जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Anand Ankush Rawool
08-11-2021
dymane101@gmail.com

नमस्कार सर,
माझ्या आजोबांना दोन बायका होत्या.पहिल्या पत्नीस एकच मुलगा असून, ते आता हयात नाहीत. तर, दुसऱ्या पत्नीस दोन मुले व दोन मुली आहेत. पैकी आतादुसऱ्या पत्नीच्या दोन मुली व एक मुलगा हयात आहे. आजोबांना वडिलोपार्जित 14 एकर जमीन असून, दुसऱ्या पत्नीला भाऊ नसल्याने त्या पत्नीची 28 एकर जमीन होती. परंतु या 28 एकर जमिनीवर आजोबांचे नाव लागल्याचे कागदपत्रावरून दिसून येत नाही. त्यामुळे संपूर्ण 28 एकर जमीन पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावावर झाली आहे, त्यामध्ये इतर भावंडांना हिस्सा मिळालेला नाही. तसेच पहिल्या पत्नीच्या मुलानेवडीलोपार्जित 14 एकर जमिनीमध्येही तिसरा हिस्सा घेतला आहे. मात्र दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर जमिनीमध्ये कोणताही हिस्सा दिलेला नाही(सदर कालावधी साधारण सन-1970 ते 95 मधील आहे.). तर, आता आजोबांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना 28 एकर शेत जमिनीमध्येसमानहिस्सा मिळेल किंवा कसे, तसेच याबाबत 28 एकर जमिनीमध्ये समान अधिकार मिळविण्यासाठी कायकरावे लागेल? कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.
AnandAnkushRawool
२८ एकर जमीन हि दुसऱ्या पत्नीची आहे . दुसरी पत्नी , हि आजोबांच्या अगोदर मयत झाली असल्यास , ती मिळकत वारसाने तिची मुले व आजोबा यांना समान हिस्यामध्ये मिल्ने आवश्यक . म्हणजे दोन मुली व दोन मुले . एका मुलगा मयत आहे . त्यास जर वारस असतील तर ते हि मयत मुलास मिळणार हिस्सा (१/४) हक्कदार आहेत .
दुसरी पत्नी मयत झाल्यावर पहिल्या पत्नीच्या मुलाचे नाव ज्या फेरफाराची लागले तो फेरफार अहवानीत प्रांतांकडे करावा लागेल . जर विलंब खूप असेल तर , दिवाणी न्यायालयात , हक्क निश्चित करून मी हीने बाबत दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sarang
04-11-2021
darya21@gmail.com

सर शेजारचा शेतकरी बांध फोडत आहे तो म्हणतोय पूर्वेकडील बांधावर माझा अधिकार आहे मी फोडणारच तरी मी काय करु मला तहसीलदार किंवा sdo यांच्याकडून मदत मिळू शकते त्यासाठी काय करावे
तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करावी

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
तलाठी यांनी फेरफार नोंद घेतल्यानंतर मंडलाधिकरी यांनी ती नोंद प्रमाणित करण्याचा कालावधी किती असतो त्याबाबत काही परिपत्रक आहे का. प्रमाणभूत क्षेत्र जसे ११ आर हे क्षेत्र ३ व्यक्तींना समाईक घेता येते का त्यामुळे तुकडेबंदी कायद्याचा भंग होतो का ?
मंडळ अधिकारी यांनी 25 दिवसात नोंदीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची जमीन जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय विकत घेता येणार नाही आणि असे क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर ते सामायिकात विकत घेता येणार नाही

