जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by anand salve
28-11-2016
salveanand@89gmail.com
नमस्कार सर , ऑनलाइन फेरफार पाहू शकतो का ? फेरफार संबंधित कागतपत्र मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?
सद्या तरी नागरीकांसाठी ऑनलाइन फेरफार बघण्याची सुविधा नाही. फेरफार नक्कल संदर्भात संबंधित गावांचे तलाठी यांचे कडुन माहीती घ्यावी.
Reply by कामराज बसवंन्ना चौधरी | तलाठी
Question by नरेंद्र गो पाटील अलिबाग रायगड
28-11-2016
ngpatil@rcfltd.com
नमस्कार साहेब माझ्या प्रश्नाला आपण दिलेल्या उत्तरास अनुसरून पुढील खुलासा करीत आहे.साहेब तिसऱ्या सातबारावर कूळ म्हणून कोठेही नोंद सापडत नाही.ना सातबारावर ना फेरफार वर.सदरची चूक त्यावेळेसच झाली असावी अन्यथा तिसऱ्या मालमत्तेचा ताबा आजपर्यंत आमच्याकडे राहीलाच नसता.आजोबा असतानाच कूळ नोंद झाली असती तर त्यावेळेसच किम्मत लावली गेली असती. आता मालमत्ता आमचे ताबेक्ब्जात व मालक वेगळेच.माझा प्रश्न आपणांस असा की आम्ही कूळ वहीवाट नोंदीसाठी तहसीलदार यांचेकडे आता दावा दाखल करू शकतो का ?व त्यासाठी कोणकोणते पुरावे दयावे लागतात याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तर बरे होईल साहेब.
कूळ वहीवाट नोंदीसाठी आपण तहसीलदार यांचेकडे आता दावा दाखल करू शकाल. त्यासाठी सन १९५० पासूनचे सर्व सात-बारा उतारे, त्यांवरील सर्व फेरफार, कुळ-मालक नाते सिध्द करणारे दस्तऐवज, खंड दिल्याच्या पावत्या इत्यादी दाखल करावे लागतील. तथापि, जमिनीवर ताबा असणे आणि जमिनीचा मालक असणे या दोन्ही् गोष्टी् भिन्न आहेत. जमिनीवरील ताबा हा कायदेशीर कागदपत्रांन्वयेच आलेला असावा अन्यथा ते अतिक्रमण ठरेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र गो पाटील अलिबाग रायगड
26-11-2016
ngpatil@rcfltd.com
महोदय साहेब एकत्रीकरण गटयोजनेत एकत्रीकरना योजनेपूर्वीचे क्षेत्र ०-९८-९ ईतके होते तर नंतर गटाचे क्षेत्र ०-६४-३ ईतके झाले.सदरचे एकत्रीकरण सन १९९० साली झाले.तेव्हा वडील मुम्बई ला कामाला होते.वडील सन २००२ ला वारले.तेंचे मृत्यु पछत मी सादरची शेतजमीन आमचे नावे करतांना जुना रेकॉर्ड पाहिला असता ही बाब लक्षात आली.सर्व कागद गोळा करी पर्यंत सन 2003 उजाडले.दिसे.2003 ला सादरचे प्रकरण ता.भू.अ.अलीबाग येथे दाखल केले.फेर चौकशि झाली.पुढे काहीच होत नसल्याने उप संचालक कोकण नंतर जमाबंदि आयुक्ताकडे नंतर महसूल मंत्राकडे या संदर्भत अर्ज विनंती करून थकलो.सदरचे प्रकरण कोठे गायब झाले ते कोणीच सांगत नाही.आजपावेतो मला कही न्याय मिळालेला नाही.आज तेरा वर्ष झाली हरकत दाखल केलेल्याला.या उपर आणखी कोणता मार्ग मला उपलबध आहे.कृपया मार्गदर्शन करावे.मी आपला आभारी राहीन
Question by अभिजित य. पाटील
25-11-2016
abhijit_y_patil@yahoo.co.in
सर,
नमस्कार
तीन भावांच्या वडिलोपार्जित मालकीच्या दोन वेगवेगळ्या गावातील मिळकत 'अ' व मिळकत 'ब' होत्या. त्यांच्यात २००४ साली रजिस्टर वाटणीपत्र झाले. वाटणीपत्राच्या सुरवातीला त्यांच्या वडिलांच्या मालकी कब्जे वहिवाटीच्या मिळकती म्हणून 'अ' व 'ब' या दोन्ही मिळकतीचा उल्लेख करण्यात आला आहे.
