जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Kiran
06-01-2024
kiranghodke47@gmail.com
सात बारा च्या वेळी आपली हरकत तलाठी कडेच घेतली पाहिजे का ?
Question by अमोल वाघ
05-01-2024
amolwagh6828@gmail.com
म.ज.म.अ.१९६६ चे कलम १५५ अन्वये क्षेत्र दुरुस्ती संदर्भात अर्ज केलेला होता. त्यात सर्व संबंधितांना नोटीस बजावण्यात आलेली होती. क्षेत्र कमी होणार असल्यामुळे काही जणांनी त्यास विरोध केला. तहसिलदार साहेब यांनी दिलेल्या निर्णयावर विरोध असलेल्यांनी मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांचेकडे अपील केले. माझा प्रश्न असा आहे की, मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या निर्णयावर देखील नाराज असलेले मा.जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे अपील करू शकतात का? किंवा दिवाणी न्यायालयात जाऊ शकतात का?
कारण अर्जातील मुद्दा हा चुकीने वाढलेले क्षेत्र कमी करावयाचा असून तहसिलदार साहेब यांनी वाढलेले क्षेत्र खातेदार यांच्या हिस्सा चे सरासरीच्या प्रमाणात कमी करण्याचा निर्णय दिलेला आहे परंतु काहींना तो मान्य नाही. परंतु त्यामुळे मान्य असलेल्या व्यक्तीनांही अपील केलेले असल्याने तारखेसाठी वेळ द्यावा लागत आहे.
Question by श्री भास्कर दशरथ पिंपळे
03-01-2024
kiranpimpale1997@gmail.com
नमस्कार महोदय मी भास्कर दशरथ पिंपळे रा रहिमपुर ता संगमनेर जि अहमदनगर येथिल रहिवासी आहे. मि २१ नोव्हे. २०२३ रोजी याच पोर्टलवर गायराण जमिन नियमित करण्यासाठी मार्गदर्शन मागितले होते त्यावर आपण मा. जिल्हाधिकारी यांना 2 हे. पर्यन्त जमिन नियमीत करण्याचा अधिकार आहे व त्यासाठी कागदोपत्री पुरावा असणे आवश्यक आहे असे कळविले होते. मि सन १९७५ पूर्वी पासुनचे २हे२०आर क्षेत्रावर अतिक्रमण असल्याचे सर्व पुरावे सादर केलेले आहेत. परन्तु मा जिल्हाधिकारी यांनी आमची मागणी सर्वोच्च न्यायालय २०११ जगपाल सिंग विरुद्ध पंजाब सरकार या निर्णया अन्वये नामंजुर केली आहे. परंन्तु माझा मुलगा चि किरण भास्कर पिंपळे (MSc.Agri) याने सदर निर्णयाचा अभ्यास केला असता त्यातील मुद्दा क्र 22 मध्ये दिलेल्या विवेचना प्रमाणे काहि अपवादात्मक परिस्थिति मध्ये भुमिहीन मजुर/ अनुसुचित जाती/ जमाती यांची अतिक्रमणे नियमित केली जाऊ शकतात असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले आहे. त्यामुळे मि अनुसूचित जमाती चा असल्यामुळऐ कोणाकडे दाद मागावी कृपया मला सांगावे. सदर जिमिनीचे पुरावे मि आपल्याला सादर करु इच्छितो तशी मला परवानगी द्यावी.
Question by Rohan Vijay Sawant
30-12-2023
rohan.sawantgp@gmail.com
My land was declared Non Forest land by the Deputy Collector Bhiwandi But still in 7/12 extract the entry relating to taking permission from Central Government relating any development on property. I want to delete that entry.
