जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Pradip Bhagwant Sant
19-02-2024
dipgayu@gmail.com
नमस्कार साहेब ,
माझी वडिलोपार्जित जमीन धरणाखाली संपादित करण्यात आली . सदर जमिनीची नुकसानभरपाई आम्ही घेतली नाही आणि पर्यायी जमिनीची मागणी केली होती . या जमिनीच्या भू संपादनाची रक्कम महसूल ठेव म्हणून आमच्या नावे शासकीय कोषागारात जमा करण्यात आली . ती रक्कम तशीच पडून आहे . आम्ही पर्यायी जमिनीची मागणी केली असता नुकसानभरपाई च्या ६५% रक्कम जमा न केल्याने मला पर्यायी जमिनीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे .
माझा प्रश्न खालील प्रमाणे -
जर का नुकसानभरपाई ची रक्कम आम्ही स्वीकारलेली नाही तर ६५% रक्कम कुठल्या नियमानुसार मागत आहेत . सर्व रक्कम तर शासकीय कोषागारात जमा आहे . असे असताना मला पर्यायी जमिनीसाठी अपात्र घोषित करण्याचा निर्णय योग्य आहे का ? याबाबत कुठे दाद मागावी ?
आपण पुनर्वसन संचालक तथा विभागीय आयुक्त यांचेकडे दाद मागू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kiran Khalate
19-02-2024
drkirankhalate@gmail.com
कलम 85 जमीन वाटप माहिती पाहिजे
जी जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावे आहे व ज्यांच्यामध्ये , मालकी हक्काबाबत वाद नाही . अश्या व्यक्ती जिल्हाधिकारी / तहसीलदार यांचेकडे , मिळकतीचे सरस निरस वाटप करून मिळावे म्हणून अर्ज करू शकतात . तहसीलदार महसूल संहितेच्या कलम ८५ खाली असे वाटप करण्यास सक्षम आहेत .
तपशीलवार कार्य-पद्धतीसाठी कलम ८५ व महाराष्ट्र जमीन महसूल ( शेत-जमिनीचे वाटप ) नियम १९६९ चे वाचंन करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by KRUSHNA SOMNATH SHINDE
18-02-2024
krushnasomnathshinde@gmail.com
1. शेतकऱ्याला स्वतः च्या शेतात स्व खर्चाने विहीर खोदायची असल्यास व सदर क्षेत्र प्रतिबंधित नसल्यास विहीर खोदण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे का? असेल तर ते सक्षम अधिकारी कोणते व त्याची प्रक्रिया व अटी शर्ती काय आहेत?
2.MRGS मधून एखाद्या शेतकऱ्यास विहीर मंजूर झाली असेल व त्याची स्वतः ची शेतजमीन असेल तर ती खोदण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे का? असेल तर ते सक्षम प्राधिकरण कोणते ? व प्रक्रिया काय आहे?
Question by Rahul jadhav
18-02-2024
jadhav.rahul111@yahoo.in
आमची गावी वडिलार्जित शेती असून माझे वडील व त्यांच्ये २ भाऊ असे वारस. आम्ही वडिलांचे नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झालो. तोंडी वाटणीप्रमाणे आम्ही आपापले क्षेत्र वहिवाटीत आहोत. माझ्या वडिलांचे क्षेत्र वडिलांच्या मोठ्या भावाचा मुलगा माझा चुलत भाऊ खंडाने कसत होता. शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून आम्ही विहीर काढली. भाऊ स्थानिक असल्याने वडिलांनी आमच्या व छोट्या चुलत्यांच्या हिश्शाचे पैसे दिले व विहीर खोदण्याची व बांधकाम करुन घेण्याची जबाबदारी चुलत भावाकडे दिली. माझ्या वडिलांचे २०१८ मध्ये निधन झाले व चुलत भावाचे २०२० ला निधन झाले. भावाचा मुलगा आता आमचे क्षेत्र वहिवाटीत नाही. मात्र विहीरीत आमचा हिस्सा नाही म्हणून पाणी घेऊ देत नाही. व ही विहीर आम्ही एकट्याने काढली असल्याचे सांगतो. माझ्या वडिलांनी भावाला वहिरीसाठी पैसै दिल्याचे लेखी नाही. भावाने विहीर बांधण्याकरिता contractor शी केलेले agreement स्वत: चे नावावर केले आहे. ते दाखवून विहिरीवर एकट्याचाच हक्क त्याचा मुलगा सांगत आहे. आम्ही काय करावे? कुठे दाद मागावी? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आपण माम्लेत्दार अधिनियामानातर्गत तहसीलदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Yedage
15-02-2024
yedagesagar@gmail.com
नमस्ते सर...
