जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Jayant Govind Puranik
17-12-2023
upasana115@gmail.com
माझ्या वडिलांच्या नावे देवस्थानासाठी इनामी जमीन (खिदमत) ६ हेक्टर आहे. माझ्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून आम्हाला आमचे (वारसांचे) नावे लावण्यासाठी आम्ही रितसर अर्ज तहसीलदार यांना दोन वर्षांपूर्वी दिला होता. त्यानुसार तलाठी यांनी वारसदाराचे नाव लावले होते. त्यानंतर वारसातील बहिणीनी हक्कसोडपत्र दिले व त्याची नोंद घेण्याबाबत अर्ज केला होता व फेरफार तयार करण्यात आलेला होता परंतु तो मंजूर न होता अचानक तलाठी यांनी आदेशाने खाता दुरुस्ती करत, आधी लावलेल्या सर्व वारसदाराचे नाव कमी करुन परत माझ्या वडिलांचे नाव सातबारावर लावले. आता यापुढे आम्ही कुठे व काय कार्यवाही करावी जेणेकरून आमचे नाव सातबारावर लागेल. याकरिता काय करावे लागेल. याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.
देवस्थान इनाम जमीन हि केवळ ज्या देवस्थानासाठी दिली आहे त्यांचे नाव लागणे आवश्यक आहे . देवस्थान इनाम हा मुख्यत्वे पच्छिम महाराष्ट्रात आहे . पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी / भागात , वहिवाटदार यांची नावे लावण्याची प्रथा आहे . मात्र पूर्वी पासून आपल्या वडिलांचे नाव लागले होते . वडिलांचे मृत्य - पश्चात , देवस्थान न्यासाने , आपली वहिवाट चालू आहे का ? न्यास अस्तित्वात नसेल किंवा असा न्यास स्थापन झालेला नसेल तर आपला या मालमत्तेमधील अधिकार संपुष्टात आलेला आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अरूणा पद्माकर हलकारे
13-12-2023
arunahalkare52@gmail.com
प्रोबेट च्या आधारे फेरफार नोंद घेण्यासाठी तलाठी कडे विरुद्ध पक्षाने अर्ज केला. त्याविरुद्ध वरिष्ठ स्तर न्यायालयाकडे अपील केले असता त्यांनी आम्हाला प्रोबेट रद्द करण्याचे अधिकार नाहीत ते हायकोर्टाला आहेत, त्यामुळे तुम्ही हायकोर्टात अपिल करा. परंतु तलाठ्याने प्रलंबित फेरफार मंजूर करून 7/12 वरील माझे नाव कमी केले. प्रोबेट विरुद्ध आम्ही हायकोर्टात अपील केले व एकाच सुनावणीत कोर्टाने प्रोबेट रद्द केले. व सर्व वारसांना हक्क सिद्ध करण्यासाठी परत दावा दाखल करा असे सांगितले.
तलाठ्याने घेतलेल्या फेरफारची नोंद रद्द करणेसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपिल दाखल केले व एक वर्षानंतर अपील मंजूर झाले. प्रतिवादीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पूनर्निरिक्षण अपील दाखल केले त्याच्या सुनावण्यात पूर्ण झाल्या असून प्रकरण आदेशासाठी ठेवले आहे परंतु आज सहा महिने झाले तरी आदेश मिळाला नाही.
आदेश देण्याबाबत काही कार्यकाळ ठरवुन दिलेला आहे का?
7/12 वर माझे नाव नसल्याने मला शेती करता येत नाही त्यामुळे आर्थिक नुकसान होते आहे याची भरपाई शासन करेल का?
मला शेती करता येते का?
कोणत्याही महसूल अधिकाऱ्याला अथवा भूमापन अधिकाऱ्याला त्याच्याकडे दाखल झालेले अधिकार अभिलेखाच्या वादाचे प्रकरण एक वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येत नाही. जर एक वर्षापेक्षा अधिक काळ प्रकरण प्रलंबित ठेवायचे असेल तर त्यासाठी लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घेणे अभिप्रेत आहे.
