जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by अशोक यशवंत मोरे
17-01-2022
aymore1952@gmail.com
सर माझे जमिनीला एक एकरला 1/4/57 चे कुळ लागले आहे. बाकी 8एकर जमिन माझे ताब्यात आहे. कुळ एक एकराची होऊ शकेल का? कुळ व त्याचा मुलगा मयत आहे. नातू जमिन ख,रेडी करु इच्छित नाहि. 53/54च्या 7/12 मध्ये एक एकरची नोंद आहे
एक एकर जमीन क्षेत्राची विक्री (कलम ३२ ग ) कुळाचे लाभात होऊ शकते .
मात्र कुल घेउ इच्छित नसेल तर , जमीन शासन जमा होऊन , ३२प प्रमाणे वाटप होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अशोक यशवंत मोरे
17-01-2022
aymore1952@gmail.com
सर,माझे जमिनीला 1/4/57 चे कुळ लागले आहे.एकूण क्षेत्र 9 एकर आहे. त्यापैकी एक एकर जमीन कुळ कसत होते .त सी नोंद 53/54 च्या 7/12 वर आहे. कुळ खरेदी एक एकर ची होइल का? करु व त्याचा मुलगा मयत आहे नातु जमिन खरेदी करु इच्छित नाही.
आपला प्रश्न निट कळला नाही. एक एकर जमीन कुळ कसत होते तर, एक एकर जमीन कुळ खरेदी करू शकेल.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by विकास कणसे
16-01-2022
kansevikas@gmail.com
नमस्कार, मला माझी स्वकष्टार्जित जमीन माझ्या नातवाच्या नावाने बक्षीस पत्राने करायची आहे. त्याचे वय 10 वर्षे आहे. आणि जमीन देखील वर्ग 1 आहे. तरी त्याबद्दल मार्गदर्शन करावे. शिवाय त्याचे नाव 7/12 वर लागेल का.. किंवा इतर खरेदी जमीन मालकाप्रमाणे त्याला सर्व अधिकार प्राप्त होतील का??? धन्यवाद...
जर मिळकत हि शेतजमीन स्वरूपाची असेल तर आपण नातवाचे नावे मिळकत बक्षीस पत्राने देऊ शकता . मुंद्रणक शुल्क २०० रुपये आहे .
मात्र नातू हा अज्ञान असल्याने त्याचे बरोबरच त्याच्या वडिलांचे अथवा आईचे Guardian म्हणून नाव लागणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by देवेंद्र
15-01-2022
dnbonde@gmail.com
उपविभागीय अधिकारी यांनी एका व्यक्तीस मागील कालावधीत वैध असलेले ओ बी सी नॉन क्रीमिलेयर दिले आहे माझ्या माहिती प्रमाणे नॉन क्रीमिलेयर हे ज्या दिवशी ईशु केले जाते त्या दिवसा पासून पुढील कालावधीस वैध असते ते एक दोन किंवा 3 वर्षा पर्यंत वैध असते या बाबत मार्गदर्शन मिळावे जसे मागील कालावधीत वैध प्रमाणपत्र देण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांचे अधिकार शासन निर्णय परिपत्रक नियमावली
Question by सागर
15-01-2022
sagarkandekar1990@gmail.com
महोदय
माझ्या पणजोबाची आम्ही राहत असलेला गाव सोडून दुसऱ्या गावी ५ एकर जमीन होती.पणजोबाना ४ मुले होते व त्या मध्ये माझे आजोबा सर्वांत लहान होते. पणजोबा हे १९५० रोजी मयत झाला नंतर ए.कु.क म्हणून मोठ्या मुलाचे नाव वारस म्हणून लागले होते व नंतर ह्या जमिनीचे जुने नोंदी बघितले तर असे समजले की मोठ्या मुलाने १९८८ रोजी एक त्रयस्थ व्यक्ती ला सदर जमीन तहसीलदार यांना अर्ज देऊन जमीन माझा ताब्यात नाही असे लिहून नावे केली असा तहसीलदार चा आदेश आहे.आज पणजोबाची ची ४ ही मुले मयत आहे व माझा वडिलांना ह्या बद्दल काहिच माहिती नाही तर आज मितीला ति जमीन मला मिळाली म्हणुन मला काही अधिकार उरला आहे का ? मार्गदर्शन करावे.
