जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याविरुद्ध पूर्वी व्यवहार झाला असल्यास व त्याची नोंद सातबारा सदरी घेण्यात आली आहे पण आता क्षेत्र जुळत नसल्याने त्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनिय1966 चे कलम 155 अन्वये अर्ज दाखल केल्यास त्यावर कोणती कारवाई करावी कृपया मार्गदर्शन करावे

Question by yogesh
04-10-2019
yogeshrudruke2GMAIL.COM

आमच्या गावामध्ये १९८० मध्ये वाढीव गावठाण अंतर्गत प्लॉट पडले आहेत, त्या मधील काही प्लॉट शिल्लक आहेत ते खरेदी करण्यासाठी काय करावे लागेल
त्यासाठी काही प्राधान्य क्रम आहे का ? ते प्लॉट कोणाला मिळू शकतात

Question by Sagar
03-10-2019
sagarkandekar@hotmail.com

हि वेबसाईट इतक्या उशिरा का update होते?.
महिन्यात एकदा पण माझे मांडलेले प्रश दिसत नाही.
खूप कामाची आहे ही वेबसाईट specialy शेतकरी वर्गासाठी.
सागरजी आपले म्हणणे मान्य आहे
website Maintenance साठी update नव्हती .
असुविधेसाठी दिलगीर आहोत

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rohan Thakur
02-10-2019
rohanthakur121@gmail.com

माझी आई व तिची चार भावंड यांची मिळून ५८ गुंठे जमीन आहे. त्यांचे आई वडील हयात नसून सर्वांची ७/१२ वर नोंद झालेली आहे. परंतु पाचहीजणांची लग्न झालेली असून ती वेगवेगळी राहत आहेत. त्यातील ३ जणांना सध्या पैश्याची गरज असल्यामुळे ती जमीन विकण्याचा विचार चालू आहे.
परंतु अंतर्गत वादामुळे २ जणांचा ह्या विक्रीला विरोध आहे तो म्हणजे निव्वळ इतरांना त्रास व्हावा म्हणून.
तरी पैश्याचा गरजेपोटी ती जमीन विकायची असल्यास काय करता येईल.
ज्यांचा विरोध आहे त्यांना जमीन खरेदी करण्यास विंनती करा
अन्यथा नायायालायात दिवाणी दावा दाखल करून , हिस्से पाडुन, ताबा मिळणेच हुकूम मागा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by रोहित
02-10-2019
rohitambekar45@gmail.com

गजकर्ण रोग असलेल्या पेशंटला ठेवणारी संस्था महाराष्ट्र मध्ये कुठे आहे का कारण माझ्या एरियामध्ये अशी व्यक्ती आहे ते पूर्ण शरीरावर उठला आहे
कृपया अशे प्रश्नास उत्तरे देण्यासाठी हे माध्यम नाही .
आपणच अश्या व्यक्तीस चांगल्या त्वचा वैद्याकडे घेऊन जा व उपचार करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shivaji nilkanthe
01-10-2019
srnilkanthe1@gmail.com

इतर इसमाने जमिनीवर दावा टाकल्यानंतर त्या जमिनीची विक्री करता येते का? विक्री केल्यास खरेदी करणाराचे नांवे फेरफार करून 7/12 निघू शकते का? विक्री केल्यांनंतर रजिस्ट्री रोखता येते का ?
दावा प्रलंबित आहे म्हणून जमिनीची विक्री होण्याचे थांबू शकत नाही . घेणारे या भीतीवर जमीन खरेदी करतो कि , विक्री करणारांचे विरुद्ध निकाल लागला तर , कामीं त्याचेकडून जाऊ शकते . न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्या शिवाय , खरेदी रोखता येत नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर माझा प्रश्न असा आहे की गेली १५ वर्षा पासून माझे वडील पुजारी आहे जागा मालकाने १ गुंठा जागा देण्याचं आश्वासन दिले होते परंतु आता जागा देण्यास नकार देत आहे पण कोर्ट पंचनामा करून वडिलांचे पुजारी आहे याचे नाव लागले आहे
प्रश्न विस्ताराने मांडा .
पुजारी आहेत म्हणून जागा देण्याचे मान्य केले होते . त्या बाबत काही अभिलेख करण्यात आला आहे का ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1950साली खातेदार मयत झाल्यानंतर त्याने खरेदी केलेल्या जमीनीला वारस म्हणून नातवाचे (वय 4) नाव आहे पण 6क ला नातवाच्या नावासोबत अ.पा.क नातवाच्या आईचे नाव आहे त्याचबरोबर ए.कु.म्हणून वर्ग 2चे मयताच्या 3भावांची पण नावे आहेत पण फेरफार ला फक्त एकट्या नातवाचे नाव आहे व एकत्र कुटुंब पुढारी म्हणून कुठेही उल्लेख नाही तर मयताच्या भावांची त्या जमिनीवर नाव लागु शकतील का?
गेली ४० वर्षापासुन जवळपास ८० कुटुंबे प्रोटेक्ट फॉरेस्ट जमिनीवर घरे बांधून रहात आहोत.तर ही घरे आमच्या मालकीची होतील का?
वनहक्क कायद्या अंतर्गत , आदिवासी कुटुंवचे बाबतीत २००५ पूर्वीचे वास्तव्य पुरावा व अन्य बिगर आदिवासी यांचे बाबतीत ७५ वर्षांपूर्वीच पुरावा सादर करून , घराखालील जागा आपले मालकीची होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पुणे येथे आमची महार वतन जमीन आहे, ती विक्री करता येते का?