प्रकरणामधील सुनावणी पूर्ण झाली व प्रकरण निर्णयासाठी बंद झाल्यानंतर त्याचा निकाल किती दिवसात द्यावा याबाबत महसूल संहितेमध्ये कोणतेही उपबंध नाहीत तथापि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, तीन ते चार आठवड्याच्या कालावधीत निकाल जाहीर करणे आवश्यक आहे असा निर्वाळा माननीय उच्च न्यायालयाने दोन-तीन प्रकरणात दिलेला आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जयंत गोविंदराव पुराणिक
13-12-2023
upasana115@gmail.com
माझ्या वडिलांचे नावे इनामी जमीन (खिदमत) आहे. त्यांचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. त्यांचे आम्ही सहा भावंडे वारस आहेत. सदर जमिनीवर वारसदार नावे लावण्यासाठी काय करावे लागते तपशीलवार माहिती द्यावी.
खिदमतमाश जमीन हि सेवाधारी इनाम आहे . मंदिर , मस्जिद इत्यादी यांच्या पूजा -अर्चा करण्यासाठी अश्या धार्मिक स्थळांना दिलेल्या जमीन . अश्या जमिनींना केवळ मंदिराचे नाव लागू लागते . इतरांची नावे लावता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shailesh Subhash gaikwad
09-12-2023
sg14014@gmail.com
माझा वय वाटी रस्ता बंद करण्यात आला आहे तू मला परत चालू करायचा आहे त्यासाठी काय करावे लागेल
जो रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्या रस्त्याचा वापर जर शेती कारणासाठी होत असेल तर आपण मामलेदार न्यायालय अधिनियम अंतर्गतआपले तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकता. शेती शिवाय रस्त्याचा वापर अन्य कारणासाठी होत असेल तर आपणाला दिवाणी न्यायालयाकडे दाद मागावी लागेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by satish vishnupant lolge
08-12-2023
satishlolge@gmail.com
मी नाशिक येथे आशिष को ऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर 65 ओंकार नगर विठ्ठल मंदिराच्या जवळ राहतो माझ्या व शेजारच्या प्लॉट मध्ये सामाईक भिंत मध्ये अतिक्रमण केलेले आहे या करिता हद्द मोजणी साठी भूमिअभिलेख कार्यालय क्रमांक 3 येथे मोजणी बाबत चौकशी साठी गेलो असता आमच्या सोसायटी सिटी सर्वे झाला असून त्याची सनद पैसे भरून घेतल्या शिवाय मोजणी होणार नाही असे सांगितले मी सलग माझ्या घरात राहत असुन आज पावतो मला काही एक न सांगता अथवा नोटीस न देता माझ्या घराची मोजणी कशी काय झाली असे विचारता माहिती मिळत नाही तसेच आमच्या लगत असलेल्या प्लॉटचे देखील मोजमाप झालेले नाही तरी सनद तयार झाल्या आहेत़ यातील प्लॉट ले आऊट प्रमाणे क्षेत्रफळाच्या नोंदी अंदाजे लावल्या आहेत तरी या बाबत आपणा कडून काही ठोस तपासणी/कारवाई होऊ शकेल काय याची माहिती मिळावी ही नम्र विनंती आहे
ज्यावेळी नासिक शहराचे नगर भूमापन झाले , त्यावेळेस सर्व मिळकतींचे भूमापन झाले आहे . नगर भुमापनाचे आधारे प्रत्येक भूखंडाचे नकाशे सुद्धा तयार झाले आहेत . आपणाला अतिक्रमण याचे अनुषगाने पुढील कारवाई करण्याची असल्यास , झालेल्या भूमापनाच्या अनुषगाने , महसूल संहितेच्या प्रकरण ८ मधील कलम १३६ अन्वये , सीमा / हद्दी निच्छित करून मिळणेबाबत , मा जिल्हाधिकारी /उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा . हद्दी निच्छित करून दिल्यानंतर , आपल्या भूखंडावर शेजार्य्च्याने अतिक्रमण केले आहे का हे कळून येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Shubham Yadav
04-12-2023
shubham.p.yadav@gmail.com
भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मराठी मधून pdf पाहिजे
आपणास एखाद्या नजीकच्या दुकानात जेथे मराठी भाषेतील कायद्याची पुस्तके मिळतात तेथून विकत घ्यावा लागेल . माझ्याकडे नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Niwrutti purushottam kawate
02-12-2023
kniwrutti7005@gmail.com
नमस्कार सर
माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची चार ठिकणी घर जागा आहे.