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

Question by Shridhar Dhaware
03-11-2021
shridhar.d333@gmail.com

नमस्कार सर,
माझे आजोबा यांनी 1951 मध्ये नोंदणीकृत खरेदीखताने जमिनी खरेदी केलेली आहे. तद्नंतर शासनाने ती जमिन निर्वासीत मालमत्ता (Evacuee Property) म्हणून जाहिर करुन 1954 ला पाकिस्तानातून भारतात आलेल्या एका निर्वासित व्यक्तीला दिली व त्याची सनद 1958 ला सदर निर्वासित व्यक्तीला दिली होती. या निर्वासित व्यक्तीने 1980 ला ही जमिन गावातीलच इतर व्यक्तींना कायम खरेदीने विकली आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की, जर ही निर्वासीत मालमत्ता पाकिस्तानाहून भारतात स्थलांतरीत झालेल्या व्यक्तीला दिली होती तर अशी जमीन विकताना त्यासाठी शासनाची पूर्व परवानगीची आवश्यकता आहे का ? असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागते आणि नसेल तर त्यासाठी कोणती तरतूद आहे ? कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
अशी जमीन विकतांना शासनाची किंवा शासनामार्फत नियुक्त केलेल्या कस्‍टाोडियन यांची परवानगी आवश्यक आहे आपण संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,
सन २००८ साली मनपा.हद्दीत ०-०३ आर चे खरेदीखत केले आहे.त्याबाबत का.तलाठी यांना आता गावदप्तरी सदर खरेदीखताची नोंद घेता येईल का?किंवा कसे?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती...
२००८ साली हि खरेदी केले क्षेत्र मनपा हद्दीत होते का ? असल्यास गाव दप्तरी नोंद होण्यास अडचण नाही .
नसल्यास नवीन तरतुदी नुसार दंड भरून व्यवहार नियमानुकूल करून घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sarang
29-10-2021
darya21@gmail.com

सर 1967 रोजी इनामी वर्ग 6 अ ची जमीन परवानगी न घेता 400 रुपयात खरेदीखत करून घेतली आहे आज तो दस्त नियमित करायचा आहे तर त्यासाठी किती रक्कम भरावी लागेल
संबंधित तहासदिलदार कार्यालयात विचारणा करणे उचित

Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
सर आम्ही 2002 साली खरेदीखत करून जमीन विकत घेतली आहे. सदर जमीन दोघे भाऊ यांचे 141 आर क्षेत्र होते. ते क्षेत्र विभागणी करून मझी आई विद्या.व दोन चुलती यांच्या नावावर 47आर अशी विभागणी केली आहे.तसेच ती जमीन तोंडी वाटपाने आम्हाला 2005 साली देण्यात आली आहे.
सदर जमीन अहमदनगर -सोलापूर रोड क्र 516 च्या चौपदरीकरण साठी 2017 साली संपादित झाली आहे. तेव्हा पासून चे रस्ता सर्व्हे, 3d प्रांत ची नोटीस, नकाशा हे सर्व ची नोंद माझी आई विद्या यांच्या नावावर झाली आहे, तसेच निवाडण्यात ही आई च्या नावानेच नोंद आहे. सदर जमिनीत आम्ही 2011 साली घरबांधणी केली आहे तसेच त्याची 7/12 उतारा वर वस्तीपड लावून ग्रामपंचायत ला 2013 साली नोंद केली आहे. 2013 सालापासून ते 2021 पर्यंत घरपट्टी , पाणीपट्टी आपण भरलेली आहे, तसेच सदर जमिनीत एक बोरवेल घेतलेला आहे. त्याची नोंद 7/12 उतारा वर बोरवेल पड म्हणून लावली आहे. व लाईट चे कोटेशन 2013 साली भरले आहे. तसेच या क्षेत्रात आंबा फळबागेची आपण 2016 साली लागवड केली आहे.त्याची नोंद व पावती आहेत. या सगळ्या गोष्टी ची उपविभागीय अधिकारी यांच्या निवाड्यात नोंद आहे. आणि निवाडा तयार होपर्यंत माझ्या चुलतींनी कसली ही हरकत व अर्ज केलेला नाही,
सदर जमिनीचा मोबदला मिळत्या वेळी प्रांत अधिकारी यांनी ७/१२ उतारा वर असलेल्या सर्व नांवाच्या व्यक्तींची सहमती लागेल असे सांगितले होते. तर 2 चुलतींनी सहमती दयायला विरोध केला. तर त्यानंतर मी प्रांताधिकारी यांच्या सल्यानुसार अर्ज करून प्रत्यक्ष पाहणी साठी यावे ही विनंती केली. तर 16/9/21 ला उपभूमिअभिलेख श्रीगोंदा येथील शिरस्तेदर पाहणी करता आले व त्यांनी अहवालात वहिवाट व ताबा तसेच इतर पुरावे लक्ष्यात घेऊन परत 3d नोटीस च्या नावाप्रमाणेच अहवाल पाठवला त्या मध्ये माझ्या दोघी चुलतींचे नाव कमी झाले. व पैसे घेणारे माझी आई व गट क्रं मधील 4 असे एकूण 5 लोकांची सहमती घेऊन पैसे काढून घ्यावे असे प्रांताधिकारी यांनी संगीयतले. तर त्या अहवाल वर माझ्या चुलत्या यांनी हरकत घेतली व हा अहवाल खोटा बनवला असे हरकत घेऊन परत पाहणी चा अर्ज केला तर परत पाहणी करता उपअधीक्षक भूमिअभिलेख श्रीगोंदा हे पाहणीला आले तर परत जुना अहवाल त काही बदल न करता पाठवला.
1)सदर जमिनीचे आम्हाला पैसे काढण्यासाठी काय करावे लागेल
2) सदर जमिनीत 5 जण मोबदला घेणारे आहेत तर त्या पैकी माझे चुलते सहमती देत नाहीत. बाकी 4 जण तयार आहेत.तर आमच्या 4 घांचे पैसे काढण्यासाठी काय करावे?
3) गटामधील इतर व्यक्ती सोडून आपले वयक्तिक रक्कम काढता येईल का?
४) जर पैसे नाही निघाले तर पुढे काय करावे
5) भविष्यात जर हे प्रकरण न्यायालयात गेले तर काय होईल?
ह्रषीकेशजी
खरतर जमीन ज्या व्यक्तीच्या नावे खरेदी केली आहे त्या सर्व व्यक्तींची नावे ७/१२ ला लागणे आवश्यक आहे . त्यामुळे मिळकत ज्यांचे नावे मिळकत खरेदि करण्यात आली आहे त्या सर्वांचा भू संपादन नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे .
इतरांना म्हणजे ज्याचे नावे मिळकत खरेदी करण्यात आली आहे त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळू द्या
प्रकरण न्यायालयात गेल्यास , सर्वाना नुकसान भरपाई मिळेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Shridhar Dhaware
27-10-2021
shridhar.d333@gmail.com