Question by Navnath g dharpale
30-12-2023
navnathdharpale85@gmail.com
नमस्कार सर सर्वे क्रमांक 36 चे दोन हिस्से करण्यात आले दोन हिस्से चे क्षेत्र समान होते त्यानंतर 1970 71 मध्ये पोटेसचा मोजणी मध्ये दोन्ही हिश्याला गट नंबर देण्यात आले गट नंबर 15 व 16 यामध्ये गट नंबर 15 चे सहा गुंठे कमी करून 16 चे सहा गुंठे वाढवण्यात आले व पोट हिस्सा नकाशे बनवण्यात आले व लागू करण्यात आले त्यानंतर 1975 76 मध्ये दोन्ही गट नंबर मधील अर्धी अर्धी जमीन एकमेकांना जोडण्यात आली गट क्रमांक चा टोच नकाशा काढला असता तो पोट हिस्सा मोजणी प्रमाणे आहे परंतु भूमी अभिलेख डिपार्टमेंट मधून हिस्से बुकाची प्रामाणिक नक्कल काढले असता त्यामध्ये दोन्ही गटाचा पोट हिस्सा नकाशा स्केल प्रमाणे आहे व त्याखाली विनास्केलचा नकाशा काढण्यात आलेला आहे व त्यामध्ये जुन्या दोन्ही गटाचे खातेदारांची नावे आहे व तो जागेवरील वहिवाटीनुसार आहे परंतु तो अपडेट करण्यात आलेला नाही दोन्ही गटांची आजपर्यंत कोणतीही मोजणी करण्यात आलेली नाही गटाची मोजणी टाकल्यास वाद उद्भवू शकतो कृपया योग्य मार्गदर्शन करावे ही अपेक्षा
Question by Rahul
26-12-2023
rahulkamble5313@gmail.com
Mazya vadilani 2002 Sali 4.50 gunthe Jamin vikat ghetli ahe. Tyacha ferfar pn zala ahe pn vadilanch 7/12 vr name ny lagl ajun. Hyla ky Krav lagel ferfar vr tukde jod tukde bndi kayda virodhat vyavhar asa dhakhl Itar hakk theun nond Shera as ahe.
उपरोक्त व्यवहार हा तुकडे जोड कायद्याविरुद्ध आहे . मात्र जर नोंद मंजूर असेल , तर ७/१२ ला नाव लागण्यास काही हरकत नाही . तलाठी यांना फेरफारचा अंमल देण्यास विंनती करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Suraj Bhosale
25-12-2023
suraj.bhosale27@gmail.com
माझ्या वडिलांचे चार वर्षापूर्वी निधन झाले आहे आणि त्यांचे राहते घर हे आम्हाला माझ्या व भावाच्या नावाने करायचे आहे त्यासाठी कूठे अर्ज करावा लागेल ग्रामपंचायत की तहसीलदार आणि किती दिवसांत ते आमच्या नावाने होऊ शकते?
Question by Shrikrushna
24-12-2023
shrikrushnabhujbal55@gmail.com
शेजारी शेतकरी पाटा च ,पानी प्रवाह अडवत असेल तर काय करावे
आपण माम्लेतदार कोर्ट अधिनियम अंतर्गत आपल्या तहसीलदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shrikant Kashinath Ichake
22-12-2023
ishreekant@yahoo.com
रजिस्टर साठेखत 7/12 सदरी इतर अधिकारात नोंद घेता येते का ?
Question by Sumit wagh
20-12-2023
sumit.w007@gmail.com
नमस्कार sir
मी एक प्रॉपर्टी विकत घेणार आहे
त्या 7/12. मध्ये भोगतात वर्ग 1 अशी नोंद आहे
Bhogvatdat च नाव
सोसायटी नाव आहे
जी. कुब्जा पद्धतीने तहसीलदार कडून मिळाली आहे
आनि ईतर हक्क नवीन अविभाज्य शर्ती अशी नोंद आहे
तर माझा प्रश्न आहे की
ह्या जमिनीचा 7/12 कुठल्याही प्लॉट धारकाच्या नावावर नाही
तर आता ते नाव लावता येणार का
तर प्रक्रिया काय.
