जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महोदय,
कुळाची नोंद घेणे ची पद्धत आजही सुरु आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम चे कलम 2(18) व 4 - मानीव कुल या मधील निकष पूर्ण होत असतील , तर आज हि कुळांची नोंद होऊ शकते /होते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कुळकायद्यानुसार कुळ व मालक यांच्यात करार होणे, कुळ व मालक असे नाते सिध्द होणे, कुळाने मालकास खंड देणे इत्यादी बाबी कुळ सिध्द होण्यास आवश्यक असतात.

कुळ कायदा कलम '३२ ओ' चा अशावेळी संबंध येऊ शकतो का असा प्रश्न निर्माण होतो. कारण कुळकायदा कलम '३२ ओ' नुसार , जमीन मालकाने दिनांक ०१/०४/१९५७ नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कुळवहिवाटीच्याबाबतीत, जातीने जमीन कसणार्या कुळास अशी कुळवहिवाट सुरु झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आंत, त्याने धारण केलेली जमीन मालकांकडून खरेदी करण्याचा हक्क असतो. कुळकायद्याने कुळास दिलेला हा हक्क बजावण्याची ज्या ची इच्छा असेल त्याने एक वर्षाच्या आंत, त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) विहीत रितीने कळविले पाहिजे. परंतु अशा वेळी वर उल्लेखल्याप्रमाणे कुळ व मालक असे नाते सिध्द होणे आवश्यक असते हे लक्षात घ्यावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,5 वर्षांपूर्वी मोबदला देऊन जमिनीचे रजि.कु.मु.पत्र घेतले होते .त्यातील एक व्यक्ती मयत झाली असताना आज रोजी संपूर्ण जमिनीची कु.मु.पत्राआधारे रजि. विक्री झाली असल्यास 7/12 सदरी संपूर्ण क्षेत्रांची नोंद करता येईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
व्यक्ती मयत होण्या पूर्वी जर , विक्री दस्त झाला असेल तर , नोंद 7/12 सादरी घेणे आवश्यक .
मात्र जर विक्री दस्त होण्यापूर्वी , व्यक्ती मयत असेल , त्याचे हिस्स्यांचे क्षेत्र वगळून ( जर सह धारकांचे हिस्से 7/12 वर नमूद असतील तर ) इतर क्षेत्रास खरेदीदारांची नावे लावता येतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्‍न फारच त्राोटक आहे. माोबदला देतांना नाोंदणीकृत दस्त केला हाोता काय? त्यातील एक व्यक्ती मयत झाली म्‍हणजे काोण? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. त्‍यामुळे नेमका सल्‍ला देता येत नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

आमच्या फेरफारामध्ये वर्षे 1934 या मध्ये खरेदीखत केल्याची नोंद आहे . हे खरेदीखत मिळण्यासाठी कुठे अर्ज केला पाहिजे


संबंधित दुय्‍यम निबंधक कार्यालय.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by sajid
23-08-2016
sajid11@rediffmail.com

इनामी जमीन आहे कोणत्या उताऱ्यावरून कळते इनामी जमिनीची माहिती कोणत्या नमुन्यामध्ये मिळते
नमुना न 3 - तलाठी अभिलेख

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सात बारा उतार्‍यावरून तसेच ॲलिनेशन रजिस्‍टर वरून

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, वारस फेरफार नोंद अपील करण्यासाठी विहित नमुना आहे काय ? साध्या अर्जावर अपील चालत नाही काय ? अपील साठी वकील द्यावा लागतो का ? त्यासाठी कोणत्या कागद पत्राची आवश्यकता लागते कृपया मार्गदर्शन करावे.
अपीलाचा फाॉरमॅट ठरलेला असताो. अपीलासाठी वकील देणे याोग्‍य ठरेल. अपिलासाठी आवश्‍यक कागदपत्रे प्रकरण निहाय वेगवेगळी असतात. आपण वकीलाचे मार्गदर्शन घेणे याोग्‍य ठरेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महोदय,
कुळाची नोंद 7/12 वरून कमी करण्याचे अधिकार कोणाला आहे ? कोणत्या कलमान्वये ? कृपया मार्गदर्शन करावे .
शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) . कुळाचे नाव कमी करण्‍यासाठी विविध कलमे आहेत जी प्रकरण निहाय वापरली जातात. कुळाचे नाव कमी करतांना सखाोल चाौकशी हाोणे आवश्‍यक असते.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

