जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by संतोष जवरे
23-12-2014
jaware_sb@rediffmail.com
एका खातेदाराची 0-००-२ हे.आर. जमिनीचा स्वतंत्र ७/१२ उतारा असून इतर हक्कात तुकडा नोंद आहे. ती जमीन त्याने रजिस्टर दस्ताने दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली आहे. तर असा वेळी खरेदीखतानुसार फेरफार मंजूर करता येईल का?
कायदा अंमलबजावणी सुरवातीपासून सदर जमिनीचे क्षेत्र तुकडा म्हणून नोंद असेल तर फेरफार मंजूर करण्यास हरकत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
23-12-2014
jaware_sb@rediffmail.com
एक खातेदार मयत झाल्याने वारस म्हणून पत्नीचे नाव ७/१२ सदरी दाखल झाल्याने तीने संपूर्ण क्षेत्राची रजिस्टर दस्ताने विक्री दुसऱ्याला केली. पंरतु मयत खातेदाऱ्याचे आईने वारस फेरफार विरुध्द हरकत / अपिल दाखल केल्याने आईचे नाव सहहिस्सेदार म्हणून ७/१२ सदरी उपविअ यांचे आदेशाने दाखल झाले आहे. सदर जमिनीचे खरेदीखता विरुध्द तक्रार रजिस्टर दाखल झाले आहे तर खरेदीखत हे संपुर्ण क्षेत्राचे आहे. तर काय करणे अपेक्षित आहे.
प्रांत अधिकारी यांचे निकालाची अंमलबजावणी करणे अपेक्षित
निकाल वैधतेबाबत आपणास हरकत घेण्याचा प्रश्न नाही
निम्म्या क्षेत्रास आई चे नाव लावणे
प्रश्न दिवाणी स्वरूपाचा आहे
वास्तविक खरेदी झालेनंतर , आई चे नाव लावणे बाबत , निकाल देत येणार
मालमत्ता हस्तातरण कायदा कलम ४२ प्रमाणे , खरेदी करणारा याने दिवाणी न्यायाय्लाय्त Bonafide purchaser संपूर्ण क्षेत्रास तो मालक असले बाबत जाहीत करून मिळणे बाबत दावा दाखल करणे आवशयक
तुमचे स्तरावर प्रांत अधिकारी यांचे निकालाची अंमल बजावणी करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप
23-12-2014
pzunjaruk1@gmail.com
कुनबी चे सर्व रेकॉर्ड पुणे जिल्ह्यातील आहे.
१९६० पूर्वीपासून आम्ही अहमदनगर जिल्ह्यात राहतो. तरी कुनबी दाखल्यासाठी प्रस्ताव कुठे सादर करावा?
Question by विजयसिंग भास्करराव देशमुख
23-12-2014
vijaysingdeshmukh@gmail.com
प्रश्न:- आजोबांच्या नावे २२ गुंठे जमिन होती . त्यांनी त्यातून २१ गुंठे जमिन वेगवेगळ्या व्यक्तींना विकली .सन २००५ ला आजोबा मयत झाले आहे.परंतू तलाठ्याने संपुर्ण क्षेत्र विकले आहे असे समजून आजोबांच्या नावाला कंस मारला आहे.परंतू तिथे १ गुंठा जागा शिल्लक आहे.तेव्हा क्षेत्र दुरूस्ती होऊन मिळण्यासाठी काय करावे.
()
म.ज.म.अ १९६६ चे कलम १५५ प्रमाणे दुरुस्तीसाठी तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रशांत सुरे
22-12-2014
prashant_sure@yahoo.com
एखाद्याला फार्म हौस चा प्लॉट खरेदी करायचा असेल तर त्याला शेतकरी असणे अवश्यक आहे की बिगर शेतकरी व्यक्ती अशी जमीन खरेदी करू शकतो का ?.तसेच एखाद्याला शेतकरी म्हणून दाखला अवश्यक असल्यास तो मिळवण्यासाठी कायद्यातील तरतूद सांगावी ही विनती
बिगर शेतकरी व्यक्तीस शेत जमीन खरेदी करण्यासाठी , जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक .
