जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by rohit patil
26-03-2016
rhtpatil168@gmail.com
सर मी फोन लावून तुमच्या शी बोलू शकतो का मला तुमचा फोन नु द्या
Question by किरण गिरे
26-03-2016
thekiran123@gmail.com
आदरणीय सर
मी एक सिटी सर्वे प्लॉट (कुलमुखत्यार म्हणून )घेतला आहे.परंतु। मूळ मालकाचे नाव सिटी सर्वे उतरा वरुन जात नाही .कारण असेकी सदर जागा(प्लॉट) वर्ग ब आहे .आणि सादर जागेच्या उतारा वर "दूसऱ्यास भाड्याने वा कराने अथवा वीकता येणार नाही या शर्थिवर "असा उल्लेख आहे.
प्रश्न
१)सदर जागेवरील शर्थ शिथिल करता येईल का व शर्थ शिथिल करण्यासाठी काय करावे?
2)सदर जागा बिगर शेती करता येईल का?
३) अ वर्ग करण्यासाठी काय करावे लागेल?
कृपया मार्ग दर्शन व्हावे
सदर सेरा कोणत्या आदेसानुसार आला या करिता फेरफार व मुल आदेश पहावे नंतर आदेसानुसार सक्षम अधिकारी यांच्या परवानगीने सर्तीबाबत कार्यवाही करता येयील
Reply by श्री.ओ.आर. अग्रवाल | उप जिल्हाधिकारी
Question by Smita ganpat khatpe
25-03-2016
smitakhatpe87@gmail.com
Maje pati yani jamin vikli ahe to tyancha kakachya mulane fhasawanuk karun getli ahe tari mala majhi jamin parat havi ahe tar mala kes karnyasathi sarkari vakil hava ahe karan amhi sadhya bhadyacha gharat rahto aani majuri karun pot bharti tyamule sarkari vakil mala milel ka aani tyanchi fee kiti asete aani tyasathi mala kai karave lagel mala margadarshan kara
आपणास गुन्हा दाखल करावयाचा असल्यास , आपण स्वत( आपले पती ) नजिकचे पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करू शकता . त्या साठी वकिलाची गरज नाही
मात्र आपणास फौजदारी तक्रार , न्यायिक दंडाधिकारी यांचे कडे करावयाची असल्यास , आपण वकील मिळण्यासाठी तालुका विधी प्राधिकरण यांचे कडे संपर्क साधा . गट विकास अधिकारी , तालुका विधी प्राधिकरणाचे सदस्य सचिव आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेन्द्र राऊत
25-03-2016
narenraut35@gmail.com
मा, सर आपनास सविनय पूर्वक विषय सादर करतो
माझी वडिलोपारजीत शेती, ही नगरपरिषद हद्दित ग्रिन झोन मधे आहे . आणी आजुबाजुला निवासी प्लॉट पाडलेले आहे ,
मला हि निवासी प्लॉट पाडण्यासाठी सविस्तर माहिती द्या हि नम्र विनंती. आपला नम्र
सदरचा प्रश्न नगर रचना विभागाशी सबंधित आहे
तथापि , नगर पालिका हदीत ग्रीन झोन मध्ये , जागा असल्यास , निवासी वापर अनुद्नेया नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by prashant shankar Mali
25-03-2016
prashantmali8700@gmail.com
आपला प्रश्न/सूचना...sir dharangrastas punarvasan mhanun milaleli jamin vikata yete Ka? tyache niyam Kay aahe
अशी जमीन विकत येते
आपण पुनर्वसन कायदा ( संबंधित लागू ) वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पदमसिंह गटकळ
25-03-2016
padamasinha1986@gmail.com
कर्ज पुनर्गतन बाबत goverment resoulation कधी येणार आहे ?
महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटच्या शासन निर्णय या सदराला भेट देत राहा
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by राम गव्हाणे
24-03-2016
ram.gavhane@gmail.com
आदरणीय किरम पाणबुडे सर दिनांक १०.०३.२०१६ ला केलेल्या प्रश्नला दिलेले उत्तरा बद्दल धन्यवाद परंतु सर रीतसर केलेल्या बहिणीच्या हक्कसोड पत्र बाबत तिच्या मुलाने गावातील तलाठी कडे आक्षेप घेतला आहे आणि तलाठी त्या बाबत सांगत आहेत कि आम्ही हे आक्षेप पत्र वरती पाठवू असे सांगतायत मंजे नेमके त्या पत्रच पुडे काय होईल त्या बाबत कृपया माहिती सांगावी .
अधिकार अभिलेख सदरी नोंद टाकले नंतर , १५ दिवसाची नोटीस सर्व हित्साबंधीतांना देण्यात येते
त्यानुसार तलाठी , आपणास पत्र पाठवू असे म्हणत असतील
मात्र त्यासाठी ते विलंब लावत असतील तर , तहसीलदार महोदयांना समक्ष भेटून आपले गाऱ्हाणे मांडा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
24-03-2016
pradip.borle6226@gmail.com
नवीन भूसंपादन अधिनियम २०१३ मध्ये दिनांक १२ मे २०१५ चे शासन निर्णय नुसार प्रकल्पासाठी शेतजमीन आपसी वाताघातीने थेट खरेदी ची तरतूद आहे.यामध्ये जे शेतकरी भूमिहीन होतात त्यांना भूमिहीन होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ची गरज आहे काय ?
Question by पंकज गवळी
23-03-2016
pankajgawali2012@gmail.com
टुरिंग सिनेमा म्हणजे काय त्याबाबत तहसीलदार यांना परवानगी देत येईल काय ! टुरिंग सिनेमा कोणते सिनेमा येतात किती दिवसाकरता परवानगी देत येईल कोणकोणते कागदपत्र लागतील
Question by VIKRAM YADAV
23-03-2016
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर ,
आपण माझ्या प्रश्नाचे उतर दिले त्यासाठी धन्यवाद , माझा प्रश्न असा आहे. कोर्टात केलेले हक्कासोड पत्र रद्ध करता येते का ,माझा बहिणीने कोर्टात हक्क सोड पत्र करून दिले आत्ता त्यांचे पती ते पत्र फसवून केले आहे असे सागून कोर्टात केअस करेन अशी धमकी देत्तात नाहीतर आमचा हिसा दे .बहिणीचा हिसा मी कोर्टात देवुनच पत्र हुकूमनामा झाला आहे .तर मी आत्ता काय करू कृपया मार्ग्दर्स्न करा . आपपल्या उतराने मला अनेक वेळा योग्य मार्ग मिळाला आहे.
बहिणीचा हक्कसोड दबावाखाली केला आहे हे सिद्ध होत नाही तर तो कायदेशीर आहे
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by जीवन गोसावी
22-03-2016
jeevan.gosavi@rediffmail.com
देवस्थान इनाम वर्ग ३ या प्रकारतील जमिनिमधे आमची ५५ वर्षांपासुन वीना अडथळा वहिवाट चालू आहे तर त्या जमिनिचि मलकी आम्हाला मिळु शकते का ?
Question by Sunil Kale
22-03-2016
sunilste@gmail.com
जर गट विकास अधिकारी यांच्याकडे वडलोपार्जित (आजोबां च्या) घराच्या नावाच्या फेरफारा संबंधित केलेल्या अपिला वर निर्णय देत नसेल तर पुढील दाद कोणाकडे मागता येईल, कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती. धन्यवाद!
Question by रामेश्वर सुलाखे
21-03-2016
aksharcomp2007@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या वडिलांचे निधन फेब्रुवारी २०१६ मध्ये झाले आहे. वडिलोपार्जित जमिनीवर ७/१२ ला त्यांचे नाव आहे. आम्ही २ भाऊ व १ बहिण आहोत. आमची वारस म्हणून नोंद घेण्यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती.
