जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Vinayak
26-03-2023
vinayakmalegaon@gmail.com
Is there a need to make payment of NAZARANA, regarding Watan land which was used for Residential N.A. purposes with the prior permission of The Collector?
Question by जाधव निलेश
20-03-2023
dineeshjadhav@gmail.com
आजोबांच्या जमिनीत नातीचे नाव (मुलीची मुलगी) लागेल का ? आजोबा ह्यात आहेत. मुलीची आई ह्यात नाही. जमीन वडिलोपार्जित आहे.
होय लागू शकेल . त्यासाठी नातीने तिच्या हिस्स्याच्या मिळकतीचे वाटप करून मागावे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Himanshu Patil
17-03-2023
himanshupatil1992@yahoo.com
How to remove 1 acre of reservation from my 7/12 extract. Where can i get the procedure to remove reservation. Town Planning authority not sure which exactly 1 acre is reserved out of total land.
Reservation is shown on the Development Plan Maps. You may refer to those Maps. Town Planning Authority is concerned with Regional Plan and not Development Plan. In the Regional Plan, the area is subdivided into zones.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by जाधव निलेश
15-03-2023
jadhavdinesh.1a@gmail.com
मामाने आईचे ( आई ह्यात आहे )
हक्कसोडपत्र करून घेतले आहे. परंतु तिच्या विवाहित मुलीला परिस्थिती मुळे त्या जमिनीत हिस्सा पाहिजे. काही कायदेशीर मार्ग आहे का ? कृपया मागदर्शन करावे.
जे हक्क सोड पत्रक तयार केले आहे ते जर नोंदणीकृत असेल तर आपणास न्यायालयाकडून ते रद्द करून घ्यावे लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by साधना जाधव
15-03-2023
dis.jadhavs@gmail.com
माझ्या मामाने माझ्या आईकडून वडिलोपार्जित जमिनीचे हक्कसोडपत्र करून घेतले आहे ( आई ह्यात आहे )
परंतु मला त्या जमिनीत हिस्सा पाहिजे. तो मिळण्यासाठी काही कायदेशीर पर्याय आहे का ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
Question by sushant vartak
15-03-2023
sushantvartak1980@yahoo.co.in
नमस्कार साहेब , वसई , उमेळे येथे राहत असून आमचा वडिलोपार्जित संपत्ती मध्ये (शेत जमिनीमध्ये ) वडील जिवंत (हयात) असताना वडिलांची संमती असेल तर मुलाचे नाव सातबार्यावर आणू शकता येते का? सदर सातबारा मध्ये माझ्या वडिलांचा अविभाज्य हिस्सा आहे आणि सातबारावर 90 पेक्षा जास्त लोकांची नावे असल्याने बक्षीस पत्र अथवा विक्रीपत्र करण्यासाठी सर्वांची संमती घेणं कठीण आहे तरी मुलाचे नाव सातबारावर येण्यासाठी काही उपाय सुचवा.
जमिनीचे सरस- निरस वाटप करून मागा . सह खातेदार संमती देत नसतील तर न्यायालयात दावा दाखल करून हिस्सा निछिती व त्याप्रमाणे ताबा मिळणे बाबत दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Karan abhinay bodhe
15-03-2023
bodhekaran.2323@gmail.com
स.नं 1935 पासुन सातबाराचे लेखन करण्याचे राहून गेल्यास त्यांचे पुनर्लेखन महसूल अधिनियम 1966 कलम 155 नुसार करता येईल का ?
