जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by swati swami
07-02-2017
swati.swami@yahoo.com

मा. सर धन्यवाद . पण महेश मुकुंद सप्रे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व प्रवीण वरंडे व इतर -OA No ३५४/२०१५ हा निर्णय कोठे मिळू शकेल ?
संबंधीत न्यायालयात अर्ज करून नक्कल घेता येईल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर मी राहुल माझा प्रश्न असा आहे कि आमची गावी वडिलोपार्जीत जमीन आहे, ती जमीन आमचे आजोबा निधन झाल्यावर वारस तपासणी करून कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या मोट्या काकांनी सातबारावर आपले नाव लावले व माझ्या वडिलांचे नाव गाव नमुना ६ क मध्ये लागले आहे आता मोठे काका वारले आहेत त्यांच्या मुलांनी वारस तपासणी करताना स्वतःच्या कुटुंबाचीच फक्त नोंद केली आहे त्या बरोबर माझ्या वडिलांची त्यांचे संख्ये भाऊ म्हणून वारस म्हूणन नोंद करणे जरुरी असताना हि त्यांनी फक्त आपल्याच कुटुंबाची नोंद केली आहे , तर माझ्या वडिलांनी आपल्या सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी काय करावे ?त्यासाठी मोट्या काकांच्या कुटुंबाची सही किंवा परवानगी लागेल काय ?गाव नमुना ६ क च्या उताऱ्या वरून वारस तपासणी करता येईल काय ?याचे आपण मार्गदर्शन करावे धन्यवाद साहेब .
संबंधीत फेरफार विरूध्द अपील दाखल करावे.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Vikram yadav
06-02-2017
Vikram.vy1113@gmail.com

. Namaskar Sir appan mala nehmich yoga MargDarshan keele ahhe an mala vicharyache ahhe ki mage Apil prant Sir yanchakade Charu hote te 7/12 nod dharnys sathi che hote amche vakil sangtat ki amche saves Kam Dale ahhe ata no nikal prant shheb detil . Toa nikal postane kalvala Gail.atta 2 machine gale tari nikal kalvala nahi.tar mi Kay karu, kharch Kati kalvadhi nikal patavnysathi ahhe plz sanga.thanks.
आपण स्वत: संबंधीत कार्यालयात नकलेसाठी अर्ज करावा. निकाल झाला असेल तर त्या्ची नक्कल लगेच मिळू शकेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by sandeepK
06-02-2017
sandeep.kurade25@gmail.com

1. साहेब ,माझा प्रश्न
जर वाढीलोपार्जित हिंदू अविभक्त कुटूंब मिळकत आहे आणि त्या शेतजमीन आहॆ,
तर वडील x च्या मृत्यु 1965 ला झाला आणि त्यांचे 4 मुले होती ( a ,b मुले C,D विवाहित मूली ) आता A & B हेयानी त्यांची नावे कब्जेदारव C ,D चीना वे इतर हक्कात 1984 ला 7/12 वर नोंद केली.

तरी 4 मुलांची पुर्वी मृत्यु आहेत पण त्यांची वारासदार चि नावे पण त्या प्रमाणे नोंद झाली, आता C & D हया मूली चे वारस इतर हक्कात आहे.

1) C & D चे कब्जेदार सदरी न होता इतर हक्कात केले हे कुठल्या कायदा चे उलघन आहे.?

2) C & D हया मूली चे वारस इतर हक्कात आहे.तर ते कब्जेदार सदरी नाव नोंदवु शकते का? कुठलया कायदाखाली.?