तलाठी यांचे कडे , आपले नाव( सर्व ) वारस म्हणून दाखल करण्यासाठी अर्ज करा
वडिलांचा मृत्य दाखला दया
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कृष्णा मडके
20-03-2016
krishnamadke64@gmail.com
नमस्कार साहेब,
७-१२, ८अ सारखे उतारे, इतर कागदपत्रे विशिष्ट काळावधित मिळावी असा शासकीय निर्णय आहे का?
Question by गणेश शिंदे
19-03-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर.एखाद्या प्रकरणात अपील दाखल करताना किती वर्षाचा विलंब कालावधी माफ केला जातो.कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
महाराष्ट्र महसुल अधिनियम १९६६ कलम २५१ अन्वये विलंबाबाबत अधिकार्याची खात्री पटवून दिल्यास मुदत संपल्यावरही अपील दाखल करता येते. विलंब कालावधी माफ करणे हा अधिकार्याचा स्वेच्छाधिकार आहे
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by मिलिंद रमेश khot
19-03-2016
milind.khot@rediffmail.com
आमच्या गावी( देवस्थान इनाम ) वाहिवातदार या जागेत दरवर्षी दत्तजयंती सप्ताह होत असे नंतर सर्व गावकरी लोकांनी असे ठरवले कि त्या जागेवर आपण कायम स्वरूपी सभागृह बांधावे त्या साठी मुंबई मंडळ रजिस्टर केले बांधकाम पण पूर्ण झाले आता त्या जागेवर ज्या चार भोगवाटदार आहेत ती जागा संस्थेच्या नावावर करण्यास राजी नाही पहिले तोंडी परवानगी दिली होती आता देत नाही तर ती नावावर कशी करावी सर्व ग्रामस्थ संस्थेच्या नावावर करण्यास राजी आहेत तसेच सातबारा मध्ये देवस्थान मालक सरकारी आहे तर काय पर्याय आहे नावावर करण्यास ते सांगा
Question by पंकज झांबरे
19-03-2016
zambare16@gmail.com
नमस्कार साहेब मला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हवे आहे. माझे वडिलांच्या नावावरील शेत जिगाव प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. म्हणून माझ्या वडिलांनी इंजिनीअर ने दिलेले प्रमाणपत्र काढले आहे. आता पुढे काय करावे लागेल कोणती कागदपत्रे आणखी लागतील आणि कोठे अर्ज करावा लागेल कृपया सविस्तर माहिती द्या.
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन ,जिल्हाधिकारी कार्यालयआत अर्ज करावा
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन ,जिल्हाधिकारी कार्यालयआत अर्ज करावा
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन ,जिल्हाधिकारी कार्यालयआत अर्ज करावा
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by संजय जी वाघ
18-03-2016
sanjaygwagh@gmail.gom
विविध योजनेकरिता हयातीचे प्रमाणपत्र ग्रामीण भागात कोणाकडून घ्यावे.प्रमाणपत्र देण्यास सक्षम अधिकारी कोण.
Question by स्मिता गणपत KHATPE
17-03-2016
smitakhatpe87@gmail.com
माझे पती यांनी जमीन विकली आहे तरी ज्या वक्तीने ती खरेदी केली आहे ती वक्ती त्या जमिनीच्या ७/१२ असेल त्याचा फेरफार मध्ये ती ज्या किमतीला खरेदी केली आहे ती फेरफार मध्ये लिहतात का किमत कमी किव्हा जास्त टाकू शकतात ( मंझे त्यांनी जमीन जर एक लाख rupay ला घेतली असेल तर त्याचीच नोंद करावी लागते का ती वक्ती त्यापेक्षा जास्त रुपयाची नोंद फेरफार मध्ये करू शकते ) कृपया मला मार्गदर्शन करा
नोंदणीकृत खरेदीखतामध्ये जी किंमत नमूद असते ती किंमत लिहितात.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by जयेश हरेश्वर पाटील
17-03-2016
jayeshpatil0999@gmail.com
नमस्कार साहेब
मी दिनांक ०८/०३/२०१६ रोजी शेतकरी व ७/१२ किंवा कुठल्याही प्रकारची शेतजमीन माझ्या नावे नसताना देखील मी विकत घेतलेली जमीन ७/१२ व बंगला माझ्या नावे करता येईला का अशा आपले मार्गदर्शनपर प्रश्न विचारला होता. *त्या संर्दभात आपणाकडून माहितीही मला मिळाली होती.
