जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Sameer Shaikh
18-07-2023
sameer440shaikh@gmail.com
माझ्या वडिलांना पुनर्वसन अंतर्गत प्लॉट देण्यात आले होते 1990 मध्ये त्यांनी स्वत: च्या पत्नीला बक्षीस म्हणून तो प्लॉट दिला हस्तातर देत असताना जिल्हाधिकारी यांची परमिशन घेतली नाही पत्नीला पुनर्वसन अंतर्गत प्लॉट देण्यात आल असेल तर परमिशन ची गरज नाही असं शासन निर्णय परिपत्रक किंवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती द्यावी मला नितांत आवश्यकता आहे आहे
पुनर्वसन भूखंड याचे हस्तांतरण मा. जिल्हाधिकारी यांचे परवानगीनेच होते . आपण रीतसर परवानगी घ्यावी . पत्नीचे नाव सह-धारक म्हणून लावता येईल परत्तू पतीच्या जागी पत्नीचे नाव लागणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rohit Lokhande
18-07-2023
lokhanderohit82@gmail.com
साहेब,मौजे उदापूर ता. जुन्नर, पुणे ह्या आमच्या मूळ गावी आमचे वडिलोपार्जित घर आहे व घरालगत मोकळी जागा आहे. सदर घराच्या व जागेच्या मालमत्ता पत्रकावर फक्त आमचे थोरले अजोबा यांचे नाव आहे आणि नावाखाली वडिलोपार्जित अशा उल्लेख आहे. आमचे थोरले अजोबा आता हयात नाहीत. त्यामुळे भूमी अभिलेख शाखेत आमची वारस नोंद करण्यास अडचण येत आहेत. सदर घर व जागेबाबत आमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची कायदेशीर वाटणी झालेली नाही. मालमत्ता पत्रकावर थोरल्या अजोबांच्या नावापुढे ए. कु. मॅ. लावयाचे राहून गेले असेल अशी शकता आहे. तरी ह्याबाबत काय प्रकिया करून वारस नोंद करता येईल. थोरल्या अजोबांच्या नावापुढे ए. कु. मॅ. लावण्यासाठी कुठे अर्ज करावा आणि सोबत कोणते कागद पत्र जोडावे. तसेच भूमी अभिलेख शाखेत असे कोणते दस्त उपलब्ध होईल त्यावरून असे समजेल की इतर वारस असताना फक्त थोरल्या अजोबांचे नाव मालमत्ता पत्रकावर लावण्यात आले आहे. कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
मालमत्ता पत्रक आहे म्हणजे नगर भूमापन झाले आहे . नगर भू मापन चौकशीवेळी , आपल्या मिळकतिच्या मालकी हक्काबाबत चौकशी अधिकारी यांनी घेतलेल्या चौकशीचे कागद पत्र , नगर भूमापन अधिकारी यांचे कार्यालयात मिळतील . त्यावरून आजोबांचे नाव इतर वारसांचे वतीने प्रातिनिधिक स्वरूपात दाखल झाले आहे हे कळेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rajiv uttankar
18-07-2023
rajiv_uttankar@yahoo.com
Dear Sir,
Kindly provide me a detailed clarification to the following questions in the context of Maharashtra Public Record Act 2005:
Q.1)Under which category, the following land record documents in falls in?
Enquiry register, Nagar bhumapan nakasha, tippan, Area book, Measurement Map, Gut book Map.
Q.2) For how many years the above mentioned documents shall be preserved by land record office?
Q.3) What is the expiry date till which the above mentioned documents should be preserved?
