जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 149 नुसार खातेवाटप करू शकतो का???

हो असेल तर कोणाकडे अर्ज करावा लागेल?
कलम १४९ अंतर्गत हक्क संपादनाच्या नोंदी अधिकार अबिलेखात करण्याबाबतचे उपबंध आहेत . खातेफोड केवळ कलम ८५ खाली , सह-ध्राकांमध्ये होउ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी जमीन गहान त्याला पैसे परत नाही केले आणि जमींन त्याच्या नावानी zali तर् मी त्याना दिलेले पैसे परत करीन तर् मला जमीन परत् मीडेल काय?
आपले गहन कोणत्या स्वरूपाचे आहे त्यवर अवलंबून आहे . जर संपती गहाण ठेवून , ताबा दिला असेल व तसी करारामध्ये शर्थ नमूद केली असेल कि कर्ज रक्कम व व्याज परतफेड केल्यावर , पुन्हा संपती गहानकारकडे हस्तांतरित करावी लागेल तरच , आपणास आपली मालमत्ता परत मिळेल . मात्र हि सर्व प्रक्रिया ऋणमोचनाच्या अगोदर होणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
ग्रामपंचायत गावठाण मधील मिळकतीस मूळ मालकाची १०० रुपये स्टॅम्प पेपर वर अंगठा घेउन मिळकत हस्तांतरित केली आहे. अशा प्रकारे मिळकत हस्तांतरित करता येते का त्याबाबत सदरची नोंद बेकायदेशीर आहे रद्द करावी म्हणून ग्रामपंचायत व पंचायत समिती मध्ये अर्ज देऊन हि कार्यवाही करत नाहीत. याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
अश्या प्रकारे रु १००/- च्या मुद्रांकावर्ती मालमत्ता हस्रांतरित होत नाही . आपण गट विकास अधिकारी यांचेकडे अपील करा . तेथेही काही झाले नाही तर न्यायालयात जावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1) G.R.P.& S.D. No.1586/34-D, Dated 17.5.1951
2) G.R.GAD No. Mis. 31/76-Desk-xoodl, Dated 25.8.1977
3) जा.बि.सा.पू.वि.क. डीएमसी. 1087/9698/608-32. Dated 2.1.1989
वरीप्रमाणे शासन निर्णयाची प्रत मिळावी

Ref 4: Govemment Resolution No. Mis.2010/PRA.KRA.300/Videshi-2 Mantralaya, Mumbai-32, Dated 5/10/2010

Question by ravi katariya
01-05-2024
adsumdirector@gmail.com

i want land rates for valuation of kagal hatkanangale kolhapur.
नमस्कार सर
माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची चार ठिकणी घर जागा आहे.
माझ्या आजोबांना दोन मुले होती सर्वात मोठे माझे वडील होते.
माझ्या आजोबा मयत झाल्‍यावर नियमाप्रमाने माझ्‍या वडिलांचे नाव सर्व घर जागे वर ग्रामपंचायत ला लागली.
पण कालांतराने माझ्या वडिलांचे त्याच्या लहान भावांशी भांडणे होऊ लागली त्यामुळे माझे वडिल दुसरीकडे रहावयास गेले.
पण सन 1984 ला सिटी सर्व्हे झाला त्यावेळेस माझ्या काकांणी माझ्या वडिलांच्या जागी मीच ऐकटा आहे असे सांगितले ऐ कु मे आहे असे सांगितले आणि सिटी सर्व्हे ला त्यांचे नाव लावले.
1) माझ्या वडिलांचे नाव सिटी सर्व्हे ला लावण्यासाठी काय करावे लागेल
2) ग्रामपंचायत आता नगर पंचायत झाली आहे आणि त्या जागेवर अजुनही माझ्या वडिलांचे नाव आहे 8A ला. आणि मी सर्व घरपट्टी पण भरली आहे
3) माझ्याकडे जून्या नोंदीपण आहे ग्रामपंचायत जागेचे माझ्या वडिलांच्या नावे
4) सिटी सर्व्हे ला नाव लावण्यासाठी काय करावे लागेल माझ्याकडे कोर्टाचा वारस दाखला पण आहे
5) त्या सर्व जागा धरण पुनर्वसनात जाणार आहे.
6) ग्रामपंचायत आणि नगरपंचायत च्या सर्व ठिकाणी माझ्या वडिलांचे नाव आहे.
सर्व मालमत्ता ( चार घरे व अन्य काही असेल तर ) आपल्या आजोबांचे होते . त्यामुळे त्यवर आपले वडील व आपले चुलते यांचा सम समान अधिकार आहे . आपापसात एकत्र बसून वाटप करून घेणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kedar
29-04-2024
army101guy@gmail.com

