जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महोदय,
श्याम या शेतकऱ्याचे शेतामधून जाण्यासाठी राम या शेतकऱ्यास नायब तहसीलदार ह्यांचे कोर्टातून रस्त्याचा आदेश पारित करण्यात आला. श्याम ह्यांचे 7/12 मध्ये रस्त्याचे आदेशाची नोंद घेता येईल काय ?कृपया मार्गदर्शन करावे.
कलाम 148 मध्ये अधिकार अभिलेख म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे . या मध्ये ज्या बाबी नमूद आहेत त्याची 7/12 सादरी नोंद करता येते .
रस्त्याची नोंद करता येणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी दिनांक २५/०५/२०१६ रोजी जमिनीवरील बोजा कमी करण्यासंदर्भात बँकेचे पत्र तालाठीकडे दिले आहे पण अद्याप त्यांनी बोजा कमी केला नाही वारंवार विचारणा केली तर online च्या नावाखाली कारणे सांगतात त्यासंदर्भात मार्गदर्शन करावे
कारण बरोबर आहे .
मात्र इतके दिवस प्रलंबित राहण्याचे कारण नाही . तहसीलदार यांचे निदर्शनास नि बाब आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. सर
माझ्या आईच्या नावे जमीन असून, तिला गावातील विकास सेवा सोसायटीचे सभासदत्व मिळवायचे आहे. तरी,
1. अर्ज कोठे सादर करावा.
2. सभासद होण्यासाठी किती फी द्यावी लागते.
3. कागदपत्रे कोणकोणती द्यावी लागतात.
4. कागदपत्रे दिल्यानंतर किती दिवसात सभासद होता येते.
5. सभासद होण्यासाठी फी आवश्यक नसेल परंतु सदर अधिकारी फी मागत असतील तर कोठे तक्रार करावी.
आदरणीय सर,आम्ही aminitis प्लॉटची विक्री करू शकतो का?किंवा कसे? कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
aminity space विकता येत नाही . त्यावर सर्वांची मालकी असते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
एका व्यक्तीने दि 01.01.2016 रोजी शेतजमीन खरेदी केली.परंतु फेरफार केला नाही त्यामुळे 7/12 आज त्याचे नावावर नाही.आज त्या व्यक्तीला जमीनधारक म्हणता येईल काय ? कोणत्या कलमानुसार.कृपया मार्गदर्शन करावे.
होय
खरेदी खत हे title Deed आहे.
7/12 वरील नाव केवळ , जमीन महसूल गोळा करण्यासाठी/देण्यासाठी जबाबदार कोण या साठी आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार
माझा प्रश्न असा आहे कि कमी जास्त पत्रक केव्हा केले जाते त्या साठी कोणत्या कायद्याचा अवलंब केला जातो कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
जमिनीचा आकार /क्षेत्र जर विभागणीमुळॆ बदलणे आवश्यक असल्यास , मोजणी करून आकारफोड पत्रक केले जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदिवासी व्यक्तीने बिगर आदिवासी व्यक्तीकडून भोगवटादार वर्ग 1 ची जमीन खरेदी केलेली असल्यास सदर जमिनीच्या 7/12 सदरी "आदिवासी" शिक्का मारला जातो का? असल्यास शासन निर्णय किंवा परिपत्रक आहे का?
आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस खरेदी करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक आहे . परवानगी मिळाल्यावर , जमीन बिगर आदिवासी व्यक्तीचे नावावर 7/12 झाल्यावर , इतर हक्कातील"आदिवासी" हा शेरा काढून टाकला जातो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

