जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

महार वतन जमिनीची शर्तभंग झाली असल्यास नियमित करण्यासाठी काय करावे लागेल
शर्तभंग काय झालाय ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार,
देऊळ, ट्रस्ट, देवस्थान, मंदिराच्या जागांना कुळ लागतात का ? कुळ लागली असतील पण त्यांना काढायची असतील तर काय करावे लागेल ?
देवस्थान जमीन ला कुल लागू शकतो
मात्र त्याचे नावे विक्री होऊ शकत नाही
देवस्थान जमीन स्वतः कसण्यासाठी अशी जमीन काढून घेऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by sharmila
01-02-2019
shardha12@yahoo.com

mi X kadun jamin vikat ghetli, sale deed register kele. X ya navane 7/12 hota. pan mazya navavar 7/12 zala nahi, jamin ni.sa.pra. aslyache karan denyat aale. aata X sahkary karat nahi, tar aata mazya kade kay paryay aahet ?
आपण शेतकरी आहेत का ? आपण जर शेतकरी असाल तर नवीन सुधारणा कायदयानुसार आपला व्यवहार दंड भरून नियमानुकूल करता येईल .
जमीन कोणत्या गावी/ तालुक्यात/ जिल्ह्यात आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तलाठ्यांनी वसुली रकम जवळ ठेवण्याची मर्यादा बाबत शासनादेश असल्यास कृपया माहीती द्यावी
सातबारा वरती जर नाव वर्णाक्षरे ने चुकीची असतील तर कुठे तक्रार करावी?
साहेब नमस्कार
माझा प्रश्न आहे की माझ्या वडिलांनी माझ्या आत्याला २००४ साली निबंधकाकडे जाऊन रजिस्टर मृतुपत्र केले आहे,ते मृतुपत्र माझ्या नावावर आहे हे मला माहित नव्हते,आत्या २०१७ साली मयत झाली तेव्हा मला कळले ,मृत्यूपत्र तलाठी यांच्याकडे नोंदीला दिले तलाठी यांनी नोंद घाली आहे ,पण ७/१२ वर नोंद घालत असताना वारसांना कळले त्यांनी कोर्टात दावा दाखल केले आहे आणि मी मृतुपत्र पहिले असता मृत्यूपत्र करताना मृतुपत्रा मध्ये काही चुका झाल्या आहेत त्या म्हणजे १) दोन साक्षीदार आमच्या गावाचे आहेत पण त्यांचे पत्ते चुकीच्या गावाचे टाकले आहेत
२) साक्षीदार व मृतुपत्र करणारी माझी आत्या यांची दस्ताला ओळखीसाठी कोणतीही कागदपत्रे जोडली नाहीत
3) मृतुपत्र करतेवेळी आत्याचे ७५ वय झाले होते,मृतूपत्राला डॉक्टरांचा मेडिकल आणि फिजिकल फिटनेस दाखला जोडला नाही,
3) आत्याने माझे नावे मृतुपत्र करण्याचे कारण आत्याला मुल बाल नाही,व आत्याची मृतुपत्रातील इच्छा मरेपर्यंत सांभाळ सेवा चाकारी करणार म्हणून केले होते ,परंतु आत्या तिच्या सासरी असल्याने मी तिचा सांभाळ, सेवा दवाखाना केली नाही ,मृतुपत्र रजिस्टर आहे, परंतु आत्याच्या वारसदाराना मृतु पत्राबद्द्दल माहित झाले असल्याने त्यांनी कोर्टात दावा दाखल केला आहे,हे मृतुपत्र कोर्टात चालेल का ,मी पुढील कायदेशीर कार्यवाही काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करावे हि आपणास विनंती
न्यायालयाने त्या बाबत निर्णय घेईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी लहान असताना आजोबांनी काही जमीन माझ्या नवे केली आहे परंतु त्या वेळी ती जमीन टोपण नावाने सातबाऱ्यावर नोंदवली गेली... सध्या सर्व शासकीय कागदपत्रे माझ्या चालू नावावर आहेत फक्त सातबारा टोपण नावे आहे तर ते नाव दुरुस्ती कशी करावी

Question by Sushil Karnade
21-01-2019
Sushi.karnade@gmail.com

Bhogwatdar warg 2 jamin vidharbha prane sampurna rajyat warg 1honyachi kiti shakyata आहे
या बाबत नियम अस्तित्वात आले आहेत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा. श्री. पाणबुडे सर , तक्रार रजिस्टर भरल्यानंतर किती दिवसा मद्ये निकाल दिला पाहिजे , निकाल देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असेल तर कायकरावे संबधीत अधिकारी पुढची तारीख देत नाही व निकालही देत नाही कृपया आपले मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती.