वाटणीपत्राच्या मुख्य कलमामध्ये फक्त मिळकत 'अ' ची वाटणी करण्यात आली असा उल्लेख आहे व मिळकत 'अ' मधील प्रत्येकाच्या वाटणीचे क्षेत्राचा उल्लेख आहे. मुख्य कलमामध्ये मिळकत 'ब' चे वाटप झाले म्हणून कोणताही उल्लेख नाही. परंतु परिशिष्ट मध्ये वारस १ च्या वाटणीस मिळकत 'अ' मधील हिश्श्याबरोबर मिळकत 'ब' सुद्धा आल्याचा उल्लेख झाला आहे.
आता वारस 2 व 3 चे म्हणणे असे कि, वाटणीपात्राच्या मुख्य कलमामध्ये मिळकत 'ब' चे वाटप झाले म्हणून कोणताही उल्लेख नाही वा मिळकत 'ब ' वारस १ च्या वाटणीस आल्याचा कोणताही उल्लेख नाही. फक्त परिशिष्ट मध्ये मिळकत 'ब' चा उल्लेख आहे म्हणून मिळकत 'ब' चे वाटप झाले असे म्हणता येणार नाही. वाटपासाठी मुख्य कलमात उल्लेख असणे आवश्यक आहे. त्या मुले मिळकत 'ब' अजून सामायिक व अविभाजित आहे आणि म्हणूनच मिळकत 'अ' च्या वाटपाचा फेरफार लगेच केला मात्र मिळकत 'ब' चा फेरफार अजून झालेला नाही.
तर वारस १ चे म्हणणे असे कि, परिशिष्ट प्रमाणे मिळकत 'ब' माझे वाटणीस आलेली आहे. परिशिष्ट सुद्धा वाटणीपत्राचा भाग आहे. म्हणून वारस १ ने आता २०१६ साली त्याच्या फेरफार साठी अर्ज केला आहे. फेरफाराची नोटीसला वारस 2 व 3 यांनी हरकत घेतली आहे.
या प्रकरणामध्ये योग्य बाजू काय आहे? याबाबत मार्गदर्शन करावे हि विनंती.
धन्यवाद
Question by ravi
25-11-2016
ravindra171282@gmail.com
नमस्कार सर , भावा भावा च्या वडिलोपार्जित शेती मध्ये दिशा लावणे म्हणजे काय ? दिशा कश्या लावल्या जातात ? दिशा लावल्या मुले जमिनीचे हस्तातंरंन कशे होते? दिशा लावणे हि कायदेशीर प्रकिया आहे का? प्रश्न २) या मध्ये तलाठी ची भूमिका काय असते ते या वर कश्या प्रकारे काम करतात ?
माझ्याामते दिशा लावणे याचा अर्थ सीमा आणि क्षेत्र निश्चित करुन जमिनीचे कायदेशीर पध्दतीने वाटप करून घेणे.
तहसिलदारकडे अर्ज करून, दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून किंवा दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत दस्ताने, सर्व सहहिस्सेदारांच्या संमतीने वाटप करता येते.
