जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

एखादा महसुल कर्मचारी आंतर जिल्‍हा / आंतर विभाग बदलीने बदनुल आला असता, नियुक्‍तीच्‍या जिल्‍हयामध्‍ये दुय्यम सेवा / महसुल अर्हता उत्‍तीर्ण केल्‍या असल्‍यास बदलीनंतरच्‍या जिल्‍हयात संबंधीत कर्मचा-यास शासन परिपत्रक दि १४.०९.२०१६ नुसार पुन्‍हा परिक्षा देण्‍याची आवश्‍यकता नाही. परंतु सदर कर्मचा-यास नियुक्‍तीच्‍या जिल्‍हयामध्‍ये दुय्यम सेवा / महसुल अर्हता परिक्षेतील काही विषयामधुुुन सुट मिळाली असल्‍यास बदलीनंतरच्‍या जिल्‍हयात संबंधीत कर्मचा-यास पुन्‍हा सुट मिळालेल्‍या विषयाची परिक्षा देणे बंधकारक आहे का ?
सूट दिलेल्या विषयांची परीक्षा देणे बंधन कारक नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार
मी सण 1998 साली २ गुंठे जमीन खरेदी केली आहे त्या वेळी माझे नाव २ गुंठे क्षेत्र साठी मालक सादरी आले आहे सण 1999 साली मी ती जमीन विकली होती त्या वेळी खरेदी घेणार यांचे नाव इतर हक्कात आले आहे.परत 2000 साली ती जमीन मी खरेदी केली आहे आत्ता माझे नाव मालक सदरी येणार नाही का
सध्या आपण जुंचे कडून जमीन खरेदी केली त्यांचे नाव इतर हक्कात कसे आले ? फेरफार पहा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय साहेब, भुसंपादन कायदा १८९४ अन्वये जमीन संपादित केली गेल्यानंतर जमीन मालकाने सदर जमिनीचा मोबदला म्हणून अॅयडव्हांस रक्कम देखील स्विकारलेली आहे आणि उर्वरीत रक्कम न्यायलायत जमा केलेली आहे, अशा परिस्थितीत सदर जमीन आज रोजी मोकळी आहे तर अशी जमीन मालकाला परत मिळावी यासाठी कायद्यामध्ये काही तरतुद आहे का? तशी तरतुद असल्यास कृपया अधिनियम आणि कलम त्याची माहिती देण्यात यावी. ही नम्र विनंती...
1. नुकसान भरपाई रक्कम न्यायालयात जमा झाली म्हणजे कायद्याने , खातेदारास नुकसान भरपाईची रक्कम दिली असे मानले जाते .
२. १८९४ च्या कायद्यानुसार जमीन संपादन झाली असेल व संपादन प्रयोजनासाठी तिचा वापर होत नसेल तर , अन्य सार्वजनिक कामासाठी अशी जमीन देण्याची आहे . अथवा अश्या जमिनीचा लिलाव केला जातो . ती मूळ मालकांना परत देता येत नाही

भास्कर पिल्ले विरुद्ध केरळ शासन ( सर्वोच्च न्यायालय )
३. २०१३ चे भू संपादन कायद्यात , जमिनीचा भू संपादन प्रयोजनासाठी वापर ५ वर्षात ना झाल्यास परत देण्याची तरतूद आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री किरण पानबुडे सर नमस्कार मी तुम्हला फोन करू करु शकतो का ? मदत करा ?...
Nmaskar sir sasan jama jamnisadi kahi paryay ahi kaa? sir tyaver marg sangaa?....
होय. आपली जमीन महसूल न भरल्याने , शासन जमा झाली असल्यास , आपण जमीन परत मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,

माझी रत्नागिरी जिल्ह्यात वडिलोपार्जित जमीन आहे. यातील काही जमीन मुंबई गोआ महामार्ग रुंदीकरणात जात आहे. सदर जमिनी संदर्भात माझे काही प्रश्न आहेत.