कायदाची मर्यादा १ वर्षाची आहे .
मात्र शास्नानाने परिपत्रकाद्वारे ती मुदत कमी केली आहे
३ मानण्यात निकाल देणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खरेदी खत नोंदणी प्रत मागणी केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी पुस्तक प्रतीमध्ये नोंदणी सुरु तारीख आणि अंतिम पानावर नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये प्रथम पानावर व अंतिम पानावर नमूद रजिस्ट्रार सही दोन वेगळ्या रजिस्ट्रारची आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये जमीन देणाऱ्याची सही नसून तेथे अंगठ्याचा ठसा असा शिक्का आहे तेथे अंगठ्याचा ठसा लावलेला नाही . तसेच खरेदी देणार इसम सही करत होता व तो मयत आहे . सदर खरेदी १९६८ ची आहे
१) वरील खरेदी खत बोगस इसम नेऊन केली असेल का ?
२) नोंदणी सुरु तारीख आणि नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप का असेल ?
आपणास बोगस वाटत असल्यास , ते अहवाणीत करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर मला ज़िला अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कलाम ३१ अ निर्यणाया निकाल विरुद्ध अपील करावयाचे आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावे हि विनंती .
आपण उपसंचालक भूमी अभिलेख यांचेकडे अपील करावे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sarang
07-01-2019
Sarangalone@rediffmail.com

अम्हला देवास्तन ची 30 अकर जमिन खरेदी ची 2008 मधे धर्मदय आयुक्त ची परवानगी मिढली होती पण ट्रस्टी ने पुर्ण रकम घेऊण फक्त 25 अकर च जमिन खृरेदी करुण दिली 5अकर जमिन खरीदी चे आश्वासन दिले होता पण खरीदी करुण दिली नाही तया मुडे 5 अकर साथी अम्ही कोर्ट मधे केस केली आहे आम्हला 5 अकर जमिनिची खरीदी ची ऑर्डर मिढल काय?आज 07/1/2019 कोर्ट-कचहरी चालू आहे
आपण ३० एकर जमिनीचा साठे करार केला होता का ? आपण कोणत्या आधारे उर्वरित ५ एकर जागा देव्स्ताहन विश्व्स्तांनी आपणास द्यावी याचा दावा करत आहेत ? कोणता दस्त आपणाकडे आहे ? त्यावर अवलंबून आहे . आपले २५ एकराचे दस्त मध्ये ३० एकर जमिनीचे पैसे मिळाले बाबत देवस्थान विश्वस्तांनी नमूद केले आहे का ?
विश्वस्तांना ३० एकर जमिनीचे पैसे मिळाले बाबत आपण सिद्ध करू शकला तर , आपणास उर्वरित जमीन विश्वस्तांनी विक्री करून द्यावी या बाबत न्यायालय आदेश देऊ शकेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

खरेदी खत नोंदणी प्रत मागणी केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी पुस्तक प्रतीमध्ये नोंदणी सुरु तारीख आणि अंतिम पानावर नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये प्रथम पानावर व अंतिम पानावर नमूद रजिस्ट्रार सही दोन वेगळ्या रजिस्ट्रारची आहे . तसेच नोंदणी पुस्तकामध्ये जमीन देणाऱ्याची सही नसून तेथे अंगठ्याचा ठसा असा शिक्का आहे तेथे अंगठ्याचा ठसा लावलेला नाही . तसेच खरेदी देणार इसम सही करत होता व तो मयत आहे . सदर खरेदी १९६८ ची आहे
१) वरील खरेदी खत बोगस इसम नेऊन केली असेल का ?