आणि आपल्या video बघितला bhogwatdar 2 च रूपांतर bhogwatdar 1 मध्ये करणाऱ्या बाबत
तर ती केस ईथे लागू आहे का
असल्यास ती रक्कम बाजार भावा च्या ती कुणी भरायला हवी
जो मला ही जमीन विकत आहे मी त्याला काई सांगू की माझे नाव 7/12 ला लाऊन दे
आणि सर भो वर्ग 2 जमिनी भो वर्ग 1 रूपांतर करणे नियम 2019 इथे लागू आहे का
Question by Digambar Bhamare
20-12-2023
digabhamare2013@gmail.com
आमचे पंजोबांचे वडिलोपार्जित गावी घर होते हे घर माझ्या आजोबांनी माझ्या काकांना सन १९८७ मध्ये विक्री केले आहे, सदर घर माझ्या काकांनी काकूंच्या नावाने खरेदी केलेले असल्यामुळे काका मला माझा हिस्सा देण्यास नकार देत आहेत. सदर घरात मला माझा हिस्सा मिळण्यासाठी मी काय करावे ?
घराची विक्री आजोबांनी , काकांना केली , तसेच काकांनी घराची विक्री काकुच्या नावे केली त्यामुळे आपणाला आपला घरामध्ये हिस्सा/हक्क असतानाही . विक्री झाल्यामुले , मधील दोन खरेदी दस्त रद्द करावी लागतील . त्यासाठी दिवाणी न्यायालयात जावे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by AVINASH BHAGANE
20-12-2023
avinashbhagane@ymail.com
महाराष्ट्र शासन ई हक्क प्रणाली द्वारे ऑनलाइन वारस नोंद करताना नोटरी अथवा मा. तहसीलदारसाहेब यांजकडील वारस नोंद प्रतिज्ञापत्राची आवश्यकता आहे का? असल्यास जर एखाद्या व्यक्तीची जमीन कोल्हापूर येथे असेल व सदर व्यक्ती मुम्बई येथे वारस नोंद प्रतिज्ञा पत्र नोटरी करून ऑनलाइन नोंद अर्ज करु शकतो का?
Question by Shilpa raut
18-12-2023
shilparaut35@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 54 न्यायालयाकडून वाटणी साठी अर्ज केला आहे आणि न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर जिल्हाधिकारी किंवा त्यांनी निवडून दिलेला अधिकारी यांनी वाटप करायचा असतो असे आहे का आणि यामध्ये आपणास स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का किंवा वाचवण्यासाठी आपणास काय करता येईल कारण सदर जमिनीवर वाटणीसाठी स्टॅम्प ड्युटी भरण्याची शेतकऱ्याची ऐपत नाही.
दिवाणी प्रक्रिया संहिता कलम ५४ अन्वये , न्यायालयाचा हुकूमनामा , ज्याद्वारे मिळकतीतील हक्क अभिलीखीत करण्यात येतो तो मुद्रांक अधिनियम अंतर्गत , संलेख आहे . त्यामुळे त्यावर मुद्रांक शुल्क जमा करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by satish vishnupant lolge
18-12-2023
satishlolge@gmail.com
धन्यवाद सर माहिती मिळाली हद्द कायम करणे साठी मोजणी करता अर्ज करुन पैसे भरावे लागतात नंतरच मोजणी होईल असे सांगतात पन नगर रचना लेआउट प्रमाणे मोजणी होईल काय तसेच एका प्लॉट मध्ये दोन घरे असल्यास क्षेत्रफळ मोजणी नुसार बरोबर असावेत नसल्यास काय करावे या बाबत मार्गदर्शन करावे भूमिअभिलेख कार्यालयात फार वेळा जाऊन नीट माहिती मिळत नाही या बाबत तक्रार कुठे करावी याची माहिती क्रुपया द्यावी
अभिन्यासाप्रमाणेच ( Lay-Out) प्रमाणेच मोजणी होईल . अभिन्यासाप्रमाणे , जागेवर बांधकाम नसेल तर आपणाला नियोजन प्रधीकार्याकडे अर्ज करावा लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shilpa raut
18-12-2023
shilparaut35@gmail.com
नमस्कार साहेब वारस नोंद करताना एखाद्या वारसाने फेरफार नोटीस वर सही करायला नकार दिला तर वारस नोंद करता येते का उदाहरण घ्यायचा झालाAआणि B हे भाऊ बहीण आहेत Aभाऊ आहे आणि B ही बहीण आहे त्यांची आई ही साधारणतः दोन वर्षांपूर्वी वारलेली आहे आणि सातबारावर वडिलांच्या निधनानंतर तिचे नाव आहे बहीणB हिला वारस नोंद करायची आहे म्हणजेच आईचे नाव सातबारा उतारा वरून कमी करायचे आहे त्यासाठी तिने अर्ज केला आहे आणि तलाठ्याने फेरफार टाकून फेरफार नोटीस दिली परंतु भाऊ त्याच्यावर सही करत नाही म्हणजे मग अशा परिस्थितीत वारस नोंद फेरफार मंजूर करता येतो का?