मात्र शेतीसाठी जमीन खरेदी करावयाची असल्यास १२०००/- पेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश फेगडे
22-12-2014
nileshfegade@yahoo.co.in
नमस्कार सर,
आम्ही फेब्रुवारी २०१४ ला ४ एकर शेती विकत घेतली आहे. आमची एक चूक अशी झाली कि टोकन देण्यापूर्वी आम्ही जमिनीचा सर्वे केला नाही आणि registration झाल्यानंतर आम्ही ३ सरकारी सर्वेयार कडून प्रायवेट सर्वे केला आणि प्रत्येकांनी जागा सरकलेली असल्याचे सांगितले पण प्रत्येकांनी दाखविलेली जागा वेग-वेगळ्या ठिकाणी येते आणि ६०-७० meter सरकलेली दिसते.
सर्वांच म्हणन असं आहे कि तिथे आता प्रर्यंत कोणी सर्वे केला नसल्याकारणाने अडचणी येत आहेत आणि ते असेही म्हणतात कि सरकारी सर्वे करयचा असेल तर सर्व जागा साफ करून द्यावी लागेल आणि वहिवाट दाखवावी लागेल.
कृपया करून मार्गदर्शन करावे,
१. जागा खरोखर खूप सरकलेली असेल तर आम्ही करायला पहिजे?
२. सरकारी सर्वेयर ला सगळी जागा साफ करून देण हे जरुरी आहे का?
३. जागा तंतोतंत शोधण्यासाठी काही नवीन technolgy कार्यरत आहे का?
धन्यवाद.
आपण खरेदी केलेल्या क्षेत्र प्रमाणे हद्दी जुळत नाहीत किव्न्हा ७/१२ वर नमूद खेत्र प्रमाणे , प्रत्यक्ष क्षेत्र जुळत नाही
अश्या स्थित , आपणास हद्दी दाखवावी लागेल
तसेच लगतचे खातेदारांनी आपले वाहिवातीस ( पूर्वाश्रमीचे मालक ) मान्यता देन आवश्यक
जर वाहिवती बद्दल वाद असेल तर , ७/१२ प्रमाणे हद्दी निच्छित करून मिळणेबाबत, दिवाणी न्यायालाय्त दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वैभव
20-12-2014
vaibhav.wagh1985@gmail.com
नमस्कार सर,
* माझ्या आजोबांनी १० वर्षापूर्वी ०२ एकर शेतजमीन 'अ' या माणसाला विकली आहे. हि शेतजमीन वारसाहक्कने माझ्या आजोबाच्या नावे आलेली होती. वारसाहक्क पत्रात त्यावेळी आजोबाची बहिणीची नावे आलेली होती, 'अ' माणसाला विकलेले जमिनीच्या खरेदी खतामध्ये आजोबाची बहिणीची आणि आजोबाची मुलांची कुणाची हि संमती अथवा सही नाहीये. तर आता माझ्या आजोबाची बहिणीची किवा आजोबाची मुलांची काही फायद्याची बाब करता येऊ शकते का ?
Question by वैशाली तोटे
20-12-2014
vaishalirudre@gmail.com
नमस्कार, मी जिल्हाधिकारी कार्यालय ,जालना येथे लिपीक(अनु.जमाती-महीला) पदावर 7.10.10 पासुन कार्यरत असुन महसुल अर्हता परीक्षा पहील्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहे तरी अ.जमातीतुन दोन लिपीक माझया नंतर परीक्षा उत्तीर्ण झाले असून रुजु माझया अगोदर झालेले आहेत करीता अव्वल कारकुन पदावर पदोन्नती ही रुजु दिनांकावर ग्राहय धरली जाते की महसुल अर्हता परीक्षा कोणी प्रथम उत्तीर्ण केली यावर ग्राहय धरली जाते याविषयी मार्गदर्शन करावे तसेच त्याविषयी असणारा शासन निर्णय देण्यात यावा
आपले नंतर जरी पर्क्षा उत्तीर्ण झाले असली तरी , दिलेल्या संधी कलावादी उत्तीर्ण झाले असतील तर , सेवा ज्येष्टतेनुसार , ज्येस्तठा निच्छित केली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vitthal Lotu Tayade
20-12-2014
vitthaltayade5@gmail.com
साहेब मला विचारायचं कि आम्ही बिल्डर कडून याने नसलेल्या जमिनीवर बांधलेली घरे विकत घेतलेली आहे . बिल्डरने ती जमीन देवोल्पिंग म्हणून घेतलेली . आत्ता आम्हाला तिथे सोसायट्य करावायची आहे तर सदर भूखंड हा अजूनही मुळ मालकाच्य नावावर आहे . आत्ता सोसायट्य झाल्या नंतर तो सोसायत्य्च्य नावर कारचा आहे तर होईल का? आणि त्याची पद्धत कशी आणि कुठून करावयाची. आम्हाल सविस्थर माहिती ध्या .