२) नोंदणी सुरु तारीख आणि नोंदणी पूर्ण तारीख यामध्ये २ वर्षाचा गॅप का असेल ?
खरेदी देणाऱ्याची सही नसेल मात्र , अंगठा आहे का ? असल्यास खरेदी खत वैध आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री पाणबुडे सर
आमच्या गावात सरकारी जमिनीवर चाळी बांधकाम करून विक्री करतात तर ह्यासाठी कुठे तक्रार करावी, तसेच मोठ्या प्रमाणात डोंगर खोदून माती विकतात,,
अवैध उत्खननाबत बाबत आपण तहसीलदार यांचे कडे तक्रार करा .
चाली बांधकामास नियोजन अधिकाऱ्यांची विकास परवानगी नसेल तर , त्या नियोजन अधिकारी यांचेकडे तक्रार करा
नियोजन अधिकारी - बांधकाम नगर पालिका क्षेत्रात असेल तर - मुख्याधिकारी
महानगर पालिका - पालिका आयुक्त
गावठाण - ग्रामपंचायत
अन्य ग्रामीण भाग -जिल्हा प्रादेशिक योजना - जिल्हाधिकारी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर
माझे वडील महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट मध्ये रोजंदारी वर कामाला होते त्यांना पगार महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट देत होते १९८७ ला त्यांना कामावरून काढले त्यानंतर वडिलांनी कामगार कोर्ट मध्ये केस केली त्या चा निर्णय वडिलांच्या बाजूने लागला परंतु स्टेट ट्रान्सपोर्ट ने अपील केले तेथे सुद्धा खालील कोर्ट चा निर्णय कायम केला ह्या सगळ्या मध्ये वडिलांचे वय ६० वर्षे झाले त्या मुळे स्टेट ट्रान्सपोर्ट ने तुम्हाला तुम्ही वया मुळे कामावर हजार होऊ शकत नाही असे सांगून अत्यल्प मोबदला दिला बाकी कोणत्या हि सुविधा दिल्या नाहीत तरी त्यांना इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि पेन्शन मिळणे साठी काय करावे हे मार्ग दर्शन करावे हि विनंती कोर्ट ने असे सांगितले कि स्टेट ट्रान्सपोर्ट पगार देत असलेने सदर कर्मचारी हा तुमचा कामगार आहे कॉन्ट्रॅक्टर चा नाही
कामगार न्यायालय व त्यावरील अपील न्यायालय यांनी , वडिलांचे बाजूने निकाल दिला आहे . मात्र न्यायालयाचा निकाल काय होता ? जर निकाल , वडिलांना सेवेत कायम स्वरूपाचे कर्मचारी म्हणून घ्यावे असा असेल तर , निवृत्ती नंतर चे सर्व लाभ आपणास , महाराजस्त्र राज्य परिवहन मंडळाने पूर्व लक्ष्यी प्रभावाने देणे आवश्यक . आपण ज्या कामगार न्यायालयाने निकाल दिला त्याच न्यायालयात दाद मागा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या वडिलांनी व मोठ्या भावाने 2008 साली 2आर जागा व त्यातील घर नोदणीकृत करारनामा करून दिले घेणारा माणूस बाहेर राज्यातील असून तो मयत आहे त्याचे कोणी वारसदार नाही 7/12 व घर वडिलांच्या नावे अजुन आहेत गावातील ज्या व्यकतीने हा व्यवहार केला आहे तोच आजपर्यंत घराचे भाडे घेत आहे तर ते घर आम्ही परत घेऊ शकतो का कायदेशीर माग॔दश॔न करावे.