उपोक्त आदेश किंवा नोंदणीकृत दस्तान्वनये फेरफार नोंद तलाठी यांनी नोंदवावी लागते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रवी
25-11-2016
ravindra171282@gmail.com
सर ३भावना वडिलोपार्जित शेती आहे त्या मध्ये चार वेगवेगळे उतारे मध्ये जवळ पास २३ एकर क्षेत्र आहे . सध्या परिस्थिती मध्ये सर्वांचे वेगवेगळे खाते नंबर पडलेले आहेत . त्या मध्ये जर कुठल्याही एका भावास किंवा आम्हास आमची जमीन विकायची किंवा वेगळी Karun हवी असेल तर काय करावे आम्ही आमची जमीन कुठल्या बाजूने पकडायची किंवा जर आम्हास जमीन कसायची असल्यास कुठल्या बाजूने कसायची ? त्या सती वाटणी पत्रक करावे लागेल का? वाटणी पत्रक कश्या प्रकारे बनते तसेच वाटणी पत्रकाची पूर्ण माहिती सांगावी ? तसेच वाटणी पत्रक बनल्या नंतर तलाठी त्यावर काय कार्यवाही करतात? वाटणी पत्रक बद्दल जरा अधिक माहिती द्यावी जेणे करून भविष्य मध्ये आम्हास कुठल्याही प्रकारची कायदेशीर अडचणी येणार nahit. वाटणी पत्रकात कोणी कुठल्या बाजूने कासवे किंवा त्याचा अधिकार कुठल्या बाजूने आहे हे कशे सिद्ध होते त्यांची प्रकिया sanagavi
२३ एकर क्षेत्र आहे . सर्व जमीन समान उत्पादिकतेची असल्यास , चार सारखे ( प्रत्येकी १\४) हिस्से करण्यास हरकत नाही .
मात्र समान उत्पादकतीची नसल्यास , चौघांनी एकत्र बसून , कोणी कोणती घ्यावी हे ठरवावे .
कोणत्या बाजूने कसावी या बाबत , नियम नाहीत . आपण ठरवणे हितावह
वाटप पत्र १०० रु. चे स्टॅम्प पेपर वर हि बनते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिणी Pathrabe
25-11-2016
brohini12@gmail.com
नियुक्ती प्राधिकारी हे कर्मचाऱ्याचा ३५ वर्षांची सेवा झाल्यानंतर
स्वेच्छा सेवा निवृत्तीचा अधिकार संबंधित कर्मचाऱ्याचे निलंबन नसेल तर रोखून ठेवू शकतात काय? ठेवू शकत असल्यास कृपया संदर्भासहित माहिती द्यावी .
Question by संतोष मोरे
23-11-2016
santoshpmore9@gmail.com
जमीन नोंदणी दस्ताने खरेदी घेतल्यानंतर काही कारणास्तव फेरफार नोंद करणेचे राहून गेले होते . सदर खरेदी देणार इसम खरेदी तारखे पासून ५ वर्षानंतर मयत झाला. त्यानंतर पुढील वर्षी फेरफार साठी अर्ज करून ७/१२ वर नाव नोंद करून घेतले आहे. सदर घटनेला ४० वर्ष झालेली आहेत परंतु खरेदी देणार इसमाचे वारस खोट्या इसमाला नेऊन खरेदीखत केले आहे व फेरफार परस्पर संगनमताने नोंद केला असल्याची तक्रार करणार आहेत. वरील प्रकरणात खरेदी देणार ५ वर्षानंतर मयत झाले व त्यानंतर पुढील वर्षी फेरफार केला असल्याने अडचण येऊ शकते का ?
घाबरण्याचे कारण नाही . आपण खोटा इसम नेऊन खरेदी खत केले हे सिद्ध करण्याची जबाबदारी वारसांची आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by दिनकर सोनावणे
23-11-2016
yogeshsonawane5401@gmail.com
माननीय महोदय,
मी १९९४ साली जमीन खरेदी खताने जाण्या येण्याच्या रस्त्या सह घेतली आहे , खरेदी खातात व साठे खातात तसा उल्लेख आहे .
खरेदी लिहून देणारा मयत झालेला आहे . तर आता त्यांची पत्नी वारसदार म्हणून रास्ता देण्यास नकार देत आहे.
तर रास्ता मिलने साठी काय करावे लागेल कृपा करून कळवा.
धन्यवाद .
आपला विनम्र
दिनकर नरहरी सोनावणे .
पत्नी रस्ता नाकारू शकत नाही .
न्यायालयात तिने अडथळा केला असल्यास दावा दाखल करा .