माझा प्रश्न असा आहे की... रजिस्टर ऑफिसात एकूण किती प्रकार चे खरेदी खत केले जाते.....
जसे की,...खरेदी खत.... बक्षिस पत्र ....कायम खुश खरेदी खत.....साठे खत....
आणि प्रत्येकाची व्हॅल्यू कितपत असते....
आपण मोघम प्रश्न विचारला आहे . विशिष्ट असा प्रश्न विचारा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Yedage
15-02-2024
yedagesagar@gmail.com
नमस्ते सर,
गाव गट नकाशा वरती आमच्या शेत जमिनीचा गट नकाशा नाही....परंतु भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता N.J किंवा N लार्ज वरून गट नकाशा चे रेकॉर्ड सापडले असे का.....आणि N.J किंव्हा N
लार्जं म्हणजे काय
Question by ravi ghule
15-02-2024
ravikiranghule@gmail.com
i want to cerculer no. 1.LNQ-1094/166/P.K.439/A-2, 20 oct 1995
2.-LNQ-1098/166/P.K.28/A-2, 25 March 1998
3- sankiran-02/2010/P.K.29/A-2, 16 Feb 2010
4- sankiran-02/2010/P.K.29/A-2, 14 Sept 2012
Question by SOMMU ANAND RAMTEKE
14-02-2024
sommu_ram@rediffmail.com
Respected Sir's,
My grandfather demised in the month of October, 2023. My grandfather has 4 daughters and one adopted son (which he adopted illegally without proper legal documents). We have made application in the month of October, 2023 to Talathi office for adding names of four daughters (and not adopted son) in 7/12 Extracts who are legal heirs/biological daughters of my late grandfather and grandmother who demised intestate but the concerned Talathi is purposely trying to delay the matter and has not yet added names of all 4 daughters in 7/12 extracts inspite of making proper application to the talathi office. Same application has been made by adopted son in talathi office to add his name in 7/12 extracts. We came to know that the adopted son bribed the talathi office so as to not to add names of 4 daughters name in 7/12 extracts. The adopted son sold 1 acres of land for Rs.10 lakhs to two unknown persons in the year 2023 when my grandfather was alive without taking NOC from 4 daughters and kept all the money in his bank account and didnt share any part of money to all 4 daughters Inspite of repeated follow ups through mobile phone, personal meeting at talathi office our greviances are not been heard by the Talati office. We are helpless as the talathi office is purposely delaying the matter and not adding names of all 4 daughter's who are legal heirs of my late grandfather. The Talathi office is neither providing any reasons nor providing any information with regard to delay in adding names of 4 daughter in 7/12 extract. Thus the matter is still pending before the talathi office without any justifiable reasons. She informed on whatsapp that without succession certificate she cant do the needful. She has not given anything in writing to apply for succession certificate. We approached Tahsildar office. Tahsildar informed to Talathi but she says she will give reply after 2 days as she is busy in election duty and purposely try to delay the matter.
Kindly advise.