माझ्या आजोबांना दोन मुले होती सर्वात मोठे माझे वडील होते.
माझ्या आजोबा मयत झाल्यावर नियमाप्रमाने माझ्या वडिलांचे नाव सर्व घर जागे वर ग्रामपंचायत ला लागली.
पण कालांतराने माझ्या वडिलांचे त्याच्या लहान भावांशी भांडणे होऊ लागली त्यामुळे माझे वडिल दुसरीकडे रहावयास गेले.
पण सन 1984 ला सिटी सर्व्हे झाला त्यावेळेस माझ्या काकांणी माझ्या वडिलांच्या जागी मीच ऐकटा आहे असे सांगितले ऐ कु मे आहे असे सांगितले आणि सिटी सर्व्हे ला त्यांचे नाव लावले.
1) माझ्या वडिलांचे नाव सिटी सर्व्हे ला लावण्यासाठी काय करावे लागेल
2) ग्रामपंचायत आता नगर पंचायत झाली आहे आणि त्या जागेवर अजुनही माझ्या वडिलांचे नाव आहे 8A ला. आणि मी सर्व घरपट्टी पण भरली आहे
3) माझ्याकडे जून्या नोंदीपण आहे ग्रामपंचायत जागेचे माझ्या वडिलांच्या नावे
4) सिटी सर्व्हे ला नाव लावण्यासाठी काय करावे लागेल माझ्याकडे कोर्टाचा वारस दाखला पण आहे
5) त्या सर्व जागा धरण पुनर्वसनात जाणार आहे.
6) ग्रामपंचायत आणि नगरपंचायत च्या सर्व ठिकाणी माझ्या वडिलांचे नाव आहे.
7) सिटी सर्वे ला अधिकार आहे का ग्रामपंचायत ची नोंद कोणाच्या नावे आहे ते पडताळून न बघता
सिटी सर्वे ला कोणाचेही नावे लावावीत.
पण ज्या गावांमध्ये अथवा शहरांमध्ये राहता त्याचे ज्यावेळेस नगर भूमापन झाले त्यावेळेस आपल्या काकांनी आपल्या आजोबांच्या मालकीच्या ज्या चार मिळकती किंवा घर जागा होत्या त्या चा ताबा त्यांच्याकडे राहण्यास ते पात्र आहेत अशा प्रकारचा पुरावा देऊन मिळकत पत्रिकेला आपल्या काकांचीच केवळ नावे लागलेली आहेत असे आपले कथन आहे. जुन्या ग्रामपंचायत अभिलेखांवरती आपल्या वडिलांचे नाव आहे. नगर भूमापन चौकशीच्या अनुषंगाने, एखाद्या मिळकतीचा ताबा राहण्यास कोण व्यक्ती पात्र आहे या चौकशीचे निष्कर्ष नगर भूमापन कार्यालयात/ उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असतात. या चौकशी उताऱ्याची प्रमाणित प्रत आपण प्राप्त करून घ्यावी. व त्या चौकशी उताऱ्यामध्ये उपरोक्त चार घर जागांच्या ठिकाणी केवळ आपले काका हे ताबा ठेवण्यासाठी पात्र आहेत असा जर चौकशी अधिकाऱ्याचा निष्कर्ष असेल , तर अशा चौकशी निष्कर्षा विरुद्ध अपील , महसूल संहितेच्या उप्बंधानुसार , जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख /उपसंचालक भूमी- अभिलेख यांचेकडे दाखल करणे आवश्यक आहे .
