जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

इनाम वर्ग 6ब (महार वतन) जमीन खरेदी केल्‍यानंतर पुन्‍हा नवीन जमीन खरेदी धारकाला पुढच्‍या वर्षी विक्री करता येते का ? तसेच जर 2014-15 रोजी इनाम वर्ग 6ब ची जमीन शेतीसाठी खरेदी घेतेवेळी 50% नजराणा रक्‍कम भरली असेल तर व जमीन खरेदी दाराला जर पुढच्‍या वर्षी पुन्‍हा शेतीसाठी सदर जमीन विक्री करताना 50% नजराणा रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे किंवा कसे ? मार्गदर्शन होणेस विनंती

Question by Neha
03-02-2015
neha_kulkarni_2001@yahoo.com

बक्षिसपत्र जमीन विकता येते का?
या जमिनीवर इतर कोणी हक्क, जे वारसदार नाही , सांगत असेल तर काय करावे?
बक्षिसाने मिळालेली जमीन विकत येते.....हक्क सांगणार यांना सांगू देत तो दिवाणी कोर्टाचा विषय आहे .

Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

महोदय
पुनर्वसन शेत जमीन मिळाल्यानंतर किती कालावधीनंतर विकता येते आणि त्यासाठी कुठल्या परवानगीची आवश्यकता आहे, याची माहिती मिळावी
संपादित होणार्या जमिनीच्या विक्रीस परवानगीची गरज असल्यास , पुनर्वसित क्षेत्रात मिळणारी जमीन त्याच धारणा प्रकाराने मिळते . म्हणजे संपादित झालेली जमीन वर्ग-२ ची असेल तर , पुनर्वसित क्षेत्रात ( लाभक्षेत्रात ) दिली जाणारी जमीन , वर्ग २ धारणा प्रकारची मिळते .
लाभक्षेत्रात दिलेली वर्ग २ जमीन १० वर्षापर्यंत विकत येत नाही . १० वर्षानंतर , शाषन शुल्क ( Premium ) भरून विकत येते .

कलम १६ (१) (ब) (इ) - महाराष्ट्र प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन कायदा 1999

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय
वडिलोपार्जित जमीन नावावर असताना इतर चुलत भाऊ वहिवाट करून देत नसतील तर जमीन ताबा मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
आपणास दिवाणी न्यायालयात , ताबा मिळणे बाबत व चुलत भाऊ यांना मनाई करणे बाबत दावा करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझी वडीलोपारजीत जमीन असून माझे वडील मयत आहेत आम्ही तिन भाऊ एकत्र राहतो माझा प्रश्न असा आहे माझ्या थोरल्या भावाने एकत्रीत क्षेत्रातील चार महीनयापुरवी चार एकर जमीन आमच्या संमतीशिवाय चार खरेदी दिले आहे ही बाब लक्षात आली आहे तरी त्याला विचारले असता त्याची पण फसवणूक झाली आहे तलाठी कार्यालय मधुन कुठलेही नोनोटीस बजावली नाही सर आम्हाला यातील मार्गदर्शन लवकर करावे ही विनंती
आपले क्षेत्रापुरते खरेदी खात रद्द करणे बाबत दावा दाखल करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

फसवणूक म्हणजे नक्की काय झाले आहे ?
फसवणूक बाबत आपणास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा लागेल
भावाने तुमच्या हिस्सायाची जमीन , विकली असेल अशे खरेदी रद्द करणेसाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा खरेदी खताचे अनुषगाने होणार्या फेरफार नोंदीस तलाठी/मंडळ अधिकारी यांचे कडे हरकत दाखल करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

इनाम वर्ग 6ब (महार वतन) जमीन खरेदी केल्‍यानंतर पुन्‍हा नवीन जमीन खरेदी धारकाला पुढच्‍या वर्षी विक्री करता येते का ? तसेच जर 2014-15 रोजी इनाम वर्ग 6ब ची जमीन शेतीसाठी खरेदी घेतेवेळी 50% नजराणा रक्‍कम भरली असेल तर व जमीन खरेदी दाराला जर पुढच्‍या वर्षी पुन्‍हा शेतीसाठी सदर जमीन विक्री करताना 50% नजराणा रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे किंवा कसे ? मार्गदर्शन होणेस विनंती
सदर जमीन विक्री करताना पुन्‍हा 50% नजराणा रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