सन २००८ साली माझ्या आत्यानी नोंदणीकृत हक्क सोड पत्राद्वारे या सर्व जमिनीवरील आपला हक्क सोडला. त्यानुसार त्यांची नावे देखील ७/१२ उताऱ्यावरून कमी झाली. माझी आजी २००३ साली वारली आणि त्याचा उल्लेख वरील हक्क सोड पत्रात देखील आहे. परंतु, २००९ साली माझ्या आजीचे वारस म्हणून आत्यांची नोंद परत ७/१२ उताऱ्यावर करण्यात आली.
माझे प्रश्न असे आहेत कि,
२००९ साली माझया आत्याच्या नावांची परत करण्यात आलेली नोंद कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे का?
२००९ साली परत करण्यात आलेली नोंद, मी रद्द करू शकतो का? आणि त्यासाठी मी कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज करू?
आपल्या उत्तरामुळे मला फार मदत होईल.
धन्यवाद....
आत्याने जर नोंदणीकृत दास्ताने हक्क सोडला असल्यास तिचा हक्क संपलेला आहे . नुकसान भरपाई रक्कम देण्यासाठी काला ( CALA -Competent Authority Land Acquisition) यांची नोटीस प्राप्त झाल्यावर , त्यांना हक्क सोड पात्र दस्त दाखवा . तसे आपले म्हणणे सादर करा .
आत्याचे लावणे चुकीचे आहे . कदाचित आपण हक्क सोड पत्र आजी मयत झाल्यावर , वारस नोंद होताना , हक्क सोड पत्र तलाठी / मंडळ अधिकारी यांना सादरकेले नसेल . तथापि आपण सध्या उपरोक्तनमूद केल्याप्रमाणे , काला यांना हक्क सोड पत्र दाखवून आपली नुकसान भरपाई रक्कम प्राप्त करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर मला जमीन खरेदी विषयी थोड़ी माहिती हवी आहे
सर मला 2 गुंठे शेती जमीन एका व्यक्ती कडून घ्यायची आहे तो सध्या तेथे राहत आहे आणि त्याची घराची नोंद ग्रामपंचायत मधे आहे तर या व्यवहारात खरेदी होईल की नोटरी आणि आणखी काही पर्याय आहे का। धन्यवाद
१.जमीन रहिवासी वापर विभागातील असेल तर , तुकडे बंदी कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाही .
२. जमीन नोंदणीकृत दस्ताने खरेदी करा . notarorized दस्तास कायद्यात आधार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
मला एक प्रश्न विचारायचा आहे आमचा एक घर आहे ते १९९४ पासून ग्रामपंचायत मध्ये माझ्या नावावर आहे व सदरील घर हे १९९४ च्या आधी मोकळी जागा होती नगरपंचायत मध्ये सगळे फेरफार व्यवस्थित झाले आहेत पण माझ्या नावावर PR कार्ड नाही व घरच्या पण कोणाच्या नावावर pr कार्ड निघत नाही आम्ही १९88 पासून येथे राहत आहोत तर PR CARD नसेल किंवा दुसर्याच्या नावावर असेल तर?
बहुतेक सिटी सर्वे ला नोंद झाली नसावी त्या काळात
आपले घर ग्राम पंचायत मध्ये असताना , गावठाणात असेल व गावठाणाचा सिटी सर्वे झाला नसेल तर प्रॉपर्टी कार्ड , काढले जात नाही .
आता आपण नागरपंच्यात मध्ये समाविष्ट झालेले आहेत . नागरपंचायतने , सिटी सर्वे करणे बाबत , अधीक्षक भूमी अभेलेख यांना प्रस्ताव देणे आवश्यक . सिटी सर्वे झाल्यावर , नगर पंच्यात क्षेत्रासाठी , प्रोप्रेर्टी कार्ड निघेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका महिलेचे लग्न होऊन दोन वर्षे झालेली आहेत. तरी, सदर महिलेसाठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढावयाचे असल्यास त्यांचे करीता कोणाचे उत्पन्न ग्राह्य धरावे लागेल ?
जर वडिलांचे उत्पन्न ग्राह्य धरावयाचे असेल परंतु, वडील हयात नसल्यास किंवा वडील कमावते नसल्यास अशा प्रसंगी कोणाचे उत्पन्न ग्राह्य धरावे ?
कमावते नसले तर उत्त्पन्न शून्य धरावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Milan bhoir
26-04-2017
rajp390.rp@gmail.com

