जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

गट क्र.40 हा एका व्यक्तीचा होता त्या गटामध्ये एक विहीर होती. त्यांना 3 मुले त्या तिनही मुलांनी नंतर त्यांचे हिस्से इतर 3 खरेदीदारांना विकले त्यापैकी एक हिस्सा मी सन 2003 मध्ये खरेदी केला. परतू खरेदी खतामध्ये विहीरीची नोंद ही चुकुन (सदर गटात इतर हक्की विहीर असून ती सदर तुकडयात नसुन इतर तुकडयात आहे ) चुकीची नोंदली गेली. तसेच सदर विहीरीची नोंद ही आमच्या 7/12 वर आजही आहे. परंतू आता इतर 2 खरेदीदार यांचे म्हणने आहे की सदर विहीरीची नोंद ही तुमचया खरेदी खतात नाही तसेच ती विहीरही तुमच्या तुकडयात नसल्यामुळे त्यावरती तुकचा 1/3 हक्क्‍ पोहचत नाही. तसेच एका खरेदीदारांच्या खरेदीखतामध्ये गट क्र.40 मध्ये असलेल्या विहीरीवर तुमचा 1/3 हिस्सा आहे अशी नोंद व एका खरेदीदाराच्या खरेदी खतामध्ये विहीरीचा काहीही उल्लेख नाही. तरी पुर्वीपासून असलेल्या सदर विहीरीवर आमचा 1/3 हक्क कसा मिळयाचा याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती मो.-9403556517
आपला विहिरीवर easementary right आहे . आपण The Specific Relief Act खाली आपला easementary right जाहीर करून मिळणेबाबतचा दिवाणी दावा दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर , माझ्या वडिलांनी 45 वर्षांपूर्वी गावापासून 3 कि.मी. अंतरावर अतिक्रमित जमीन वहिवाटी साठी काढली होती. माझे वडील भूमिहीन असल्याने मा. कोर्टाने सदर गटातील क्षेत्रा पैकी 60 गुंठे क्षेत्र वडिलांच्या नावावर करण्यात आले होते परंतु उर्वरित क्षेत्र हे माझ्या वडिलांच्या ,भावाच्या व आईच्या नावावर होईल का ? तसेच त्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल ? कागदपत्र कोणती लागतील? व जी .आर ची माहिती देऊन कृपया मार्गदर्शन करावे .
आपले प्रश्नावरून आपला जमिनीवरील ताबा , दिवाणी न्यायालयाने Adverse -possession या तत्वाखाली कोर्टाने , मालकी म्हणून जाहीर केलेला असावा .
उर्वरित क्षेत्रावर जर आपले वडील , भाऊ व आई यांचा 12 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताबा असल्यास आपण परत दुसरा दिवाणी दावा दाखल करून , मालकी सिद्ध करून मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

(Namsakr सर
माझे नाव नंदू जाधव असून माझे वडील 1973 साली दत्तक गेले होते .. त्यानुसार मला काही शेतजमीन मिळाली आहे.. त्यानंतर पुढील एक दोन वर्षात ज्यांना वडील दत्तक गेले ते आजोबा आणि माझे वडील दोघे मयत झाले. पण आत्यानी त्यावेळी दत्तक पत्र रद्द करण्या साठी अपील केले आपण पण दिवाणी सत्र न्यायालय तसेच जिल्हा सत्र न्यायालयाने दत्तक कायम ठेवले आहे ... अपनी मालमत्ता आमच्या कडे ठेवली .. हलाखीच्या आर्थिक परिस्थीती मुले तसेच एका बनावट मृत्यूपत्र मुळे आत्यांची नावे 7/12 उताऱ्यावर तसेच राहून गेली आहेत.नंतर आम्ही अलीकडे ती नावे कमी करण्यासाठी प्रांत कार्यालयात अर्ज केला तेव्हा त्यांनी तो फेटाळायला आणि नावे कायम ठेवलीय. तसेच दिवाणी कोर्टाने सुद्धा ते बनावट मृत्यूपत्र आणि आमच्या कडील मृत्यूपत्र दोन्ही रद्द करून व दत्तक कायम ठेऊन संबधीत मालमत्ते मध्ये 3 हिशे केले ... असे झाल्यास आम्हाला फार थोडी जमीन शिल्लक राहते आणि त्यातली निम्म्म्या हुन अधिक जमीन आत्यांना जाते .. ज्यांना आधीपासून खूप मालमत्ता आहे ..

