जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by नंदकिशोर रामराव सोनवणे
04-10-2016
nrsonvane@gmail.com
नमस्कार सर
सर ग्रामीण, नगरपालीका, महा नगरपालीका, या भागा मधे म.रा.ज.म.१९६६ चे कलम ४४ प्रमाणे अकृषीक झाले असेल तर मुळ अकाराला ( ग्रामपंचायत जिल्हापरीषद ) शेषस लागतात का कृपया मार्गदर्शन करने..
Question by नंदकिशोर रामराव सोनवणे
04-10-2016
nrsonvane@gmail.com
नमस्कार सर
सर ग्रामीण, नगरपालीका, महा नगरपालीका, या भागा मधे म.रा.ज.म.१९६६ चे कलम ४४ प्रमाणे अकृषीक झाले असेल तर मुळ अकाराला ( ग्रामपंचायत जिल्हापरीषद ) शेषस लागतात का कृपया मार्गदर्शन करने..
Question by BALAJI DAHIPHALE
03-10-2016
balajidahiphale1996@gmail.com
नमस्कार सर,
कोतवाल यांनी कोणती कामे करवी,तसेच कोतवाला संबधी कोणता अधिनियम आहे का? असेल तर त्यांची कॉपी मला इमेल वर पाठवावी.
मुंबई कनिष्ठ गाव वतने निर्मूलन कायदा, १९५८ अन्वये दिनांक १ फेब्रुवारी १९६२ पासून अनुवांशिक कनिष्ठ गाव सेवक प्रणाली संपुष्टात आली. त्यानंतर गावच्या लोकसंख्येकनुसार कोतवालाचे नियमित मानधन घेणारे पद निर्माण करण्यात आले.
काही काळ कोतवालांची पदे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली होती. पुन्हा दिनांक १ डिसेंबर १९६३ पासून कोतवालाची पदे महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आली.
कोतवाल हे महसूल खात्यातील सर्वात कनिष्ठ पद आहे. कोतवाल हे गाव कामगार तलाठी यांचे मदतीसाठी काम करतात.
कोतवालांकडून खाजगी कामे करुन घेण्यास शासनाने २५/०५/२००४ च्या परिपत्रकान्वये मज्जाव केला आहे.
कोतवालांना कामावर असतांना जखम/इजा झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने १२/१२/१९९१ च्या परिपत्रकान्वये दिल्या आहेत.
कोतवालांची सेवा पुस्तके दोन प्रतीत ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत त्यायोगे त्यांना निवृत्तीनंतरचे लाभ देणे सोयीस्कर होईल.
कोतवालाची भरती: तहसिलदार करतात.
कोतवाल पदाचे शिक्षण: ४ थी पास
कोतवाल पदासाठी वयोमर्यादा: ४५ वर्षापर्यंत
कोतवालाचे सध्याचे मानधन: रु. ५०००/-
• घोलप समिती अहवालानुसार कोतवालाची कर्तव्ये:
æ शासकीय रक्कम शासकीय तिजोरीत भरण्यात सहाय्य करणे.
æ शेत सारा, शासकीय देणे अदा करण्यासाठी गावकर्यांाना चावडीवर बोलावून आणणे.
æ शासकीय पैसा, कार्यालयीन कागदपत्रे आणि शासकीय वसुली म्हणून जप्त केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे.
æ अटकवलेली/जप्त केलेली मालमत्ता/जनावरे चावडीवर घेऊन येणे.
æ आवश्यकतेनूसार गाव दप्तर गावातून तहसिल कार्यालयात नेणे.
æ चावडीचे टपाल तहसिल कार्यालयात व तहसिल कार्यालयाचे टपाल चावडीवर नेणे.
æ शासकीय अधिकार्यातना त्यांच्या दौर्यायत, पीक पाहणीत, हद्दीच्या खुणा तपासण्यात सहाय्य करणे.
æ नोटीस/ समन्स बजावणे व नोटीस/ समन्स बजावण्यासाठी मदत करणे.
æ गावातील जन्म, मृत्यू, लग्न आणि अर्भक मृत्यूची माहिती ग्राम पंचायत सचिवाला देणे.