Under the Public Records Act 2005, the retention Schedule is prepared by the concerned Department and is approved by the Director of Archives, Maharashtra State, Pune. Check with the Land Record Department. I am not aware about the retention period of the documents which you have mentioned .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Under the Public Records Act 2005, the retention Schedule is prepared by the concerned Department and is approved by the Director of Archives, Maharashtra State, Pune. Check with the Land Record Department. I am not aware about the retention period of the documents which you have mentioned .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sanjay ganpati todkar
18-07-2023
sanjay_todkar@yahoo.com
जमिनीच्या ७/१२ उतार्यावर पुरुषां बरोबर स्त्रियांचं मालकी हक्क म्हणून नोंद . कृपया एस-१४/२१६१८१६/प्रक्र ४५८/लं-६, दिनांक १५ september १९९२ circular कृपया email करावे हि विनंती
Question by Madan Patil
15-07-2023
madanpatil1994@gmail.com
सर,आमची जमीन सिंलीगला गेली आहे,परंतु नंतर त्यातून राज्य मार्ग गेला आहे, रोड गेला आहे ती जमीन सिंलिगमध्ये गेली पण भूसंपादन मात्र आमच्या सातबारा उताऱ्यावर केलेले आहे यामध्ये आमची जमीन रोडलगत नाही, रोडलगतची जमीन सिंलिगने इतरांना
मिळाली. या घटनाक्रमात अगोदर सिंलिग आले नंतर रोडचे भूसंपादन झाले , यात ज्यांची रोडलगत जमीन आहे त्यांचे भूसंपादन करायला पाहिजे होते पण तसे केले नाही उलट
रोडलगत नसताना मूळ मालकाचे भूसंपादन केले, तर आता आमच्या सातबारावरील भूसंपादन कमी करण्यासाठी काय करावे लागेल ? किती वेळ लागेल ? होईल का ?कोणत्या अधिकारीकडे हे प्रकरण असते?
कृपया मार्गदर्शन करावे...ही विनंती.
आपल्या प्रश्नावरून , संपादन झालेली जागा ही रोड लगतची नसून अनावधानाने किंवा चुकीने रोड लगत नसलेली म्हणजे आपली जागा संपादन झालेली आहे. ही जर वस्तुस्थिती आपणाला लवकर कळाली असती तर आपण त्या संबंधित भूसंपादन अधिकारी यांना ही सुख निदर्शनास आणून द्याव्याला पाहिजे होते. आता जागा संपादन झालेली आहे निवाडा जाहीर झालेला असेल तर त्यात दुरुस्ती करण्याचे अधिकार कुणालाही नाही. जर संपादित जागेचा ताबा घेतलेला नसेल तर आपण ही चूक भूसंपादन संस्थेला तसेच भूसंपादन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या, आपली जागा ही भूसंपादनातून वगळली जाईल. हा कदाचित संपादनाच्या अनुषंगाने जी संयुक्त मोजणी केली जाते त्या संयुक्त मोजणी मध्ये झालेली ही चूक आहे. ज्यावेळेस संयुक्त मोजणीचे पथक प्रत्यक्ष जागेवर आलं होतं त्यावेळेस आपल्या वतीने जर कोणी उपस्थित असतं तर त्याने ही चूक त्याच वेळेस निदर्शनास आणून देणे आवश्यक होतं.. आपल्या अनुपस्थितीमुळे संपादन संस्थेला व भूसंपादन अधिकारी यांना कुठलीही ही चूक लक्षात आली नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपल्या प्रश्नावरून , संपादन झालेली जागा ही रोड लगतची नसून अनावधानाने किंवा चुकीने रोड लगत नसलेली म्हणजे आपली जागा संपादन झालेली आहे. ही जर वस्तुस्थिती आपणाला लवकर कळाली असती तर आपण त्या संबंधित भूसंपादन अधिकारी यांना ही सुख निदर्शनास आणून द्याव्याला पाहिजे होते. आता जागा संपादन झालेली आहे निवाडा जाहीर झालेला असेल तर त्यात दुरुस्ती करण्याचे अधिकार कुणालाही