Regards,
Adv. Sommu Ramteke
The adopted son sold the land means his name was mutated to the property . You need to challenge the mutation entry by which adopted son's name was mutated before the Sub- Divisional Officer under section 247 of Maharashtra Land Revenue Code 1966
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Nikhil Poladiya
13-02-2024
nikhil.poladiya@gmail.com
Agricultural land (CTS NO. 698B/3) , situated in Mulund west under BMC - T WARD.It is used for residential purpose since 1991 , after obtaining collector interim permission . In order to convert this agricultural land to non agricultural (NA) for residential use in official records - what is the basis for calculation of conversion tax , premium , nazrana , any other payment required for above conversion and the actual amount payable for above change of land use.Please share the logic of calculation and the amount as well . Thanks in advance .
Pl read section 47A of Maharashtra Land Revenue Code 1966 .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Hariprasad Madhukar Patil Patil
13-02-2024
hariprasadpatil@rediffmail.com
सर मी माझे शेत दिनांक 05/05/2023 रोजी माझ्या शेतीची सरकारी मोजणी झाली असून ,माझ्या कडून आर्थिक टंचाई मुळे मला ताबा घेता आला नाही, आता शेजारील शेतकऱ्याने ताबा देण्यास विरोध केला आहे. व हद्द कायमची खून पण नष्ट केली आहे.
या परिस्तीत मला माझ्या शेतावर ताबा घेणे आहे
तरी मला वाद न होता ताबा कसा मिळणार ही सांगण्याची विनंती करावी
धन्यवाद
आपली व आपले शेजारील शेतकरी यांचे शेताची हद्द निच्छित झाली असेल , त्यावेळी कलम १३८ अन्वये , हद्दीच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचा जमीन धारण करण्याचा हक्क कोणत्या क्षेत्रापर्यंत आहे हे निच्छित होते . लगतच्या शेतकर्याने अतिक्रमण केले असेल तर , आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा . असा अनधिकृत ताबा काढून देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by VIJAYKUMAR GOPALDAS AGRAWAL
12-02-2024
akshau_agr@yahoo.co.in
राज्यात कुणी व्यक्ति आपल्या मुलाना हयात असताना मालमत्ता वाटणी करूण फेरफार अर्ज करु सकतो का ?
जर वाटप करण्यात आलेली जमीन मिताक्षरा hindu एकत्र कुटुंबाची असेल तर , अशे वाटप यामुळे आवश्यक फेरफार अर्ज करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shilpa raut
06-02-2024
shilparaut35@gmail.com
नमस्कार साहेब आमचे एकूण 43 सातबारा आहेत ही आमची सामायिक जमीन आहे याच्यापैकी साधारणता 18 सातबारा हे माझ्या वडिलांच्या आणि काकांच्या कब्जे वापरात आहेत यातील आम्ही काही सातबारा मध्ये माझ्या वडिलांच्या आणि काकांच्या नावासमोर एकत्रित क्षेत्र आणलेले आहे (एक खाते नंबर बनवून माझ्या वडिलांचा आणि काकांचा ) तरी या पैकी फक्त चार सात बारा वरील माझा काकां चा आणि वडिलांच्या नावासमोर विभागून क्षेत्र आणण्यासाठी कलम 85 द्वारे अर्ज करू शकतो का म्हणजेच भविष्यात इतर राहिलेल्या सातबारांसाठी आम्ही वेगळा अर्ज केला तरी चालतो का?
थोडक्यात प्रश्न असा आहे की कलम 85 अन्वये आम्ही एकाहून जास्त वेळा अर्ज करू शकतो का?
हो . आपल्यावर अवलंबून आहे कि आपण किती संयुक्त रित्या धारण केलेल्या जमिनीचे वाटप करू इच्छिता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by AVINASH BHAGANE
01-02-2024
avinashbhagane@ymail.com
महाराष्ट्र शासन ई हक्क प्रणाली द्वारे ऑनलाइन वारस नोंद करताना नोटरी अथवा मा. तहसीलदारसाहेब यांजकडील वारस नोंद प्रतिज्ञापत्राची आवश्यकता आहे का? असल्यास जर एखाद्या व्यक्तीची जमीन कोल्हापूर येथे असेल व सदर व्यक्ती मुम्बई येथे वारस नोंद प्रतिज्ञा पत्र नोटरी करून ऑनलाइन नोंद अर्ज करु शकतो का?