वास्तविक ना आपला व त्या त्रयस्थ इसमाचा आता त्या घर व त्या खालील जमिनीवर कोणताही हक्क उरलेला नाही . विना वारस जमीन शासनाकडे निहित होणे आवश्यक

माझे वडील महसूल मंडळ अधिकारी या पदाने माहे ऑगस्ट २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. सदर त्यांना विभागीय चौकशीचे ज्ञापन माहे जुलै २०१८ दिले होते आणि माहे नोवेंबर २०१८ निकाल निर्दोष म्हणून दिला आहे. पण विभागीय चौकशी आरोपपत्रातील काही आरोप हे खोटी माहितीच्या आधारे टाकण्यात आले होते. खोटी माहिती देणाऱ्या शासकीय कर्मचारी विरुध्द तक्रार देऊ शकतो? शक्य असल्यास कोणाकडे करावी? कृपया मार्गदर्शन करावे.
होय
आपण जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करू शकता . मात्र संबंधित कर्मचाऱ्याने खोटी माहिती दिली होती हे आपणास सिद्ध करावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न - महोदय , माझ्या मालकीच्या जमीन च्या इतर हक्कात स.सा. कुळ असलेल्या व्यक्ती ची नावे चौकशी करून (केस चालवून) व माझ्या बाजून निकाल देत कुळ असलेल्या व्यक्तीची नवे इतर हक्कतून कमी करण्याचा आदेश मा.तहसीलदार यांनी केला आहे व त्याची प्रत गाव तलाठी याच्या कडे पोहचली आहे तरीही ;
१.नियमाप्रमाणे तलाठी याना किती दिवसात नोंद घालणे बंधनकारक आहे.
२.तसेच ज्या इतर हक्कातील व्यक्तीची नावे आदेशानुसार कमी होणार आहे त्यांना वरीष्ठ अधिकाऱ्यां कडे अपील करण्याची किती दिवसाची मुदत असते?
१. तलाठी यांनी तहसीलदार यांचा आदेश असल्याने लगेच नोंद मंजूर करणे आवश्यक
२. अपील करण्याची मुदत ६० दिवस आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

तहसीलदार यांनी दिलेल्या निकालानुसार २४ .११ ७० चा ३२ म निरर्थक ठरवून ३१ .७ .१९८९ रोजी ३२ म प्रमाणपत्र माझे आजोबांचे नावे करण्यात आले ७/१२ वर आमचे नावाची नोंद होन्याचे दरम्यान नोव्हेंबर १९८९ मध्ये एकत्रीकरण झाले त्यामुळे सदर जमीन आमचे नावे न होता यापूर्वीचे मालकाचे नावेच राहिली त्यामध्ये यापूर्वीचे मालकाचे लगतची जमीन एकत्र होऊन जमिनीचे क्षेत्र बदलून जास्त झाले व जमीन त्याचेच नावे राहिली . सदर प्रकरणात एकूण दोन गट नंबर (६८७ , ८०४ ) होते. गट ८०४ मध्ये ३२ म नुसार आमचे क्षेत्र ३० आर व विरोधकाचे २१ आर एकूण ५१ आर व गट न ६८७ मध्ये ४ आर आमचे व विरोधकांचे २ आर एकूण ६ आर . त्यापैकी एक गट ६८७ मधील ६ आर पैकी ३ आर जमीन वारसाने विक्री केली व विक्री चे परवानगीसाठी जुना २४ .११ .७० चा ३२ म जोडला . मला असे विचारायचे आहे कि गट न ८०४ मधील ३० आर आमचे क्षेत्र असल्याने त्याची नोंद आमचे नावे ७/१२ वर घेण्यासाठी ३२ म व एकत्रीकरण (९)(३ )(९ )(४ ) देऊन अर्ज तलाठी यांचेकडे देणे योग्य आहे का व गट ६८७ बाबत विक्री चा फेरफार रद्द करणेस मा उपजिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज देणे योग्य आहे का
या दोंघाकडे अर्ज देऊन अथवा अपील करून उपयोग नाही . त्यांना अधिकार क्षेत्र नाही
महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडे जोड कायदा , कलम ३२ अथवा ३३ अन्वये जमाबंदी आयुक्त किंवा शास्नानाने गटवार योजना बदल करणे आवश्यक

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vikas sanap
02-01-2019
Vikassanap1993@gmail.com

1. maharashtra land revenue code 1966 chya kalam 247 kon kontya adhikariyan kade appeal karta yete ? 2. Saksham pradhikari chi name list milawi?