मामलतदार कोर्ट कायद्या खाली हि आपण अर्ज करू शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित जठार
23-11-2016
www.roraj8@gmail.com
आमच्या वडिलोपार्जित जमिनीचे माझ्या वडिलांनी माझ्या नावे मृत्युपत्र केले आहे. पण माझ्या भावाला समजताच माझ्या भावाने व २ बहिणीने कोर्टात वाटणी पत्र करीत अर्ज केला आहे आता कोर्टात केस चालू आहे
तर केस चालू असताना माझे वडील वारले तर सदर मृत्युपत्र मान्य होईल का?
मी काय करू कृपया सल्ला द्या
मान्य होईल .
मात्र मिळकत वडिलांची , स्व कष्टार्जित असावी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र पाटील अलीबाग रायगड
22-11-2016
ngpatil@rcfltd.com
माझ्या आजोबांना सन 1961-62 साली 32ग शेतजमीन मिळाली. त्यावेळेस 3 स्वतंत्र सातबारा होते परंतु 2 सातबारांची खरेदी किम्मत ठरवली व त्यानुसार हप्ते भरले. आजोबा सन 1967 ला वारले.वडील लहान असल्याने व नंतर नोकरी नीम्मीत्त बाहेरगावी.त्यामुळे सदरची बाब लक्षातच आली नाही.आता ऑनलाईनच्या जमान्यात या सातबारा बाबत एका एजेंटने ही माहिती मूळ मालकांच्या वारसाना दिली व लगेचच वारसांनीही सदरच्या सातबारावर वारस नॊंद दाखल केली.आता एजेंट आम्हाला सदरचि जागा विकत घेणेबाबत तगादा लावत आहे अन्यथा ती जागा दुसऱ्याना विकली जाईल अशी धमकी देत आहेत.मूळ मालक सन 1961 अगोदरच मुम्बईत स्थाईक झालेले आहेत.आजोबा पासून सर्व शेतजमीन आमच्याच तबेकब्जात आहे.माझा प्रश्न आपणांस असा की आमच्याकडे आता काय पर्याय उपलब्ध आहेत.जुन्या नोंदी पाहिल्याअसता आजोबाची नोंद कोठेही सापडत नाही.आता तलाठि कूळ वहिवाट नोंद दाखल करू शकतो का ?.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपण कथन केल्यानुसार , तिसऱ्या मिळकतीचे कुल म्हणून लागलेले नाव कमी झाले आहे काय ?
नाव कमी झालेले नसल्यास , ३२ ग किंमत आताही निश्चित होऊ शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ,अभिजीत
20-11-2016
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय या सरकारचा सिलींग अँकट विषयी वर्तमानपत्र व सोशल मिडीयात जोरदार प्रचार सुरू आहे यात कितपत सत्य आहे कीती जमिन सिलींग खाली येणार व आगामी येणार्या सिलींग अँक्ट विषयी माहीती दया
या पूर्वीचा कायदा हा १९६१ पासून अमलात आलेला आहे. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा झालेल्या आहेत .
महाराष्ट्र नागरी जमीन कमाल मर्यादा धारण कायदा रद्द झालेला आहे . मात्र शेतजमीन कमाल मर्यादा धरण कायदा रद्द झालेला नाही
कायदा बनवण्याची एक पद्धत असते . कायदा बनव्य्नयापूर्वी त्याचे प्रारूप प्रसिद्ध केले जाते .लोकांच्या हरकारी , मते मागवली जातायत.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
वर्तमानपत्र व सोशल मिडीयावर फार विश्वास ठेऊ नये. याबाबतचा जुना कायदा काही वर्षापूर्वीच शासनाने रद्द केलेला आहे. त्याामुळे तोच कायदा पुन्हा अंमलात येण्याची शक्यता फार कमी आहे. तथापि, जर हा कायदा पुन्हा आणला गेलाच तर शासनाचा निर्णय सर्वोच्च असल्याने तो स्वीकारावा लागेलच.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश
20-11-2016
nikysweet1@gmail.com
नमस्कार सर , मी सण १९८५ मध्ये मूळगावी २२०० sq भूखंड खरेदी खतानुसार खरेदी केला व आज रोजी माझेच नावे आहे. पण काही काळानंतर माझे वडिलांनी ती जागा एका इसमांस तात्पुरती राहायला म्हणून दिली. आज रोजी त्या इसमाचे त्या जागेवर घर बांधून वास्तव्य आहे. व त्यांनी ग्रामपंचायत दप्तर ला नोंद सुद्धा केली व नमुना ८ ला त्याचा नावे निघाला. आता मी सेवा निवृत्त झालो आहे आणि आता मला परत माझे मूळ गावी यायचे आहे. तर ती जागा मला परत कशी मिळवता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे.