प्लॉट वाटप केलेल्या वाढीव गावठाणाचा(वर्ग 2) सिटी सर्वे झालेला नाही.नकाशा उपलब्ध होत नाही.गट हा ग्रामपंचायत क्षेत्रात आहे .घरठान उतारा ही उपलब्ध आहे.तसेच 7/12 ला पण नाव आहे . काही लोक म्हणतात वैयक्तिक प्लॉटची मोजणी होत नाही तर संपूर्ण गटाची मोजणी करावी लागेल.
# जर माजी सैनिकाला या वाटप केलेल्या गटातील वैयक्तिक प्लॉटची सिटी सर्वे मोजणी करायची आहे तर काय करावे लागेल?
# पोलीस प्रोटेक्शन कसे मिळवावे आणि यावरील अतिक्रमण काढण्यासाठी काय करावे लागेल?
या आधी प्रांत साहेबानी वर्ग 2 मध्ये 7/12 नाव लावले असून आदेशामध्ये तहसीलदारांना जागेचा कब्जा देण्याबाबत लिहिलेले आहे पण अजून अंमलबजावणी झालेली नाही. सिटी सर्वे मोजणी व कब्जा यासाठी काय करावे लागेल ?
मुंबई सरकारी ठराव L.N.D. 4746/63771 ता 21/09/1955 काय आहे?

Question by kAILAS mORE
28-04-2024
kailasbright@gmail.com

माझी जमीन दोन शेतकऱ्यांच्या मध्ये आहे उजव्या बाजूला माझा गट नंबर आहे आणि डाव्या बाजूला पण माझा गट नंबर आहे ती दोन्ही जमीनी माझ्या नावे आहेत पण माझ्या शेताच्या मध्ये दुसऱ्याची जमीन आहे आणि ती सरकार इनाम जमीन आहे आता मूळ शेतकरी त्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या नातेवाईकांनी त्याची जमीन सातबारा उतारा मध्ये फेरफार करून विकण्याच्या तयारीत आहे तरी एक बाजूचा शेतकरी म्हणून मला काय करता येईल ????एक कायद्याची तरतूद अशी आहे काय की ती जमीन फक्त मलाच विकावी लागेल
शेजार च्या शेतकर्यास जमीन विकावी असा कोणताही कायदा नाही . केवळ हिंदू वारसा कायदा या मध्ये , वंश-परंपरागत पद्धतीने आलेली जमीन , हि अन्य वारसाला प्राथम्याने विक्री करण्याचे बंधन आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४२ ब अंतर्गत वाणिज्य व रहिवास वापरासाठी सनद मिळणे कामी अर्ज दाखल केलेला आहे. अर्ज दाखल करताना कागदपत्रांमध्ये सक्षम प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आलेली बांधकाम परवानगी मागीतली. बांधकाम परवानगी नाही. परंतु सदर सक्षम नियोजित प्राधिकरण यांच्याकडून म्हणजे नगरपरिषदेकडून महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीचे बांधकाम आहे असे पत्र तसेच विकास नियंत्रण नियमावली नुसार झोन दाखला मध्ये वाणिज्य व रहिवास वापरास सनद मिळण्यास सक्षम प्राधिकरणाची हरकत नाही असे पत्र दिले आहे. या प्रकरणामध्ये बांधकाम हे नगरपरिषद कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीचे आहे त्याचा पुरावा नगरपरिषदेकडून १९५२ चे घराचे असेसमेंट उतारा दिला आहे तर बांधकाम परवानगी आवश्यक आहे का ? या बाबत मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती‌.
आपल्या जमिनीचा शेत-सारा वसूल करण्यात येत आहे . आता वेगळ्याने ४२ प्रमाणपत्र /सनद घेण्याची आवश्यकता नाही . स्थानिक प्राधिकरणाने , आपले बांधकाम अनधिकृत आहे म्हणून आपणास नोटीस दिली आहे का ? दिली असेल व जुने बांधकाम आपणास चालू ठेवायचे असेल तरच , ते नियमानुकुल करावे लागेल . अन्यथा या सर्व गोष्टी अनावश्यक वाटतात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Kiran H
20-04-2024
kiranhulawale@gmail.com