me june 2015 madhe jaga kharedi keli tyaweli jagewar pakke compound sarkari mojanicha nakasha v iter awashyak babinchi pahani keli
nantar mahapalikekadun plan pass karun ghetala v jagewar bandhkam chalu kele ahe
jaga NA keli ahe
pan kam chalu kelyawar mala kalale ki tya jagewaril vahiwatisandarbhat court madhe case chalu ahe
takrardarane maze kam thambawinyasathi stay denyachi vinanti court la keli
parantu sbal kagadpatraabhavi tyachi stay baddal chi magani fetal li pan jagesandarbhat case chalu ahe
ya period madhe takrardarane bhumi abhilekhat apil karun tyachi v amachi sarkari mojani sadar karun amachi radda karanesathi apil kele
bhumi abhilekh karyalayane ektarfi sadar arjanusar mojani antim nikalaparyant sthagit keli ahe
takrardarane oct 2011 madhe mojani keli asun amchya jagechi mojani march 2014 madhe zali ahe
doghanchya jaganche june dast v tyawaril chatusima pahata amachya jagechya sarva chatusima eksarakhya ahet
parantu takrardarachya chatusima patyek dastamadhe wegwegalya dilya ahet
vmul malakakadun alelya v tyachya mojanit dakhawalelya chatusima vegvegalya ahet

sadar prakarnat bhumi abhilekh karyalay virodhat nikal deu shakate ka
mojani radda kelyas konate kaydeshir paryay upalabdha ahet
माोजणी अभिलेख कार्यालय त्‍यांच्‍या समाोर आलेल्‍या व त्‍यांच्‍या अभिलेखात असलेल्‍या कागदपत्रावरून .निकाल देईल. .निकाल आपल्‍या विराोधात गेल्‍यास आपण अपील करू शकाल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

साहेब
शेत जमिनीची मोजणी करणयासाठी पद्धत सागा आणि लागणारे कागदपतरे व शुल्क सांगावे
F ई मोजणी:
ई मोजणी पुर्वीची कार्यपध्दती - शेतकरी किंवा खातेदार यांना आपल्या हद्दीबाबत शंका किंवा वाद निर्माण झाल्यास शंका दुर करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षक भूमि अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी कार्यालयात अर्ज करून हद्द कायम मोजणी करून घेऊन आपली शंका निरसन करुन घेता येते. अर्ज करून जागेवर मोजणी होवून त्याचा नकाशा प्राप्त होईपर्यंत दिनांक ३१ डिसेंबर २०११ पर्यंत खालील प्रमाणे कार्यपध्दती होती.