Question by Sushant vartak
30-01-2024
sushantvartak1980@yahoo.co.in
नमस्कार साहेब आमचे काही सातबारा वरती सामायिक जमीन असून त्यावरती 50 ते 60 वारसांची नावे आहेत आहे आणि ही सर्व नावे अनुक्रमे "अ" "ब" "क" या तीन भावांच्या वारसांची आहेत. "अ" हा एकत्र कुटुंब प्रमुख असल्याने त्याच्या फेरफार मध्ये "अ" हा 1/3, "ब" हा 1/3 आणि "क" हा 1/3 साठी वारस आहे तरीही या फेरफाराच्या अनुषंगाने वारसांच्या नावासमोर क्षेत्र टाकण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करता येईल का
कलम 85 ने वाटणी करण्यात काहीजण सहकार्य करत नाही म्हणून आम्हाला सदस्यतीत नावासमोर क्षेत्र आणायचे आहे तरी आपला अभिप्राय द्यावा ही विनंती
कलम ८५ खाली वाटप हे सह- धारक यांचे मध्ये संमती असेत तरच करता येते अन्यथा नाही . ज्या जमिनीच्या सह-धारकांमध्ये वाद असेल त्या ठिकाणी दिवाणी संहिता कलम ५४ प्रमाणे दिवाणी न्यायालयात अर्ज करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुरज भोसले
30-01-2024
suraj.bhosale27@gmail.com
नमस्कार साहेब, माझ्या वडिलांचे आकस्मित निधन झाल्यामुळे वारस नोंदी साठी मी तलाठी यांच्याकडे अर्ज दिला होता त्यांनी २१ दिवसात सात बारा वर वारसांची नोंद होईल असे सांगितले होते परंतु १ महिना झाला तरी अजून वारस नोंद झाली नाहीये त्यासाठी काय करावं लागेल कृपया मार्गदर्शन करावे.
आपण नायब तहसीलदार /तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण नायब तहसीलदार /तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपण नायब तहसीलदार /तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ajit madam
25-01-2024
ajitk0421@gmail.com
Question by दत्तात्रय टी. सोनवणे शिवडी मुंबई
25-01-2024
sonavanedt7@gmail.com
बिल्डर कडून फसवणूक झाल्याने Conjumer कोर्टाचे आदेशाने जप्त झालेली बिल्डरची जमीन लिलावात घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही तर , शासन सदर जमीन शासनाचे नावे कोणत्या नियमाने ताब्यात घेवू शकते ? आणि त्यानंतर सदर जमिनीचे ७- 12 उताऱ्यावर इतर अधिकारात सुमारे 60 लोकांची नावे व बोजा थकबाकी नोंद आहे. ती रक्कम शासन परत केंव्हा मिळेल ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती . दत्तात्रय सोनवणे मो. नं 9870767328
Question by Vishal Shinde
24-01-2024
vishalashokshinde1@gmail.com
मे.कलेक्टर सो.बहादूर यांचेकडिल हु.नं.आर.बी.डब्लू.एस/1606/65दि18/11/55अन्ववे यांचे परवानगीशिवाय वाटणी गहाण अगर तसदीबद्दल न करणेचे शर्तीवर 1591 असा शेरा दाखवत आहे,त्यावर काही करता येईल जेणेकरुन तो कमी होईल म्हणजेच कुठे अर्ज दाखल केल्यानंतर तो कमी होईल कारण हे चुकून शेरा दाखल करण्यात आला असून.
Question by विलास मिसाळ
16-01-2024
Vilasmisal1992@gmail.com
नमस्कार
मा.
