जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Mahesh
28-12-2018
maheshpatil.comp@gmail.com

Maze vadil mayat asun aamhi jya jagevar ghar bandhun rahato te Ghar 8-A vadilanchya navavar ahe, Light bill tyanchyach navavar ahe.Gavacha city survey karyanvit navta to 2015 la karyanvit zala va tya nanatar documents property card,sanad milali parantu tyvar vadilanche naav vahivatdar mhanun yet ahe.Purviche documents kadlyanantar samazale ki hi jaga vadilani vikat ghetali hoti parantu kharedi 1985 la stamp paper var karun ghetali hoti va to ajun hi karar patra ahe amchyakade.kaydeshir navavar karayala kaay marg ahet. City survey type - A Type ahe, Satbara var - Jyachykadun ghetale te hi mayat ahet va tyachya varasache nave ahet, City survey record la- Dharak - jyanchyakadun getali tyanche nav ahe va vahivatdar-Vadilanche nav ahe(Donhi Mayat Ahet) Please suggest
उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा . आपल्या वडिलांनी जर मिळकत नोंदणीकृत दस्ताद्वारे खरेदी केली असेल व ते मयत असले तरी आपले नाव मिळकत पत्रीकेस लागणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Mahesh
28-12-2018
maheshpatil.comp@gmail.com

१९८५ साली स्टॅम्प पेपर वर गावठाण प्लॉट वडिलांनी खरेदी केला आहे आणि आता वडील व देणारे दोघेही मयत आहेत आणि प्रॉपर्टी कार्ड वर धारक वर देणाऱ्याचे नाव आहे आणि भोगवटादार म्हणून वडिलांचे नाव आहे. आता स्टॅम्प पेपर रजिस्टर करू शकतो का ?
महेशजी
जर आपला दस्त नोंदणीकृत नसेल तर , आता तो नोंदणीकृत करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Abhijeet
27-12-2018
dolasabhijeet@yahoo.com

नमस्कार सर
बक्षीस पत्रास हरकत घेऊ शकतो का ?
कशाप्रकारे घेऊ शकतो ?
आपण हरकत घेऊ शकता . मात्र हरकतीचे कारण काय आहे ?
जर बक्षीस पत्राचे आधारे फेरफार नोंद अभिलिखित करण्यात अली असेल तर , संबंधित तलाठी यांचेकडे हरकत घ्या .
जर बक्षीस पत्राचे आधारे फेरफार नोंद मंजूर झाली असेल तर , दिवाणी न्यायालयात , बक्षीस पत्र आव्हानात करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sadik
26-12-2018
sadik11m@rediffmail.com

सर डोमीसाईल चा दाखला 2007 मध्ये काढलेला आहे किती दिवस चालणार त्याची मुदत किती असते
अधिवास प्रमाणपत्र आपले महाराष्ट्र राज्यातील मागील वास्तव्य १०/१५ वर्षे आहे त्यावरून दिला जातो .
आपण पूर्वी घेतलेला आदिवासी दाखला २००७ चा आहे . आपण मध्यंतरीच्या कालावधीत , महाराष्ट्र राज्याबाहेर वास्तव्यास असल्यास , आपण अधिवास दाखला मिळण्यास पात्र होऊ शकत नाही . आपले मागील १५ वर्षे वास्तव्य , महाराष्ट्रात होते याची पडताळणीकरण्यासाठी , दरवर्षी अधिवास प्रमाणपत्र (आवश्यकतेप्रमाणे) काढणे आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सादिक
26-12-2018
sadik11m@rediffmail.com

सर रजिस्टर पॉवर ऑफ attorny द्वारे जमीन हस्तांतरित होऊ शकते बरोबर आहे का
2) court/ मॅजिस्ट्रेट याना search वॉरंट काढण्याचा अधिकार असतो तसा तहसीलदार यांना हा अधिकार असतो का? ते पण मॅजिस्ट्रेट च असतात ना
जमीन हस्तांतरित होऊ शकत नाही . मात्र जमीन हस्तांतरित करण्याचा जमीन मालकाचा अधिकार , मुखत्यारयास मिळतो