सदर जमीन हि मांडा titawala तालुका कल्याण जिल्हा ठाणे इथली आहे.
धन्यवाद साहेब ,
विठ्ठल लोटू तायडे.
Apply to District Deputy Registrar ( Co-operative )
The papers required for doing Deemed Conveyance are as follows:
Application Form 7 to the District Deputy Registrar, Co-operative Societies, affixing a court fee stamp of Rs 2,000 on the application
1.Affidavit made before the Notary or Executive Magistrate
2.True copy of the Society Registration Certificate
3.Stamp duty paid and registered agreement copies of all individual flats/ shops
4.List of members in prescribed format
5.Index-II for each member as issued by the Sub-Registrar of Assurance
6.Copy of the Development Agreement between land owner and builder
7.Copy of the legal notice issued to the original owner or developer for doing conveyance
8.Details of corresponding address telephone number etc. of the original owner or developer
9.Draft conveyance deed/ Declaration proposed to be executed in favour of the applicant
10.City (CTS) Survey plan
11.Property Registration Card or
12.7/12 extract of the land
Copy of the approved plan
IOD
13.Commencement Certificate
14.Building Completion certificate
15.Occupation Certificate (not compulsory)
16.Property taxes paid
17.Location plan of the building
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रदीप झुंजरूक
20-12-2014
pzunjaruk1@gmail.com
पंजोबांची कुनबी नोंद सापडली आहे। त्यांनी सर्व जमीन वीकली। आजोबा वारस लागले नाहीत। कुनबी दाखला कसा मिळेल। मार्गदर्शन व्हावे।
Question by वसीम सय्यद
19-12-2014
wasimsayyed2007@yahoo.co.in
सर माज्या आजोबानो म्हणजे आईच्या बाबाने सन १९५२ ला २८ एकर शेत २००० रु. ला विकत घेतला होता. सदर शेत आजोबाने सन १९६० ते १९७२ पर्यंत एका व्यक्तीला मक्त्याने दिला होता. नंतर सदर शेत कसणाऱ्या व्यक्तीच्या नावाने झाला सन १९७३ मध्ये. हक्क नोंदणी मध्ये असा उल्लेख आहे कि "त्याने भूस्वामी खरेदी हक्काने सरकार कडून ९२२ रु. खरेदीला घेतला." अस कस झाले असेल? कुळ लागला असेल का? याची विस्तृत माहिती द्यावी. आजोबा व त्यांचे वारस त्या वेळेस जिवंत होते. यात संबधित व्यक्ती दगाबाजी केली असेल का? किंवा पैसे देऊन पटवारी कडून शेत आपल्या नवे केला असेल का? याची माहिती द्यावी. यात आज तारखेला आमचा दावा चालणार का? त्यासाठी काय करावा लागेल. कोण-कोणती कागदपत्रे काढावी लागेल?
Question by PRAMOD G PATIL
18-12-2014
pg.patil@pcmcindia.gov.in
साहेब महाराष्ट्र शेतजमीन कमाल मर्यादा कायदा च्या अनुसुची मध्ये पुणे जिल्हात मर्यादा काय आहे.कृपया माहीती मिळणेस विनंती.
मागील प्रश्नाचे उत्तरात नमूद keli , tevdhich maryada aahe
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कुणाल अं. जाधव, लिपीक
17-12-2014
mr.k1387@gmail.com
तलाठ्यांना स्टेशनरी (सादिल) भत्ता किती देय आहे ?
मंडळ अधिकाऱ्यांना रु. 120/- सादिल भत्ता अदा करण्याबाबत शासन निर्णय आहे परंतु, तलाठ्यांना स्टेशनरी (सादिल) भत्ता देण्याबाबत शासन निर्णय नाही. कृपया सदर शासन निर्णय मिळणेस विनंती आहे.
