जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

मृत्युपत्र मुत्युनंतर वारसांना कोर्टाकडून शाबित करुनच आणावे लागते काय? की ते डायरेक्ट तहसिलदार कार्यालयात पुढील नोंदीसाठी सादर केले जाते?
मुंबई या शहरात व्यक्ती( हिंदू, बुद्ध, सिख, जैन ) राहत असेल अथवा मिळकत असेल तर Probate आवश्यक
अन्य ठिकाणी आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नोंदणीकृत असेल तर सरळ नोंदणीकरू शकतात पण ते करावेच असा आग्रह धरणे योग्य नाही ................पण कोर्टाकडून प्रोबेत आणल्यास उत्तम .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

Question by atul ambhore
05-01-2015
ambhorea@gmail.com

पाणी परवाना देण्याचे अधिकार कोणाला आहेत

तहसिल कार्यालय कि जल सिंचन किंवा पाणी पुरवठा विभाग
पाणी स्त्रोत जर जलसंपदा विभाग अथवा लघु पाटबंधारे विभाग यांचे कडे अधिसूचित असेल तर त्या विभागाची परवानगी आवश्यक
जर स्त्रोत अधिसूचित नसेल मात्र शासकीय मालकीचा असेल व शेतीसाठी पाणी आवश्यक असेल तर , तर तहसीलदार यांची परवानगी घेणे आवश्यक
शेतीशिवाय अन्य कारणासाठी , शाश्नाची परवानगी आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

धरणातून परवानगी पहिजेअसेल तर ...........जलसिंचन विभाग

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

इनाम ६ ब ची जमीन निवासी झोनमध्ये आहे.0 .०६ आर आहे.विक्री परवानगी घेताना शेतकरी दाखला आवश्यक आहे का?
होय
कलम ६३ , म.क.व शे अ. १९४८ तरतुदी लागू होतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,६ ब इनामाची जमीन बांधकाम फर्म तर्फे भागीदार बिनशेतीसाठी घेत असेल तर त्याच्या स्वतःच्या नावे असलेला शेतकरी दाखला चालेल का? किंवा ६३ ची परवानगी घ्यावी लागेल?कृपया मार्गदर्शन करावे.
भागीदारी संस्था कायद्याचे भाषेत व्यक्ती नाही . त्यामुळे भागीदारी संस्थाचे नावे मिळकत घेत येत नाही .
भागीदारी संस्थातेतील भागीदार शेतकरी असेल तर , त्याचे नावे जमीन खरेदी करणे
भागीदार संस्था नोंदणी कृत करताना , दस्त बनवला जातो अथवा आपापसात करार केला जातो , त्या मध्ये , एखादे भागीदाराचे नावे मिळकत असल्यास , ती firm ची मिळकत असले बाबत उल्लेख करता येतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझ्या ऐका नातेवाईकाच्या विरोधात ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या ऐका चुलत भावाने तक्रार अर्ज दिलेला आहे(माझ्या नातेवाईकाच्या वाट्याला आलेल्या जमिनीमध्ये सोच्याल्य बांधलेले आहे ) तर त्या तक्रार अर्जाची नकळ प्रत माहितीच्या आघीकाराखाली मागू शकतो काय तो अर्ज कोणाच्या नावे करावा .
माहितीचा अधिकार २००५ कलम ३ अन्वये , नागरिकांना माहितीचा अधिकार आहे . त्यामुळे आपण ती प्रत मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तुमचा नातेवाईक नक्कल मागू शकतो ....................................

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

स्वतःच्या हिश्श्याच्या (वाटपानंतर मिळालेल्या) वडीलोपार्जित मालमत्तेचे मत्युपत्राद्वारे वाटप करता येते का?
हिंदू वारसा ( सुधारणा ) कायदा २००५ नंतर , वडिलोपार्जित व स्वकष्टार्जित मिळकत असा भेदभाव राहिलेला नाही .
मृत्यापात्राद्वारे वाटप करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

होय. परंतु फक्त एकांगी मृत्युपत्र असल्यास ते वारसांकडून आव्हानित / रद्द होऊ शकते ....