दिवाणी न्यालयाने नियमित दिवाणी दाव्यात कोणतेही अंतरिम आदेश पारित न करता कोर्टाने 1.Matter was refered to mediator.Read report of Judge mediator. 2.Plaintiff and defendants No.1 and 2 are present alongwith their advocates.they admit the terms of compromise pursis [Exh. 44] ane their singnatures and thumb impress 3.The suit is for partition. The suit against defendants No.3a and 4 has already been withdrawn. the compromise is Lawful. I am satified that the parties are compromising the suit voluntarily. 4. the compromise is read and recorded. 5.Order below [Exh. 1]is passed प्रकरणी तहसील स्तरावर कोणती कार्यवाही अपेक्षित आहे
दावा वाटप संबंदातील आहे . तडजोड पुरशीस प्रमाणे , जमिनीची मोजणी करून , आकारफोड पत्रक तयार करणे आवश्यक . आकारफोड पत्रकानुसार 7/12 , व त्यास सह धारकांची हिस्स्यास नवे लावणे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by anand salve
21-09-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर , माझ्या भावाने कुठल्या कागद पत्राचा आधारे भारत गॅस conection घेतले होते /आहे हे मी भारत गॅस agency कडून माहितीच्या अधिकाराने मागू शकतो का ?
BPCL हे माहिती अधिकारासाठी सार्वजनिक प्राधिकरण आहे. मात्र त्रितिय पक्षी माहिती आपण मागत आहेत. आपण मागत असलेल्या माहितीमुळे कोणते सार्वजनिक हित सध्या केले जाईल कि ज्यामुळे , आपल्या भावाच्या right to privacy वर गदा/अतिक्रमण झालेले चालेल . हि बाब आपणास जण माहिती अधिकारी या पुढे सिद्ध करावी लागेल .
माझ्या वैयक्तिक मते माहिती देता येणार नाही.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by ANAND
20-09-2016
anandraodeokar3589@gmail.com

swatachya shetat kelelya nalyamule itaranche nuksan hot asel tar samndhitavar karvai sathi ya babtit provision kay ahe....
नैसर्गिकपणे वाहणारा पाण्याचा प्रवाह नाल्यामुळे अडवला जाऊन नुकसान होत असेल तर तो अडथळा मामलेदार अधिनियम नुसार दूर करता येईल.त्यासाठी नजीकच्या तहसील कार्यालयात संपर्क करावा.

Reply by मगर विनायक सुधीर | नायब तहसीलदार

एखादा कोतवाल कर्मचा-याने दप्तरात गैरव्यवहार केला व तसेच गेले दोन वर्षे सतत गैरहजर असल्यास त्यास थेट निलंबित करून खात्यांतर्गत चौकशी करून कोतवाल सेवेतून बडतर्फ करता येते का ?
शासन निर्णयानुसार आदिवासी उपयोजन क्षेत्रात कार्यरत असणा-या सर्व अधिकारी / कर्मचा-यांना मूळ पदाच्या नजिकची पदोन्नती वेतनश्रेणीचा (एकस्तर वेतनश्रेणीचा) लाभ अनुज्ञेय करण्यात येतो. परंतु, काही आदिवासी भागातील कर्मचा-यांच्या शहरी भागातील कार्यालयांत सेवा वर्ग करण्यांत येतात. असे कर्मचारी शहरी भागात प्रत्यक्ष काम करून मूळ पदाच्या नजिकच्या पदोन्नती वेतनश्रेणी (एकस्तर वेतनश्रेणी) वेतन घेतात. तरी, अश्या कर्मचा-यांना सदर वेतनश्रेणी अनुज्ञेय आहे किंवा नाही याबाबत मार्गदर्शन मिळावे, ही विनंती.
सेवा वर्ग करणे , हे महाराष्ट्र नागरी सेवा नियम अथवा बदल्यांचा कायदा या मध्ये अनुज्ञेय बाब नाही . असा प्रकार बंद झाला पाहिजे असे शासनाचे धोरण आहे .
आदिवासी उपयोजना क्षेत्रात , सुविधा कमी असल्याने , नजीकच्या वरची पद्दोनात्ती श्रेणीचा लाभ दिला जातो . मात्र जर कर्मचारी / अधिकारी प्रत्यक्षात शहरी भागात काम करत असेल तर , केवळ तांत्रिक द्रिष्टया तो आदिवासी भागात काम करतो म्हणून असा लाभ दिला जाऊ नये .
अशी बाब आदिवासी आयुक्त यांचे निदर्शनास आणून दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मी कोतवाल या पदावर कार्यरत आहे.मी दररोज तहसील मध्ये येतो. मला सज्जा दिलेला नाही.जुना एक शासन निर्णय मी पहिला असता या मध्ये प्रवास भत्त्याची कोतवाल यांना तरतूद आहे.मी वरिष्ठांना विचालले असता मला सांगतात सज्जा ते तहसीलला येण्यासाठी प्रवास भत्ता मंजूर आहे.तू सज्ज्याहून तहसील ला येत नाही.असे म्हणतात.
आपणास साज देणे बाबत , तहसीलदार यांना विंनती करा .
मात्र सध्या स्थितीत आपण प्रवास करत नसाल तर , आपणास प्रवास भत्ता अनुज्ञेय होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