Question by sandeepK
06-02-2017
sandeep.kurade25@gmail.com

नमस्कार साहेब,
माझ्या आजी ची पुणेच्या ठिकाणी वडिलोपार्जित हिंदू अविभक्त कुटुंब ची मिळकत आहे,तसें तिचे नाव सातबाऱ्यावर इतर हक्कात नाव होते ,तिच्या मृत्यू नंतर तिच्या एक मुलगा "A" व विवाहित मुलगी B चे नाव सातबाऱ्यावर नोंदवले त्या नंतर एक बिल्ल्डर च्या चलाखी ने बाहीने ( B ) चे हक्क सोडपत्र (A) भाऊ ला मिळवून दिले आणि नंतर
खरीदीखत केले.

question १)
जर इतर हक्कात नाव होते तर खरीदीखत कसें झाले जर झाले तर कुठल्या कायदा खाली?

question २)
जर इतर हक्क च्या हिश्यादार तर्फे खरीदी घेऊ शकत नाही तर सादर खरीदीदस्त रद्द करण्याची किंवा हरकत घेण्या साठी काय महसूली प्रक्रिया आहे ?
पूर्वी मुलींना मिळकतीमध्ये समान वारसा हक्क् नसल्यामुळे त्यांचे नाव इतर हक्कात दाखल करण्याची पध्दत अस्तित्वात होती. बहिणीने हक्क‍सोडपत्र करून दिल्यामुळे तिचा हक्क संपुष्टात आला. त्यामुळे खरेदी खताला कायदेशीर बाधा येत नाही. खरेदीखत रद्द करण्याचे अधिकार महसूल खात्याला नाहीत. त्या‍साठी आपण दिवाणी न्यायालयात दाद मागावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

माझे घर वरणगाव येथे असुन त्या घरा बाहेर एक विहीर होती तिला पाणी नसल्याने काही वर्षांपूर्वी ती विहीर बुजवली. आता त्या विहीरीच्या जागेवर आम्हाला बांधकाम करायचे आहे. पण आमचे शेजारी त्या जागेवर हक्क दाखवत आहे. त्यांचा त्या विहिरीवर फक्त पाणी भरण्याचा हक्क होता. आता पाणीही नाही आणि विहिरही नाही. तर आमच्या शेजाऱ्यांना त्या विहीरीच्या जागेवर हक्क दाखविता येईल का? आम्ही त्या जागेवर बांधकाम करू शकतो का ?
शेजाऱ्यांना त्या विहिरीवर फक्त पाणी भरण्याचा हक्क होता हे आपण निर्विवादपणे सिध्द करू शकत असाल तर त्यांना विहीरीच्या जागेवर हक्क दाखविता येणार नाही. तुम्हीे त्या जागेवर आवश्यक त्या परवानग्या घेऊन बांधकाम करू शकाल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by chandrkant kale
04-02-2017
chandukale49@gmail.com

माझी आई नगर परिषद मध्ये झाडू कामगार आहे तिची जन्म तारिख नगर परिषद कडुन सेवापटाला चुकीची लागली आहे आई ने दिलेला जन्म दाखला लावला नाही आणि
आम्हाला कल्पना देखिल दिली नाही माझी आई असुक्षित आहे आम्ही कुठे तक्रार करावी कृपया मला मदत करा साहेब ही विनंती आहे
संबंधीत न्‍यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

kalam २५५/२५७ ची प्रकरणे अपर जिल्हाधिकारी यांचेकडे चालतात कि जिल्हाधिकारी यांचेकडे .
बहूतांश ठिकाणी अपर जिल्हाधिकारी यांचेकडे चालतात

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by RAVINDRA
03-02-2017
ravindra171282@gmail.com

नमस्कार सर , प्रश्न असा आहे कि ठाणे जिल्हेतील कल्याण डोंबिविली परिसरातील सोसायटी आहे तिचे बांधकाम १९८५ च्या दरम्यान झाले आणि सोसायटीस जर ओसी प्रमाणपत्र नसेल तर मानवी हस्थांतरांत काही अडचण येऊ शकेल का. आणि जर ओसी प्रमाण पत्र नसेल तर त्यास पर्याय काय होऊ शकतो. किंवा ओसी शिवाय मानवी हस्थांतरंन होऊ शकते का..
नमस्कार सर लीस पेंडन्सी चा शेरा ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद असल्यास सदर ७/१२ चे खरेदी खत करता येईल का
लीस पेंडन्सीचा शेरा ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद असल्यास सदर मिळकतीचे खरेदी खत करण्यात अडचण नाही. तथापि, सदर खटल्यात होणारा न्यांयालयीन निकाल नवीन खरेदीदारावर बंधनकारक राहील.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

सर आम्हाला सरकारी गायरान पठा २.०० हे जमीन मिळालेली आहे त्या मधून ३६१ क्र.हाव्हे जात आहे.भूसपाद्न मध्ये आमचे नाव घेतलेले नाही त्या साठी कोणाला भेटावे व त्याचा मोबदला किती मिळतो
संबंधित भूसंपादन अधिकार्‍याची भेट घ्‍यावी.