सर, एखादी निर्वासित मालमत्ता सनद देऊन जर कोणाला अलॉट केली असेल तर अशी जमिनी विक्री करताना परवानगीची आवश्यकता आहे का ?
निर्वासित मालमत्ता प्रदान केल्यानंतर त्या मिळकतीवर कोणतेही निर्बंध नाहीत . अशी मालमत्ता free -hold आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul B Kale
18-10-2021
rahulrk7085@gmail.com

सर माझा प्रश्न असा आहे की, जर एका कुटुंबात 2 भाउ व 1 बहीण आहे. त्या बहीणीने जर हक्कसोडपत्र एका भावाच्या लाभात करून दिले असेल व अशा हक्कसोडपत्रान्वये 7/12 पत्रकी अंमल होवुन बहीणीचे नाव कमी झाले असुन फक्त दोन भावांची नावे दाखल आहेत.


तर ते हक्कसोडपत्र दुस—या भावाच्या लाभात देखील सोडुन दिले जाते किंवा नाही ? तसेच सदरील 7/12 पत्रकी कोणाचा किती हिस्सा आहे ?
दोन भाऊ व एक बहीण आहे . बहिणीने एका भावाच्या लाभत आपला हक्क सोडून दिला आहे त्यामुळे बहिणीचा १/३ हिस्सा ज्या भावाच्या लाभात हक्क सोडला आहे त्याचे लाभात होईल . दुसऱ्या भावाच्या लाभात हक्क जाणार नाही . एका भावाचे नावे २/३ हिस्सा व दुसऱ्या भावाचे नावे १/३ हिस्सा होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर माझ्या मामाने माझ्या आईचा अंगठा घेऊन विनामोबदला हक्कसोड पत्र बनवलेलं आहे माझ्या आईच त्यावेळी वय ७५ वर्षे होत आणि ती अज्ञानी होती तर ते हक्कसोडपत्र रद्द होऊ शकते का आईचा मृत्यू २ वर्षांपूर्वी झाला आहे तर हे हक्कसोडपत्र रद्द होईल का?
करार कायदा १८८१ च्या कलम २५ अन्वये , कोणताही करार मोबदल्याशिवाय अवैध असतो . मात्र जर असा करार नोंदणीकृत असेल व प्रेमापोटी रक्तातील नात्याच्या व्यक्तीस दिला असेल तर असा करार अवैध ठरत नाही . त्यामुळे करार अवैध ठरणे अवघड आहे .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Aditya
13-10-2021
itsadi9696@gmail.com