कलम १५५ खाली पुनर्लेखन होत नाही तर लेखन प्रमाद चूक दुरुस्त करता येते
पुनर लेखन आता त्याचा काही उपयोग आहे का ? ७/१२ संगाक्न्कीकरण या मध्ये 7/12 पुनर्लेखन झाले आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Wasim Sayyed
14-03-2023
wasimsayyed2007@gmail.com
आजोबानो शेत सर्वे नं. ५२, १९५२ ला २००० रु. ला खरेदी केला होता. एकूण क्षेत्रफळ २५७१७ एवढ होता. काही काळ स्वतः वहीती केल्या नंतर आजोबाने शेत एका व्यक्तीला मक्त्याने दिला सन १९६०-६१. "पेरे पत्रक" नुसार त्याने सन १९६० ते १९७० पर्यंत मक्त्याने शेत वहीती करत होता. सन १९७३ ला शेत त्याने स्वतःच्या नावाने केला. असा उल्लेख फेरफार नोंदी मध्ये आहे. सन १९७३ ला एकाच दिवशी २०/०८/१९७३ त्याच्या नावाने तीन फेरफार झाले आहे. ते पुढील प्रमाणे –
१) सर्वे नं. ५२/१ एकूण क्षेत्रफळ २४७१६,
२) सर्वे नं. ५२/२ एकूण क्षेत्रफळ १७१
३) सर्वे नं. ५२ एकूण क्षेत्रफळ २५७१७.
असे एकूण एकाच दिवशी तीन फेरफार झाले आहे. फेरफार नं. १ व २ च्या समोर “भूस्वामी खरेदी हक्काने श.मा.क्र. ४७९/५९(१३)/६३-६४ प्रमाणे शेत सर्वे नं. ५२ सरकार पासून खरेदीस घेतला” असा शेरा आहे. व फेरफार नं. ३ च्या समोर “पोट हिस्सा एकत्र झाल्यामुळे फेरफार” असा शेरा आहे. हक्क नोंदी पत्रकात सुद्धा अश्याच प्रकारे उल्लेख आहे. खरेदी खताच्या नक्कल मध्ये “Purchase under section 43 of the Bombay Tenancy and Agriculture Lands (Vidarbha Region and Kutch Area) Act, 1958.” प्रमाणे दिनांक २२/०५/१९७३ ला शेत ९२२ रु. खरेदीस घेतला असा उल्लेख आहे. अश्या प्रकारे आजोबा च्या मालकीचा शेत मक्त्याने करणाऱ्या वैक्तीच्या ताब्यात गेला. या सर्व प्रकरणाच्या कालावधीत आजोबा जिवंत होते. आजोबा अशिक्षित असल्यामुळे संबधित व्यक्तीने याचा फायदा घेऊन शेतावर आपला ताबा केला.
सर माझा प्रश्न असा आहे कि आजोबाला भूमिहीन करून सरकारने शेत संबधित व्यक्तीला कसा काय विकला असेल? या प्रकरणी आमचा दावा चालू शकतो का? किंवा कसे? किती एकर पर्यंत कुळ कायद्यांतर्गत शेत कुळाच्या ताब्यात जातो? शेत मालकाला पूर्णतः भूमिहीन करता येवू शकते का? कुळ मयत झाल्यामुळे आता आम्ही आमचा मालकी दावा करू शकतो का? किंवा कसे? सर कृपया सविस्तर माहिती द्यावी.
Question by Raghoji atmaram Shinde
14-03-2023
raghoji464@gmail.com
नमस्कार सर,
तलाठी साहेबांकाडे भावाच्या सम्मतीने बहिनीचे
नोंदनीकृत हक्कसोड पत्र रद्द करता येते का ?
Question by Vibhali dalvi
14-03-2023
makarand.sawant1@gmail.com
Sir talathi bharthi che form kadi nighnar ahe
Question by Rahul
13-03-2023
jadhav.rahul111@yahoo.in
सर, माझ्या आजोबांनी एका व्यक्तीला 3 गुंठे जमीन विकली होती. परंतू एकत्रीकरणात आणेवारी दाखल होताना चुकीची दाखल झाली व सदर व्यक्तीच्या नावापुढे खरेदी क्षेत्रापेक्षा जादा क्षेत्राची नोंद झाली, (3 गुंठे सोडून बाकी क्षेत्रावर आमचीच ताबेवहिवाट आहे) याबाबत आम्ही उपसंचालक भूमि अभिलेख यांचेकडे अर्ज करुन ही बाब योग्य ते पुरावे देवून निदर्शनास आणून दिली. याबाबत स्थळ पहाणी झाली. परंतू ज्याव्यक्तीच्या नावे जादा क्षेत्र लागले आहे त्याच्या वारसाने आम्हालाच वकिलांमार्फत नोटीस पाठवून सदर जागा माझी असून तुम्हीच बेकायदेशीर वहिवाट घातली असून आम्ही लावलेला उसही मीच लावला असल्याचे खोटे नाटे नोटीस मधे नमूद केले आहे. सदर नोटीसीला आम्ही कायदेशीर उत्तर दिलेले आहे. परंतू तरीही सदर व्यक्ती तलाठी कार्यालय, पोलीस स्टेशन, उस कारखाने याठिकाणी आमचे विरुध्द अर्ज देवून आमच्या उसाची नोंद घेऊ नये अशा आशयाच्या तक्रारी करीत आहे.