नाही. जर संपादित जागेचा ताबा घेतलेला नसेल तर आपण ही चूक भूसंपादन संस्थेला तसेच भूसंपादन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या, आपली जागा ही भूसंपादनातून वगळली जाईल. हा कदाचित संपादनाच्या अनुषंगाने जी संयुक्त मोजणी केली जाते त्या संयुक्त मोजणी मध्ये झालेली ही चूक आहे. ज्यावेळेस संयुक्त मोजणीचे पथक प्रत्यक्ष जागेवर आलं होतं त्यावेळेस आपल्या वतीने जर कोणी उपस्थित असतं तर त्याने ही चूक त्याच वेळेस निदर्शनास आणून देणे आवश्यक होतं.. आपल्या अनुपस्थितीमुळे संपादन संस्थेला व भूसंपादन अधिकारी यांना कुठलीही ही चूक लक्षात आली नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
आपल्या प्रश्नावरून , संपादन झालेली जागा ही रोड लगतची नसून अनावधानाने किंवा चुकीने रोड लगत नसलेली म्हणजे आपली जागा संपादन झालेली आहे. ही जर वस्तुस्थिती आपणाला लवकर कळाली असती तर आपण त्या संबंधित भूसंपादन अधिकारी यांना ही सुख निदर्शनास आणून द्याव्याला पाहिजे होते. आता जागा संपादन झालेली आहे निवाडा जाहीर झालेला असेल तर त्यात दुरुस्ती करण्याचे अधिकार कुणालाही नाही. जर संपादित जागेचा ताबा घेतलेला नसेल तर आपण ही चूक भूसंपादन संस्थेला तसेच भूसंपादन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्या, आपली जागा ही भूसंपादनातून वगळली जाईल. हा कदाचित संपादनाच्या अनुषंगाने जी संयुक्त मोजणी केली जाते त्या संयुक्त मोजणी मध्ये झालेली ही चूक आहे. ज्यावेळेस संयुक्त मोजणीचे पथक प्रत्यक्ष जागेवर आलं होतं त्यावेळेस आपल्या वतीने जर कोणी उपस्थित असतं तर त्याने ही चूक त्याच वेळेस निदर्शनास आणून देणे आवश्यक होतं.. आपल्या अनुपस्थितीमुळे संपादन संस्थेला व भूसंपादन अधिकारी यांना कुठलीही ही चूक लक्षात आली नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Dilipkumar Kharat
15-07-2023
dkkharat1@gmail.com
राज्यातील काही गावामध्ये अनुसूचित जाती विशेषतः महार जातीच्या सार्वजनिक उपयोगासाठी गावालगत किंवा गावापासून दूर अंतरावर जमिनी आहेत. या जमिनी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. जसे की, म्हारकी, हाराटी, हडुळकी, दळे इत्यादी. या जमिनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जातीच्या वापरात आहेत. त्यापैकी काही जमिनी शेतीसाठी उपयोगात आणल्या जात असून काही या अनेक वर्षांपासून कोणत्याही वापराविना पडून आहेत. या जमिनी तत्कालीन ब्रिटिश शासनाने या जातीला ईनाम म्हणून दिलेल्या आहेत असा समज आहे. अशा जमिनी या त्या समाजातील काही प्रमुख व्यक्तिंच्या नावावर नोंदलेल्या आहेत
या जमिनीचे वाटप त्या जातीच्या सर्व सदस्यांना मालकीहक्काने करणे कायदेशीर होईल काय ?
तसेच या जमिनीबाबतची संपूर्ण माहिती, ती ईनाम म्हणून देण्याचे प्रयोजन, उद्दिष्ट कोणत्या कार्यालयात मिळेल ?
Question by Prabha
14-07-2023
satheprabha@rediffmail.com
गावी आमची वडिलार्जित शेती होती. माझे वडील व 2 चुलते असे वारसा. आम्ही पुण्यात व १ चुलते मुंबई ला असतो. गावी असणाऱ्या मोठ्या काकांचे नाव एकुमा होते त्यांनी सगळी 3३ गुंठे शेत जमीन आम्हाला काही न सांगता विकली. काकाने ती जमीन ज्याला विकली त्यानेही ती तिसऱ्या माणसाला विकली आहे. वकिल म्हणतात दिवाणी न्यायालयात केस करून मूळ दस्त तुमच्या क्षेत्रापुरता रद्द करून घ्यावा. असा आपल्या क्षेत्रापुरता दस्त रद्द करता येतो का? कि पूर्ण व्यवहारच रद्द होतो?