नमस्कार सर/मॅडम,
आमच्या पूर्वजांनी १९६९ मध्ये गावठाण लगत पुर्व-पश्चिम दिशेने साधारणपणे ५० फूट रुंद अशा पट्टीच्या स्वरूपात सर्व्हे नं.१ मधून १ हेक्टर १६ गुंठे जमीन घरे बांधण्यासाठी विकत घेतली होती आणि तेव्हापासून सर्वजण त्यावर घरे बांधून राहत आहोत. आमच्या घरांच्या दक्षिण बाजूला सर्व्हे नं १ मधील लोकांच्या मालकीचा पूर्वापार रस्ता होता म्हणून आमच्या पूर्वजांनी रस्त्याच्या शेजारी असलेली ही जमीन विकत घेतली होती.रस्त्याच्या दक्षिण बाजूला सर्व्हे नं ९९ आहे. सर्व्हे नं ९९ मधील लोकांनी तो रस्ता त्यांच्या मालकीचा आहे असे म्हणून जमिनीची कोणत्याही प्रकारची मोजणी न करता बंद केला आहे. हा रस्ता गेल्या ३ महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे गल्लीतील सर्वांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आमच्या घरांची व रस्त्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात आहे पण आमची गल्ली गावठाण मध्ये येत नसल्याने ग्रामपंचायत त्यावर काही कारवाई करू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी आम्ही मामलेदार ॲक्ट १९०६ चे कलम ५(२) अंतर्गत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे पण इतर शेतरस्ता तक्रारी प्रमाणे या विषयावर अत्यंत मंद गतीने कार्यवाही चालू असल्याने त्यावर अजून काही ठोस प्रकारची कारवाई झालेली नाही.मुळात हा रस्ता इतर शेतरस्त्यांपेक्षा वेगळा असल्याने त्यावर लवकरात लवकर कारवाई होणे आवश्यक आहे. रस्ता बंद असल्यामुळे व दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने आम्हाला घरांच्या बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. हा रस्ता लवकरात लवकर खुला करून मिळावा म्हणून आम्ही काय करावे व कोणाकडे दाद मागावी यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.
Indian Easement Act १८८२ खाली दिवाणी दावा दाखल करावा .
कारण रस्त्याचा वापर शेतीकामासाठी होत नाही . त्यामुळे मामलतदार कोर्ट ऍक्ट चा उपयोग करता येणार नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Ghansham
11-10-2021
rathodghansham24@gmail.com

Good evening sir ,
I purchased one acre irrigated land out five acres land from one person via Registered Kharedi but He already took loan from the other bank so It is not being registered on my name .mandal Adhikari is saying . This farm can not be registered because there is loan on it . Please give answer
Circle Officer cannot refuse to mutate the land in your name which you have purchased by registered deed . Ask him to give in writing.

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर, माझ्या नातलगाचे २.५० रुपये घ्या स्टॅंपवर १९७५ मध्ये अनोंदणीकृत आपसी वाटणी पत्रानुसार हिस्सेवाटणी झाली होती.त्यांच्या सोबत त्यांच्या आईचे सुध्दा ७/१२ वर नाव दर्ज आहे.आपसी वाटणी पत्रानुसार त्यांच्या आईचे मृत्यू नंतर त्यांचा एकट्याचांच हिस्सा राहील असे लिहिले आहे.त्यांच्या आईचा २५ वर्षा आधी मृत्यू झाला आहे,आज पावेतो आईचे नाव कमी केलेले नाही.करीता आजही त्या आपसी वाटणी पत्रानुसार त्यांच्या आईचे नाव कमी होऊ शकते का? किंवा इतर वारस दावेदारी करु शकते, त्याबद्दल मार्गदर्शन करावे.
आईचा मृत्यू झाला आहे तर आईचे नाव कमी होणे आवश्यक आहे . मात्र आईस त्या व्यक्तीशिवाय अन्य वारस आहेत का ? त्या अन्य वारसांची नावे हि लागू शकतात

