जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

सर
आमच्या चुलत काकांची जमीन चुकीने माझ्या वडिलांच्या व एका काकांच्या नावे झाली होती.ही जमीन 2000 दरम्यान त्यांना आजोबांनी विकली होती,माझ्या वडिलांना दोन भाऊ असून ती फक्त माझे वडील व मधल्या काकांच्या नावावर होती,ती जमीन आम्ही परत त्यांच्या नावावर रजिस्ट्री करून दिली आहे,नावावर करते वेळेस वडील व मधल्या काकांनी सह्या केल्या परंतु लाहण्या काकांनी फेरफार वर आक्षेप घेतला आहे ह्या संबंधी मार्गदर्शन करावे ही विनंती.
आजोबांनी जमीन विकली होती . आजोबाना हि जमीन कशी प्राप्त झाली होती ? ती त्यांची स्वकष्टार्जित होती कि वडिलोपार्जित होती ? स्व कष्टार्जित असेल तर , काकांच्या आक्षेपाला काहीही अर्थ नाही . मात्र आजोबांना त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झालीअसेल तर , काकांचा आक्षेप योग्य आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

60 ते 70 वर्षा पासून कुळ हक्कात किव्हा इतर हक्कात असलेली जमीन आहे त्या जमिनीला माझे आजोबा वारस म्हणून आहेत व ती जमीन गेल्या 60 वर्षांपासून आम्हीच करत आहे, असे 5 गट न आहेत तिथे कुळ म्हणून नोंद आहे व सातबर्याला दुसया मालकाचे नाव आहे तर आत्ता त्या जमिनीवर कुळ हकातून नाव काडून मालकाच्या ठिकाणी आपले नाव कसे लावता येईल, त्या जमिनीच्या मालकाचा काही ठाव ठिकाण नाही व वरसाचा पण नाही
कुल म्हणून नाव दाखल असेल तर आपण किंमत निश्चित करण्याचा दावा शेत जमीन न्याधीकरण /तहसीलदार यांचे कडे दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर

माझ्या वडिलांच्या नावे 7/12 वर 1 हे 30 आर जमीन आहे परंतु माझ्या वडिल व वडिलांचे 4 चुलते यानी एकत्र कुटुंब असतानी 6 हे 30 आर जमिन 1961 साली खरेदी घेतली नंतर त्यानी आपसात एकत्र कुटुंबात पारंपरिक पधतिने वाट्प केली नंतर त्याना व्यवारिक आड्चनी येउ नये म्हनुन त्यानी सर्वानी एकत्र 1992 साली तसीलदार यांच्या कड़े वाट्प करुण मिळावे यासाठि अर्ज़ केला व त्या प्रमाने तसीलदार यानी कग्दोपत्रि प्रतेकास समान ( 1 हे 30 आर ) वाट्प केलें व तसा फेरफार पण ज़ाला आहे व सरकारी मोजनी करुन घ्यावी असा आदेश केला व त्या प्रमाने सर्वानी सरकारी मोजनिसाठि अर्ज़ केला, सरकारी मोजनी 1994 साली आली पन मोजनी करतेवेळि काही वाद निर्मान ज़ाले त्या मुळे सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं. नंतर तेव्हपासुन आज पर्यंत सरकारी मोजनी पूर्ण ज़ाली नाहीं व आता सर्वजण सरकारी मोजनी साठी तयार होत नाहीत,
तर आता मि आमची कमी आसलेली 38 आर जमीन मिळवीण्यासाठी कुठे दाद मागावी.
सर, अज्ञान मुलांच्या नावाने जमीन फेर झालेला आहे व परत 8-9 वर्षानी त्या सदर फेर रद्द करण्याबाबत विभागिय अधिकारी साहेब यांच्याकडे प्रकरण गेले तेंव्हापासून आजपर्यंत मुले अज्ञानच आहेत तर सदरील फेरफार रद्द करता येतो का?
अज्ञान मुलांचे नावे जमीन होऊ शकते . फक्त त्यांचे सोबत पालकांचे ( Guardian ) नाव लिहावयाचे असते .आई वडील हे दोघेही हयात नसतील तर , न्यायालय पालक नियुक्त करते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबाचा जमिनीचा गट ०.०१ आर इतक्या क्षेत्राचा आहे.ते क्षेत्र आजोबांनी विक्री केले आहे हा व्यवहार तुकडेजोड व तुकडे बंदी कायद्याविरुद्ध आहे का ? किंवा विक्री केलेल्या व्यवहारास आव्हान देता येईल का?
हा तुकडा केंव्हा निर्माण झाला आहे त्या वर अवलंबून आहे . सदरचा तुकडा तुकडेबंदी कायद्या पूर्वी पासून असेल तर त्यास आव्हान देता येणार नाही . तसेच हा तुकडा रहिवासी/वाणिज्य /औद्योगिक जमीन वापर विभागात असेल तर हि त्यास हवं देता येणार नाही .
या दोनीही परिस्थीशिवाय अन्य असेल तर हवं देता येईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