दत्तक तसेच मृत्यूपत्र नुसार सर्व मालमत्ता आम्हाला दिलेली आहे आणि आमचा ताबा आहे सध्या. मालमत्ता अधिकार 22 जुन 1994 नुसार सुद्धा ती जमीन आम्हाला मिळते .. ( ह्यात फक्त 22 जुने1994 नंतर जन्मलेली आणि 22 जुने 1994 नंतर लग्न झालेली मुलींना अधिकार आहे आणि आणि ज्यांनी दावा केला आहे त्या पैकी एक तर 1994 पूर्वी मयत आहेत. पण त्यांचे मुलांची नावे सध्या 7/12 वरती आहे आणि दुसरी जी आहे तिने दावा नई केला आणि नाही कोर्ट समोर आलीय.
पण आता कोर्टाने संपूर्ण मालमता मध्ये 3 हिस्से सांगितले आहे ..
ह्यात 2 आत्यानं पैकी एक मयत असून दुसरीने संबंधीत मालमत्तेची मागणी नाही केली.. जी मयत आहे त्यापैकी एकीच्या नातवाने मागणी केली आहे .. ह्यामध्ये काय होईन ह्यावर आपले मार्गदर्शन आहे आहे .. कृपया आपले मत आणि पुढील वाटचाली साठी मार्गदर्शन करा ..
नंदू जाधव
आपले वडील दत्तक गेल्याची बाबा न्यायालयाने मान्य केली आहे . मात्र मृत्य पत्रे रद्द केली आहेत . त्या मुले आजोबांना जे वारस आहेत , त्या प्रमाणे न्यायालयाने हिस्से केलेले आहेत .
या पेक्षा आपणास जाडा जमीन मिळू शकणार नाही . अन्यथा मृत्य पत्र खरे/बरोबर आहे या साठी अगोदर उत्तर दिले प्रमाणे अपील दाखल करा
Reply By - श्री. किरण पानबुडे
उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन
कोर्टाच्या निकालावर भाष्य करता येणार नाही. आपणास सदर निकाल मान्यस नसेल तर आपण वरिष्ठ न्यायालयात दाद मागू शकाल
Reply By - कुंडेटकर संजय नरेंद्र
Dy. Coll. Satara)





धन्यवादसाहेब आपल्या अभिप्रायाबद्दल
अजून काही माहिती हवी होती सर आपल्या कडून.. कारण ह्या संबंधित विषयावर कुठल्याहि वकिलाचे आम्हाला एकसारखे मत मिळत नाहीये.तर आपले मत सांगा सर ...
1) आमच्या कडे असलेल्या आणि न्यायालयाने मान्य केलेल्या दत्तकपत्रा मध्ये संपूर्ण मिळकतीचा उल्लेख म्हणजे गट नंबर सर्वे नंबर सहित सर्व मालमत्तेचा एकमेव अधिकार वडिलांना दिलेले आहेत .. त्यानुसार काही मागणी करता येऊ शकते काय.. कारण दत्तक पत्र तर कोर्टाने कायम केलेले आहे ..मग त्यामध्ये जर संपूर्ण मिळकतीचा अधिकार दिलेला आहे .. आणि ती मालमत्ता ज्यांनी दत्तक घेतले त्या आजोबानी स्वतः खरेदी केलेली होती....
2) आणि 2006 च्या वारस हक्क नियम मध्ये मुलींना जन्मातहा अधिकार दिलेले आहेत पण ती मुलगी 9/9/2005 पर्यंत जिवंत हवी किंवा त्या आधी तिने मागणी केलेली हवी.. असे असताना देखील त्यांना दिवाणी कोर्टाने कसाकाय डायरेक्ट सामान हिस्सा दिला असावा यामध्ये कुठला नवी सुधारित कायदा आलेला आहे काय ?