 अर्जदार शेतकरी, तालुका कार्यालयात आल्यानंतर ज्या जमिनीची मोजणी करावयाची आहे त्याचा अधिकार अभिलेख कार्यालयातील मुख्यातलयातील सहाय्यक यांना दाखवुन मोजणी फी किती होईल, प्रकरणासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती घेत असे.
 मोजणी फी भरणेस अर्जदाराने संमती दिल्यावर मुख्यालय सहाय्यक त्या रकमेचे चलन तीन प्रतीत तयार करून ते अर्जदारास देत असे.
 अर्जदार स्टेट बॅक ऑफ इंडीया (ट्रेझरी शाखा) किंवा कोषागारामध्ये प्रत्यक्ष पैश्याचा भरणा करून त्यातील एक चलन कार्यालयात आणून देत असे.
 कार्यालयात मोजणीचा अर्ज, पैसे भरलेले चलन व अभिलेखाच्या प्रती दाखल करत असे.
 अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी लिपीक सदरचा अर्ज मोजणी नोंदवहीत नोंदवून तो अर्ज कार्यालयातील भूकरमापकाकडे मोजणीसाठी देत असे.
 भूकरमापक त्या अर्जावर त्याच्या सोईनुसार मोजणीच्या तारखा देवून नोटीस पाठवित असे.
 मोजणीसाठी ठरलेल्या दिवशी भूकरमापक प्रत्यक्ष गावी जावून मोजणी करून मुळ अभिलेखाधारे हद्दीच्या खुणा दाखवून त्या प्रमाणे नकाशाच्या प्रती तयार करून प्रकरण कार्यालयात जमा करत असे.
 कार्यालयात जमा केलेल्या अशा प्रकरणांत आवश्यक छाननी करुन उप अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या स्वाक्षरीने नकाशाची 'क' प्रत अर्जदारास पुरविली जात असे.
वरील सर्व प्रक्रियेमध्ये मोजणी फी किती होईल, मोजणी केंव्हा होईल, मोजणीस कोण येईल वगैरे प्रश्न सामान्य नागरीकांस पडत होते. यामध्ये खातेदाराचा पैसा, मानसिक त्रास व कालापव्यय होत असे. या सर्व बाबीवर उपाय म्हणून शासनाने संगणकीकृत आज्ञावली म्हणजे "ई-मोजणी" तयार करून शेतक-यांचे समाधान व शासकिय कामात सुटसुटीतपणा व पारदर्शकता उपलब्ध करून दिलेली आहे.

ई मोजणीचा खातेदारांना झालेला फायदा- खातेदार, अधिकार अभिलेख व लगत खातेदारांच्या माहितीसह कार्यालयात उपस्थित राहिल्यास त्याचा मोजणीचा अर्ज संगणकामध्ये नोंदवुन घेतला जातो व त्याला रु. ३०००/- च्या वरील रक्कमेचे मोजणी फी चे चलन किंवा रु. ३०००/- च्या आतील रक्कमेची पावती, पैसे भरल्यास तात्काळ दिली जाते.
अधिकार अभिलेख, मोजणी फी चे चलन अथवा पावती व मोजणीचा अर्ज या तीन कागदपत्रांच्या आधारे मोजणीची कार्यवाही पारदर्शकपणे केली जाते.
कोषागारात मोजणी फी चे पैसे भरुन मोजणीचा अर्ज कार्यालयांत जमा केल्यास तात्काळ मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते, ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती असते.
वरील संपुर्ण प्रक्रीयेसाठी खातेदारास हेलपाटे मारावे लागत नाहीत. योग्य व अचुक मोजणी फी खातेदाराकडुन घेतली जाते.
प्रस्तुत प्रकरणाचे संगणकीय आज्ञावलीतुन नियंत्रण होत असल्याने ठराविक कालावधीत प्रकरण निकाली करण्याचे न कळत बंधन आल्याने खातेदारास तत्पर सेवा मिळत आहे. घर बसल्याही खातेदाराला आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती समजुन घेता येत आहे. योग्य माहिती नमुद केल्यास खातेदारास आपल्या प्रकरणांत होणारी संभाव्य मोजणी फी सुध्दा आज्ञावलीतुन घरबसल्या समजते.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

साहेब
त्यांना पूर्वी शेतात जणांसाठी दुसरा रस्ता होता पण तो लोकांनी बंद केला परंतु गट नंबर समान असलयामुढे तयांनी आमचा शेतात रस्ता मागितले पण बैलगाडी जणांसाठी माझ्या शेतीत तेव्हडी जागा रिकामी पडत आहे तरी मला मार्ग सुचवा
आपले शेतातून जर , पारंपरिक वहिवाटीचा मार्ग त्यांचेसाठी नसेल तर , त्यांना देण्याचा प्रश्न उद्भवत नाही .
आपणास रस्तासाठी त्यांना हक्क देण्याबात आपण त्यांना अगोदर उत्तर दिल्याप्रमाणे , आपण त्याना विकत देऊ शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

