जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by गणेश शिंदे
20-04-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर, ७/१२ सदरील इतर हक्कात बाँडिंग तगाई बोजा र.रु.....आहे सदर रकम कोठे भरावी लागेल कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
तगाई बोजे कधीं टाकणे बाबत , शासन निर्णय आहे . ( माझ्याकडे प्रत नाही ) . कालबाह्य अंतर हक्कातील बुजे काढून टाकणे बाबत शासन निर्णय आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत पाटील
19-04-2017
abhijit_y_patil@yahoo.co.in
सर नमस्कार
महसूल न्यालयालयाच्या निर्णयाचा अंमल सातबारा वर येण्या पूर्वी ६० दिवसांचा अपील कालावधी जावा लागतो हे खरे आहे का?
धन्यवाद
Question by अमोल ए वाघ
18-04-2017
amolwagh6828@gmail.com
नमस्कार सर,
२००७ मध्ये नोंदणीकृत खरेदी खताने २ एकर जमीन विकत घेतली. खरेदी देणार पती आणि पत्नी होते. मालक सदरी दोघांची नावे सातबारा उतारावर होते. त्यांना 2 मुली व १ मुलगा असे अपत्य आहेत. खरेदी खतात १ मुली व १ मुलगा यांच्या संमती देणार म्हणून सही घेतलेल्या आहेत. १ मुलगी अमेरिका येथे असल्याने तिची सही घेतलेली नव्हती. जमीन विकत घेताना खरेदी देणार पती व पत्नी यांच्या नावावर ४ एकर जमीन शिल्लक होती व आजही आहे. खरेदी खताच्या आधी दैनिक वृत्तपत्रात जाहीर नोटिस दिलेली होती.
मागील वर्षी अमेरिकेत असलेली मुलगी भारतात परत आलेली आहे, तिने २०१७ मध्ये मंडळ अधिकारी यांनी २००७ मध्ये मंजूर केलेल्या फेरफार वर नाराज होऊन मा.उपविभागीय अधिकारी यांचे कडे अर्ज केलेला असून त्याची नोटिस मिळालेली आहे.
१) मा.उपविभागीय अधिकारी अर्ज मंजूर करतील का?
२) मंजूर फेरफार रद्द होऊ शकतो का?
३) सदर अर्ज बाबत काय निर्णय घेतला जाऊ शकतो?
योग्य मार्गदर्शन व्हावे.
७/१२ सादरी पती पत्नी होते . सादर मिळकत पती पत्नी यांचे स्व कष्टार्जित मिळकत असावी . त्यामुळे त्यांचे मुलांना त्यात हक्क नाही . त्यामुळे त्यांची संमती घेण्याची गरज नव्हती . मुलीला अपील करून उपयोग होणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संकेत गुजर
18-04-2017
sanketgujar@gmail.com
आदरणीय साहेब,
माझा प्रश्न पुढीलप्रमाणे, सन १९३८ मध्ये माझ्या आजोबांच्या काकाने (काशिबा) आमच्या जमीनीस मालक माझे आजोबा (बाबुराव) व त्यांचे सख्खे भाऊ (बाजीराव) असताना देखील काकाची (काशिबा) यांची वहिवाट आहे असे दाखवुन आजोबांच्या भावाने म्हणजेच बाजीराव याने अर्ज दिलेवरुन बाजीराव चे नाव कमी करुन काशिबा चे नाव दाखल केले. परंतु फेरफार वर माझ्या आजोबांचे नाव दिसुन येत नाही. तरीदेखील सदर बाबतीत बाबुराव याची वहीवाट असताना देखील बाबुराव याच्या नावे नोंद असलेला आठ आणे हिस्सा याची नोंद विचारात न घेता तलाठीने संपुर्ण क्षेत्र हे काशिबा च्या नावे दाखल केले आहे. यामध्ये बाबुराव याने जागा सोडलेचा कोणताही पुरावा उपलब्ध नाहीये. तसेच काशिबा याने पुढे जागा विकली आणि परत तिच जागा काशिबा ची बायको(राहीबाई) च्या नावावर झाली.