त्याने जागेचा मोबदला दिला तर तो स्वीकारावा .
जागे वर घर बांधले आहे , त्या मुले तो जागा आपणास परत करणार नाही
जागा किती वर्षे त्याचे तांबे कब्जात आहे ?
जर १२ वर्षापेक्षा , त्याचे ताब्यात असेल तर , तो adverse possession चा दावा दाखल करू शकतो . जागेची मालकी त्याचे नावे जाहीर करून मिळण्यासाठी चा दावा मान्य होऊ शकतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रवी गव्हाणे
20-11-2016
ravindra171282@gmail.com
नमस्कार सर आपल्या कार्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार . प्रश्न असा आहे कि जमिनीचा सातबारा मध्ये ३ भाऊ १ बहीण वेग वेगळे खाते नंबर वरती आहेत जमीन हि वडिलोपार्जित आहे . वडिलांच्या मृत्यू नंतर ३ भाऊ एक बहीण वारस नोंद झाली आहे. नोंदींना बरेच दिवस सारून गेले आहेत त्यांचे खाते number वेगवेगळे दाखवत आहेत तरी सादर बाबतीत हक्क सोड पत्र होऊ शकते का ? जर हो तर काय करावे लागेल किंवा जर नाही तर तिला आपला हक्क सोडायचा असल्यास काय आणि कुठल्या प्रकारचा दस्त करावे लागेल ते सांगावे ? प्रश्न २) सर सादर जमिनीवर ३ भाऊ एक बहीण चे नाव आहे तरी सादर बहीण एका भावाच्या नावे तिच्या नावे असलेले जमिनी पैकी काही भाग फक्त एक भावास देऊ इच्छिते तर सादर बाबतीत हक्क सोड पत्र होईल ka. सादर बहीण एका भावाच्या नावे काही भाग देऊ शकते ka. आणि ते हक्क सोड पत्र होईल ka. अन्य काही खरेदी खात करावे लागेल?.
Question by नरेंद्र पाटील अलीबाग रायगड
20-11-2016
ngpatil@rcfltd.com
साहेब मी आपला विशेष आभारी आहे.कारण आपण मी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल.माझा दुसरा प्रश्न असा आहे माझ्या आजोबांना सन 1961 ला 32ग ची शेतजमीन मिळाली.प्रत्यक्ष 3 सातबारा होते परंतु 2सातबाराचे मूल्यांकन झाले.सन 1967 ला आजोबा वारले.सर्व मुले लहान होती नंतर नौकरी निमित्त बाहेर गेली.सर्व शेतजमीन आमच्या ताबेकब्ज़ात आहे.आता ऑनलाइनच्या जमान्यात मूळ मालकांच्या वारसांना गावातल्या एजेंट लोकांनी न झालेल्या त्या सातबाराबद्दल सांगितले.एवडेच नाहीतर वारसाची नावे दाखल केली.त्यांचे कुटुंब 1961 अगोदरच मुम्बई स्थित आहेत आता एजेंट आम्हाला सांगत आहेत की ती जागा तुम्ही विकत घ्या.सदरील वारसाना कोठे जागा आहे ते ही माहिती नाही.माझा प्रश्न असा आहे की आम्हाला काय करता येईल.सदरील सातबारावर कूळ वहिवाटची नोंद झालेली नही.कृपया मार्गदर्शन करावे
Question by किशोर
20-11-2016
brsawalkar@gmail.com
नमस्कार सर,मी २०१५ साली एक २४०० sqare ft चा प्लॉट गाव नमुना ८अ च्या आधारे खरेदी केला आहे.सादर प्लॉट मी ज्या व्यक्तीकडून घेतला त्याचे नाव ७/१२ ला नोंदणी केलेले नाही परंतु त्या व्यक्तीने तो प्लॉट झान्च्याकडून घेतला त्या दोघांची नोंद ७/१२ ला आहे.आता मला ७/१२ ला सादर प्लॉट च्या खरेदीखताद्वारे माझे नाव लावायचे आहे .परंतु मी ज्याच्याकडून हा प्लॉट घेतला त्याचीच नोंद ७/१२ ला नसल्यामुळे मला माझे नाव ७/१२ ला लावता येत नाही असे तलाठी साहेब म्हणतात.तर आता मी ज्याच्याकडून हा प्लॉट खरेदी केलेला आहे त्याचे नाव ७/१२ ला नोंद करण्यासाठी काय करू ? ज्याच्याकडून हा प्लॉट घेतला त्याचे नाव ७/१२ ला नोंदविण्यासाठी ,अर्ज मी करू शकतो का ?मला माझे नाव ७/१२ ला लावण्यासाठी काय करावे लागेल ? कृपया मार्गदर्शन करावे.