æ पोलिस पाटील आणि पोलिसांना रात्रीच्या गस्तीसाठी मदत करणे. संशयास्पद प्रकरणांची माहिती पोलिस पाटलास देणे.
æ बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास तसेच शव विच्छेदनासाठी प्रेत घेऊन जाण्यात पोलिसांना सहाय्य करणे.
æ शासनाच्या आदेशांबाबत गावात दवंडी देणे.
æ लसीकरण मोहीमेत मदत करणे.
æ अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी प्रशासनास मदत करणे.
æ गुन्हेगारांच्या हालचाली पोलिसांना कळवणे तसेच तपासात आणि गुन्हे प्रतिबंध समयी पोलिसांना मदत करणे.
æ पोलिस पाटलाच्या अभिरक्षेत असलेल्या गुन्हेगारावर पहारा देणे.
æ गावातील अधिकार्यांभना जमीन महसूल वसुलीस तसेच त्यांच्या इतर शासकीय कामात मदत करणे.
æ गावात शासकीय कामासाठी आलेल्या अधिकार्यांसना सहाय्य करणे.
æ गावातील चावडी स्वच्छ ठेवणे आणि तेथे दिवाबत्ती करणे.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित बर्गी
02-10-2016
sujitbargi95@gmail.com
नमस्कार सर ,
मला खालील प्रश्नांवर मार्गदर्शन आणि शंकांचं निरसन करावे हि विनंती .
१) एका व्यक्तीने पूर्वी जमीन खरेदी केली असून त्यांना तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे आणि ते खाते क्रमांक दीपकच्या नावे आहे . तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी काय करावे लागेल ?
(2) एका व्यक्तीला पूर्वी कुळकायद्या नुसार जमीन मिळाली, त्यानुसार सात बारा मध्ये कुळाचे वर्णन : साधे कुळ ( 1 )
म. ग. पाटील यांचा ( 1 )
32 ग चा बोजा र.रु. 414.70 ( 1 )
हपते 5 ( 1 ) असे वर्णन आहे
वरिल व्यक्तीला (ज्याला कुळ कायद्यानुसार जमीन मिळालेली व्यक्ती ) तीन मुले होती त्यांची नावे रमेश , लक्ष्मण, अनिल अशी आहेत.ही जमीन त्यांनी तिघांमध्ये आपअपसात वाटून घेतली. आणि हद्दीच्या निशाणी ठरवून वाटण्या एकमेकांत मान्य केल्या. पण त्या तिघांमध्ये कोणताही लेखी करार झाला नाही फक्त एकमेकांच्या सहकार्याने तोंडी वाटण्या झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्च्यात त्यांच्या वारसांची नावे चढली ती अशी रमेश च्या जागी दीपक, लक्ष्मण च्या जागी कमला आणि अनिल च्या जागी मंगेश . ही जमीन सामायिक आहे शिवाय कोणाच्याच नावे स्वतंत्र क्षेत्र दर्शविलेले नाही, आणि खाते क्रमांक एकच आहे आणि ते खाते क्रमांक दीपकच्या नावे आहे . तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन स्वतःच्या नावे करायची आहे परंतु त्यांच्याकडे वाटणीचा कोणताही पुरावा आता नाही, पण सातबारा वर मंगेश यांचे नाव आहे. आणि दीपक व कमला हे दोघे जण सहकार्य करत नाहीत. हरकत दाखवत आहेत तर मंगेश यांना त्यांच्या हिश्याची जमीन नावे करण्यासाठी आणि वर वर्णन केलेले कुळ सात बारा मधून काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल ?
(3) शिवाय सात बारा मधून सर्वांच्या सहमतीने कुळाचे नाव कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल ?
(4)सात बारा मध्ये खालील वर्णन केलेली जमीन विकता येते का ?
इतर अधिकार
फॉरेस्ट कलम 35 मधुन वगळण्यात आली. ( 1 )
म. खा. व. स. कायदा 1975 ( 1 )
केंद्र शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय वनैतर वापरास बंदी ( 771 )
वने ( 809 )
वन ( 809 )
धन्यवाद !