कृपया मार्गदर्शन करा..
नंदू जाधव
दत्तक पत्रामध्ये मिळकतीचा उल्लेख केला आहे असे आपले म्हणणे आहे . मात्र दत्तक पत्रामुळे मिळकत हस्तांतरण होत नाही .
आपला पूर्वीचा प्रश्न व आत्ताच प्रश्न याची पूर्ण उकल होण्यासाठी , निकालाची प्रत मेल करा
kiranpanbude @gmail,com

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

कृपया न्यायालयाचे निकालाची प्रत मेल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

किरण पाणबुडे साहेब नमस्कार .
गावठाण प्लॉट न 18 व 22 बद्दल अपिलीय अधिकारी यांच्याकडे केलेले अपील आमचे औंषतः मंजूर झाले आहे. ऑर्डर मध्ये त्यांनी असे म्हटले आहे कि औंषतः अपील मंजूर करण्यात येते. प्लॉट न 18 व 22 बाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमापे घ्यावी व नोंद करावी असा आदेश दिला आहे. तसेच पहिला झालेला नकाशा व चौकशी आदेश रद्द केला आहे. म्हणजे निकाल आमचे बाजूनेच झाला ना ? मग औंषतः या शब्धाचा अर्थ काय ? आता सिटी सर्वे वाले प्रत्यक्ष जागेवर येऊन काय करणार ? कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
औनशता म्हणजे आपण अपील मध्ये केलेल्या मागण्यापैकी काही मागण्या अपील अधिकाऱ्याने मंजूर करणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कार्यरत प्रशिक्षणार्थी यांनी उपभोगलेली अर्जित रजा मंजूर करणे संबधी काय तरतुद आहे. (कोण मंजूर करावी) याबाबत कृपया मार्गदर्शन व्‍हावे.
परिविक्षाधीन व्यक्ती ज्या सवांर्गात आहे त्या सवर्गाची राजा मंजूर करण्यास जो अधिकारी सक्षम आहे तो अधिकारी परिविक्षाधीन अधिकाऱ्याची राजा मंजूर करतो .
मात्र जेवढ्या कालावधीसाठी राजा उपभोगली जाते , तेवढा कालावधी ने परिविक्षाधीन कालावधी पुढे जातो .
(1) (a) A probationer shall be entitled to leave under these rules if he had held his
post substantively otherwise than on probation.
(b) If, for any reason, it is proposed to terminate the services of probationer, any leave which may be granted to him shall not extend-
(i) beyond the date on which the probationary period as already sanctioned or extended expires, or
(ii) beyond any earlier date on which his services are terminated by the orders of an authority competent to appoint him.
(2) A person appointed to a post on probation shall be entitled to leave under these rules.
Note.-The probationers in the Registration Department for Sub-Registrar's posts are not eligible for any leave but the period of probation will count as duty if the probationers are subsequently confirmed.
महाराष्ट्र नागरी सेवा ( राजा ) नियम
नियम 56-

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी 31आॅगसटला प्रश्न विचारला होता की एकत्र कुटुंबातील दोन भाउ व पाच बहिणी असुन त्यांचे वडील 1962साली मयत झाले तया पाच बहिणींना 1956चया अॅकटनुसार लिमिटेड हिस्सा मिळाला व बाकी क्षेत्र दोन भाउ यांच्यात विभागाले गेले दोन भावांपैकी एकाचा मृत्यू 1992साली झाला त्याला तीन मुले व एक मुलगी असुन तया मुलीला समान धयावा लागेल असे आपन सांगितले होते परंतु त्या मुलीचा विवाह 1994पुवीं झाला आहे तर तिला समान हिस्सा मिळेल का माग॔दश॔न करावे