श्री. मोहन बाबुराव आसबे,
सर, प्रथम आपले सर्वांचे या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन..
माझ्या आजोबांचे नांव १९५६-५७ पासून कुळ म्हणून दाखल आहे. आजोबा २००३ साली मयत झाले आहेत. आजोबा अशिक्षित असल्याने सदर जमीन कुळ म्हणून खरेदी करुन घेऊ शकले नाहीत. त्याच मिळकतीतील अर्ध्या हिश्याची जमीन ३२ग ने खरेदी करण्यात आलेली आहे. उर्वरित अर्ध्या हिश्याचे जमीन मालक १९५६ साली मयत झाले आहेत. त्यांना कोणीही वारस नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे आमचा जमीन मालकाशी कधीच संपर्क झाला नाही. सदर जमीन वारसाने आम्हीच कसत आहोत. त्याचा शेतसारा नियमित मालकाचे नांवे भरल्याचे आमचेकडे पावत्या आहेत. सध्या सदर जमीन ३२ ग ने खरेदी मिळणेसाठी कुळाचे वारस म्हणून आम्ही तहसिलदार यांचेकडे दावा दाखला केला होता. सदर प्रकरणाचे निकाली आदेशामध्ये - अर्जदार यांचे पुर्वाधिकारी त्यानंतर अर्जदार हे दावा मिळकतीमध्ये दिनांक ०१/०४/१९५७ रोजी कृषक दिनापुर्वीपासून कुळ म्हणून कब्जा वहीवाट करत आहेत. त्यामुळे दावा मिळकत ही अर्जदार यांना कुळ कायदा कलम ३२ व ३२ ग प्रमाणे विकत घेणेचा हक्क व अधिकार आहे.
या दाव्यात इकडून चौकशीची तारीख ०९/०१/२०१७ रोजीची नेमून नोटीसा काढण्यात आल्या. तदनंतर यामध्ये दि. २३/०१/२०१७, दिनांक २४/०४/२०१७ अशा तारखा देवून उभय पक्षकारांना पुरावा करणेची संधी देणेत आली तथापि प्रतिवादी / जमीन मालक यांना अर्जदार यांनी दिलेल्या पत्यावर नोटीस लागू झालेली नाही. तदनंतर जमीन मालकांना म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून दैनिक लोकमत या वृत्तपत्रातून दि. ०३/०३/२०१७ व दैनिक पुढारी वृत्तपत्रातून दि. ०४/०३/२०१७ या तारखेची जाहीर नोटीस देणेत आली. परंतु प्रतिवादी / जमीन मालक तर्फे कोणीही प्रतिनिधी अगर समक्ष हजर राहीलेले नाहीत. त्यानंतर पुन्हा दि २३/०५/२०१७ रोजी नोटीस काढून ती गा. का. तलाठी यांचेमार्फत पंचनामे व्दारे दावा जमीनीस चिकटविणेत आली.