मी छत्रपती संभाजी नगर चा रहिवासी असून इ.स 1987 मध्ये आज्जी ने रजिस्टर खरेदी खत केले त्या नंतर तिच्या बहिणीच्या मुलाने मूळ खरेदी खत त्यांच्या जवळ घेतले व आज्जीला बोलला की घरी गेल्यावर देतो.त्याने ते दिले नाही.व आता आम्हाला त्यांची गरज आहे कारण त्याने 2000 साली ती जमीन त्याने परस्पर नावे केली आहे.आमच्या कडे त्यांची झेरॉक्स सुधा नाही क्रुपया मला त्यांची नक्कल कुठे मिळेल मदत करावी
Question by रुपेश पुं.विश्वेकर
13-01-2024
rupesh06111984@gmail.com
सर ,मौजे सोनाळा १ येथे गट न १७४ २हे९१ आर शेती नामदेव गुलकरी ने विकत घेतली होती त्यानंतर १हे९४आर शेत महादेव इंगळे ला विकले त्यामुळे नामदेव गुलकरी जवळ ०.९७ आर नावे राहली परंतु ७/१२ मध्ये महादेव संस्थान तर्फे पंच असे नाव लागले आहे परतू संस्थान नोदणी कृत नाही कारण त्याचा काहीच संबंध नाही . तसेच नामदेव गुलकरी ह्यांनी सदर ०.९७ आर शेती संस्थानला दान दिली नाही किंवा नव्हती. त्या बाबत सह्यायक धर्मदाय ह्याचे कडे चौकशी केली तेथे सुद्धा सदर संस्थान रजिस्टर नाही सदर मिळकती आजरोजी वारसाच्या ताब्यात आहे. तसेच संस्थान त्या गावात नाही. महसूल रेकार्डला दान बद्दल माहिती तसेच फेरफार झाला नाही. संस्थान चे नाव कसे कमी करता येईल.मयत नामदेव चे वारसाची नावे ७/१२ लावायची आहे .त्यामध्ये काय व कुणाकडे अर्ज करावा. मार्गदर्शन मिळावे
नाहादेव संस्थांचे नाव कोणत्या फेर्फाराने दाखल झाले आहे ? तो फेरफार पहा . त्यावरून आपणास आपल्या प्रश्नाचे उत्तर मिलेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anshuman
12-01-2024
anshumol2007@gmail.com
जमीन वहिवाटीचा वादाबाबत तहसिलदार यांचेसमोर फौजदारी संहिता 145 नुसार केस सुरु असून प्रतिवादी हा परगावी राहत आहे, त्याने वकिलांची नेमणूक केली असून तो स्वत हजर रहात नाही. 145 केस मधे वकिल दिला तरी स्वत उपस्थित रहाणे आवश्यक आहे का त्याबाबत काही नियम आहे का? कृपया मार्गदर्शन करावे
Question by Kedar
11-01-2024
army101guy@gmail.com
#माजी सैनिक जमीन प्रश्न #
प्लॉट वाटप केलेल्या वाढीव गावठाणाचा(वर्ग 2) सिटी सर्वे झालेला नाही.नकाशा उपलब्ध होत नाही.गट हा ग्रामपंचायत क्षेत्रात आहे .घरठान उतारा ही उपलब्ध आहे.तसेच 7/12 ला पण नाव आहे . काही लोक म्हणतात वैयक्तिक प्लॉटची मोजणी होत नाही तर संपूर्ण गटाची मोजणी करावी लागेल.
# जर माजी सैनिकाला या वाटप केलेल्या गटातील वैयक्तिक प्लॉटची सिटी सर्वे मोजणी करायची आहे तर काय करावे लागेल?
# पोलीस प्रोटेक्शन कसे मिळवावे आणि यावरील अतिक्रमण काढण्यासाठी काय करावे लागेल?
या आधी प्रांत साहेबानी वर्ग 2 मध्ये 7/12 नाव लावले असून आदेशामध्ये तहसीलदारांना जागेचा कब्जा देण्याबाबत लिहिलेले आहे पण अजून अंमलबजावणी झालेली नाही. सिटी सर्वे मोजणी व कब्जा यासाठी काय करावे लागेल ?