प्रश्न १. .दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करावा.
प्रश्न २. म.ग.पाटील यांनाच जर कुळकायदा ३२ ग नुसार जमीन मिळाली असेल आणि ३२-म चे प्रमाणपत्र असेल तर वरील बाोज्याची नाोंद, चलन, ३२-ग आदेश आणि ३२-म प्रमाणपत्र, तहसिलदारकडे सादर करून, म.ज.म.अ. कलम १५५ अन्वये कमी करता येईल.
प्रश्न ३. म.ग.पाटील हे सध्या जमिनीचे मालक नसतील आणि अन्य व्यक्ती असतील तर तहसिलदारकडे अर्ज करावा लागेल. तहसिलदार याोग्य ती चाौकशी करतील.
प्रश्न ४. अशी जमीन वन खात्याच्या परवानगी.शिवाय विकता येणार नाही.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sajid
02-10-2016
sajid11@gmail.com
सर एखाद्या जमिनीमध्ये 3 सह हिस्सेदाराक आहेत.पण त्यांचे वाटप होऊन त्यांना कोणते क्षेत्र मिळाले आहे कशावरून कळते?
2) सर एखाद्या जमिनीमध्ये 3 सह हिस्सेदाराक आहेत.पण त्यांचे वाटप झालेले नाही आपण 2 सह धारकाचा संमती विना बोअर घेऊ शकतो का व घेतल्यास ते त्यांचा त्या बोअर मध्ये हिस्सा मागू शकता का
वाटप पत्रात नमुद सीमांच्या आधारे काोणाला कोणते क्षेत्र मिळाले आहे हे कळू शकते.
सह धारकाचा संमती विना बोअर घेणे याोग्य हाोणार नाही. घेतल्यास ते त्यांचा त्या बोअर मध्ये पाण्याचा हक्क मागू शकतील
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by saddam
02-10-2016
saddam11@gmail.com
सर प्रत्येक सह हिस्सेधारकाची वाटणी झालेली असेल तर 7/12 एकत्र निघतो का वेगवेगळा निघतो
2)वाटणी कोर्टाकडून तहसीलदारकडून भूमी अभिलेख कडून कोणाकडून होते व कोणाला अधिकार आहेत वाटणीचे
वाटणीमुळे सहसा ७-१२ स्वतंत्र हाोत नाही. त्याच ७-१२ वर .हिस्स्याचे क्षेत्र नमुद करतात.
सर्व सहहिस्सेदारांची संमती नसल्यास, दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून, सर्व सहहिस्सेदारांची संमती असल्यास, तहसीलदारांकडे म.ज.म.अ. कलम ८५ नुसार अर्ज करून किंवा दुय्यम निबंधकाकडे नाोंदणीकृत दस्त करून वाटणी हाोऊ शकते.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by रोहित जठार
02-10-2016
www.roraj8@gmail.com
सर, सद्ध्या स्वच्छ भारत अभियान चालू आहे, यात आमच्या गावातहि शौचालये बांधण्यास सांगत आहेत. आम्हालाही आमचे वैयक्तिक शौचालय बांधायचे आहे.
परंतु आमचे घर हे आमच्या पणजोबा यांचे नावे आहे व त्यांना आत्ता पर्यत ८ वारस आहेत सदर घर हे २०’x३३’ चे आहे. तर आम्हाला जवळ पास २.५’x ४’ इतकीच जागा मिळते आहे. व त्याच बरोबर आमच्या घरावर व जमिनीवर दिवाणी न्यायालयात केस चालू आहे.
आणि ग्रामपंचायतवाले बोलतात कि तुम्हाला शौचालय बंधावेच लागेल आम्हीही आमचे वैयक्तिक शौचालय बांधायचे आहे. पण अशा काही कारणामुळे आम्हाला शौचालय बांधता येत नाही.
याच बरोबर आमचे रेशन, वीज, सरकारी दाखले, गावचे पाणी बंद करणार आहेत. ग्रामपंचायत ग्राम सभेत आपले विचार न मांडू देणार नाहीत, आमच्या घरा समोर वाजंत्री लावून व गावात सार्वजनिक जागेत आमचे फलक लावणार आहेत.