Question by MAHESH
28-09-2019
vyavahare.mahesh@gmail.com

माझे वडील यांचे नाव ७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात कुळकायदा कलम ३अ प्रमाणे इसप ३००० ६/१/१६३ ३२ पी खाली (१) असे आहे.
मुळ मालक हे मयत आहेत व त्यांचे वारस कोठे आहेत हे मला माहित नाही.माझी वहिवाट त्या जमिनीवर सुरु आहे. ७/१२ वर मी माझे नाव कसे लावू शकतो.
कुलकायद्याने जमीन माझे नावावर होयील का ?
आपण ३२ ग किंमत निश्चित करण्यासाठी आपण अर्ज करा . जमीन मालक कृषक दिनी विधवा (१.४.५७)होत्या काय ? असल्यास त्या मयत झाल्यापासून २ वर्षाचे आत , उपरोक्त अर्ज करणे क्रमप्राप्त .
नसल्यास आपण अर्ज करा . बाकीची प्रक्रिया शेत जमीन न्यायाधिकरण मार्फत होईल
मालक मयत आहे व वारस माहित नाही , अश्या स्थितीत , वर्तमान पटार्ट नोटीस प्रसिद्ध केली जाते . तसेच जागेवर नोटीस प्रसिद्ध केली जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Swapnil mane
27-09-2019
maneswapn124@gmail.com

नमस्कार सर
माझा आजोबाचा जमिनीवर कुळ लागलेले आहे त्यामध्ये इतर हक्क मध्ये असे मनःतले आहे की वहिवाट मध्ये हुंकूम नंबर 767 दिनांक 06/10/80 हुकमाप्रमाणे
पण त्या 7 /12 वर माझा चुलते व वडिलांची नावे वारसप्रमाणे लागलेली आहेत तरी हे कुळ कसे काढता येईल त्याबद्दल मार्गदर्शन करावे
कलम १४ खाली आपण कुळवहिवाट समाप्त करू शकता . त्यासाठी कलम १४ वाचा . खालील कारणासाठी कुळवहिवाट समाप्त करता येऊ शकते .
१. कुळाने ३१ मे पूर्वी खंड न देणे
२.कुळाने जमीन अन्य त्रयस्थ इसमास कसण्यास देणे
३. जमिनीचा पोत खराब करणे
या तिन्हीपैकी एका बाबीची पूर्तता होत असेल तर , खुलासा तीन महिने अवधीची नोटीस द्यावी . या उक्त कालावधी उपरोक्त भंग दुरुस्त झाला नाही तर , कुलवहिवाट समाप्त होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर एका ७/१२ वर ३ आणेवारी आहेत त्यामधील २ आणेवारीचे खरेदी खत मी वेगवेगळे केले आहे पण ७/१२ च्या एका आणेवारी वर बोझा आहे त्याचा फेरफार प्रलंबित दाखवत आहे तर माझी एक प्रथम खरेदी खताची ची नोंद पण प्रलंबित दाखवत आहे तलाठी आता बोलत आहेत कि बोझा कमी झाल्याशिवाय तुमचे नाव ७/१२ वर चढणार नाही
तसेच दुसऱ्या आणेवारीच्या खरेदी खताची नोंद पण टाकू शकत नाही आपण मार्गदर्शन करावे
बोजा जमीन महसुलाचा असेल तर जमीन महसूल जमा करा
अन्य बाबाईचा बोजा असल्यास ( बँक कर्ज ) , नोंद प्रलंबित ठेवता येणार नाही . तो बोजा आपले ७/१२ वर तसाच राहील . व आपल्याल्या कर्ज परतफेड करावी लागणार . ज्याचे कडून आपण जमीन खरेदी केली आहे त्यास बोजा रक्कम भरण्यास सांगून बोजा कमी करून घ्या . अन्यथा आपणस परत फेड करावी लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

