जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Jai Daga
26-06-2023
jai_daga@yahoo.co.in
मा. महोदय, आमची खोपोली ईथे ३ एकर जागा आहे । जागेचे डिटेल्स गाँव - गणेश नगर ( ९४५२९५५), तालुक़ा - खालापुर, जिल्हा - रायगड , गट क्रमांक (सर्वे) -३०३.
या जागा पैकी २ एकर जागा माझ्या आई इन्दू डागा यांची आहें आणि एक एकर A यांची आहें । दोन इश्यू आहें
१)A यान्नी आदिवासी यानना रस्ता पाहिजे असा सांगुण माझ्या आई च्या जागेतुन मोठा रस्ता बँधला ते ही माझ्या आईची परवानगी न घेता । याची कम्प्लेंट साठी आणि जेवढ़ी जागा रोड मध्ये गेली त्याच्या कंपनसेशन साठी काय करवायी करता येईल कारण अIमच्या कढ़े ग्रामपंचयत किव्वा ट्राइबल डिपार्टमेंट इथूँ काहीही लेटर नाही ।
२. हे ७/१२ वेगला करण्या साठी फ़ास्ट ट्रैक प्रोसेस काय आहे आणि किति दिवसात होतो।
प्लीज़ आम्हाला गाइड आणि हेल्प करा कारण माझी आई एक सीनियर सिटीजन आहें आणि खालापुर किव्वा ग्रामपंचायत ऑफिस कोणिही मदद करत नाही ।
मला विश्वास आहें की अम्हाला आपला सहकार्य भेटेल ।
धन्यवाद जय डागा
१. आपल्या जागेतून आपल्या परवानगीशिवाय कोणीही रस्ता करू शकत नाही . शासनाच्या कोणत्या प्राधिकरणाने रस्ता तयार केला आहे ? याची आपणास माहिती आहे का ? कि रस्ता खाजगी आहे ? शासनाने / ग्राम पंचायतीने रस्ता तयार केला असेल तर आपणास त्या बाबत नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे . त्यासाठी प्रथम शासन / ग्राम पंचायतीला नुकसान भरपाई देण्याबाबत नोटीस द्या . जर त्याचा काही उपयोग झाला नाही तर , आपणास न्यायालयाट जावे लागेल .
२. ७/१२ आपली आई व A यांचे मध्ये स्वतंत्र करावयाचा असल्यास , उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा . मोजणी करून , आपला ७/ १२ स्वतंत्र होईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Àditya
25-06-2023
adityak80@yahoo.com
माझ्या आजोबांची वडिलार्जित हिश्शाची जमीन त्यांच्या निधनानंतर माझ्या आजीच्या व आईच्या नावे वारसाहक्काने आली. आजीचे नाव भोगवटादार सदरी होते व आईचे नाव इतर हक्कात. परंतू आईच्या चुलत भावाने कर्ज मिळवून देतो असे सांगून आजीचा अंगठा घेऊन सगळी जमीन खरेदी घेतली. आजीला व आईला याबाबत समजले तेव्हा आम्ही प्रांताकडे अपील केले असता सदर विक्री घरखर्च व लोकांची देणी देण्यासाठी कौटुंबिक गरजेसाठी केली असल्याचे व एकुमॅ ला तो अधिकार असल्याचे सांगून अपील फेटाळले. जिल्हाधिकारी यांनीही तोच आदेश कायम ठेवला आहे. व नोंद रद्द करणेसाठी न्यायालयात खरेदी खत रद्द करुन घेण्यासाठी सांगितले आहे.
परंतू ७/१२ वर कुठेही एकुमॅ नाही .क्षरेदी दस्तामधे एकुमॅ म्हणून विक्री नाही. खरेदी फेरफार वर एकुमॅ नाही. आईचे नाव आजही 7/12 सदरी इतर हक्कात आहे. तरीही चुकिचे निष्कर्ष काढून अन्याय कारक निकाल दिला आहे काय करावे ?