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

क ड ई पत्रके व फेरफार नोंदी साधारण कोणत्या वर्षापासून ठेवल्या गेल्या? त्या कुठे प्राप्त होतील? याविषयी माहिती हवी आहे
पूर्वी क ड ई पत्रके ठेवायचे आता ठेवली जात नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझी व माझ्या भावाचे नावे ३० गुंठे जमीन आहे दोघांचा ८ अ वेगळा आहे पैकी माझ्या हिस्ष्याची १५ गुंठे जमीन माझ्या अडचणीसाठी विक्री केली आहे इतर हक्कात कोणतीही नोंद नाही.. आता भाऊ खरेदीला हरकत घेत आहे हे बरोबर आहे का
हिंदू वारसा कायदा १९५६ च्या कलम २२ प्रमाणे वंशापारांपारागत मिळकतीच्या विक्रीवेली , भावास खरेदी कार्याचा प्राधान्य हक्क आहे
मात्र जमीन मुल्य प्रचलित बाजारभावाने असणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर/मॅडम,
मी कोल्‍हापूर येथे शासकीय नोकरीत असून सध्‍या निलंबीत आहे. माझेवर माझ्या विभागाने विभागीय चौकशी सुरू केली असून मला चांगला व अनुभवी बचाब सहायकाची आवश्‍यकता आहे. मला महाराष्‍ट्रातील चांगल्‍या व अनुभवी बचाव सहायकाची नाव पत्‍ते व फोन नं. कळवावीत. ही विनंती.
आपण विभागीय चौकशी कार्यालयात चौकशी करा
तेथे बचाव सह्याकांची नावे मिळतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सादरी ३२म सिर्तीफिकॅतेद्वारे खरेदीखत होऊनpurvi दाखल झाले आहे.परंतु इतर हक्कातील पोक्लीस्त नवे कायम आहेत.काय करावे लागेल?जमीन ४३ ची आहे.
पोक्लीस्त नोंद काय आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by manish
28-12-2014
manish85@gmail.com

सन १९३० सालचे क ड ई पत्रक काढले त्यावर माझे खापर पणजोबा यांचे नाव हे विठल रुक्मिणी मंदिर आर्चक म्हणून दाखल होते ,त्यानंतर ते मयत झाले त्यांना ३ मुले होते त्या पैकी मोठा मुलगा म्हणून माझा पणजोबा यांचे नाव मोठा मुलगा म्हणून एकुक म्हणून नाव दाखल झाले नंतर त्यांनी आपले लहान २ भाऊ यांना व स्वताला सेक्सशन ८५ नुसार वाटप केले मग माझे आजोबा यांचे नाव दाखल झाले त्यानंतर त्यांनी पण सेक्सशन ८५ नुसार वाटप केले माझे चुलत आजोबा हे मयत झाले त्यांची पण वारस नोंद लागली त्यानंतर चुलत आजी वारली त्यांची पण वारस नोंद लागली त्यानंतर माझा चुलत काका व आत्या यांनी जाबजबाब देऊन नाव कमी केली आता माझा चुलत काका याचे नाव विठल रुक्मिणी मंदिर आर्चक म्हणून दाखलआहे.
माझे सख्ये आजोबा हे मयत झाले माझ्या काकांचे नाव दाखल झाले आता ते मयत झाले असून त्यांना पत्नी व मुलगी असून त्यांचे नाव वारसा हक्काने दाखल होईल का ?
आर्चन (पुजारी ) यांचे वारस लागतात का हो तर कसे ? नाही तरी कसे ?
देवस्थान इनाम बदल सविस्तर माहिती पाहिजे आहे ?
पुस्तक पण सांगा ?
वास्तविक देवस्थान इनाम जमीन हि देवाचे दिवा बतीची व्यवस्था करण्यासाठी एखद्याला कसण्यासाठी दिलेली असते . कसणार्याला वाहिवातदार संबोधतात . मात्र असा वाहिवातदार हा कायदेशीर मालक होत नाही
त्यामुळे वाहिवात्दाराचे वारसांची नवे लावणे चुकीचे आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मल सावत्र आई आहे माझे वडीलाना शेतीचे पैसे मिळालेत ते आम्हाला मिळन्य साठी काय करावे लागेल ?
आपली शेती शाश्नाने संपादित केल्याने आपणास , नुकसान भरपाई मिळत असेल.
आपण भू संपादन अधिकारी यांचेशी संपर्क साधा.
मात्र हिंदू विवाह कायदा १९५५ , मधील तरतुदीचा विचार करता , आपला प्रश्न मला सविस्तर
kiranpanbude@gmail.com पाठवा अथवा 991711999 वर विचारा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर आमची जागा चुकून दुसर्या व्यक्तीच्या नावावर झाली आहे खरेदीपत्र तयार करायला किती खर्च येईल ..रत्नागिरी जिल्हा ,चिपळूण तालुका बामणोली किज्बिलेवाडी ,मीन रोड पासून आतमध्ये आहे.बिनशेती प्लॉट आहे.४ गुंठे
आपणास जुने खरेदी खात रद्द करून , नवीन खरेदी करावे लागेल .
दुरुस्ती करता येणार नाही
नोंदणी फी व मुन्द्रंक शुल्क भरावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