चौकशी अधिकारी हा उपाधीक्षक भूमी- अभिलेख या दर्जाचा असेल तर , अधीक्षक भूमी- अभिलेख यांचेकडे अपील करावे लागेल अन्यथा चौकशी अधिकारी , जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दर्जाचा अधिकारी असेल तर अपील उपसंचालक यांचे कडे करणे आवश्यक आहे .
अपील ज्ञाप्नात उपरोक्त पुरावे दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Gajanan bhikanrao kale
01-12-2023
dgkale29@gmail.com
गजानन भिकनराव काळे रा sawdad तालुका sidhkhed raja जिल्हा बुलढाणा
अतिवृष्टी झाल्यामुळे शासनाने सिंदखेड राजा तालुका हा अतिवृष्टी ग्रस्त तालुका म्हणून घोषित केला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अनुदान जाहीर केले मी माझे आधार ऑनलाईन केवायसी केले मला vk number 2324RNRHR3986SWA05328170नंबर सुद्धा मिळाला चाळीस दिवस झाले अजून माझ्या खात्यात अनुदान जमा झाले नाही तरी मेहरबान साहेबांना माझी विनंती आहे माझी अडचण लवकरात लवकर दूर करावी व माजी अनुदान मला मिळून द्यावे विनंती
आपण आपल्या तालुक्याच्या तहसीलदार साहेब्बना प्रत्यक्ष भेटून , आपल्या खात्यात , अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा झालेली नाही हे सांगा . जर त्याचा काही परिणाम झाला नाही तर , आपले सरकार या संकेत स्थळावर आपली तक्रार दर्ज करा .
मात्र , अतिवृष्टी काळात , आपले शेतीचे नुकसान झाले होते व तसा पंचनामा करण्यात आला होता याची खात्री करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सुदर्शन भाऊसाहेब चव्हाण
29-11-2023
Chavansudarshan21@gmail.com
माझ्या आजीने आमच्या वडिलोपार्जित घराला आजोबा वारल्यानंतर माझे वडील सहा भावंड व आजी एक असे सात वारस असताना फक्त स्वतः अन सर्वात लहान मुलगा असे दोघांनाच वारस लावले होते. आता आजी हयात नाही व माझ्या वडीलांचे पण निधन झाले तर वारस लागण्यासाठी मी काय करू?
आपले घर , ग्रामपंच्यात हद्दीत असेल तर , आपण पंच्यात समिती कडे अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sandeep dattatray dalvi
24-11-2023
SSANDEEPDALVI@GMAIL.COM
आपण स्टॅम्प वेंडर कडून स्टॅम्प खरेदी करतो, त्यावरती अनुच्छेद क्रमांक चार फक्त प्रतिज्ञापत्रासाठी असा शिक्का असलेले स्टॅम्प इतर बँक कामी, हायपोथिकेशन डीड, लोन एग्रीमेंट, अशा कामासाठी वापरू शकतो का? किंवा मोठ्या रकमेच्या हायपोथिकेशन डीड, लोन एग्रीमेंट साठी जर वापरले असतील आणि कर्जदार डिफॉल्टर झाला तर भविष्यात बँकेला कायदेशीर रित्या धोका असू शकतो का? किंवा यामुळे बँक किंवा ग्राहक अडचणीत येऊ शकतो का?
कृपया मार्गदर्शन करावे..
धन्यवाद!