प्रांत अधिकारी यांचे निष्कर्ष चुकीचे व सदोष आहेत . आपल्या आजी ला जरी तिचे नाव एकु म्या म्हणून दाखल असले तरी . तिला विकण्याचा हक्क आहे कि नाही ठरवण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला आहे . महसूल न्यायासानास नाही . आपण जिल्हाधिकारी यांचे सदोष आदेश अप्पर आयुक्त यांचेकडे अह्वणीत करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anshuman
25-06-2023
anshumol2007@gmail.com
सर, आमची 6 एकर वडिलार्जित जमीन असून माझे वडिल व २ काका प्रत्येकी २ एकर वहिवाट आहे. आमचे वाटपपत्र झाले नाही. आम्ही दोन्ही घरे तिथे रहात नसल्याने आमची शेती तिथे स्थायिक मोठ्या चुलत भावाला कसायला दिली आहे. शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून त्याने आम्हाला न सांगता आमच्या दोघांच्या हिश्श्याच्या मधे विहीर काढली आहे. या वर्षी आम्ही आमचा हिस्सा एका इसमाला वाट्याने दिला आहे. तो भाऊ वाटेकरीला त्रास देतो आहे. तसेच विहीर मी काढली ती माझी एकट्याची आहे. तुमची जमीन मलाच विकायची असे म्हणतो. विहिरीची नोंद ७/१२ वर सामाईकात करता येईल का? त्यासाठी काय करावे?
आपल्या जागेच्या वाटणी झालेली नाही मात्र विहीर खोदण्याचा खर्च ज्याने केला , त्याची ती विहीर आहे . खर्चाचा भार सोसण्यास आपण तयार असेल तर ताशे आपले चुलत्यांना विचारून पहा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर येडगे
24-06-2023
yedagesagar@gmail.com
मा. महोदय,
ग्रामपंचायत मालकीच्या खुल्या जाग्याची मा.सीईओ साहेबांची भाडे तत्वावर करणे करिता परवानगी मिळाली आहे,
आत्ता कायदेशीर नोंदणी कुत भाडे तत्वावर करणे करिता काय प्रोसेस आहे.....
भाडेपट्टा दस्त तयार करून , आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन ते नोंदणीकृत करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sagar patil
23-06-2023
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की आम्ही 2018 ला वहिवाटीचा रस्ता खुला करून द्यावा असा मामलेदार कोर्ट 1906 ची कलम पाच नुसार तहसीलदारांकडे अर्ज केला आहे 2018 पासून आमचा व जबाबदार यांच्या तारखा चालू आहेत विषय असा झाला आहे की आत्तापर्यंत तीन तहसीलदारांनी स्थळ पाणी केली आहे स्थळपाणीत आम्हाला कोणताही पर्याय रस्ता नाही असा पंचनामा तयार होतो परंतु ते तहसीलदार बदलल्यानंतर आमचे प्रतिवादी अगोदरचे स्थळ पाहणी आम्हाला मान्य नाही व नवीन स्थळ पाहणी व्हावी म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करतात व नवीन साहेबांन कडून स्थळ पाहणी करून घेतात मला म्हणायचे आहे की अगोदर केलेल्या स्थळ पाहणीस पंचनाम्यास कोणतेही मूल्य असते का नाही किंवा अगोदरच्या पंचनाम्यास काय कायदेशीर अधिकार असतो का नाही कृपया मार्गदर्शन करावे
मामलतदार न्यायालय अधिनियम नुसार रस्ता मागणी अर्जावरची चौकशी हि संक्षिप्त व अर्धा न्यायिक स्वरुपाची आहे . जास्तीत जास्त एखादे महिन्याच्या कालावधीत अश्या अर्जावर निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे . ३ तहसीलदार यांचे कालावधी असे पर्यंत अशी चौकशी पुढे ढकलता येणार नाही .
ज्या वेळी स्थळ पाहणी पंचनामा झाला असेल व त्यावर विरोधी पश्काराची स्वाक्षरी असेल तर त्यांनी परत नवीन तहसीलदार यांचेपुढे असा स्थळ -पंचनामा नाकारता येणार नाही . या शिवाय अशे कि नोटीस देऊन हि , स्थळ पाहिनिसाठी उनुप्स्थित असतील तर , त्यांना असा हि पंचनामा नाकारता येणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Usha Patil
22-06-2023
chaitu9289@gmail.com
महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक आरपीए- २००६/प्र.क्र १(४)/र-१, दिनांक : १७/०४/२००६ माहिती मिळावी
कृपया महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर दिनांकानुसार शोध घ्यावा. तात्काळ संदर्भासाठी पुढे लिंक दिली आहे. धन्यवाद.