याबाबत आम्ही काय करावे. कृपया मार्गदर्शन करावे.
एकत्रीकरन योजनेतील चुका दुरुस्ती करण्याबाबत उपसंचालक भूमी अभिलेख यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rajendra Aher
12-03-2023
rajendra.aher@yesbank.in
Jaminichya mulyankana sabandhit margadarshak suchna 29 B mhanje kay ahe
Question by प्रणव सोनार
11-03-2023
pranavpandit9698@gmail.com
नमस्कार
माझे वडील व चुलते यांचे नाव भोगावातदार सदरी आहे. व त्यांच्या आत्याची नांवे इतर हक्कात आहेत. सदर वाटणी ही 1984 साली झालेली आहे. सध्या इतर हक्कातील सर्व व्यक्ती मयत असून ती नावे जर आम्हाला कमी करायची असतील तर होतील का? किंवा जमीन व्यवहार करण्यास त्याची काही अडचण येईल..
(2) 1965 साली आमच्या जमिनीतून रस्ता गेलेला आहे. सध्या तो प्राधानमंत्री सडक योजनेतून मोठा देखील झालं आहे. या गोष्टीचा फायदा प्रकल्पग्रस्त म्हणून होईल का? त्याचा मोबदला आम्ही घेतलेला नाही.
Question by Vilas misal
10-03-2023
Vilasmisal1992@gmail.com
सर्व मान्यवरांना सर्व प्रथम माझा नमस्कार.काही वर्षा आगोदर आमची शेती इतर लोकांनी परस्पर नावे करून घेतली.व आम्ही कोर्ट केस दाखल केली आहे. व आमचे वकील साहेब काही स्टे ऑर्डर काढत नाही.व प्रती वादी जे आहे ते सर्व अनुदान लाभ घेत आहे.अनुदान बंद करण्या साठी मी स्वतः काही प्रोसिजर करून हे अनुदान बंद करू शकत नाही का.क्रुपया काही पर्याय असल्यास सहकार्य करावे
Question by मनोज मधुकर मुंडये
10-03-2023
manojmundya@yahoo.com
आम्ही भूमीहीन आहोत,आमच्या कडे जमिनी चा छोटासा तुकडा नाही, आम्हाला सरकार माफॅत जमिनी मिळू शकते काय?त्यासाठी काय करावे,कोणाला भेटावे,लागणारी कागदपत्रे सांगा.