आपणाला दोन बाबींवरती दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल. एक म्हणजे अधिकार नसतानाही तुमच्या हिश्याची क्षेत्र तुमच्या चुलत्याने विकलेले आहे. तसेच चुलत्याच्या हिस्स्यांचे क्षेत्र ही प्रथम खरेदी करण्याचा अधिकार आपणाला आहे. आणि अशी तरतूद हिंदू वारसा कायद्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही या दोन मुद्द्यांवर आपल्या चुलत्यांनी जे खरेदी खत त्रयस्थ व्यक्तीसकरून दिलेला आहे ते रद्द करून घ्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amit raut
14-07-2023
shilparaut35@gmail.com
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 54 प्रमाणे न्यायालयात जमीन वाटणीसाठी अर्ज केला असता नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटी किती असते. सातबारा वरती जो आकार लिहिलेला असतो त्याच्याशी काही संबंध असतो का.
न्यायालयाने पारित केलेला आदेश हा, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ च्या कलम २ अन्वये सलेख आहे. न्यायालयाचा आदेश हा मुद्रांक शुल्क आकारणीसाठी पात्र असतो. माननीय न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी मिळकतीचे वाटप केल्यानंतर, वाटपानंतर सर्वात मोठा जो हिस्सा शिल्लक राहतो, त्याच्या बाजार मूल्यावर 2% दराने मुद्रांक शुल्क वसूल केले जाते.
उदाहरणादाखल एखाद्या इसमास ८ एकर जमीन होती, व त्याचे वाटप या व्यक्तीला ४ एकर , ब व्यक्तीला ३ एकर व क या व्यक्तीला १ एकर असे करण्यात आले, या तीन हिश्यांपैकी सर्वात मोठा हिस्सा हा ४ एकर जमिनीचा आहे जो या व्यक्तीला मिळालेला आहे. या ४ एकर जमिनीचे बाजार मूल्य, जे वार्षिक मूल्य दर तक्त्यात( म्हणजे शीघ्र सिद्धगणकामध्ये व बोली भाषेमध्ये रेडी रेकनर रेट) नमूद करण्यात आलेला आहे त्याला बाजार मूल्य असे म्हटले जाते. या उदाहरणांमध्ये अ या व्यक्तीला ४ एकर क्षेत्र मिळाले व तो सर्वात मोठा हिस्सा असल्यामुळे त्यावर २ टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारणी केले जाईल मात्र मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी ही वाटप केलेल्या सर्व व्यक्तींवर म्हणजे या उदाहरणातील, अ, ब व क या तिघांवर आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amol
14-07-2023
amolsalunkhe@rediffmail.com
सर सैन्य दलातील व्यक्ती देत असलेल्या त्रासाबाबत प्रश्नाला उत्तर देताना आपण त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी उप विभागीय दंडाधिकारी तथा प्रांत यांचेकडे सादर केला आहे का ? असे विचारले होते. परंतु असा काही प्रस्ताव पोलिसांनी पाठवलेला नाही. पोलिस सदर व्यक्ती बाबत नरमाईची भूमिका घेत आहेत. त्याच्या आलेल्या तक्ररी ठाणे दैनंदिनी मधे नोंद करतात. आपले सरकार पोर्टल वर तक्रार केली की NC घेतात व सदर व्यक्ती सैन्य दलात कर्तव्यावर असलेने पोलिस स्टेशनला हजर होऊ शकत नसल्याने त्याला फोनवर समज देण्यात आली व त्याने मी पुन्हा वाद व. भांडणतंटा करणार नाही असे सांगितले म्हणून तक्रार निकाली काढली असा अहवाल वरिष्ठांना देतात. सदर व्यक्ति आपण सैन्य दलात मेजर असल्याचे सांगतो. पण हवालदार (हाऊसकिपर) या पदावर असल्याची माहिती नुकतीच माहिती अधिकारातून प्राप्त झाली. पोलिसांच्या सौम्य भूमिकेमुळे तो निर्ढावला आहे.