मी एक जमीन विकत घेतली आहे, पण मोजणी मध्ये ती जमीन मूळ मालकाच्या वहिवाटीच्या बाजूला निघते आहे, मोजणी मध्ये जिथे जमीन निघती आहे तेथे २४ वर्षा पासून एक कंपनीने रस्ता बनवलेला आहे, ती कंपनी वाले मोजणी मान्य करत नाहीये तर मी काय करावे .
आपण आपल्या जागेवरील अतिक्रमण कंपनीने काढावे या साठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar Yedage
20-04-2024
yedagesagar@gmail.com

नमस्ते सर,
भुमी अभिलेख मधील रेकॉर्ड जसे की सन 1800 कालीन सर्वे नंबर नकाशे सद्या तालुका भुमी अभिलेख कार्यालय मधे जीर्ण होऊन फाटले आहे.....तर त्याची copy संचालक भुमी अभिलेख पुणे (महाराष्ट्र राज्य) येथे मिळू शकेल का.....
जुना शिव पांदण गाडी वाट हि गटांची हद्द समाप्त तसेच शेत गट क्रमानकामधून सदरील रस्ता जात नाही याबाबत शासन निर्णय तसेच सविस्तर मार्गदर्शन व्हावे
विषय: शेतं जमीनीचा सात बारा उताऱ्यावरील क्षेत्र दुरूस्ती करणे बाबत.


महोदय,
मी माधव भास्कर पवार, पिता: भास्कर रावसाहेब पवार, रा.हावरगा, ता.जळकोट, जि.लातूर, येथील रहिवासी असून माझ्या वडिलोपार्जित पूर्वजांची असलेल्या शेत जमीनीचे सात बारा उताऱ्यावर एकूण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असल्याची नोंदणी करण्यात गेली आहे.

माझ्या आजोबांचे वडील म्हणजेच माधव दाजीबा रा. हावरगा, ता. जळकोट, जि. लातूर यांच्या नावे सन 1961 या साली सात बारा उताऱ्यावर, जुने पाहणी पत्रक (सन 1955 पासून ते 1957 या सालापर्यंत) तसेच वहितीचा तपशील (सन 1953 ते 1954), खासरा पत्रक, खासरा पाहणी पत्रक, क. ड. ई. पत्रक, इत्यादी. नुसार सर्वे नं. 17, हिस्सा (आ) (2) मध्ये शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 5.0 एकर 34.0 आर येवढं आहे.

सन 1961 या सालापासून ते 1980 या सालापर्यंत माधव दाजीबा यांच्या नावे सर्वे नं.17, हिस्सा (आ ) (2) मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे सात बारा उताऱ्यावर एकूण क्षेत्र 5.0 एकर 34.0 आर येवढं आहे.

सन 1980-1981 मध्ये सर्वे नं. 17 हिस्सा ‌‌‌(आ) (2) मध्ये असलेली शेतं जमीन ही (भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 2) आणि (भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 6) या दोन उपविभागात विभागली गेली आहे.