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vikas sanap
25-12-2018
vikassanap1993@gmail.com

namaskar sir 1.maza question asa hai ki civil courtane opposite party la permanant injunction dilela hai tari samoril party plantiff chya property (land)
var atikram karat asel tar karave? 2.civil court madhe ya baddal kay procedure hai ka?
आपणास असे म्हणायचे आहे का , विरुद्ध पक्षास मिळकतीमध्ये , वहिवाट/प्रवेश करण्यास दिवाणी न्यायालयाने कायमचा मज्जाव , मनाई केली आहे .
मनाई हुकुमाचे विरुद्ध , जर विरोधी पक्ष , मिळकतीत अतिक्रमण असेल तर , हि बाब न्यायालयाचे निदर्शनास आणून द्या . न्यायालयाचा अवमान आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Umesh sable
25-12-2018
sable.umesh77@gmail.com

माननीय सर माझा प्रश्न असा आहे .माझे वडील व चुलते यांनी 1987साली जमिनी विकून टाकली .माझे आजोबा मयत झाले त्या नंतर माझी आज्जी 3आत्या वडील व चुलते यांची नावे 7/12पाहीजे होती .पण असे झाले नाही. झालेले व्यवहार रद्द करता येऊ शकते का .आज्जी आज रोजी ह्यात आहे.कुल मुखतयार आज्जी आणि आत्या यांचे करून मला दावा करता येतो का?मी नातू आहे. 7/12 खरेदीदाराचे नाव आहे
जमीन जर वडील व चुलते यांनी स्वता खरेदी केलेली नसेल तर , वडील व चुलते यांनी केलेला व्यवहार रद्द करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करू शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Umesh sable
25-12-2018
sable.umesh77@gmail.com

नमस्कार सर, माझा प्रश्न 535 gat number आमचे आजोबा नाव कुळ मुळ मालकांनी त्या जमिनीवर सोसायटी कर्ज काढले व सोसायटी ने जमीन विकली आता काय करावे इतर हक्कात आमचे आजोबांचे नाव आहे

ज्या वेळी कर्ज काढले , त्यावेळी कर्जाची नोंद ७/१२ सदरी घेतली त्यावेळी आपण हरकत घेणे आवश्यक होते . आपण सध्या स्थितीत , विक्री व्यवहार दिवाणी न्यायालयात आव्हानात करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबांनी मला मृत्युपत्राने 15 एकर पैकी 10 एकर जमीन दिली आहे. पण त्यांच्या वारसांनी मी वारसा अर्ज दाखल करण्यापूर्वी वारस लावून घेतला आहे. त्यानंतर मी तलाठी यांचेकडे वारसा नोंदणी साठी अर्ज केला तलाठी यांनी माझा वारसांचा फेरफार तयार केला व नोटीस बजावली आहे. आता मंडळ अधिकारी यांचे कडे तो फेरफार मंजुरी साठी प्रलंबित आहे त्यावर वारसांनी तक्रार दाखल केली आहे तरी मला आपण मार्गदर्शन करावे
माझे वडिलांच्या नावे 7 एकर जमीन त्यातील 4 एकर माझ्या व भावाच्या नावा वर करायची आहे आम्ही तहसीलदार यांचे कडे कलम 85 नुसार वाटप करण्यासाठी अर्ज केला आहे .पण 7 एकर जमीनीच्या 7/12 उतारावर फक्त माझ्या वाडीलांचेच नाव आहे . मग कलम 85 नुसार वाटणीपत्र होईल काय. नसेल तर साधा उपाय सुचविण्यात यावा
जमीन वडिलोपार्जित ( वडिलांची ) असेल , तर coparcenary तत्वानुसार , आपले वडील व आपले हिस्से दिवाणी न्यायालयातून h निश्चित करून घेणे प्रथम आवश्यक .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vikas sanap
21-12-2018
Vikassanap1993@gmail.com

