जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by भिमराव त्र्यंबक ढाकरे
15-11-2016
bhimraodhakare79@gmail.com
सर, माझ्या वडीलांच्या नाले 2 हेक्टर जमिन आहे, आणि आम्ही आदिवासी खातेदार आहोत, ती माझ्या नावे करण्यासाठी तलाठी रजिस्ट्री करण्यास सांगतात व दुय्यम निबंधक साहेब जिल्हाधिकारी यांची परवानगी आणण्यास सांगतात परंतु वडिलांची जातीचे व्हँलीडीटी नसल्यामुळे परवानगी देत नाहीत कारण वडील निरक्षर आहेत, वाटणी पत्रााद्वारे फेर करण्यासाठी परवानगी लागते का? कृपया मार्गदर्शन करावे
आदिवासी व्यक्तीचे जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासी व्यक्तीस करता येत नाही .
वडिलांचे हयातीत , आपले नावे जमीन करता येणार नाही .
आपले व वडिलांचे जातीची पडताळणी झाली असल्यास , जिल्हाधिकारी यांचे परवानगीने , जमिनीचे हस्तांतरण करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजित य पाटील
14-11-2016
abhijit_y_patil@yahoo.co.in
सर,
नमस्कार
तीन भावांच्या वडिलोपार्जित मालकीच्या दोन वेगवेगळ्या गावातील मिळकत 'अ' व मिळकत 'ब' होत्या. त्यांच्यात २००४ साली रजिस्टर वाटणीपत्र झाले. वाटणीपत्राच्या सुरवातीला त्यांच्या वडिलांच्या मालकी कब्जे वहिवाटीच्या मिळकती म्हणून 'अ' व 'ब' या दोन्ही मिळकतीचा उल्लेख करण्यात आला आहे.
वाटणीपत्राच्या मुख्य कलमामध्ये फक्त मिळकत 'अ' ची वाटणी करण्यात आली असा उल्लेख आहे व मिळकत 'अ' मधील प्रत्येकाच्या वाटणीचे क्षेत्राचा उल्लेख आहे. मुख्य कलमामध्ये मिळकत 'ब' चे वाटप झाले म्हणून कोणताही उल्लेख नाही. परंतु परिशिष्ट मध्ये वारस १ च्या वाटणीस मिळकत 'अ' मधील हिश्श्याबरोबर मिळकत 'ब' सुद्धा आल्याचा उल्लेख झाला आहे.
आता वारस 2 व 3 चे म्हणणे असे कि, वाटणीपात्राच्या मुख्य कलमामध्ये मिळकत 'ब' चे वाटप झाले म्हणून कोणताही उल्लेख नाही वा मिळकत 'ब ' वारस १ च्या वाटणीस आल्याचा कोणताही उल्लेख नाही. फक्त परिशिष्ट मध्ये मिळकत 'ब' चा उल्लेख आहे म्हणून मिळकत 'ब' चे वाटप झाले असे म्हणता येणार नाही. वाटपासाठी मुख्य कलमात उल्लेख असणे आवश्यक आहे. त्या मुले मिळकत 'ब' अजून सामायिक व अविभाजित आहे आणि म्हणूनच मिळकत 'अ' च्या वाटपाचा फेरफार लगेच केला मात्र मिळकत 'ब' चा फेरफार अजून झालेला नाही.
तर वारस १ चे म्हणणे असे कि, परिशिष्ट प्रमाणे मिळकत 'ब' माझे वाटणीस आलेली आहे. परिशिष्ट सुद्धा वाटणीपत्राचा भाग आहे. म्हणून वारस १ ने आता २०१६ साली त्याच्या फेरफार साठी अर्ज केला आहे. फेरफाराची नोटीसला वारस 2 व 3 यांनी हरकत घेतली आहे.
या प्रकरणामध्ये योग्य बाजू काय आहे? याबाबत मार्गदर्शन करावे हि विनंती.