सन 1981 या साली माधव दाजीबा यांच्या नावावर असलेल्या भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 2 मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे सात बारा उताऱ्यावरील एकूण क्षेत्र हे 1.0 हेक्टर 07 आर येवढं दर्शिविण्यात आले आहे तर भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 6 मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे सात बारा उताऱ्यावरील एकूण क्षेत्र हे 98.0 आर येवढं दर्शिविण्यात आले आहे.

वास्तविक पाहता भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 2 मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे सात बारा उताऱ्यावरील एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 36 आर येवढं असायलाच पाहिजेत, पण असं न करता 1.0 हेक्टर 07 आर येवढंच दर्शिविण्यात गेलं आहे, म्हणजेच शेतं जमीनीच्या एकूण क्षेत्रापेक्षा सात बारा उताऱ्यावर 29.0 आर येवढं कमी क्षेत्र दर्शिविण्यात गेले आहे.

सन 1961 साली सर्वे नं. 17 हिस्सा ‌‌‌आ (2) च्या सात बारा उताऱ्यावर फेरफार नं. 31 हा चूकीचा फेरफार नं. दर्शिविला गेला आहे.
तहसिल कार्यालय जळकोट, येथून फेरफार नं. 31 ची प्रत मिळविली असून, त्या वरुन असे लक्षात येते की, फेरफार नं.31 चा आणि माधव दाजीबा यांच्या नावे असलेली शेत जमीनीचा काहीही संबंध नाही, म्हणून फेरफार नं. 31 हा चूकीचा दर्शिविला गेला आहे. हा फेरफार 1961 साली फक्त एकदाच आणि एकाच वेळेस आढळून आला आहे.

कालांतराने भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 2 मध्ये असलेल्या शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 07 आर हे गट क्रमांक 104 मध्ये दर्शिवले आहे तर भूमापन क्रमांक 17, भूमापन क्रमांकाचा उपविभाग 6 मध्ये असलेल्या शेत जमीनीचे एकूण क्षेत्र 98.0 आर हे गट क्रमांक 101 मध्ये दर्शिवले आहे.

वारसा हक्काद्वारे गट क्रमांक 101(क्षेत्र 98.0 आर) आणि गट क्रमांक 104 (1.0 हेक्टर 07 आर) मध्ये असलेली शेतं जमीन माधव दाजीबा यांचा मुलगा रावसाहेब माधव पवार, रा. हावरगा, ता. जळकोट, जि. लातूर यांच्या नावे केली गेली आहे.

त्याचप्रमाणे वारसा हक्काद्वारे रावसाहेब माधव पवार यांचा मुलगा भास्कर रावसाहेब पवार यांच्या नावे गट क्रमांक 104 मध्ये असलेली शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 07 आर नावे केली गेली आहे.
तर गट क्रमांक 101 मध्ये असलेली शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 98.0 आर हे रावसाहेब माधव पवार यांचा नातू व भास्कर रावसाहेब पवार यांचा मुलगा म्हणजेच माधव भास्कर पवार यांच्या नावे करण्यात आली आहे.

सन 2023-2024 या चालू वर्षात, माधव भास्कर पवार यांच्या नावे असलेली गट क्रमांक 101 मध्ये एकूण शेतं जमीनीचे क्षेत्र 98.0 आर येवढं आहे आणि भास्कर रावसाहेब पवार यांच्या नावे असलेली गट क्रमांक 104 मधील शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 07 आर येवढेच आहे.

वास्तविक पाहता, या चालू वर्षात भास्कर रावसाहेब पवार यांच्या नावे असलेली गट क्रमांक 104 मध्ये शेतं जमीनीचे एकूण क्षेत्र 1.0 हेक्टर 36 आर असायला पाहिजे आहे पण भास्कर रावसाहेब पवार यांच्या नावे असलेली गट क्रमांक 104 मधील शेतं जमीनीचे क्षेत्र हे फक्त 1.0 हेक्टर 07 आर येवढंच आहे, म्हणजेच एकूण शेतं जमीनीच्या क्षेत्रापेक्षा 29.0 आर येवढं कमी क्षेत्र दर्शविले गेलं आहे.