Question by Vishnu Pawar
13-07-2023
pawarvishnu@rediffmail.com
सर, कुळकायद्याची सर्व्हे नंबर ६४/१/अ ची कोशिंबे येथील आमच्या शेतजमीन संबंधीचे ३२म सर्टिफिकेट तलाठ्याकडे नोंद करून दहा वर्ष झाली. तरीसुद्धा मूळ मालक व आता त्यांचे वारसांची नावे सातबारावर लावली जात आहेत. सदर शेतजमीन खूप वर्षांपासून आमचे वाडवडिल कसत होते. शेतजमीन आमच्या कब्जात आहे व आम्ही ती अजूनहि कसत आहोत. पण आम्हाला सरकारी योजनेचा लाभ होत नाही. मूळ मालकांची नावे सातबारा मधून काढून टाकण्यासाठी काय करावे लागेल?
तहसीलदार यांचेकडे अर्ज करून हि बाब त्यांचे निदर्शनास आणून द्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर येडगे
13-07-2023
yedagesagar@gmail.com
मा. महोदय,
माहिती अधिकार अंतर्गत द्वितीय अपील मा.राज्य माहिती आयोग यांना काय काय अधिकार आहेत....
उदा. एखाद्या शेतकऱ्याची जमीन शासन बऱ्याच वर्षा पासून अनलिगली वापर करत आहे...हे माहिती अधिकार अंतर्गत सिद्ध होत असेल तर तो शेतकरी मा.राज्य माहिती आयोग यांच्या कडे कशा प्रकारे दाद मागू शकेल...म्हणजे जमीन वापरली म्हणून नुकसान भरपाई किंव्हा त्या जागेचा मोबदला मागू शकेल का.....
Question by sagar patil
12-07-2023
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की आमच्या आजोबांचे चुलते त्यांना कोणी वारस नसल्यामुळे आमचे आजोबा त्यांच्या हीशाची सर्व जमीन खरेदी खताने 1960 ला विकत घेण्यासाठी गेले असता आमच्या आजोबांना त्यावेळेस सांगण्यात आले की तुमचे चुलते भूमिहीन होत असल्यामुळे खरेदीखत करता येणार नाही पुढे 1962 ला ते चुलते मयत झाले तर आजही सातबारा वरती त्यांचेच नाव आहे व ती जमीन तेव्हापासून आमच्याकडेच आहे तर त्या सातबारा वरती आमची नावे लावण्यासाठी काय करावे लागेल (आजोबांना पाच भाऊ आहेत)
Question by sagar patil
12-07-2023
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की सातबाराच्या इतर अधिकारामध्ये XYZ व्यक्तीने रक्कम रुपये 325 दिनांक 1992 रोजी कोर्ट अवॉर्ड करून घेतले असे नमूद केले आहे तर कोर्ट अवॉर्ड करून घेणे म्हणजे काय
हा जो तपशील किंवा आपण त्याला शेरा असे म्हणू, जो सातबाराच्या इतर हक्कात नोंदवण्यात आलेला आहे त्याच्या खाली कोणता फेरफार क्रमांक नमूद केला आहे का हे पहा. जर त्याखाली फेरफार क्रमांक नमूद असेल तर तो फेरफार चा तपशील काय आहे ते पहा त्या तपशिलावर कदाचित नक्की याचा अर्थ काय आहे आणि कोर्ट अवार्ड केले म्हणजे काय याबाबत आपल्याला बोध होईल. जर त्याच्या खाली कोणताही फेरफार नोंद क्रमांक नसेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1960 च्या कलम 155 खाली मेहरबान मामलेदार साहेबांना विनंती करा की हा असा पोकळीस्थ जो काही शेरा आहे तो काढून टाका.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amit raut
