जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by शेख अन्सारोद्दीन तलाठी
26-11-2014
ansarhisam@gmail.com
सर,
तुकडेबंदी कायदयाअंर्गत अकोला जिल्हयासाठी क्षेत्राचे प्रमाण किती ?
Question by AJINKYA PAWAR
26-11-2014
ajinkya.likes@gmail.com
majhe city madhhe plot aaahe mahanagar palika manjur lay out aahe seprate utara aahe...taridekhekhil bhumi abhilekh karyalay mojani karta yet nahi mhantat...
महानगर पालिका क्षेत्रामधील आपल्या मिळकतीचा मिळकत उतारा घेऊन मोजणी फीस भरावी. तर जर ते मोजणी साठी तयार होत नसती तर जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करावी. कारण जिल्हधिकारी हे जिल्ह्याचे पदसिद्ध सह संचालक, भूमी अभिलेख आहेत. तरीही समाधान न झाल्यास लोकशाही दिनात तक्रार करावी.
Reply by डॉ.जयकृष्ण फड | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
25-11-2014
jaware_sb@rediffmail.com
पाटीलवतन नवीन अविभाज्य शर्तीची जमिन असून त्या जमिनीचा फेरफार मध्ये इनाम वर्ग ६ब ची जमिन रिग्रेट करुन वरीष्ठ कार्यालयानी शर्ती व अटी चे अधिन राहुून सरकार नोंद कमी करुन कब्जेदार यांचे नाव दाखल केले आहे. तर पाटीलवतन नवीन अविभाज्य शर्तीची जमिन बाजार भावाच्या ५० टक्के नजराणा भरुन भोगवटदार १ करता येईल का?
Question by संदीप
25-11-2014
mechmaster7@gmail.com
नमस्कार सर,
शासनाकडून "जात प्रमाणपत्र " मिळवताना जी कागदपत्रे द्यावी लागतात ती साक्षांकित प्रत हवी का ?
२) "साक्षांकित प्रत" कोणाकडून केलेली चालते?
"वकील नोटरी" कि "विशेष कार्यकारी अधिकारी " ?
याबाबतचा शासन निर्णय प्रत मिळेल का?
Question by sanjay shekokar
25-11-2014
sanjayshekokar71@gmail.com
maharashtra जमीन महसुल अधिनयम १९६६ ८५ आणी ८५ (२) नुसार जमिनीचे वाटप विभाजन करण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत का ? या साठी सक्षम अधिकारी कोण आहेत व हि केस कोणत्या महुसूल अधिकारी मार्फत चालवली जाते
मुल अधिकार जिल्हाधिकारी यांचे आहेत
बहुतांशी ठिकाणी तहसीलदार यांना अधिकारप्रदान करण्यात आले आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by atul ambhore
24-11-2014
ambhorea@yahoo.com
गयरान शेतजमिनिवर तलाव खोद्कामाचि परवांनगि तहसिलदार याना देता येते का
धन्यवाद पाणबुडे सर उत्तर दिल्यबद्दल
सर सदर कामी ग्राम्पान्चायातीस काय कळवून नाकारता येईल
कुर्पया मार्ग दर्शन करावे
गायरान जमीन गुरांना चरण्यासाठी आहे . त्याचा वापर तलावासाठी करता येणार nahi
तसेच अशी parvangi देण्यास तहसीलदार यांना adhikar nahi
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
24-11-2014
jaware_sb@rediffmail.com
जर एखाद्या व्यक्तीला कोळंबी प्रकल्पासाठी भाडेपट्ट्याने जमिन दिली असेल व तो व्यक्ती मयत झाला असल्यास त्याच्या वारसाची नोंद ७/१२ सदरी करता येईल का ? तसेच बॅकेचा बोजा सदर जमिनीस नोंद करता येईल का ?