Question by sadik
06-09-2016
sad12@gmail com

आजोबा व त्यांच्या भावाने 1965 साली शेतजमीन खरेदी केली होती आज रोजी आजोबांच्या भावाच्या hishamadhun काही जमिनीचे हक्क sod पुतण्याच्या मुलाच्या नांवे करायचे आहे तर हक्क सोड होऊ शकते का
मोहदय माझे आजोबा व त्यांचे वडील हे सन-1945-2000 पर्यंत जमिनीवर रीतसर डायरी नं नुसार कुळ होते तरी हे कुळ चुकून लागलेले आहे असा बेकायदेशीर आदेश कोणतीही नोटीस न देता दिला व मूळ मालकाने ती जमीन सन 2000 ला विकली .मी या जमिनीवर कुळाचे वारस लावण्यात यावेत असा वारंवार अर्ज करत होतो तहसीलदार यांनी माझी दाद घेतली नाही ,सदर जमिनीवरील कुळांची माहिती,माहिती अधिकार अर्ज करून मागवली ति माहिती तहसीलदार व जिल्हाअधिकारी यांनी दिनांक 20-7-2016,दिली कि सन 1945 -2000 पर्यंत हि दोघे रीतसर डायरीनुसार कुळ होते तरी पुढचा मार्ग मला सांगावा हि विंनती
जमीन आज हि आपणच कसत आहेत का ?
कुल म्हणून आपली 7/12 सादरी नोंद होती का ?
कुळाची नोंद जर 7/12 सादरी होती तर , रद्द ज्या फेरफाराची झाली तो फेरफार आव्हानात केला आहे का ?
उपरोक्त प्रश्नाचे उताराचे अनुषंगाने पुढील उत्तर देता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७/१२ वर इतर अधिकारामध्ये महाराष्ट्र बँकाचा बोजा असेल व बँकात जर कर्जापोटी घेतलेली रक्कम व्याजासहित भरली असेल तर बोजा कसा कमी करुन घ्यावा .
कर्ज व व्याजाची रक्कम भरले बाबत बँकेचे पत्र घ्या . तलाठी यांचेकडे सादर करा .
तसेच आपण जमीन बँकेकडे गहाण ठेवली होती का ? कोणत्या प्रकारचे गहाण आपण घेतले होते ?
simple mortgage, English mortgage, mortgage by conditional sale , Usufructuary Mortgage या वरून पुढील प्रक्रियाही आवश्यकतेनुसार पार पाडावी लागेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. महोदय, नगरपरिषद निवडणूकीचा अर्ज करतांना अर्जदाराने मयत झालेल्या अपत्याची संख्या लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्रात नमूद करावी काय? केली नसल्यास एखाद्या इसमाने आक्षेप घेतल्यास असा उमेदवार अनर्ह ठरु शकेल काय?
7 सप्टेंबर 2001 नंतरच्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक नसावी , एवढाच उद्देश आहे . त्यावरून ठरवा .
या मध्य हयात अपत्य अभिप्रेत आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. महोदय, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक स्थाप्रप-1414 (प्र.क्र. 73/14) 13-अ दिनांक 11 सप्टेंबर 2014 नुसार स्थायित्व प्रमाणपत्र मिळणेकामी शासन सेवेत लागल्यापासून ३ वर्षापर्यंतचे गोपनीय अहवाल आवश्यक आहेत किंवा कसे? तसेच सन 2011 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना गोपनीय अहवालाच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात येत नसल्यामुळे कोणत्याही ३ वर्षांचे गोपनीय अहवाल स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी वापरणे योग्य ठरेल काय? मार्गदर्शन व्हावे.
आदरनिय सर,माझे आजॊबा 1936 सालापासुन 5 हॆ. 39 आर जमीन कसत हॊतॆ. 1948 साली आजॊबांची संरक्षित कूळ अशी नोंद झाली. त्यानंतर आजॊबा 1988 साली मयत झालॆ व तॊपर्यत तॆ जमीन कसत हॊतॆ.त्यांना वारसदार 4 मुलॆ व 3 मुली आहॆत. त्यातील 1 माझॆ वङील आहॆत व मी हि जमिन 2014 पर्यत कसत हॊतॊ व 7/12 वर वहिवाटदार अशी 2014 पर्यत नॊंद आहॆ. त्यानंतर मुळ मालकानॆ सन 2011 मध्ये हि सर्व जमिन खरॆदिखतानॆ तिस-या इसमास विकली आहॆ. या खरॆदिखतात 3 चुलतॆ व 3 आत्या यांनी सहया कॆल्या आहॆत. माञ या खरॆदिखतावर माझी व आईची सही व संमती नाही. तसॆच खरॆदिखतात खरॆिददारानॆ 4 हॆ 20 आर क्षेत्र घॆतलॆ व 1 हॆ 20 क्षेत्र हॆ तिन चुलत्यांच्या नावावर कॆलॆ. या जमिनीवर आमचा ताबा 2014 पर्यंत हॊता. माञ मनगटशाहीनॆ तॊ घॆतला. माञ माझॆ व आईचॆ नाव इतर हक्कात 7/12 वर आजही आहे. तर आम्हाला हि जमिन कुळ कायदयानॆ मिळॆल का? व किती जामिन मिळॆल व त्यासाठी काय करावॆ लागॆल? कुपया माहिती द्यावी हि विनंती.
आजोबांचे नांतर हिंदू वारसा कायदा व महाराष्ट्र कुल वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलाम 40 प्रमाणे 4 मुले व 4 मुली वारसदार आहेत . त्यामुळे 5 हे 39 आर जमिनीचे 7 वारसदार आहेत . आपणास 1/7 हिस्स्यावर आपला अधिकार आहे . आपण खरेदी खत आव्हानात करा व आपल्या हास्याचे क्षेत्र आपले चुलते व खरेदीदार यांचेकडून मग अथवा त्याचे मूल्य मिळण्याची मागणी करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. महोदय, एखाद्या कर्मचाऱ्यास निलंबित केल्यानंतर सदर कर्मचाऱ्याने त्या आदेशाविरुध्द वरीष्ठ कार्यालयात अपील दाखल केल्यानंतर काही कारणास्तव आदेश निर्गमित करण्यास विलंब होत असल्याचे लक्षात आल्यास कर्मचारी शासन सेवेत पुन:स्थापित करणेकामी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज दाखल करु शकतेा किंवा कसे? कृपया मार्गदर्शन व्हावे.
नाही .
वरिष्ठ अधिकारी यांनी, जर निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेले असल्यास, ते रद्द करणे आवश्यक.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. महोदय, नवनियुक्त कर्मचाऱ्यास किरकोळ, वैद्यकिय, अर्जित रजा यांचा 6 महिन्याच्या आत लाभ घेता येतो किंवा कसे? कृपया मार्गदर्शन व्हावे.
होय.
6 महिन्या मध्ये 15 दिवस अर्जित राजा खात्यात जमा होते . आपला सेवेत किती कालावधी झाला आहे या वरून ठरवा .
किरकोळ रजा वर्षाला 12 आहेत .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