भाऊ नोटीस घेत नसेल तर महसूल संहितेच्या कलम २३० प्रमाणे म्हणजे , जागेवर सबंधित तलाठी यांनी नोटीस प्रसिद्ध करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shilpa raut
18-12-2023
shilparaut35@gmail.com
नमस्कार साहेब चुलत भाऊ आणि चुलत बहीण यांची दोघांची भावे सातबारावर उपलब्ध आहेत. चुलत भाऊ आणि चुलत बहीण या दोघांचे आजोबा हे सख्खे भाऊ होते आणि चुलत बहिणीला आपल्या चुलत भावाचा नावे विना मोबदला हक्क सोड करायचा आहे. तसे बघितले तर चुलत असले तरी रक्ताच्या नात्यांमध्ये आणि सदर संपत्ती ही वडिलोपार्जित संपत्ती आहे तर त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का?
चुलत भाऊ व बहिण हे रक्त नात्यात येत नाहीत . पूर्ण पूर्ण मुद्रांक शुल्क जमा करावे लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Jayant Govind Puranik
17-12-2023
upasana115@gmail.com
माझ्या वडिलांच्या नावे देवस्थानासाठी इनामी जमीन (खिदमत) ६ हेक्टर आहे. माझ्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून आम्हाला आमचे (वारसांचे) नावे लावण्यासाठी आम्ही रितसर अर्ज तहसीलदार यांना दोन वर्षांपूर्वी दिला होता. त्यानुसार तलाठी यांनी वारसदाराचे नाव लावले होते. त्यानंतर वारसातील बहिणीनी हक्कसोडपत्र दिले व त्याची नोंद घेण्याबाबत अर्ज केला होता व फेरफार तयार करण्यात आलेला होता परंतु तो मंजूर न होता अचानक तलाठी यांनी आदेशाने खाता दुरुस्ती करत, आधी लावलेल्या सर्व वारसदाराचे नाव कमी करुन परत माझ्या वडिलांचे नाव सातबारावर लावले. आता यापुढे आम्ही कुठे व काय कार्यवाही करावी जेणेकरून आमचे नाव सातबारावर लागेल. याकरिता काय करावे लागेल. याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.
देवस्थान इनाम जमीन हि केवळ ज्या देवस्थानासाठी दिली आहे त्यांचे नाव लागणे आवश्यक आहे . देवस्थान इनाम हा मुख्यत्वे पच्छिम महाराष्ट्रात आहे . पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी / भागात , वहिवाटदार यांची नावे लावण्याची प्रथा आहे . मात्र पूर्वी पासून आपल्या वडिलांचे नाव लागले होते . वडिलांचे मृत्य - पश्चात , देवस्थान न्यासाने , आपली वहिवाट चालू आहे का ? न्यास अस्तित्वात नसेल किंवा असा न्यास स्थापन झालेला नसेल तर आपला या मालमत्तेमधील अधिकार संपुष्टात आलेला आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अरूणा पद्माकर हलकारे
13-12-2023
arunahalkare52@gmail.com
प्रोबेट च्या आधारे फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठी कडे विरुद्ध पक्षाने अर्ज केला. त्याविरुद्ध वरिष्ठ स्तर न्यायालयाकडे अपील केले असता त्यांनी आम्हाला प्रोबेट रद्द करण्याचे अधिकार नाहीत ते हायकोर्टाला आहेत, त्यामुळे तुम्ही हायकोर्टात अपिल करा. परंतु तलाठ्याने प्रलंबित फेरफार मंजूर करून 7/12 वरील माझे नाव कमी केले. प्रोबेट विरुद्ध आम्ही हायकोर्टात अपील केले व एकाच सुनावणीत कोर्टाने प्रोबेट रद्द केले. व सर्व वारसांना हक्क सिद्ध करण्यासाठी परत दावा दाखल करा असे सांगितले.