रस्‍त्‍याचे हक्‍क विकत घ्‍यावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माननीय सर नमस्कार ,
शासकीय कर्मचारी सेवेत असताना सलग तीन वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे . तसेच सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास दोन आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे. मला सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाले असताना सुद्धा एकच आगाऊ वेतनवाढ मंजूर केली. यावर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
.किंवा न्या‍याधिकरणाकडे दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

वरिष्‍ठांकडे लेखी विनंती करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by संपत
20-08-2016
sampatraskar4049@gmail.com

१९६६ मधे आमच्या आजोबांनी एका व्यक्तिकडुन २ गुंटे जागा खरेदी खत केली होती त्याचे खरेदि खत आहे.परंतु त्यामधे ग्रामपंचायत मिळ्कत नं आहे आणि चतुसिमा याचा उल्लेख केला आहे, त्या जागेच्या सातबार्यावर त्या विकणार्या व्यक्तिचे नाव नाही परंतु खरेदी खत आमच्याकडे आहे, त्या जागेवरति आम्ही आमचे राह्ते घर पाडुन नवीन बांधकाम सुरु केले आहे, परंतु ज्या व्यक्तिचे नाव ७/१२ वर आहे त्याने आमचे काम बंद केले आहे.तर आम्हाला काय करता येइल का ? कपया संपुर्न मार्गदर्शन करा....
ग्रामपंचायत मिळ्कत नं आहे आणि चतुसिमा याचा उल्लेख असेल तर त्‍या जागेची नाोंद ग्रामपंचायत कार्यालयात असण्‍याची शक्‍यता आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

कृपया सल्ला द्या. देवस्थान इनाम जमीन वर्ग 3 सात बारा मधून काढण्यासाठी काय karave
देवस्थान इनाम जमीन वर्ग 3 ची नाोंद सात बारावरून कमी करणे कायद्‍याने शक्‍य नाही.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by राहूल
20-08-2016
ry96908@gmail.com

तलाठी पदासाठी निवड झाल्यानंतर त्या व्यक्तिला महसूल प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षणासाठी किती दिवसांनतर पाठवले जाते? म्हणजे अगोदर महसूल प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण दिले जाते की अगोदर अनुभवी तलाठी कडे प्रशिक्षण दिले जाते?
तसेच तलाठींसाठीची महसूल प्रबोधिनी कोठे आहे?
(संदर्भ: शासन निर्णय क्रमांकः तप्रशि-2012/प्र.क्र.242-अ/ई-10
शासन निर्णय दिनांक- 24/03/2014
शासन निर्णय संकेतांक- 201403251244395119)

अगोदर महसूल प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण दिले जाते नंतर अनुभवी तलाठी कडे काम करण्‍याची संधी .दिली जाते हे प्रशिक्षण सहा महिन्‍याचे असते. महसूल प्रबोधिनी बाबत आपण संबंधीत जिल्‍हाधिकारी कार्यालयात विचारणा करावी. त्‍या अआ.धि संबंधित परिपत्रके वाचण्‍याची तसदी घ्‍यावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मागील प्रश्नाचे उत्तर दिल्याबददल मोहसीन सरांचे आभार. मी एका पलाॅटमधील दोन भाऊ व पाच बहिणी यांच्या सामायिक क्षेत्रातील पाच बहीणींचा अविभक्त हिस्सा खरेदी खताने विकत घेतला असून माझी नोंद होईल का दोन भावांपैकी एकाने त्याचा हिस्सा आधिच विकला आहे. कृपया मार्गदर्शन करावे
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ४४ अन्वये अनेक सहधारकांपैकी एक सहधारक आपल्या हिस्याचे क्षेत्र विकू शकतो. अशा विक्रीमुळे ते क्षेत्र खरेदी घेणार्या व्यक्तीला सहहिस्सेदाराचा दर्जा प्राप्त होतो.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय महोदय, भाडेकरूने फ्लॅट वर हक्क दाखवू नये या करीता काय काळजी घ्यायला हवी?
जाणकार वकीलाच्या सल्‍ल्‍याने नाोंदणीकृत भाडेकरार करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ...वारस फेरफार करताना नोंद तलाठी यानी घातली त्यावर हरकत दाखल केली आहे ,, परंतु ती तक्रार केस मंडलाधिकारी यांकडे चालवली जाणार आहे परंतु मंडलाधिकारी यांच्या कडे काही कारनास्तव आपल्याला चलवायाची नसेल तर काय करावे ....
तहसिलदारकडे तसा विनंती अर्ज सादर करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,मनपा.हद्दीत रहिवासी झोनमध्ये पूर्वी विहीर होती. संदर जागा बिनशेती करावयाची आहे.7/12 सादरी विहिरींची नोंद आहे.आज रोजी सदर विहिरीत पाणी नाही.तसेच तिचा काहीही उपयोग नाही.तरी सदर विहीर बुजविणेकामी कोणाची परवानगी घ्यावी लागेल?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
विहीर मनपाची नाही याची खात्री करा . विहीर आपले मालकीची असेल तर परवानगीची गरज नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तहसिलदारकडे तसा विनंती अर्ज सादर करावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