आपणास जी जागा दिली त्याचा ताबा शासनाने आपणास पूर्वी दिला होता का ? जर पूर्वी ताबा दिला नसेल तर , अतिक्रमण विरहीत जागेचा ताबा देण्याची जबाबदारी तहसीलदार / शासनाची आहे . मात्र जागेचा ताबा आपणास पूर्वी दिला होता व त्यानंतर जागेवर अतिक्रमण झाले असेल तर, असे अतिक्रमण काढून टाकणे आपली जबाबदारी आहे . भू मापन करण्यासाठी आपणास भूमी अभिलेख विभागास अर्ज करणे आवश्यक आहे .
तहसीलदार यांना ताबा देण्याबाबत निर्देशित करूनही ताबा दिला नसेल तर , आपण जिल्हाधिकारी कार्यालयात , सैनिक मदत कक्ष स्थापन केले आहेत त्यांचे कडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anil B
10-01-2024
barhateanil21@gmail.com
नमस्कार सर,
आमचे आजोबा 17 एकर चे स. कुळ होते 1970 मध्ये 3 एकर चे 32ग करून 32म प्राप्त झाले
कब्जेदर सदरी 3 एकर ला नाव लागले इतर हक्कात फेरफार नवीन शर्त 47 व कब्जेदार सदरी 47 फेर पडला तसेच इतर हक्क हा पूर्ण 17 एकर अस्तानी 3 एकर खरेदी होऊन उर्वरित इतर हक्क मधून सुद्धा फेरफार 47 धकाऊन नाव कमी झाले.....नाव कमी कशाने झाले त्या बद्दल काहीच माहिती नाही सापडत आहे...
मूळ मालकाने नंतर 2 व्यक्तींना 5 आणि 5 असे 10 एकर विक्री केले...त्यात त्यांनी कोणतीही परवानगी प्रांत घेतली नाही तसेच चलन भरले नाही......तर त्यांचा व्यवहार कायदेशीर आहे का तो कोर्ट मध्ये ॲपील होऊ शकतो का......कारण आम्ही कुळ होतो 1.4.57 चे आणि 3 एकर घेतली होती आम्ही त्यातील... जर ती जमीन आम्हाला पुन्हा मिल्व्याची असेल तर काय करावे लागेल
जर आपले पूर्वाधिकारी /वाड- वडील हे सौरीक्षित कुल होते म्हणजे ते कृषक दिनी मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे कोणत्याही परीस्थितीत आपले नाव कमी होणे चुकीचे आहे . आपण ज्या फेरफाराने आपले नाव कमी झाले आहे त्याविरुद्ध अपील दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
जर आपले पूर्वाधिकारी /वाड- वडील हे सौरीक्षित कुल होते म्हणजे ते कृषक दिनी मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे कोणत्याही परीस्थितीत आपले नाव कमी होणे चुकीचे आहे . आपण ज्या फेरफाराने आपले नाव कमी झाले आहे त्याविरुद्ध अपील दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anil B
10-01-2024
barhateanil21@gmail.com
सर आमचे आजोबा 1.4.57 चे स.कुळ होते 1970 मध्ये आम्ही 3 एकर चे 32ग केले व 32 म प्राप्त केले नंतर 7/12 ला इतर हक्क मध्ये नाव कमी झाले तसेच नवीन शर्त 47 आणि कब्जेडार मध्ये फेरफार 47 तसच आमचे आजोबांचे नाव फेरफार 47 ने इतर हक्क मध्ये कमी झाले दिसून येते...नाव कशाने कमी झाले त्या बद्दल काहीच उपलब्ध नाही मूळ मालकाने 1980 मध्ये ती जमीन आपल्या विधवा सूने चा नवे केले आणि आज रोजी 3 वर्षा पासून नापीक आणि मोठ्या कात्या आहेत त्या मध्ये.....तर ती जमीन पुन्हा मिळवता येऊ शकते का त्या साठी काही प्रोसेस
Question by Suraj Sanjay Borude
10-01-2024
surajborude906@gmail.com
विभागी आयुक्त यानी पारित केलेल्या आदेशने मंडळ अधिकारी नोद घेत नाही काय केलं पाहिजे किंवा आदेशाला काही मुदत आसती का
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3380 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
