जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

नमस्कार सर,
(1) सर माझा कडे प्रकल्पाचे प्रमाणातआहे आता सध्या ते प्रमाणात माझा नावाने आहे त्यामध्ये माझे पूर्ण नाव आहे ते आगोदर आजोबाचा नावी होता पण त्यामध्ये आजोबाचे आडनाव दिलेले नाही (ते सण 1975 आहे )जर सरकारी नेकर भारतीची निवड झाल्यावर नियुक्ती वेळेस (पडताळनी वेळेस )त्या प्रमाणात बद्दल काही अडचण येईल का? जर ती दुरुस्त करायची असलास त्याची पध्दत काय आहे ? (2) आणि त्या प्रमाणातमध्ये सण (जुना तालुका होता)1975 चा वेळेसचा सर्वे नंबर वेगळा आहे आणि (नवीन तालुका)आताचा 7/12 मध्ये सध्या सण 2020 चा वेगळा आहे त्या बद्दल काही अडचण येईल का ? आणि त्या 7/12मध्ये आजोबाचे पूर्ण नाव आहे. या दोन प्रशना बदल माहिती मिळवी आशी नम्र विनांती.

Question by Amol
15-06-2020
amol.mote0@gmail.com

सर माझे नावे 10:25 गुंठे जमीन आहे .पण माझे घर शेजारील दुसऱ्या मालकीच्या गटात जात आहे त्या मालकाची 12 गुंठे जमीन आहे तरी मी त्या मालकाच्या संमतीने पाच गुंठे त्याला जमीन देऊन पाच गुंठे मी त्याच्याकडून जमीन खरेदी (दस्त) करू शकतो का?