एका ७/१२ वर खरेदी खत झाले आहे पण ७/१२ वर नोंद मजूर करताना त्या ७/१२ वर बोझा चा फेरफार प्रलंबित असल्यामुळे
मी केलेल्या खरेदी खताची नोंद बोझा फेडल्याशिवाय होणार नाही असे सांगत आहेत हे योग्य आहे का माझे नाव ७/१२ कसे लागणार आपण मदत करावी
मला जातीच्या (N.T.-B)दाखल्यासाठी माझ्या स्वर्गीय वडिलांचा *गावाकडचा रहीवासाचा पुरावा हवा आहे.* .परंतु गावी जन्म —मृत्यू नोंदणीत नोंद सापडत नाही(जन्म तारीख १९/०९/१९३५) . वडीलांच्या नावे जमिन नसल्याने ते वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या आई सोबत व मोठ्या भावासह मुंबईत आले.त्यांचा मतदान यादीतील १९६६ चा उतारा सापडला .
दरम्यान माझ्या सख्ख्या चुलत्यांनी गावात शेतजमिन घेतल्याने व त्यांनी गावी घर बांधले असल्याने (१९९२) त्यांच्या रहीवासाचा दाखला प्राप्त झाला . परतू माझे चुलते आणि माझे वडील यांच्यात रक्ताचे नाते दर्शवणारा कोणताही ग्राह्य पुरावा उपलब्ध होत नाही .
गावातील शाळेतील दस्त पूराच्या पाण्यात (२००५)वाहून गेल्याने तेथूनही काही माहीती मिळाली नाही .
सदरचा पूरावा मला शेतकरी दाखल्यासाठी देखिल आवश्यक आहे .
माझ्या सख्ख्या आणि चुलत कांकांची घरे सध्या गावी अस्तित्वात आहेत .
कृपया मार्गदर्शन करावे.
आपला प्रवर्ग हा पूर्वी इतर मागास प्रवर्ग होता. या प्रवर्गातील बहुतांशी सर्व जाती १९६७ साली , इतर मागास वर्गामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत .
१९६६ चा वडिलांचा मुंबई येथील मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा आपल्याला मिळाला आहे परंतु त्यावर जात नमूद नसते . त्यामुळे अन्य पुरावा ज्यावर आपली जात नमूद आहे व तो १९६७ अथवा त्या पूर्वीचा असणे आवश्यक आहे
आपले चुलते , चुलत यांचे प्रमाणपत्र आहे का पहा ? आपल्या अन्य भावंडाना ( चुलत -चुलत ) यांना जात प्रमाण पत्र व वैधता प्रमाण पात्र दिले आहे का पहा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir/madam,
तलाठी पदासाठी झालेल्या पदभरती च्या जळगाव जिल्हा निवड यादीमध्ये 160 गुण मिळवून OBC चा मुलगा आलेला आहे पण मला जास्त 162 गुण असूनही यादीमध्ये नाव नाही
अशावेळी कुणाशी संपर्क साधायचा आणि काय process करायची?
काय आपण मला प्रत्यक्ष मदत करू शकता?
माझी exam login id आहे- REV_TI_०२८३५०३

संपर्क- 8329952629
नमस्कार सर
माज्या वडीलांचे नाव गोविंद बाळू गोळे आहे पण 7/12 वरती त्यांच नाव गोविंद विठू गोळे लागला आहे त्यांच्या नावा मध्ये दुरुस्ती करण्यासाठी कोणाशी संपर्क करावा लागेल
तहसीलदार यांचेकडे महाराष्ट्र जमीन आदिनियम १९६६ खाली अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sandeep
23-09-2019
mechmaster7@gmail.com

