जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by सतीश दगडू वाघ
02-06-2023
wagh.satish87@gmail.com
आमची 2.64 हे.वडिलोपार्जित जमीन माझे बाबा व काका यांच्यामध्ये 1/2प्रमाणात वाटून घेण्यासाठी आम्ही 22.07.2022 नायब तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता त्यासंबंधी सर्व कागदपत्रे दाखल केली होती परंतु अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळकाढू धोरणामुळे आज दिनांक 02.06.2023 पर्यंत कार्यवाही पूर्ण केली नाही तर या संदर्भात काही नियम व वेळेची मर्यादा किती असायला पाहिजे त्या संबंधी लिखित स्वरूपात काही कायदा असेल तर त्या संबंधी मला माझ्या email वर माहिती द्यावी
जमिनीचे संमतीने वाटप या साठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ८५ च्या तरतुदी लागू आहेत . या कलमानुसार , सह धारकांना ३० दिवसापेक्षा कमी नाही मात्र ६० दिवसा पर्यंतची नोटीस देण्याची तरतूद आहे . नोटीस दिल्यानन्तर , साधारणपणे , सुनावणीस मुदत वाढ दिली नसेल तर , वाटप पत्र आदेश काढण्यासाठी , १५ दिवसाचा कालावधी आवश्यक . साधारणपणे ३ महिन्याच्या कालावधीत प्रकरणावर निर्णय होणे आवश्यक आहे . या शिवाय आपण जमिनीचे कलम ८५ खालील जम्वानीचे संमतीने वाटप हि सेवा , सेवा हमी कायद्या अंतर्गत , अधिसूचित केली आहे का व त्यासाठी किती कालावधी , अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे ? याची पडताळणी करा . जरा जमीन वाटप हे सेवा अधिसूचित असेल तर , निर्धारित वेळेत निर्णय दिला नाही / सेवा दिली नाही म्हणून अपील दाखल करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Yogesh Nimodiya
02-06-2023
silverrice17@gmail.com
वडिलोपार्जित वारस हक्काने प्राप्त आदिवासी जमिनीतून हक्क सोड पत्र करण्यास मा,जिल्हाधिकारी यांची परवानगी ची आवश्यकता आहे काय।
वारसा हक्काने प्राप्त झालेली जमीन आदिवासी व्यक्तीला कोणत्याही मार्गाने हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी व शासनाची संमती आवश्यकता आहे . मात्र आपणास अश्या जमिनीतील हक्क सोडून द्यायचा असेल तर परवानगीची आवश्यकता नसावी . मात्र याबाबत हक्क सोड पत्र करण्या पूर्वी सबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मत घ्यावे कारण ते आपली नोंद मंजूर करणार आहेत ./ निर्णय घेणार आहेत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaunain Sahil Shaikh
02-06-2023
kaunainshaikh2780@gmail.com
Navin avibhajya shart bhogwatdar warg 2 chi shet jamin bakshis patra karta yete kaay?
Question by पवन
01-06-2023
4974273@gmail.com
माझी अहमदनगर मध्ये शेती आहे. परंतु मी पुण्यात स्थायिक झालो आहे. कामाच्या व्यापा मुळे माला गावी जाणे शक्य होत नाही. माझ्या शेतजमिनीच्या विकसणा साठी अथवा इतर कामा साठी मी पुण्यात कुलमुखत्यार पत्र नोंदवू शकतो का?
Question by Prakash
31-05-2023
ppawar2952@gmail.com
आमची वडिलार्जीत 9 एकर शेती असून त्यांचे माझे वडिल व 2 चुलते यांचा समान हिस्सा आहे व 7/12 सदरी समान हिश्शाने नोंद असून वहिवाटही आहे. माझे वडिल व चुलतेही हयात नाहीत आता आम्हा वारसांची 7/12 सदरी नोंद आहे व पुर्वापार जशी वहिवाट आहे तशीच अजून चालू आहे. आमचे अजून वाटणीपत्र झालेले नाही. आता आम्हाला वाटणी पत्र करायचे आहे. परंतू माझ्या धाकट्य़ा चुलत्याच्या हिश्शाच्या 3 एकर जमीनीबाबत चुलत भावाचा व त्याच्या बहिणींचा वाद असून सध्या दिवाणी न्यायालयात दावा चालू आहे. या परिस्थितीमधे आम्हाला वाटणीपत्रासाठी न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही का? कृपया मार्गदर्शन करावे.