आपण ज्याचे कडून खरेदी केली त्याचे नाव ७/१२ सादरी नसले तरी आपले नाव ७/१२ सादरी लावता येईल . ज्याने आपणास जमीन विकली , त्याचे खरेदी दस्त , तलाठी कडे सादर करा . प्रथम आपल्या विक्रेत्याचे नाव लागेल , त्या नंतर आपले लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक
19-11-2016
vnyk1234@gmail.com
नमस्कार,
माझ्या सात बारावर खालील प्रमाणे नोंद आहे.
लागवडीचे योग्य क्षेत्र हेक्टर आर
जिरायत १ - ४८ ०
बागायत - -
भातशेती - -
------------------------------------------------
एकूण १ - ४८ ०
------------------------------------------------
पोटखराब ४-४३ ०
वर्ग ( अ ) - ०
वर्ग ( ब ) - ०
------------------------------------------------
एकूण ४-४३ ०
------------------------------------------------
रुपये पैसे
आकारणी.....
------------------------------------------------
जुडी किंवा विशेष आकारणी ० ७९
------------------------------------------------
वरील एकूण क्षेत्र (हेक्टर, एकर, गुंठे ) किती आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे.
८ –अ नुसार १ हे. ४८ आर
७-१२ नुसार लागवडी लायक क्षेत्र १ हे. ४८ आर
अधिक पोटखराबा (लागवडी लायक नसलेले) क्षेत्र ४ हे. ४३ आर
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by विशाल एकनाथ khairnar
19-11-2016
vishalkhairnar84@rediffmail.com
कर्मचारी लाचलुचपत प्रकरणात निलंबित असून अजून पुनर्स्थापित करण्यात आलेले नाही अशा कर्मचाऱ्याला वय वर्ष ४५ पूर्ण झाले असल्यास अहर्ता / सेवा प्रवेशोत्तर परीक्षा सूट देता येल का
निलंबन कालावधी जर १ वर्ष पूर्ण झाला असेल तर निलंबन आढावा समिती , अपचारी कर्मचाऱ्यास सेवेत घेणे बाबत विचार करू शकते . दोन वर्षे पूर्ण झाले वर , गुन्ह्याचे स्वरूप बघून , सेवेत पुनर्स्थापित केले जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विशाल एकनाथ khairnar
19-11-2016
vishalkhairnar84@rediffmail.com
नगर भूमापन योजना लागू करताना शेती मिळकती वर सनद फी आकारता येते का
Question by संतोष मोरे
19-11-2016
santoshpmore9@gmail.com
एकाद्या इसमाने आपल्या सर्वे नंबर पैकी काही जमीन सहकारी संस्थेस खरेदी दिली सदर संस्था आता विसर्जित झालेली आहे. विसर्जनावेळी संस्थेची सर्व देणी पूर्ण झालेली आहेत व आता ती जमीन सदर संस्थेच्या नावावर दहा वर्षा पासून पडून आहे . सदर जामीन विकणारी व्यक्ती हयात नसलेने त्याचे वारस सदर जमीन सरकारी दराने परत मागणी करू शकतात का ?