महसूल विभातून वन विभागात सेवा वर्ग होते का ? क्रपया मार्गदर्शन व्हावे.
सेवा वर्ग होत नाही
आपणास भरती प्रक्रिये द्वारे वन विभागात प्रवेश करता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by narshing
02-02-2015
narshingtugave@gmail.com

Sir Namste
Sir Mahangar palika yriyamadhe mahsul khatyala vasuli krnyacha adhikar aahe ka ? mahanagr palika pn binsheticha tax vasul krtat v tahsil office pn vasul krto .Nemke konala vasuliche adhikar aahet mahanagar palike madhe asnarya gavachi vasuli krnyache adhikar tahsil officela aahet ki mahanagarpalikela ? jr tahsil officela binsheti tax vasul kraycha adhikar asel tr kontya shasn nirny aahe ka ? mahanar palika pn tax v tahsil office pn tax gola krtat tyamul nemka adhikar konala aahe vasulicha ?
महानगर पालिका क्षेत्रात बिनशेती आकार वसूल करण्याचा अधिकार महसूल विभागास आहे
प्रकरण XI - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by narshing
02-02-2015
narshingtugave@gmail.com

sir kharya khurya aavdogik proyojnasthi bhogvtdar varg 2 chi jmin kharedi kru shakto ka ? v tyasathi collector chi permission lagte ka ? tsech ykun kiti njrana bharava lagto ? tasech kharya khurya prayojnasathi vapr kraycha asel tr registri madhe aavdogik prayojnasathi mhnun registeri kravi lagte ka ? v aavdogik prayojnasathi jr jmin kharedi kraychi sel kiva krnyasathi to area aavdogik zone mhnun mnjur zalela pahije ka ? Tahsildar yanche kadil ptr aahe ki 2 pt njrana bharun 149 /150(2) pramane karyvahi tatkal kra ase ptrat mhnle aahe e brobr aahe ka ? Thodisi deetel mahiti milavi
१. आपण कलम ६३-१ अ वाचा . खर्याखुर्या औद्योगिक कारणासाठी आपण वर्ग २ ची जमीन खरेदी करू शकता .
२. १० हेक्तर पेक्षा क्षेत्र कमी असल्यास परवानगीची गरज नाही , मात्र १० हेक्तर पेक्षा क्षेत्र जादा असल्यास , आयक्त विकास यांची परवानगी घेणे आवश्यक
३.खरेदी खतात औद्योगिक वापर लिहिणे तर आवश्यकच आहे पण अशी खरेदी केलेली जमीन ५ वर्षात औद्योगिक वापरात आणली पाहिजे
४.तहसीलदार यांचे पत्र बरोबर आहे - होणार्या खरेदी खताचे अनुषगाने फेरफार नोंद मंजूर करण्याचे दृष्टीने

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझी वडीलो पारजीत जमीन असून माझे वडील मयत आहेत आम्ही तिन भाऊ एकत्र राहतो माझा प्रश्न असा आहे माझ्या थोरल्या भावाने एकत्रीत क्षेत्रातील चार एकर आमच्या संमतीशिवाय चार महीनयापुरवी खरेदी दिले ही बाब आमच्या लक्षातआली तलाठी कार्यालयामधुन आम्हाला कोणतेही नोटीस आले नाही भावाला विचारले असता त्याची पण फसवणूक झाली आहे सर आम्हाला यातील मार्गदर्शन करावे ही विनंती
वाटप झालेले नसल्‍यास सर्वांचा समान .हिस्‍सा गृहीत धरला जाताो. थाोरल्‍या भावाने त्‍याच्‍या .हिस्‍स्‍याचे क्षेत्र सहधारकांच्‍या संमतीने .विकणे अपेक्षीत आहे. संबंधीत .विक्री फेरफारा.विरूध्‍द प्रांताकडे अपील दाखल करू शकता.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर
मी पुणे जिल्यात खेड तालुका हद्दीत धानोरे गावा लागत १००० चौरस फुट जागा घेत आहे. मी आणि माझे मित्र एकून ११ गुंठे गेट आहोत तर सर्वांचे वेगवेगळे खरेदी खत होईल का. आम्ही एक एजंट कडून जागा घेत आहोत तरी काय अडचण येईल मार्ग दर्शन करावे.
मी आणि माझे मित्र ११ गुंठे घेत आहोत , पण आपण किती मित्र ११ गुंठे घेत आहात ?
जात जमीन बिन शेती असेल तर , क्षेत्र बिन शेती आदेशातील भूखंड प्रमाणे घेऊ शकता
मात्र जमीन शेती असल्यास , बागायत शेत्र कमीत कमी ५ गुंठे , भात शेती अथवा एक पिकी १५ गुंठे व जिरायत असल्यास २० गुंठे असणे आवश्यक आहे