कुळकायदा मध्ये अलीकडे झालेली सुधारणा अधिनियम 20/2016 ची प्रत अपलोड करावी हि विनंती

Question by ramnath kadam
16-08-2016
rdkadam@gmail.com

आदरणीय सर वारस नोंद करताना सर्व वारसांची नावे कब्जेदार सादरी येणे आवश्यक आहे तरी आजच्या digital युगात इफेरफर सारखे उपक्रम आले असताना तलाठी जर संगनमत करून वारस महिलांची नावे इतर अधिकार ठिकाणी ठेवत असेल तर हा अन्याय आहे ,ह्या विरुद्ध काय करावे लागेल ,
असे झाले असेल तर त्‍या फेरफार नाोंदी.विरूध्‍द अपील करावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,दुसऱ्या राज्यातील शेतकरी पुरावा महाराष्ट्र राज्यात शेतजमीन घेताना चालेल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
कुळाच्या वारसाची नोंद करताना मूळ मालकाला नोटीस देणे बंधनकारक आहे ka
वारस नोंद करायची आहे , मग मूळ मालक हायत- जिवंत कसा असेल ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

हाेय. सर्व हितसंबंधीतांना नाोटीस देण्‍याची कायदेशीर तरतुद आहे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या वडिलांची आणि त्यांच्या भावाची जमीन वडिलोपार्जित आहे .हे दोघे 30 वर्ष्या पूर्वी वाटण्या झालेल्या आहे पण वडिलांचा भावाचा मुलगा रस्ता देत नाही तर आम्हाला रस्ता मिळेल का व कोणाकडे दाद माघाची ?
तहसिलदारकडे दाद मागावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर मी अनुसूचित जमाती (संत) या प्रवर्गातील असून मला माझा प्लॉट / घराचा विक्रीचा व्यवहार गैर आदिवासी व्यक्ती सोबत करता येईल का? किंवा कसे , कृपया मार्गदर्शन करावे.
कायद्यातील तरतुदीनुसार भोगवटा हस्तांतरण करता येत नाही .
भोगवटा म्हणजे धारण केलेला जमिनीचा भाग
जमीन म्हणजे त्यावरील इमारत या सह असा आहे . त्यामुळे बिगर आदीवासी व्यक्तीस विकत येणार नाही .
हा कायद्यातील ग्रे क्षेत्र ( grey - area ) आहे . त्यात बदल होणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

अनुसूचीत जमाती भाोगवटा हस्‍तांतरण प्रतिबंध कायदा शेत जमिनींसाठी लागू आहे असे माझे व्‍यक्‍तीगत मत आहे. कायद्‍यात तसा स्‍पष्‍ट उल्‍लेख नाही. तथापि, आपण जाणकार वकीलाचा सल्‍ला घ्‍यावा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,