धन्यवाद
वाटप पत्राचे मुख्य भागात , जमिनीचे वाटप सह धारकाच्या कश्याप्रकारे करण्यात आले आहे , त्याचा उल्लेख काण्यात आला आहे . प्रत्येकाचे वाट्याचे क्षेत्र किती , प्रत्यक्ष की=जमिनीचा कोणता भाग कोणाच्या वाट्यास आला आहे इत्यादी
परिशिष्ट मध्ये वाटप करण्यात आलेल्या जमीनीचा उल्लेख करण्यात येतो मात्र त्याचे वाटप कश्यपराकारे झाले आहे याचा उलेख नाही
त्यामुळे मुख भागात अ मिळकतीचा उल्लेख आहे त्याप्रमाणे वाटप झालेले आहे . ब मैळकतीचे वाटपाचा फेरफार मंजूर होणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महेश ढमढेरे
13-11-2016
maheshdhamdhere84@rediffmail.com
माझ्या वडीलांच्या आईला 1945 साली मिळालेली मुलकी पाटील ईनाम वर्ग 6ब ची जमीन 1952साली विक्री केली सदर खरेदी दाराने कुठल्याही समकक्ष अधीकारी यांची परवानगी घेतली नाही
हे खरेदी खत सरकारी नियमानुसार झाले असेल का ?
1952 नंतर आजीचे नाव कूळ आणी खंडा मधे येते पुढे मूलकी पाटिल पद रद्द झाले सरकारने रीग्रँड करायला सांगितली ती झाली नाही आनी 1975 नंतर सरकारी आकारी पङ झाली
आता आम्ही काही करु शकतोका ?
कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी आपले आजीने , हस्तांतरित केली आहे . मुलकी पोलीस पटेल ( पाटील ) नष्ट करण्याचा कायदा कलम ३ प्रमाणे , पटेल वतन जमीन नष्ट करण्यात आलेली आहे . त्यावेळी आपले आजीने परत मिल्ने करिता अर्ज करणे आवश्यक होते .
आजी वतनदार असताना , ती पुन्हा कुल कशी असू शकते ?
विलंब खूप झालेला आहे . त्यातच आपण आता authorised - holder होऊ शकत नाही . आता काही होऊ शकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by nanabhau madaku koli
13-11-2016
nanabhau3282@gmail.com
आजी गिताबाई गुमान कोळी याच्या दोन मुली
१) जिजाबाई मडकु कोळी मोठी
२लीलाबाई पंढरीनाथ कोळी लहान
आजी वारली ३०/५/२०१५ रोजी पण आजी जमीन १६० गुंठा आहे पण लीलाबाई जमीन देत नाही म्हणुन धुळे जिल्हा तालुका सिरपुर यथे कोर्ट कचेरी चालु आहे केस टाकायला १८ महीने झाले
Question by Goroba Pawar
13-11-2016
gorobap@gmail.com
३२ म चे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर १० वर्ष्याच्या आत उप विभागीय अधिकारी नि. स. प्र. ची नोंद शिथिल करू शकतात का?
Question by Goroba Pawar
13-11-2016
gorobap@gmail.com
कुळाची नसलेली एखाद्या जमिनीला एकत्रीकरणाच्या वेळी अनावधाने नि. स. प्र. चा लागलेला शेरा कमी करण्याबाबत तहसीलदार यांनी उप विभागीय अधिकारी यांचेकडे अहवाल सादर केलेला आहे. म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५५ अन्वये तो शेरा कमी करण्यासाठी उप विभागीय अधिकारी यांना वरिष्ठांची मान्यता घ्यावी लागेल कि ते स्वतः उक्त कलमाखाली आदेश देऊ शकतात
उपविभागीय अधिकारी यांना अधिकार नाही
एकत्रीकरण मधील चुका साठी उप संचालक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by योगेश अहिरे
12-11-2016
yogesh.ahire9290@gmail.com
नमस्कार सर
प्रश्न :- माझ्या आजोबांच्या नावाने नवीन अविभाज्य शर्तीची वर्ग 2 -वडिलोपार्जित शेतजमीन आहे 6 हेक्टर 60 आर, आजोबा हयात आहेत.