Question by सागर
15-06-2020

उमाकांत , मनोज व महेश हे तीन सख्खे भाऊ आहेत.ह्या तीन भावांमध्ये शेखर उमाकांत हा सर्वात मोठा भाऊ असून प्रमोद सर्वात लहान आहे.ह्या तीन भावांचा एक चुलत भाऊ ज्याचे नाव अनिल आहे.उमाकांत , मनोज , प्रमोद व अनिल यांची सामाईक 80 गुंठे वडिलोपार्जित नविन अविभाज्य शर्त, भोगवटदार वर्ग 2 ची जमीन आहे.ह्या सर्वांचे वाटप पत्र झाले नाहीत.अत्ता ह्या मध्ये अनिल ही आपल्या हिस्साची अर्धी म्हणजे 40 गुंठे जमीन विकू इच्छितो व तसेच त्यांनी एक तिसऱ्या इतर व्यक्ती बरोबर साठे खत केले आहे , हे जेव्हा मनोज ला समजले तेव्हा त्यांनी अनील ला नोटिस पाठवली व त्याचा हिस्सा मी खरेदी करू इच्छितो असे सांगितले पण 3 महिने होऊनही त्याला अनिल कुठला प्रतिसाद नाही आला..
१.तर समाईक जमीन घेण्याचा मनोज यांचा अग्र हक्क आहे का?
२.उमाकांत , मनोज व महेश यांपैकी कोणाला सर्वांत आधी अनिल यांचा हिस्सा विकत घेण्याचा अग्र हक्क आहे?
३.अग्रा हक्काने जमीन विकत घेताना जमिनी ची कुठली किंमत ग्राह्य धरली जाते? शासकीय किंमतचा मोबदला देऊन खरेदी होईल का?
प्रश्न : सर मला मामलेदार कोर्ट अधिनियम १९०५(५) अंतर्गत मामलेदार यांनी दिलेल्या निकालाविरोधात अपील करावयाचे आहे तर ते कोनकाकडे व कोणत्या पद्धतीत करावे.(सद्या अर्जावर की वकीलांतर्फे)
माझ्या आईने नातवांच्या नावाने मृत्यु पत्राने जमीन दिली आहे ते मृत्यु पत्र नोंदणी कृत नाही त्याचा फेरफार तलाठी यांनी तयार केला होता. सदरची नोंद मंडळ अधिकारी यांनी फेटाळली आहे. सदरचे मृत्यू पत्र नोंदणीकृत नाही म्हणून नोंद नामंजूर केली आहे. मंडल अधिकारी मृत्य पत्र प्रोबेट करून आणण्यास सांगतात. तलाठी यांचेकडे कोणतीही हरकत नसलेबाबत बहीनीचे जबाब घेतले आहेत. तरी याबाबत काय करावे.
नमस्ते,
माझ्या पंजोबांच्या नावे असलेली जमीन पंजोबा वारल्यानंतर माझ्या चुलत आजोबांनी माझ्या आजोबांची खोटी सही करुन चुलत आत्याच्या नावे बक्षीसपत्र करुन घेतली त्यास आता 40 वर्ष झाली आहेत ती जमीन आपल्याला हवी असल्यास काय करता येईल?
सर मला मामलेदार कोर्ट अधिनियम १९०५(५) अंतर्गत मामलेदार यांनी दिलेल्या निकालाविरोधात अपील करावयाचे आहे तर ते कोनकाकडे व कोणत्या पद्धतीत करावे.(सद्या अर्जावर की वकीलांतर्फे)
आदरणीय सर, माझा प्रश्न असा आहे की,माझ्या जमिनीमध्ये पूर्वी जंगल वहिवाट द्वारे काही इसमांची नावे दाखल झाली होती त्यांनी ती जमीन लगेच दुसऱ्या व्यक्तीला विकली त्यांची व त्या जागेवर सद्या स्थितीला आमची व त्यांची वहिवाट आहे तरी त्यांची नावे कमी कार्यासाठी काय करावे.
घराचे नविन बांधकाम करताना एक समाईक भिंत पडली तर ती कोणी बांधून द्यायचे
गावातील गावठाण मध्ये आमचे घर होते सद्यस्थितीला हे घर पूर्वी काढलेले असून आज रोजी ती जागा मोकळी आहे .परंतु ग्रामपंचायत स्थापन १९५८ झाल्यापासून ते १९९३ पर्यंत ग्रामपंचायत नमुना नंबर ८ (८/अ)मध्ये घराची नोंद आढळते आणि ग्रामपंचायत कर भरलेल्या पावत्या देखील आहेत ग्रामपंचायत सदर आज रोजी चौकशी केली असता या मिळकतीची व मोकळ्या जागेची नोंद नाही व ग्रामसेवक साहेबांना विचारले असता ग्रामसेवक म्हणतात की सदर जागा ग्रामपंचायतीने वर्ग करून १९९३ मध्ये घेतली असावी सद्यस्थितीला गावाचा भु सव्हेक्षण (सिटी सर्व्हे)झाला नाही जागा गावठाणातील आहे व आमच्याकडे या जागेचे ग्रामपंचायत स्थापन होण्यापूर्वीचे १९४२ सालाचे खरेदीखत आहे तरी वरील विषयास अनुसरून आमचे प्रश्न असे बागेत कि,
प्रश्न १ ग्रामपंचायत मधील नमुना नं. ८(८/अ) बाद अथवा मयत करता येतो का ?व करता येत असल्यास कोणत्या कलमानुसार येतो?
पश्न २ ग्रामपंचायत कर भरला नसेन अथवा थकीत असेल तर ग्रामपंचायत आणि ग्रामसभा(ग्रामसभेचा ठराव) नमुना नं ८(८/अ) रद्द अथवा मयत करू शकतो का?
प्रश्न ३ ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्डला नमुना नं ८(८/अ) ला आज रोजी या जागेची परत नोंद करता येईल का? व ती कशी करता येईल याचे योग्य मार्गदर्शन व्हावे हीच आपणांस विनंती.