घराची कच्ची सौदापवती करावयाची असल्यास कशी करावी? त्यात मुदत किती असावी.
कच्ची सौदा पावती हि व्याव्हारिक संकल्पना आहे . कायदेशीर भाषेत आपण यास Agreement to sale म्हणता येईल . याची मुदत आपले व्यापाराचे स्वरूप, जमीन खरेदी करण्यासाठी , परवानगीची आवश्यकता लागत असल्यास त्यासाठीचा कालावधी या वर अवलंबून आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Raju Gaikwad
18-09-2016
Rajug2917@gmail. com

32ग म्हणजे काय ?
32 ग हे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कायदा 1948 क्सचे एक कलाम आहे . या कलमातील तरतुदी नुसार , कुळाचे नवे जमिनीची विक्री किंमत निश्चित केली जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
पोलीस पाटील या पदासाठी खुल्या प्रवर्गातील जागा आहे.परीक्षा फी 300/- आहे.मागासवर्गीय उमेदवारासाठी फी 150/-आहे.एस टी प्रवर्गातील उमेदवारास अर्ज भरावयाचे असल्यास परीक्षा फी किती भरावी लागेल.कृपया मार्गदर्शन करावे.
महोदय,
महाराष्ट्र ग्राम पोलीस (सेवा,भरती,वेतन,भत्ते,आणि इतर सेवाशर्ती )आदेश 1968 ह्या बाबत कृपया माहिती द्यावी.किंवा हि प्रत कोठे उपलब्ध होईल..
मा. सर
माझा प्रश्न महसूल विभागाविषयी नाही तरी आपण सल्ला द्यावा हि विंनती.

माझा चुलत भाऊ महेंद्र नवनाथ शिर्के याचा अपघात झाला होता, आम्ही त्यास रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे दाखल केले होते, महेंद्र याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- एवढे असल्यामुळे आम्ही हॉस्पिटल कडे मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी गरीब रुग्णांसाठी सुरु केलेल्या योजनेमधून मोफत उपचाराची मागणी केली होती, परंतु हॉस्पिटलने मोफत उपचार न देता आमच्याकडून रक्कम भरून घेतली, या कारणामुळे आम्ही मा. अध्यक्ष रुग्णालय देखरेख समिती तथा धर्मादाय सह आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, व सदर तक्रारींमध्ये धर्मादाय आयुक्तांनी आमची रक्कम परत करण्याबाबत हॉस्पिटलला आदेश दिले आहेत,
पण हॉस्पिटल 3 महिने झाले तरी आमची रक्कम परत देण्यास तयार नाही म्हणून धर्मादाय आयुक्तांनी सदर केसच्या तारखेदिवशी हॉस्पिटलला देखरेख समितीसमोर रकमेचा चेक घेऊन बोलाविले होते पण तरीही ते चेक घेऊन आले नाहीत व आमची रक्कम देण्यास नकार दिला आणि देखरेख समिती सुद्धा हॉस्पिटल वरती काहीच कारवाई करत नाही.व या कारणामुळे महेंद्र व त्याच्या आईवडिलांनी दि. 17 ते 20 सप्टेंबर या कालावधीत केव्हाही मंत्रालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
1. तरी आपण योग्य सल्ला द्यावा व सहकार्य करावे.
2. आम्हाला सदर आदेशाप्रमाणे पैसे मिळावेत यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेता येईल का
3. येत असेल तर कशी