प्रस्तुत प्रकरणातील वादी यांनी जमीन मालकाचा पुर्ण पत्ता दिलेला नाही. त्यामुहे त्यांना नोटीस पाठविली असता त्यांना नोटीस लागु न होता ती परत आलेली आहे. नैसर्गिक न्यायाचे दृष्टीने जमीन मालक यांना नोटीस लागु करुन त्यांचे म्हणणे घेणे आवश्यक आहे. तशी कार्यवाही वादी यांनी केलेची दिसून येत नाही. त्याचप्रमाणे कुळ कायदा कलम ३२ ग अन्वये जमीनीची किंमत ठरवायची झालेस कुळाने मालकांस खंड दिल्याचे पुरावे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे कुळ व जमीन मालक यांचेतील नाते स्पष्ट होत नाही. केवळ वादी यांनी दाखल केलेल्या दाव्यावरुन जमीन मालक यांना कोणतीही संधी न देता जमीनीची किंमत ठरविल्यास मुळ जमीन मालक यांचेवर अन्याय केल्यासारखे होईल. अशा परिस्थितीत वादी कुळ यांचा उक्त जमीनीची किंमत ठरवून मिळणेबाबतचा अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते. सबब मी तहसिदार मला असले मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ३२ ग अन्वये खालील आदेश पारीत करीत आहे. आदेश - अर्जदार यांचा अर्ज नामंजूर करणेत येत आहे. सदर निकालाची समज उभय पक्षकार व गा.का. तलाठी यांना देणेत यावी. सदर आदेश दिनांक ०२/११/२०१७ रोजी झालेला आहे.
सदर आदेशावर मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपिल करण्यात आले होते. सदर अपिलाचा निर्णयामध्ये - अपिल अंशत: मान्य करणेत आले आहे. व फेरतपासामध्ये सखोल चौकशी करुन ३ महिन्याचे आत अंतिम निकाल देणेबाबत. आदेशित केले आहे. त्यानंतर फेरतपासणीमध्ये जमीन मालक अगर त्यांचे प्रतिनिधी कोणीही उपस्थित झालेले नाहीत. सदर ३ महिन्यांचा कालावधी उलटून ४-५ महिने झालेले आहेत अजूनही तारखेस बोलविणेत येत आहे. शेवटच्या तारखेत तोंडी खंड भरलेच्या पावत्या, कुळ व जमीन मालक यांचे नाते स्पष्ट होण्यासाठी केलेले करार पत्र सादर करण्यात सांगण्यात आलेले आहे. परंतु आमचेकडे खंड भरलेच्या पावत्या किंवा कुळ व जमीन मालक यांचेतील करार पत्र उपलब्ध नाही.
तरी सदर जमीन ३२ग ने खरेदी करुन मिळण्यासाठी मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.

1) नमस्कार सर 19 डिसेंबर 2018 चा समांतर आरक्षणाचा GR काय आहे?? 2) मी OBC प्रकल्पग्रस्त असून मी गुणवत्तेनुसार (जास्त) मार्क असेल तर मी OPEN प्रकल्पग्रस्ताचे मेरीट मारू शकतो किंवा Open प्रकल्पग्रस्तांमध्ये समावेश होईल का?? 3) तसेच मला OBC प्रकल्पग्रस्तामधून गुणवत्तेनुसार सध्याचे (48%किंवा 32%) pure general प्रवेश करता येईल का??? याची कृपया माहिती द्यावी ही नम्र विनंती
श्री. मोहन बाबुराव आसबे,
सर, प्रथम आपले सर्वांचे या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन..