ज्या दोन पक्षकारांमध्ये कोणताही दस्त निष्पादित होणारा असतो त्या पक्षकारांपैकी एका पक्षकाराच्या नावे मुद्रांक कागद खरेदी केलेला असणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या मुद्रांक कागदावर, दुसऱ्या व्यवहारा चा, अनुच्छेद नमूद केलेल्या कारणास्तव, असा निष्पादित केलेला दस्त हा अवैध ठरत नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by भास्कर दशरथ पिंपळे
21-11-2023
kiranpimpale1997@gmail.com
नमस्कार महोदय, मि भास्कर दशरथ पिंपळे आदिवासी भिल्ल समाजाचा असून मौजे रहिमपुर ता.संगमनेर जि अहमदनगर येथील कायमचा रहिवासी आहे.माझे वडिल कै.दशरथ शिवराम पिंपळे यांनी रहीमपुर येथील सरकारी जमिनवर सन १९७४ पुर्वी पासून २हे२०आर एवढ्या क्षेत्रावर अतिक्रमण करुन वहिति करत होते.व् आज मि करतोय. त्यापैकी २१ आर क्षेत्र सन १९७९ ला नियमित करण्यात आले उर्वरित क्षेत्र १हे९९आर आजही माझ्या ताब्यात आहे ते
माझ्या वडिलांच्या नावावर नियमित करण्यासाठी मि प्रयत्न करतोय कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद
आपले क्षेत्र जे नियमित करण्यात आले ते शेती कारणासाठी नियमित करण्यात आले असेल .आपणाकडे अन्य उर्वरित आपल्या मालकीची जमीन नसेल तर , २ हेक्टर मर्यादेपर्यंत , जिल्हाधिकारी यांना अतिक्रमण नियामाकुल करता येते .
मात्र त्यासाठी आपणाकडे , आपले अतिक्रमण आहे याचा कागदोपत्री पुरावा असणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by satyjeet shinde
13-11-2023
satyjeet.shinde777@gmail.com
Caste certificate issue karnyache aadhikar kontya department la aahet. thethe konta jababdar Aadhikari asto.
जात -प्रमाणपत्र देण्याचे अधिकार , महसूल विभागाच्या , उपविभागीय अधिकारी यांना आहेत . उप - विभागीय अधिकारी यांना , जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे विनियमन कायदा २००० अन्वये , सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandesh Gajanan Zalke
12-11-2023
sandeshzalke96@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे. कि माझ्या शेतीची अपिल ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे चालू होती व नंतर त्या आपिलीचा निकाल हा माझ्या विरुद्ध लागला व लगेच मी त्याला त्या निर्णयाला अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल दाखल केली व निर्णय हा प्रलंबित आहे व अपिल चालू असताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी त्या प्रकरणात नवीन फेरफार घेतला. या बद्दल सविस्तर माहिती दयावी.
अप्पर जिल्हाधिकारी यांनी , उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशास स्थगिती दिली नसेल तर , नवीन फेरफार अभिलीखीत करणे व प्रमाणित करणे, अवाजवी अथवा गैर नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by rohidas sakharam pabale
09-11-2023
yashsurveyors2008@gmail.com
मा. तहसीलदार यांना सात बारा वरील इतर अधिकारातील धरणग्रस्तासाठी राखीव शेरे कमी करण्याचे अधिकार आहे का असल्यास त्याबाबत काही जीआर परिपत्रक आहे का अधिकार नसल्यास असे शेरे कमी केले असल्यास तहसीलदार यांच्यावर काय कारवाई होऊ शकते त्याची तक्रार कोणाकडे करावी
महाराष्ट्र प्रकल्प बाधीत व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या कलम १२ अन्वये , जिल्हाधिकारी यांचेमार्फत , लाभ क्षेत्रातील जमीन , प्रकल्प बाधीत व्यक्तीसाठी आवश्यक नाही अशी अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करतात . या अधिसूचनेद्वारे , तहसीलदार , अश्या राखीव मालमत्तेच्या , अधिकार अभिलेख पत्रकाच्या इतर अधिकारातील धरन ग्रस्त राखीव शेरे कमी करण्याची कार्यवाही केली जाते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by subhash Pandharinath mali
09-11-2023
spmali1949@gmail.com
bhoodanat prapt jamini babat watap na zalelya jaminichi mahati kothe milel
Question by अजय देवकत्ते
09-11-2023
Devkatteajay@gmail.com
2015 मध्ये शेतजमिनीत 2 गुंठे जागा खरेदी खत करून घेतली आहे. पण त्यावेळी त्याची 7/12 ला नोंद लावून घ्यायची राहीली आहे. आता ती नोंद होऊ शकते का आणि होत असेल तर काय करावे लागेल?
