जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अनिल वसव
16-01-2015
abhijitvasav@gmail.com
मा.श्री.पाणबुडे साहेब यांना धन्यवाद आपल्याला प्रश्न समजण्यासाठी पुन्हा सविस्तर मुद्दे खालीलप्रमाणे.
मुळची ८८ आर शेतजमिनीचे मालक कुलकर्णी हे होते.
कुलकर्णी यांनी वसव व शिर्के यांना १/३ हिस्से म्हणजेच २९.३३ आर प्रमाणे विकले व स्वतच्या नावे २९.३३ आर राहिले.
८८ आर मधील शेतजमीनीतील आमच्या पंजोबांचा ३ रा हिस्सा म्हणजेच २९.३३ आर हे क्षेत्र २०० रू. रोख देऊन १९५२ साली खरेदी केला.
पंजोबांच्या मृत्यूनंतर आजोबांचे नाव एकटा वारस २९.३३ आर क्षेत्रात लागले.
१९६७ मध्ये फेरफारला आजोबांचा मृत्यूनंतर माझे वडील व चुलते असे पाच जनाची वारस नोंद झाली
त्यानंतर १९७१ साली ग्रामपंचायतीने बगीचा करिता ८० आरची शासनाकडे मागणी केली.
त्यानुसार मा. तहसीलदार व भूसंपादन अधिकारी यांनी मूळ ८८ मधून ८० आर संपादीत केली.
संपादीत क्षेत्रा मधून राहिलेल्या ८ आर क्षेत्रामध्ये मध्ये वसव,शिर्के व कुलकर्णी यांना हिस्सा देण्यात आला.
हि संपूर्ण प्रक्रिया आम्हास मान्य नसल्यामुळे आमच्या वडील वा चुलते यांनी कोणताही मोबदला घेतला नाही तसेच या सुनावणीस हजर न राहिलेमुळे एकतर्फा निर्णय देण्यात आला.
आजपर्यंत आम्ही एकूण सर्व २० कुटुंबे या संपुर्ण जागेत आमचीच वहिवाट आहे.
ज्या कारणासाठी ग्रामपंचायतिला जमीन देण्यात आली त्या कारणासाठी आजतागायत कोणताही बागबगीचा लालेला नाही उलट इतर लोकांनी अतिक्रमण करून राहिलेली जागा अडवलेली आहे.
आम्ही १९७१ सालापासून २०१४ पर्यंत मा.जिल्हाधिकारी सो. ते मा.मुख्यमंत्री सो. यांचे कडे जमीन परत मागणी करता वेळोवेळी पाठ पुरावा केला परंतु आमची मागणी फेटाळली
आज आम्ही कोणाकडे न्याय मागवा याचे मार्गदर्शन करावे हि विनंती
अनिल साहेब ,
जमिनीचा वापर संपादन संस्थेने केला नाही , म्हणून मुल खातेदारास जमीन परत दिली जात नाही .
अश्या जागेचा लिलाव केला जातो . ( केरळ शाषण सर्वोच्च न्यायालय निकाल )
शाषण स्वत असा लिलाव करणार नाही . न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन , आपण न्यायालाय्त जा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by बालाजी सावंत
15-01-2015
Balaji.sawant44@gmail.com
शासकिय नोकरी भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना वयाची मर्यादा किती आहे?
पोलिस भरती साठी
Question by लक्ष्मन गोसावी
15-01-2015
laxmangosavi1@gmail.com
सर ,
मला कुल कायदा बद्दल सर्व माहिती पाहिजे ,तसेच कुळाचे किती प्रकार व कुळात पात्र होण्यास काय पाहिजे हि सर्व माहिती मला मिळावी हि नम्र विनंती
कुळाचे खालील प्रकार आहेत
१. सौरीक्षित कुल
२. कायमचे कुल
३. मानीव कुल
गोसावी साहेब , आपण महाराष्ट्र कुल्वहिवत व शेतजमीन अधिनियम १९४८ सविस्तर वाचा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
15-01-2015
rahul9619309796@gmail.com
सर आमचे आजोबा वारल्यानंतर आमच्या मोठ्या काकांनी वारस तपासणी केली होती तेव्हा त्यांनी कुटुंब प्रमुक म्हणून आपले नाव सातबारावर लावले व माज्या वाडिलांच्या व लहान काकानच्या नावाची नोंध गाव नमुना ६क मध्ये झालेली आहे पण सातबारावर नावे नाहीत . तरी आता आमचे मोठे काका वारलेले आहेत मोठ्या काकांच्या कुटुंबाकडून वारस तपासणी करीत असताना माज्या वडिलांचेहि नाव गाव नमुना ६क प्रमाणे वारस म्हणून लावन्यास ते चाल धक्काल करीत आहेत तर मी त्यांच्या शिवाय माझ्या वडिलांच्या नावाची गाव नमुना ६क प्रमाणे वारस तपासणीसाठी तळाठी कार्यालयात अर्ज करू शकतो काय ?