1. hissa form no 4 ani hissa form 11 kon cancelled karu shakto? 2. pot hissa phalani ani 7\12 madhe farak asel tar kay karvye 3. pot hissa phalni cha ferfar zalyla nahi parantu record bhumi abhileh kadhe ahe tar kay karave
सर नमस्कार
माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्जदाराने तलाठी कार्यालय संबंधित माहितीचा अर्ज तहसील कार्यालयात केल्यास तो अर्ज कलम ६(३)अन्वये तलाठी कार्यालयास हस्तांतरित कराता येतो काय?म्हणजे तलाठी यांना जनमाहिती अधिकारी म्हणून संबोधले जाते काय आणि सदर माहिती तलाठ्याने मुदतीत दिली नाही तेव्हा त्याचे प्रथम अपील कोणाकडे करावे.मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे करावे.कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
माहिती अधिकार कायद्या अंतर्गत , तलाठी यांना जण माहिती अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे . त्यांचे निर्णयाविरुद्ध अपील तहसीलदार यांचे कडे आहे .
अर्ज तहसील कार्यालयाकडे केला असल्यास , ६(३) अन्वये , माहितीचा अर्ज तलाठी यांचेकडे वर्ग करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय,
आत्ताच्या काळात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत असल्याने आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणात हस्तांतरित होत आहेत तर त्यावर काही उपाय आहे का ...? त्याच प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता आदिवासींच्या भामिनी हस्तांतरित करता येतात का ..?
जिल्हाधिकारी / शासनाचे पूर्व परवानगी शिवाया हस्तांतरित करता येणार नाही

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

माझे वडील महसूल मंडळ अधिकारी या पदाने माहे ऑगस्ट २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. सदर त्यांना विभागीय चौकशीचे ज्ञापन माहे जुलै २०१८ दिले होते आणि माहे नोवेंबर २०१८ निकाल निर्दोष म्हणून दिला आहे. पण विभागीय चौकशी आरोपपत्रातील काही आरोप हे खोटी माहितीच्या आधारे टाकण्यात आले होते. खोटी माहिती देणाऱ्या शासकीय कर्मचारी विरुध्द तक्रार देऊ शकतो? शक्य असल्यास कोणाकडे करावी?
हो .
आपण फौजदारी तक्रार न्यायालयात दाखल करू शकता
मानहानी दिवाणी दावा दाखल करू शकता . मात्र हे न्यायालयात सिद्ध करणे खूप अवघड आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. पानबुडे सर , माझा प्रश्न असा आहे की , आम्ही आठ जणांमध्ये 7 गुंठे जागा सामाईक विकत घेतली आहे , परंतु जागेचे खरेदी खत करतांना आमच्या पैकी एक जण बाहेरगांवी असल्याने आम्ही सात जणांनी सदर जागा रजिस्ट्री करून घेतली , ही बाब बाहेरगावी असलेल्या आमच्या सहकाऱ्यास माहिती होती , त्याचा याबाबीला विरोध न०हता परंतू आता तो म्हणतो की , सातबारा वर तुमच्या सोबत माझेही नाव लावा . त्याचे नाव आमच्या हिस्स्याला लावण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतू त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती .
आपण आठ जणांमध्ये सात गुंठे जागा घेतली आहे . जर जागा , निवासी अथवा अन्य बिनशेती जमीन वापर विभागात नसेल तर , सदरचा व्यवहार हा तुकडेबंदी कायद्या विरुद्ध आहे . नवीन सुधारणेनुसर , शीघ्र सिद्ध गणक किंमतीच्या २५ % रक्कम भरून व्यवहार नियमित करून घ्या ( जर व्यवहार २०१६ पूर्वीचा असेल )
आता कोणताही मार्ग शिल्लक नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे माझे वडील 1975 साली मयत झाले आई देखील मयत आहे परंतु 2016 साली वारस नोंद झाली असून सातबारावर आम्ही दोन भाऊ व तीन बहिणी आहेत बहिणींची लग्ने 1990 पूर्वी झाली आहेत आता आम्हाला जमीन वाटप करायची आहे तर बहिणीना किती हिस्सा द्यावा लागेल
१० एकर जमिनीचे समान ५ हिस्स्यात वाटप करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी जमीन १४ वर्ष आधी नोंदनीकृृत खरेदिखताने विकत घेतलेली होती मी पंरतु मी बाहेरगावी सरकारी नोकरीला असल्याने जमीनखरेदी करून नोकरीनिमित्त बाहेरगावी निघुन गेलो व मला आता ६ महिने झाले खाजगीकामानिमित्त ७/१२ उतार्‍याची आवश्यकता भासली मी तलाठी आॅफिस मध्ये सर्वे नंबर सांगितला तर त्या उतार्‍यावरती अन्य माणसाचे नाव होते.मि त्यानंतर पुढिल तपास केला तर मी जमिन घेतल्यानंतर माझ्या नावे ७/१२ वरती नावाची नोंदच झालेली नव्हंती त्यांचा फायदा घेवुन ज्या मालकाकडुन मी जमिन विकत घेतलि त्या मालकाने अन्य माणसाला १३वर्ष आधिच विकलेलि आहे तर मला ती जमीन परत कश्याप्रकारे मिळेल व कोणत्या बेसवरती मिळेल योग्य मार्गदर्शनाची अपेक्ष्या सर...
ज्या फेरफार नोंदणीच्या आधारे , अन्य इसमाची नावे लागली आहेत , तो फेरफार आव्हानात करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