वारसांची नवे लावता येतील
Government leased land cannot be mortgaged to financial institution without permission
See permission was taken
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शशिकांत रामचंद्र नाचण
23-11-2014
vsn2577@gmail.com
ज्या जमिनी २ टक्के नजराणा भरून खरीदी केल्या जातात त्या पुन्हा विक्री करण्यासाठी कोणती कारवाई केली जाते
कायद्यात सध्या स्पष्ट तरतूद नाही . मात्र
२ % नजराणा हा जर जमीन वर्ग ईई ची असेल तर भरण्याचा आहे. कलम ६३ १ अ अन्वये जमीन खरेदी करताना , बिगर शेतकरी व्यक्ती , औद्योगिक कारणासाठी जमीन विकत घेऊ शकते. त्यामुळे तो शेतकरी नसला तरी चालू शकते. मात्र जमीन वर्ग २ ची असल्यास , म्हणजे शाषण प्रदान ( अ. वि. स. ) असल्यास , ती वर्ग २ ची राहणार , नंतर च्या प्रत्येक हस्तांतरास , जर ती शेतकरी व्यक्तीस विकावयाची असल्यास , अनार्जित उत्तपानाची रक्कम शाश्नास जमा करावी लागणार.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शब्बीर फरास
23-11-2014
faras_shabbir@yahoo.co.in
"म" सत्ता प्रकार म्हंजे काय ? थोडे सविस्तर माहिती सांगा, तो कमी करणे साठी काय करव्यास हवे कृपया सविस्तर माहिती द्या .
Question by फरास शब्बीर अप्पासाहेब
23-11-2014
faras_shabbir@yahoo.co.in
नियंत्रित सत्ता प्रकार मध्ये, बिन शेती प्लॉट सेकंड सेल करताना किती वेळा सरकार ला नजराणा भरणे ?
केवळ जमीन शेत प्रकारातील असेल तर , ती नि.स.प्र असते.
बिनशेती आहे म्हणजे शर्थ शिथिल करण्यात आलेली आहे
पुन्हा नजराणा भरण्याची गरज nahi
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by श्रीकांत राऊत
22-11-2014
raut1959@gmail.com
नमस्कार,
आम्ही म्हणजे माझे वडील,मी, व माझा भाऊ यांचेत सुमारे ३३ वर्षापूर्वी रजिस्टर वाटणी पत्र झाले आहे परंतु त्यानुसार प्रत्यक्ष जमीन वाटणी कागदोपत्री आहे. तरी सदर जमिनीची पुनरवाटणी रजिस्टर करता येईल का व सदर वाटणीसाठी किती स्टम्प लागेल.पूर्वीच्या वाटनीनुसार तिघांचे ८ अ व ७/१२ झाले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
Question by संजय वाघमारे
22-11-2014
sanjaywaghmare70@rediffmail.com
नमस्कार सर, तलाठी,मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार, तहसिलदार यांचेकरिता उत्पन्नाचे दाखले देण्याबाबतचे शासन निर्णयाची किंवा परिपत्रकाची प्रत असल्यास कृपया अपलोड करावी हि विनंती.
Question by कृष्णा गणपत तेली
21-11-2014
kgteli53@gmail.com
मृत्युपत्र हे कोर्टाकडून मान्यता प्रमाणपत्र (PROBATE) मिळविले नसतांना सुद्धा तलाठी /मंडळ अधिकारी ७/१२ वर वारसदाराची नोंध करू शकतात का?
Yes
Probate is essential in mumbai only and not else where
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
21-11-2014
psshirke14@gmail.com
मा. सर
मी तहसीलदार यांच्याकडे जमिनीचे वाटप करून मिळणेबाबत कलम ८५ नुसार अर्ज सादर केला होता आणि त्यांनी माझा अर्ज निकाली काढला आहे व उत्तरामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे कि, कलम ८५ प्रमाणे फक्त ७/१२ उतारा विभक्त करता येतो जमिनीचे वाटप करता येवू शकत नाही, तरी आपण मला खालील माहिती द्यावी हि विनंती.
१. मा. सर, जर एखाद्या व्यक्तीने ठरविले कि, मला आपल्या जमिनीचे वाटप माझ्या मुलांच्या नावावरती करून द्यावयाचे आहे तर ते कलम ८५ प्रमाणे करता येवू शकते का ?
२. तहसीलदार यांचे असे म्हणणे आहे कि, कलम ८५ प्रमाणे वाटप म्हणजे एखाद्या ७/१२ उतारयामध्ये जर दोन जमिन धारकांची नावे असतील तर तेच फक्त आपापल्या नावावरील जमीन आपापसांत वाटप करून घेवू शकतात. तर हा निर्णय योग्य आहे का ?