तलाठ्याने घेतलेल्या फेरफारची नोंद रद्द करणेसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपिल दाखल केले व एक वर्षानंतर अपील मंजूर झाले. प्रतिवादीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पूनर्निरिक्षण अपील दाखल केले त्याच्या सुनावण्यात पूर्ण झाल्या असून प्रकरण आदेशासाठी ठेवले आहे परंतु आज सहा महिने झाले तरी आदेश मिळाला नाही.
आदेश देण्याबाबत काही कार्यकाळ ठरवुन दिलेला आहे का?
7/12 वर माझे नाव नसल्याने मला शेती करता येत नाही त्यामुळे आर्थिक नुकसान होते आहे याची भरपाई शासन करेल का?
मला शेती करता येते का?
कोणत्याही महसूल अधिकाऱ्याला अथवा भूमापन अधिकाऱ्याला त्याच्याकडे दाखल झालेले अधिकार अभिलेखाच्या वादाचे प्रकरण एक वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येत नाही. जर एक वर्षापेक्षा अधिक काळ प्रकरण प्रलंबित ठेवायचे असेल तर त्यासाठी लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घेणे अभिप्रेत आहे.
प्रकरणामधील सुनावणी पूर्ण झाली व प्रकरण निर्णयासाठी बंद झाल्यानंतर त्याचा निकाल किती दिवसात द्यावा याबाबत महसूल संहितेमध्ये कोणतेही उपबंध नाहीत तथापि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, तीन ते चार आठवड्याच्या कालावधीत निकाल जाहीर करणे आवश्यक आहे असा निर्वाळा माननीय उच्च न्यायालयाने दोन-तीन प्रकरणात दिलेला आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयंत गोविंदराव पुराणिक
13-12-2023
upasana115@gmail.com
माझ्या वडिलांचे नावे इनामी जमीन (खिदमत) आहे. त्यांचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. त्यांचे आम्ही सहा भावंडे वारस आहेत. सदर जमिनीवर वारसदार नावे लावण्यासाठी काय करावे लागते तपशीलवार माहिती द्यावी.
खिदमतमाश जमीन हि सेवाधारी इनाम आहे . मंदिर , मस्जिद इत्यादी यांच्या पूजा -अर्चा करण्यासाठी अश्या धार्मिक स्थळांना दिलेल्या जमीन . अश्या जमिनींना केवळ मंदिराचे नाव लागू लागते . इतरांची नावे लावता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shailesh Subhash gaikwad
09-12-2023
sg14014@gmail.com
माझा वय वाटी रस्ता बंद करण्यात आला आहे तू मला परत चालू करायचा आहे त्यासाठी काय करावे लागेल
जो रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्या रस्त्याचा वापर जर शेती कारणासाठी होत असेल तर आपण मामलेदार न्यायालय अधिनियम अंतर्गतआपले तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकता. शेती शिवाय रस्त्याचा वापर अन्य कारणासाठी होत असेल तर आपणाला दिवाणी न्यायालयाकडे दाद मागावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by satish vishnupant lolge
08-12-2023
satishlolge@gmail.com