वाणिज्य कडे वर्ग झालेल्या जमिनीसाठी आकारणी कशी करावी .
सर नमस्कार ,

आमच्या आजोबांच्या नावे रत्नागिरी जिल्ह्या मध्ये जमीन आहे. त्या पैकी काही जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर भोगवटा सदरी जमीन मालकाचे नावे आहेत व आजोबांचे नाव इतर हक्कात "साधे कुळ" असे आहे. सदर जमिनीत वहिवाट आमचीच आहे. इतर हक्कात "साधे कुळ" असणाऱ्या जमिनी मध्ये आम्ही भात शेती करतो, त्या ऐवजी माझे भाऊ सदर जमिनीत नारळाची झाडे लावण्याचा विचार करीत आहेत.

सर, आम्ही त्या जमिनी मध्ये नारळाची झाडे लावल्यास भविष्यात काही अडचण येऊ शकते का?
आणि सदर सात बारा सदरी आम्ही आमची वारस नोंद करू शकतो का ?

कृपया सुचवावे,

धन्यवाद
ज्या जमिनीत आपण कुल आहेत त्या जमिनीची खरेदी आपले लाभात शेत जमीन मुख्याधिकारां यांचे कडे अर्ज करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्ते. सर.
1) भुसंपादन चे पैसे मे.दिवानी वरिष्ठ न्यायालयात आलेले आहे.तर हा निधी जॉईंट अकाउट वर घेण्याचा कायदा आहे का.
2)सिंगल अकौंउटं वर देण्यासाठी रितसर अर्ज दिलाय .तो अर्ज रिजेक्ट केला.त्याच जिल्ह्यातील दुसर्या तालुक्यातील मे.दिवानी न्यायालय सिंगल अकौंउट वर देतात. या साठी माझा
मावेजा सिंगल अकौंउट वर घेण्यासाठी काय करावे.
आपण उपाय सांगावा ही नम्र विनंती.
माझा प्रश्न असा आहे की
माझी जमीन अधिग्रहण केली होती पण 3हे 96आर कँनोल बांधणीसाठी ते काम संपवून खुप वरष झाली आहेत आता मला ती परत माझ्या नावावर करून घ्यायची असेल तर मी काय करावे
जमीन कोणत्या कायद्या खाली संपादन झाली आहे त्यावर अवलंबून आहे . भू संपादन कायदा १८९४ खाली , जमीन संपादन झाली असेल तर , संपादित जमिनीचा वापर , संपादन प्रयोजनासाठी झाला नसेल , तर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावयाचा आहे . जर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता नसेल तर , अश्या जमिनीचा लिलाव करावाच आहे . लिलावामध्ये मूळ मालक सहभागी होऊ शकतो
नवीन कायदा २०१३ अन्वये जमीन संपादित झाली असेल तर , ५ वर्षणानंतर जमिनीचा वापर संपादन प्रयोजनासाठी झाला नाही तर मूळ मालकास जमीन परत करता येते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जमीन कोणत्या कायद्या खाली संपादन झाली आहे त्यावर अवलंबून आहे . भू संपादन कायदा १८९४ खाली , जमीन संपादन झाली असेल तर , संपादित जमिनीचा वापर , संपादन प्रयोजनासाठी झाला नसेल , तर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावयाचा आहे . जर अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता नसेल तर , अश्या जमिनीचा लिलाव करावाच आहे . लिलावामध्ये मूळ मालक सहभागी होऊ शकतो
नवीन कायदा २०१३ अन्वये जमीन संपादित झाली असेल तर , ५ वर्षणानंतर जमिनीचा वापर संपादन प्रयोजनासाठी झाला नाही तर मूळ मालकास जमीन परत करता येते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरनिय साहेब
मि वर्ग ३ चा शासकिय कर्मचारी आहे तरि नॉनक्रीमिलेयर प्रमाणपत्रासाठिचा अर्ज भरताना नोकरि ऐवजी व्यवसाय- शिक्षण असे झाले आहे व सदर अर्ज भरुन १ महिना झाले आहे कृपया मार्गदर्शन मिळावे
आपण दुसरा अर्ज सादर करा . सेतू कर्मचारी तसेच निवासी नायब तहसीलदार यांचे निदर्शनास हि बाब आणून द्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by vaibhav bahekar
17-02-2020
bahekar1994@gmail.com