ती जमिन वडिलांच्या व काकांच्या नावाने 3-3 हेक्टर करायची आहे , आजोबांना 4 मुली असून त्यांची पण संमती आहे तरी नजराणा भरावा लागेल का? भरावा लागल्यास किती? कोणाची परवानगी घ्यावी लागेल का? जमिन धुळे जिल्ह्यातील आहे.
हो नजराणा भरावा लागेल .
बहिणांना हक्क सोड पत्र करावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by HANMANT PHADATARE
12-11-2016
hpphadatare123@gmail.com
Sir,
सन 1999 साली वाटप झाले आहे. वाटपाच्या फेरफार नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी यानी stamp पेपरवरील वाटपपत्र, हक्कसोडपत्र, व कागदपत्रे पाहुन संबधिताचे जाब जबाब घेहुन फेरफार नोंदी मंजूर केलेल्या आहेत. व तसा उल्लेखही फेरफारला आहे.
सदर वाटपाप्रमाणे सन 1999 सालीपासन माझ्या हिस्स्याच्या जमीनीवर माझा व भावाचा, त्याच्या हिस्स्याच्या जमिनीवर ताबा व मालकी आहे.
त्याच मालकी हक्काने भावाने सन 2003 त्याचे हिस्स्याची जमीन रजिस्टर दस्ताने विकली आहे व आता वाटप झाले नाही असा व 2000 साली झालेल्या नोंदी केवळ अर्जावरून झाल्या असल्याने बेकायदेशिर आहेत त्या रद्द करावयात याकरीता उपविभागीय अधिकारी याचेकडे अर्ज केला.
सदर प्रकरणात मा.उपविभागीय अधिकारी, मा. जिल्हाधिकारी व मा.अप्पर अायुक्त यानी वाटप रजिस्टर दस्ताशिवाय झाले असल्याचे कारणावरून माझ्या हिस्स्याच्या जमिनीसंबंधीचे फेरफार नोंदी रद्द करून भावाच्या व बहिणीच्या नावाची नोंद माझ्या हिस्स्याच्या जमिनीत केली आहे.
सदर अादेश देताना मा.उपविभागीय अधिकारी, मा. जिल्हाधिकारी व मा.अप्पर अायुक्त यानी शासन परीपत्रक क्रमांकः जमीन- 07/2014/प्र.क्र. 130 /ज-1
नुसार वाटणीपत्राची नोंदणी करणे सक्तीचे नाही याचा विचार केलेला नाही
या पूर्वी दिलेल्या उत्तराप्रमाणे एकत्रित जमिनीतील हिस्सा व त्या प्रमाणे क्षेत्र अथवा क्षेत्र विकले असल्यास हास्याचे प्रमाणात जमीन विक्री किंमत मिल्ने बाबत दावा दाखल करणे हितावह
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by रोहिदास सखाराम पाबळे
11-11-2016
rohidaspable@yahoo.in
१९६५ साली वडील वारल्यानंतर ४ भावांपैकी मोठया भावाचे नाव एकूम म्हणून ७/१२ वर दाखल झाले १९८९ साली ४ हि भावांनी सध्या कागदावर ४ भावांनी जमिनीचे वाटप केले त्यापैकी २ भावांनी आपल्या हिश्याच्या जमिनी एकूम असलेल्या भावाच्या नावाने विक्री केल्या व इतर ३ भावांनी त्यास संमती दिली २ भावाचा हिस्स्यास त्या जमिनी गेल्याचा उल्लेख विक्री दस्तामध्ये आहे परंतु एकूम हे नाव उरलेल्या २ भावाच्या ७/१२ वर तसेच राहिल्या मूळे त्याच्या वारसांनी एकूम चा फेरफार काढून त्याच्या वारस नोंदी करून घेतल्या तरी त्याची नावे काढण्यासाठी काय करावे लागेल वाटप पत्र हे रजिस्टर नाही ते सध्या कागदावर आहे परंतु वक्री दसतात वाटप केलेल्या त्याचा उल्लेख आहे
Question by प्रदीप बोरले
11-11-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,अ या व्यक्तीला बक्षीस पत्राने शेत जमीन प्राप्त झाली.अ ला अपत्य नाही.अ ला ३ पुतणे आहेत.त्या पैकी एका पुतण्याला अ ने हि शेतजमीन रजिस्टर बक्षीस पत्राने दिली.फेरफार होण्यापूर्वी अ हा मयत झाला.तलाठी ह्यांचेकडे बक्षीस पत्र व वारस असे २ अर्ज प्राप्त झाले.तलाठी ह्यांनी कोणत्या अर्जाप्रमाणे नोंद घ्यावी.कृपया मार्गदर्शन करावे.