जमीन विकसकाला देताना कोणती खबरदारी घ्यावी किंवा विकास करार कसा असावा
legal drafting पुस्तकातून model नमुना घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत मध्ये नमुना ८ वर वारसांची नोंद करण्यासाठी मुदतीची आवश्यकता असते का ? २० वर्षानंतर वारसांची नोंद करता येते का ? जाहीर प्रगटन देऊन केलेली वारसांची नोंद कायदेशीर असते का?
अधिकारी यांना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागत यांनी द्यावयाची चिट्ठी हि शासन निर्णय दि ७-५-१९३० अथवा इतर शासन निर्णय असेल तर त्याची प्रत उपलब्ध होणेस विनंती
आदरणीय सर, मला १.०२ हेक्टर जमीन होती. यातील .०.५१ आर जमीन मी विकली आहे. सदर जमिनीमधुन मला आता ०.१० आर जमीन परत घ्यावयाची आहे.सदर जमीन माझ्या जमीनीलगतच असुन मुळातच सध्या तिचा वहिवाट मी करीत आहे. सदर जमीन विकताना ०.४०आर ऐवजी ०.५१आर खरेदी दिली गेली. खरीददार १०आर परत करावयास तयार आहे. सदर शेत जमीन बागायती आहे. जर १०आर खरेदी करावयाची असेल तर तुकडाबंदी कायदा लागू होतो का? जर खरेदी करावयाची असेल तर कशी करता येईल.कृपया मागॆॆदशॆन व्हावे.
मूळ खरेदीत शुद्धी पत्रक करता येईल का याचा प्रयतन करावा

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

तुकडे बंदी कायदा लागू होणार नाही . खरेदी खत करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार मी अविनाश शिंदे मी २०१५ साली ९ एकर जमीन घेतली आहे परंतु त्या जमिनी विषयी काही कायदेशीर सल्ला मला आपणाकडून घायचाआहे
सादर जमीन हि माझ्या पणजोबाव त्यांचंया भावाकडे कडे जमीन कस्नयसाठी इसवी सॅन १९५३ साला पासून आहे तसेच १९५३ साली त्यांचे व भावाचे संरक्षित कुल म्हणून नाव लागले परंतु जमीन मालकाने ते कुल म्हणून तहसील समोर कुल हक्क सोडून दिले व तास फेर पडला त्या नंतर १९६३ पुन्हा संरक्षित कुल लागले पण त्या वेलेस पण कुल म्हणून हक्क सोडून दिले व नवीन फेर पडला तदनंतर १९७३ पर्यंत मालकाने मंजुरीने व खंड ने जमीन कसून घेतली व कागतोपात्री कुल म्हणून व इतर हक्कात कधी नाव लागले नाही व आज पर्यंत त्यांनी पीक पाणी खुद्द असे आहे कागतोपात्री आज पर्यंत ते मालक आहेत पण कब्जा आमचा होता
२) त्यांनी आम्हाला जमीन विक्री साठी विचारले आम्ही ती घेतली परंतु माझ्या आजोबांच्या भावाने आमच्या विरुद्ध केस मनाई साठी लावली आहे तरी मला कायदेशीर मार्गदर्शन करावे
कुल मालक हे संभांड केव्हाही निर्माणहोऊ शकतात . आपले आजोबांचे भावाने , जर न्यायालयात , त्यांची वहिवाट सिद्ध केली , तर न्यायालय आपणास मनाई हुकूम देऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,एखाद्या महसूल अधिकाऱ्याकडे नोंदीबाबत तक्रार केस चालू असताना सदर केस निकालावर ठेवली असता,अर्जदारास आपले लेखी म्हणणे दाखल करता येईल का?दाखल केल्यास सदर मुद्दे निकालपत्रात समाविष्ट केले जातात का?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
निकालावर ठेवली म्म्हणजे दोनी बाजूंचे पुरावे संपले आहेत . तथपि विरोधी पक्षाने संमती दिल्यास , लेखी म्हणणे देता येईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर, ७/१२ सदरील इतर हक्कात बाँडिंग तगाई बोजा र.रु.....आहे सदर रकम कोठे भरावी लागेल कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
तगाई बोजे कधीं टाकणे बाबत , शासन निर्णय आहे . ( माझ्याकडे प्रत नाही ) . कालबाह्य अंतर हक्कातील बुजे काढून टाकणे बाबत शासन निर्णय आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर नमस्कार

महसूल न्यालयालयाच्या निर्णयाचा अंमल सातबारा वर येण्या पूर्वी ६० दिवसांचा अपील कालावधी जावा लागतो हे खरे आहे का?