12-07-2023
shilparaut35@gmail.com
आमचे 40 पेक्षा अधिक छोटे छोटे सातबारे आहेत आणि सातबारावर एकूण 70 ते 80 लोकांची नावे आहेत फॅमिली ट्री प्रमाणे यामध्ये महत्त्वाचे भागीदार हे तीन असून 70 ते 80 जण हे त्यांचे वारसदार आहेत तरीही कलम 85 अन्वये एखाद्या सहधारकाने जर आपल्या हिस्सासाठी मागणी केली असता दुसरा सहा धारक ज्याचा हिस्सा एक पर्सेंट एवढाच असेल तर त्यांनी हरकत घेतली तर कलम 85 द्वारे वाटप करण्यात अडचण येऊ शकते का किंवा तहसीलदार त्यावर निर्णय देऊन कलम 85 द्वारे वाटप करू शकतात का. सर्व जमिनी 50 ते 60 वर्षांपूर्वीच तोंडी वाटपाने प्रत्येकांच्या कब्जेवापरात आहेत
Question by Anil Jadhav
12-07-2023
Anilashok354@gmail.com
सर आपले खूप खूप अभिनंदन आपण व्यक्तिशः लक्ष देऊन लोकांचे शंका चे निरसन करता , आपल्याला चांगले आरोग्य लाभो
सर माझे आजोबा 1948 मध्ये संरक्षित कुळ होते नंतर ते कमी झाले आणि पुन्हा ते 1957 मध्ये संरक्षित कूळ झाले आणि त्या नंतर 7/12 सदरी १९५६ पासून 1969 पर्यंत संरक्षित कूळ म्हणुन इतर हक्क मध्ये आणि पीक पेरा सदारी नाव होते 1970 मध्ये 3 एकर चे पैसे भरून कब्जेदर सदरी नाव लागले व उर्वरित 10 एकर मूळ मालकाचे नाव लागले तत्पूर्वी 1960 मध्ये आजोब नी 1960 मध्ये पूर्ण जमीन खरेदी साठी अर्ज केला होता पण मूळ मालक अपक असल्यामुळे खरेदी तहकूब असा फेर होता. 1970 नंतर 1989 व 1993 मध्ये मूळ मालकाने जमीन आजोबा व वारस ह्यांना न विचारता ती तिसऱ्या व्यक्तीला विकली आणि 7/12 ला कूळ कायदा कलम 43 /1 आणि आजोबांनी जमीन कब्जा रक्कम भरून जेव्हा 3 एकर घेतली होती तो फेर 47 हा 7/12 ल व इतर हक्क मध्ये नवीन शर्त 47 म्हणून होता तरी तिसऱ्या व्यक्तीने मूळ मालक कडून जमीन घेतली आणि आमचा कूळ हक्क डावलला गेला असे वाटते
1) ४३(१) आणि नवीन शर्त ४७ असताना कूळ व वारस आणी सरकारी परवानगी न घेता झालेला व्यवहार हा कायदेशीर आहे का आणि नसेल तर व्यवहार रद्द करून आम्हाला जमीन मागणी करता येईल का आणि कुठे दाद मागावी लागेल
२ १९६० चा जमीन खरेदी अर्ज असताना व्यवहार झाला आहे तर तो कायदेशीर आहे का
३ एक मूळ मालक १० एकर मधील २ एकर च मालक असून विधवा स्री आहे आज रोजी जमिनी मध्ये कट्या आहेत तर ती जमीन आम्हाला हवी असेल तर काय करणे योग्य
Question by Sagar Jadhav
08-07-2023
sagajadh1206@gmail.com
१. डिजिटल सातबारा मध्ये विहीर नोंद कशी करावी?
२. ई पीक पाहणी आपलिकेशन मधून कायम पड मध्ये विहीर नोंद केली तर ती कुसुम सोलर योजने साठी ग्राह्य धरली जाईल का?