I am interested to know the current royalty charges in maharashtra state on various material like sand, murum. Etc.
Please send the various links about GR.
You may visit tahsil office and obtain the same. Alternatively you may search Government Resolution prescribing the Royalty rates on various minor minerals in the state of Maharashtra , on Maharashtra Government web site

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by CHANDRAKANT KHUTADE
17-02-2020
khutodec@gmail.com

प्रश्न : नमस्कार सर, माझ्या आजोबांनी 1953 वा त्या अगोदर एक जमीन शेतसारा भरून मिळवली होती. त्यावेळी त्यांना मूल नसल्याने त्यांनी 7/12 ला वारस म्हणून चुळत्याच्या मुलाचे नाव लावले होते पण 1957 ला चुलता वारल्याने त्यांच्या बायकोने व मुलाने गाव कायमस्वरूपी सोडलं. त्या नंतर आजोबांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्य झाली. आमच्या आजोबांचा मृत्यू 2011 साळी झाला त्यानंतर वारस हक्काने 7/12 ला आजी, बाबा आणि आत्या चे नाव लागले आहे तसेच 7/12 ला आजोबांच्या चुलत भावाचे नाव शुध्दा आहे. 1957 ते 2019 पर्यंत आजोबांचा चुलत भाऊ कधी गावाकडे आलाच नाही पण आज घडीला आजोबांच्या चुलत्याच्या मुलाचे वारस येवून आमच्या जमिनीतून अर्धा वाटा मागत आहेत. जी जमीन गेले 50-52 वर्ष आमचे आजोबा व बाबा कसत आले आहेत त्यांनी त्याचे पूर्ण आयुष्य या जमिनीमध्ये घालवले आहे. आज त्या जमिनीचा हिस्सा मागताहेत. 1) कायदेशीर रित्या हे योग्य आहे का? 2) जर कायदेशीर योग्य असेल तर आम्हाला त्याच्या विरोधात काही कारवाई करता येवू शकते का? 3) आणि जर योग्य नसेल तर त्यांचे नाव 7/12 वरून कमी करू शकतो का? कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे.
शेत सारा भरून जमीन मिळवली म्हणजे - आजोबांचीच जमीन किंवा त्यांना त्यांचे वारसा हक्काने प्राप्त झालेली असा आहे .
आजोबा हयात असताना , वारस म्हणून पुतण्याच्या मुलाचे नाव वारस लावले ? व्याव्क्ती हयात असताना , वारसांची नावे लागू शकत नाहीत .
आपले प्रश्नावरून खालील वस्तुस्थिती असणे संभव आहे
आजोबांना जमीन त्यांचे वडिलांकडून प्राप्त झाली आहे . शेत सारा न भरल्याने , शासनाने जमीन जप्त केली . थकीत शेतसारा रक्कम आजोबांनी रक्कम जमा केली व परत प्राप्त करून घेतली .
आजोबांना जसे आपले वडील वारस आहेत तसेच आपले चुलते हि वारस आहेत . त्यामुळे चुकत्याच्या मुलाचा मिळकतीत हक्क आहे . त्याची मागणी योग्य आहे . त्याचे नाव कमी करता येणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर, माझा प्रश्न महार वतन जमिनीशी संबंधित आहे. भोगवटादार वर्ग २
आमच्या जमिनीचे ३/९/१९७६ ३७४ रु एका हफ्त्यात भरायचे होते ते मराठा समाजातील एका व्यक्तीने भरले व ३२ ओ प्रमाणे आपल्या बायकोचे नाव कब्जेदार म्हणून ७/१२ वर लावले व हफ्ते फिटे पर्यंत मूळ मालकाचे नाव इतर हक्कात दाखल केले .
१/२/१९७६ ला जमिनीची खरेदी किंमत संपूर्ण भरली व ३२ एम प्रमाणे मूळ मालकाचे नाव कमी केले.