माझ्या आजोबांचे नांव १९५६-५७ पासून कुळ म्हणून दाखल आहे. आजोबा २००३ साली मयत झाले आहेत. आजोबा अशिक्षित असल्याने सदर जमीन कुळ म्हणून खरेदी करुन घेऊ शकले नाहीत. त्याच मिळकतीतील अर्ध्या हिश्याची जमीन ३२ग ने खरेदी करण्यात आलेली आहे. उर्वरित अर्ध्या हिश्याचे जमीन मालक १९५६ साली मयत झाले आहेत. त्यांना कोणीही वारस नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे आमचा जमीन मालकाशी कधीच संपर्क झाला नाही. सदर जमीन वारसाने आम्हीच कसत आहोत. त्याचा शेतसारा नियमित मालकाचे नांवे भरल्याचे आमचेकडे पावत्या आहेत. सध्या सदर जमीन ३२ ग ने खरेदी मिळणेसाठी कुळाचे वारस म्हणून आम्ही तहसिलदार यांचेकडे दावा दाखला केला होता. सदर प्रकरणाचे निकाली आदेशामध्ये - अर्जदार यांचे पुर्वाधिकारी त्यानंतर अर्जदार हे दावा मिळकतीमध्ये दिनांक ०१/०४/१९५७ रोजी कृषक दिनापुर्वीपासून कुळ म्हणून कब्जा वहीवाट करत आहेत. त्यामुळे दावा मिळकत ही अर्जदार यांना कुळ कायदा कलम ३२ व ३२ ग प्रमाणे विकत घेणेचा हक्क व अधिकार आहे.
या दाव्यात इकडून चौकशीची तारीख ०९/०१/२०१७ रोजीची नेमून नोटीसा काढण्यात आल्या. तदनंतर यामध्ये दि. २३/०१/२०१७, दिनांक २४/०४/२०१७ अशा तारखा देवून उभय पक्षकारांना पुरावा करणेची संधी देणेत आली तथापि प्रतिवादी / जमीन मालक यांना अर्जदार यांनी दिलेल्या पत्यावर नोटीस लागू झालेली नाही. तदनंतर जमीन मालकांना म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून दैनिक लोकमत या वृत्तपत्रातून दि. ०३/०३/२०१७ व दैनिक पुढारी वृत्तपत्रातून दि. ०४/०३/२०१७ या तारखेची जाहीर नोटीस देणेत आली. परंतु प्रतिवादी / जमीन मालक तर्फे कोणीही प्रतिनिधी अगर समक्ष हजर राहीलेले नाहीत. त्यानंतर पुन्हा दि २३/०५/२०१७ रोजी नोटीस काढून ती गा. का. तलाठी यांचेमार्फत पंचनामे व्दारे दावा जमीनीस चिकटविणेत आली.
प्रस्तुत प्रकरणातील वादी यांनी जमीन मालकाचा पुर्ण पत्ता दिलेला नाही. त्यामुहे त्यांना नोटीस पाठविली असता त्यांना नोटीस लागु न होता ती परत आलेली आहे. नैसर्गिक न्यायाचे दृष्टीने जमीन मालक यांना नोटीस लागु करुन त्यांचे म्हणणे घेणे आवश्यक आहे. तशी कार्यवाही वादी यांनी केलेची दिसून येत नाही. त्याचप्रमाणे कुळ कायदा कलम ३२ ग अन्वये जमीनीची किंमत ठरवायची झालेस कुळाने मालकांस खंड दिल्याचे पुरावे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे कुळ व जमीन मालक यांचेतील नाते स्पष्ट होत नाही. केवळ वादी यांनी दाखल केलेल्या दाव्यावरुन जमीन मालक यांना कोणतीही संधी न देता जमीनीची किंमत ठरविल्यास मुळ जमीन मालक यांचेवर अन्याय केल्यासारखे होईल. अशा परिस्थितीत वादी कुळ यांचा उक्त जमीनीची किंमत ठरवून मिळणेबाबतचा अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते. सबब मी तहसिदार मला असले मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ३२ ग अन्वये खालील आदेश पारीत करीत आहे. आदेश - अर्जदार यांचा अर्ज नामंजूर करणेत येत आहे. सदर निकालाची समज उभय पक्षकार व गा.का. तलाठी यांना देणेत यावी. सदर आदेश दिनांक ०२/११/२०१७ रोजी झालेला आहे.