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
Reply by MCS Officer | उप जिल्हाधिकारी
Question by suvarna
22-06-2023
suvarnaramesh40@gmail.com
महोदय,
माझी वारस हक्कासंबंधीची केस जिल्हाधिकारी यांचेकडे चालू असून, माझा भाउ प्रतिवादी आहे. सदर केस प्रलंबित ठेवण्याचे हेतूने माझ्या भावाच्या मुलाने जो आर्मी मधे नोकरी करतो त्याने आर्मीच्या कमांडर तर्फे एक पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे की, सदर व्यक्ती हा आर्मी मधे काम करीत असून आम्ही त्याला विशेष कामगिरी दिली असले मुळे तो सुनावणी साठी येउ शकत नाही तर आपण 2 महिन्यांनतरची तारीख द्यावी. परंतू केस मधे तो प्रतिवादी नाही. भावाने त्याला कुलमुखत्यार नेमले आहे, पण सदर व्यक्तिला व आर्मी विभागाला अशी कोणतीही नोटीस पाठवली नसताना आर्मी असे पत्र देउन सुनावणी 2 महिन्याने घ्या असे सांगू शकते का? याबाबत काय नियम आहे का? आर्मी असा हस्तक्षेप करु शकते का? कृपया मार्गदर्शन करावे.
पीठासीन अधिकारी यांनी, आपल्या बंधूंनी त्याच्या मुलाला जो आर्मी मध्ये नोकरी करतो त्याला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत जे प्राधिकार पत्र दिलेले आहे ते मान्य करावयाला नको होते. आपण पीठासीन अधिकारी यांच्याकडे या नियुक्तीला आक्षेप घेऊन अन्य व्यक्तीस , जी सुनावणी कामे कायम हजर राहू शकेल, त्याला नियुक्त करण्याबाबतचे आदेश पारित करण्याबाबत पाठपुरावा करा. जर आपली विंनती मान्य केली नाही तर त्या विरुद्ध अपील करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Amar Mapari
20-06-2023
amarmapari@gmail.com
क्र: भूमापन -१०८६/६८/४९६६/ ल-१, दिनांक ४ नोव्हेंबर १९८७ महसुल व वनविभाग,शासन GR मिळणेबाबद
कृपया महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर दिनांकानुसार शोध घ्यावा. तात्काळ संदर्भासाठी पुढे लिंक दिली आहे. धन्यवाद.
https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions७
Reply by MCS Officer | उप जिल्हाधिकारी
Question by सुभाष पाटील
19-06-2023
subhashpatil7867@gmail.com
जय हिंद सर
मी माजी सैनिक आहे
माझ्या वडिलांनी मला 2002 मध्ये 26 गुंठे पैकी 1 गुंठा जागेचा खरेदीखत करून दिले कारण मला घरकुल मंजूर झाले होते माजी सैनिक कल्याण योजनेतून तरी सदरील जागेचा फेरफार ही करण्यात आला पण 2012 मध्ये वडील मयत झाल्यावर भावानी वाटणीपञ करताना त्या जागेला वाटणी मध्ये परस्परात करुन त्या नावाला कमी करण्यात आले अणि सदरील जागेवर माझे 2 प्रशस्त घर आहे अणि 2020 पर्यंत नमुना नंबर 8 सुद्धा आहे पण भावाने आणि त्याच्या मुलाने काही बनावट बाँड च्या माध्यमातून त्यांनी ग्रामपंचायत मध्ये नोंद केली अणि सतत मारून अणि उचलून नेण्याची धमकी देत आहे माझ्याकडे सत्य खरेदी खत अणि त्या संबंधित सातबारा आणि फेरफार सुद्धा आहे
1)तरी 1 गुंठा पुन्हा सातबारा वर आणण्यासाठी काय करता येईल
2)आणि माझे घर पुन्हा मला कशे मिळतील
आपण आपल्या भावासमवेत जे वाटणी पत्र झाले ते कोणत्या पद्धतीने झाले? त्या वाटणी पत्राला आपण संमती दिली का?? जर आपली संमती नसेल व आपल्या बंधूंनी त्याचे वाटप करून अन्य बंधूच्या नावावर वाटपास केल्याचे दाखवलेले असेल, तर असे वाटप पत्र आपण आव्हानित करा. मात्र जे वाटप झाले त्याला जर आपण संमती दिलेली असेल तर जागा केवळ त्या व्यक्तीच्या नावे राहील मात्र त्यावरील घरावरचा हक्क किंवा प्रशस्त बंगल्यांवरचा हक्क हा आपलाच राहणार आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विलास मिसाळ
19-06-2023
vilasmisal1992@gmail.com
सर्व मान्यवरांना माझा नमस्कार.