५/९/१९७६ ला बँक ऑफ महाराष्ट्र व १७ /१/१९७७ भूविकास बँक कडून कर्ज घेतले. ताबे गहाण सोडवणार अशी नोंद ७/१२ वर आहे (मुदत १० वर्ष ). त्यांनी कर्ज घेऊन बोजा दाखल करून ठेवला आहे. २००४ साला पासून ७/१२ व ८ अ हा दि महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह लॅन्ड डेव्हलोपमेंट बँक च्या नावावर झाला आहे.सध्या स्तिथीत चौकशी केल्यावर कळले भूविकास बँक बंद झाली आहे .जमीन पडीक आहे.आमच्या कडे जमीन विकल्याचा कोणताही पुरावा नाही. माझे वडील त्यावेळी लहान असल्याने त्यांना पुरेशी माहिती नाही.मी सर्व जुने फेरफार व ७/१२ काढले आहेत(१९४७ ते १९७३ पर्यंत आजोबांचे नाव आहे).
मला जमीन परत मिळू शकेल का ?
मला कुठे दाद मागावी लागेल ?
कोणता मार्ग आहे ?
आपण मार्गदर्शन करावे
आपण उपरोक्त जमिनीस कुल होता का ?
कर्ज कोणी घेतले ? आपण कि त्या व्यक्तीने
कर्जाची परत फेड झाली का ?
जमीन स बँकेचे नाव केंव्हा लागले ? त्याचा फेरफार आहे का ?
सर्व बाबींचे फेरफार पहा . विस्ताराने प्रश्न मांडा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर माझे पणजोबांना दोन मुले होते.त्यातील 2 नंबरचे हे माझे आजोबा आहेत तर माझे आजोबा हे 1952 मध्ये कामासाठी मधप्रदेश मध्ये सरकारी(ministry of defence) नोकरीत रुजू झाले व 1984 ला तेथेेच रिटायर्ड झाले. व माझे आजोबा डिफेन्स मध्ये नोकरी वर असताना.1952 साली आजोबांचे मोठे बंधू(ऐकूम्या) आणि आजोबां चा चुलत भाऊ यांच्यात satara court त वाटपाचा स्पे.अ. न. ने दावा होऊन court ने माझे आजोबाना 4आने व आजोबांचे मोठे बंधू(ऐकूम्या )4आनेआणि चुलतभाऊ याना 8आणे प्रमाणे वाटप केली.पुढे जाऊन त्या वडिलोपार्जित मिळकतीत कुळा ने 32 ग करून आजोबांचे मोठे बंधू व चुलतभाऊ यांना नोटीस देऊन कुळाने खरेदी केल्या. त्या वेळी माझे आजोबा मध्यप्रदेश येथे डिफेन्स मध्ये रुजू होते .आणि कुळा ने माझे आजोबा व त्यांचे वारसास32ग करताना आज पर्यंत कुठल्याही नोटीस नाहीत .पण वाटपाने 1952 लाच कोर्टात आम्ही 4आणे प्रमाणे आम्ही मालक असताना कुळाने आमचा पण हिस्सा 32ग ने घेतला आहे. नंतर माझे वडील सुद्धा 1982 (ministry of defence)मध्ये रुजू झाले व 2007 ला रिटायर्ड झाले त्या मुळे आमच्या दोन पिढ्या ह्या सरकार च्या सेवेत गेले. गावाकडे आमची वडिलोपार्जित जमीन कुळाला गेल्याने. आज ही आमच्या 3 पिढया भूमिहीन आहोत व आम्हाला उदर निर्वाह चे कोणतेही साधन नाही.आज आम्ही मोलमजुरी करून पोटाची खळगी भरत आहोत .तर आम्हाला सरकार कडून पुनर्वसन होहिलं का व आम्हाला आमची वडिलोपार्जित शेत जमीन मिळेल का
टीप:-1)जेव्हा 32 ग झाले तेव्हा आम्हाला कोणतीही नोटीस बजावली नाही.
2) कोर्टात वाटपाने जो हिस्सा आम्हाला धीला पण पुढे 7/12सदरी आजोबा चे मोठे बंधू व चुलतभाऊ यांच्याच नावाची नोंद केली आमचे आजोबा चे नावाची कोठेही नोंद नाही .
३२ ग किंमत निश्चित झाली तो आदेश अहवानीत करणे आवश्यक होते . आता कालावधी खूप झाला आहे . त्यामुळे अपील दाखल करण्यास झालेला विलंब प्रांत अधिकारी यांनी मान्य केला तर आपले अपील दाखल होऊ शकते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by NILESH GAVIT
16-02-2020
nileshg592@gmail.com