११ गुंठे क्षेत्र जमीन काय स्वरुपाची आहे ? त्या वर अवलंबून आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
माझ्या वडिलांच्या नावे २ एकर शेती आहे.तर ते अल्प भूधारक आहे का. शेती पुणे जिल्यात आहे आणि बागायती आहे. उत्तर मिळावे.
धन्यवाद
भूसंपादन योग्‍य नुकसान भरपाईचा अधिकार व स्‍थानांतरण, पुनःस्‍थापना आणि पुनर्वसन अधिनियम २०१३ नुसार

अल्पभूधारक( Small Farmer ) म्हणजे -२.५ एकर बागायती / ५.० एकर जिरायती क्षेत्र धारण करणारा शेतकरी

अत्यल्प भू धारक ( Marginal Farmer ) म्हणजे - १.२५ एकर बागायती / २.५ एकर जिरायती क्षेत्र धारण करणारा शेतकरी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

भूसंपादन योग्‍य नुकसान भरपाईचा अधिकार व स्‍थानांतरण, पुनःस्‍थापना आणि पुनर्वसन अधिनियम २०१३ नुसार

अल्पभूधारक( Small Farmer ) म्हणजे -२.५ एकर बागायती / ५.० एकर जिरायती क्षेत्र धारण करणारा शेतकरी

अत्यल्प भू धारक ( Marginal Farmer ) म्हणजे - १.२५ एकर बागायती / २.५ एकर जिरायती क्षेत्र धारण करणारा शेतकरी

आपले शेतीचे स्वरूप काय आहे ?
बागायती कि जिरायती ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर ,
ऐका खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने माझे वडील हयात असताना आमच्या शेत जमिनीवर विनापरवानगी अतिक्रमण करून २८ वर्षापूर्वी इमारत बांधली आहे ते 14 वर्षापूर्वी निवर्तले त्याचे नंतर सर्व देखभाल माझी आई करत होती ती पण 10 महिन्यापूर्वी निवर्तली त्यानंतर मी कायदेशीर जमीन मोजणी करून घेतली असता १९.५ आर जमिनीवर अतिक्रमण असल्याचे दिसून आले हे अतिक्रमण कसे दूर करता येईल माझे नावे {3 हिस्सेदार } मिळून फक्त ४७ आर जागा आहे संस्थेने N A परवानगी घेतलेली नाही फक्त ग्रामपंचायती मधून N O C घेतली आहे . हे अतिक्रमण कसे दूर करता येईल कृपया मार्गदर्शन करा
आपण खूपच विलंब केलेला आहे .
२८ वर्षे अतिक्रमण झाले नंतर आपण आता , अतिक्रमण दूर करू ईश्हिता .
प्रथम आपण शाषण दरबारी म्हणजे तंत्र शिक्षण विभागाकडे अतिक्रमण दूर करणे बाबत अर्ज करा. त्या नंतर आपणास न्यायालयच न्याय देऊ शकेल
अतिक्रमण दूर जरी झाले नाही तरी , नुकसान भरपाई मिळू शकते
आपण अथक प्रय्तन करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