Question by गणेश शिंदे
10-11-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,बांधकाम व्यावसायिकाने सोसायटीस रजिस्टर Convence Deed करून दिले आहे.त्याची नोंद गावदप्तरी घेतली असता नोंद घेता येत नाही या कारणास्तव नोंद रद्द केली आहे.तरी अशी नोंद गावदप्तरी घेता येईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
कोणत्या कारणामुळे नोंद घेता येत नाही याचे कारण दिले आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by anand salve
09-11-2016
salveanand@89gmail.com
नमस्कार सर , पि.आर बॉण्ड म्हणजे काय ?त्याला काही मुद्दत असते का ? एखादा आरोपी त्या नुसार सुटला आसेल तर त्याला पुन्हा कस्टडी होऊ शकते का ?त्याला जामीन लावावा लागेल का ?
Question by RAM PHADATARE
09-11-2016
ram.p.phadatare@gmail.com
सन १९९७ साली तोंडी वाटप झाले आहे. वाटपानतर सन १९९७ साली फेरफार नोंदी केलेल्या आहेत. नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी यानी stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी मुळ कागदपत्रे पाहुन संबधिताचे जाब जबाब घेहुन फेरफार नोंदी मंजूर केलेल्या आहेत. व तसा उल्हेखही फेरफारला आहे. व वाटपाप्रमाणे सन १९९७ सालीपासन माझ्या हिस्स्याच्या जमीनीवर माझा व भावाचा त्याच्या हिस्स्याच्या जमिनीवर ताबा व मालकी आहे.
त्याच मालकी हक्काने भावाने सन 2000 साली त्याचे हिस्स्याची जमीन रजिस्टर दस्ताने विकली आहे व आता वाटप झाले नाही, अन १९९७ साली केलेल्या नोंदी केवळ अर्ज व stamp पेपरवरून झाल्या असल्याने बेकायदेशिर असल्यामुळे
रद्द करणेकरीता उपविभागीय अधिकारी याचेकडे अर्ज केला.
सदर प्रकरणात उपविभागीय अधिकारी यानी वाटप रजिस्टर दस्ताशिवाय झाले
असल्याचे कारणावरून माझ्या हिस्स्याच्या जमिनीसंबंधीचे फेरफार नोंदी रद्द करून भावाच्या बहिणीच्या नावाची नोंद माझ्या हिस्स्याच्या जमिनीत केली आहे.
सन १९९७ साली फेरफार नोंदी करताना तलाठी/मंडळ अधिकारी याना stamp पेपरवरील हक्कसोडपत्र, वाटपसंबंधी कागदपत्रे असलेली आरटीएस Faayil कागदपत्रे जतन करण्याचा कालावधी संपल्याने नष्ट केली आहेत त्यामुळे माझ्याकडे पुरावा नाहीत.
आपले हिस्स्यांचे जमिनीस आपले बहिणीचे नाव लावणे बाबत उपविभागीय अधिकारी यांनी निर्णय दिला आहे . भावाने त्याचे हिस्स्याची जमीन विकली आहे . त्यामुळे एकत्रित जमिनीत आपले सर्वांचा हिस्सा किती आहे /होता हे निश्चित करणे आवश्यक आहे . मात्र एकत्रित जमिनीतील काही हिस्सा भावाने विकला आहे . तो हिस्सा आता वाटप करण्याचे दृष्टीने विचार करता येणार नाही.