केवळ तोंडी वर्दीने ( सूचनेने ) जमीन हस्तांतरण होत नाही . नोंदणीकृत दस्ताशिवाय जमिनीचे हस्तांतरण होत नाही .
ज्या फेरफाराने , त्रयस्थ व्यक्तीचे नाव लागले आहे , तो फेरफार अहवानीत करा . त्याचे विरद्ध प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पाटील शुभम प्रकाश
15-01-2022
sp9168810173@gmail.com
नमस्कार सर, माझे आईचे वडील २०१७ साली वारले होते आणि त्यानंतर लगेच आमच्या दोन्ही मामांनी आईला व मावशींना न विचारताच संपूर्ण ४० एकर जमीन नावावर करून घेतली. आता मावशा पचतावा करत आहेत काय करायला पाहिजे उपाय सुचवा.
Question by प्रसाद खोंदापुरे
15-01-2022
khondapure1987@gmail.com
सन 1988 दरम्यान माझे वडील व इतर दोघांमध्ये एक गुंठा जागा खरेदी झालेली आहे कालांतराने 1992 पर्यंत वडिलांनी उर्वरीत दोघांकडून त्यांचे हिस्स्याची असलेली जमीन खरेदी केली परंतु 7/12 वर वडिलांच्या नावासमोर 84 क चा शेरा नोंदविला गेलेला असल्याने, 7/12 वरून उर्वरित दोघांची नावे निघत नाहीत. वडील शेतकरी नाहीत. तथापि सदरची जागा 1998 पासून पुणे महानगरपालिका मध्ये समाविष्ट झालेले आहे आणि सद्यस्थितीत सदर सर्व्हे नंबर पुणे महानगरपालिका अंतर्गत निवासी झोन मध्ये आहे. त्यामुळे सदरची जागा निवासी झोन मध्ये असल्याने त्याआधारावर 7/12 वरून 84 क शेरा काढता येईल काय?
Question by Sachin Gavhane
01-01-2022
ravindra171282@gmail.com
वाडीलोपार्जित शेत जमीनीचा सातबारा एकत्रित आहे, भाऊ आणि बहिनीच्या नावे एकत्रित क्षेत्र दाखवते आहे , क्षेत्र वेगवेगले करून घेण्यासाठी काय करावे लागेल। वाटनी करण्यासाठी भाऊबंद तयार नसतील तर क्षेत्र वेगवेगले करण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल
न्यायालयात हिस्स्याप्रमाणे वाटप करून मिल्ने व त्याप्रमाणे क्षेत्राचा ताबा मिळण्यासाठी आदेश देणे या करीत The Specific Relief Act खाली दावा दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Vikas Kanse
01-01-2022
kansevikas@gmail.com
नमस्कार सर,
मी 1998 साली 54 गुंठे जमीन गहाणखताने घेतली होती. त्याचा फेरफार 7/12 उताऱ्यावर दाखल आहे. त्याच जमिनीचे पुढे 2007 साली मी कायम स्वरूपी खरेदी खत करून घेतले. त्यावेळेस मी खरेदी दस्ताची प्रमाणित कॉपी तलाठी ऑफिसला नोंद करण्यासाठी दिली होती. पण त्यांनी नोंद केली नाही. खरेदी दस्ताचा फेरफार झालेला नाही. ती चुकी माझ्या आता लक्षात आल्यामुळे मी तलाठी ऑफिसला मूळ दस्तासोबत भेट दिली. तर त्यांनी जुने फेरफार आणि जुने 7/12 आणण्यास सांगितले. मी जुने 7/12 1993 सालापासून ते आतापर्यंत आणि गहाण खताचा फेरफार जमा केले आहेत. जमिनीचा मूळ मालक मयत आहे. माझ्या नावे संबंधित गटात योग्य ती जमीन आहे. पण मूळ जमीन मालकाचे नाव इतर अधिकारात आहे. गहाण खताचा फेरफार अद्याप रद्द झालेला नाही. तरी माझा प्रश्न आहेत- 1. त्या गटातील गहाण खताचा फेरफार रद्द होऊन खरेदी दस्ताप्रमाणे फेरफार करण्यासाठी काय करावे लागेल?
धन्यवाद सर..