sir mi 6 varsha purvi ek row house book kele hote. builder payment kelelya pavatya(Reciepts) mazyakade ahet. pn ata to builder maran pavala (dead) ahe. ani to project dusrya builder ne take over kela ahe. problem asa ahe ki mi mazyakade fkt pavatya(Reciepts) ahet. mazya relative ne to row house book karun dila hota. ata mala navin builder ani maze relative mala tya row house mazya navavar karnyas adchnit anat ahet. tya baddal aple margdharshan milave. hi vinati
आपण payment कॅश नि कि cheque द्वारे केले आहे ?
cheque द्वारे केले असेल तर , आपण न्यायालयात दावा दाखल करा
पावट्याच्या आधारे आपण row house चे पैसे दिले होते हे सिद्ध करणे थोडे अवघड आहे .
वकिलांच्या सल्ल्याने दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मी जमीन १४ वर्ष आधी नोंदनीकृृत खरेदिखताने विकत घेतलेली होती मी पंरतु मी बाहेरगावी सरकारी नोकरीला असल्याने जमीनखरेदी करून नोकरीनिमित्त बाहेरगावी निघुन गेलो व मला आता ६ महिने झाले खाजगीकामानिमित्त ७/१२ उतार्‍याची आवश्यकता भासली मी तलाठी आॅफिस मध्ये सर्वे नंबर सांगितला तर त्या उतार्‍यावरती अन्य माणसाचे नाव होते.मि त्यानंतर पुढिल तपास केला तर मी जमिन घेतल्यानंतर माझ्या नावे ७/१२ वरती नावाची नोंदच झालेली नव्हंती त्यांचा फायदा घेवुन ज्या मालकाकडुन मी जमिन विकत घेतलि त्या मालकाने अन्य माणसाला १३वर्ष आधिच विकलेलि आहे तर मला ती जमीन परत कश्याप्रकारे मिळेल व कोणत्या बेसवरती मिळेल योग्य मार्गदर्शनाची अपेक्ष्या सर...
आपले नाव ७/१२ सदरी दाखल झाले नाही / आपण करून घेतले नाही .आपले नन्तर ज्या त्रयस्थ इसमाचे नाव ७/१२ सदरी दाखल झाले आहे . ज्या फेरफाराने त्याचे नाव दाखल झाले आहे त्याचे विरुद्ध प्रांताधिकारी यांचे कडे अपील दाखल करा . तसेच त्या अपील मेमो मध्ये आपले नाव ७/१२ सदरी डंख करणे बाबत विनंती करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