महोदय मजा मामीचे वडील 1971 चा बांगलादेश युद्धात शाहिद झाले तेंव्हा माज्या मामी खूप लहान होत्या माज्या मामींच्या आईला शासनाकडून दहा एकर जमीन मिळाली. 1975 मध्ये मामींच्या आईने दुसरा विवाह केला त्यांना दोन मुले आहेत आता त्या जमिनीवर आमचाच अधिकार आहे असे ते म्हणतात तर यात शाहिद जवानांचा मुलीला त्या जमिनीत हक्क मिळेल का.
हिंदू उत्तराधिकार अधिनियम-१९५६ कलम १४ अन्‍वये: हिंदू स्त्रितची मालमत्ताबाबत नमूद आहे की, :
या अधिनियमापूर्वी किंवा नंतर, हिंदू स्त्रिची, तिच्या कब्जात असलेली कोणतीही संपत्ती, मग अशी मालमत्ता तिला विवाहापूर्वी किंवा नंतर वारसाहक्कांने, मृत्यूपत्रीय दानाने, वाटणीमध्ये् पोटगी म्हणून, नातलगांकडून मिळालेली असो किंवा तिने अशी मालमत्ता स्व‍त:च्या कौशल्याने, परिश्रमाने किंवा एखादी संपत्ती दान म्हणून, मृत्यूपत्रान्वये, इतर कोणत्याही लेखान्वये, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यान्वये, आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्यान्वये संपादित केली गेली असेल किंवा अन्य् कोणत्या ही मार्गाने संपादित केलेली असो, अशी संपत्ती, हिंदू स्त्री संपूर्ण स्वामी म्हणून धारण करील, मर्यादित स्वामी म्हणून नव्हे.
तथापि, असे दानपत्र, मृत्युपत्र, अन्य लेख, हुकूमनामा, आदेश किंवा निवाडा काही अटी किंवा शर्तींच्या आधिन ठेवल्यामुळे संपत्तीत निर्बंधीत अधिकार निर्माण होत असतील तर अशा संपत्तीला या अधिनियमाचे उपबंध लागू होणार नाहीत.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

मा. महोदय नमस्कार,
माझे वडील शामराव व त्यांचे सख्खे भाऊ राजाराम व भार्गव यांनी समा. ४ आणेचा हिस्सा खूष खरेदी पत्राने घेतलेला होता व नंतर दि. ०५/१२/१९८२ रोजी फे. नं. ३०१६ ने झालेल्या त्यांच्या वाटणी पत्रावरून त्यांचे नावे खालीलप्रमाणे हिश्याची नोंद झालेली होती :
गट नं. ४९४/१ १) शामराव :- २ आणे २ पै. २) राजाराम :- ११ पै. ३) भार्गव :- ११ पै.

गट नं. ४९४/२ १) शामराव :- १ आणे ४ पै. २) राजाराम :- १ आणे ४ पै. ३) भार्गव :- १ आणे ४ पै.