झोपडपट्टी मध्ये असलेले घर.आई ने मुलाच्या नावे.विक्री पत्र 2006 या वर्षी 20 रुपयांचा बॉन्ड करून विक्री केले.असे करता येते का
ज्या मिळकतीचे मूल्य रुपये १००/- पेक्षा जास्त असेल त्या मिळकतीचे नोंदणीकृत दस्ताशिवाय हस्तांतरण होत नाही . रुपये २०/- च्या बंध्पत्रावरील व्यवहार अनुद्नेय आहे . घेणार्यास कोणताही हक्क मिळणार नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गिरीश भोसले
14-06-2023
Girish.bhosale84@gmail.com
वारस ठरविण्याचा अधिकार किंवा वारसांबाबात निर्णय घेण्याचा अधिकार मंडल अधिकारी यांना आहे का? अपर जिल्हाधिकारी मंडल अधिकारी यांना वारस ठरविण्याचा अधिकार देउ शकतात का? अपर तहसीलदार यांनी वारस ठरविण्याचा अधिकार मंडल अधिकारी यांना दिल्यास काय कारवाई करता येईल?
वारस ठरवण्याचा अधिकार केवळ दिवाणी न्यायालयास आहेत अन्य कोणत्याही महसूल अधिकारी यास नाही . केवळ जे वारस आहेत त्यामध्ये संमती असेल तर , महसूल अधिकारी त्याची नोंद महसूल अभिलेखात करतात .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विलास मिसाळ
14-06-2023
vilasmisal1992@gmail.com
मुद्रांक विक्रेता मुद्रांक रजेस्टर मुद्रांक किती विकले व कुणाला विकले हे कुठे नोंद करतो
मुद्रांक विक्रेत्याकडे मुद्रनंक विक्रीची नोंद वही असते . त्यामध्ये हा सर्व विक्रीचा तपशील लिहिणे आवश्यक आहे . मुद्रांक विक्रेत्यांची वेळोवेळी तपासणी होणे हि आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vidhyadhar S Mokashee
14-06-2023
vishvidhyam@gmail.com
माझ्या भावाने १९९८ ला जमीन खरेदी करुन रजिस्ट्रेशन केले होते परतु त्याचा फेरफार तहसील कार्यालयात थाबवुन ठेवल्याने त्यातील दीड एकर जमीन विक्रिकेलेल्या मालकाने पून्हा तीराहित व्यक्तीला विक्री केलि आहे त्या साठी काय कायदेशीर कार्यवाही करता येईल
मूळ मालकाने आपल्या बंधूंना जमीन विकल्यानंतर 1998 नंतर ज्या दुसऱ्या व्यक्तीस ही जमीन विकलेली आहे व त्या जमिनीची ज्या फेरफार अन्वये अधिकार अभिलेख सदरी नोंद झालेली आहे ती फेरफार नोंद आपण मेहरबान उपविभागीय अधिकारी यांचेकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 247 अन्वये आव्हानित करा.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vidhyadhar S Mokashee
14-06-2023
vishvidhyam@gmail.com
सात बारा वर शेताचे नाव नमूद केलेले नसल्यामुळे शेताचा सर्वे नं, गट नं माहिती होत नाही त्यामुळे सलोखा मध्ये ताब्यातील जमीनी नावी करण्याकरता अर्ज दाखल करता येत नाही. या करीता गाव नमूना सात ब उपयोगी आहे का ? असल्यास तो कसा व कुठे मिळेल ? ताब्यातील जमीनीचे गट नं शेताच्या नावाने काढायचे असतील तर कुठुन काढता येतील?