या कारणाने आमचे घरचे निराश झाले आहेत व मला तर भीती वाटते आहेत कि कोन्ही या मुळे जीवाचे काही बरे-वाईट करून घेऊ नये या साठी तुम्हीच आम्हाला मदत करावी.
१) तरी आम्ही काय करू ?
व
२) तर रेशन दुकानदारांकडे, वीज वितरण मंडळाकडे, जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा याच्याकडे, ग्रामपंचायत कडे सरकारी दाखले देऊ नये असे कोणतेही GR पाठविले आहेत काय?
कृपा करून या दोन प्रश्नाची उत्तरे द्यावी.
Question by Vinayak बुवाजी patil
02-10-2016
Vbpatil96@gmail.com
If there is not mentioned specific period in the contract of sale deed of land and near about 56 years has been completed but this contract is not completed then what is specific period to complete this contract
Question by गणेश शिंदे
01-10-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,सण 1983 मधील नोटरी केलेले कु.मु. पत्र असल्यास मनपा.हद्दीतील जमिनीचा TDR मिळू शकेल का?
Question by sajid
01-10-2016
sajid11@rediffmail com
नॉन क्रीमीलेयर मधे बसत नसेल तर ओबीसी आरक्षण चा नोकरीसाठी फायदा घेता येतो का
Question by anand salve
01-10-2016
salveanand89@gmail.com
नमस्कार सर , माझे काका गेल्या तीन वर्षा पासून हरवले आहेत त्यांच्या मुलांनी त्या बद्दल पोलीस कंप्लेंट केलेली नाही ते पाचोरा तालुक्यातील राहणारे आहेत तर त्यांना काकाचे मुर्त्यू सर्टिफिकेट भेटू शकते का ?त्याची काय प्रॉसिजर आहे ?
दिवाणी न्यायालयात तसे सिध्द करावे लागेल. भारतीय पुरावा कायदा, १८७२ च्या कलम १०७, १०८ अन्वये दिवाणी न्यायालयामार्फत वारस दाखला प्राप्ती करून घ्यावा
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by anand salve
01-10-2016
salveanand89@gmail.com
नमस्कार सर , एखादी फेरफार नोंद झाली असल्यास त्या विरोधात अपील करण्यासाठी किती कालावधी असतो .ऑनलाइन फेरफार पाहू शकतो का ?जमिनीवर मुलींच्या मुलांचा अधिकार असतो का ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम २५० अन्वये, ज्या निर्णयाविरुद्ध किंवा आदेशाविरुद्ध तक्रार असेल तो निर्णय किंवा आदेश, जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा अधीक्षक, भूमि अभिलेख याच्या दर्जाहून कमी दर्जाच्या असलेल्या अधिकाऱ्याने दिला असेल तर साठ दिवसांची मुदत संपल्यानंतर त्याविरूद्ध अपील दाखल करता येणार नाही.
जमिनीवर मुलींच्या मुलांचा अधिकार, जमीन कशी प्राप्त झाली आहे यावर ठरताो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by सय्यद फिरोज बनेमिया
30-09-2016
firojsayyad1982@gmail.com
नगरपालिका हद्दीत महार वतन जमिनीचे भूसंपादन करतांना कपात करावयाची नजराणा रक्कम किती ? याबाबत मार्गदर्शन होणेस विनंती आहे.