सर मी निलेश गावित आहे माझा प्रश्न असा आहे की .
माझ्या पणजोबा चे आजोबांचे नाव मोजाजी होते .त्यांना 6 मुले होते .पणजोबा चे वडील क्रमांक 3 चे वरील 6 पैकी 5 मुलांचा वाट्याला जमीन वाटली गेली पण . क्रमांक 3 चा मुलाचा जमीन दिली नाही ..मी क्रमांक 3 चा पिढीत जन्माला आलो .पणजोबा ,आजोबा यांनी पाठपुरावा केला असता .वरील वारसदारांनी मारझोड करून पळवून लावले .ते बजुचाचा गावात जाऊन वास्तव्य करू लागले . पण आता ,पणजोबा चे आजोबा, पणजोबा., आजोबा हे सर्व आता मयत आहे ,माझ्या पापा नीही प्रयत्न केला असता आजोबा वरले तेव्हा ते 10 वी ला होते .म्हणून राहून गेले प्रयत्न करायचे .पण आता मी मागील 50 वर्षाचे फेरफार काढले असता .क्रमांक 3 चा मुलाचे नाव कुठेच दिसून आले नाही.पुरावा म्हणून आता काय करता येईल .की मग मी या पिढीत जन्म घेतला नाग. म्हणून शांत बसू .. मला मार्गदर्शन करावे सर
माननीय महोदय,
सप्रेम नमस्कार,
मला सात बाराच्या उताऱ्यामध्ये खासरा नंबर कुठे असतो,त्याबद्दल माहिती हवी आहे.
सर माझी जवळा शिवारात शेत जमीन असून मला दुधना नदी पत्रातून पाणी घेण्यासाठी वीहिर किंवा खडा घेण्यासाठी
दुसरा शेतकरी अडवणूक करत आहे नदी मध्ये माझी जमीन आहे किंवा ताबा सांगतो तर मी काय करायला पाहिजे?
जेथे विहित आपणास खोदायची आहे ती जागा आपले मालकीची आहे का ? आपले मालकीची जागा असेल तर आपण विहीर आपण महाराष्ट्र भू जल ( विकास व व्यवस्थापन ) कायदा २००९ च्या अधीन खोदु शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महोदय मी स्वतंत्र प्लाट खरेदी केला आहे मला अगोदर स्वतंत्र नावाचा 7/12 उतारा मिळत होता आता ई-उतारा तो पण आता 8 लोकांचा सामाईक उतारा मिळतो तहसीलदार साहेब यांना दोन वेळेस अर्ज दिला तरी न्याय मिळाला नाही