आपल्या लगतच्या ज्या जमिनी आहेत त्या शेतजमिनीचे भोगवटादार कोण आहेत याचा तपशील तलाठी यांच्याकडे बसून माहित करून घ्या व त्या आधारे शेजारच्या भोगवटा दाराचा भूमापन क्रमांक कोणता त्या आधारे आपला भूमापन क्रमांक निश्चित करण्याचा प्रयत्न करा. यातून आपल्यायला माहिती मिळाली तर पहा अन्यथा भू - अभिलेख विभागाचे भूमापक यांची मदत घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by KUNAL JADHAV
14-06-2023
mr.k1387@gmail.com
अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध MPDA अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येतात. तर, कोणत्या कलमा नुसार वाळू तस्करांविरूद्ध गुन्हा दाखल केला जातो ? MPDA कायद्यात सुधारणा केल्याबाबतची अधिसूचना असल्यास कृपया देण्यात यावी.
खाणी आणि खनिजे ( विकास व विनियमन) अधिनियम 1957 च्या कलम 21 अन्वये अनाधिकृत पणे अथवा विनापरवाना गौण खनिज करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जातो.MPDA कायद्यामध्ये सुधारणा झाल्याची माहिती माझ्याकडे नाही.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pankaj Ade
14-06-2023
Pankajade07@gmail.com
मी आदीवासी जमातीचा असुन बिगरआदिवासीने माझ्या वडिलांच्या स्वभावाचा फायदा घेत कोणतीही परवानगी न घेता जमिनीची इसारपत्र नोटरी करुन घेतले आणि जमीन ताब्यात घेतली विस वर्षापासून जमीन बिगरआदिवासीच्या ताब्यात आहे विक्री झालेली नाही. वडील मयत झाले. आता मला जमीन ताब्यात घ्यायची आहे तर दाद कोणाकडे मागता येईल. कृपया सविस्तर माहिती द्यावी.
आदिवासी खातेदाराकडून बिगर आदिवासी खातेदाराकडे भोगवट्याचे हस्तांतरण झालेले असल्यास, भोगवटा आदिवासी खातेदाराला पुनर स्थापित करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 अनुसार मूळ अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. पुनर स्थापित करण्याबाबतचे जिल्हाधिकारी यांचे हे अधिकार काही जिल्ह्यांमध्ये उपविभागीय अधिकारी( महसूल) यांना दिलेले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये हे अधिकार तहसीलदार यांना दिलेले आहेत. आपल्या वडिलांनी धारण केलेली जमीन जिचा भोगवटा आपल्या वडिलांचा भोळेपणाचा फायदा घेऊन बिगर आदिवासी व्यक्तीने गेले वीस वर्षापासून घेतलेला आहे ती ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यामध्ये उपरोक्त अधिकाराचे प्रत्यापण उपभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यापैकी कोणास केलेली आहे त्याकडे, आपणाला जमीन प्रत्यावर्तीत करून देण्याबाबत अर्ज करावा लागेल. मात्र त्यासाठी आपण आदिवासी समाजाचे आहात त्याबाबतचे जात प्रमाणपत्र व ज्याला पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र दिलेले आहे, असा अभिलेख आपणाकडे असणे आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Pankaj Ade
14-06-2023
pankajade07@gmail.com
बिगर आदिवासीच्या ताब्यातील आदिवासी शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात दाद मागावी की मा. तहसीलदार साहेब यांचेकडे दाद मागावी. कृपया मार्गदर्शन करावे.
उपरोक्त उत्तरात नमूद केल्याप्रमाणे आदिवासी व्यक्तीच्या भोगवट्याचे हस्तांतरण विनापरवाना बिगर आदिवासी व्यक्तीकडे झालेला असल्यास, भोगवटा परत पुनर्स्थापित करण्याबाबतचा अधिकार हा तहसीलदार/ उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपणाला दिवाणी न्यायालयात जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आपण उपरोक्त ्राधिकार्यांकडे अर्ज करावा. अर्जाचे चौकशी ही संक्षिप्त स्वरूपाची आहे त्यामुळे अतिशय लवकर न्याय प्राप्त होतो.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Anshuman
14-06-2023
anshumol2007@gmail.com
आमच्या शेजारील व्यक्तीने ओढ्याच्या काठा लगत विहीर खोदण्याचे सुरु केले असून त्याने तिथे असणारी जुनी आंब्याची झाडेही तोडली आहेत. तसेच खोदकामातून निघणारा माल ओढ्यात टाकला आहे. सदर कामासाठी परवानगी आवश्यक असते का? हे काम बेकायदेशीर असेल तर तक्रार करता येईल का? कोणाकडे.?