Question by laxman godase
30-09-2016
vedant22god@gmail.com
नमस्कार सर माझ्या आजोबांच्या नावे असलेली काही एकर जमीन पुनर्वसनात गेली आहे त्याचे आम्हाला पैसे सुद्धा मिळाले माझी आई एकुलती एक असल्यामुळे आलेले पैसे आम्ही आमचे चुलत मामा याना वाटून देत होतो पण ते पैसे घेण्या करता येत न्हवते आणि आम्हाला जमीन सुद्धा वहिवाटवून देत नाहीत वाद घालत आहेत आणि आता ते पैसे व्याजासकट मागत आहेत व आम्हाला वहिवाट देखील करून देत नाहीत आम्ही रीतसर दस्त करून सगळी जमीन वाटून घेतली आहे सादर प्रकरणी आम्ही वहिवाटी करता दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता पण निकाल त्यांच्या बाजूने दिला गेला आता सादर प्रकरण सातारा न्यायालयात आहे पण निकाल लागला नाही सात बारा ला आई चे नाव आहे तसेच ते आम्हाला मोजणी फॉर्म वर देखील मोजणी करण्याकरता सही देत नाहीत या प्रकरणी आपले मार्गदर्शन हवे आहे धन्यवाद लक्समन godase
Question by Jaydatta kshirsagar
29-09-2016
jaydattakshirsagar1612@gmail.com
सर
माझ्या आजीच्या नावावर बाक्सिसपत्राने आलेली जमीन माझ्या मोठ्या चुलत्याने कोणालाही कळू न देता माझ्या चुलत भावाच्या नावावर करून घेतली आहे .तरी या जमिनीवर माझा किव्वा माझ्या वडिलांचा हक्क चालू शकतो का ?चालत असेल किव्वा नसेल तर हक्क घेण्यासाठी काय करावे?
आजीला बक्षीसपत्राने मिळालेली जमीन वारसा कायदा कलम १४ प्रमाणे तिची स्वत:ची .मिळकत हाोते. त्या जमिनीची विल्हेवाट मर्जीनुसार लावण्याचा तिला पूर्ण अधिकार हाोता.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
29-09-2016
sadik11m@rediffmail.com
सर गट नम्बर 150 सामयिक आहे त्यामधे hissedarancha तोंडी vatni zaleli आहे तर त्या सर्व हिस्से दारंचे सामयिक 7/12न निघता वेगळा 7/12 निघेल का. 2) समयीक गट नम्बर काढून वेगळा seprate गट नंबर मिळण्यासाठी काय करावे लागेल
सह हिस्सेधारकाचे वाद नसल्यास , म.ज.म.अ. 1966 च्या कलम 85 खाली वाटप अर्ज दाखल करा . तहसीलदार सरस निरस वाटपासाठी प्रकरण भूमी अभिलेख खात्याकडे पाठवतील. सरस निरस वाटप व मोजणी झाल्यावर , आकारफोड पत्रकाप्रमाणे , 7/12 स्वतंत्र होईल.
अथवा , आपण मोजणीसाठी भूमी अभिलेख खात्याकडे अर्ज करा. सह खातेधारकांच्या वहिवाट हद्दी वरून , मोजणी केली जाईल . मोजणी नंतर आकारफोड पत्रकावरून स्वतंत्र 7/12 होईल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुमीत Bobhate
29-09-2016
Sumeet311@gmail.com
1956 साला पासून जमिनीचे 7/12 उतारे माझ्या नावे आहेत. त्या आधी बोटखत माझ्या वडिलांचे नावे आहे. माझ्या वडिलांचे लवकर निधन झाल्या मूळे माझे पालन पोषण माझ्या आईच्या वडिलांनी म्हणजेच आजोबानी त्यांच्या गावी केले. त्या मूळे माझ्या गैर हजेरीत माझे चुलत काका ती जमीन कसू लागले नंतर अचानक 1976 साली 7/12 उताऱ्यात माझ्या चुलत काकांनी व दुसऱ्या लांबच्या काकांनी आणेवारी लावून नावे लावली आहेत. आता सर्व चुलत काका हे हयात नाहीत व त्यांच्या मुलांनी सुद्धा 7/12 मध्ये आपली नावे वारस म्हणून लावली आहेत व त्या जमिनी कसत आहेत. सादर जमिनी हि माझी वडिलार्जित आहे हे मला अलीकडच्या काळात समजले तरी हि सर्व नावे मला कमी करण्यासाठी काय करावे लागेल.कृपया मदत करा
आपणास दोन मार्ग आहेत .