धन्यवाद
आवश्यक नाही . मात्र कालावधी पाळला जातो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
२००७ मध्ये नोंदणीकृत खरेदी खताने २ एकर जमीन विकत घेतली. खरेदी देणार पती आणि पत्नी होते. मालक सदरी दोघांची नावे सातबारा उतारावर होते. त्यांना 2 मुली व १ मुलगा असे अपत्य आहेत. खरेदी खतात १ मुली व १ मुलगा यांच्या संमती देणार म्हणून सही घेतलेल्या आहेत. १ मुलगी अमेरिका येथे असल्याने तिची सही घेतलेली नव्हती. जमीन विकत घेताना खरेदी देणार पती व पत्नी यांच्या नावावर ४ एकर जमीन शिल्लक होती व आजही आहे. खरेदी खताच्या आधी दैनिक वृत्तपत्रात जाहीर नोटिस दिलेली होती.
मागील वर्षी अमेरिकेत असलेली मुलगी भारतात परत आलेली आहे, तिने २०१७ मध्ये मंडळ अधिकारी यांनी २००७ मध्ये मंजूर केलेल्या फेरफार वर नाराज होऊन मा.उपविभागीय अधिकारी यांचे कडे अर्ज केलेला असून त्याची नोटिस मिळालेली आहे.
१) मा.उपविभागीय अधिकारी अर्ज मंजूर करतील का?
२) मंजूर फेरफार रद्द होऊ शकतो का?
३) सदर अर्ज बाबत काय निर्णय घेतला जाऊ शकतो?
योग्य मार्गदर्शन व्हावे.
७/१२ सादरी पती पत्नी होते . सादर मिळकत पती पत्नी यांचे स्व कष्टार्जित मिळकत असावी . त्यामुळे त्यांचे मुलांना त्यात हक्क नाही . त्यामुळे त्यांची संमती घेण्याची गरज नव्हती . मुलीला अपील करून उपयोग होणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय साहेब,
माझा प्रश्न पुढीलप्रमाणे, सन १९३८ मध्ये माझ्या आजोबांच्या काकाने (काशिबा) आमच्या जमीनीस मालक माझे आजोबा (बाबुराव) व त्यांचे सख्खे भाऊ (बाजीराव) असताना देखील काकाची (काशिबा) यांची वहिवाट आहे असे दाखवुन आजोबांच्या भावाने म्हणजेच बाजीराव याने अर्ज दिलेवरुन बाजीराव चे नाव कमी करुन काशिबा चे नाव दाखल केले. परंतु फेरफार वर माझ्या आजोबांचे नाव दिसुन येत नाही. तरीदेखील सदर बाबतीत बाबुराव याची वहीवाट असताना देखील बाबुराव याच्या नावे नोंद असलेला आठ आणे हिस्सा याची नोंद विचारात न घेता तलाठीने संपुर्ण क्षेत्र हे काशिबा च्या नावे दाखल केले आहे. यामध्ये बाबुराव याने जागा सोडलेचा कोणताही पुरावा उपलब्ध नाहीये. तसेच काशिबा याने पुढे जागा विकली आणि परत तिच जागा काशिबा ची बायको(राहीबाई) च्या नावावर झाली.
परंतु राहीबाई च्या नावावर जागा कशी आली याचे फेरफार काढले असता सदर फेरफार आमच्या मिळकती संदर्भात दिसुन येत नाही. तसेच १९६५ साली राहिबाई हिने जागा विकली परंतु तिचे खरेदीखत पाहिले असता खरेदीखतावर आमच्या मिळकतीचा उल्लेख दिसुन येत नाही. परंतु तलाठिने नोंद मात्र आमच्या मिळकतीची केलेली आहे. आणि राहिबाई ला इंग्रजी येत नसताना सदर दस्त ईंग्रजी भाषेत आहे. राहीबाई ची देखील फसवणुक झालेलेली आहे.