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Bharat Khanderao
09-10-2021
bpkhanderao3@gmail.com

वडीलांची बॅकेत ५५हजार रू आहेत वडील मयत झाले तर ती रक्कम वारसांना कोणत्या GR नुसार मिळतील
GR कश्याला हवा आहे .
वारसांची नावे लागणे आवश्यक आहेत Succession Certificate काढा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Gayatri Pande
06-10-2021
gayatripande840@gmail.com

माझ्या वडिलांनी 1993 मध्ये 25*45 फूट प्लॉट मधून 12.5*45 फूट प्लॉट विकत घेतला होता.त्याच प्लॉट मधला अर्धा भाग आजपर्यंत पडीत आहे.28 वर्षात त्या प्लॉट चा कोणी वारस नाही आला.तो प्लॉट विकत घ्यायचा आहे तर काय करावे?
बिनशेती/ विकास परवानगी दिलेला प्लॉट असेल, तर ज्या अधिकार्याने/नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे , त्याची परवानगी लागेल .
शेती प्लॉट असेल व प्लॉट बिनशेती झोन मध्ये असेल तर परवानगीची गरज नाही . मात्र शेती प्लॉट बिनशेती झोन मध्ये नसेल तर परवानगी मिळणार नाही .विकत घेता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर. माझा असा प्रश्न आहे की मी जेथे राहतो त्या गावी आमच्या नावे कुठेच जमीन जागा नाही पण आम्ही गेली 40 वर्षे पासून त्या सरकारी जागेवर पुनर्वसन वसाहती मध्ये खाली जागेवर जेथे कोणाला काही अक्षेप नाही अशा जागी राहतो तर ती जागा आता आमच्या नावे होईल का. आणि ग्रामसेवक करू शकतो का?
पुनर्वसन जागा नसती व अन्य शासकीय असती तर आपण अतिक्रमण नियमानुकूल करू शकला असता . मात्र पुनर्वसन जागा असल्याने आपण प्रकल्प ग्रस्त व्यक्ती असाल तरच आपला विचार होऊ शकला असता .
या जागेवरच अतिक्रमण दिवाणी न्यायालयात प्रतिकूल ताबा ( Adverse possession ) दावा दाखल करून मिळकतीची मालकी दिवाणी न्यायालयाकडून आपले नावावर जाहीर करून घेऊ शकता .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Pranay
04-10-2021
pkumar.barde@gmail.com

Sir माझ्या आजोबांनी त्यांची वडिलोपार्जित शेत जमीन माझ्या नावे बक्षीस पत्र द्वारे केली आहे.तर यावर माझ्या आत्या ऑब्जेक्शन करू शकतात का.
वडिलोपार्जित जमीन केवळ नातवाच्या नावे दाखल कशी करता येईल . आत्याकडून हरकत येणार