jaminichi chate phode karaychi ahe 7/12 la bahini dharun 12 jan waras ahet tyay 5 jani bahini asun baki bhau ahet tyatil 4 bahini expire zalya ahet tar tyanche mrutyu patra dakhaun tyanchi nave kami karta yatil ka wa khate phod karta yeil ka ka mayat bahininchya warsanchi nave 7/12 wawawi lagtil
१. बहिणी मयत झाल्यावर त्यांचे वारसांची नावे लावणे आवश्यक
२. बहिणीच्या वारसांनी नोंदणीकृत हक्क सोड पत्रक करणे आवश्यक तरच त्यांची नावे कमी होतील

३. मुल वारस १२ , त्यापैकी काही मयत , म्हणजे आताचे वारसांची संख्या १२ पेक्षा जादा असणार . त्यामुळे खातेफोड करताना तुकडे बंदी व तुक्देजोस कायद्याचा विचार करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

स्‍थायित्‍व प्रमाणपत्र मिळण्‍याकरीता काय करावे लागेल, त्‍याचे निकष काय आहेत.

Question by Ram Phadatare
30-01-2015
ram.p.phadatare@gmail.com

Civil courtaat malaki hakkabaabad dawa chalu astana jaminichya 7/12 record la iter adhikarat asnari nave bhogwatdar sadri gheta yetat ka?

tyala kalam 85 cha baadh yeto ka?
दावा चालू असताना ७/१२ सदरी नावे घेण्यास बाधा नाही
मात्र न्यायालयाचा मनाई हुकुम असता कामा नये
कलम ८५ जमीन वाटप संबंधी आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या पंजोबा नी १९४३ मध्ये भावबंधा कडून जमीन खरेदी केली होती तरी त्याचं नाव इतर अधिकारात आहे व कब्जेदार नाही दिसत ती जमीन आम्ही १९७२ च्या दुष्काळ पर्यंत करत होतो परंतु दुष्काळ मुळे रोजगार साठी आम्ही बाहेर गावी कामासाठी गेलो आता गावी आलो तर त्या मध्ये खूप नावे लागली व त्यांचा कोणता हि प्रकार चा वहिवाट नसताना हि त्यांच्या अधिकार दाखवत आहे व एक सर्व्हे नंबर चे १० गट केले आहे .आता आम्ही राहायला आलो तर आम्हाला देत नाही सर्व कागद दाखून व वरिष्ठ व महसूल विभागाला अर्ज करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही व महसूल विभागात रेकॉड पण देत नाही. साहेब आम्ही आता काय करू साहेब.
आपले गावी एकत्रीकरण योजना झाली असावी , त्यावेळी आपण बाहेर असल्याने , Survey ऑफिसर ने वाहिबातीप्रमाणे नावे दाखल केली असतील
आपले खरेदी कागद घेऊन SLR यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by navnath more
30-01-2015
justnavnath@gmail.com

kharedi dast zalenantar kharedi denara nond honyapurvich mayat zala aasel tar...nondi babat kay nirnay gyava.
नोंद घेण्यास हरकत नाही तथापि
१. मृत्य झालेल्या विक्रीदाराचे वारसांना notice देणे आवश्यक आहे.
२. वारसांची खरेदी खताचे खरेपणाबद्दल हरकत नसावी
३. कलम १४९ व १५० मध्ये नमूद सर्व सोपस्कार पार पडणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