सदर आदेशावर मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपिल करण्यात आले होते. सदर अपिलाचा निर्णयामध्ये - अपिल अंशत: मान्य करणेत आले आहे. व फेरतपासामध्ये सखोल चौकशी करुन ३ महिन्याचे आत अंतिम निकाल देणेबाबत. आदेशित केले आहे. त्यानंतर फेरतपासणीमध्ये जमीन मालक अगर त्यांचे प्रतिनिधी कोणीही उपस्थित झालेले नाहीत. सदर ३ महिन्यांचा कालावधी उलटून ४-५ महिने झालेले आहेत अजूनही तारखेस बोलविणेत येत आहे. शेवटच्या तारखेत तोंडी खंड भरलेच्या पावत्या, कुळ व जमीन मालक यांचे नाते स्पष्ट होण्यासाठी केलेले करार पत्र सादर करण्यात सांगण्यात आलेले आहे. परंतु आमचेकडे खंड भरलेच्या पावत्या किंवा कुळ व जमीन मालक यांचेतील करार पत्र उपलब्ध नाही.
तरी सदर जमीन ३२ग ने खरेदी करुन मिळण्यासाठी मार्गदर्शन व्हावे ही नम्र विनंती.
आपल्याकडे जरी खंडाच्या पावत्या नसल्या तरी आपण कुल आहेत याचा फेरफार असेल , तसेच ७/१२ च्या इतर हक्कात कुल म्हणून आपले नावाची नोंद असेल . तसेच पीक पाहणी सदरी , कसणारे म्हणून आपले नाव दाखल असल्यास , आपली नावे ३२ ग किंमत निश्चित होण्यास याचं नाही .
प्रतिवादींचा पत्ता देणे वादी ची जबाबदारी आहे . मात्र जर पत्ता उपलब्ध नसेल तर , वर्तमान पत्रातील नोटीस पुरेशी आहे . तहसीलदार सुनावणी प्रक्रिया सुरु करत नसतील तर , प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आमची ७ एकर जमीन वडिलोपार्जित आहे आमच्या हिस्साला आलेल्या जमिनीवर आजीचे नाव लागले होते ते आता कमी केले असून वारसा नोंदणी नुसार आता काकांची नावे लागली आहे परंतु आदिच समान खातेवाटप झाले असून त्या नंतर आजीचे नाव चुकून लागले होते आमच्या ७/१२ वरून त्यांचे नाव कमी कारण्यास ते तयार आहे पण त्यासाठी काय करावे या साठी मार्गदर्शन करावे हि आपणास विनंती
या पूर्वीचे वाटप कसे झाले आहे ? वाटपाचा फेरफार झाला आहे का ? वाटप लिखित स्वरूप आहे का ?
काका पूर्वीचे वाटपाप्रमाणे , जमीन नावावर करून देण्यास तयार असल्यास , पुन्हा पूर्वी सारखेच वाटप करा .
अथवा काकांचे नाव , या पूर्वी वाटप होऊन हि लागले तो फेरफार आव्हानात करा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

श्री पाणबुडे सर,, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स इंडिया ,, ने संपादित केलेली जमीन तालुका अंबरनाथ ,जिल्हा ठाणे, येथे असून त्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशररित्या चाळी बांधणे तसेच विक्री चालू आहे,, ह्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा खूप नुकसान होत आहे तरी हे बेकायदेशीर बांधकाम थांबावे ह्या करिता काय करावे.
2) बाजूच्या सरकारी जागेवर बेकायदेशीर बांधलेल्या चाळींचा सांडपाणी शेतात येत आहे व थोड्या दिवसांनी विहीर पण घाण होईल आत्ता काय करावे मार्गदर्शन करावे विनंती,
१. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडे तक्रार करा . तसेच या विभागाकरिता नियोजन प्राधिकरण कोण आहे ? त्यांचेकडे अनधिकृत बांधकामाबद्दल तक्रार करा .
२. बेकायदेशीर चाली बाबत नियोजन प्राधिकरणाकडे अर्ज करा . सरकारी जागेवर अतिक्रमण आहे , तहसीलदार यांचेकडे तक्रार दाखल करा
३. सांडपाण्याबाबत , प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.37 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3