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आपला प्रश्न/सूचना... महोदय सन १९७० ते १९७२ च्या दुष्काळात माझ्या गावात पाझर तलाव झाले त्यांची नोंद ७/१२ अभिलेख वर आजपर्यत नाही तसेच सदर पाझर तलावासाठी जी जमिन संपादीत झाली ती कोनी केली ते ही माहीत नाही आणि नोंदही ऊपलब्ध नाही ती फक्त ल पा विभागात आहे परंतु जलयुक्त शिवार मध्ये ४० लक्ष रु खर्च केला आहे मग ७/१२ सदरी नोंद कशी करता येईल यासाठी मी ९ महीन्यापासुन आपले सरकार व लोकशाही दीनातही अर्ज केले परंतु कोणीही अधिकारी लक्ष घालत नाही तयासाठी चा शासन आदेश ही दीला आहे मार्गदर्शन करा

Question by anand salve
03-02-2017
salveanand89@gmail.com

नमस्कार सर , तलाठी ऑफिस मधून फेरफार मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो का ? तो कसा ? किती दिवसात आपल्याला फेरफार बाबत माहितीचे कागतपरत्र मिळतील .
महोदय,
गाव नमुना ७ (अधिकार अभिलेख ) मध्ये सामायिक खातेदार यांचे नावापुढे त्यांचे हिश्याची जमिनीचे क्षेत्राची नोंद करण्याची महसूल अधिनियमात तरतूद आहे काय ? कृपया मार्गदर्शन करावे.
१९५८ वर्षाची किंवा त्या आधीची एखादी फेरफाराची हिस्टरी फाईल जर तलाठी ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस ला मिळत नसेल तर ती कुठे शोधावी

Question by swati swami
31-01-2017
swati.swami@yahoo.com

बी कर्मचारी ३ वर्ष पूर्ण न झाल्यामुळे महसूल अहर्ता परीक्षा देऊ शकत नाही .आंतर जिल्हा बदलीने सी कर्मचारी बी नंतर आलेला आहे आहे.बी नंतर सी chi जेष्टता आहे . सी अहर्ता परीक्षा उत्तीर्ण आहे .बी सिनियर आहे तरीही सी ला अव्वल कारकून पदी पदोन्नती देता येते का ? असेल तर कोणता नियम पाहावा लागेल ? कृपया मार्गदर्शन व्हावे.
नुकताच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने , या बाबत निकाल दिला आहे . विहित प्रयत्नात व वेळेत परीक्षा उत्तीर्ण झालेला , ज्येष्ठते मध्ये अगोदरचे स्थानावर असतो त्यामुळे तो अव्वल कारकून पदास पद्दोनात्तीस पात्र होतो .
महेश मुकुंद सप्रे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व प्रवीण वरंडे व इतर -OA No ३५४/२०१५

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमच्या फेरफारामध्ये गहाणखताचा उल्लेख आहे , तर हे गहाणखत कुठे मिळेल आणि ते मिळण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाला भेटावे
गहाणखत नोंदणीकृत असेल तर , दुय्यम निबंधक ( नोंदणी ) कार्यालयात मिळेल . प्रमाणित प्रत घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rohit said
30-01-2017
rohitsaid.07@gmail.com