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबाला एकूण 6 मुले व 1 मुलगी असा परिवार होता, त्यापैकी माझे आजी आजोबा वारले असून, त्या 6 पैकी माझे 4 चुलते देखील वारले, त्या 4 पैकी 3 चुलत्यांना मुले आहेत, माझ्या आजोबाला गावी जमीन वगैरे काही नाही फक्त 1000 स्क्वेअर फूट जागा पिढीजात होती, व आहे, ती जागा मागील2 वर्षापर्यंत माझ्या आजोबाच्या नावाने होती,
त्या जागेवर व त्या घरात माझे सगळ्यात लहान चुलते व वारलेल्या एका चुलत्याचा मुलगा व त्याचा परिवार राहत होता, बाकी सर्व चुलते त्याच गावात वेगवेगळ्या ठिकाणी जागा घेऊन घर बांधून वेगळी राहिली, व त्यांच्या नावे घर आहेत,
परंतु माझ्या वडिलांनी 1975 साली कामधंद्यासाठी ते गाव सोडून नाशिक ला शहरात आले, तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही नाशिक येथे राहतो आमचे देखील नाशिकला स्वतःचे घर आहे,व आम्ही, लग्नं किंवा इतर काही कार्य असले तरच आमच्या मूळ गावी जातो परंतु 4 वर्षांपूर्वी माझे छोटे चुलते यांनी नगरपरिषद रेकॉर्ड ला आजोबाच्या नावाच्या जागी फक्त त्यांचे नाव लावून घेतले, कालांतराने म्हणजे 2 वर्षांपूर्वी त्या जागेवर त्यांनी घरकुल योजनेचा लाभ तसेच स्वतःचे काही पैसे खर्च करून त्या जागेवर rcc बांधकाम केले आहे, परंतु घर बांधायच्या आधी त्यांनी जे भाऊ, किंवा मयत झालेल्या चुलत्यांची वारसदार यांना बोलावून घेऊन हक्कसोड कागदपत्रांवर सर्वांच्या सह्या घेऊन रजिस्ट्री ऑफिसमध्ये बोलावून सह्या घेतल्या, व घर बांधले, परंतु माझ्या छोट्या चुलत्यानी माझ्या आई वडिलांना असे सांगितले की मी त्या जागेवर आपण 1+1 rcc बांधकाम करू त्यावर मी ग्राऊंड म्हणजे खाली बांधतो, तुम्ही वरचा मजला बांधा त्यांपैकी पायाभरणी मजबुतीकरण ला जो खर्च येईल तो दोघात अर्धा अर्धा करू अशी तोंडी चर्चा होऊन सर्व भावासमोर संमती दर्शविली, परंतु आम्ही नाशिकला आल्यास त्यांनी 1+1 घराचे पूर्ण काम माघारी केले, आता आम्ही म्हंटल की आता आम्हीठरल्याप्रमाणे घर कुठे बांधायच तर ते मी असं बोललो नाही असे म्हणत आहेत, आणि विश्वास दर्शवून आम्ही सर्व म्हणजेच माझे चुलते व चुलत भाऊ सर्वांनी हक्कसोड कागदपत्रांवर सह्या घेतल्या आहेत,परंतु त्यावर माझे वडील निरक्षर असल्याने त्यांचा अंगठा घेतला आहे, परंतु वारसदार या नात्याने माझी कुठेही कोणत्याही कागदपत्रांवर सही घेतली नाही, तरी कृपया मार्गदर्शन करावे की मला आता त्या जागेवर कोणत्या कायद्याचा आधार घेऊन, किंवा माझ्या वडिलांचा हिस्सा घेता येईल याबाबत कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपले चुलत्यांनी त्या जागेवर खर्च करून घर बांधले आहे . घर बाधत असताना आपण दिवाणी न्यायालयात जाऊन त्यांचे विरुद्ध मनाई हुकूम घेणे आवश्यक होते मात्र विहित वेळेत आपण दावा दाखल केला नाही . त्यामुळे मिळकत/हिस्सा आपणास मिळण्याचा दावा दाखल करता येणार नाही अथवा दावा दाखल केला तरी आपल्या लाभात होणार नाही .
आपण Mesne Profit चा दावा दिवाणी न्यायालयात दाखल करु शकता त्याद्वारे नुकसान भरपाईची रक्कम मागू शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Sir sr no 127 chi jamin setinavikas zone la hoti ti NA zali aahe ka techa vikas kar 1R la kiti yeto te sanga sir
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२४ब व अनुसूची ब/२ पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by B.G solnar
01-10-2021
balajisolnar35@gmail.com

नमस्कार सर. आमच्याकडे वर्ग 2 ची जमीन आहे. 7/12 आहे व 8 अ आहे फेरफार आहे. या सर्व नंबरची जमीन कोनत्या ठिकाणी आहे ते माहिती आहे . पण या सर्व नंबर मध्ये अन्य 7 शेतकरी आहेत . आमची जमीन कोणत्या ठिकाणी आहे ते आम्हाला माहिती नाही .भूमी अभिलेख मध्ये गेले असता ते म्हणत आहेत की तुमच्या सर्वे नंबर ची अद्याप मोजणी झालेली नाही . व आम्हाला गायरान जमीन मोजता येणार नाही . सर आमची जमीन कशी मिळेल सर.कृपया मार्गदर्शन करावे
बालाजी राव
आपली जमीन वर्ग २ ची आहे . मग गायरान जमीन असण्याचा प्रश्न येतो कुठे ?
असो आपण जमीन मोजणी अर्ज दाखल करा . अन्य ७ शेतकऱ्यांना भूमिअभिलेख खात्यामार्फत नोटीस जाईल व ते हजर राहतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Vikas Bhosale
29-09-2021
Vikasbhosale2012@gmail.com