1. ज्या फेरफाराने चुलत काका व लांबचे काका यांचे नाव लागले तो फेरफार , प्रांत अधिकारी यांचेकडे आव्हानात करा .मात्र फेरफार मंजूर होऊन खूप दिवस झाल्याने विलंबाची मुद्द्यावर , अपील फेटले जाऊ शकते .
2. प्रश्नाधीन जमीन चे आपण मालक आहेत हे जाहीर करून मिळण्याचा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुमीत Bobhate
29-09-2016
Sumeet311@gmail.com
नमस्कार,
एखाद्या व्यक्तीच्या मिळकती च्या फेरफार मध्ये तोंडी वाटपाने माझे नाव " हिस्सेदार " म्हणून लागले असेल तर त्या मिळकतीत हिस्सा मला मिळू शकेल काय ? व तोच मिळिविण्यासाठी मला काय करावे लागेल ?
Question by Jaydatta kshirsagar
29-09-2016
jaydattakshirsagar1612@gmail.com
सर
माझ्या वडिलांच्या आत्याचे नाव 7/12 वर 30 वर्षांपूर्वी इतर हक्कात लागले आहे पण त्या मयत आहेत त्यांचे वारस आमच्या कसल्याही संपर्कात नाहीत तरी ते नाव आम्हाला कमी करायचे आहे तर ते कसे करावे?
तहसिलदारकडे अर्ज करावा. ते जाहिर नाोटीस व अन्य मार्गाने वारसांची चाौकशी करून याोग्य ताो निर्णय घेतील.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
27-09-2016
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,ग्रामीण भागातील रहिवासी झोनमधील 20 आर च्या आत क्षेत्र असल्यास बिगर शेती करण्यासाठी स्थळपाहणीबाबत मा.तलाठी व सर्कल साहेब यांचा अहवाल अर्जासोबत सादर केल्यास चालेल का?कि तहसीलदार साहेब यांचा अहवाल आवश्यक आहे.त्याबाबत काही नियमावली आहे का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.
आपणास केवळ अर्ज करावा लागेल . अर्ज समवेत , प्रस्तावित बिनशेती आराखडा सादर करावा लागेल . अर्ज प्राप्त झालेनंतर , सक्षम अधिकारी ( जिल्हाधिकारी/प्रांत अधिकारी/तहसीलदार ) , अर्जाचे अनुषंगाने चौकशी करतील .
आपणास अगोदरच , हे चौकशी हव्हल जोडण्याची गरज नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश
27-09-2016
nikysweet1@gmail.com
नमस्कार सर ...वैदकीय कारणास्तव सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा मुलास अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळू शकते काय.. किंवा कसे कृपया मार्गदर्शन karave
नाही . शासकीय सेवेत असताना गट क अथवा गट ड कर्मचारी मयत झाल्यास त्याचे अपत्यास नोकरी मिळू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मुस्ताक पठाण
27-09-2016
mnpathan66@gmail.com
प्रभाव क्षेत्रातील गावांना सर्वे न. लागू असून तरी आम्ही प्रभाव क्षेत्रातील गावांमध्ये २ गुंठे,४ गुंठे किंवा २० आर पेक्षा कमी क्षेत्र खरेदीने घेऊ शकतो का? ७/१२ उता-यावर पीक पाहणी पडित आहे. त्याचा शासन निर्णय असेल तर त्याचा संदर्भ द्यावा.
आपल्या जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र काय आहे या वर अवलंबून आहे . आपण उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे प्रमाणभूत क्षेत्राबाबत चौकशी करा व त्या वरून ठरवा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजू गायकवाड
27-09-2016
rajug2917@gmail.com
नमस्कार महोदय,
माझी जमीन गाव जांबुळवाड ता शहापुर जि ठाणे .
इनाम पत्राकात पनजोबाचे १८९६ मध्ये ९४ एकर ५ गुंडे महार इनाम जमीन मिळाली होती.सदर गाव नमुना ३मध्ये पनजोबाचा उल्लेख नाही त्यात नमुद केले आहे . शर्तीबाब बाड नाही व जुना आकार फोड मिळाला पण सर्वे नंबर तेच असुन त्यात मुळ मालक ( पनजोबा ) उल्लेख नाही १८९६ते १९३१या काळातील कोणतेही पुरावे तहसील तलाठी यांच्याकडे उपलब्ध नाही १९३१पासुन ते आज पर्यतचे सातबारा व फेरफार आहेत पनजोबंचे नाव नाही कुठले कागदपत्रे काढल्यावर फेरबदल समजेल वती जमीन परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल ?