तरी आपणांस सर्वांना हात जोडून विनंती आहे की, सर्वे नं. 17 हिस्सा (आ) (2) मध्ये सात बारा उताऱ्यावरील शेतं जमीनीचे क्षेत्र कमी दर्शविल्याचे कारण सांगून, शेतं जमीनीचे क्षेत्र पूर्वस्थितीत बरोबर करण्यास सविस्तर माहिती देण्यात यावी हि कळकळीची विनंती, मी तुम्हा सर्वांकडून आशा करतो की, तुम्ही मला नक्कीच मदत कराल.



अर्जदार
माधव भास्कर पवार
(9975157114)




अर्जदाराशी असलेले नाते:

वडीलांचे नाव: भास्कर रावसाहेब पवार
आजोबांचे नाव: रावसाहेब माधव पवार
आजोबांच्या वडीलांचे नाव: माधव दाजीबा
भूमापन क्र १७ ची पोट हिस्सा मोजणी होऊन दोन उपविभागांचे क्षेत्र दर्शवण्यात आले होते का ? कि तलाठी यांनी दोन उपविभागांचे ७/१२ तयार केले होते. आपण जे फेर्फाराने क्षेत्र कमी दाखवले आहे त्याविरीद्ध अपील दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rupesh Vitthal Bhale
22-03-2024
bhale.rv@gov.in

Please provide me circular dt.26/5/2014 & 10/5/2006

Question by sunil aran
21-03-2024
sunilaran2121@gmail.com

7/12 nahi ahe property details kashi shodaychi
माझ्या वडिलांनी 2001 मध्ये पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दी मध्ये 7 गुंठे जागा विकत घेतली. तुकडेबंदी लागू असल्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांनी सात बारा नोंद रद्द केली. सध्या ती जागा सक्षम प्राधिकरण PMRDA च्या हद्दीत गेली आहे. PMRDA च्या गुंठेवारी नियमितीकरण / अनधिकृत विकास अधिनियम अंतर्गत ती जागा नियमित करून घ्यायची आहे. त्यासाठी सात बारा वर नाव पाहिजे म्हणुन सांगितले जात आहे. शासकीय मोजणी पण करता येत नाही. ज्या ठिकाणी जागा आहे तो संपूर्ण गट 2.34.00 हेक्टर चा आहे व 1.54.00 हेक्टर अजून मालकाच्या वारसदारांच्या नावाने आहे. ज्यांच्या कडून खरेदी झाली ते मयत झाले आहे. वडिलांनी जागा खरेदी केल्यानंतर 1-2 गुंठयाचे बऱ्याच जणांचे नाव सात बारा वर आले आहे. 2001 नंतर तलाठी साहेब तसेच मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार अर्ज देऊन तसेच विचारून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. 2001 पासून ते 2024 आत्ता पर्यन्त अजून नाव लागले नाही. कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
तुमची जागा , निवासी , औद्योगिक किंवा वाणिज्य वापर विभागात गेली असेल तर आपली फेरफार नोंद मंजूर होऊ शकते व आपले नाव ७/१२ ला लागू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Amol
15-03-2024
amolsalunkhe@rediffmail.com

माझ्या मामाची गावी जमीन आहे. आईचे नाव इतर हक्कात आहे. मी अनेकदा शेतीच्या कामाकरिता मामा बरोबर जात असतो. त्याच गटातील एका व्यक्तीने मामाच्या क्षेत्रात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्याचा राग धरुन त्याने CPC 6 J नुसार दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र माझं ७/१२ वर. नाव नसताना माझा जमिनीशी काहीही संबंध नसतानाही त्याने मलाही न्यायालयाची नोटीस पाठविली आहे. अशी बेकायदेशीर दावा. दाखल करता येतो का? कोर्ट नोटीस पाठविण्याआधी काही बघत न ही का? याबाबत काय करावे मार्गदर्शन करावे.
कोणी कोणाला नोटीस कशी द्यावी व का द्यावी या बाबत आपण काहीच करू शकत नाही . आपणास कोर्टाचे समन्स आले असेल तर, कोर्टात हजार राहून , आपले म्हणणे दाखल करावे लागेल . त्याने वकिलामार्फत नोटीस दिली असेल तर , त्याला उत्तर द्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sandesh Godve
14-03-2024
sa1419@gmail.com