Question by नागेश
15-01-2015
nageshdachewar@gmail.com
माझी ग्रामपंचायत हद्दी मध्ये शेतजमिन आहे. मला या जमिनीवर गृह निर्माण योजना सुरु करायची आहे. त्यासाठी अकृषी परवाना कोणाकडे मिळेल ?
गावठाण जमिनीमध्ये akrushik परवानगीची गरज नाही ......................आपण नगर रचना विभागाकडून प्लान मंजूर करून घ्या वे त्याप्रमाणे बांधकाम करू शकता ...................
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजित बुरघाटे
15-01-2015
abhijit_burghate@rediffmail.com
नमस्कार, आपण हे संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन साहेब, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्याबद्दल बदली सुट्टी/रजा घेता येते काय?. याविषयी मार्गदर्शन करावे तसेच त्याविषयी असणारा शासन निर्णय देण्यात यावा. हि विनंती
या संकेत स्थलाद्वारे महसूल व अनुषंगिक विभाशी निगडीत प्रश्नाची उत्तरे दिली जातात .
इतर विभागाच्या प्रश्नाबाबत उत्तर माहित असल्यास त्याचे उत्तर दिले जाते .
१. वास्तविक सुटीचे दिवशी काम केले म्हणून , बदली रजा/ सुट्टी बाबत शाषण निर्णय नसावा . या बाबत कार्यालय प्रमुख निर्णय घेतात
२. आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी कि , शाशकीय कर्मचारी / निम शःश्कीय कर्मचारी , हे २४ तास कर्तव्यासाठी बांधील आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ratnnakar Ahire
15-01-2015
ratnnakar01@gmail.com
Aadiwasi v Mahar watan jamin kharedi vikri vyawahar mahiti
आदिवासी जमीन - बिगर आदिवासी साठी हस्तांतरण शाशानाचे पूर्व परवानगी शिवाय करता येत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
14-01-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर ,एखाद्या प्रकरणामध्ये मा.प्रांत साहेबांकडे अपील करावयाचे असल्यास वकिलांची आवश्यकता असते का?व्यक्ती स्वतः अपील दाखल करून आपले म्हणणे मांडू शकते का ?
व्यक्ती स्वतः अपील दाखल करून आपले म्हणणे मांडू शकते
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
14-01-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर ,७/१२ सदरी जी आणेवारी दाखल असते उदा.२ आणे,४ आणे ८ आणे याविषयी अर्थासहित कृपया मार्गदर्शन होण्यास विनंती ...
बर्याच नोंदी ह्या १ अन्ना ८ पैसे तसेच १ अन्ना १० पैसे अशा हिस्शेवारी दाखविणाऱ्या आहेत .....................त्यामुळे १६ अन्ने म्हणजे १९२ पैसे म्हणजेच १०० % हिस्सा हे बरोबर आहे .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
, एक आणा सहा पैसे चार आणा २४/२५ पैसे आठ आणा ४८/५० पैसे सोळा आणा ९६/१०० पैसे
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
१६ अन्ने म्हणजे १९२ पै= पूर्ण हिस्सा
८ अन्ने म्हणजे ९६ पै = अर्धा हिस्सा
४ अन्ने म्हनजे ४८ पै= पाव हिस्सा
१ अन्ना=१२ पै
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by महादेव गोरोबा शिंदे
14-01-2015
mahadeoshinde3594@gmail.com
महसुल विभागाच्या कर्मचार्यांना वन विभागात सेवा वर्ग होता येइएल काय
Question by nasir
13-01-2015
nasirpinjari@gmail.com
सर माझ्या वडिलांना ५ मुले/मुली आहेत. त्यांचा नावे असलेली ०.७५ हेक्टर जमीन त्यांनी मला खरेदिखाताने माझ्या एकट्याच्या नावे केली आहे . माझे बहिण भाऊ त्या जमिनीवर दावा करू शकतात काय
दावा करायला काहीही बंधन नाही ................प्रश्न दावा जिंकेल का हरेल हा प्रश्न आहे. .....त्यामुळे मी केलेल्या गुणात्मक बाबींचा विचार करून दावा दाखल करावा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
स्व अर्जेत असल्यस दावा नाही वडिलोपार्जित असल्यस दावा दाखल करू शकतात
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
बहिण भाऊ त्या जमिनीवर दावा करू शकतात..................परंतु दिवाणी न्यायालय हे जमीन विक्रीचे कागदपत्र , विक्रीची परिस्थिती , जमीन संपदांची स्थिती( वादिलोपार्जीय किंवा स्वकस्तार्जीत), विक्रीवेली आल्या बहिण भावांची वय इत्यादींच्या आधारे गुणात्मक निर्णय घेतील
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by रावडे सतीश
13-01-2015
ravdest.10@gmail.com
सर,एखाद्या आध्यात्मिक संस्थेस (नोंदणीकृत)बक्षिस पत्राने ईश्वरीय सेवेसाठी जमीन मिळाली असल्यास सदर जागेचा वापर न झाल्यास संस्था जमीन विकू शकते का ?त्यासाठी बक्षिसपत्र करून देनाराची संमती घ्यावी लागेल का?किंवा बक्षिस्पत्र करून देणारास पुन्हा जमीन मिळू शकते का ?..