Question by Vijay bendke
08-06-2020
vijaybendke@gmail.com

Sir, aamchya jaminicha mahaul na bharlyane ti varg 2 madhe geli aahe tar aamhi ti parart Kashi milavu shakti. Konala bhetave lagel .kinva process Kay asel please sanga

Question by Vijay bendke
08-06-2020
vijaybendke@gmail.com

Sir, mazya vadilanchya naavavar 2 acre jaga aahe pan ti duaryanchya tabyat aahe ticha taaba kasa milavu shakto. Mojani aanlyavar te objection gheu ahaktat tar Kay karu shakto.
सर माझ्या आई ने 27-2-2001-रोजी दुय्यम निबंधक कार्यालय माजलगाव जि बीड येथे खरेदि खत दस्त करून प्लॉट घेऊन घर बांधले . त्याची नोंद ग्रामपंचायत कडे केली. 7-12 नोंद घेण्यासाठी तलाठी सिरसळा कडे अर्ज केला असता जूने दस्त आहे म्हणून नकार देत आहेत.नोंदी साठी मार्गदर्शन करावे.
माझ्या आईची आई श्रीमती विमल प्रभाकर मिसाळ या विधवा असून त्याच्या एकुलत्या एक मुलाचाही मृत्यु झाला आहे. त्यांच्याकडे अर्धा एकर जमीन असून त्यातील चार गुंठे क्षेत्र घर व गोठा यासाठी गेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जेमतेम 16 गुंठे जमीन कसण्यासाठी राहिली आहे. त्यातही 2003 साली ग्रामपंचायत वरकुटे खुर्द यांनी दलितवस्ती पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणली व आजीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांनी आजीची परवानगी न घेता व कोणतेही जागेचे बक्षीसपत्र करून न घेता आजीच्या जागेत बोर घेतला व 10 बाय 10 फुटांची खोली बांधली. आजीच्या सातबारा उतार्यावर या खोलीची व बोरची कसलीही नोंद केलेली नाही व ग्रामपंचायत कडे जागेचे कसलेही बक्षीसपत्र उपलब्ध नाही. आजीच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतीने आजीच्या जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनही ते अतिक्रमण हटवायला तयार नाहीत. उलट आमच्यावरच दमदाटी करून खोट्या पोलिस केस करत आहेत. यासाठी मला पोलिसांनी पकडून नेले होते. आमच्यावर अन्याय होत आहे कृपया यावर उपाय सुचवा.
सर 1250स्के.फु चा प्लाट बिगर एन ए नगर परीषद एरीयात आहे मला बांधकाम करायचे आहे.तरी होम लोन करणे साठी प्लाट एन ए लागतो मला तहसील एन ए करण्यासाठी किती फी व वेळ लागेल.हे सांगा हि विनंती आहे कारण की एजंट लोक खुप पैसे सांगतात. याची प्रोसेजर कशी आहे ते सांगा प्लिज
मी शेखर पवार बोलत आहे.माझा प्रश्न असा आहे की माझे वडिल धरून 3 चुलते आहेत.आमची 2 गावामध्ये जमिनी आहेत.आम्ही रजिस्टर ऑफिस मधून वाटपपञानुसार खातेवाटप करून ज्याची त्याला जमिन दिलेली आहे.त्यामधील 2 चुलत्यांची जमिन वाघाळे गावात असून त्यांना दिलेल्या जमिनीची नोंद सुद्धा झालेली आहे.पण आता आमच्या नोंदीस अडचण आणत आहेत.तलाठी साहेबांनी दिलेली हक्कसोड नोटीस वर सह्या करत नाही. आम्हाला अडथळा आणत आहेत.हक्कसोड सुद्धा झालेल आहे रजिस्टर ऑफिस मधून... तर आता आमच्या नोंदीचा प्रश्न कसा सुटेल..कळावे..

नमस्कार सर ,grampanchat हद्दी फ्लॅट घेतला आहे.. शेती ना विकास झोने मधे.... मुळशी तालुका मधे..दस्त नोंदणी होऊ शकते का? विसार पावती केली तर चालेल का? कृपया मार्गद्शन करावे...
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे की माझ्या पणजोबांनी 1935 स*** वीस रुपये घेऊन मुदत दहा वर्षे खरेदी खत आठ आणे स्टॅम्प पेपरवर करून दिले होते सदर जमीन खरेदी घेणाऱ्यांच्या ताब्यात असून सातबारा आमच्या नावे आहे व ती जमीन आम्ही 2020 आली विकली ते मुदत खरेदी खत आज आमच्या निदर्शनास आले त्या खरेदी खता विषयी आम्हास काही माहिती नव्हती आम्ही ज्याला खरेदीखत करून दिले त्यांना काही अडचण येईल का कृपया मार्गदर्शन करावे