Question by anand salve
15-09-2016
salveanand@89gmail.com

नमस्कार सर , गावी आमचे घर आहे 8 अ ला ग्रामपंचायत सदरी आईचे नाव आहे ते घर मला माझ्या नावावर करायचे आहे तर मला काय करावे लागेल आम्ही तीन भाऊ आहोत आईचा मृत्यू झाला आहे आमचे गाव सिटी सर्वे ला येते ह्या प्रोसिसीर ला किती वेळ लागेल .
आई नंतर तीन भाऊ वारस आहेत . घराला तिघांची नावे लागणे आवश्यक .
ग्रामसेवक यांचेकडे आईच्या मृत्यूचा दाखल द्या . पुढील कार्यवाही , ग्रामसेवक यांचेकडून 15 दिवसात होणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एखादी व्यक्ती मयत झाल्यावर वारसाची नोंद 7/12 वर न करता त्याचे रजिस्टर हक्क सोड पात्र करता येते का
वारस नोंद प्रथम 6 क म्हणजे वारस रजिस्टरला होणे आवश्यक . नंतर हक्क सोड पत्र करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by KP
14-09-2016
krrishnakant@gmail.com

नमस्कार,

तीन कुटुंबातील वडिलोपार्जित सामायिक जमिनीचे खाते वाटप किंवा तीन भाग झालेले नाहीत तसेच प्रत्येकाचे सात बारा वेगवेगळे आहेत. तसेच तीन कुटुंबातील काही चुलते काका मुंबईत आहेत तर काहींचे मयत झालेले आहे . प्रत्येकाचे चुलते काकांच्या मुलांची वेगवेगळी मते असल्यामुळे खातेवाटपाचा प्रश्न किंवा तीन भाग करण्याचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून रेंगाळत राहिला आहे आणि तो प्रश्न सुटण्याची शक्यता दिसत नाही .

1. चुलत भावाने स्वतःची आर्थिक स्तिथी चांगली असतानाही कुटुंबाला विश्वासात ना घेता त्याच जमिनीवर त्याने स्वतःच्या आणि बायकोसायही नवे सोसायटी कडून कर्ज काढले आहे आणि सात बारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा दाखवत आहे तसेच कुटुंब प्रमुख म्हणून खात्यावर सर्वात मोठे चुलते काका जे मयत झाले आहेत त्यांच्या मुलाचे नाव लावायचे सोडून स्वतःच्या भावाचे नाव लावलेले आहे . या प्रकरणाचा जमिनीचे वाटप करताना किंवा तीन भाग करताना काही अडचण येऊ शकते का ??

2. वडिलोपार्जित सामायिक जमिनीची रीतसर तीन भागात खाते वाटप किंवा तीन भाग कारण्यासाठी i कोणते प्रश्न मार्ग लावावे लागतील जेणेकरून खाते वाटप सुरळीत होईल ?

3. तसेच कमीत कमी किती गुंठ्याची मोजणी करता येईल आणि तीन कुटुंबाचे स्वतंत्र सात बारा करता येतील का ?