बक्षीस पत्रा मध्ये , जमिनी चा उद्देश जर ईश्वरीय सेवा या कारणासाठी नमूद असेल तर , जमीन किक्त येणार नाही
मात्र जर देनाराची संमती असेल तर, जमीन विकत yeyil
मालमत्ता हस्तांतरण kayda कलम १२६ अन्वये , जमीनबक्षीस ज्या कारणासाठी दिलेली आहे त्या कारणासाठी वापर न केल्यास , बक्षीस रद्द होते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by बालाजी सावंत
12-01-2015
Balaji.sawant44@gmail.com
सर प्रकल्पग्रस्तांना कोणत्या शासकिय सवलती दिल्या जातात
१)प्रकल्पग्रस्त दाखला
२)नोकरीमध्ये काही ठिकाणी व काही प्रमाणांत राखीव जागा
३)प्रकल्पग्रस्ताने अगोदर तसा अर्ज व संपादनाच्या पैश्यापैकी ठरविक रक्कम घेतली नसल्यास दुसर्या ठिकाणी जमीन मागू शकतो
४)पुनर्वसनात गावठाण प्लॉट
५) पूर्ण जमीन संपादन झाली असली तरी जमीन घेताना जमीन आवश्यकच असावी अशी गरज नाही
... इत्यादी प्रकारचे लाभ प्रकल्पाच्या आकार व उद्देश्य यावर अवलंबून देत येतात
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by विनायक magar
12-01-2015
vinayakmagar3026@rediffmail.com
मौरुशी कुल म्हणून घेतलेली जमीन आहे.त्यावर काबिल्कास्त नोंद चुकून झाली आहे .पी १ पी २ वर भूमिधारी नमूद ahe तर ती नोंद कमी करता येयील kay
Question by मयूरेश मुकुंद पाटणकर
12-01-2015
mayureshpatankar@yahoo.co.in
साहेब माझे वडील मुकुंद पाटणकर एका जागेत भाड्याने 1976 पासून व्यवसाय करत होते. सदर जागा मालक मकरंद खरे यांनी इमारत दुरुस्तीचे कारन दाखवुन व नतर जागा देतो असे सांगून २ वर्शनपूर्वी आम्हाला जागा रीकामी करण्यास सांगितले. मात्र आता ते जागा देत नाहीत व् ईमारत दुरुस्त करत नाहीत. त्या जागेत वडिलांच्या नावाने विज मीटर आहे. तसेच गुहागर नगर पंचायत मध्ये आमचे नाव भोगवतदार म्हणून आहे. तर त्या जागेत आम्ही परत जाऊ शकतो का ?
गुहागर ला भाडे नियंत्रण कायदा लागू आहे का?
असेल तर , आपण मिळकतीचा ताबा मिळणे साठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा
इमारत दुरुस्त झाले नंतर भाडेकरू , इमारतीत राहू शकतो , त्याचा हक्क राहतो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदिप
10-01-2015
sandeepkumar@gemal.com
का कंञाटी पदावर ३६४ दिवस अथवा जास्त दिवस तात्पुरती पदोन्नती देण्यात आली असेल तर ३६५ दिवसानंतर त्या व्यक्तीला त्या पदावरून पदानावत करता येते किवा नाही?. याबाबत काही शासन निर्णय, न्यायायलीन निर्णय असल्यास मला देण्यास विनंती.
कंत्राटी कामगाराससेवेत, नोकरीत. कयाम करायचे असेल तर पद्दवनात करण्याची गरज नाही.