Question by दौलत नरसाळे
09-03-2023
daulatn9@gmail.com
सर गट न 362गोरेगाव पारनेर इतर हक्क मध्ये नोंद झाली तहसीलदार साहेबांनी 1950 पासून चे कागदपत्रे मागितली होती ती आम्ही दिली आमची खरेदी 19/०३/1956 ची आहे 1950 ते 2022 पर्यंतची सर्व कागदपत्रे कुळ शाखेत जमा केली आता ते म्हणतात की आम्ही निर्णय नाही घेऊ शकत आम्ही काय करावे आता आम्हाला माहिती द्या
Question by Laxmikant Sheshrao Parihar
09-03-2023
lxmkntparihar11@gmail.com
माझ्या प्लॉट समोरील रस्ता मध्ये मंजूर असूनही सदरील रस्ता वारंवार आमचीच जमीन आहे असे म्हणून लातूर आतील डी फार्मसी कॉलेज वाली अडवणूक करत आहेत तरी डीपी प्लॅन प्रमाणे रस्त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी महानगरपालिका टाळाटाळ करत आहे यासाठी काय करावे
Question by विजयराज तानाजी खरात
09-03-2023
vrajkharat99@gmail.com
एका गटामधून आम्ही 0.21 हे आर एवढी शेतजमीन खरेदी केली आहे सदर जमीन साठी कायम रस्ता व कॅनॉल पाण्यासाठी दंड / पाट खरेदी घेतली आहे. मूळ मालकाने गटातील उर्वरित क्षेत्र बेकायदेशीर रित्या गुंठेवारी पद्धतीने इतर लोकांना दिले आहे त्या गुंठेधारक लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तर पाटाच्या पाण्यात सांडपाणी सोडले आहे आम्ही पोलिसांना न्याय मागितला ते बघ्याची भूमिका किंवा साधी कलम लावत आहेत कृपया मार्गदर्शन व्हावे
Question by sagar patil
08-03-2023
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की आमच्या आजोबांचे चुलते त्यांना कोणी वारस नसल्यामुळे आमचे आजोबा त्यांच्या हीशाची सर्व जमीन खरेदी खताने 1960 ला विकत घेण्यासाठी गेले असता आमच्या आजोबांना त्यावेळेस सांगण्यात आले की तुमचे चुलते भूमिहीन होत असल्यामुळे खरेदीखत करता येणार नाही पुढे 1962 ला ते चुलते मयत झाले तर आजही सातबारा वरती त्यांचेच नाव आहे व ती जमीन तेव्हापासून आमच्याकडेच आहे तर त्या सातबारा वरती आमची नावे लावण्यासाठी काय करावे लागेल (आजोबांना पाच भाऊ आहेत)
Question by sagar patil
08-03-2023
sp109391@gmail.com
सर माझा प्रश्न असा आहे की सातबाराच्या इतर अधिकारामध्ये XYZ व्यक्तीने रक्कम रुपये 325 दिनांक 1992 रोजी कोर्ट अवॉर्ड करून घेतले असे नमूद केले आहे तर कोर्ट अवॉर्ड करून घेणे म्हणजे काय
Question by Sachin b gawande
08-03-2023
s18gawande@gmail.com
सर मी कारंजा नगरपरिषद अंतर्गत लेआऊट मधे प्लॉट घेतला त्याला शिवडी रस्ता लेआऊट मॅप मधे होता आणि आता बाजूला २ लेआऊट झाले आणि त्यांनी त्या शिवडी रस्त्या मधे पलोटिंग केले त्याबाबत तो शिवडी रस्ता मोकळा कशाप्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन मिळावे ही विनंती
Question by Sachin gawande
08-03-2023
s18gawande@gmail.com
सर मी एक प्लॉट घेतला त्याला लागून शिवडी रस्ता होता आणि आत बाजूला नवीन लेआऊट झाले आणि तो शिवडी रस्ता प्लॉट टाकण्यात आले आहेत तो रस्ता अत्त अतिक्रमण मुक्त कशाप्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती
Question by महेंद्र कांबळे
07-03-2023
ranjanakamble652@gmail.com