आपल्या कथनावरून खरेदी खताचा अंमल ७/१२ ला दिला आहे . मात्र गहाण खताची अजूनही ७/१२ सदरी नोंद आहे . आपण प्रांताधिकरी यांचेकडे हि नोंद टाकण्यासाठी अपील दाखल करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मनोज कृष्णराव यादव
29-12-2021
manojyadav181@gmail.com
महोदय
आम्ही आमच्या आईच्या नावाने मागील वर्षी जमीन खरेदी दस्त केला आहे. सदरची जमीन खरेदी करताना सातबारा वरती भोगवटदार वर्ग 1 असा उल्लेख होता, मंडल अधिकाऱ्यांनी सदरची जमीन महार वतन म्हणून नोंद नाकारली आहे, सदरच्याच जमिनीचे अगोदर 4 व्यवहार झाले आहेत तेव्हा कुठेही नोंद नाकारण्यात आली नाही. जुने फेरफार तसेच 9-3,9-4 उतारे काढून बघितले तर सदरचा गट कुठेही महार वतन म्हणून नोंद नाकारलेली नाही. आता तहसीलदार यांनी जमिनीचा सत्ता प्रकार भोगवटदार वर्ग 2 केला आहे. आम्ही दस्त केला तेव्हा व त्या अगोदर कित्येक वर्ष वर्ग 1 च होता. आमच्याकडे जुना दस्त सुद्धा आहे. जमीन विकानाऱ्यांची पण काही हरकत नाही. प्रांत अधिकारी यांचेकडे अपील केले आहे. तर जमीन नावावर होईल का? त्यासाठी काय करावे लागेल.? मार्गदर्शन मिळावे.
The Maharashtra Inferior Watan ( Abolition ) Act 1959 , अन्वये महार वतन जमीन हस्तांतरणास २००८ पूर्वी निर्बंध होते . २००८ नंतर हस्तांतरणावरील निर्बंध दूर करण्यात आले आहेत . आपण केलेल्या नोंदणीकृत दस्ताची प्रत अपील मेमो समवेत प्रांत अधिकारी यांचेकडे द्या . आपली नोंद मंजूर करण्याचे आदेश प्रांत अधिकारी देतील . मात्र २००८ पूर्वी विना परवाना हस्तांतरने झाली असल्याने , जमीन वर्ग २ च राहणार . वर्ग १ करायची असल्यास चालू बाजार मूल्याच्या ५०% रक्कम जमा केल्यास , ती वर्ग १ होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by BALAJI GOPAL DAHIPHALE
28-12-2021
BALAJIDAHIPHALE1996@GMAIL.COM
महोदय सर,
या वर्षा पासून महाराष्ट्र तुकडे बंदी अधिनियम १९४७ ची अंबलबजावणी महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी काढलेल्या परिपत्रकामुळे कडक झालेली आहे म्हणून मला खालील प्रश्नाविषयी मार्गदशन हवे आहे.
१ ) १९४७ ते २०२१ पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे कसे काय कायदेशीर ठरू शकतील या सर्व नोंदी बेकायदेशीर असतील का ?
२ ) हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ नुसार वारसामध्ये सम प्रमाणत वाटप होईल, हे हक्क संपुष्टात येईल का ? कारण २ एकर जमीन ३ भाऊ व १ बहिण यांच्यात सम प्रमाणत वाटप हे अर्धा एकर येईल हे वाटप तुकादेबंडीचे उलंघन ठरेल का?
३ ) आज पर्यंत झालेले भाव-भावात वाटणी पत्र हे सुद्धा रद्द होतील का?
४ ) आजही मा.न्यायालात नागरिक तडजोड करून आपली वाटणी करून घेतात, मा.न्यायालयाच्या नजरेत असे तडजोड पत्र, वाटणी ,ई. नजरेत येत नाही का?
बालाजीराव खूप मूलभूत प्रश्न आपण मांडले आहेत . त्याची उत्तरे खालील प्रमाणे .
१. मंध्यतरी झालेल्या सुधारणांनुसार , ज्या मिळकती /जमिनी बिगर शेती जमीन वापर विभागामध्ये असतील , अश्या जमीनि / मिळकती २५% चालू बाजारभावाच्या रक्कम भरून नियमित होऊ करता येतात . मात्र ज्या मिळकती /जमिनी बिगर शेती क्षेत्रात नसतील , अश्या जमिनी चे व्यवहार सुरवातीपासूनच अवैध आहेत .