आपले एकत्रित क्षेत्र किती आहे ? आपले वडिलांना वारस क्ती आहेत ? हि माहिती द्यावी .
हिस्से निश्चित करण्यासाठी , हि माहिती आवश्यक आहे
आपले भावाने जमीन विकली आहे ते आता परत मिळणार नाही . जमीन विक्रीतून प्राप्त पैसे , हिस्स्याप्रमाणे अन्य वारसांना मिळण्यासाठी व उर्वरित जमीनीचे वाटप करण्यासाठी दिवाणी दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष शितोळेदेशमुख
09-11-2016
sshitoledeshmukh6@gmail.com
जुना फेरफार फाळणी 12 आलेवरून नोंद केली असे .त्यामध्ये क्षेत्र कमी झाले आहे पूर्वी 4 एकर क्षेत्र होते आता 3 एकर झाले आहे काय करावे लागेल
Question by सचिन निकम
09-11-2016
sachin.pnikam@gmail.com
नमस्कार आम्ही साधार २० ते २५ वर्षा पूर्वी एक ०२.०२ हे.गट नं.४५५/१ हि जमीन घेतली होती. व आम्हाला आज तिची विक्री करायची आहे.परंतु त्या मध्ये एक अडचण अशी आली आहे कि त्या जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये पुनर्वसनासाठी राखीव ०३.७० हे(गट नं.४५५/१ व ४५५/२ ) असा फेर पडलेला आहे. व नंतर २००४ मध्ये पुनर्वसनासाठी राखीव ०३.७० हे(गट नं.४५५/१ व ४५५/२ ) बोजा कमी असा एक फेर पडलेला आहे.
माझा प्रश्न असा आहे कि मला आता ती जमीन विक्री करावयाची आहे. तरी त्या मध्ये काही अडचण येईल का किंवा त्या संबधी काही GR आहे का.
धन्यवाद
महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा १९९९ चे कलम १२ (२) खाली मा विभागीय आयुक्त महसूल यांची परवानगी घ्यावी
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मनोज भोसेकर
07-11-2016
manoj.bhosekar@gmail.com
जमाबंदी वेळेस नकाशावर असणारा पांदण रस्ता पुनर्मोजनिच्या नकाशा मधे दाखवलेला नाही.सदर रस्ता सध्या अस्तित्वात आहे. तरी आता तो रस्ता पुन्हा नकाश्यावर घेण्यासाठी काय करावे लागेल?
जमाबंदी पासून रास्ता होता हे आपणास कशे माहित . जमाबंदी १९३० चे आसपास झालेली आहे .
रास्ता गाव नकाशावर घेणे अश्यक्य
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जगदीश पटेल
07-11-2016
jagdish19.com@gmail.com
मा. श्री. किरण पाणबुडे सर,
खालील मुद्द्यावर मला मार्गदर्शन हवे आहे.
२००५ साली खरेदीखत क्र.२८४४ आधारे तलाठी यांच्या कडे फेरफार नोंद करण्यात आली. क्षेत्र शिल्लक नसल्या मुले आम्ही त्या पोकालीस्त फेरफारीस आक्षेप घेतला. प्रकरण प्रथम तहसील मध्ये चालले,तहसीलदार साहेबांनी कोर्टाचा निकाल येई पर्यंत प्रकरणास स्थगिती दिली. त्या नाराजी ने आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपील केली.अपील मंजूर करण्यात आली. फेरेफार नामंजूर करण्यात आल.
१)२०१४ साली पुन्हा त्याच २८४४ खरेदिखता आधारे नव्याने फेरफार नोंदविण्यात आला, हे पुन्हा त्याच खरेदीखताची नोंद होऊ शकते का?
२) तलाठी, मंडळ अधिकारी , तहसीलदार यांनी कोणीच हितसाबंधीतास नोटीस बजावली नाहि. आणि नोंद ७/१२ उताऱ्या वर घेण्यात आली.