परंतु राहीबाई च्या नावावर जागा कशी आली याचे फेरफार काढले असता सदर फेरफार आमच्या मिळकती संदर्भात दिसुन येत नाही. तसेच १९६५ साली राहिबाई हिने जागा विकली परंतु तिचे खरेदीखत पाहिले असता खरेदीखतावर आमच्या मिळकतीचा उल्लेख दिसुन येत नाही. परंतु तलाठिने नोंद मात्र आमच्या मिळकतीची केलेली आहे. आणि राहिबाई ला इंग्रजी येत नसताना सदर दस्त ईंग्रजी भाषेत आहे. राहीबाई ची देखील फसवणुक झालेलेली आहे.
सदर प्रकरणात आम्हाला झालेल्या फेरफार वर अपिल दाखल करुन आज रोजी आमच्या आजोबांच्या नावे नोंद असलेले आठ आणे क्षेत्राबाबत कशाप्रकारे न्याय मागता येईल का?? कृपया मार्गदशन करावे, मी आपला कायम ऋणी राहिल...
बाबुराव यांचा मिळकतीत हक्क होता . तथापि बौराव यांचे नाव कमी झालेवर वहीत मुदतीत अपील दाखल करणे आवश्यक होते .
आत्ता आपण अपील दाखल केले तरी , विलंब माफ होणे आवश्यक आहे . त्याही पुढे जमिनीची विक्री झाली आहे . त्यामुळे आपणास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून हक्क साबूत करू घ्यावे लागतील . जमीन परत मुळेच अशे नाही मात्र जमिनीचे हिस्स्याची किंमत मिळू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sudarshan patil
18-04-2017
Sudarshanshrikhande07@gmail.com
1)नमस्कार सर आजोबांच्या शेत जमिनीवरील 7/12 वर वारस हक्काने त्यांच्या बहिणीचे नाव ईतर अधिकारात लागलेले होते, त्या मयत झाल्यावर मुलाचे व मूलगा मयत झाल्यावर त्यांच्या सूनेचे नाव लागलेले आहे, आज आजोबा व त्यांची बहिण दोघेही हयात नाहीत , आम्ही त्यांना काही प्रमाणात मोबदला देवून हक्कसोड करण्यास प्रयत्नशील असून तरी त्या महसूल कोर्टात केस टाकण्याची धमकी देत असून तयार होत नाही. तरि त्यांचे नाव दुसरया मार्गाने काढता येईल का? हो असेल तर कसकाय
2) आजोबांना मूलगा नसलयाने त्या जमिनीवर वारस हक्काने त्यांच्या मुलींची नावे लागलेली आहेत, 7/12 पूर्ण क्षेत्र हे सामाईक क्षेत्र आहे तर एकूण जमिनीचे समान वाटप करता येईल का? त्या साठी काय करावे लागेल तसेच त्या साठी सर्व बहिणीचीं संमती आवश्यक आहे का
धन्यवाद
१. दुसऱ्या मार्गाने नाव काढता येणार नाही
२. समान वाटप करावयाचे आहे . बहिणी संमती देतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by चेतन चौधरी
18-04-2017
chetan_raver@rediffmail.com
७ १२ वर नावे लागल्यानंतर किती दिवसात हरकत घेता येते.
नावे ७/१२ सदरी लागल्यावर . हरकती घेण्याचा प्रश्न उदभवत नाही
वर्दी नोटीस दिल्यावर हरकत घेता येते
मंजूर फेरफारावर अपील दाखल करा . ६० दिवस मर्यादा आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
17-04-2017
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर ,१० वर्षांपूर्वी आजोबांच्या नावावर शेतजमीन आम्ही पैसे देऊन विकत घेतली होती.आजोबांचे निधन झाल्यानंतर आम्ही वारसनोंद करताना फक्त आमचीच नावे लावून घेतली कारण फक्त आम्हीच पैसे दिले होते.त्यामुळे सादर नावे लावण्यास इतर वारसांचीही हरकत नव्हती.व आजही नाही.आज रोजी सदर जमीन आमच्याच ताब्यात आहे .व आम्ही ती विकसित करणार आहोत.परंतु भविष्यात इतर वारसांनी हरकत घेऊ नये म्हणून आम्हास काय करावे लागेल?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.....