शेतीचा 7/12 पाहिजे. .
आपले तलाठी यांचे कडे समर्क करा
online ७/१२ उपलब्ध aahe

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by manish
26-12-2014
manish@85gmail.com

सन १९३० सालचे क ड ई पत्रक काढले त्यावर माझे खापर पणजोबा यांचे नाव हे विठल रुक्मिणी मंदिर आर्चक म्हणून दाखल होते ,त्यानंतर एकुक म्हणून माझा पणजोबा यांचे नाव दाखल झाले नंतर त्यांनी आपले लहान २ भाऊ यांना व स्वताला ८५ नुसार वाटप केले मग माझे आजोबा यांचे नाव दाखल झाले त्यानंतर त्यांनी पण ८५ नुसार वाटप केले व माझ्या काकांचे नाव दाखल झाले आता ते मयत झाले असून त्यांना पत्नी व मुलगी असून त्यांचे नाव वारसा हक्काने दाखल होईल का ?
कुनबी चे सर्व रेकॉर्ड (फेरफार नोंदी) पुणे जिल्ह्यातील (शिरूर)आहे.
१९६० पूर्वीपासून आम्ही अहमदनगर (श्रीगोंदा)जिल्ह्यात राहतो. तरी कुनबी दाखल्यासाठी प्रस्ताव कुठे सादर करावा?
१. १३ /१०/१९६७ या दिवशी अथवा तत्पूर्वी आपले / आपले वडिलांचे/ आजोबाचे वास्तव जेथे होते , त्या प्रांताधिकारी यांचे कडे अर्ज करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खाते फोड कशी करावी पूर्ण सदस तयार नाही आहेत तरी सदर जागेत आमचा हिस्सा आहे तरी सर्व लोक तयार होत नसतील तर खाते फोड कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे हि विनती
दिवाणी न्यायालयात The Specific Relief Act 42 प्रमाणे दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका खोतदाऱ्याच्या ७/१२ उताऱ्याचे इतर हक्क सदरी ४०००रु. ता.ग.घे. व भाडेपट्टयाने बॅकेंकडून घेतली असा शेरा फेरफारान्‍वये दाखल आहे. ज्या बॅकेकडून कर्ज घेतले ती बँक बरखास्त झाली आहे. तर सदरचा शेरा कोणत्या आदेशानवये कमी करता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे.
खातेदाराने बँकेकडून भाडेपट्ट्याने घेतली आहे त्यामुळे हि जमीन खातेदाराचे मालकीची नाही
बँक जरी बरखास्त झाली असली तरी , तशी उद्घोसःना होणे अव्शुअक असते
हि जमीन बँकेची असल्याने , बँकेची इतर गेनी देण्यासाठी हि जमीन , विकली जाणार आहे
हा शेर आस कमी करता येणार नाही
company act , च्या तरतुदी नुसार व Banking Regulation Act नुसार , निर्णय घेणे उचित आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मला विभागीय चौकशी अधिनियम १९९१ पाहिजे होता