जे एकूण क्षेत्र आपल्या आजोबांच्या नावे होते ते निम्मे निम्मे क्षेत्र आपले वडील व आपले चुलते यांच्या नावावर होणे क्रमप्राप्त आहे. चुलत्याच्या मुलांमध्ये त्यांचे हिश्याबाबत वाद चालू असल्यामुळे दिवाणी न्यायालयात जरी दावा चालू असला तरी आपण त्या दोघांशी संवाद साधून व सल्लामसलत करून आपल्या वडिलांचे क्षेत्र व त्यांच्या वडिलांचे क्षेत्र यामध्ये वाटप करून घेण्याबाबत काही मार्ग निघतोय का याचा विचार करा. जर ते तयार होत नसतील तर आपणाला न्यायालयामध्ये जाऊन आपले क्षेत्र हिस्सा निश्चित करून त्याप्रमाणे ताबा मागण्याचा/ दावा करण्याचा पूर्ण अधिकार आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rahul
29-05-2023
jadhav.rahul111@yahoo.in
आमची एकूण 6 एकर वडिलार्जित शेती असून माझ्या अजोबांनी यापैकी 30 गुंठे जमीन गावातील काही लोकांना घरे बांधण्यासाठी 3-3 गुंठे विकली होती त्यांच्या नावाची नोंदही 7/12 सदरी झालेली आहे. आमचे गटा लगत सरकरी जमीन असून त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यातीलच एकजणाने पक्के घर बांधले आहे आम्ही RTI ने त्याची माहिती मागितली असता त्याने आमचे गटातील 3 गुंठे जागा विकत घेतली असल्याचा दस्त ग्रामपंचायतीला देवून त्याच्या घराची नोंद ग्रामपंचायत सदरी केली आहे. परंतू त्याचे नाव 7/12 सदरी नाही. तरीही ग्रामपंचायतीने सदर दस्ताचे आधारे त्याचे घराची नोंद नमूना 8 ला घेतली आहे. जमीन नावावर नसतानाही अशी नोंद घालता येते का? कारण माझे अजोबा हयात नाहीत तसेच या इसमाच्या आजोबांना माझ्या अजोबांनी अथवा माझे वडीलांनी जमीन विकलेली नाही. याबाबत काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.
ज्या दस्ताचे आधारे शेजारच्या अतिक्रमण धारकाने, आपल्या आजोबांकडून तीन गुंठे क्षेत्र खरेदी केल्याचे भासवून तसा दस्त ग्रामपंचायतीला सादर करून त्याचे नाव ग्रामपंचायत अभिलेख सदरी दाखल केलेले आहे, तो दस्त ताब्यात घेऊन अथवा अशा दस्ताची प्रत घेऊन त्याचे अवलोकन करून असा दस्त आपल्या आजोबांनी केलेला आहे का याची पडताळणी करा. जर अशा प्रकारे त्याने खोटा दस्त केलेला असेल तर त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाही करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Yedage
28-05-2023
yedagesagar@gmail.com
ग्रामपंचायतीची गाळे किंवा जमीन कायमस्वरूपी भाडेपट्टा करण्याची प्रोसेस काय आहे.
2. ग्रामपंचायतिचे गाळे किंवा जमीन कायमस्वरूपी भाडेपट्ट्यावर देण्याचे कोणाला अधिकार आहेत.
ग्रामपंचायतची मालमत्ता भाडेपट्ट्याने देण्याचे अधिकार हे त्यासंबंधीत ग्रामपंचायत आहेत. मात्र त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची परवानगी घ्यावी लागते. . ग्रामपंचायतीने भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबत ठराव करणे आवश्यक आहे व तो ठराव संबंधित गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेकडे सादर केला जातो व त्यांची परवानगी प्राप्त झाल्यानंतर जी मिळकत आपणाला भाडेपट्ट्याने द्यावयाची आहे त्याबाबतचा भाडेपट्टा करार केला जातो व त्या इसमाला त्या जमिनीचा ताबा दिला जातो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर येडगे
28-05-2023
yedagesagar@gmail.com
नमस्ते सर.
ग्रापंचायतीचे गाळे किंवा जमीन कायमस्वरूपी अल्प भाडे तत्वावर करण्याची कायदेशीर प्रोसेस काय आहे...
भाडे तत्वावर देण्याचे अधिकार कोणाला आहेत..