4. आता आम्ही एकाच घरात वादविडाद नकोत म्हणून खरेदी खताने दुसऱ्याची जमीन विकत घेऊन नवीन घर बांधले आहे . वडिलोपार्जित सामायिक जमिनीचा काही भाग आम्ही नवीन खरेदी खताने विकत घेतलेल्या जमिनीशी लागून आहे आणि वर उल्लेख केलैपाप्रमाणे त्या जमिनीवर म्हणजेच सात बारावर कर्जाचा बोजा दाखवत आहे . आमची अशी उच्च आहे कि त्या सामायिक जमिनीचा काही भाग आपणास मिळावा कारण ती आम्ही खरेदी खताने विकत घेतलेल्या जमिनीस लागून आहे पण माझा एका चुलत भावाचे जयनाई कर्ज घेतले आहे त्याचे असे म्हणणे आहे की ती जमीन तो आणि त्याचे कुटुंब वर्षानु वर्षे कंसात असल्यामुळे आणि त्या जमिनीसाठी काही खर्च झाल्यामुळे ती जमीन आम्हाला देण्यास त्यांचा विरोध आहे .

कृपया वरील विषय समजून आम्हा कुटुंबाला lagatchya जमिनीचा काही भाग कसा मिळवता येईल याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.
आपण आपले उत्तरात जमीन सामायिक आहे असे म्हणता मात्र त्याच वेळी , आपण ती वेगवेगळ्या 7/12 सदरी असल्याचेही नमूद करता .
आपणस या बाबत जमिनीचे हिस्से निश्चित करून , प्रत्येकाचे क्षेत्र वाटप करून , ताब्यात डेबेबाबत हुकूम करण्या करीत , दिवाणी न्यायायालयात दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री. किरण पाणबुडे सर,
श्री. नरेंद्र संजय कुंडेटकर सर,
नमस्कार सर..
आपण मी विचारलेल्या सर्व प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद..
जनपीठ च्या माध्यमातून खरच नागरिकांना उत्तम मार्गदर्शन मिळत आहे.
माननीय सर नमस्कार ,
मी महसूल विभागात 2010 पर्यंत कार्यरत होते व सद्य सेवानिवृत्त झालेलो आहे. सलग तीन वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे . तसेच सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाल्यास दोन आगाऊ वेतनवाढ देण्याचा नियम आहे. मला सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवाल अतिउत्कृष्ट मिळाले असताना सुद्धा एकच आगाऊ वेतनवाढ मंजूर केली. न्यायाधिकरणाकडे अपील करण्याचा अवधी आहे का. यावर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
न्यायाधिकरणाकडे जाण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांना भेटून आपली व्यथा मांडा.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार.......... हंगामी पिक शेती कशाच्या आधारे ठरवायची. पिकांना विहीर व बोरवेल ने पाणी देणे. हा एकच निकष पुरेशा आहे का. (कायदेशीर आधाराचा संदर्भ द्यावा.)
1. ज्या जमिनीस राज्य शासन , जिल्हा परिषद किंवा नैसर्गिक पाण्याचे स्रोतापासून एक ऋतू पाण्याचा खात्रीशीर पाणी पुरवठा आहे
2.ज्या जमिनीस खाजगी लिफ्ट द्वारे पाण्याचा खात्रीशीर पाणी पुरवठा आहे
3.ज्या जमिनीस खाजगी विहीर , नदी प्रवाह या मधून खात्रीशीर पाणी पुरवठा आहे
वरील निकषांचे आधारे , हंगामी पीक शेती ठरवण्यात येते .
कृपया महाराष्ट्र शेतजमीन ( धारण जमीन मर्यादा ) कायदा 1961 चे कलम 5 (ब) वाचा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Dear Kiran panbude sir,
As per your suggestions I mailed you 7/12 extract of the said land. I am still waiting for the answer
Thank you
आपला 7/12 मी पाहिला .
आपली जमिनीचे स्थानिक नाव फॉरेस्ट आहे . याचा अर्थ ती राखीव वन आहे असा नाही .
मात्र भूधरण पद्धती सरकार नमूद आहे . भूधारण पद्धती , वर्ग -1 , वर्ग-2 , सरकारी पट्टेदार , अश्या पद्धितीची असते .
जर हि अविभाजय सत्ता प्रकारची जमीन असेल व त्याचे हस्तांतरण विना परवानगी झाले असेल तर आपण हस्तांतरण नियमनाकुल करण्यासाठी , विभागीय आयुक्त यांचे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.39 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3