बिनशेती आदेश पारित केल्‍यानंतर त्‍यापुढे किती वेळा मुदतवाढ देता येते.
सदर मुदत वाढ घेण्यासाठी करवायचा अर्ज व त्यासंबंधीची माहिती असणारी website कोणती?
पूर्वी तात्पुरती ( काही कालावधीसाठी ) परवानगी देण्याची तरतूद होती . तद्नंतर कायमची परवानगी देण्या बाबत शाश्नाचे आदेश होते
आता कलम ४४ मध्ये दुरुस्ती झाली आहे
बिन शेती परवानगी गरज नाही .
विकास परवानगी घेणे आवश्यक
दुर्द्ध्वनीवर , विलास भोसले यांचेशी बोलणे झालेप्रमाणे ( तसेच आपला mail ) आलेनंतर , दुरुस्त कलम ४४ अधिसूचना प्रत पाठवली आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सहा वर्षापूर्वी शासनाने माझी जमीन साठवण तलावासाठी ताब्यात घेतली आहे.अजून एकही पैसा मोबदला मिळालेला नाही.शासनाकडे अनेक पत्रे पाठवली,पण एकदाही लेखी उत्तर आलेले नाही.काय करावे?न्यायालयात जावे लागेल काय?
भूसंपादन प्रकरणतील निवडा झालेवर मोबदला मिळेल .यंत्रनेनी भूसंपादन प्रकरण शिवाय ताबा घेतला असलास नायालयात जावे

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

Question by Ganesh Belge
29-01-2015
belageganesh1612@gmail.com

शासनाचे पती-पत्नी एकत्रीकरणाचे धोरण काय आहे व त्याबद्दल शासन निर्णय आहे का
शाषण परिपत्रक क्रमांक . यास. आर .व्ही -१०९७/प्र. क्रं २०/९७/बारा दिनांक २७/११/१९९७
परिच्छेद क्रमांक १०

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा किरण पाणबुडे साहेब
उपजिल्हाधिकारी

महोदय
मी विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या माहितीबद्दल, आपण जि काही सर्व माहिती मला दिली त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.
धन्यवाद सर
सर मी माहाराष्ट्र शासनाच्या ऐका विभागात कंञाटी कम॔चारी मनूनं वाहनचालक या पदावर दोनवर्षा पासूनच काय॔रत आहे सर मला विभागाचा आस्थापनी दोनदा ऐका दिवसचा तांञीक खड दिला व सेवा सरळ केली पंण ज्या दिवशी तांञीक खड दिलात्या दिवशी मी कामावर हजर होतो
तशी नोंद हजरी रजीट॔र व
वाहन लोग बुक मध्य आहे सर मंग मला

मम औदोगिक कलह कायदा १९४७ च्या कलम २५ न अन्वये , सलग १ वर्ष सेवेत असणार्या कामगारास , कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय सेवेतून , नोकरीतून काढता येते का व
अश्या कामगारास अन्य कामगार कायद्याचे लाभ अनुद्नेया होतील का कुपया माहिती द्यावी ही विनंती .
धन्यवाद सर
संदीपजी
कायद्याची प्रक्रिया पार पडल्याशिवाय कोणालाही सेवेतून काढता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

इनामवर्ग ६ब जमीन मधील ३ आर क्षेत्राचे खरेदीखत होऊन नवीन शर्तीमुळे नोंद रद्द झाली.त्यामुळे मूळ मालक सदर जमीन विकीकामी मा.जिल्हाधिकारी साहेबांकडून परवानगी घेऊन dusarya व्यक्तीस जमीन विकणार असेल तर पूर्वीच्या खरेदिखातामुळे शर्तभंग होऊ शकतो का?पूर्वी खरेदीखत करून घेतलेल्या व्यक्तीची कोणतीही हरकत नाही .अशा वेळी चालू बाजारभावाच्या ५०% कि ७५% नजराणा भरावा लागेल?कृपया मार्गदर्शन करावे..
शर्तभंग झालेला आहे. शर्तभंग प्रस्‍ताव पाठवण्‍यासाठी प्रयत्‍न करा.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by tushar shewale
27-01-2015
tsshewale@gmail.com

सर,
सरकारी मुफ्त jaminitil निरंतर कायम लिलाव द्वारे मिळालेल्या भूखंडाची फेरविक्री बाबत कृपया मार्गदर्शन
करावे हि विनंती.
शाश्नाचे परवानगी शिवाय विक्री करता येत नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नवीन शर्त काढण्यासाठी काय करावे लागते आणि किती खर्च येतो या बद्दल सविस्तर माहिती सांगा.
त्यास कोणती शर्त आहे त्यानुसार कलेक्टर/ विभागीय आयुक्त यांची परवानगी लागते.


Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3