असे असता राजाराम यांना त्यांच्या इतर हिस्स्याच्या जमिनीवर विहीर पाडणे व पाईप लाईन करणेचे खर्चासाठी कर्ज झालेने सदरील कर्ज भागवण्यासाठी पैशांची गरज लागल्याने त्यांनी वर नमूद गट नं. ४९४/१ मधील ११ पै. व ४९४/२ मधील १ आणे ४ पै. चा त्यांचे नावे असलेला संपूर्ण हिस्सा माझे वडील शामराव यांना ते सह हिस्सेदार असलेने दि. ०२/०८/१९८३ रोजी रक्कम रु. ५०००/- ला ५ (पाच) वर्षे मुदती करिता गहाण स्वरूपी मुदत खरेदी पत्राने दिलेला होता. सदरील दस्ताची नोंद माझे वडील शामराव यांनी दस्त लिहून देणार राजाराम हे सख्खे भाऊ असलेने त्यांनी वर नमूद दस्ताची नोंद त्यावेळी ७/१२ सदरी केली नाही.
तसेच माझे वडील शामराव यांनी अर्ज देऊन दि. ३१/१२/१९८४, रोजी फे. नं ३२०५ ने त्यांच्या खाते उताऱ्यावरील गट नं . ४९४/१ मधील २ आणे २ पै, व गट नं ४९४/२ मधील १ आणे ४ पै, च्या हिश्या सहित सर्व गट नं. वर त्यांच्या मुलांची नावे दाखल केली होती.
अशी वस्तूस्थिती असताना पुढे राजाराम यांनी माझे वडील शामराव यांचे कडून दि. ०२/०८/१९८३ रोजी गहाणस्वरूपी मुदतखरेदी पत्राने घेतलेली र. रु. ५०००/- दि. १४/१२/८४ रोजी परत देऊन माझे वडील शामराव यांचे कडून त्यांच्या वर नमूद जमीन मिळकतीचे रजि. रिकन्व्हेअन्स पत्र करून घेतले व त्याच दिवशी राजाराम यांनी रजि. रिकन्व्हेअन्स पत्रा मध्ये नमूद असलेली मिळकत म्हणजेच गट नं. ४९४/१ मधील ११पै व गट नं. ४९४/२ मधील १ आणे ४ पै च्या हिश्याची गहाणस्वरुपी मुदत खरेदीपत्राची नोंद माझे वडील शामराव यांनी ७/१२ सदरी केलेली नसल्यामुळे सदर मिळकत राजाराम यांच्याच नावे नोंद होती म्हणूनच दि. १४/१२/१९८४ रोजीच राजाराम यांनी शिवराम कदम यांना कायम खूषखरेदी पत्राने दिलेली होती. याची फे.नं. ३४३८ ने ७/१२ सदरी नोंद झालेली होती व आहे. त्यामुळे सन १९८४ सालीच राजाराम यांचे नावे असलेला हिस्सा व हक्क संपुष्टात आलेला होता व आहे. अशी वस्तुस्थिती असताना राजाराम यांनी दि. १२/०२/१९८५ रोजी. रिकन्व्हेअन्स पत्राची ७/१२ सदरी नोंद करण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकताच नव्हती. तरीही त्यांनी लबाडीने व बेकायदेशीरपणे नोंद केली.

वास्तवीक राजाराम यांनी रिकन्व्हेअन्स पत्राच्या नोंदीसाठी मा. तलाठी व मंडल अधिकारी, या शासकीय अधिकारी यांना अर्ज दिला तेव्हा या शासकीय अधिकारी यांनी रिकन्व्हेअन्स पत्राची नोंद मंजूर करताना दि. ०२/०८/१९८३ रोजी र.द.अ.नं. १८८२/१९८३, च्या गहणस्वरूपी मुदतखरेदी पत्राची नोंद सन. १९८२/८३ ते सन. १९८४/८५ पर्यंतच्या ७/१२ सदरी झालेली नाही तसेच राजाराम यांच्या नावे गट नं. ४९४/१ मधील ११पै व गट नं. ४९४/२ मधील १ आणे ४ पै चा हिस्सा तसाच शाबूत आहे याची कोणतीही दाखल न घेता माझे वडील शामराव यांनी फे.नं. ३२०५ ने त्यांच्या मुलांच्या नावे केलेल्या गट नं. ४९४/१ मधील २आणे २पै व गट नं. ४९४/२ मधील १आणे ४पै च्या हिश्यातून फे.नं. ३२१६ने कमी करून सन. १९८४/८५ च्या ७/१२ सदरी राजाराम यांच्या नावे गट नं. ४९४/१ मध्ये ११पै + ११पै व गट ४९४/२ मध्ये १आणे ४पै + १आणे ४पै अशी वाढीव हिश्याची नोंद केलेली आहे. त्यामुळे सादर फेरफार शासकीय अधिकारी यांनी मंजूर करून अन्याय केलेला आहे.