Question by Sijauddin Ramjan mujawar
28-05-2023
sijauddinm786@gmail.com
देवस्थान जमीन ७/१२ वरील एपू नोंद कमी करने करीता काय करावे? सर कृपया मार्गदर्शन करावे.
देवस्थान जमिनीवरती ज्या लोकांच्या नोंदी असतात त्या नोंदी या वहिवाटदार म्हणून असतात. ज्या लोकांची नावे सातबारा सदरी दाखल असतात ते लोक देवस्थान मिळकतीचे मालक नसतात. वास्तविक वहिवाटदारांची नावे भोगवटादार सदरील दाखल करणे ही पूर्णपणे चुकीची प्रक्रिया आहे. वहिवाटदारांची सातबारा सदरी नावे दाखल करू नयेत. त्यामुळे एक पु नोंद आहे किंवा नाही या बाबी गौण आहेत. देवस्थान जमिनीची मालकी त्या त्या देवस्थानाची म्हणजे त्या देवाची असते. जे वहिवाटदार असतात त्यांना अधिकार केवळ ती जमीन कसवणूक करून किंवा तिचा उपभोग करून त्यामधून जे काही उत्पन्न प्राप्त होते त्यामधून त्या देवस्थानची दिवाबत्ती करणे, त्याची व्यवस्था पाहणे व उरलेल्या उत्पन्नातून स्वतःची उदरनिर्वाह करणे असा असतो. देवस्थानची जमीन कायद्याने सुद्धा हस्तांतरित करता येत नाही. यापूर्वी सन 2014 मध्ये ज्या देवस्थान जमिनीची अशा प्रकारे हस्तांतरने झालेली आहेत ती हस्तांतरण झालेली जमीन शासन जमा करण्याची ही कार्यवाही करण्यात आलेली होती.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदिप शिंदे
27-05-2023
sandip_shinde1984@yahoo.co.in
सर आम्ही एक शेत जमीन खरेदी केलेली आहे सदर शेतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदलेली आहे (सन 17 -18 सली ) तर विहीर आता आमच्या नावावर कशाप्रकारे करता येईल??
विहीर नावावर करणे म्हणजे आपल्या मिळते तिचा जो सातबारा आहे त्यावर विहिरीची नोंद करणे . संबंधित तलाठी यांच्याकडे योजनेखाली विहीर मंजूर झाल्याबाबत व ती पूर्ण केल्याबाबतचे कागदपत्र सादर करा व विहिरीची नोंद करून घ्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर शिंदं
26-05-2023
onlinecenter@gmail.com
नमस्कार सर, काही शैैक्षणिक संस्था या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थाकडून प्रवेश देतेवेळी उत्पन्नाचा / मिळकतीच्या दाखल्याची मागणी करतात, असा अनुसूचित जातीना उत्पन्नाचा दाखल्याबाबत कोणता शासन निर्णय किंवा नियम असेल तर सांगावा, धन्यवाद
Question by vinod shankarrao warkad
25-05-2023
vinodwarkad99@gmail.com
चतुर्थश्रेणी अंध अविवाहीत महिला कर्मचारी मय्यत झालेली आहे. तीला ४ भाऊ असून चारही विवाहीत आहे. आई वडीलापैंकी आई हयात आहे. मय्यत कर्मचाऱ्यांने कुटूंब निवृत्ती वेतनाकरीता तसेच गटविमा योजना करीता व भ. नि. नि. करीता विवाहीत भावास नामनिर्देशीत केलेले आहे. अशावेळी कुटूंब निवृत्ती वेतनाकरीता आई, विवाहीत भाऊ यापैकी कोण पात्र राहील. तसेच अनुकंपावर नौकरीकरीता भाउु अर्ज सादर करु शकतो का
अनुकंपा तत्वावरील नोकरी ही मयत व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्याला मिळू शकते. जी अंध अविवाहित महिला मयत झाली, तिच्यावर अन्य कुटुंबीय अवलंबून होते का? तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयामध्ये कुटुंब या संज्ञेमध्ये भाऊ आणि बहीण येतात का याची पडताळणी करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मधूकर पकाले
24-05-2023
madhukarpakale111@gmail.com
कृपया मार्गदर्शन करावे
सन १९९८ मध्ये मौजे हारगुळ बु ता.जि. लातूर येथील जमीन गट नंबर १६३ प्लॉट नंबर ९४ दिड पानी एन.ए. प्लॉट खरेदी करण्यात आला होता.