आपण सांगितलेले होते की
(१ जानेवारी पासून महाराष्ट्र कुल वहिवाट शेतजमीन अधिनियम कायदा १९४ चे कलम ६३ मध्ये दुरुस्ती च्या GR प्रमाणे बिनशेती वापरासाठी जमीन खरेदी करण्यासाठी जर रहिवास क्षेत्रात असेल तर परवानगीची गरज नाही) असे सांगितले होते.
त्या प्रमाणे मी तो GR काढला होता व तलाठी कार्यलयात घेऊन गेलो होते परंतू सदरचा दुरुस्ती कायदा हा माझ्या कामा साठी लागू होत नाही.असे संगितले कारण त्यामध्ये असे नमुद आहे की कोणत्याही (सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित केलेली असेल आणि अशा संपादनाच्या परिणामी ती अशा संपादनाच्या दिनांकापासून भूमिहीन झालेली असेल अशा कोणत्याही व्यक्तीला आणि तिचे वारस यांचा समावेश होईल)असे नमुद आहे
त्यामुळे तो GR माझ्या कामासाठी लागू होत नाही आणि त्यामुळे आता काय करता येईल.जेणेकरून मी खरेदी केलेली जमीन ७/१२ व बंगला कायदेर्शीर मार्गाने माझ्या नावे करता येईल. आणि त्या ७/१२ वर "घरपड"असा उलेख आहे.
तर आता पुढे काय करता येईल साहेब याची माहिती पुन्हा आपणाकडून मिळावी.
तरी मार्गदर्शन व सहकार्याची अपेक्षा साहेब...
आपण जी आर नित वाचलेला दिसत नाही
आपणास प्रतःम आपली जमीन कोणत्या परिक्षेत्रात येते याची माहिती घेणे आवश्यक आहे
ती माहिती आपणास नगर रचना कार्यालयात मिळेल
झोन बाबत्चुई माहिती आपणास मिलालेनंतर , जर जमीन रहिवास झोन मध्ये असेल तर , आपणास परवानगीची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कविता शिंदे
17-03-2016
kvt.shinde1@gmail.com
सर नमस्कार. मला माझ्या गावी शाळा व इतर सामाजिक कामासाठी जागा हवी आहे.
१. ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेली गायरान जमीन सामाजिक संस्थेला देण्याचे अधिकार कुणाला आहेत? ग्रामसभेचा ठराव पुरेसा आहे का?
२. शासनाच्या वतीने भाडेपट्टा कोण करू शकत?
३. जमीन घेण्याची इतर पध्दती कोणत्या?
- खुप खुप धन्यवाद..!
ग्राम पंचायत कायदा १९५८ चे कलम ५५ अन्वये
१. तीन वर्षापेक्षा जड कालावधीचा भाडेपट्टा
२. जमिनीचे हस्तांतरण - विक्री
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे परवानगी शिवाय करता येत नाही
नुसता ठराव असून उपयोग नाही
गायरान जमीन हि ग्राम पंच्याती कडे निहित असते त्या मुले अश्या जमिनीचे भाडेपट्टा ,विक्री करण्यास शाश्नाचा सबंद नाही
शाश्नाचे वतीने , जिल्हाधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी भाडेपट्टा करू शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sandeep chdhri
16-03-2016
sandeepchaudhari85@gmail.com
महोदय,एखाद्या धोरणात्मक निर्णयाला महानगरपालिकेच्या महासभेची मंजूरी मिळाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते.म्हणजे तो निर्णय लागु करण्यासाठी कोणा कोणाच्या मंजूरीची गरज असते.