२. खरतर वारसांमधील वाटपामध्ये जर Fragment( तुकडा) निर्माण होत असेल , तर काही वारसांनि जमिनीच्या ऐवजी , पैसे घेणे अंतर्भूत आहे . हे पैसे ज्यां वारसांना , त्यांना मिळणाऱ्या हिस्स्यांपेक्षा जादा जमींन देऊ केली जाते ( तुकडा पडू नये म्हणून , ज्या वारसांनी जमीन ऐवजी पैसे घेण्यास संमती दिली आहे व त्यांचे हिस्स्याची जमीन ज्या वारसांना मिळणार आहे ) . अशे वाटप जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आहे .
३. खरतर कायद्याचा भंग झाला असेल तर , व्यवहार /हस्तांतरण हे आरंभापासूनच अवैध व रद्द आहे .
४. न्यायालय फक्त सह हिस्सेदाराचे हिस्से ( share ) निश्चित करते . प्रत्यक्ष वाटप जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आहे . हे सरस निरस वाटप प्रश्न २ च्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे तुकडा निर्माण होणार नाही या प्रमाणे करण्याचे आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Rajendra Karnde
25-12-2021
rajendra5471@gmail.com
महोदय,
गट न. ६७८, गाव कोळे, तालुका कराड , जिल्हा सातारा या गटातून कराड-ढेबेवाडी हा रस्ता कोळेवाडी गणेश मंदिर या ठिकाणी गेला आहे ( संपादित झाला आहे ). तर त्या वेळेचा फेरफार उदा. गट न. ६७८ मधील कोणत्या हिस्सेदाराची जमीन गेली, किती गेली, त्याबद्दल त्याला काय मोबदला दिला किंवा दुसरीकडे कुठे जमीन दिली, किंवा त्या गटातील सर्वांची सामाईक जमीन गेली का, किती गेली ? या गटातिल हिससेदार कृष्णा आबा मांग ( तडाखे ) व यशवंत आबा तडाखे हे सख्खे भाऊ आहेत. ७/१२ वर दोघांची क्रमशः १४/१४ गुन्ठे जागा दिसते परंतु प्रत्यक्ष १३ गुन्ठे जागा आहे. संपूर्ण गत १०७ गुन्ठे आहे परंतु प्रत्यक्ष कमी आहे.
तर त्या गटातुन सरकारी रस्ता गेलेला फेरफार मिळेल का ?
कृपया मार्गदर्शन करावे आपला आभारी आहे
आपण ७/१२ अथवा संयुक्त मोजणी पत्रक पहा .
संयुक्त मोजणी पत्रक जिल्हाधिकारी कार्यालय येथे भूमी अभिलेख शाखेत मिळेल
७/१२ तलाठी कडे पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by विशाल रविंद्र सपकाळे
24-12-2021
vishalsapkal.c@gmail.com
निर्वासित लोकांची मालमत्ता असलेला गटांची खरेदी करण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल तसेच भू धारणा पध्दत - वर्ग 1 करायचे आहे तर मार्गदर्शन पाहिजे धन्यवाद
निर्वासित मालमत्ता एखाद्याला प्रदान केली कि , ती वर्ग १ ची आहे . त्याचे विक्रीस परवानगीची गरज नाही .
जर शासनाच्या मालकीची मिळकत एखाद्या व्यक्तीस दिली असल्यास , ती वर्ग २ ची आहे . निरवासित व्यक्तीस , त्याची पाकिस्तान मध्ये असलेली जमीन , स्थलांतरण केल्याने गेली असल्याने , त्याचे बदल्यात त्याला दिलेली मिळकत आहे . त्यामुळे पुनर्वसन खाली दिलेल्या जमिनीप्रमाणे ती वर्ग १ ची असते . जमीन विक्री वर काही निर्बंध नाहीत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by swapnil Digalwar
23-12-2021
sdowardha@gmail.com
whether permission required for selling NON AGRICULTURE Tribal land to non tribal
There is a restrictions on the Transfer of occupancies belonging to the Tribals in favour of the Non-Tribals .Occupancy means portion of land held by a person . There is no distinction between NA and Agricultural occupancy . Hence you need to have permission for the sale Non Agricultural land to a on tribal
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अशोक यशवंत मोरे
23-12-2021
aymore1952@gmail.com
सर, माझे जमिनीला 1/4/57 चे कुळ लागले आहे.1974 ला झालेल्या कुळ खरेदी केला कुळ हजर राहिले नाही त्यामुळे कोर्टात कुळ खरेदी निरर्थक ठरली. व कुणाचे नाव कमी केले.2021 ला सदर जमीन पेपर नोटीस देउन व सर्च रिपोर्ट काढुन पत्नीच्या नावावर केली आहे. कुळाच्या मुलाने व नातुनी आम्ही जमीन कसत नव्हतो व कुळाचे नाव चुकीने लागले असी नोटरी करुन दिली आहे 75 वर्षा पासून जमीन आमचे वहिवाटीस आहे का.ही समस्या निर्माण होतील का? .