मी नाशिक येथे आशिष को ऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर 65 ओंकार नगर विठ्ठल मंदिराच्या जवळ राहतो माझ्या व शेजारच्या प्लॉट मध्ये सामाईक भिंत मध्ये अतिक्रमण केलेले आहे या करिता हद्द मोजणी साठी भूमिअभिलेख कार्यालय क्रमांक 3 येथे मोजणी बाबत चौकशी साठी गेलो असता आमच्या सोसायटी सिटी सर्वे झाला असून त्याची सनद पैसे भरून घेतल्या शिवाय मोजणी होणार नाही असे सांगितले मी सलग माझ्या घरात राहत असुन आज पावतो मला काही एक न सांगता अथवा नोटीस न देता माझ्या घराची मोजणी कशी काय झाली असे विचारता माहिती मिळत नाही तसेच आमच्या लगत असलेल्या प्लॉटचे देखील मोजमाप झालेले नाही तरी सनद तयार झाल्या आहेत़ यातील प्लॉट ले आऊट प्रमाणे क्षेत्रफळाच्या नोंदी अंदाजे लावल्या आहेत तरी या बाबत आपणा कडून काही ठोस तपासणी/कारवाई होऊ शकेल काय याची माहिती मिळावी ही नम्र विनंती आहे
ज्यावेळी नासिक शहराचे नगर भूमापन झाले , त्यावेळेस सर्व मिळकतींचे भूमापन झाले आहे . नगर भुमापनाचे आधारे प्रत्येक भूखंडाचे नकाशे सुद्धा तयार झाले आहेत . आपणाला अतिक्रमण याचे अनुषगाने पुढील कारवाई करण्याची असल्यास , झालेल्या भूमापनाच्या अनुषगाने , महसूल संहितेच्या प्रकरण ८ मधील कलम १३६ अन्वये , सीमा / हद्दी निच्छित करून मिळणेबाबत , मा जिल्हाधिकारी /उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा . हद्दी निच्छित करून दिल्यानंतर , आपल्या भूखंडावर शेजार्य्च्याने अतिक्रमण केले आहे का हे कळून येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shubham Yadav
04-12-2023
shubham.p.yadav@gmail.com
भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मराठी मधून pdf पाहिजे
आपणास एखाद्या नजीकच्या दुकानात जेथे मराठी भाषेतील कायद्याची पुस्तके मिळतात तेथून विकत घ्यावा लागेल . माझ्याकडे नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Niwrutti purushottam kawate
02-12-2023
kniwrutti7005@gmail.com
नमस्कार सर
माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची चार ठिकणी घर जागा आहे.
माझ्या आजोबांना दोन मुले होती सर्वात मोठे माझे वडील होते.
माझ्या आजोबा मयत झाल्यावर नियमाप्रमाने माझ्या वडिलांचे नाव सर्व घर जागे वर ग्रामपंचायत ला लागली.
पण कालांतराने माझ्या वडिलांचे त्याच्या लहान भावांशी भांडणे होऊ लागली त्यामुळे माझे वडिल दुसरीकडे रहावयास गेले.
पण सन 1984 ला सिटी सर्व्हे झाला त्यावेळेस माझ्या काकांणी माझ्या वडिलांच्या जागी मीच ऐकटा आहे असे सांगितले ऐ कु मे आहे असे सांगितले आणि सिटी सर्व्हे ला त्यांचे नाव लावले.
1) माझ्या वडिलांचे नाव सिटी सर्व्हे ला लावण्यासाठी काय करावे लागेल
2) ग्रामपंचायत आता नगर पंचायत झाली आहे आणि त्या जागेवर अजुनही माझ्या वडिलांचे नाव आहे 8A ला. आणि मी सर्व घरपट्टी पण भरली आहे
3) माझ्याकडे जून्या नोंदीपण आहे ग्रामपंचायत जागेचे माझ्या वडिलांच्या नावे
4) सिटी सर्व्हे ला नाव लावण्यासाठी काय करावे लागेल माझ्याकडे कोर्टाचा वारस दाखला पण आहे
5) त्या सर्व जागा धरण पुनर्वसनात जाणार आहे.
6) ग्रामपंचायत आणि नगरपंचायत च्या सर्व ठिकाणी माझ्या वडिलांचे नाव आहे.
7) सिटी सर्वे ला अधिकार आहे का ग्रामपंचायत ची नोंद कोणाच्या नावे आहे ते पडताळून न बघता
सिटी सर्वे ला कोणाचेही नावे लावावीत.