परंतु लातुर येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे दीड पानी रजिस्ट्र बंद आहेत म्हणून सांगितले आहे. जर रजिस्ट्र करायची असेल तर काय करावे लागेल मार्गदर्शन करावे ही विनंती.
मधूकर पकाले
मो. 7709477088
रा. लातूर
Question by दिनेश जाधव
23-05-2023
jadhavdineesh@gmail.com
आजोबांच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये नातीचे ( मुलीची मुलगी ) नाव लावायचे आहे. (आजोबा ह्यात आहेत मुलगी ह्यात नाही.) सुप्रीम कोर्टाच्या निकाल नुसार अपील न करता वंशावळीच्या आधारे तलाठी द्वारे नाव कसे लावावे.
हो लावता येईल मात्र त्यासाठी , मिळकतीतील नातीचा हिस्सा निच्छित करावा लागेल अथवा सर्वांना मान्य असावा लागेल . जर हिस्सा मान्य असेल तर , मिळकतीचे वाटप करावे , त्याद्वारे नातीचे नाव लावता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by megha chaudhari
22-05-2023
megha.kc0910@gmail.com
भूखंडाचा विकास महसूल विभाग शासन निर्णय 9 मे 2023 नुसार सपाटीकरण आदेश कसे पारीत करावेत कृपया मार्गदर्शन मिळावे.
Question by vijaya vilas pagar
12-05-2023
pagar.vijaya10@gmail.com
maze mr.expire zalet jamin sasaryancya navaver ahe amhi varas lavalele nahi mr. pn lavale navhte tri sasryani jamin ekach mulala vikli tin mule hoti
ase krta yete ka? jamin vadiloparjit ahe eka mulala vikta yete ka
वडिलोपार्जित व मिताक्षरा सह्दायकी मिळकत या मध्ये फरक आहे . केवळ मिताक्षरा सह्दायकी मिळकती मध्ये , पुढील चार पिढ्यांना हक्क असतो . मात्र अशी मिळकत जेंव्हा , एका व्यक्तीच्या नावे प्रक्रांत झाली असेल , तर त्याची ती व्यक्तीक होते व त्याची विल्लेवात त्याला लावता येते . त्यामुळे आपल्या सासर्यांना एकाच व्यक्तीच्या नावे मिळकत देता येईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रभाकर कदम
11-05-2023
yogeshksutar2011@gmail.com
नमस्कार सर, माझी रत्नागिरी या ठिकाणी जमिन मिळकत आहे, सदर मिळकतीच्या इतर अधिकारात क्र एल ए क्यु /एस आर /२१५ संपादनासाठी अशा शेरा नोंद करण्यात आला परंतु सदर शेरा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संपादनासाठी करण्यात आला आहे त्याबाबत अधिकार अभिलेखात फेरफार नोंद दाखल आहे. सदर मिळकतीमध्ये २७ पोटहिस्से असुन त्या पोटहिस्यामध्ये कब्जेदार सदरी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याचे नाव दाखल असुन सन २००० साली भूसंपादन शेरा नोंद करण्यात आला आहे त्यावेळी पासून
माझ्या मिळकतीला माझे स्वतचे नाव मालक म्हणून दाखल आहे. सदरचा शेरा नमूद असताना मिळकतीची विक्री करता येते काय ? करता येत असेल तर कश्या पद्धतीने ? किवा शेरा कमी करण्यासाठी काय करावे लागेल या बद्ल आपले बहूमोल्य असा सल्ला मिळावा. सर तुम्ही आपल्या वेब साईड ला जे नाव दिले आहात त्याप्रमाणेच आपण जनतेची सेवा करत आहात.खूप खूप आभार आपल्या या जन कार्याबद्ल.