आम्ही सरकारी मोजणी केली त्यामध्ये असे कळले कि बाजूच्या शेतकऱ्याने आमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. पण ते आम्हाला ताबा देण्यास नकार देत आहे. पुढे काय करावे ? विस्तृत माहिती कुठे मिळेल ?
महसूल संहितेच्या कलम १३६ प्रमाणे हद्द निच्छित करून मिळणे करिता , जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज करा . हद्द निच्छित जिल्हाधिकारी यांनी करून दिली व त्यामध्ये हे निच्छित झाले कि आपल्या शेजारच्या शेतकर्याने , आपल्या जागेत अतिक्रमण केले आहे तर आपण महसूल संहितेच्या कलम १३८ खाली आपल्या जागेतून त्याला काढून टाकण्यासाठी , जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा.

महसूल संहिता – “महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६” असा वाचावा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार,
बोगस मोजणी नकाशा वरून बिगर शेती परवानगी केली असेल व ईतर शासकीय परवानगी घेऊन त्या जमिनीवर व्यवसाय चालू असेल तर तक्रार कोठे करायची व कोणते कलम व दंड नुसार कारवाई करण्याची माहीती मिळावी, ही नम्र विनंती
बिगर शेती आदेश च्या अटी व शर्ती चे भंग केल्यास कोणते नियम लागू होतात. ही माहिती मिळावी ही विनंती
रित सर आपली फी देण्यास तयार आहे. कृपया माहीती मिळावी
दिलीप लोंढे, पूणे
9822067943

Question by Vikrant Shinde
06-03-2024
vcshinde09@gmail.com

Is Maharashtra rehabilitation act 1976 is applicable for project affected persons of Dhom dam Satara ?please anwer
सर्व्हे क्रं ६० गट ३ मधील जमीन तहसील कार्यालयात १९५९-६० पासुन १९७१-७२ पर्यंत १६ एकर २५ आर आहे एकत्रीकरणानंतर भूमी अभिलेख कार्यालयाच्या आकारबंध मधील नोंद ही PHS रजिस्टर प्रमाणे १७ एकर ३५ आर केली गेली हीच भूमी अभिलेख कार्यालयाची चुक तहसील कार्यालयाच्या क पत्रक तसेच एकत्रीकरणापूर्वीच्या ७-१२ मध्ये नोंदीमध्ये पुराव्यानिशी दिसून येत आहे, याकारणाने इतर गटामधील ३ शेतकरी यांचे क्षेत्र कमी झाले आहे. मा.तहसीलदार,मंडळ अधिकारी तसेच तलाठी साहेब, तसेच एकूणच कर्मचारी क पत्रक, आकारबंध, एकत्रीकरण यावर कुठलाच अभ्यास न करता भूमी अभिलेख कार्यालयाची ही चुक बाधीत शेतकरी यांच्यावर थोपवत आहेत, तसेच आजतागायतच्या हस्तलिखित १९७१ पासुन २०१७ पर्यंतच्या सर्व ७-१२ या बरोबर आहेत आणि ऑनलाईन प्रमाणे क्षेत्र जुळवणी चुकीची झाली आहे असे का ? याबाबत काय सल्ला दयाल ही विनंती.
एकत्रीकरण योजनेत क्षेत्र कमी जास्त होत असते . जमिनीच्या मगदुराप्रमाणे ( उत्पादकता ) जमिनीचे वाटप एकत्रीकरण योजनेत होते. त्यामुळे त्याला चूक म्हणता येणार नाही . मात्र जर जमीन एकाच उत्पादकतेची असेल तर , योजने दुरुस्तीसाठी , अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Mul phalni shet nakash tayar karnare adhikari yanche nav taril v sal .tasech mul bhumi abhilek dastayeaj kontya prakare milvavyat te kothe surshit astat dhanyawad
उप-अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे पहावे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sagar patil
26-02-2024
sp109391@gmail.com