Question by सागर
15-02-2020
sagarkandekar1990@gmail.com

महोदय ,
Power of Attorney Act , 1882 नुसार 100 रु.पेक्षा जास्त मालमत्ताचे कुलमुखतीयार पत्र हे नोंदणीकृत असले पाहिजे पण त्रयस्थ व्यक्तीने जमीन हि जर नॉटरी कुलमुखतीयर खोट्या साह्य करून व नंतर त्याच नॉटरी कुलमुखतीयरच्या आधारे रजिस्टर खरेदी खत्ताने परस्पर विकली असेल तर Specific relief act खाली दावा टाकून खरेदी Null and Void करून मिळेल का?
किंवा आम्ही आमचा जमीन मोबदला व्याजा सकट मिळवू शकतो का?
आदरणीय मोहदय,

सरकारने जाहीर केलेली कर्ज माफी हि गाव स्तरीय पत संस्था व विकास सोसायटी यांच्या मार्फत घेतलेले कर्ज हे माफ होण्यास लागू होते काय?

कर्जाची रक्कम व त्या बरोबर असणारे पत संस्थेचे प्रतिनिधी यांचे नाव ७/१२ (इत्तर अधिकार) वरून कमी होईल का?

७/१२ वरील इत्तर अधिकारातील पत संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांचे नाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती.

आपला कृपाभिलाषि,
रोहिदास काळे


Question by Subodh Yadre
14-02-2020
yadre86@gmail.com

महोदय,

मी सुबोध यद्रे, राजापूर, रत्नागिरी, माझ्या आजोबांचे वडिलोपार्जित जमीन आहे, त्यांना २ मुलगे आणि १ मुलगी हयात आहेत. आजोबांचा मृत्यू झाल्यानंर वारस तपासात माझ्या मोठया चुलत्याने ज्या जमिनी फक्त आजोबांच्या नावे होत्या त्यांच खाते वेगळे करून ते स्वतःच्या नावे केले आहे, आणि इतर सामायिक जमिनी आहेत त्याच्या सातबाऱ्यात सगळ्या भावंडांची नावे लावली आहेत, परंतु त्यांच्या नावे ज्या जमिनी आहेत त्या सुद्धा सगळ्याच्याच आहेत तर या वर कायदेशीर काय करता येईल कृपया मार्गदर्शन करावे.
आपण ज्या फेरफाराने आजोबांच्या जमिनी चुलत्याच्या नावे झाले आहेत तो फेरफार अहवाणीत करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Subodh Yadre
14-02-2020
yadre86@gmail.com

महोदय,

मी सुबोध यद्रे, राजापूर, रत्नागिरी, माझ्या आजोबांचे वडिलोपार्जित घर आहे, आजोबांचा मृत्यू झाला आहे, त्यांना २ मुलगे आणि १ मुलगी हयात आहेत. त्याचप्रमाणे मोठा मुलगा म्हणून माझ्या मोठ्या चुलत्याचा नावावर ते घर झाले आहे, म्हणून आम्हाला ते माझ्या वडिलांच्याहि नावे करायचे आहे, म्हणजेच घरपट्टी मध्ये अ आणि ब करायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत मध्ये संमती पत्र मागितले आहे, परंतु चुलता ते द्यायला तयार होत नाही आहे ( सही करायला येत नाही आहे ). तर यावर कायदेशीर काही उपाय करता येईल का, याचे मला मार्गदर्श्न करावे हि विनंती.
माझ्या आत्याला घरात हिस्सा नको आहे तसेच सदर जमीन हि तिघांच्या नावर आहे.
आजोबांचे मृत्य नंतर केवळ आपल्या वडिलांचे भावाचे नाव दाखल करण्यात आले आहे . आपले वडील वारस असून हि त्यांचे नाव घराला लावले नाही . ग्राम सेवक यांनी चुलत्यांना नोटीस काढणे आवश्यक आहे . चुलते यांनी त्यावर जरी संमती दिली नाही तरी , ग्राम पंचायतीने , आपले वडील वारस असल्याचे पुरावे पाहून आपले वडिलांचे नाव दाखल करणे आवश्यक .
सदरची बाब गट विकास अधिकारी यांचे निदर्शनास आणून दया