३)तलाठी यांनी दि. १/९/२०१४ रोजी त्यांची नोंद ७/१२ उताऱ्या वर गेतली. परंतु मंडलाधिकारी यांनी फेरफार नोंद ६/९/२०१४ रोजी केली तर ५ दिवसा आधी ७/१२ उताऱ्या वर नाव घेण्यात येऊ शकते का?
४)दि. १/९/२०१४ रोजी नाव असलेल्या उताऱ्या आधारे तो प्लॉट दुसऱ्या व्यक्ती विकण्यात येतो, परंतु फेरफार मजूर ५ दिवसा नंतर होत आहे, तर टी खरेदी आणि ७/१२ वैध आहे का?
मुदतीत उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तक्रार करण्यात आली आहे,परंतु नामंजूर जालेला फेरफार आणि हे हेतुपूर्वकभर,भ्रष्ट मार्गाने करण्यात आलेल्या फेरफार नोंदी ह्याचा अध्याप काहीच निकाल लागत नाही.
कोणा कडे न्याय मागवा?
नवीन सुधारणे नुसार अपील ६ महिन्याच्या आत निर्णयीर करणे महसूल अधिकारी यांच्यावर बंधन कारक आहे .
आपण झालेले विल्माब बाबत जिल्हाधिकारी यांना अवगत करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र गो पाटील अलिबाग रायगड
06-11-2016
ngpatil@rcfltd.com
माझ्या आजीच्या आईची शेतजमीन आहे शेतजमीन ताब्यात आहे आजी 1981 ला वारली तर तिची आईच 1990 निधन आजपावेतो वारस नोंद झालेली नाही आता तलाठी नोंद करून घेत नाही आता आम्ही वारसा नोंदीसाठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे .वारसा हक्काचा फॉर्म आहे काय ? असल्यास तो कोठे सादर करावा .आपला आभारी
तलाठी यांनी नोंद करणे आवश्यक . कदाचित वारस नोंद खूप उशिरा करण्यात असल्याने त्यांनी , वारस दाखला मागितला असेल .
मला गाव व तहसील सांगा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by नरेंद्र गो पाटील अलिबाग रायगड
06-11-2016
ngpatil@rcfltd.com
आमची गावठाणात जमीन आहे 1983 पर्यंत गावठाण मोजणी झालेली नव्हती 1983 ला चुलत्यांचे आमचे एकत्रित सिटी सर्वे नंबर दिला आहे .आता आम्हाला स्वतंत्र हिस्सा कररयाचा आहे परंतु चुलते मोजणीसाठी सही करीत नाही माझे घर पडावयास आले आहे .आम्ही आता काय करू शकतो .कृपया मार्गदर्शन करणे
आपण न्यायालयात आपला हिस्सा निश्चित करून मिळण्यासाठी दावा दाखल करा . सर्व प्रश्न आपोआप सूटतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमितकुमार शिर्के
06-11-2016
amitkumar.shirke@gmail.com
नमस्कार सर
माझ्या आईच्या नावे 2 एकर क्षेत्र आहे.
लेखी 7/12 हा 2 एकर निघतो. पण सध्या ऑनलाईन 7/12 उतारा तलाठी कार्यालयाने देणे चालू केले आहे.
आणि आमचा उतारा हा ऑनलाईन 1 एकरच निघतो.
तलाठी यांचेकडे याबाबत विचारणा केली असता ते दखल घेत नाहीत.
म्हणून तहसीलदार यांचेकडे तक्रार अर्ज केला असता त्यांनी असे सांगितले आहे की, आपण म. ज.म. अधिनियम कलम 155 नुसार दुरुस्ती बाबत अर्ज सादर करा.
परंतु आमचे सर्व कागदपत्रे बरोबर आहेत व आम्ही 1 एकर क्षेत्राची विक्री वगैरे केलेली नाही.
तरी सध्या आम्ही काय करावे.