तसेच राजाराम यांनी सदर रिकन्व्हेअन्स पत्राची नोंद ७/१२ सदरी लबाडीने व बेकायदेशीरपणे करून घेतले मुळे माझे वडील शामराव यांचे मुलांचे नावे नोंद असलेला वर नमूद दोन्ही मिळकती मधील अनुक्रमे ११पै आणि १आणे ४पै चा हिस्सा फे. नं. ३२१६ने राजाराम यांचे नावे केवळ कागदोपत्री नोंद झालेला आहे. वास्तविक आमच्या नावे नोंद असलेल्या हिश्यातून कमी झालेले क्षेत्र हे सर्वस्वी आमच्या मालकी हक्काचे व प्रत्यक्ष कब्जे वहिवाटीचे होते व आहे. पुढे राजाराम यांच्या दि. २४/१०/१९८६ रोजीच्या अर्जावरून फेरफार ने राजाराम यांचे नावाची नोंद वर नमूद दोन्ही मिळकती माधील अनुक्रमे ११पै व १आणे ४पै चे हिश्यास पोकळ स्वरूपी झालेली होती व आहे.

तसेच माझे वडील शामराव हे वयस्कर व अशिक्षित असल्याने व नोकरी-धंद्या निम्मीत पर ठिकाणी राहण्यास असल्याने त्यांना फेरफार ने त्यांचे मालकीचा वर नमूद दोन्ही गटातील हिस्सा ७/१२ सदरी कागदोपत्री कमी झाले बाबत त्यावेळी कोणतीही माहिती मिळाली नाही. असे असले तरी माझे वडील शामराव हे हयात असे पर्यंत त्यांची व तदनंतर आज पर्यंत आम्हा भावांची पूर्वपार प्रमाणे संपूर्ण मालकी हक्काने असलेल्या हिश्या प्रमाणे वर नमूद जमीन मिळकती मध्ये मालकी हक्काने प्रत्यक्ष कब्जे वहिवाट होती व आहे. यास राजाराम व त्यांची मुले यांनी कधीही हरकत अथवा तक्रार केलेली नव्हती. सदरील पूर्व हकदार राजाराम यांनी त्यांचा गट नं.४९४/१ मधील ११पै व गट नं.४९४/२ मधील १आणे ४पै चा हिस्सा दि. ४/१२/१९८४ रोजी शिवराम कदम यांना विक्री केलेला होता व आहे. याची माहिती होती त्यामुळे राजाराम व त्यांची मुले यांना त्यांची वर नमूद मिळकत तुमची तुम्हांस परत देतो या आशेवर ठेवले होते. म्हणून राजाराम यांचेवर विश्वास ठेऊन सदर फेरफारा बाबत कोठेही अपील अथवा रिव्हिजन केले नव्हते. परंतु शेवटी कंटाळून आम्ही (मे.उपविभागीय अधिकारी यांचे न्यायालयात)आर.टी.एस./ रिव्हिजन अर्ज. सर्व पुराव्या सहित महराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलाम 257 नुसार अर्ज केला होता. सदर रिव्हिजन अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 257 सुधारणा नुसार खालील निर्णयास 5 वर्ष पेक्षा अधिक कालावधी लोटल्या मुळे फेरचौकशीची कारवाई सुरु करता येणार नाही. या मुद्देवर फेटाळण्यात आलेला होता.
त्या नंतर आम्ही पुढे अप्पर जिल्हा अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 247 अंतर्गत अर्ज दाखल केला होता. तेथेही सदर रिव्हिजन अर्ज महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 249,252 अन्वये फेरतपासणी अमान्य केले असल्यास व त्यावर अपिलाची तरतूद नसल्याने सदरची अपील दाखल करणेचा स्तरावर फेटाळण्यात येत आहे. असा निर्णय दिला आहे ...तर आता पुढे मी काय करावे या बद्दल कृपया आपण मार्गदर्शन करावे.
आपण जाणकार वकीलाचा सल्‍ला घेऊन, दिवाणी न्‍यायालयात दाद मागता येते काय याबाबत चाौकशी करावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.37 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3