साहेब, मी जातीचा दाखला काढला आहे परंतु माझे graduation पूर्ण झाले आहे तरी मला जात validity करायची आहे तर त्यासाठी काय करावे लागेल.
जिल्हा स्तरावर ( अनु जमाती सोडून ) सर्व जातीचे पडताळणी कार्यालय सुरु झाले आहे . हे कार्यालय सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात आहे . या ठिकाणी अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
आमच्या गावातील उपसरपंच यांच्या पत्नीची प्रसुती आमच्या गावात किंवा तालुक्यात न होता दुसऱ्याच तालुक्यात झालेली आहे.
परंतु उपसरपंच यांनी आपल्या मुलाची जन्मनोंद होण्यासाठी ज्याठिकाणी मुलाचा जन्म झालेला आहे तेथील हॉस्पिटलमधून तशी कागदपत्रे आणून आमच्या गावातील ग्रामसेवकाकडे दिले असता त्यांनी सदर जन्मनोंद लावलेली आहे.
१. ही नोंद बेकायदेशीर असू शकते काय ?
२. बेकायदेशीर असल्यास कोणावर कारवाई होऊ शकते, ग्रामसेवक की उपसरपंच
३. उपसरपंच यांचे पद यामुळे धोक्यात येऊ शकते का ?
४. हि नोंद बेकायदेशीर असल्यास त्याबाबत कोणाकडे तक्रार दाखल करण्यात यावी.

माहिती द्यावी ही विनंती
जन्म नोंद फक्त जन्म केव्ह्न झाला आहे यासाठी करावयाची आहे . जन्माचा दिनांकाचा पुरावा असल्यास , वडिलांचे कायमचे रहिवासी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नोंद करता येते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,ओपन स्पेसचा टीडीआर (मनपा) घेण्यासाठी काय करावे लागेल ?
एका व्‍यक्‍तीच्‍या 7/12 वर अडनाव नाही. अडनाव दाखल करण्‍यासाठी काय प्रक्रिया आहे
म. ज. म. अ १९६६ च्या कलाम १५५ प्रमाणे दुरुस्तीसाठी तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माननिय महोदयांस नमस्कार, १. एखाद्या विभागाचे नविन सेवा-प्रवेश नियम बनविण्यात येत असतील किंवा सुधारीत करण्यात येत असतील तर मान्यतेकरीता संबंधित विभागांस सादर करतेवेळेस (उदा. वित्त विभाग, महा. लोकसेवा आयोग, कार्या-१२, विधी व न्याय विभाग, इ.) त्यासोबत कर्मचा-यांशी संबंधित कोणकोणते कार्यालयीन दस्तएवज सादर करावे लागतात. व कर्मचा-यांची चालू वर्षातील सेवाजेष्ठता यादी, बिंदूनामावलीची प्रमाणित प्रत जोडली जाते कां? त्याचप्रमाणे संबंधित कर्मचारी सेवा-प्रवेश नियमांच्या प्रतीची मागणी करू शकतो कां? धन्यवाद, आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
mala as vicharaych aahe ki, jar ka mazjya aajobanch name saat baar n record la asel tar koni to chukichya paddhatine swatachya naave karu shakto ka?
aani as jar kelya tyachi takrar konakade karavi?
आजोबांच्या कायदेशीर वर्षांची नावे ७/१२ सादरी लागणे आवश्यक . चुकीचे नावे लागली असतील तर , संबंधित फेरफार विरुद्ध , प्रांताधिकारीकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,इनामवर्ग ६ ब जमिनीबाबत प्रकरणी संपूर्ण चौकशी होऊन नजराणा भरणेकामी अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांचेकडून पत्र प्राप्त झाले होते.परंतु आर्थिक अडचणीमुळे १ वर्षापर्यंत रक्कम भरता न आल्याने सदर प्रकरण निकाली काढण्यात येऊन तहसील ऑफिस मध्ये पाठविण्यात आले.परंतु आज रोजी अर्जदार सदर रक्कम भरण्यास तयार आहेत .तरी नव्याने पुन्हा अर्ज दाखल करणे आवश्यक आहे का?पुन्हा संबंधितांचे जाब-जबाब व प्रतिज्ञापत्र घ्यावे लागतील का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती........
आर ओ आर प्रकरणात कोर्ट फी बाबत काही शासन निर्णय आहे का ? किंवा कार्यालयात अर्जदार यांचेकडून अर्ज घेताना किती रुपयांचे मुद्रांक त्या अर्जावर असावेत ? कृपया मार्गदर्शन व्हावे .

This page was generated in 0.40 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3