nikysweet1@gmail.com
Sunday, August 21, 2016
माननीय सर नमस्कार ,
शासकीय कर्मचारी सेवेत असताना सलग तीन वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे . तसेच सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास दोन आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे. मला सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाले असताना सुद्धा एकच आगाऊ वेतनवाढ मंजूर केली. यावर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

.किंवा न्या‍याधिकरणाकडे दाद मागावी
Reply By - कुंडेटकर संजय नरेंद्र
Dy. Coll. Satara

वरिष्‍ठांकडे लेखी विनंती करावी.
Reply By - कुंडेटकर संजय नरेंद्र
Dy. Coll. Satara
धन्यवाद सर आपण मार्गदर्शन केल्याबद्दल. पण कालावधी बराच होऊन गेला. अपील करण्यासाठी कालावधी असतो का. सण 2006-07 मधील प्रकरण आहे सर.
आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहेत , तेथील आस्थापना लेखा विभागाकडे असलेल्या अतिकामामुळे त्यांचेकडून अश्या वेतन वाढ काढल्या जात नाहीत . आपण हि बाबा त्यांचे निदर्शनास आणून द्या . अथवा आपले विभाग प्रमुख यांना भेटून आपली व्यथा मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या गावात एका व्यक्तीने गटारात अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. संबंधित व्यक्तीला तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 52 अन्वये मनाई हुकूम दिला होता परन्तु काही ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे याबाबत कारवाईस टाळाटाळ करण्यात आली तरी याबाबत कोणाकडे दाद मागावी व ह्या ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध कोठे तक्रार करावी व तक्रार करण्याची प्रक्रिया काय?
आपण या ग्राम पंचायत सदस्याविरद्ध जिल्हाधिकारी यांचेकडे अनर्हता अर्ज दाखल करा .
महाराष्ट्र ग्राम पंचायत कायदा 1958
कलम 14 (1) (j3)