Question by sushant vartak
07-07-2023
sushantvartak1980@yahoo.co.in
आमची वसई येथे वडिलोपार्जित छोटे छोटे जमिनीचे 43तुकडे सातबारे असून आमच्या कुटुंबाची ती सामाईक जमीन आहे. प्रत्येक सातबारा मध्ये साधारणता 80 ते 100 नावे असून त्याचे मुख्य हिस्सेदार हे काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी चार हे आहेत म्हणजेच 80 ते 100 जण हे या चार जणांचे वारस आहेत. सर्व जमिनीची पन्नास वर्षांपूर्वीच तोंडी वाटप झालेला असून त्यानुसार प्रत्येक कुटुंबाच्या तसेच व्यक्तीच्या कब्जेवापरात आहे काही सातबारांमध्ये समांतर तर काही ठिकाणी विषमरीत्या जमीन तोंडी वाटप झालेले असून त्यां जमिनीचे बांध सुद्धा घातलेले आहेत आणि सदर जमिनीचे फोड होताना 1966 साली झालेल्या आकारफोड आकारबंद मध्ये ह्या तुकड्यांची नोंद आहे परंतु सातबारा व त्याची विभागणी झालेली नाही तरीही सातबारे मध्ये वरील चार भावांच्या वारसांमध्ये म्हणजेच त्यांच्या नावाच्या समोर आपण क्षेत्र कब्जेवापर तसेच आकार फोड किंवा कब्जे वापराप्रमाणे जुने नकाशे त्यानुसार आपण क्षेत्र आणू शकतो का सदर जमीन हि कलाम ८५ नुसार वाटणी करण्यात काही जणांचे सहकार्य मिळत नाही तसेच दिवाणी न्यायालया मार्फत करण्यासाठी वेळ लागू शकतो तरीही आम्ही सद्य स्थितीत नावासमोर क्षेत्र आणू शकतो का.
सर्व सह-धारकांची संमती असती तर हा प्रश्न सहज सुटू शकेल . मात्र ज्या जमिनीचे १९६६ ला वाटप झाले आहे व केवळ सध्याच्या वहिवाटीच्या आधारे प्रत्येक जन आपला हक्क सांगत आहे . अन्य कोणताही उपाय यामध्ये मला दिसून येत नाही . एक तर सह धारकांची संख्या खूप आहे व झालेला कालवधी , प्रत्येकांने आपल्या मिळकतीत केलेली गुंतवणूक पाहता , दिवाणी न्यायालय हाच एक मार्ग आहे . अन्यथा सध्या ज्या प्रमाणे कब्जा आहे व सम - विषम वाटप याचा विचार न करता , तहसीलदार यांचेकडून कलम ८५ खाली वाटप करून घेणे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sushant vartak
05-07-2023
sushantvartak1980@yahoo.co.in
जर नोंदणीकृत हक्क सोडपत्र केला असेल तर तलाठ्याला फेरफार टाकण्यासाठी नोंदणीकृत हक्क सोडची झेरॉक्स प्रत आणि अर्ज दिल्यानंतर तलाठी फेरफार टाकू शकतात का की प्रतिज्ञापत्रकाचे गरज असते
सुशांत वर्तक वसई पालघर
हक्क सोड पत्राचे इंडेक्स II ची प्रत तलाठी याजकडे येते . त्यामुळे छाया प्रत , सही करून दिलेली चालू शकते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गिरीश भोसले
05-07-2023
Girish.bhosale84@gmail.com
RTS अपिल चा full form काय आहे?
Question by Amol
04-07-2023
amolsalunkhe@rediffmail.com
सैन्य दलात काम करणारी व्यक्ती सुट्टी वर असताना सैन्य दलात असल्याचा गैरफायदा घेऊन अनेकांना मारहाण करणे जिवेमारण्याच्या धमक्या देणे, हल्ला करणे शेतीचे नुकसान करणे असे करीत आहे. त्याच्या अनेक लेखी तक्रारी पोलिसांकडे आल्याने त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांचेकडे ०१ मार्च २०२३ रोजी पाठविण्यात आला आहे. मात्र अजूनही त्यावर कारवाई करण्यात आली नाही. प्रस्ताव आल्यापासून किती दिवसात ही कारवाई करतात.यासाठी काही नियमावली आहे का? या संदर्भात काय करावे लागेल.