Question by प्रदीप बोरले
05-11-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,महा ज मह.अधिनियम 1966 चे कलम 85 खाली शेतजमिनीचे वाटप करताना सरस निरस जमीन ठरविण्याचे अधिकार कोणास आहे.कृपया शासनाचे निर्णय /परिपत्रक असल्यास माहिती द्यावी.
Question by amoldhamke
05-11-2016
amoldhamke67@gmail.com
क्ष इसम शासकीय बाकी न भरल्यामुळे सदर जमिनीचा लिलाव केला असता लिलाव कोणी न घेतल्यामुळे नॉमिनल बीड वर शासनाने जमीन खरेदी केली त्यानुसार कब्जेदार सादरी सरकार नाव दाखल केले व जमीन मालकाचे नाव इतर अधिकारात दाखल केले आज रोजी जमीन मालकाचे नाव कब्जेदार सादरी दाखल होण्याची विनंती करीत आहे सरकार नाव कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून कमी केली जात व त्याची काय कार्यपद्धती आहे याबाबत कृपया मार्गदर्शन होण्यास विनंती आहे
शासनाने जमीन जप्त केली असल्यास , तीन वर्षात मूळ जमीन मालक शासकीय बाकी व जमीन आकाराचे तिप्पट रक्कम भरून जमीन परत करणे बाबत किल्ह्याधिकारी यांचेकडे अर्ज करू शकतो . ( कलम ७२ म. ज.म. अ. १९६६ )
अन्यथा ३ वर्षे होऊन गेले असल्यास खालील रक्कम भरून थकबाकीदार जमीन नावावर करू शकतो ( कलम २२०)
१. जमीन थकबाकी रक्कम
२.थकबाकीची रक्कमेच्या १/४ दंड
३.जमिनीचा शासनाकडे जमीन असलेल्या कालावधीचा आकार
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
04-11-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ने 100 हेक्टर जमीन खाजगी शेतकऱ्याकडून खरेदी केली.सदर शेतजमीन वहिवाट करण्यासाठी पांधणरस्ते होते.ती जमीन शिल्लक आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ला त्या शिल्लक जमिनीचा कायदेशीर ताबा घेता येईल काय ? किंवा शासनाकडे त्या शिल्लक जमिनीचा मोबदला भरून जमिनीची मागणी करता येईल काय ? कृपया मार्गदर्शन करावे.याबाबत जी आर असल्यास सांगावे.
पांधण रस्ते जमीन विल्लेवाट नियम अंतर्गत शासनाकडे मागणी करता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप बोरले
04-11-2016
pradip.borle6226@gmail.com
महोदय,झुडूपी जंगलाचे निर्वनीकरण म्हणजे काय ? कलम 4 ची अधिसूचना बाबत माहिती द्यावी.
निर्वनीकरण याचा dictionary अर्थ -to cut down and clear away the trees or forests from.
निर्वनीकरण म्हणजे जमिनीचा वन हा दर्जा बदलणे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमितकुमार शिर्के
04-11-2016
amitkumar.shirke@gmail.com
मा. सर
नमस्कार
माझे आजोबा व त्यांचे बंधु यांचे नावे 1970 ला वाटपद्वारे 15-15 एकर एवढी शेतजमीन त्यांचे वडिलांकडून आली आहे.
आज आम्ही आमची ताब्यातील जमीन मोजली असता ती फक्त 10 एकर भरत आहे व सात-बारा वरती तर 15 एकराचा उल्लेख आहे.
म्हणून आम्ही चुलत आजोबा यांच्या ताब्यातील जमीन मोजली असता त्यांची 20 एकर भरत आहे व सात-बारा वर तर 15 एकर आहे.
यावरुन मला असे समजले की, आमची 5 एकर एवढी जमीन चुलत आजोबांचं वहिवाटत आहेत.
मी याबाबत माझे आजोबा, वडील तसेच चुलते यांच्याशी बोललो असता त्यांना याबाबत काहीच माहित नाही, ते म्हणतात की, आपल्या ताब्यातील जमीन हि 15 एकर असेल कारण त्यांनी आजपर्यंत कधीच मोजणी केली नाही.