एकदा जमीन भूसंपादक झाली की त्याबाबत त्याची नोंद कमी करता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आपल्या मिळकतीच्या इतर अधिकार अभिलेख सदरी असलेला शेरा कमी करता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पांडुरंग म्हारगुडे
10-05-2023
pandurangmhargude53@gmail.com
कुळकायदा ४३कमी करणेकामी मा.तहसीलदारसो यांना अर्ज केला होता.त्या अर्जाचे उत्तर लेखी असे मिळाले कि आपण ३२एम प्रमाणपत्र जोडुन द्यावे.तद्नंतर मागणी अर्ज दाखल केला असता तब्बल तीन अर्ज करुन आणि स्मरणपत्र देऊन ही ते प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले नाही.यानंतर माहिती अधिकार कायदा २००५अन्वये मागणी केली असता द्वितीय अपील मध्ये सदरचे प्रमाणपत्र आढळून येत नाही असे लेखी कळवले आहे. यानंतर कुळकायदा संबंधित शासन निर्णय बघितला असता त्यानुसार फेरफार द्वारे किंवा सदर प्रमाणपत्र द्वारे सदरच्या जमीनिस दहा वर्षे झाली असल्यास कोणतीही अडचण येणार नाही असे स्पष्ट होते.या प्रमाणपत्र चा फेरफार ही आम्ही सादर केला आहे.इथुन पुढे काय प्रोसेस करावी लागेल.किंवा संबंधित शासन निर्णय पुनश्च अवलोकन करणेसाठी तहसीलदार सो यांना देऊ का..
महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 च्या तरतुदीनुसार, कुळाने धारण केलेल्या जमिनीची विक्री किंमत कुळाचे नावे निश्चित झाली व कुळाने निश्चित केलेली विक्री किंमत शासन जमा केल्यावर त्याला 32 म प्रमाणपत्र दिले जाते.. महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ ची सुधारणा होण्याच्या अगोदर ज्या जमिनीची विक्री कुळ कायद्यांतर्गत कुळाच्या नावे झालेली आहे अशा कुळाला जमिनीची विक्री जिल्हाधिकारी/ उपभागीय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येत नव्हती. शासनाने त्याबाबत सुधारणा करून ज्या मिळकतीची/ जमिनीची विक्री किंमत निश्चित होऊन त्याप्रमाणे 32 म प्रमाणपत्र दिलेले आहे त्या गोष्टीला जर दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर विक्री करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या परवानगीची सद्यस्थितीत आवश्यकता नाही. याबाबत तहसीलदार जे नजरांना निश्चित करून देतील तो नजराना आपण चलनाद्वारे शासन जमा करावा. व चलनाची प्रत मेहरबान तलाठी साहेबांना दाखवावी त्या आधारे 43 चा जो शेरा आहे की ज्याद्वारे कुळ कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या जमिनीच्या हस्तांतरणावरती निर्बंध घातलेले आहेत ते दूर होतील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shivaji Pawar
09-05-2023
pra@gmail.com
महार वतन जमीन शर्तभंग बाबत निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या ऑफिस ला आहे? त्याविरुद्ध अपील कुठे करता येते??
महार वतन या धारणाधिकाराने धारण केलेली जमीन जर विनापरवाना हस्तांतरित केलेली असेल तर शर्तभंग झाल्याच्या प्रकरणी आपण जिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करून तक्रार करू शकता. जिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आपल्या तक्रारीवर विहित पद्धतीने चौकशी करून महाराष्ट्र गाव कनिष्ठ इनामे नाहीसे करण्याबाबतचा अधिनियम 1958 व त्याबाबत निर्णय घेतला जाई
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Chaitanya Phadatare
08-05-2023
chaitanyaphadatare7@gmail.com
सर नमस्ते
माझ्या वडिलांना दोन सख्खे आणि एक सावत्र भाऊ असून,माझे वडील सर्वात धाकटे आहेत.माझे सावत्र चुलते ह्यात नसून त्यांची दोन मुले आहेत.माझ्या वडिलांना सावत्र चुलत्याची मुले जमीन रजिस्टर वाटप करून देत नाहीत व त्या साठी कोणतंही सहकार्य करत नाहीत.तरी आम्हाला रजिस्टर वाटप करायचं आहे तरी लवकरात लवकर तुम्ही मार्गदर्शन करावं ही विनंती.