एकदा जमीन विकत दिल्यानंतर, विकत देणार्या्च्या वारसांना, विकत दिलेल्या मिळकतीवर हक्क सांगता येणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश अहिरे
18-11-2016
yogesh.ahire9290@gmail.com
प्रथम मागच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
नमस्कार सर मला खाते-फोड विषय माहिती पाहिजे ़
जमीन नवीन अविभाज्य शर्तीची (महार-वतन) धुळे जिल्ह्यातील आहे , सदर जमीन आजोबांच्या नावाने असून ती वडील व काकांच्या नावाने करायची आहे,आजोबा हयात आहेत , तरी इतर वारस हक्क सोड पत्र करुन देण्यासाठी तयार आहेत, तर ह्या साठी नजराणा भरावा लागेल का..? लागेल तर किती..? कुणाची परवानगी घ्यावी लागणार का..? क्रुपया परिपूर्ण मार्गदर्शन करा हि विनंती मोबाईल नंबर 7588517207
Question by नरेंद्र शिवदास शिंदे
18-11-2016
vickysss40@gmail.com
आदरणीय,
सर/ मॅडम,
मी आदिवासी आहे माझी जमीन दुसऱ्या कडे होती खूप दिवस झाले आता ती जमीन मला सोडून घ्यायची आहे. आणि तो पुढचा व्यक्ती सुद्धा आदीवाशी आहे . तो द्यायला पण तयार आहे. त्यांनी माझी जमीन वर ६०००० कर्ज काढला होता. आता मला ती जमीन माझ्या नावावर करायची आहे. आदिवासी कायद्या विषयी मला जास्त माहिती नाही आहे तरी मला मार्गदर्शन करावे.
धन्यवाद...!!!
आपली जमीन दुसऱ्याकडे म्हणजे आपण ती जमीन गहाण दिली होती का ?
जर जमीन कोणत्याही दस्ताशिवाय दुसऱ्या इसमाकडे दिली असल्यास , तो आपले जमिनीवर कर्ज काढू शकत नाही
आपण जर जमीन त्यास विकली असेल , तर त्याचे इच्छे शिवाय आपणास परत घेता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
तुमचा आपसात काय आणि कसा करार झाला होता हे पाहणे आवश्यक आहे. आपण संबंधीत तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल अंकुश जाधव, लिपीक
17-11-2016
mr.k1387@gmail.com
एखादे कर्मचाऱ्यावर न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल व त्यांचे मागील अंदाजे दीड महिन्यांचा निलंबन कालावधी अद्याप नियमित करण्यात आलेला नसेल तर त्यास कालबद्ध पदोन्नती (12 वर्षे) लाभ अनुज्ञेय आहे का ?
Question by anand salve
16-11-2016
salveanand@89gmail.com
नमस्कार सर , ऑनलाइन फेरफार पाहू शकतो का ? फेरफार संबंधित कागतपत्र मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?
Question by धनाजी जठार
16-11-2016
dhana.jathar@gmail.com
सर, आमच्या आजोबाना माझ्या वडिलांना धरून ३ मुले आणि ३ मुली आहेत आजोबा व आजी हयात नाहीत. आजोबांचा नावे ११ एकर जमीन असून सध्या स्टॅम्प वर वाटणीपात्र झाले आहे ३ मुलं कडे प्रत्येकी ३ एकर असून अजून जमिनीची खातेफोड झाली नाही. ३ मुली पैकी एक मुलगी बेपत्ता आहे व २ मुली हिस्सा मिळावा यासाठी इच्छुक आहेत. तरी ह्याची खातेफोड कशी होईल व प्रथम कुठे चौकशी करावी लागेल तसेच सिलिंग ऍक्ट १९७५ कधी पासून लागू होणार आहे किंवा होईल कि नाही याची माहिती मिळावी हि विनंती.
११ एकर जमीन ६ हिस्स्यात वाटप करणे आवश्यक्य . जर एक मुलगी बेपत्ता असेल व तीस कोणतीही वारस नसतील तर ५ हिस्स्यात वाटप करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