नमस्कार सर आम्ही 2007 साली एका जमिनीचे 6 एकर क्षेत्राचे साठेखत केले होते तर त्या जमिनीला पुनर्वसन ची परवानगी लागत होती परंतु मूळ मालकाने आम्हाला पुनर्वसन परवानगी अनु दिल नाही त्यामुळे आम्ही 2013 साली एका व्यक्तीला विकून टाकली साठे खत रद्द लेख अनुसार विकून टाकली पाच एकर परंतु त्याचे पैसे आम्हास अद्याप दिलेले नाहीत व टाळाटाळ करीत आहे.व उरलेली एक एकर ही त्याने परस्पर त्याच्या नावावर करून घेतली आहे व आमची फसवणूक केली आहे व साठे खत रद्द केल्या पासून आम्हाला पैसे दीले नाही टाळाटाळ करीत आहे आज देतो उद्या देतो तरी यासाठी कृपया आम्हाला पर्याय सांगा ही विनंती.
The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर कुल कायदा म्हणजे काय
कुल व मालक यांचे संबंध , या संबंधीचा कायदा .
कृपया हा कायदा वाचा . असं दोन तीन परिच्छेदामध्ये उत्तर देता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Arjun mayane
27-09-2021
arjunmayane976@gmail.com

नमस्कार सर
भूमिहीन सैनिकांना शासनाकडून गायरान जमीन किंवा सरकारी जमीन मिळण्याची तरतूद आपल्या कायद्यात आहे का ❓
असल्यास कृपया माहिती मिळावी
महाराष्ट्र जमीन महसूल ( सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे ) नियम १९७१ अंतर्गत ,आजी/ माझी सैनिक यांना जमीन मिळू शकते
आपण जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

पुनर्वसन शेरे 7/12वरती पडुन 25वर्षे पूर्ण झाली आहे तर ते कमी कधी होतील ।गावी एकत्रीकरण योजना लागु झाली नाही तर शेरे कसे कमी होतील
पुनर्वसन कायद्यानुसार जर संपादित केलेली जमीन वर्ग २ ची असेल तर , नवीन जमीन वर्ग-२ धारणाधिकाराची असते अन्यथा ती वर्ग १ ची असते . त्यामुळे शेरे असण्याचा प्रश्न नाही
मात्र ज्या जमिनी महसूल अधिनियम व त्या खालील नियमांतर्गत दिली असेल तर अशी जमीन वर्ग २ ची असते . मध्यंतरी २०१४ चे आस पास अशे शेरे काढण्याचा शासन निर्णय झाला आहे . तो शा नि पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर
शेत जमिनींचा नंबर बाध , उरळी शेजाऱ्यांनी ठेवली नाही. दुसऱ्या बाजूने नदीच्या पलीकडे शेत असणारा शेतकरी त्याच्याकडे 7/12 वरील असणाऱ्या क्षेत्र पेक्षा जास्त क्षेत्र वर (नदीत एक दोन विहिरी खोदून त्याचा भराव नदीत त्याच्या बाजूने भराव करून )अतिक्रमण करत आहे,त्याच्या या भरावा मुळे आमचा बांध तब्बल 10 ते 12 फूट खसळला आहे.त्यांना विनंती करूनही ते ऐकत नाहीयेत.शिवाय ते लोक चोऱ्या , दरोडे,हाणामारी ,दादागिरी करणारे आहेत .सदरील विषयात आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात यावे ,ही नम्र विनंती.
नदी हि कोना एकाच्या मालकीची नसते . नदी जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे . हि बाब जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून द्या . त्याचे मार्फत नदीत भराव करन [यात्रा अरुंद करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.41 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3374
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3