३. सर, तहसीलदार यांनि दिलेल्या निर्णयाच्या विरुद्द मी प्रांत साहेबांकडे अपील दाखल करायला गेलो असता त्यांनी माझे अपील दाखल करून घेतले नाही व मला असे सांगितले कि तुम्ही कलेक्टर साहेबांकडे अपील सादर करा. तर मी आता काय करू.
४. कलम ८५ बाबतची माहिती द्यावी.
५. तहसीलदार म्हणतात कि, कलम ८५ प्रमाणे वाटप होते असा शासन निर्णय आणून द्या मग मी लगेच तुमचे वाटप करून देतो, तरी सर आपण मला सदर शासन निर्णय द्यावा हि विनंती.
१. नाही
2. hoy
३. अपील दाखल करून घेतले pahije
4. Read MLRC
5. under section 85 , holding is divided amongst the co holders . But father cannot partition his land in the name of son .
Fathet will have to either sale or gift the land to son
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पंकज अहिरराव
21-11-2014
pankaj.ahirrao26@gmail.com
तलाठीने कोणते पुस्तक रेफर करावे?
तलाठ्यांनी संदर्भासाठी वापरावयाची पुस्तके.
१) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व त्या अन्वये तयार केलेले नियम
२) जमीन महसूल नियमपुस्तिका- खंड १ ते ४
३) महाराष्ट्र नागरी सेवा नियम (सर्व)
४)श्री. शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांसाठी लिहिलेली सर्व पुस्तके.
५) लेखा विषयी, परभणी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या ब्लोग वर उपलब्ध असलेले साहित्य.
Reply by डॉ.जयकृष्ण फड | उप जिल्हाधिकारी
Question by atul ambhore
20-11-2014
ambhore.79@gmail.com
गयरान शेतजमिनिवर तलाव खोद्कामाचि परवांनगि तहसिलदार याना देता येते का
Question by yogesh karmarkar.
20-11-2014
yogeshkarmarkar798@gmail.com
नि.स.प.जमिनीचा कायदा काय आहे.?खालसा करण्यासाठी जमिन मालकाने काय करावे.
maharashtra Tenanacy and Agricultural land Act
parvangi ghene
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandeep Sutar
20-11-2014
sandeepms30@gmail.com
Sir,what is procedure to do N.A.land comes under R1 zone of MMRDA BSNA For personal home construction .land area is 0-03-00(3 are).
Question by Sandeep Sutar
20-11-2014
sandeepms30@gmail.com
Sir,what is procedure to do N.A.land comes under R1 zone of MMRDA BSNA For personal home construction .land area is 0-03-00(3 are).
Question by कुणाल अंकुश जाधव
19-11-2014
mr.k1387@gmail.com
जर तहसिलदार हे किमान ८ दिवस रजेवर असतील तर मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांचेकडून प्राप्त झालेल्या पत्रास उत्तर देताना नायब तहसिलदार यांचे स्वाक्षरीने अहवाल सादर करता येईल का ?
तसेच मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या पत्रास उत्तर देताना प्राप्त दिनांकापासून कालमर्यादा किती आहे ?
ज्या अधिकार्याकडे कार्यभार असेल त्याचे सहीने उत्तर पाठवणे
काल्मार्यदा पत्रात नमूद केलेली असेल
नसेल तर , लवकर पाठवणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुजित चव्हाण
19-11-2014
sujitchavan456@gmail.com
सर भुमि अभिलेख एकत्रिकरण योजनेच्या आगोदर सन १९७३/७४ शेतपुस्तिका मध्ये २११/१ते ८ हिश्यांची नोंद एका पानावरती आहे २११/१ते ११असे हिशे आहेत तर त्या पानावरती शिसपेन्सिलने पुढचे हिसे म्हणजे ९.१०.११ हे शेवटच्या पानावरती पाहवे असे लिहले आहे शेवटच्या पानावरती सुद्धा शिसपेन्सिलने बाकीच्या ९.१०.