आपल्या प्रश्नामध्ये तीन उपप्रश्न असल्याचे प्रामुख्याने निष्पन्न होत आहे.
१. विहीर खोदकाम करण्यासाठी सक्षम प्राधिकार्याची परवानगी आवश्यक आहे काय?
२.आंब्याची झाडे तोडण्यास परवानगीची आवश्यकता आहे का ?
३. ओढ्यामध्ये अश्या पद्धतीने गाळ/उत्खानांतून निर्माण होणारी माती टाकता येईल का ?
या तिन्ही प्रश्नांची उत्तरे खालील प्रमाणे आहेत .
१. महाराष्ट्र भू-जल ( विकास व व्यवस्थापन ) अधिनियम २००९ अन्वये , राज्य शासनास , एखादे क्षेत्र अनुसूचित करता येते . अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित झाल्यावर अश्या क्षेत्र मध्ये विहीर खोदण्यास प्रतिबंध निर्माण होतात . तसेच राज्य शासनास , अनुसूचित क्षेत्राशिवाय गैर अनुसूचित क्षेत्रात विहीर खोद्काम करण्यास प्रतिबंध घालता येतात . आपले तक्रार ठिकाण ज्या क्षेत्रात आहे ते ठिकाण उपरोक्त कायद्याखाली अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं असल्यास अथवा राज्य शासनाने त्यावर निर्बंध घातलेले आहेत का याची खात्री करा .
२.. महाराष्ट्र वृक्षतोड ( नियमन ) अधिनियम १९६४ च्या कलम ३ अन्वये आंब्याचे झाड हे अनुसूचित वृक्ष असल्याने परवानगीची आवश्यकता आहे . विनापरवानगी तोडता येणार नाही .
विना परवानगी अशी झाडे तोडल्यास रु.१०००/- दंड करण्याची तरतूद आहे . तसेच झाडे तोडण्यास वापरण्यात आलेली हत्यारे , वाहने जप्त करण्याची तरतूद आहे .
३. अशी माती टाकता येणार नाही . उपरोक्त कृत्य हे “आगळीक” या भारतीय दंड संहितेच्या कलम ४२५ मधील , व्याख्येमध्ये येऊ शकते . दंड संहितेच्या कलम ४३० किंवा ४३१ अन्वये , जो कोणी पाटबंधारे कामाची खराबी करतो अथवा पाण्याची दिशा /पातळी बदल्ण्याचा प्रयत्न करतो त्यास , पाच वर्षापर्यंत व द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mittal vartak
12-06-2023
shilparaut35@gmail.com
मी मित्तल वर्तक तालुका वसई गाव उमळे येथे राहत आहे आमचं गावामध्ये वडिलोपार्जित साधारणता 80 ते 90 वर्षं पूर्वीपासूनचे सामायिक घर आहे त्यामध्ये माझ्या हिस्स्यामध्ये आम्ही वेळोवेळी दुरुस्ती केलेली आहे तसेच आता मी माझा हिस्स्यामध्ये दुरुस्ती करत असताना सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले आहे आणि ते त्यासाठी मी दुय्यम निबंधक येथे रजिस्ट्रेशन सुद्धा केलेले आहे घराची घरपट्टी माझ्या नावावर आहे माझ्या भागासाठी मला सहकारी संस्थेने बोजा चढवण्यासाठी एक पत्र दिलेले आहे आणि त्यानुसार तलाठ्याने त्यावर फेरफार सुद्धा टाकलेला आहे परंतु पंधरा दिवसाचा कालावधी असल्याने तो अजून मंजूर झालेला नाही आणि त्यामध्ये माझ्या घराचं क्षेत्र सुद्धा नमूद केलेला आहे परंतु आता माझ्या आत्याने बोजा चढवण्यासाठी विनाकारण अडाणूक करण्याच्या हेतूने हरकत घेतली आहे तरीही मला बोजा चढवायचा आहे आमच्या सर्व जमीन या सामा सामायिक असल्याने जमिनीवर बरीच नावे आहेत आणि मी बँकेने के कडून लोन घेताना बऱ्याच सहधारकांच्या ज्यामध्ये आत्याचं सुद्धा ना हरकत दाखला सुद्धा घेतलेला आहे तरीही या संदर्भात मार्गदर्शन करावे