१००/- वेतनाबरोबर दिला जातो
याशिवाय मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयासाठी , कार्यालयीन खर्च हि दिला जातो
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by satish futane
17-12-2014
satishfutane11@gmail.com
Respected sir,
7/12 Remark is "Potkharab jamin" this agri can we do sale/purchase ? but going to agri road for this jamin/agri.
plz guide
Question by ravindra paradhi
15-12-2014
ravindrap526@gmail.com
२००५ साली ३२ म प्रमाणपत्र दिलेले होते परंतु त्यावर स्थगिती दिलेने ते नोंद करणेत आलेले नव्हते तरी स्थगिती उठलेनंतर ते प्रमाणपत्र सबरजिस्टर ऑफिस ला नोद करणेस दिले परंतु मृत्यूपत्राशिवय नोंद करता येत नाही असे सांगून नोंद केलि नाही तरी सदर प्रमाणपत्र जुन्या तरखेखाली रेष मारून चालू वर्षाची तारीख घालून नोंद करणेसाठी दिले व रजिस्टर ऑफिस ने ते नोंद करून दिले परंतु प्रतिवादी यांनी सदर प्रमाणपत्र जुन्या तारखेस खाडाखोड केली महणून तकरार दिली तरी वरील केलेली दुरुस्ती योग्य आहे कि अयोग्य या बाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती याबाबत शाशकीय तरतूद संगनेस विनंती आहे
Question by अमोल
14-12-2014
amool_jagtap@yahoo.co.in
आमचे आजोबा सन १९७३ ला मयत झाले त्यांना अ ब क ख ही चार मुले व ग घ च ज ह्या मुली वारस आहेत परंतु घ या मुलीने ब या भावा लाभात नोंदनीकृत हक्कसोड पत्र लिहुन दिले तर सदरचा हक्कसोड मूळे मिळनारा बहीनीचा हक्क हा लिहून घेना-या ब या भावालाच मिळेल का सर्व भावांना मिळेल
ज्या भावाचे लाभत हक्क सिदला आहे , त्या भावास हा हक्क मिळेल . सर्व भावांना नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by praful
14-12-2014
praful.Bharose@yahoo.com
उदाहरणार्थ एका उमेदवार महसुल विभागातील दुय्यम सेवा परीक्षा (लीपिकाकरिता) १ लि संधी मध्ये ५ लेखी पेपर पास आहे परंतु ओरल मध्ये १०० पैकी ३० मार्क आहेत. एकून
मार्क ५० टक्क्यापेक्षा जास्त आहेत तर तो उमेदवार परीक्षेत पास आहे किंवा नाही.
Question by prashant sure
14-12-2014
prashant_sure@yahoo.com
इतर हकातील कुळाचे नाव कमी होणे बाबतचा शासन निर्णय व कायद्यातील तरतूद व लीज पेंडन्सी च्या नोदिबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
१. इतर हक्कातील कुल , कायद्यामधील नमूद घटना घडल्याशिवाय कमी होत नाही. महारष्ट्र कुल्वहिवत आणि शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम १४, १५ प्रमाणे कुल कमी करण्याच्या तरतुदी आहेत . या तरतुदी कलम ३१ ला अधीन आहेत.
२. एखादे मिळकती संदर्भात दिवाणी न्यायालात वाद असल्यास , त्याची माहिती अशी जमीन खरेदी करण्याची इच्छा असणार्या इसमास होणे करता , न्यायालाय्त दावा प्रलंबित असले बाबत दुय्यम निम्बंदाकाकडे नोंद केली जाते . या प्रक्रियेस Latin भाषेत LIs -pendant अशे संबोडले जाते .या मुले जमिनी विक्रीवर निर्बंध येत नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by ravindra paradhi
12-12-2014
ravindrap526@gmail.com
June. Mahanaje sadaran 2004 che 32m pramanpatra kontya niyamane nond karta yel kiwa tyababat gr asles sangawa hi winanti
३२व्ग किंमत निस्च्छित केल्याने जमीन हस्तांतरित होते
GR मिळणे अश्यक आहे
आपण ३२ म दुय्यम कार्यालयात सादर करा
नोंदणी करू देतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रमोद शिर्के
12-12-2014
psshirke14@gmail.com
मा. सर
मला सायबर कॅफे हा व्यवसाय सुरु करायचा असून त्याबाद्दलची माहिती द्यावी.
१. सायबर कॅफेचा परवाना मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असणे आवश्यक आहे तरी त्यासंबंधातील शासनाच्या परिपत्रकाची प्रत असल्यास माझ्या इमेल वरती पाठवून द्यावी.
२. सायबर कॅफेचा परवाना मिळविण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी देण्यात यावी.
तरी वरील माहिती द्यावी हि विनंती.
१.मुंबई पोलिस कायदा चे कलम ३३ प्रमाणे जिल्हा दंडाधिकारी यांनी नियमावली तयार लेकी असल्यास त्या खाली परवानगी घेणे आवश्यक .