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पिक पाहणी ७/१२ वर लावुन घेण्यासाठी तलाठी जर अडचण देत असेल तर कोणाकडे दाद मागावी व रितसर पिकपाहणी लावुन घेण्यासाठी काय करावे.
उत्तर मिळावे.
तहसीलदार यांना अर्ज दया .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मूळ मालकाच्या समतिविना(मालक व कुळ नाते सिद्ध होत नाही पण इतर हक्कात सर्व साधारण कुळ म्हणून दोन शेतकऱ्यांची नोंद आहे ) साधारण 50 वर्षे दोन शेतकऱ्यांच्या ताब्यात जमीन असून,त्यांच्याकडे (पीक पाहणी सदरी नावे आहेत) कब्जा आहे व त्यापैकी एक मयत असून ते पीक पाहणी व इतर हक्कात वारस नोंद करू शकतात का?तसेच ते शेतकरी दिवाणी न्यायालयात adverse possession चा दावा दाखल करू शकतात का ? यासंबंधी माहिती मिळावी .
1. पीक पाहणी सदरी असलेले नाव हे , कसणारी व्यक्ती याने दुसऱ्याचे मालकीची जमीन , मालकाचे संमतीने कसल्याशिवाय लावले जात नाही .
2. पीक पाहणी सदरी असलेले नाव हे त्या ठराविक एका हंगाम पुरते असते . त्यास वारस लावता येत नाही
3. शेतकरी adverse Possession चा दावा दाखल करू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by saddam
04-09-2016
saddam@gmail.com

शासकीय जमिनीची नोंद कोणत्या गाव नमुन्यात असते
महााराजस्‍व अभियाना अंंतर्गत आता प्रत्‍येक तहसिल स्‍थरावर शासकिय जमीनी संदर्भात डेटा बँक तयार करण्‍ेा बाबत निर्देश आहेेत. व संबंंधीत माहीती ही त्‍या जिल्‍ह्याच्‍या संकेत स्‍थळावर सुध्‍दा असेल.

Reply by कामराज बसवंन्‍ना चौधरी | तलाठी

नमस्कार सर ,

आम्ही महाराष्ट् जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५५ अन्व्ये पोकळ नोंद केलेले फेरफार रद्ध करण्यासाठी तसेच त्यांची नावे सातबारातून रद्ध करण्यासाठी अपिलीय अर्ज तहसीलदार यांना करणार आहोत , त्यावर वरील वरील अधिनियम आणि कलम अर्जावर नमूद करावे का तसेच सदर फेरफार सुमारे 58 वर्षापूर्वीचे आहेत . तर अर्ज सोबत विलंब माफी चा अर्ज करावा लागतो का .तसेच विलंब माफी चा नमुना कसा असावा ,या वर थोडे मार्गदर्शन करावे
कलाम 155 खालील लेखन प्रमादचूक दुरुस्त करण्यासाठी , काळ मर्यादा नाही. त्यामुळे विलम्बमाफीचा अर्ज देण्याची गरज नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,

आमच्या सातबारा मध्ये 1980 वर्षी एक नाव पोकळ नोंद केले गेले , पण ज्या वेक्तीचे नाव नोंद केले त्यांच्या वडिलांचे नाव 30 वर्षांपूर्वी कायमचे निघून गेले आहे तसा मंजूर फेरफार आमच्याकडे आहे , या बद्दल आम्हाला कुठलीही नोटीस आली नाही , मला असे विचाराचे आहे कि जेव्हा एखादा नवीन फेरफार मजूर होण्यापूर्वी त्याची नोटीस मूळ कब्जेदार किंवा वहिवाटदार येत नाही का