एखादी व्यक्ती जरी कृषक दिनी जमीन कस्त असेल तर ती व्यक्ती मानीव खरेदीदार असते . किंम्मत निश्चित करणे हि केवळ तांत्रिक बाब आहे . कुल हजार राहिला नाही म्हणजे खरेदी निरर्थक ठरत नाही . कुळाने किंमत भरण्यास नकार दिला अथवा किंमत भरली नाही तर खरेदी निरर्थक ठरते .
कुळाचे मुलाने अथवा नातूंने ते जमीन कसत नसल्याबद्दल शपथ पत्र केले असेल तर ते तहसीलदार यांचे पुढे किंमत निरर्थाल ठरलेबाबत जे आदेश काढले त्यात याचा उल्लेख केला आहे . अश्या प्रकारचे निरीक्षण निकालपत्रात नोंदवले आहे का ?
केवळ आपल्याकडे शपथ पत्र दिले असेल तर त्याचा उपयोग नाही .
ज्याजमीन ची खरेदी किंमत निरर्थक ठरते अशी जमीन कलम ३२प अन्वये वाटप करण्याची आहे . मूळ मालकास प्रथम प्रधम्या आहे मात्र अशी जमीन मूळ मालकास महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम १५ च्या अधीन देण्याची आहे .
कलम १५ अन्वये , कलम ३१ व ३१ अ च्या अधीन जमीन परत करण्याची आहे
कलम ३१ अन्वये , जमीन मालकाने कुळाला ३१/१२/१९५६ पूर्वी( जमीन परत मिळण्यासाठी ) नोटीस दिलेली असणे आवश्यक आहे . नोटीसची एक प्रत हि मामलतदार यांना दिलेली असणे आवश्यक आहे
कलम ३१ अ अन्वये जी जमीन परत घेण्याची आहे , केवळ त्याच जमिनीतून येणारे उत्पन्न हे मुख्य उत्पन्न जमीन मालकाचे आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Yedage
21-12-2021
yedagesagar@gmail.com
नमस्ते सर,
एखाद्या व्यक्तीची मालकीची जमीन शासनास भाडे तत्वावर देणे असल्यास त्या साठी एका गुंट्या स किती शासकीय भाडे असते...(एका महिन्या साठी)
Question by तुळशीराम माकणे
16-12-2021
makne007@gmail.com
सर मी ग्रामपंचायत क्षेत्रातील प्लॉट विकत घेत आहे. या प्लॉटला 1989 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 44नुसार NA परवानगी मिळाली आहे. रेजिस्ट्री करण्यासाठी रेजिस्ट्री ऑफिस मध्ये SDM कार्यालयाकडून 1989 मध्ये NA करताना जोडलेला SANCTION लेआऊट मागत आहेत. सर SANCTION LAYOUT म्हणजे काय असतो? तो SANCTION LAYOUT SDM ऑफिस मध्ये मिळतो का?