परंतु आपल्या प्रश्नावरून आपण शाशिकीय सेवेच्या अनुषंगाने विचारात आहत . असे वाटते
मम औदोगिक कलह कायदा १९४७ च्या कलम २५ न अन्वये , सलग १ वर्ष सेवेत असणार्या कामगारास , कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय सेवेतून , नोकरीतून काढता येत नाही
अश्या कामगारास अन्य कामगार कायद्याचे लाभ अनुद्नेया होतात .
कामगार कायद्यांचे वाचन करून निर्णय घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Santosh Nimbare
10-01-2015
nimbares@yahoo.co.in
sir, Maze ajoba ani tyancha ek motha bhau hota, ekatra sheti karayche, kul kaydyane ti jamin mothya bhavachya navavar zali, mazya ajobanche tyala nav lavale nahi. Mothe ajoba mayat zalya nantar tyanchya mulachya navi ti jamin zali. Tyana tin bhau ahet.Ata tya jamnila mazya vadilache anti ty tin bhavanche nave ahet. Mothya bhavach mulaga vatap karaycha mhanto pan tya jaminitil ardha vata magato ani ardya vataa tumhi tighani vatun ghya ase sangato. To tya jaminicha ardha hissa karun aplya navi karu shakto kay ? ani jar tyane ase kele tar amhi kay karave.
आजोबा आणि भाऊ एकत्र कसत असलेने , ते दोघे कसतपरंतु आपले चुलत आजोबांचे नाव ७/१२ सदरी ३२ ग किंमत निक्क्क्षित होऊन लागले . चुलतआजोबामयत झाले वर , त्यांचा मोठा मुलगा म्हणजे आपलेचुलतचुलते यांचे नाव लागले , त्या नंतर चुलतचुलते , त्यांचे दोन भाऊ व आपले वासिलांचे नाव मिल्कातीस लागले.
मोठे चुलत चुलते वाटप करू एशितत , चुलत आजोबा व आजोबा या दोघांचा कायद्याने अध हिस्सा आहे
म्हज्जे तुम्क्क्षे तीन चुलत चुलते यांचा अर्धा हिस्सा तर वडील यांचा अर्धाहिस्सायाप्रमाणे वाटपहोमे अब्श्यक
जात मोठेचुलतचुलतेऐकत नसतील. तर दिवाणी न्यायालाय्त दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सीमा धंदे- भदाणे
09-01-2015
seema8sc@gmail.com
सर जर जमीन महाराष्ट्र शासन राखीव वने असा कब्जेदार सदरी ७/१२ वर असेल तर अशी जमीन खरेदी करता येते का? असल्यास कशा प्रकारे करता येईल ? कृपया मार्गदर्शन करावे ...
कब्जेदार सादरी राखीव वने असेल तर ती , जमीन राखीववन आहे
त्यामुळे तीखरेदी करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुरेश kale
09-01-2015
sureshk515@gmail.com
एखादा शासकीय अधिकारी (वर्ग २)सेवानिवृत्त झाल्यानंतर DE (साधारण प्रकरण)चालू झाल्यास पेन्शन चालू आहे परंतु ग्रज्युएति ची रक्कम मिळाली नाही.ती मिळू शकेल का ?
Question by गणेश शिंदे
09-01-2015
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,मा.तहसीलदार साहेबांकडे तक्रार केसचा निकाल लागल्यानंतर सदर केसची पूर्ण साक्षांकित नकल(रोजनाम्यासाहित दाखल असलेली सर्व कागपत्रे) अर्ज केल्यास अभिलेख कक्षातून मिळू शकतात का?
Question by अनिल वसव
09-01-2015
abhijitvasav@gmail.com
१९७० साली ८८ आर शेतजमीनीतील आमच्या आजोबांचा ३ रा हिस्सा म्हणजेच २९ आर हे क्षेत्र आमच्या पणजोबानी २०० रू. रोख देऊन १९५२ साली खरेदी केलेली होती.१९६७मध्ये फेरफारला आजोबांचा मृत्यूनंतर माझे वडील व चुलते यांची वारस नोंद झाली त्यानंतर १९७१ साली ग्रामपंचायतीने बगीचा करिता ८० आरची शासनाकडे मागणी केली त्यानुसार मा. तहसीलदार व पु. अधिकारी यांनी अवार्डच्या सुनावणीला बोलावले परंतु आम्ही हजर राहिलो नसल्याने सुनावणी एकतरफा होऊन दोनभाग करण्यात आले ८ आर मध्ये ३ रा हिस्सा आम्हास देण्यात आला आजपर्यंत आम्ही सर्व २९ आर याजागेमध्ये व्यवसाय व रहिवाशी आहे. मा. जिल्हाधिकारी व मा.मुखमंत्री कार्यालय यांचाकडे जमीन परत मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत.आजपर्यंत आम्हास यश मिळाले नाही कृपया आम्हास कायदेशीररीत्या मार्गदर्शन मिळावे.