महाराष्ट्र धारण जमिंचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणे अधिनियम याच्या उपबंधानुसार , शेतजमिनीची २ गुंठे क्षेत्रापुरती विक्री करता येत नाही . २ गुंठे क्षेत्रासाठी अधिकार अभिलेख पत्री नोंद होऊ शकत नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Niwrutti purushottam kawate
31-10-2023
kniwrutti7005@gmail.com
नमस्कार सर
माझा प्रश्न असा आहे की माझ्या आजोबांची चार ठिकणी घर जागा आहे.
माझ्या आजोबांना दोन मुले होती सर्वात मोठे माझे वडील होते.
माझ्या आजोबा मयत झाल्यावर नियमाप्रमाने माझ्या वडिलांचे नाव सर्व घर जागे वर ग्रामपंचायत ला लागली.
पण कालांतराने माझ्या वडिलांचे त्याच्या लहान भावांशी भांडणे होऊ लागली त्यामुळे माझे वडिल दुसरीकडे रहावयास गेले.
पण सन 1984 ला सिटी सर्व्हे झाला त्यावेळेस माझ्या काकांणी माझ्या वडिलांच्या जागी मीच ऐकटा आहे असे सांगितले ऐ कु मे आहे असे सांगितले आणि सिटी सर्व्हे ला त्यांचे नाव लावले.
1) माझ्या वडिलांचे नाव सिटी सर्व्हे ला लावण्यासाठी काय करावे लागेल
2) ग्रामपंचायत आता नगर पंचायत झाली आहे आणि त्या जागेवर अजुनही माझ्या वडिलांचे नाव आहे 8A ला. आणि मी सर्व घरपट्टी पण भरली आहे
3) माझ्याकडे जून्या नोंदीपण आहे ग्रामपंचायत जागेचे माझ्या वडिलांच्या नावे
4) सिटी सर्व्हे ला नाव लावण्यासाठी काय करावे लागेल माझ्याकडे कोर्टाचा वारस दाखला पण आहे
5) त्या सर्व जागा धरण पुनर्वसनात जाणार आहे.
6) ग्रामपंचायत आणि नगरपंचायत च्या सर्व ठिकाणी माझ्या वडिलांचे नाव आहे.
7) सिटी सर्वे ला अधिकार आहे का ग्रामपंचायत ची नोंद कोणाच्या नावे आहे ते पडताळून न बघता
सिटी सर्वे ला कोणाचेही नावे लावावीत.
आपल्या गावाला नगर भूमापन योजना केंव्हा लागू झाली झाली ? चौकशी अधिकारी यांच्या , जमीनिवर कब्जा करण्यास कोण पात्र आहे या निर्णयावर , जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अपील करावे . जर अपील कार्याचा कालावधी संपुष्टात आला असेल तर , आपण विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम या अंतर्गत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून मालकी हक्क जाहीर करून घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Niwrutti purushottam kawate
31-10-2023
kniwrutti7005@gmail.com
सर माझ्या आजोबांची वडिलोपार्जित
शेती महाजनको ने नवीन पॉवर प्लांट साठी 2007 साली अधिग्रहित केली आहे. सर्व मिळुन क्षेञफळ 4 हेक्टर. माझा असा प्रश्न आहे कि
माझ्या आजोबांचे निधन १९९४ या साली झाले आहे आणि इतर वारस सुद्धा लागलेले आहे जेव्हा जमीन संपादित झाली तेंव्हा सर्वे मिळून ५ वारस लागलेले होते.
माझे वडील आणि त्यांचे दोन भाऊ आणि २ बहिणी.
१) माझ्या वडिलांचे निधन झालेले आहे आणि मला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट हवे आहे जॉब साठी, तर मला असे विचारायचे आहे कि मला इतर जे वारसदार आहे त्यांचे संमतीपत्र घ्यावे लागेल का प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट मिळवण्या यासाठी ,किंवा इतर दुसरा पर्याय आहे का प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी.
२) कोण कोणते कागदपत्रे लागतात प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी .
३) इतर वारसदार काही हरकत घेऊ शकतात का जर त्यांच्यी संमती जर नाही घेतली तर
४) आणि मला प्रकल्पग्रस्त दाखला कुठे मिळू शकेल कृपया माहिती द्या
५) सर्वे नंबर एकाच असल्यामुळे एकाच सर्टिफिकेट मिळेल कि सर्वाना सर्टिफिकेट मिळेल कारण जमीन संपादित झाली त्यावेळेस सातबारा वरती ऐकून 5 नावे होती.
मला असे सांगण्यात आले आहे कि आता कायदा बदल्या मुले आता इतर वारस दारांचे संमती पात्र लागत नाही असे सांगण्यात आले आहे . ते खरंच आहे का ???
आणि असेल तर मला प्रकल्पग्रस्त चा दाखला मिळू शकतो का
६) माझ्या वडिलांच्या बहिणीचे निधन झालेले आहे तर त्यांचा मुलांचे संमती मला घ्यावी लागेल का कि फक्त मृत्यू दाखला दिला तरी चालेल का ?
सर कुपया लवकरात लवकर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे
नवीन काही नियम आला आहे का या विषयी
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
१. आपली जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी संपादित झालेली आहे त्याबाबतचा अधिकृत पुरावा जसे की संपादन निवाडा, किंवा संपादन संस्थेचे नाव दाखल करण्यासाठी अभिलेखित करून प्रमाणित केलेला फेरफार चा उतारा.
२. सर्व कायदेशीर वारसांचे आपणाला प्रमाणपत्र देण्याबाबतची संमती
३. जी जमीन संपादित झालेली आहे त्यासाठी केवळ एकच प्रमाणपत्र मिळण्यास आपले कुटुंब पात्र आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गजानन भिकनराव काळे रा sawdad तालुका sidhkhed raja जिल्हा बुलढाणा
27-10-2023
dgkale29@gmail.com
अतिवृष्टी झाल्यामुळे शासनाने सिंदखेड राजा तालुका हा अतिवृष्टी ग्रस्त तालुका म्हणून घोषित केला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अनुदान जाहीर केले मी माझे आधार ऑनलाईन केवायसी केले मला vk number 2324RNRHR3986SAW02531690नंबर सुद्धा मिळाला चाळीस दिवस झाले अजून माझ्या खात्यात अनुदान जमा झाले नाही तरी मेहरबान साहेबांना माझी विनंती आहे माझी अडचण लवकरात लवकर दूर करावी व माजी अनुदान मला मिळून द्यावे विनंती
प्रथमता ज्यावेळेस अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे आपल्या शेतीची जी काही नुकसान झालेले आहे त्याचा पंचनामा स्थानिक तलाठी यांनी केलेला आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. जर आपला शेतीचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा स्थानिक तलाठ्यांनी केलेला असेल तर आपण आपल्या तालुक्याच्या तहसीलदार साहेबांना भेटून आपल्याला अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही ही बाब त्यांच्या कानावर घाला. जर यालाही काही प्रतिसाद मिळाला नाही अथवा आपल्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसानीची भरपाईची रक्कम जमा झाली नाही तर आपण आपले सरकार नावाच्या संकेतस्थळावर आपली तक्रार दर्ज करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by NANDADEEP PANDURANG PARAB
24-10-2023
parabnandadeep@gmail.com
Government central employees buy land Do they need the department's permission to buy agricultural land?
As far as I know, permission is not required to buy agricultural land. But you'll need to report property acquisition to the Central Government according to the mandate of Civil Service Rules.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by NANDADEEP PANDURANG PARAB
24-10-2023
parabnandadeep@gmail.com
महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करण्याची लष्कराच्या जवानाला नियम व कायदे काय आहेत
असा जवान मुळात शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजे त्याचेकडे पूर्वीची त्याच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक आहे अथवा तो शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Name
21-10-2023
ravip123@gmail.com
नमस्कार पाणबुडे साहेब,
तालुका देवगड, गाव पोय रे येथील आकार फोड झाल्यानंतर सातबाऱ्यावर परत जुनी नावे आलेली आहेत ( जी सरकारी नोंदणीकृत आणि स्टॅम्प ड्युटी भरून हक्कसोड पत्र केलेली नावे ). ती नावे परत सातबारा वरून वगळण्या संदर्भात चौकशी केली असता असे समजले की 155 चा फॉर्म भरून तहसीलदार साहेबांकडे द्यावा लागेल.