आपणास NA परवानगी देताना , जो नकाशा मंजूर केलेला असतो त्यास मंजूर अभिन्यास असे म्हणतात
वास्तविक तो विकास परवानगी देताना चा असतो
आपणास SDM कार्यालयाकडून तो मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Raj
15-12-2021
maheshv.todkar@gmail.com
उपसंचालक भूमि अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या निकालावर पुढील फेर चौकशी अपील मंत्रालयाच्या महसूल व वन विभागातील कोणत्या पत्त्यावर कसे करावे
Question by Rajesh Chavan
15-12-2021
rvchavan@gmail.com
2 गट नंबर मध्ये १९५३ मध्ये वहिवाटसदरी माझ्या आजोबांचे नाव लागले आहे. सदरचे नाव १९६५ पर्यत ७/१२ वहिवाट सदरी होते. तदनंतर सदर वहीवाट सदरी कबजेदार यांची खुद्द अशी वहिवाट लागली होती. त्यामुळे तहसिलदार कार्यालयात वहिवाटीची केसलावली, तदनंतर तो जमिन मालक व आमचेमध्ये समझोता होवून सदरची जमीन आम्ही एकुमँ म्हणून असणा-या महिलेकडून १९८४ मध्ये खरेदी केली. सदर खरेदी करता असताना इतर अधिकारामध्ये ४मुलींचे नाव होते. त्यावेळेस सदरची नावे तलाठी यांचेकडे सदरच्या खरेदीखताचे नोंद करताना जबाब घेवून काढले जात होते. त्यावेळेस फेरफार नोंद होताना " फे.फा.नोंच्या अनुषंगाने इतर हक्कातील मुलींना फेरफारच्या नोटीसा बजावल्या असून मंजूर " असा शेरा आहे. तदनंतर सदर महिलांचे आईचे निधन झाल्यावर २००९ मध्ये उरलेल्या जमिनीचे त्या ४ महिंलांनी रजिष्टर वाटप पत्र केले गेले त्यामध्ये या दोन जमिनींचा समावेश नव्हता. वाटप झाल्यानंतर सदरच्या जमिनी विक्री केल्या गेल्या, परंतू आता त्याचे इतर हक्कामध्ये नाव असल्यामुळे ते हक्क सांगतात. तर याबाबत काय करता येईल. वाटप पत्रमध्ये या दोन गटांचा समावेश नाही. , तसेच एकुमँ कडून खरेदी असेल तर इतर हक्कीतल नावे पोकळीस्त असल्यामुळे निघतील का, नोटीस बजावल्या आहेत. त्याला हरकत नाही.
इतर हक्कातील नावे हि बहिणींची /मुलींची नावे आहेत . त्यांचा मिळकतीत हक्क आहे म्हणून त्यांची नावे इतर हक्कात ठेवली होती व पूर्वी तशी पद्धत होती . एकुम्या हा इतरांचे वतीने केवळ नाव धारण करत असतो . याचा अर्थ तो एकटाच जमिनीचा मालक आहे असे नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sandipan
13-12-2021
sandipatil988@gmail.com
सर, माझ्या आजोबांना तीन अपत्य, पहिले मोठे अपत्य मुलगी -माझी आत्या, दुसरा मुलगा - माझे मोठे चुलते आणि तिसरा मुलगा - माझे वडील. आजोबांनी त्यांच्या हयातीत त्यांचे वडिलोपार्जित आणि खरेदी केलेल्या शेताची माझे मोठे चुलते आणि माझे वडील यांना समान तोंडी वाटणी केली. त्यामुळे त्याची लेखी नोंदणी नाही. आजोबा मयत झाल्यावर माझ्या वडिलांच्या हिस्यातील एका शेताच्या 7/12 वर आत्या आणि मोठ्या चुलत्यांचे नांव वारस लागले. त्यानंतर सदर जमिन प्रकल्पबाधित होणार असल्यामुळे विक्री आणि व्यवहारावर बंदी असल्यामुळे त्यावरील माझी आत्या आणि मोठया चुलत्यांचे नांव कमी करणे राहून गेले. नंतर मोठे चुलते पण मरण पावले. त्यामुळे आता माझी आत्या, माझे वडील यांच्या व्यतिरिक्त मोठया चुलत्यांचे वारस म्हणून चुलती, त्यांच्या तीन मुली आणि दोन मुलांची नांवे पण 7/12 मध्ये आली. चुलती पण मरण पावली. आता शेताचे लवकरच अधिग्रहण होणार असल्याने मात्र व्यवहारांवर बंदी असल्याने 7/12 वर वारस लागलेल्यांचे हक्कसोड करून घेणे हा पर्याय निवडला. सदर शेत तोंडी वाटणी नुसार माझ्या वडिलांचे असल्याचे जाणीव असल्यामुळे एक चुलत