Question by dada bhau
31-05-2020
dadabhau123@gmail.com

सर शेतात जाण्यासाठी पूर्वापार असणारे शेत रस्ते , फरसबंदी , बैलगाडी रस्ता , पाऊलवाट यांचा उल्लेख असणारे सरकारी भूमी अभिलेख नकाशे कोणकोणते आहेत?
नमस्कार सर मि ५ गुंठे जमिन खरेदी केली आहे आणि सर्व जमिन ९ गुंठे आहे त्यात ३ भाऊ चि आनेवारी आहे ते जमिनीवर ताबा देत नाहीत ७/१२, फेरफार नोंद केली आहे दिलेल्या मालकाने चतुरसिमा दस्ता मध्ये दाखल केली आहे काय करावे

Question by Parth Patil
30-05-2020
parthppatil2222@gmail.com

सर,
14 गुंठे जिरायत शेत जमिनीच्या गटापैकी 10.5 गुंठे जिरायत शेत जमिन 2012 ला खरेदी केली आहे. त्याचा आजपर्यंत 7/12 वर फेरफार झालेला नाही. आता फेरफार करण्यासाठी काय करावे लागेल.

Question by Sumeet bhati
29-05-2020
Sumeetbhatia88@gmail.com

जमिनीची भाऊ हिस्से ची जमीन,ती जमीन वाडिलोपार्जित नसून एकत्र अस्ते वेळेस घेतलेली जमीन माझ्या वडिलांच्या नावाने होती,पण ती जमीन चा हिस्सा दूसर्या भावाच्या हिस्सायाला गेली आहे..! माझ्या वडिल आता ह्यायात नाहीत,ती जमीन आता आमच्या भाऊ बहीन च्या नावावर सामाईक झाली आहे ,ती जमीन चूलत्याच्या नावावर करायची आहे,त्यासाठी काय पर्याय उपलब्द आहेत आमच्याकडे. त्याची Registry करुण दया महण्त आहेत,ते योग्य असेल का .? व आजोबांना 5 एकर वेगळी काढली आहे, त्यात आम्हाला पून्हा हिस्सा मिळेल की नाही ? 6 मूल आहेत आजोबांना. Plz help sir.
नमस्कार सर
माझे वडील १९९६ व्या वर्षी वारले असता आम्ही आमच्या घरात मी माझी आई आणि आजोबा राहत होतो २०११ व्यां वर्षी माझे आजोबा वारल्यामुळे माझ्या काकांनी नकळत माझ्या 3 आत्या व स्वतचे नाव घरपट्टी वर चढवले.माझे काका आता मे २०२० ला वारले.काका वारल्या मुळे माझ्या 3आत्या व काकी मिळून माझ्यावर केस करून दबाव टाकत आहेत.घराची वाटणी करायला सांगत आहेत.पण माझ्याकडे हे राहत घर एवढं एकच आसरा आहे. घराची वाटणी होऊ न देता घरपट्टी वरील नावे रीतसर कशी कमी करता येईल.किवा ह्यावर अजून काही उपाय असल्यास आपण मला मार्गदर्शन करावे.
सर आमची शेतजमिनी (वडिलोपार्जित)मोठ्या काकांच्या नावी आहे. या जमिनीला माझे वडील आणि दोन काका व एक आत्या वारस आहे .जर भविष्यात काकांनी व इतर वारसांनी जमीन विक्री काढली. त्यास आमच्या वडिलांची सहमती देखील असेल पण जमीन वडिलोपार्जित असल्यामुळे आमची सहमती पण लागू शकते का? आमची विचारणा होईल का?
सर, माझ्या आजोबांनी 40 वर्षा आधी चुलत भावाच्या जमिनीवर घर बांधले होते.... संबंधित घराची घरपट्टी आजोबांच्या नावे होती... त्या नंतर ती माझ्या वडिलांच्या नावे झाली... मला आता त्या घरावर एक मजला बांधायचा आहे पण चुलत्यांच्या मुलांनी त्यावर हरकत घेतली आहे.... की तुम्ही नाही बंधू शकत जागा आमच्या नावावर आहे... तर मी काय करावे....

This page was generated in 0.36 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3