Question by सोमनाथ Lokhande
27-09-2016
somnathLokhanderx@gmail.com
सर माझ्या आजोबांना घर बांधायला जागा त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती त्याचा कुठलाही दस्तावेज केला नाही व आजोबांनी घरे बांधली तया घरांची नोंद गामपंचायतीमधये झाली असून त्याचा कर आजही आम्ही भरत आहे ज्या नातेवाईकांनी जागा दिली त्यांनी आमच्या घरांची जागा सोडून बाकी सर्व जागा विकून टाकली आहे आम्हाला घरांची जागा नावावर करण्यासाठी मुळ मालकाची परवानगी घ्यावी की आताच्या मालकची परवानगी घ्यावी कृपया मार्गदर्शन करावे
नातेवाईकांनी घर सोडून जागा विकली आहे . त्यामुळे आपले घराखाली जागा अजूम्ही आपले नातेवाईकांचे नावे आहे . त्यामुळे आपले नातेवाईकांना कडून जमीन विकत घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमितकुमार शिर्के
26-09-2016
amitkumar.shirke@gmail.com
मा. किरण पानबुडे सर
धर्मादाय सह आयुक्त पुणे यांनी, मा. उच्च न्यायालय यांनी गरीब रुग्णांसाठी सुरु केलेल्या योजनेमधून हॉस्पिटलने उपचार न दिल्याने भरून घेतलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत,
त्या आदेशाच्या विरोधात हॉस्पिटल यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दि. 17 सप्टेंबर 2016 रोजी दाखल केली आहे,
दि. 19 सप्टेंबर रोजी न्यायालयाने सदर याचिकेवर सुनावणी घेऊन धर्मादाय सह आयुक्तांच्या आदेशावर दि. 22 नोव्हेंबर 2016 पर्यंत स्थगिती दिली आहे
व आम्हाला तसेच धर्मादाय आयुक्तांना दि. 22 नोव्हेंबर पर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु सदर निर्णय आम्हाला न्यायालयाकडून प्राप्त झालेला नाही, फक्त मा. उच्च न्यायालयाच्या वेब साईट वरती प्रसिद्ध आहे,
आम्ही धर्मादाय आयुक्त यांची भेट घेतली असता त्यांनी आम्हाला हि माहिती दिली आहे,
व त्यांनाही न्यायालयाचा आदेश अजून प्राप्त झालेला नाही, त्यांनिहि नेट वरूनच सदर माहिती घेतली आहे, तरी
1. मा. उच्च न्यायालय यांचा आदेश आम्हांला व धर्मदाय आयुक्त यांना न्यायालयाकडून प्राप्त होईपर्यंत धर्मादाय आयुक्तांना स्वतः दिलेला आदेश लागू करता येऊ शकतो का ?
2. हॉस्पिटलने जर न्यायालयाच्या आदेशाची प्रत न्यायालयाकडून रित शीर प्राप्त करून धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केली तर, सदर आदेशामुळे ते स्वतःच्या आदेशावर कारवाई करू शकतात किंवा नाही ?
3. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे हॉस्पिटल पैसे देत नाही म्हणून, आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे हॉस्पिटल वरती कारवाई करणेबाबत तक्रार अर्ज सादर केला आहे, त्या अर्जावर त्यांनी असे उत्तर दिले आहे कि, आमच्या आदेशावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे व स्थगितीचा आदेश आम्हांला प्राप्त झाला कि, आपणांस पाठविण्यात येईल,
धर्मादाय आयुक्तांची हि कृती योग्य आहे का ?
सर प्लीज,
आपण सल्ला द्यावा हि विंनती.
1. नाही
2.नाही
3. होय
आपणस उच्च न्यायायालयाचा निर्णय होते पर्यंत थांबणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