Question by भाऊराव काकड
16-03-2016
bhaujyoti@gmail.com
आदरणीय सर माझ्या पहिल्या प्रश्नाचे समाधान केल्याबद्दल आभारी ..........माझ्या आईचे वडील १९९० मध्ये मयत झाले नंतर आईचे नाव इतर अधिकारात आले .परंतु आईच्या नंतर तिची मुले ( म्हणजे आम्ही ) वारस ..लागू शकतो का ? इतर अधिकार सदराची आईचे नाव भोगवटदार सदरी आणण्यासाठी काय करावे लागेल .......?
बर्याुच वेळा असे दिसून येते की, मयताच्या वारसांपैकी फक्त पुरुषांची नावेच 7/12 च्या कब्जेदार सदरी नोंदवली जातात आणि महिलांची नावे (पत्नी, विवाहित/अविवाहित मुली इत्यादी) इतर हक्कात नोंदवली जातात. ही पध्दत अत्यंत चुकीची आहे. मयताच्या वारसांपैकी महिलांची नावे सुध्दा कब्जेदार सदरीच नोंदवावी. हिंदू वारसा कायदा 1956 मधील सन 2005 च्या सुधारणेनुसार मुलींनाही, मालमत्तेत मुलाइतकाच हिस्सा मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
हिंदु स्त्रीला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून वारसाने मिळालेली कोणतीही संपत्ती मृताचा कोणताही मुलगा किंवा मुलगी ( कोणत्याही पूर्वमृत मुलाची किंवा मुलीची अपत्ये धरून) यांच्या अभावी, तिच्या पित्याच्या वारसाकडे प्रक्रांत होईल.
इतर अधिकार सदरातील आईचे नाव भोगवटदार सदरी आणण्यासाठी तलाठीकडे अर्ज करावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
16-03-2016
ganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,तहसीलदार साहेबांच्या निकालाविरुद्ध उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील चालू असताना पक्षकारास त्याबाबत संशय असल्यास नसल्यास सदर अपील अन्य ठिकाणी वर्ग होऊ शकते का?त्यासाठी काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
जिल्हाधिकारी याना अपील अन्य ठिकाणी वर्ग करणेबाबत अर्ज करावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by आजिनाथ शिंदे
16-03-2016
navnathshinde5555@gmail.com
आदरणीय सर,
मी चिखलठाण ता.करमाळा जि.सोलापूर चा रहिवासी आहे. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर गावाचे पुनर्वसन झाले आहे. त्या मध्ये मिळालेली दुसरयाची जमिन मी घेतलेली आहे. पण त्याची खरेदी केलेली नाही. खरेदीसाठी कलेक्टर ची परवानगी आणावी लागते. असे मला सांगण्यात आले आहे. त्याची प्रोसेस काय असते व ती परवानगी मी स्वतः आणू शकतो का ? याबद्दल मार्गदर्शन करावे.
प्रकल्प ग्रस्त व्यक्तीची संपादित झालेली जमीन जर वर्ग २ ची असेल तर , अश्या प्रकल्प ग्रस्त व्यक्तीस मिळणारी जमीन अथवा भू खंड हि वर्ग २ धारणा प्रकारचा म्हणून दिला जातो .अशी वर्ग २ धरणा प्रकारची मिळकत ( भूखंड /जमीन) प्रदान झाले नंतर १० वर्ष ननतर वर्ग १ धारण प्रवर्गात वर्ग करता येऊ शकते . ( परवानगीने व अधिमुल्य जमीन करून )
मात्र जर संपादित झालेली जमीन , वर्ग १ धरणा प्रकारची असेल तर , प्रदान करण्यात येणाऱ्या जमिनीचा धरणा प्रकार वर्ग १ असतो
त्या मुले आपण ज्या प्रकल्प ग्रस्त व्यक्ती कडून जमीन खरेदी केलेली आहे , त्याची मुल संपादित झालेली जमीन कोणत्या धरणा प्रकारची होती ते पहा . त्या वरून परवानगीची गरज आहे का नाही ते ठरवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3460 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