आपल्याला कर्ज घेण्यासाठी आपल्या अन्य नातेवाईकांसह आपल्या आत्याने जर ना- हरकत दिलेली असेल तर त्याबाबत बँकेचे कोणतीही हरकत नसेल तर आपली बोजा चढवण्याची नोंद मंजूर करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. मात्र हरकत देऊनही परत आत्या बोजा मंजूर करताना काही आक्षेप घेत असेल, तर त्याबाबत बँकेची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहील. कारण जर कर्जाची फेड झाली नाही व मालमत्ता विकण्याचा किंवा गहाण ठेवलेल्या घराचा भाग विकण्याचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळी बँकेला अडचण येणार आहे . त्यामुळे बँकेचा निर्णय महत्वाचा आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Swapnil Dayaram Fating
11-06-2023
swapnilfating97@gmail.com
अतिक्रम धारकांवर कारवाही न करण्या बाबत GR जि चंद्रपूर
Question by वाघ एकनाथ महारु
09-06-2023
wagheknath@yahoo.co.in
भूमापन क्रमांकाची सनद मिळविण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ च्या कोणत्या नियमानुसार आणि किती फिस आकारली जाते ?
महाराष्ट्र जमीन महसूल( गाव, शहरे व नागरिक सर्वेक्षण) नियम 1969 च्या नियम 10 अन्वये नागरी भागातील जागेचे सर्वेक्षण झाले असल्यास, सनद देण्याची तरतूद आहे. त्या साठी रु. १ /- एवढी फी आकारली जाते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandip Madhukar Gaikwad
09-06-2023
gaikwadsandy6768@gmail.com
1950 purviche 7/12 che records have ahet.
Gaikwad navache
जुने सर्व सातबारा उतारे हे त्या त्या तालुक्याच्या अभिलेख कक्षामध्ये जतन करण्यात आलेले आहेत. आपल्याला ज्या जमिनीचे सातबारा उतारे हवे आहेत त्या जमिनीच्या तालुक्याच्या ठिकाणी अभिलेख कक्षाशी आपण संपर्क साधून आपण गायकवाड नावाचे १९५० पूर्वीचे उतारे मिलतील .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विलास मिसाळ
07-06-2023
vilasmisal1992@gmail.com
स्लम वस्ती मधल्या काही गल्ली(रस्ते) आहे.तेथील लोक जाण्या येण्याच्या रस्त्या वर.नको असलेले बांधाकाम करत आहे.अतीक्रम करण्या साठी काही उपाय असल्यास मार्गदर्शन करावे.
(संबंधी नगर सेवक या कडे दुर्लक्ष करतो कारण त्यांचे वोटिंग फूटते)
झोपडपट्टी प्राधिकरणाच्या सक्षम प्राधीकार्याकडे तक्रार करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Samruddhi Suresh Shinde
07-06-2023
shindesamruddhi7429@gmail.com
Jaga kadhi nightil update
शासन जाहिरातीद्वारे याला wide publicity देते. त्यामुळे शासनाच्या जाहिरातीकडे लक्ष असू द्यावे.
Reply by MCS Officer | उप जिल्हाधिकारी
Question by Madhukar Pakakle
06-06-2023
madhukarpakale111@gmail.com
कृपया मार्गदर्शन करावे
सन १९९८ मध्ये मौजे हारगुळ बु ता.जि. लातूर येथील जमीन गट नंबर १६३ प्लॉट नंबर ९४ दिड पानी एन.ए. प्लॉट खरेदी करण्यात आला होता.
परंतु लातुर येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे दीड पानी रजिस्ट्र बंद आहेत म्हणून सांगितले आहे. जर रजिस्ट्र करायची असेल तर काय करावे लागेल मार्गदर्शन करावे ही विनंती.
मधूकर पकाले
मो. 7709477088
रा. लातूर
आपणास दिड पानी म्हणजे दीड गुंठे अशे म्हणायचे आहे का ? जर भू खंड बिनशेती असेल व अभिन्यासातील असेल तर त्याचे नोंदणीवर निर्बंध नाहीत .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3374 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