२.सध्या परती वर्ष ४०० रुपये कर भाराने आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शरद काशिनाथ जाधव
11-12-2014
sk.jadhav@pcmcindi.gov.in
नमस्कार, आपण हे संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल प्रथमत; आपले मनपूर्वक अभिनंदन साहेब नविन शासन निर्णय क्रमांक आर ए-३४१२/प्रं.क्रं.१०१/र-४ महसुल व वन विभाग मत्रालय,मुंबई-३२ दिनांक ०१/०९/२०१४ नवीन निर्णयात कमाल जमीन धारणेची मर्यादा काय आहे ,कृपया सविस्तर माहीती मिळणेस विनंती.
सदर शाषण निर्णय संकेत स्थळावर ऑगस्ट , सप्टेंबर , ऑक्टोबर महिन्यात निर्गमित झालेला नाही .
संकेत स्थळावर हि उपलब्ध नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by viraj
10-12-2014
vvm.prod@coep.ac.in
सर
१) नोंदणीकृत हक्क सोड पत्रान्वये केलेले वारस नोंद कायदेशीर असते का?
२) वडिलोपार्जित मालमत्ता सर्व वारसांचे नावावर आलेवर इतर हक्कामध्ये असलेले बहिणी व आईचे नावे वगळून मुलाचे नावावर करणेचे कायदेशीर पर्याय काय आहेत?
३) शेतजमिनीवरील घराचे नोंद महसुल विभागाकडे नसेल तर ती करण्यासाठी काय करावे? घराचे बांधकाम १९९९ मध्ये झालेले आहे? रीतसर ग्रामपंचायत कडे कर भरत आहे
४) वडिलोपार्जित मालमत्ता मुलाचे व पत्नीचे नावे करणेसाठीचे कायदेशीर मार्ग काय आहेत ?
५) आजोबांची जमीन वाटप करताना क्षेत्र वहिवाटी पेक्षा कमी लागलेले आहे .सुधारित नोंद कशी लावावी व हद्द कशी निर्धारित करावी? त्यासाठी संबधित गटातील जमिनधाराकाच्या परवानगी आवश्यक आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे
१.वारसांना मिल्कततिल हक्क सोडावयाचा असल्यास , हक्क पत्राद्वारे सोडला जातो. ज्यांचे लाभत हक्क सोडलेला आहे , ते वारस संबंदित मिळकती पुरते कायदेशीर आहेत
२.हक्क सोड पत्र करणे ( नोंदणीकृत )
३. घराची नोंद ग्रामपंचायत कडे असलेल्या कर आकारणी पत्रकात केली जाते . मात्र हे केवळ घरपट्टी आकारणी पुरते मर्यादित आहे. कर आकारणी नोंदवही , अधिकार अभिलेख नाही .
४.बक्षीस पत्र करणे . अथवा तिघांचे नावावर एकत्रित असल्यास , पत्नी व मुलांचे नावे हक्क सोड पत्र करणे
५.क्षेत्र बदल करण्यासाठी अधिषक भूमी अभिलेख यांचे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विलास म्हेत्रे
10-12-2014
vilasmhetre1977@gmail.com
पोलीस स्टेशन तपासणीचे अधिकार तहसिलदार / तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना असेले बाबतच्या कायदेशीर तरतूदींची माहिती अथवा अन्य दस्तऐवज
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय तपासणी करण्याचा अधिकार मा. जिल्हाधिकारी यांना आहेत. ते आपल्या तालुकास्तरीय अधिकार तहसीलदारांना बहाल करु शकतात. तसे केले असल्यास तहसीलदार पोलीस स्टेशन तपासु शकतात.
Reply by शशिकांत सुबराव जाधव | नायब तहसीलदार
Question by mahesh sable
09-12-2014
maheshdsable@gmail.com
लिपिकांनी परिपूर्णतेसाठी कोणते पुस्तक रेफर करावे
Question by ravindra paradhi
09-12-2014
ravindrap526@gmail.com
यापूर्वी ३२ म प्रमाणपत्र देनेत आलेले आहे परंतु त्याची नोंद रजिस्टर ऑफिस मध्ये करणेत आलेले नाही तरी आता ३२ म प्रमाणपत्र नोंद करणेसाठी रजिस्टर ऑफिस ला पत्र देता येईल का व ७/१२ ला नोंद करता येईल का
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