प्रश्न असा आहे की 155 चा फॉर्म सात बारावरील नाव असलेल्या खातेदाराने भरून द्यावा का ?? की तलाठी साहेब तहसीलदार साहेबांकडे परपर संपर्क करून 155 चा फॉर्म भरतील आणि सातबाऱ्यावरील नावे वगळतील.
खातेदाराने 155 चा फॉर्म भरावयाचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतील.
कृपया माहिती द्यावी.
आपला हक्कावर बाधा निर्माण झाली असेल तर आपण हि अर्ज करू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh
14-10-2023
maheshsarode383@gmail.com
नमस्कार साहेब
आमचा कोर्टात दावा सुरू होता त्यात निकाल सामनेवाले जिंकले आम्ही तारखेला न गेल्यामुळे, ती मिळकत त्यांनी परस्पर विकली आम्ही त्यांच्या जुन्या निकालाला कोर्टात अपील केलेय, विक्री झाल्याने,आता ती मिळकत तिसऱ्या व्यक्तीच्या नावे आहे तर तर अपील केलेल्या केस मध्ये निकाल आपल्या बाजूने लागल्या नंतर विक्री झालेले खरेदी दस्त आपोआप रद्द होईल की वेगळा दावा करून रद्द करून घ्यावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे.
खरेदीदार जर , प्रामाणिक अथवा सद्भावपूर्ण खरेदीदार असेल तर , विक्री केलेली जमीन आपणास परत मिळणार नाही . आपणास , जमिंनिमधील , आपल्या हिस्स्याचे मोबदला रक्कम व्याजासह परत मिळेल . जर खरेदीदार प्रामाणिक खरेदीदार नसेल तर आपणास जमीन परत मिळेल .
प्रामाणिक खरेदीदार - ज्याने जमीन खरेदी करण्यापूर्वी , जमिनीवर कोणाचा दावा , हक्क / हितसंबंध आहे का याची नोटीस वृत्तपत्रात दिली आहे व कोणतीही हरकत आलेली नसेल तसेच मिळकतीचे मालकी -हक्क बाबत शोध प्रमाणपत्र घेतले आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Trupti
11-10-2023
truptimulmule190@gmail.com
जमीनेचे मुळ मालक वा त्यांचे कोणीही वारस हयात नाही. जमिनीचा ताबा 100 वर्षापासून दुसर्यांकडे आहे, घराची सर्व बिले ताबा असणार्यांच्या नावे आहे मात्र ज्यांचा ताबा आहे त्यांची नावे आखीव पत्रिकेवर नाही. आखीव पत्रिकेवर नाव घेण्यासाठी काय करावे.
आखीव पत्रिका म्हणजे मिळकत पत्रिका आहे . याचा अर्थ म मिळकत ज्या गावात आहे त्या गावाचे , नगराचे भूमापन झाले आहे . नगर भूमापन चौकशी वेळी , ताबा धारकाने त्याच्याकडे असलेले पुरावा सादर का केले नाहीत ? नगर भूमापन चौकशी विरुध्द , जिल्हाधिकारी यांचेकडे महसूल संहिते अंतर्गत अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by GANESH Sanjay patil
09-10-2023
st46548@gmail.com
सर नमस्कार ... माझा एक अडचींविषयी प्रश्न पडला आहे.. मी खूप दिवसापासून प्रश्न कायदेशीर उत्तर हवं आहे जेणकरून काही अडचण येणार नाही. माझ्याकडे महाराष्ट्र domicile certificate आहे तर मला दुसऱ्या प्रातचं domicile certificate काढायचं आहे परंतू महाराष्ट्र domicile certificate राहू देऊ का? काय करू ? मला कायदएशिर मदत करावी अशी नम्र विनंती करत आहे..
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3374 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