माझे आजोबा, वडील, चुलते हे सर्व अशिक्षित आहेत, म्हणूनच त्यांनी 1970 पासून आपली जमीन 10 एकर आहे की 15 एकर हे सुद्धा समजले नाही.
मी आमच्या 5 एकर जमिनीबाबत चुलत आजोबा व त्यांची मुले यांच्याशी बोललो असता, त्यांनी डायरेक्ट आमच्याशी वाद घालण्यास चालू केला आहे व आमची जमीन आम्हांला देणारच नाहीत असे सांगत आहेत. व माझ्या आजोबांच्या नावावरील 5 एकर जमीन त्यांचे नावावर करण्यासाठी दमदाटी करत आहेत.
आज मी व माझे चुलते आम्ही सर्व एकत्रच राहतो व त्यामुळे आमच्या जमिनीचे आम्ही वाटप केले नाही, व ती अजून आजोबांच्याच नावे आहे, सर्व जमीन एकाच गट नम्बरमधील असल्याने आम्हांस ती 10 एकर आहे कि 15 हे सुद्धा समजले नाही, तरी,...
1. 1970 ला वाटप झाले, तेव्हापासून आजपर्यंत 45 वर्ष झाले, चुलत आजोबा आमची जमीन वहिवाटत आहेत, तरी तिचा ताबा आम्हांस मिळू शकतो का ?
2. न्यायालयात आमची केस टिकेल का ?
3. आम्ही दावा काय म्हणून दाखल करावा.
4. चुलत आजोबा व त्यांची मुले आमच्या नावावरील 5 एकर जमीन त्यांचे नावावर करण्यासाठी दमदाटी करत आहेत, व त्रास देत आहेत तरी आम्ही कोणती कायदेशीर मदत घ्यावी.
5. आज 45 वर्षांनंतर आम्हांस माहित झाले आमची जमीन किती आहे ते, व जरी न्यायालयात गेलो तरी आमची बाजु कमकुवत आहे, म्हणून विलंब माफी बाबत न्यायालयात आम्ही काय म्हणणे मांडावे.
6. माझे आजोबा, वडील व चुलते हे सर्व अशिक्षित असल्याने न्यायालयात मी माझे नावे केस दाखल केली तर चालेल का ?
7. हा दावा वकील न देता मी स्वतः चालवू शकतो का, कारण असे झाले तर न्यायालयात आमचे म्हणणे आम्हांला व्यवस्थित सांगता येईल.
8. म.ज.म. अधिनियमाच्या कोणकोणत्या कलमानुसार मला दावा दाखल करता येईल.
१. आपली बाजू कमकुवत आहे . मात्र म्हणून ५ एकर जमीन सोडून देणे योग्य नाही . आपण आपले जागेत अतिक्रमण केले आहे व ती जागा वहिवाट करण्यास चुलत आजोबा यांना मनाई हुकूम करणे बाबत दावा दाखल करा .
२.प्रयत्न करण्यास हरकत नाही
३.१ मध्ये नमूद केल्या प्रमाणे The Specific Relief Act खाली दावा दाखल करा
४.या बाबत आपण पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे विरुद्ध तक्रार दाखल करा . हे आपणास दिवाणी दाव्यास हि उपयुक्त ठरेल.
५.न्यायालयास convince करणे आवश्यक . Limitation bars remedy but not right हे लक्षात ठेवा .
६.जमीन सध्या ज्यांचे नावावर दाखल आहे त्यांनी दावा दाखल करणे आवश्यक
७. होय . मात्र आपण विधी पदवीधर असाल तर बिलकुल हरकत नाही . मात्र अश्या दाव्यात वकील असणे हितावह ( आपले आर्थिक कुवती प्रमाणे निर्णय घ्यावा )
. २ मध्ये नमूद केले आहे . म.ज .म.अ १९६६ चे कलाम १३५ हद्दी वाद बाबत आहे . मात्र त्याचा किती उपयोग होईल ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