Question by KUNAL ANKUSH JADHAV
25-12-2014
mr.k1387@gmail.com

एक सेवानिवृत्त तलाठी कर्मचारी यांना मा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेशान्वये दि. १२/०९/१९९७ रोजी निलंबित करण्यात आलेले होते व तशी नोंद सेवापुस्तिकेत घेण्यात आलेली आहे. मा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेशान्वये दि. ०१/१०/२००१ रोजी त्यांना पुन:श्च सेवेत घेण्यात आले. परंतु, दि. ०१/१०/२००१ च्या आदेशामध्ये निलंबनाचे कारण नमूद केलेले नाही.
सदर कर्मचाऱ्याचे सेवापुस्तक वेतन पडताळणी साठी पाठविले असता, दि. १२/०९/१९९७ ते ०१/१०/२००१ हा निलंबन कालावधी नियमीत नसल्याकारणाने सेवापुस्तक आक्षेप नोंद करुन परत आले. सदर निलंबन कालावधी नियमीत करण्याबाबत मा. उपविभागीय अधिकारी यांस अहवाल सादर केला असता, त्यांचेकडून निलंबन केलेल्या आदेशाची प्रत मागविण्यात आलेली आहे. परंतु, सदर निलंबन आदेशाची प्रत आमचे कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील अभिलेखात तसेच संबंधित कर्मचारी यांचेपैकी कोणाकडेही उपलब्ध नाही. तरी सदर प्रत उपलब्ध नसल्यानंतरही निलंबन कालावधी नियमीत करण्याबाबत आदेश निर्गमीत करता येतील का ? याबाबत मार्गदर्शन मिळण्यास विनंती आहे.
निलंबन आदेश कार्यालयात उपलब्ध नसणे , निलंबित कर्मचार्याची चूक नाही
आदेश दप्तरी नाही म्हणून , निलंबन कालावधी नियमित करण्याबाबत चाल ढकल करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by मनीष
25-12-2014
manish@85.com

माझा काकाचे नाव देवस्थान इनाम जमिनीच्या वहीवटदार म्हणून दाखल होते परंतु त्यांचा आता मृत्यु झाला आहे त्यांना आता एक मुलगी व पत्नी आहे त्यांचे नाव वारसा हक्काने दाखल होईल का ?
वाहिवात्दारांची नावे देवस्थान इनाम जमिनीस लावली जात नाहीत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तालुक्यातील एखाद्या स्थानिक महिलेची कोतवाल पदी नेमणूक करता येते का ? याबाबत मार्गदर्शन मिळण्यास विनंती आहे.
होय
नोकरीत सर्वाना संधी आहे
घटनेचे कलम 16 प्रमाणे , नोकरीत सर्वाना समान संधी आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ashish Aouti
24-12-2014
ashish.monalisa@gmail.com

Sir,
AlpBhudhark Babat Pripatrak / G.R. che Mahiti Milave Hi Vinati
महाराष्‍ट्र शासकीय कर्मचा-यांच्‍या बदल्‍याचे विनियमन आणि शासकीय कर्तव्‍य पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ अन्‍वये बदली झालेल्‍या कर्मचा-यास बदली झाल्‍याचे दिनांकापासुन किती दिवसात कार्यमुक्‍त करणे आवश्‍यक आहे. कार्यमुक्‍त न केल्‍यास संबधित कार्यालयप्रमुखावर कोणती कार्यवाही करता येते.
बदली झालेल्या कर्मचार्यास मुक्त करणे बाबत , कायदा अथवा नियमामध्ये तरतूद नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by atul ambhore
23-12-2014
ambhorea@yahoo.com

मंडळ अधिकारी दैनंदिनी बाबत काही शासन निर्णय आहे का किवा त्याबाबत त्यांना दर महिन्याला इस्तांक दिला जातो का म्हणजे फिरतीचे दिवस तसेच मुकाक्माची दिवस वगैरे माहिती द्यावी

This page was generated in 0.42 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3