सर माझा असा एक प्रश्न आहे की माझ्या वडिलांनी मी लहान असताना माझे नाव पाच एकर जमीन रजिस्टर केली होती तेव्हा मी अज्ञान पालक होतो आता सध्या माझं वय 36 आहे आणि आत्ता सातबारा माझ्या नावाने निघतो सध्या माझ्या वडिलांनी माझ्याकडून पाच एकर जमीन रजिस्टर खरेदी केली आहे अमुक अमुक एवढे पैसे मिळाले असा उल्लेख आरटीजीएस केला आहे तरीही माझ्या अकाउंटला एकही रुपया जमा झालेला नाही खरेदी झाल्यानंतर मी तहसील मध्ये अर्ज केला होता की माझ्या अकाउंटला एकही रुपया जमा झालेला नाही तरी तुम्ही फेर फार नोंद घेऊ नये तरीसुद्धा आमच्या गावातील तलाठ्याने फेरफार नोंदवला आहे तरी मला काय करावा लागेल प्रोसेस कशी असेल
Question by रोहिदास हरिभाऊ काळे
06-03-2023
rohidaskale19@gmail.com
आदरणीय महोदय,
आधी विचारलेल्या प्रश्नास व उत्तरास अनुसरून,
गावा शेजारी ७/१२ उताऱ्यावर नसलेली डोंगराळ पड जमीन कृषी वन निगडित प्रयोजने साठी जर शासनाकडून / वन विभागाकडून खरेदी घ्यावयाची असेल तर कश्या प्रकारे मागणी अर्ज करता येईल या बद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
रोहिदास काळे
आधीचा प्रश्न
प्रश्न : मला महाराष्ट्र शासनाची / वन महसूल विभाग मालकीची गावा शेजारी असलेली कमी उंचीचे लहान डोंगराळ वा टेकडी भाग जमीन हि कृषी वन निगडित प्रयोजने साठी खरेदी घेवयाची आहे. तर त्यासाठी कोणाकडे अर्ज करावा लागेल. तसेच शासन जमीन खासगी कृषी वन निगडित प्रयोजने साठी प्रदान करण्याचे कोणाला अधिकार आहेत व त्या साठी कोणत्या गोष्टींची वा कागद पात्रांची आवश्यकता आहे.
शासनाकडून कमी उंचीचे लहान डोंगराळ व टेकडी जमीन भाग हा कृषी निगडित प्रयोजने साठी खरेदी घेऊ शकतो काय या बद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
उत्तर : वृक्ष लागवडीसाठी जागा देण्याचे अधिकार, वित्तीय मर्यादेनुसार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासनास आहे. आपण मागणी करत असलेली जागा आपल्या जागे शेजारी आहे असे आपल्या प्रश्नावरून दिसून येते. शासनाकडून मागणी करणाऱ्या व्यक्तीला, जास्तीत जास्त पडीक जागा दोन हेक्टर, एक पाणी असणारी जागा एक हेक्टर व बागायत जागा पडीक जागेच्या निम्मी मिळतो. यासाठी आपणाला जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेचा सातबारा उतारा सह आपला मागणी अर्ज करावा लागेल. त्या आधारे जिल्हाधिकारी प्रकरणाची चौकशी मेहरबान तहसीलदार साहेब यांची कडून करून घेतील. व जागेची शिघ्र सिद्धगनका नुसार येणारे मूल्य, उपरोक्त नमूद महसूल अधिकारी यांच्या वित्तीय मर्यादेमध्ये असेल त्याप्रमाणे संबंधित त्याबाबत निर्णय घेतील.
महसूल किंवा वन विभाग जमीन विकत देत नाही . शासनाकडून जमिन प्रदान केली जाते . त्याची कार्य पद्धती आपणास या पूर्वी सांगितली आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vivek Kondawar
04-03-2023
vkkondawar@gmail.com
आमच्या सोसायटीने (पोस्टल ऑडिट कॉलोनी) ५०+ वर्षांपूर्वी नागपुरात शेतजमीन विकसित करून प्लॉट्स विकले होते. तेंव्हापासून वार्षिक NA (non-agricultural) टॅक्स आम्ही भरतो आहे. सध्या त्याच्या ५-६ किलोमीटर पलीकडेही sanctioned लेआऊट्स आहेत.
१) हा टॅक्स बंद केल्याची बातमी वाचल्याचे लोक सांगतात, ते खरे आहे काय
२) हा टॅक्स भरण्याकरिता कलेक्टर ऑफिस मध्ये जावे लागते. आणि फार त्रासाचे आहे वृद्ध लोकांकरिता. तो online भरता येईल काय? कोणत्या संकेतस्थळावर?
NA Tax बंद केलेला नाही . आपण online NA Tax भरू शकता . GRAS हे शासन संकेत स्थळाचे नाव आहे . या संकेत स्थालाद्वारे द्वारे आपण हा कर भरू शकता .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3374 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