सर माझा प्रश्न असा आहे की xyz व्यक्तीची 3 एकर जमीन त्यास वारसाने प्राप्त झालेली त्याचे वडील 40 वर्षे झाली मृत्यू पाहून त्याला एक बहीण असून त्याने त्या बहिणीचा वारस सातबारा सदरी लावलेला नाही मग विषय असा आहे की एक्स वाय झेड व्यक्तीची जमीन आम्ही नोंदणी कृत खरेदी खताने तीन वर्ष झाली खरेदी करून खरेदी करत असताना त्या व्यक्तीने आपणास बहीण नसल्याची खोटी माहिती दिली व खरेदी करून दिले आज तीन वर्षे झाली 7 12 सदरी खरेदी घेणाऱ्याचे नाव आहे तर आता कोर्टाकडून देणाऱ्याला बहिणीच्या वतीने नोटीस आल्या की माझ्या हिशाची जमीन मला मिळावी तर त्या देणाऱ्या व्यक्तीने आम्हाला बहिणीची व त्याची कोर्ट केस कोर्टात पंधरा वर्षे झाले चालू आहे अशी कोणतीही कल्पना खरेदी वेळी दिलेली नव्हती तर सर यामध्ये घेणाऱ्याला कोणत्या परिणामाला सामोरे जावे लागेल किंवा या गोष्टीचा घेणाऱ्या वर कोणता परिणाम होतो खरेदी करताना बहिणीचे सात बारा मध्ये नाव नव्हते कृपया मार्गदर्शन करावे
आपण जमीन खरेदी करताना , वर्तमान पत्रात नोटीस दिली होती का ? तसेच मालकी हक्क चौकशी वाकीलानामार्फात केली होती का ? या दोन्ही गोष्टी केल्या असतील तर , अडचण येण्याचे काही कारण नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Harun Yunus Shah
24-02-2024
harunshah445@gmail.com

Reconveyance Deed केव्हा उपयोगी पडतो? तो का केला जातो? सदर डीड न केल्यास भविष्यात काही अडचणी उद्भवतात का?भविष्यात डीड न झालेली जमीन कोणी खरेदी केल्यास नविन मालकास काही अडचणी येतात का? या विषयी मार्गदर्शन व्हावे
प्रत्यंतर-पत्र दस्त म्हणजे reconveyance deed हे ज्यावेळी कर्ज रक्कम व त्यावरील व्याजाची परत फेट केली जाते , त्यावेळी कर्ज रक्कमेची हमी म्हणून जी स्थावर संपदा गहाणकाराने गहान्दाराकडे हस्तांतरित केली होती ती परत गहानकारकडे हस्तांतरित करणे . मात्र अशी संपदा परत हस्तांतरित करताना , मुद्रांक शुल्क अधिनियमाप्रमाणे आवश्यक मुद्रांक शुल्क जमा करणे आवश्यक आहे . अशी मालमत्ता हस्तांतर करून घेणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रत्यंतर-पत्र दस्त म्हणजे reconveyance deed हे ज्यावेळी कर्ज रक्कम व त्यावरील व्याजाची परत फेट केली जाते , त्यावेळी कर्ज रक्कमेची हमी म्हणून जी स्थावर संपदा गहाणकाराने गहान्दाराकडे हस्तांतरित केली होती ती परत गहानकारकडे हस्तांतरित करणे . मात्र अशी संपदा परत हस्तांतरित करताना , मुद्रांक शुल्क अधिनियमाप्रमाणे आवश्यक मुद्रांक शुल्क जमा करणे आवश्यक आहे . अशी मालमत्ता हस्तांतर करून घेणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.34 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3380
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3