सदरचा मंजूर फेरफार तलाठी आणि तहसीलदार कार्यालयाला दाखवला तर ते आम्हाला 50 वर्षे तुम्ही कुठे होतात असे तलाठी आणि तहसीलदार कार्यालाकडून विचारण्यात येत , या वर आम्ही काय करावे या वर मार्गदर्शन करावे हि विनंती
आपण 155 खाली लेखन प्रमाद दुरुस्त करण्याचा अर्ज दया. या अर्जाला काळ मर्यादा नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
सर मार्गदर्शन करने
सर एका ७/१२ च्या मालकी हक्कामधे " मसनवट सरकारी जमीन " अशी नोंद आहे .सर मुस्लिम समाज त्या जमीन मधे पुर्वी पासून दफनविधी करत आहे .सर अता त्या मुस्लीम समाजाने त्या ७/१२ " मसनवट सरकारी जमीन " एैवजी मुस्लिम कब्रस्तानची नोंद ७/१२ मालकी हक्कात करावी म्हणून तहसिल कार्यालयात अर्ज केला आहे .
सर मला तहसिलदार साहेबांनी पत्र दीले आहे की आपण नियमानुसार आवश्यक स्थानिक प्रक्रिया पुर्ण करून त्या ७/१२ च्या इतर अधिकारामधे " मुस्लिम कब्रस्तान " ची नोंद घेन्याची कार्यवाही करावी. असे पत्र दीले आहे.
सर या प्रकरणामधे नेमकं मी काय कार्यवाही करू या बाबत योग्य ते मार्गदर्शन करने ही नम्र विनंती ..
सरकारी मसणवता साठी जमीन प्रदान करण्यात आली आहे कि मूळ आकारबंद ला मसणवठा म्हणून नोंद आहे .
जिल्हाधिकारी यांचे आदेश आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सरकारी मसणवता साठी जमीन प्रदान करण्यात आली आहे कि मूळ आकारबंद ला मसणवठा म्हणून नोंद आहे .
जिल्हाधिकारी यांचे आदेश आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,नगरपरिषद हद्दीत(रहिवासी झोन) 07 आर क्षेत्राची सरकारी मोजणी करून ,तसेच ले-आऊट मंजूर करून रीतसर बांधकाम परवानगी घेतलेली आहे त्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी यांचा बिनशेती आदेश असल्याने त्यानुसार बांधकाम करून बिनशेती मोजणीही केली आहे.बांधकाम पूर्ण झाले आहे.परंतु शेजारील व्यक्तीने त्यावेळी कोणतीही हरकत न घेता आता भिंत बांधून अतिक्रमण केलेबाबत तक्रार केली आहे.व त्यानेही आता सरकारी मोजणी केली आहे.त्यामध्ये कोणताही बदल नाही.परंतु तो आता दबाव आणून तडजोड करून भिंत पाडा.असे म्हणत आहे.भिंत पाडल्यास बिनशेती आदेश रद्द होईल का?तसेच आम्हाला मिळालेली क प्रत रद्द होईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
बिनशेती आदेश रद्द होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by arjit
03-09-2016
arjit123@gmail.com

7/12 वरून पोकळ नावाची नोंद कमी होण्यासाठी कौर्ट चा हुकूमनामा तलाठी कडे दिल्यावर पोकळ नोंद कमी होण्यासाठी तलाठी व सर्कल कडून कोणती व कशाप्रकारे प्रोसेस केली जाते डीटेल मधे सांगा
कोर्टाचा हुकूमनामा असल्यास , मंडळ अधिकारी यांनी पोकळ नोंद रद्द करणे आवश्यक .
कोर्ट प्रक्रियेत ज्यांचे नावाची पोकळ नोंद आहे , त्यांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकलेले असते त्यामुळॆ पुन्हा त्यांना नोटीस देण्याचा प्रश्न उद्भवत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

धन्यवाद मागील उत्तर मार्गदर्शन केल्याबबात, सर मा .प्रातअधिकारी याच्याकडे अपील केल्यानंतर त्याची नोटीस हि किती दिवसांनी आम्हाला मिळते .व त्याचा कालवधी किती असतो.याचे मार्गदर्शन करावे .
अपील दाखल केल्या नंतर , नोटीस लगेच निघणे आवश्यक . नोटीस किती कालावधीची असावी या बाबत काही मर्यादा नाही . तथापि नोटीस कालावधी 7 ते 15 /30 दिवस असतो .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.49 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3