भाऊ सोडता इतर सर्व जण हक्कसोड लिहून देण्यास तयार झाले. शेताचे पैसे मिळणार असल्याने तो भाऊ असं वागत असेल की काय म्हणून त्याला मुळात नसला तरी त्याला त्याच्या 1/7 वाट्याचा मोबदला देऊ केला. पण त्या चुलत भावाचे म्हणणे आहे की मला पैसे पण नको आणि मी हक्कसोडसाठी पण येत नाही. त्यामुळे वडिलांव्यतिरिक्त उरलेल्या 7/12 वर नांवे असलेल्या पैकी माझी आत्या, तिन्ही चुलत बहिणी आणि एका भावाने दुय्यम निबंधक यांचे समक्ष विनमोबदला माझ्या वडिलांच्या नांवे हक्कसोड लिहून दिले. त्याची नोंद तलाठी यांना घ्याण्यासाठी नोंदणीकृत हक्कसोड पत्राची प्रत तलाठी यांना सादर केली. आता मला विचारायचे आहे की, 1) जेंव्हा सदर शेतजमीन प्रकल्पात गेल्याने हस्तांतरित जमिनीचा जेंव्हा मोबदला मिळेल तेंव्हा काय पद्धत अवलंबली जाईल. मोबदल्याची रक्कम सामयिक मिळेल की हिस्याप्रमाणे मिळेल? जर मोबदल्याची रक्कम सामायिकच मिळणार असेल पैसे चुलत भावाने म्हटल्याप्रमाणे पैसे पण घेण्याची तयारी दाखवली नाही. तर काय होईल? काही मोबदल्याची रक्कम मिळण्यास काय अडचण येईल आणि तेंव्हा काय करावे लागेल? 2) जर चुलत भावाचे सहमती शिवाय रक्कम मिळणारच नसेल तर न्यायालयात जाणे उपयोगी राहिल का? आजोबांनी तोंडी वाटणी केल्याने कागदोपत्री पुरावे नसल्याने ज्या सहहिस्सेदरांनी वाटणीची सत्यता माहिती असल्याचे मानून विनमोबदला हक्कसोड लिहून दिला त्यांनी सदर शेतजमीन आजोबांनी केलेल्या तोंडी वाटणी नुसार माझ्या वडिलांच्या हिस्याची असल्याची साक्ष दिल्यास उपयोगी पडेल का? किंवा याव्यतिरिक्त अन्य काही योग्य मार्ग सुचविण्यास सर्व मान्यवरांना विनंती.
७/१२ वरील इतर सर्व व्यक्तींनी आपले नावे हक्क नोंदणीकृत दस्ताद्वारे दिला आहे . त्यामुळे इतरांचे हक्क संपुष्टात आले आहेत . केवळ एकाचे व्यक्तीचे नाव ७/१२ सादरी आहे .
नुकसान भरपाई वाटप करताना , इतर व्यक्तींना पैसे मिळणार नाहीत . मात्र ज्याचे नाव अद्याप ७/१२ सादरी आहे त्याला त्याचे हिस्स्याप्रमाणे पैसे मिळतील . त्याने पैसे घेतले नाही तरी आपली नुकसान भरपाई आपणास मिळेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Gopal Mahajan
12-12-2021
gvmahajan7@gmail.com
महानगरपालिका हद्दीत 600 चौरस फुटाचे 3 प्लॉट चे तुकडे आहेत. दोन जणांना 900 चौरस फूट घ्यायचे आहे. कस कराव लागेल सांगा किंवा याबाबत कार्यवाही कशी करतात याचा लेख कूठे कसा मिळेल कृपया सांगा
आपणास मंजूर अभिन्यास मधील भूखंड एकत्रीकरण करावयाचे आहेत . त्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घ्या
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sameer Dukare
06-12-2021
sameerdukare12@gmail.com
आमच्या आई च्या नावे तिच्या वडिलांकडून हस्तांतरित झालेला 7/12 आहे ज्याची माहिती आम्हाला तीन वर्षापूर्वी झाली, सदर जमीन ज्या व्यक्ती कडून विकत घेतली होती त्याच व्यक्ती चा कब्जा त्या जमिनीवर आहे, आम्हाला त्या जमिनी विषयी आधी माहिती नव्हती, जमीन परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल
सदर जमीन शेतजमीन आहे आणि कब्जा असलेला व्यक्ती त्यावर शेती करतो
जमिनीवर पूर्वीच्या मालकाचा ताबा आहे . ज्या व्यक्तीकडून आपल्या आईचे वडिलांनी खरेदी केली होती त्यास जर १२ वर्षे झाली नसतील तर( म्हणजे जमीनीवरील ताबा १२ वर्षापेक्षा कमी असेल ) , आपण तहसीलदार यांचेकडे मामलतदार कोर्ट अधिनियम १९०५ च्या कलम ५ (ब ) दावा /अर्ज करा .