आपण कथन केलेले प्रकरण अथवा संन्य दलातील व्यक्तीचा गुन्हा / कृत्य या साठी भारतीय दंड संहिता या खाली गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे . त्याचे कृत्य प्रतिबंधात्मक कार्यवाही खाली येऊ शकत नाही . त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी उप विभागीय दंडाधिकारी तथा प्रांत यांचेकडे सादर केला आहे का ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर येडगे
02-07-2023
yedagesagar@gmail.com
मा.महोदय,
आमची वडिलोपार्जित जमीन आहे .आमच्या आजोबांचे जमिनीचे एकूण सहा गट नं. आहेत.
आजोबा मयत झाले नंतर सहा गटांवर समाईक नावे दाखल झाली आहे. त्यातील चार गटाचे वाटप मोठे जुलत्याना जादा जमीन म्हणजे 11 एकर व आम्हाला कमी जमीन म्हणजे 7.5 एकर वाटप 1994 साली मा. तहसीलदार सहेबान मार्फत झाले आहे.
आता राहिलेल्या दोन गटात नावे समायक आहे...चुलता म्हणतो की राहिलेले गटात समान हक्क पाहिजे.
मग आदोगरचे जे चार गट कमी जादा वाटप झाले आहे ते रद्द होऊन नव्याने सर्व गट समान वाटप होऊ शकते का....?
आणि एकूण सहा गटाचे वाटप पत्र करायचे होते तिथे चार गटाचे वाटप पत्र केले आहे. मग अपूर्ण वाटप पत्र केले आहे.असा दावा करता येईल का...
तहसीलदार यांनी केलेले वाटप आता आह्वानीत करता येणार नाही . आपण या विषम वाटपाच्या विरुद्ध , दिवाणी न्याय्यालयात जाने योग्य राहील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर दिलीप चौधरी
02-07-2023
sagarchaudhari770@gmail.com
मा. महोदय आपमी वडीलांचे नांवे शेती होती. ती शेती कालांतराने विकण्यात आलेली आलेली आहे तरी पुनच्छ वडीलांचे नांव शेती घेता येऊ शकते
Question by Sijauddin Ramjan mujawar
02-07-2023
sijauddinm786@gmail.com
सर , सव्हे न 7/12 सदरी 1971 पुर्वी गुणाकार बुक, शेत पुस्तक, आकारफोड ,फाळणी नकाशा या दस्तऐवज मध्ये आमचे थोरले आजोबा व ईतर तीन्ही आजोबाची नोंद दिसून येते . 1972 साली गट न. 7/12 सदरी आमचे थोरले आजोबाचीच नोंद दिसून येते.आम्ही उपसंचालक भुमी अभिलेख, पुणे . या विभागात एकत्रीकरण चुक दुरुस्ती साठी 2019 रोजी अर्ज केलेला असता. त्यांनी जुने 7/12 सदरी एकूप अशी नोंद नसलेने तुम्ही महसूल खात्याशी एकूप नोंद साठी अर्ज दाखल करावा . असा निकाली समज दिलेला आहे. महसूल विभागात कसा अर्ज करावा ? भुमी अभिलेखने दिलेला निकाल बरोबर आहे का?
Question by गिरीश भोसले
30-06-2023
Girish.bhosale84@gmail.com
तलाठी अथवा मंडल अधिकारी सुट्टी च्या दिवशी दुसरा अथवा चौथा शनिवार या दिवशी फेरफार प्रमाणित करु शकतात का?
Question by गिरीश भोसले
30-06-2023
Girish.bhosale84@gmail.com
खरेदीखतामध्ये मिळकत 1/अ नमुद आहे परंतु फेरफार होताना भोगवटादाराचे नाव १/ब मध्ये दाखल झाले व काही कालावधी नंतर त्या भोगवटादाराने 1/अ मध्ये सुध्दा नाव नवीन फेरफार नुसार सामाविष्ट केले. सध्या एका खरेदीखतानुसार दोन फेरफार झाले असून दोन सात बारा उतारा मध्ये नावे आहेत. तर तहसीलदार यांचाकडे १५५ कलम खाली अर्ज करावा लागेल का? कलम 247 खाली उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपिल दाखल करावे लागेल..
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3374 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