Question by Sunil Kale
17-04-2017
sunilste@gmail.com
कोणतेही खरेदी खत तसेच कोणताही कायदेशीर व्यवहार न करता खातेदार हा ७/१२ तसेच ८अ वर सहहिशेदारी म्हणून कोणाचीही नोंद करू शकतो का ?
Question by sadik
17-04-2017
sadik11m@rediffmail.com
Sir majya vatnila ८ gunthe shetjamin येत ahe Teri mala तुकडे bandi kaydyanusar vatap patrala adchan yeyil ka. १) mi register vatap karu shakto ka court vatap karu shakto plz detail dya
आपली जमीन कोणत्या स्वरूपाची आहे ? बागायती असल्यास अडचण येणार नाही . नसल्यास तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by निलेश
16-04-2017
nikysweet1@gmail.com
नमस्कार सर , कुंटेकर सर मला अँप्लिकेशन आणि विस्तृत माहिती हवी होती... कृपा आपला मेल ईद मिळेल का
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
14-04-2017
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, एखादी व्यक्ती आपले जनरल मुखत्यारपत्र एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना करून देऊ शकते का ?
दोन किंवा त्या पेक्षा जाडा लोकांना नेमल्यास , दस्तामध्ये , दोघे एकत्र अथवा वेगवेगळे काम करणार याचा उल्लेख करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
12-04-2017
sadik11m@rediffmail.com
Sir mi aplya website var itke prashn vachle te prashn wachun mala asa prashn padla ki 20 gunthe 22 gunthe kitihi gunthyacha dast hotay mag tukde bandi kaydyacha faayda kay te dast awaidh kA hot nahi plz kalave
२० गुंठे क्षेत्र हे पडीक जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र आहे , त्या पेक्षा कमी क्षेत्राची विक्री झाली तर , तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्याच्यान्वये कारवाई केली जाते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र लांडगे
12-04-2017
rajlandge12@gmail.com
१ )गावठाण क्षेत्रातील प्लॉट प्रांताकडून वाटप झाले आहेत .परंतू सध्या दुसऱ्याच व्यक्ती तेथे ७-८ वर्षापासून राहत आहेत . तर तो प्लॉट सध्या राहणाऱ्या व्यक्तीच्या नावे कस करता येईल . २ ) वरील प्लॉटवर भोगवट दार म्हणून लावण्याचे अधिकार कोणाला आहेत
गावठाण विस्तार योजनेतील भूखंड वाटप झाला नसताना , जर त्यावर वहिवाट असेल तर ते अतिक्रमण आहे . जर गावठाण वस्त्र लाभार्थी निकषात आपण बसत असाल तर , प्रांताधिकारी आपले अतिक्रमण नियमानुकूल करून देऊ शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शिवाजी कर्पे
11-04-2017
shivajibkarpe@gmail.com
सहकारी दुध संस्था व सहकारी सोसायटी यांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा लागू आहे का ? या संदर्भात मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती
Question by अभय अनंत मालप
11-04-2017
malpekarabhay@gmail.com
माझ्या वडीलांची गावमध्ये जमिन आहे,७/१२ उतारासुद्धा पण पण जागेची नावे दिली आहेत त्या जागा माहित नाही.तर मला आमच्या गावचा नकाशा (भुमापण क्र./सर्वे नं.)सकट आॕनलाईन भेटु शकतो का?? जिल्हा =रत्नागिरी तालुका =मंडणगड गाव =पाचारळ
online नकाशा सध्या खाजगी संकेत स्थळावर उपलब्ध असू शकतील . शोध घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
10-04-2017
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर; मयत व्यक्तीच्या मृत्युपत्राची नोंद दुय्यम निबंधक करू शकतात का; त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते
मृत्य पत्र नोंद करणे आवश्यक नाही .