(तहसीलदार असा अर्ज दाखल करूनच घेतील असेल नाही . त्यांचे विवेकानुसार ते अर्ज दाखल करून घ्याचा का नाही ते ठरवतील . )
मात्र जर १२ वर्षापेक्षा जादाचा कालावधी झाला असेल तर आपणास The Specific Relief Act खाली दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sandy
06-12-2021
mechmaster7@gmail.com
नमस्कार सर
माझ्या आजोबांनी व इतर तीन नातेवाईक यांनी सामाईक १११ गुंठे पाटील इनाम जमीन विकत घेतली. खरेदी खतामध्ये ४ ही जणांचे प्रत्येकी क्षेत्र किती हे नमूद आहे. सद्यस्थितीत ४ ही व्यक्तींचे खाते व ८ अ देखील वेगवेगळे आहेत. आता ४ ही जण आपापल्या हिस्स्याची जमीन कसत आहेत.सदर खरेदीखतामध्ये सदर जमिनीमध्ये कोणाची वहिवाट कुठे आहे हा उल्लेख नाही . आता आम्हाला कागदोपत्री वहिवाटीनुसार प्रत्येकाचा हिस्सा (नकाशा )वाटून घ्यायचा आहे. मा. तहसीलदर यांच्याकडे १९६६ कलम ८५ नुसार वाटपासाठी अर्ज केला असता त्यांनी आपल्या सातबारावर प्रेत्यकाचे स्वतंत्र क्षेत्र नमूद असून स्वतंत्र आणेवारी देखील नमूद आहे त्यामुळे कार्यवाही करता येणार नाही असे सांगितले आहे. तरी आता खरेदीखतामध्ये नमूद असलेल्या प्रत्येकाच्या क्षेत्रानुसार या जागेत वहिवाटीनुसार नकाशा क्षेत्र ठरवून घ्यायचे असेल तर कोणाकडे अर्ज करावा लागेल.
आपल्या जमिनीचे क्षेत्र किती आहे ?
iii गुंठे म्हणजे पाऊण गुंठे कि १११ गुंठे
जर iii म्हणजे पाऊण गुंठे असेल तर वहिवाटीप्रमाणे स्वतंत्र ७/१२ होणार नाही .
जर क्षेत्र १११ गुंठे असेल तर , जमीन ज्या भागात आहे त्या ठिकाणचे प्रमाणभूत क्षेत्र किती आहे ? ते तपासून घेणे आवश्यक आहे . जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा प्रत्यकाकडे कम क्षेत्र वहिवाटीस येत असेल तर , आवण तुकडेबंदी कायद्याचा भंग केला आहे .क्षेत्र प्रत्यक्ष वाटप करण्याच्या फंदात पडू नये .
पण जर प्रत्येकाचे वहिवाटी खालील क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जादा असेल तर , उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे मोजणी करून आकारफोड पत्रक प्राप्त करून घ्या . वहिवाटीप्रमाणे स्वतंत्र ७/१२ प्रत्येकास मिळेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अशोक यशवंत मोरे
04-12-2021
aymore1952@gmail.com
माझे जमिनीला 1/4/57 चे करु लागले आहे. नंतर झालेल्या केस मध्ये कुळ कमी झाले आहे.2021 मध्ये पेपर नोटीस दिली व सर्च रिपोर्ट घेऊन जमिन विक्री केली. त्या मूळे काही कायदे विषयी प्रश्न होइल का?
वास्तविक ०१/०४/१९५७ चे कुल हे मानीव खरेदीदार कुल आहे . त्यामुळे अश्या कुळाचे नाव कमी कसे झाले ?
जर कुळाने अपील केले व त्याचा विलंब माफ केला तर , तर त्याचे नाव पुन्हा कुल म्हणून लागून , त्याचे नावे किंमत ठरू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Ganesh bankar
04-12-2021
ganeshbankar0902227@gmail.com
मी गाव - चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे राहत असून.. मा तहसीलदार यांच्या आदेशाने इनाम जमिनीवरील आमची वहिवाटदार म्हणून असलेली नावे कमी झालेली आहेत.. वर त्यावर वक्त प्रतिबंधित सत्ता प्रकार असे नाव आले आहे..कृपा करून मार्गदर्शन करा ..sir
वक़फ मिळकतीच्या हस्तांतरानावर कलम १०४ अ नुसार ( The Waqf Act १९९५ ) प्रतिबंध आहे .
मध्यंतरी या मिळकतीचा सर्वे होऊन , वअक़फ मिळकत अनुसूचित करण्यात आल्या आहेत
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3374 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