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सुशील
13-02-2020
sushilk22@gmail.com

नमस्कार सर माझे आजोबाचे ८ मुले होती व त्यांना दोन ठिकाणी जागा होत्या त्यांतील एक राहते घर व दुसरी संपूर्ण मोकळी जागा होती मोकळ्या जागेपैकी माझ्या आजोबांनी माझ्या वडिलाच्या नांवावर ग्रामपंचायत कार्यालयात त्यातील काही जागा नमुना न ८ ला करून दिली व त्यानुसार माझ्या वडिलांनी रीतसर बांधकाम परवाना काढून 30 वर्षापूर्वी घर बांधले आहे व आम्ही त्याची घर पट्टी भरत असून आमची मालकी आहे अडचण अशी आहे कि आता आजोबा नाहीत आणि pr कार्ड काढले असता त्यावर अजून आजोबांचे नाव आहे तर मी माझे तेवढे क्षेत्रापुरते pr कार्ड ला कश्या प्रकारे लावू शकतो आणि आता बाकीच्या काकांनी विरोध केला तर मी कोर्टात adverse possesion चा दावा कसा दाखल करू शकतो किंवा आणखी काही मार्ग असल्यास सुचवणे
दावा दाखल करू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रादेशिक योजना मंजूर असलेल्या नगरपंचायत क्षेत्रात 1.5 गुंठे क्षेत्राची खरेदी होवु शकते का ? तुकडेबंदी अधिनियम लागू शकतो का?
नवीन कायदा दुरुस्ती नुसार ज्या ठिकाणी प्रादेशिक योजना मंजूर व प्रसिद्ध झालेली आहे त्या ठिकाणी तुकेबंदी कायदा लागू नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार साहेब मी भगवान तबाजी शिंदे माझी आव्हाट ता राजगुनगर खेड पुणे येथे माझी वडिलपार्जित जमीन आहे त्या मध्ये माझी महार वतनाची जमीन आहे त्या जागेवर आधीच केंद्र दवाखाना बांधला होता व आता त्या जागेच्या बाजूला आणखी वॉल कंपाउंड चा बांधकाम करत आहे पण मी व माझा वडीलनी असा कोणताच बक्षीस पात्र बनवून दिला नाही ग्रामपंचात मध्ये व ग्रामसेविका सोबत मी विचारणा केली असता कोणताही पत्र मिळालं नाही हि जमीन मला कशी परत मिळेल व योग्य मोबदला कसा मिळेल कृपया करून मार्गदर्शन करावे
सदरची जमीन आपले मालकीची आहे का ? जर आपल्याला जमीन ती वतन जमीन म्हणून दिलेली असेल तर , प्रथम ज्या विभागाने त्या जागेवर दवाखाना बांधला आहे त्यांना वकील मार्फत नोटीस द्या व जमीन वापराबाबत नुकसान भरपाई मागा . तीच प्रक्रिया हॉल ज्या विभागाने बांधला आहे त्या विभागास हि नोटीस द्या . संबंधित विभाग प्रमुख यांना भेटा
नोटीस ला जर काही प्रतिसाद मिळाला नाही तर आपणास न्यायालयात जावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.47 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3