गट नं हा 45 गुंठे चा आहे त्या पैकि 20 गुंठे पांडुरंगला पुर्वी विकले आहे पण तो आतिक्रमण करून माझ्या हिशात निमी व तेझ्यातनिमी काडली आहे व विहिरीचा गाळ कचरा सर्वच माझ्या जमिनीत 8 ते 10 वर्ष झाल टाकला आहे त्या विहिरीत मला हिस्सा मिळेल काय किंवा जमिन मिळेल
आपणास प्रथम आपल्या जागेत अतिक्रमण करून विहीर बांधले बाबत , नुकसान भरपाई मिळणेबाबत , दिवाणी दावा दाखल करावा लागेल व पर्यायी मागणी विहरीत निम्मा हिस्सा मिल्ने बाबत करावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब,
माझ्या आजोबानी माझ्या नावावर खरेदी खत करून त्यांची थोडी जमीन माझ्या नावावर केली आहे.तर त्यावर माझे वडील किंवा काका कोणी दावा करू शकतात का?
आणि आता आजोंबांना त्याची राहिलेली जमीन मला द्यायची आहे त्याला काय करावे लागेल?
आजोबांची स्वकष्टार्जित जमीन असल्यास , वडील किंवा चुलते दावा करू शकणार नाहीत
मात्र आजोबांची वडिलपार्जीत जमीन असल्यास , त्यांनी वडिलांना व चुलत्यानां त्यांचे हिस्स्याची जमिनदिली नसल्यास , चुलते , वडील दावा दाखल करू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मालमत्ता पत्रिका असताना 7/12 तपासून रूपांतरण कर भारतात का?
gr आहे का
प्लीज guide
माझया कडे प्रॉपर्टीकार्ड आहे रूपांतरण कर भारणेसाठी 4महिने अर्ज केला आहे
clerk बोलतो 7/12, फेरफार चेक करावा लागतो
प्लीज मार्ग सांगाr3dq
संभंधित तहसीलदार यांना भेटा
आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
माझे वडीलांचे नावे असलेली जमिन सन १९८८ला पाटबंधारे प्रकल्पात गेली आहे.
२ जमिनिंचे नुकसान भरपाई(वडीलांना मिळाली नसल्यामूळे) मुलकी अनामतीस जमा झाली आहे.
त्यावेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामूळे वडीलांनी पर्यायी जमिनीसाठी अर्ज केला नाही किंवा पुनर्वसन नको असेही सांगितले नाही अथवा लेखी दिले नाही.
परंतु पुनर्वसन खात्यामधे 'पुनर्वसन नको' अशी परस्पर नोंद केली आहे.
आम्हास १९८६ चा पुनर्वसन कायदा लागु आहे.
माझे वडीलांचे २०१७ मधे निधन झाले आहे.
सन २०१५ कींवा २०१६ मधे पुनर्वसनासाठी राज्य सरकारने नवीन योजना आणली होती.त्यावेळी वडीलांनी पुनर्वसन धोरणात सामील करावे यासाठी अर्ज केला होता परंतु पुनर्वसन खात्याकडुन काही उत्तर आले नाही.
मला कॄपया मार्गदर्शन करावे की----
१) मी आता पर्यायी जमीन मागु शकतो का? कारण काही रक्कम मुलकी अनामतीस आहे.
२) त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?
३) गावाकडील दुस-या जमिनीवरील वारस नोंद चालु शकेल का?
४) पर्यायी जमिनीसाठी किती रक्कम भरावी लागेल? प्रती एकर दर काय आहे?

धन्यवाद
आता जमीन मागणी करता येणार नाही

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

Question by Sagar mali
01-12-2018
sagar143mali@gmail.com

सर माझा कडे 3000 स्क्वेअर फुट चा भुखंड आहे तरी तो मला वानिज्य कडे वर्गीकरण करायला प्रक्रिया सांगा
सक्षम महसूल अधिकारी कडे वापरात बदल करीत अर्ज करावा

Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी

Question by Pravin Lokhande
30-11-2018
nikysweet1@gmail.com

नगर पंचायत क्षेत्रात माझे
घर / प्लॉट आहे . नझुल मध्ये नोंद करणे आवश्यक आहे का... किंवा करता येईल का ?
याबाबत मार्गर्शन करावे.

This page was generated in 0.51 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3