
bahratborude69@gmail.com
आदरणीय सर,
माझ्या बहिणीचे पती वारलेले आहेत व मुले लहान आहेत व त्यांच्या आजोबांच्या नावावर शेतजमीन व घरे आहेत ,परंतु आजोबा व त्यांची दोन मुले(एकूण तीन होते)ती शेतजमीन विकत आहेत( काही विकली आहे ) ,बहिणीला व तिच्या मुलांना वारस नोंद करता येईल का,जमीन (वाडवदिलापार्जीत आहे व काही सरकारकडून(मिलिटरी) बहिणीच्या सासर्यांना मिळालेली आहे) करता यईल तर काय करावे लागेल,कोणती कागदपत्रे लागतील.
कृपया मार्गदर्शन करावे.
बहिणीचे सासरे यांचे नावावर जमीन असल्यास त्यावर बहिण व तिच्या मुलांची नावे वारस म्हणून नोंद करता येणार नाही. जमीन वडिलोपार्जित असल्यास आणि त्यामध्ये हक्क हिस्सा पाहिजे असल्यास दिवाणी दावा दाखल करावा लागेल.
Reply by श्री.पी.एम. गड्डम | नायब तहसीलदार
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