नमस्कार सर
माझ्या आजोबानी व इतर तिघे नातेवाईक यांनी २५ नोव्हेंबर १९७४ रोजी
" पाटील इनाम/वतन -भोगवटादार-२ " जमीन पाटलांकडून खरेदीखत करून विकत घेतली.
खरेदीखत रक्कम -८५०० त्यात
४५००- सदरची रक्कम खरेदीप्रमाणे दस्ताचे भरण्यात जमा करण्याकरीत दिली आहे.
४०००- सरकारी तगाई भागवणे यासाठी लिहून घेणार याना रोख दिली.
असे नमूद आहे. सध्या या ४ जणांपैकी ३ जणांच्या वारसाची नोंद सातबाऱ्यावर झाली आहे.
१) यात दस्त रक्कम ५०% नजराणा याप्रमाणे देण्यात आली आहे का? असे असेल तर खरेदीनंतर जमीन "भोगवटादार-२" मधून "भोगवटादार-१" का झाली नाही ?
२) महाराष्ट्र शासनाने २००२ मध्ये काढलेल्या जमीन हस्तांयेततराच्या परिपत्रकाप्रमाणे आजोबानी जमीन घेताना १९७४ मध्ये ५०% नजराणा भरला असेल तर आता ४५ वर्षांनी वारसदार भोगवटादार-१ ते भोगवटादार-२ करण्यासाठी अर्ज करता येईल का ?
३) आता वारसांना परत ५०% नजराणा भरावा लागेल का?
४) या पाटील इनाम जमिनीवर नवीन शर्त (शर्तीचा भंग-७०० ) असा उल्लेख आहे याचा अर्थ काय ?
पाटील वतनदार यांचेकडून जमीन खरेदी करताना , जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे का ?
केवळ जमिनीचा वापर कृषी इतर कामासाठी करण्यात आला असेल तरच ५० % नजराणा भरण्याचा आहे .
४ त्या वारसाचे नाव लागण्यास , नजराणा भरण्य्ची आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
या पूर्वी उत्तर दिले आहे
कलम १८ - कुळवहिवाट कायदा
त्या खाली अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
खरेदी केलेल्या जमिनीची नोंद घेताना फेरफार नमुना 6 मध्ये भूसंपादन अधिकारी यांची खरेदीस मान्यता घेऊन नोंद घ्या,हा शेर आहे. तर काय करावे. कोणती कागदपत्रे लागतील ? नोंद घेण्यास किती कालावधी लागेल ? भूसंपादन अधिकारी दाखल्यासाठी कसा अर्ज करावा ? फी किती भरावी लागेल ?
फेरफार पूर्ण तपशील whatsapp पाठवा
प्रश्नावरून समजून येत नाही
भू संपादन अधिकरी यांची संमतीचे कारण समजून येत नाही
कदाचित इतर हक्कात भू संपादनासाठी प्रस्तावित असा शेरा असेल . व त्या भागातील जमीन खरेदी विक्री वर मनाई असेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

1987 च्या चौकशी नोंदवही वर वारस नोंद झालेली आहे. A व B यांना वारस म्हणून ठरविले. पण त्याच वेळेस आखीव पत्रिकेवर वारस नोंद करताना फक्त A चे नाव नोंदवले गेले B चे नाव नजरचुकीने नोंदवायचे राहिले ही पत्रिकेतील चूक दुरुस्त करावी अशी B ने विनंती केली.पण उप अधिक्षक भुमी अभिलेख यांनी जिल्हा अधीक्षकांकडे वकिलामार्फत अपील करा असे पत्र पाठवले आहे.कुणाचाही विरोध नसताना B ने कोणा विरुद्ध अपील करायची? का करायची? चूक तर सरकारी अधिकाऱ्यांची आहे जी त्यांनी आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी करून दुरुस्त करावी अशी B ने विनंती केल्यावर सुद्धा ऐकत नाहीत. पुढे B ने काय करावे?
आपण उपाधीक्षक यांचेकडे अर्ज केल्यावर , त्यांना पूणर निरीक्षण प्रस्ताव अधीक्षक यांचेकडे पाठवणे आवश्यक .
असोत आपण पूणरनिरीक्षण अर्ज अधीक्षक यांचे कडे करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मी शासकीय कॉलेजमध्ये शिक्षक आहे.माझी संपूर्ण सरकारी नोकरी आहे. माझे वार्षिक उत्पन्न 6 लाख आहे. माझ्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही परंतु वडिलांच्या नावे शेतजमीन आहे ती जमीन वडिलोपार्जित आहे. मला एका गावात वैयक्तिक स्वतःचे नावे शेतजमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला मिळेल का ?
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम २(२) व २(११) नुसार आपले , वडील शेतकरी आहेत व पर्यायाने आपण शेतकरी आहेत . त्यामुळे आपणास हेटकरी दाखल मिळण्यास कोणतीही अडचण नाही . आपण तहसीलदार यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Karan pawar
21-09-2019
Karan975aawq6@yaho.com

विकास आराखडा मध्ये रहिवास झोन दाखविला आहे.परंतु त्या गटात अगोदरच घराचे बांधकाम केले असेल तर ती जागा आता बिनशेती करण्याचे काय पर्याय आहेत.40 पट दंड भरून बिनशेती होईल का ?
आपण जे बांधकाम केले आहे ते ,विनापरवानगी केलेले आहे असे दिसून येते .
आपण बांधकाम नियमानुकूल करून घ्या . आपोआप आपले क्षेत्र NA होऊन जाईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3