पण ज्या गावांमध्ये अथवा शहरांमध्ये राहता त्याचे ज्यावेळेस नगर भूमापन झाले त्यावेळेस आपल्या काकांनी आपल्या आजोबांच्या मालकीच्या ज्या चार मिळकती किंवा घर जागा होत्या त्या चा ताबा त्यांच्याकडे राहण्यास ते पात्र आहेत अशा प्रकारचा पुरावा देऊन मिळकत पत्रिकेला आपल्या काकांचीच केवळ नावे लागलेली आहेत असे आपले कथन आहे. जुन्या ग्रामपंचायत अभिलेखांवरती आपल्या वडिलांचे नाव आहे. नगर भूमापन चौकशीच्या अनुषंगाने, एखाद्या मिळकतीचा ताबा राहण्यास कोण व्यक्ती पात्र आहे या चौकशीचे निष्कर्ष नगर भूमापन कार्यालयात/ उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असतात. या चौकशी उताऱ्याची प्रमाणित प्रत आपण प्राप्त करून घ्यावी. व त्या चौकशी उताऱ्यामध्ये उपरोक्त चार घर जागांच्या ठिकाणी केवळ आपले काका हे ताबा ठेवण्यासाठी पात्र आहेत असा जर चौकशी अधिकाऱ्याचा निष्कर्ष असेल , तर अशा चौकशी निष्कर्षा विरुद्ध अपील , महसूल संहितेच्या उप्बंधानुसार , जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख /उपसंचालक भूमी- अभिलेख यांचेकडे दाखल करणे आवश्यक आहे .
चौकशी अधिकारी हा उपाधीक्षक भूमी- अभिलेख या दर्जाचा असेल तर , अधीक्षक भूमी- अभिलेख यांचेकडे अपील करावे लागेल अन्यथा चौकशी अधिकारी , जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दर्जाचा अधिकारी असेल तर अपील उपसंचालक यांचे कडे करणे आवश्यक आहे .
अपील ज्ञाप्नात उपरोक्त पुरावे दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Gajanan bhikanrao kale
01-12-2023
dgkale29@gmail.com
गजानन भिकनराव काळे रा sawdad तालुका sidhkhed raja जिल्हा बुलढाणा
अतिवृष्टी झाल्यामुळे शासनाने सिंदखेड राजा तालुका हा अतिवृष्टी ग्रस्त तालुका म्हणून घोषित केला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अनुदान जाहीर केले मी माझे आधार ऑनलाईन केवायसी केले मला vk number 2324RNRHR3986SWA05328170नंबर सुद्धा मिळाला चाळीस दिवस झाले अजून माझ्या खात्यात अनुदान जमा झाले नाही तरी मेहरबान साहेबांना माझी विनंती आहे माझी अडचण लवकरात लवकर दूर करावी व माजी अनुदान मला मिळून द्यावे विनंती
आपण आपल्या तालुक्याच्या तहसीलदार साहेब्बना प्रत्यक्ष भेटून , आपल्या खात्यात , अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा झालेली नाही हे सांगा . जर त्याचा काही परिणाम झाला नाही तर , आपले सरकार या संकेत स्थळावर आपली तक्रार दर्ज करा .
मात्र , अतिवृष्टी काळात , आपले शेतीचे नुकसान झाले होते व तसा पंचनामा करण्यात आला होता याची खात्री करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुदर्शन भाऊसाहेब चव्हाण
29-11-2023
Chavansudarshan21@gmail.com
माझ्या आजीने आमच्या वडिलोपार्जित घराला आजोबा वारल्यानंतर माझे वडील सहा भावंड व आजी एक असे सात वारस असताना फक्त स्वतः अन सर्वात लहान मुलगा असे दोघांनाच वारस लावले होते. आता आजी हयात नाही व माझ्या वडीलांचे पण निधन झाले तर वारस लागण्यासाठी मी काय करू?
आपले घर , ग्रामपंच्यात हद्दीत असेल तर , आपण पंच्यात समिती कडे अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3380 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