प्रश्न. विस्ताराने मांडणे आवश्यक आहे
१. तुम्क्क्षे मालकीची जमीन , भू साम्पानाशिवाय ग्राम्पांच्यात मागू शकत नाही
२. २९ गुंठे पैकी ८ गुंठे बगीचा करिता गरम पंचायत ने घेतले असले तर , २९गुंठेजमीनतुम्क्क्षे ताबे कब्जात न राहता , २१ गुंठे क्षेत्र राह्यला पाहिजे होते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राहुल सावंत
08-01-2015
rahul9619309796@gmail.com
सर आमचे आजोबा वारल्यानंतर आमच्या मोठ्या काकांनी वारस तपासणी केली होती तेव्हा त्यांनी कुटुंब प्रमुक म्हणून आपले नाव सातबारावर लावले व माज्या वाडिलांच्या व लहान काकानच्या नावाची नोंध गाव नमुना ६क मध्ये झालेली आहे पण सातबारावर नावे नाहीत . तरी आता आमचे मोठे काका वारलेले आहेत मोठ्या काकांच्या कुटुंबाकडून वारस तपासणी करीत असताना माज्या वडिलांचेहि नाव गाव नमुना ६क प्रमाणे वारस म्हणून लावता येईलकाय
Question by upendra uddhav keskar
07-01-2015
upendrakeskar@rediffmail.com
महोदय ,माझी नवीन शर्त असलेली ४.५ एकर शेती विकावयाची आहे .सदरची शर्त शेती महामंडळाची आहे १९७१ साली मिळालेली जमीन आहे. विक्री साठी परवानगीची गरज आहे का?
होय. नविन शर्थिच्या जमिनीच्या विक्रीला पुर्व परवानगी आवश्यक आहे
Reply by श्री. महेश शेवाळे | उप जिल्हाधिकारी
Question by Viraj
06-01-2015
vvm.prod@coep.ac.in
Sir
I have 15 gunthe shet jamin at madhevadgaon tal- Shrigonda but not having seperate 7/12 extract. it is total of 546 gunthe.I would like to start a industry in that land
1) What I need to make that 15 gunthe land as N.A. land
2) Is it possible to start small agro based industry in that land.
3) Which permissions I need to take
जर मिळकत औद्योगिक शेत्रात असेल ( zone ) तर , म.ज.म अ १९६६ चे कलम ४४ अ प्रमाणे , बिन शेती परवानगीची गरज नाही
तसेच नवीन अध्यादेशानुसार नुसार , बिनशेती परवानगी गरज नाही
मात्र बांधकाम परवानगी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियान द्वारे आवश्यक जर मिळकत , प्रादेशिक योजनेत असेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण १५ गुंठेसाठी अकृषक परवानगी घेऊ शकता ...............आपणास अकृषक परवानगी मिळाल्यावर आपण उद्योग सुरु करू शकता .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by सागर काळे
06-01-2015
sagarkale83@rediffmail.com
सर/मॅडम,
मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सध्या प्रसिध्द केलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेस बसणेस इच्छुक आहे. माझी एक अशी शंका आहे की, आयोगाने नुकताच “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या यापुढे घेतल्या जाणा-या परीक्षेच्या कोणत्याही
टप्यावर मागासवगीर्यांना देय असलेली वय / परीक्षा शुल्क तसेच इतर पात्रता विषयक अटी / निकषांसंदभार्त
सवलत उमेदवारांने घेतली असल्यास अशा उमेदवारांची अमागास वगर्वारीच्या पदावर श्िाफारस करण्यात येणार
नाही” असा निणर्य घेण्यात आलेला आहे.
माझे वय सध्या 31 वर्षे असून मी मागासवर्गीय प्रवर्गातील आहे. समजा मी या प्रक्रियेमध्ये अमागास प्रवर्गास असलेले शुल्क भरून परीक्षा दिली व अंतिम टप्पयामध्ये माझे मेरिटमध्ये नाव आेपनमध्ये बसले नाही तर आयोग माझ्या नावाची शिफारस मागासवर्गीयांच्या यादीमध्ये करणार का
नाही
कृपया खालील निकालपत्र वाचा
Union of India Vs. Ramesh Ram & Ors. etc.
CIVIL APPEAL NOS.4310-4311 OF 2010
[Arising out of SLP (C) Nos.13571-72 of 2008]
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
कृपया परिपूर्ण व अचूक माहितीसाठी आयोगाकडे चौकशी करावी .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
