जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by शशिकांत जाधव
10-06-2013
jadhavshashikant28@yahoo.com
एकदा मेंबर लोगिन मधून सदस्य झाल्यावर जर आपणाला प्रोफाईल मध्ये दुरुस्ती कसे करावे...
Question by योगेश पष्टे
09-06-2013
yogayog5050@yahoo.co.in
ह्या संकेतस्थळावर निवडणुक विषयक कायदे, नियम व शासन निर्णयांचा समावेश केल्यास हे संकेतस्थळ अधिक परिपुर्ण होईल. हे संकेतस्थळ निर्माण व विकसीत केल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व पुढील वाटचालीसाठी शुभेछा!!!
आपण सर्वांनी मिळून हे
संकेतस्थळ परिपूर्ण केले पाहिजे.
विकास नाईक साहेबांचे आभिनंदन.
Reply by विकास खरात | उप जिल्हाधिकारी
Question by कैलास शेटे
01-06-2013
shete.kailas@rediffmail.com
महोदय, मी कारागृह खात्यात नोकरीस असून पुणे, (हडपसर) येथे राहत आहे. माझे व माझ्या कुटुंबाचे रेशन कार्ड नाही तरी रेशन कार्ड काढण्याकरिता काय करावे लागेल. धन्यवाद.
If you have obtained a ration card any where in Maharashtra/ India before shifting to Pune then
1. Ration card surrender certificate of Tahsildar/ Rationing officer of the area where you domiciled
2. Residence proof where you are residing now
3. Apply to concerned Rationing officer of Hadapsar
If you have not obtained ration card in your life time or your even your parents had not obtained ration card or your name was not included in parents ration card / relatives card then
1. Affidavit disclosing that you have not obtained ration card any where in Maharashtra or India in your life time or your name was not included in other ration card
2 residence proof where you are staying
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विनोद अरविंद माळी
27-04-2013
vinodamali@gmail.com
७/१२ चे महत्वाचे भाग कोणते ?
Every part/ entry on 7 /12 is important.
Copy of 7 /12 should be periodically taken/ obtained from Talathi and its reading and perusal is advised.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
७/१२ चे मुख्यतः गाव नमुना ७ व नमुना १२ असे २ भाग पडतात.
गाव नमुना ७ मध्ये भूमापन क्रमांक (गट नंबर), भूमापन क्रमांकाचा उपविभाग (पोस्ट हिस्सा), खाते क्रमांक, भूधार्ण पद्धती, भोग्वातादाराचे नांव, शेताचे स्थानिक नांव, लागवडीचे क्षेत्र, पोट खराब, कुळाचे नांव, हे महत्वाचे घटक असतात.
नमुना १२ मध्ये वर्ष, हंगाम, मिश्र पिकांखालील क्षेत्र, पिकाचे नांव, जालसिंचीत, अजलसिंचीत, जाल्सिंचानाचे साधन, शेर हे घटक असतात.
- शेखर गायकवाड.
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by अभिषेक विनोद माळी
24-04-2013
vinodamali@gmail.com
सातबारा म्हणजे काय ?
जमिनीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात ठेवता येणे शक्य व्हावे म्हणून, आणि सर्व ठिकाणी सारख्याच पद्धतीने जमिनीचे महत्वाचे व मुलभूत रेकॉर्ड असावे या हेतूने तलाठी दप्तराची रचना करण्या आली आहे.
तलाठी दप्तर हे ऐकून १ ते २१ नमुन्यात ठेवले जाते. त्यातील ७ क्रमाकांचा नमुना व १२ क्रमाकांचा नमुना मिळून सातबाराचा नमुना तयार झाला आहे.
- शेखर गायकवाड
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by दिनेश शिवाजी जाधव
24-04-2013
dsjadhav@gmail.com
७/१२ नव्याने केंवा व कसा लिहतात ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १२६ नुसार ७/१२ पहिल्यांदा नव्याने लिहिला जातो. त्यानंतर दर १० वर्षांनी ७/१२ पुस्तके नव्याने लिहिली जातात.
पहिला ७/१२ पूर्ण झाल्यानंतर, नवीन ७/१२ लिहायला घेतात. ज्या नोंदी खोडून टाकलेल्या असतात किंवा ज्या अक्षरांना कंस केलेला असतो त्या वगळून ७/१२ लिहिला जातो.
७/१२ वरील मालकी हक्क सदरातील व इतर हक्कातील कोणतेही महत्वाचे लिखाण फेरफार नोंद केल्याशिवाय ७/१२ वर येऊ शकत नाही .
- शेखर गायकवाड
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by दीपक विठ्ठलराव जाधव
24-04-2013
deepakvjadhav@gmail.com
७/१२ चा उतारा कसा वाचावा ?
७/१२ उतार्यावर छापील स्वरुपात प्रत्येक रकानाच्या वर माहिती कशाबद्दल आहे हे नमूद असते.
उदा. गट क्रमांक, मालकाचे नाव, धारण प्रकार, लागवडी योग्य क्षेत्र, कुळाचे नाव इ चा उल्लेख असतो.
यातील गट क्रमांक म्हणजे जमिनीचा गट न. होय, मालक सादरी मालकाचे नाव, कुळाचे नाव या सदरात कुळाचे नाव, या शिवाय गावाचे नाव, तालुक्याचे नाव इ. मजकूर नावाप्रमाणे लिहिला जातो. जमिनीचा प्रतवारीनुसार आकार ठरवण्यात आला आहे. तो रुपये पैसे या भाषेत लिहिला जातो. धारण प्रकारामध्ये जमीन खालसा (खा), सरकारी (स), देवस्थान इनाम (दे), असा उल्लेख असतो. खाते क्रमांक रखान्यात गावातील खातेदारांना अनुक्रमाने जो नंबर दिला जातो, तो लिहितात. नमुना बारामध्ये पिकाच्या नोंदी हंगामाप्रमाणे लिहितात.
- शेखर गायकवाड
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by विशाल प्रभाकर कळींकर
vihankalinkar097@gmail.com
महसूल विभागातील तलाठी यांना तहसील कार्यालयातील डाक वाटप करणे बंधन कारक आहे किंवा कसे याबाबत माहिती द्यावी हि विनंती
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3460 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