दिवाणी न्यायालयाकडून probate घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अमोल घाडगे
10-04-2017
hiamol2006@gmail.com
नमस्कार सर,
माझा प्रश्न हाउसिंग सोसायटीच्या संदर्भात आहे..
मागील वर्षी सोसायटी ची निवडणूक झाली त्या वेळेला सभासद ने आपला थकीत १ किवा ३ महिन्याचा ढेखभाल खर्च भरलेला नव्हता हे त्या वेळेला आसणार्या निवडणूक आधिकारी च्या निदर्शनात आले नाही. आता ज्या वेळेला मी हे चेक केले तर बर्याच सभासदाचे ढेखभाल खर्च हा भरलेला नव्हता त्या महिन्यात तरी ते मेंबर झाले आहेत. तर आता ही माहिती निवडणूक आधिकारी च्या निदर्शनात आणून त्यांच्या वर काय कायदेशीर कारवाई करू शकतो??
Question by राजेंद्र लांडगे
09-04-2017
rajlandge12@gmail.com
अनुदानीत धर्मादाय शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयातील शिक्षक निवडणूक लढून सभापती झाला आहे योग्य आहे का ? असेल तर शिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागेल का १
लाभाचे पद या बाबत या पूर्वी मी उत्तर दिले आहे . त्या निकषात शिक्षक बसतो का हे पहा .
शाळा जरी अनुदानित असली तरी , त्यास नोकरीवरून काढून टाकण्याचा / त्यास नोकरीवर नियुक्त करण्याचा अधिकार जिल्हा परिषद /पंच्यात समिती यांना नाही .
त्या मुले असा शिक्षक , सभापती झाला हे योग्य आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश बांगर
09-04-2017
pshrijeet@gmail.com
नमस्कार सर,
आमच गावात एक घर आहे त्याची नोंद ग्रामपंचायत ला 19८५ पासून आहे सर्व फेरफार व्यवस्थित झाले आहेत आम्ही हि जमीन विकत घेतलेली नाही पूर्वीपासून वडिलोपार्जित आहे पण त्याची सीटी सर्व्हे ला कुठेही नोंद नाही नमुना न. 8 आहे पण PR कार्ड नाही पुढे काही अडचणी येतील का? ग्रामपंचायत नोदी कायद्याने मंजूर असतात का? व पर कार्ड साठी काय करावे? कृपया उत्तर द्या...
Question by अमोल ए वाघ
08-04-2017
amolwagh6828@gmail.com
क्षेत्र हे गावाच्या शिवेजवळ आहे. क्षेत्राची हदद कायम मोजणी केली असता पूर्ण रस्ताच क्षेत्राचा भाग आहे. महा राज्सव अभियांना अंतर्गत पानंद रस्ते मोकळे करून दिले जातात, परंतु रस्त्यानेच अतिक्रमण केले असता काय करावे? रस्ता बंद केला तर चालेल का?
रस्त्याने अतिक्रमण केले नाही . आपण अतिक्रमण केले असल्याचे मोजणी वरून दिसून येते .