सदर प्रकरणात आम्हाला झालेल्या फेरफार वर अपिल दाखल करुन आज रोजी आमच्या आजोबांच्या नावे नोंद असलेले आठ आणे क्षेत्राबाबत कशाप्रकारे न्याय मागता येईल का?? कृपया मार्गदशन करावे, मी आपला कायम ऋणी राहिल...
बाबुराव यांचा मिळकतीत हक्क होता . तथापि बौराव यांचे नाव कमी झालेवर वहीत मुदतीत अपील दाखल करणे आवश्यक होते .
आत्ता आपण अपील दाखल केले तरी , विलंब माफ होणे आवश्यक आहे . त्याही पुढे जमिनीची विक्री झाली आहे . त्यामुळे आपणास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून हक्क साबूत करू घ्यावे लागतील . जमीन परत मुळेच अशे नाही मात्र जमिनीचे हिस्स्याची किंमत मिळू शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1)नमस्कार सर आजोबांच्या शेत जमिनीवरील 7/12 वर वारस हक्काने त्यांच्या बहिणीचे नाव ईतर अधिकारात लागलेले होते, त्या मयत झाल्यावर मुलाचे व मूलगा मयत झाल्यावर त्यांच्या सूनेचे नाव लागलेले आहे, आज आजोबा व त्यांची बहिण दोघेही हयात नाहीत , आम्ही त्यांना काही प्रमाणात मोबदला देवून हक्कसोड करण्यास प्रयत्नशील असून तरी त्या महसूल कोर्टात केस टाकण्याची धमकी देत असून तयार होत नाही. तरि त्यांचे नाव दुसरया मार्गाने काढता येईल का? हो असेल तर कसकाय

2) आजोबांना मूलगा नसलयाने त्या जमिनीवर वारस हक्काने त्यांच्या मुलींची नावे लागलेली आहेत, 7/12 पूर्ण क्षेत्र हे सामाईक क्षेत्र आहे तर एकूण जमिनीचे समान वाटप करता येईल का? त्या साठी काय करावे लागेल तसेच त्या साठी सर्व बहिणीचीं संमती आवश्यक आहे का
धन्यवाद
१. दुसऱ्या मार्गाने नाव काढता येणार नाही
२. समान वाटप करावयाचे आहे . बहिणी संमती देतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

७ १२ वर नावे लागल्यानंतर किती दिवसात हरकत घेता येते.
नावे ७/१२ सदरी लागल्यावर . हरकती घेण्याचा प्रश्न उदभवत नाही
वर्दी नोटीस दिल्यावर हरकत घेता येते
मंजूर फेरफारावर अपील दाखल करा . ६० दिवस मर्यादा आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर ,१० वर्षांपूर्वी आजोबांच्या नावावर शेतजमीन आम्ही पैसे देऊन विकत घेतली होती.आजोबांचे निधन झाल्यानंतर आम्ही वारसनोंद करताना फक्त आमचीच नावे लावून घेतली कारण फक्त आम्हीच पैसे दिले होते.त्यामुळे सादर नावे लावण्यास इतर वारसांचीही हरकत नव्हती.व आजही नाही.आज रोजी सदर जमीन आमच्याच ताब्यात आहे .व आम्ही ती विकसित करणार आहोत.परंतु भविष्यात इतर वारसांनी हरकत घेऊ नये म्हणून आम्हास काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
त्यांचे हक्क सोड पत्र घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sunil Kale
17-04-2017
sunilste@gmail.com

कोणतेही खरेदी खत तसेच कोणताही कायदेशीर व्यवहार न करता खातेदार हा ७/१२ तसेच ८अ वर सहहिशेदारी म्हणून कोणाचीही नोंद करू शकतो का ?

Question by sadik
17-04-2017
sadik11m@rediffmail.com

Sir majya vatnila ८ gunthe shetjamin येत ahe Teri mala तुकडे bandi kaydyanusar vatap patrala adchan yeyil ka. १) mi register vatap karu shakto ka court vatap karu shakto plz detail dya
तुकडेबंदी कायदयाचा भंग होतो

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

आपली जमीन कोणत्या स्वरूपाची आहे ? बागायती असल्यास अडचण येणार नाही . नसल्यास तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by निलेश
16-04-2017
nikysweet1@gmail.com

नमस्कार सर , कुंटेकर सर मला अँप्लिकेशन आणि विस्तृत माहिती हवी होती... कृपा आपला मेल ईद मिळेल का

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3460
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3