११ हिश्याची नोंद केली आहे हिस्सा नंबर ११ या मध्ये गेणु व पांडु यांचे दोघाचे आठ आणे प्रमाणे हिस्सा आहे परंतु गेनु यांच्या नावाला कंस केला आहे व त्याच्या समोर ४२०३ फेरफार नं लिहला आहे तो फेरफार त्याचा वारस मुलगा गोरखनाथ याच्या वारस नोंदिचा आहे तसेच पांडु यांच्या दोन मुलाची नावे सोपान व तुकाराम यांची नावे आहेत तसेच गोरखनाथचे नाव आहे ते वारासाने आले आहे पांडु व तुकाराम यांच्या नावाला कंस केला आहे त्यामध्ये तुकाराम यांच्या पुढे फेरफार नं४२०२ आहे तो फेरफार गेनु यांनी तुकाराम यांच्या कडुन २११/११ मधील आठ आने विकत घेतला असा आहे पण पांडु यांच्या कंसा पुढे फेरफार नं नाही व त्यांच नाव मग दुरुस्ति शेत पुस्तिका मध्ये कमी झाले व सोपान व गोरखनाथचे नाव आले १९७५/७६ च्या त्या शेतपुस्तिका मध्ये सोपान यांच्या नावाला कंस झाला आहे व नाव खोडले आहे त्याच्या कंसा समोर फेर फार नं नाही तर पांडु यांचे नाव कसे कमी झाले कारन त्याचा फेरफार नाही तसेच सोपान यांचे नाव कसे आले शेत पुस्तिकाला १९७३/७४ च्या व सन १९७४/७५ दुरुस्ति शेत पुस्तिका मध्य नाव येऊन ते कंस का झाला वनाव का खोडले गेले यांचे स्पष्टिकरण रेकॉर्ड ऑफिसला मिळेल का भुमिअभिलेखला पानबुडे सर मला योग्य मार्गदर्शन मिळावे विनंती
Question by सुजित चव्हाण
18-11-2014
sujitchavan456@gmail.com
सेक्शन 36A म्हणजे काय सर सविस्तर माहीती मिळावी नम्र विनंती
दुरुस्ती.....
पहिल्या उत्तरात अनुसूचित जाती ऐवजी अनुसूचित जमाती असे वाचावे.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
१)अनुसूचित जाती समाजातील व्यक्तींच्या जमिनी बाबतची माहिती ( म.ज.म. अ. १९६६ कलम ३६ अ ) आहे.
२)विशेषतः जमीन हस्तांतरण बाबतचे नियम ( निर्बंध आणी परवानगी ) त्यात नमूद केलेले आहेत.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by Sandeep Sutar
16-11-2014
sandeepms30@gmail.com
Kiran sir request u to answer this question majhi zamin (0-03-00) Modified Draft development plan 2008-2028 for bhiwandi surrounding notified area prepared for MMRDA ya madhye rural areat aahe.NA karnesathi konachi permission & kiti period lagel? Mage asa vachle hota ki Na sathi collector chi permission not required plz help I want loan for construction of house.thanks in advance
Question by SOMNATH कुलकर्णी
16-11-2014
nana.kulkarni67@gmail.com
धुळे जिल्हा LALING SHIVAR YETHIL GAT नो ९७/1, ९७/२, - क्रमांक - आदिवासी-३११४/६८३/प्र.कर.२९/ल-९, महसूल व वन विभाग, जागतिक व्यापार केंद्र, ३२ व मजला कफ परेड, मुंबई-४००००५
नमूद केलाला क्रमांकाची आज दिनक १६/११/१४ रोजी पर्यंत FILE POSITION KALNYABABAT विनंती
क्षमस्व! अशा स्वरुपाची माहिती आपणास संबंधित विभागाकडूनच प्राप्त करून घ्यावी लागेल.
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by Vishwas Mande
15-11-2014
vishwasmande@yahoo.com
I have 15 gunthe land on my 7/12 extract. I hold this land by nomination from my fathers after his death. Actual vahivat area is more than 15 gunthe which is in our hold from the dividation 1978 after the death of my grandfather. This land is along the state high way I would like to know 1)how the actual land area is calculated
2) What is the distance limit from the center of the road state highway
3) To whom to contact for correct measurement
१) जमिनीचे क्षेत्र हे हेक्टर /एकर/गुंठे तसेच मीटर मधेही मोजतात
२) राज्य महामार्गासाठी साधारणतः ३० मीटर चा रस्ता असतो
३) आपण शेती मोजणीसाठी उप अधीक्षक तालुका मोजणी कार्यालयात संपर्क साधा . तसेच रस्त्याचे नकाशा साठी कार्यकारी अभियंता राज्य महामार्ग /सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेसी संपर्क साधा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