तुमचा विश्वासू,
चैतन्य फडतरे
जर आपले सावत्र चुलत भाऊ आपल्या एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीचे वाटप करून द्यायला तयार नसतील तर आपण आपल्या तालुक्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये वा मिळकती मधील आपला हिस्सा निश्चित करून मिळून त्याचा ताबा देण्याचा हुकूम करणे बाबत दावा दाखल करा. ही प्रक्रिया थोडीशी वेळ खाऊ व किचकट स्वरूपाची आहे. त्यामुळे यामधून काही तडजोडीने तोडगा निघतोय का याचीही चाचणी केलेली योग्य राहील.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Raju gaikwad
07-05-2023
rajug2917@gmail.com
लँड आलेनेशन (इनाम रजिस्टर) 1896 मध्ये पणजोबा यांचे नाव दिसतंय त्याच्यानंतरन वारसांचे नाव दिसत नाही सातबारा उतारावर वारसदार नाव दिसत नाही
कदाचित आपल्या आजोबांचे नाव, इनामी नाहीशी करण्याबाबतच्या अधिनियमाद्वारे कमी करण्यात आलेले असेल व त्यावेळी ज्या व्यक्तीचा मिळकतीवर ताबा कब्जा असेल किंवा असा इसम वैदरीत्या जमीन धारक करत असेल तर त्याचे नाव कब्जेदार सदरी दाखल झालेले असेल. यासाठी आपणाला जमिनीचा सातबारा उतारा काढून त्यावर नमूद जे फेरफार आहेत त्याचे उत्तरे प्राप्त करून घ्यावेत व त्या आधारे आपणाला आपल्या आजोबांचे जे वतनदार किंवा इनामदार म्हणून जे नाव आहे त्या का कमी झाले याचा बोध होईल. जर कोणत्याही फेरफाराविणार आपल्या आजोबांचे व त्यांच्या पश्चा वारसांची नावे लागली नसती तर आपणाला उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Raju gaikwad
07-05-2023
rajug2917@gmail.com
आजोबांनी व्हील (मृत्यू पत्र) बनवलेला आहे पण ते रजिस्टर नाहीये त्याच्यानंतरन बहिणीचे नाव सातबारावर लागलेली आहे पण कमी करणेबाबत काय करावे लागेल
भारतीय उत्तर अधिकारी अधिनियम 1925 अन्वये मृत्युपत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही. मृत्युपत्रांवर नाव दाखल व्हावे यासाठी बहिणींची जी नावे सातबारा दाखल झालेली आहे ती कमी करून मृत्युपत्राद्वारे ज्यांना जमीन दिलेली आहे त्यांची नावे दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपणाला अपील दाखल करावे लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vaishali
04-05-2023
vaishali.upasani14@gmail.com
नमस्कार मी विवाहीत स्त्रि असुन माझी शेती घेण्याची इच्छा आहे,2016 सालापर्यंत माझे 7/12ला नाव होते परंतू त्यानंतर शेती विकल्या मुळे 7/12ला नाव नाही . तर मला आता शेती घेता येईल का? त्यासाठी काय कराव लागेल.
महाराष्ट्र कुळवळ व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 63 अन्वये कोणत्याही बिगर शेतकरी व्यक्तीला शेतजमीन विकत घेता येत नाही. सन 2016 पर्यंत आपल्या नावे शेत जमीन होती परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol
03-05-2023
amolsalunkhe@rediffmail.com
एका व्यक्तीने आपल्या वडिलांचे कुलमुखत्यारपत्र करुन घेतले आहे व त्याचा काहीही संबंध नसलेल्या केस मध्ये त्रयस्थ पक्ष म्हणून सामील करून घेण्यासाठी अर्ज केलेले आहे. एका पोलिस केस मध्ये जबाब देताना त्याने असे लिहून दिले आहे कि 'माझ्या वडिलांच्या मेंदूचे ऑपरेशन झाले असून ते अपंग आहेत त्यांना काही एक कळत नाही'
प्रश्न असा आहे कि ज्या माणसाची मानसिक स्थिती चांगली नाही व त्याला काही ही कळत नाही तर त्याने दिलेले कुलमुखत्यारपत्र खरे असू शकते का? त्याने या अवस्थेत केलेले कुलमुखत्यारपत्र कायदेशीर ठरते का?
माणसाचे आरोग्य किंवा त्याची मानसिक स्थिती चांगली नसेल व आपल्या म्हणण्यानुसार त्या माणसाला कळत नसताना जर त्याने त्रस्त व्यक्तीला मुखत्यारी नेमले असेल तर आपण असे मुक्त्यारपत्र दिवाणी न्यायालयात आव्हान करू शकता. मात्र जोपर्यंत दिवाणी न्यायालय असे मुक्तार पत्र रद्द बादल करत नाही तोपर्यंत आपणाला मुक्त्यारपत्रावरती कोणतीही शंका उपस्थित करता येणार नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by gavhane balasaheb laxman
01-05-2023
grjtraj2@gmail.com
कुळ कायद्याने प्राप्त जमिनीचे मिळकत दाराला मृत्यु पत्र बनविण्याचा अधिकार आहे काय ?
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3374 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