फेर मोजणी करून बघा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अभिजीत
06-04-2017
abhijitkadam55@gmail.com
आपला प्रश्न/सूचना... महोदय जमिन खरेदी (दस्त) प्रक्रीया पुर्ण झालेनंतर १ महीन्यानंतर विकणारा ईसम मयत झाला त्यामुळे नोंद घेत नाहीत अशा वेळी वारस नोंद करून घ्यावी लागेल का?आनि वारसांनी नकार दिला तर कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल तलाठी वारस नोंद करावी लागेल हे कारन देत आहे यासाठी MLRC मध्ये काय तरतुद आहे कींवा कसे मार्गदर्शन करा
खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे . मयत इसमाचे वारसांना नोटीस देऊन नोंद मंजूर करणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे . मयत इसमाचे वारसांना नोटीस देऊन नोंद मंजूर करणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सूर्यकांत
06-04-2017
suryakant_5331@yahoo.com
नमस्कार सर, माझ्या जमिनीची मोजणी होऊन ४ वर्षे झाली तरी लगतदार कब्जा सोडत नाहीत. मला मोजणीची क प्रत हि मिळालेली आहे. लगतदारांच्या कडून तात्काळ कबजा घेणेसाठी काय करावे. प्लीज सर मार्गदर्शन करा.
जमिनीचा ताबा मिळणेसाठी व लगतचे खातेदाराने केलेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी दिवाणी न्यायालयात The Specific Relief Act खाली दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sadik
05-04-2017
sadik11m@rediffmail.com
१)पाणबुडे सर मॉर्टगेज चे प्रकार व व्याख्या सांगा
२)तुकडा व तुकडेबंदी म्हणजे काय व त्याची लिमिट
१. कृपया मालमत्ता हस्तांतरण कायदा वाचा . प्रकरण IV कलम ५८
२. बागायती , एकपिकी व पडीक जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे . अनुक्रमे ५ , १५ व २० गुंठे प्रमाणभूत क्षेत्र मर्यादा बागायत, एकपिकी व पडीक जमिनीसाठी आहे . या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची विक्री करता येत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by राजेंद्र लांडगे
04-04-2017
rajlandge12@gmail.com
खाजगी अनुदानातीत शिक्षण संस्थेतील कर्मचारी निवडणूक लढवू शकतो का त्याला कोणाची नाहरकत लागते
आपल्या प्रश्नाचे उत्तर -होय . निवडणूक लढवू शकते
कर्मचारी कोणती निवडणूक लढवत आहे ?
लाभाचे पद हि खूप विस्तारित संकल्पना आहे .
निवडणूक लढवू इच्छणारी व्यक्ती लाभाचे पद धरण करत आहे कि नाही , हे निश्चित झाल्यावर , त्यास निवडणूक लढवता येईल किवनह नाही हे सांगता येईल .
जर
१. अश्या व्यक्तीची नियुक्ती शासन करत असेल
२. अश्या व्यक्तीस सेवेतून काढून टाकण्याचा अधिकार शासनास आहे
३. अश्या व्यक्तीचे वेतन शासन देते
या प्रमुख निकषात निवडणूक लढवणारी व्यक्ती बसत असेल तर , त्यास निवडणूक लढवता येणार नाही .
लाभाचे पद हि संकल्पना समजण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाचा Guru Gobind Basu vs Sankari Prasad Ghosal & others (AIR 1964 SC 254) हा निर्णय वाचावा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
निवडणूक लढविणारी व्यक्ती लाभाचे पद धारण करणारी नसावी असे कायदा सांगतो.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by गोळेसर रवींद्र रामभाऊ
04-04-2017
ravindra.golesar@rediffmail.com
आदरणीय सर, वडिलांनी मोठ्या भावास त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे घर दिले आहे व त्यास इतर जणांची मंजुरी आहे. पण भावाने सर्व वारसांची घराच्या मिळकतीवर नोंद होण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केला आहे. भूमी अभिलेख विभागाने नोटीस द्वारे हजर राहून जबाब देण्यास सांगितले आहे. वारस नोंद होऊनये म्हणून हरकत घयावी किंव्हा नाही याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.
जर वडिलांनी भावास केवळ घर दिले आहे तर तो इतरांची नावे लावण्याचे कारण काय ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
मृत्युपत्र हा पवित्र दस्त मानला जातो. मरणार्या माणसाची ती इच्छा असते. त्याच्या विरोधात न जाणे अधिक चांगले.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
