जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आपला प्रश्न:
सर माझ्या पनजोबांना 1968 साली वन जमीन मिळालेली आहे त्याची नोंद ही सर्व्हे नंबर वर झाली आहे परंतु नंतर जमीन एकत्रीकरण योजनेनंतर ते नाव कमी होऊन पुन्हा गट नंबर 7/12 वर फॉरेस्ट चे नांव लागले ते नाव कमी करण्यासाठी 1989 साली फेरफार झाला आहे परंतु त्याचा अंमल फेरफार सदरी झाला नाही त्याचा अंमल होण्यासाठी 2025 साली मी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दिला आहे आणि तो अर्ज तहसीलदार यांनी मंडळअधिकारी यांच्याकडे पाठवले आहे त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जमीन निर्वणीकरण दाखला मागितला

Question by Manish Paspohe
08-09-2025
manishpaspohe@gmail.com

ता. रावेर जि. जळगाव येथील शेतातून गेलेला पाट मोजायचे असल्यास कुठल्या कार्यालयात संपर्क करावा लागेल?

Question by V choure
07-09-2025
vihanchoure09@gmail.com

नमस्कार साहेब,
माझ्या आजोबांनी 16 एकर शेत जमीन 1949 रोजी खरेदी केली.त्या खरेदी खतामध्ये विहिरीचा पण उल्लेख केला.
पण सातबारा च्या इतर हक्क मध्ये विहिरीचा उल्लेख नाही.
त्यानंतर ती शेत जमीन 1964 रोजी त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजे माझ्या वडिलांना वाटणी करून दिली.पण वाटणी पत्रात विहिरीचा उल्लेख केला नाही.
त्यानंतर माझ्या वडिलांनी आम्हा तीन भावांमध्ये रमेशला 4 एकर , सुरेशला 4 एकर आणि मला 8 एकर जमीन वाटणी करून दिली .पण त्यामध्ये पण विहिरीचा उल्लेख करण्यात आला नाही.विहिरी माझ्या आणि सुरेश च्या बांध्याच्या मधोमध आहे.
त्यानंतर मी 2005 साली 4 एकर जमीन विष्णू यांना विकली असून विकलेल्या क्षेत्रात विहीर गेली आहे.पण मी शेत जमीन विकताना खरेदी खतामध्ये विष्णू ला विहिरीत हिस्सा दिला नाही. फक्त खरेदी खतामध्ये आंब्या च्या झाडात अर्धा हिस्सा लिहून दिला आहे.तर आता मला विहिरीची नोंद 7/12 सदरी इतर हक्क मध्ये लावायची आहे तर मग मी काय करावे.
500 शपथ पत्रावर कोणताही भाऊ सहमती देत नाही.
आणि माझा हिस्सा विहिरीत किती असेल?
गांव नमुना 14 कुठे मिळेल

Question by Vasant Kumbhar
28-08-2025
diliparmy@gmail.com

सन 2025 मध्ये मिळकत पत्रिकेत सत्ता प्रकार नमुद नाही, असा शेरा आला आहे. सदरहू जागा मी सन 1998 साली विकत घेतली असून धारक सदरी बिगर परवाना बिन शेती अशी नोंद 1977 साली घेतलेली आहे. मला जमीन खरेदी देणार याचे नाव धारक सदरी नमूद नाही. परंत, जमीन खरेदी देणार व घेणार यांची नावे ग्रामपंचायतीतील रेकॉर्ड मध्ये नमुद आहे. व खरेदी घेणार आजही ग्रामपंचायतीस कर भरणा करत आहे. तरी मिळकत पत्रिकेवर कोणती सत्ता प्रकार नमुद करावी? याची प्रक्रिया काय आहे? याबाबत मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.
32 म ला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्ग १ जमीन करण्यासाठी ४० पट आकारणी नजराणा रक्कम अती अल्प रु ५.६० असेल तर नियमानुसार किमान रक्कम किती भरावी लागेल याबाबत नियम, परिपत्रक ची प्रत तथा माहिती द्यावी ही नम्र विनंती

Question by ujval
26-08-2025
ujvaltavar@rediffmail.com

मंडळ अधिकारी यांना जिल्हा बदलीसाठी विनंती अर्ज देता येतो का
मी ता.जि. धाराशिव येथील प्लॉट जमीन (3000 फुट) 2020 मधे खरेदी केली आहे. जमीन खरेदी वेळी सदर जमीन वर्ग-1 होती अता शासनाने सदर जमीन वर्ग-2 मध्ये समाविष्ठ केली आहे. मी प्लॉट खरेदी केलेनंतर 7/12 वर नांव लावले नव्हते. अता 7/12 नांव लावता येते का ? कृपया मार्गदर्शन व्हावे सर
मला शेतात जाण्यास कुठलाही रस्ता नाही आहे, तरी मला शेतात जाण्यास प्रशासन रस्ता मिळवून देईल का

Question by Chandan Mokashe
22-08-2025
mokashe@gmail.com

सीलिंग जमीनीचे रहिवाशी अकृषिक करने करिता अनुज्ञ आहे का?
असल्यास काही प्रक्रिया आहे का
वर्ग २ ७/१२ मध्ये २० + १ गुंठा पोटखराब क्षेत्र आहे. ३२ म झाल्यावर कुळ मालकांची नावे इतर हक्कातून कमी करताना पोट खराबा क्षेत्रं शासन कमी करते का ?
४० पट आकारणी नजराणा भरल्यावर १ गुंठा पोट खराब क्षेत्र शासन कमी करते का ?
वरील दोन बाबतीत पोट खराब १ गुंठा वर कसा अंमल होतो ?

Question by Paresh Bhombal
21-08-2025
ppb3012@gmail.com

सध्या आम्ही कसत असलेली जमीन 4 पिढ्या आधी खरेदी केली आहे. आणि त्यावर अजूनही जुनी नावे दाखवत आहेत. तर नवीन नावे लावण्यासाठी काय करावे लागेल
महाराष्ट्र ग्रामपंचायतचा कायदा नमुना नंबर 8 सन 1978-79 ते १९७९व८० ग्रामपंचायत हिवरे.बु तालुका जुन्नर जिल्हा पुणे मधील मिळकतीचे नंबर 175, मालकाचे नाव हौसूबाई यांचे नाव नमुना आठ नियम सन 2020-21 ते 23-24 साठी कर आकारणी नोंदवहीमध्ये मालकाचे धारण करणारेचे नाव तानाजी असे घेण्यात आले.

भोगवटा करणारे माझे वडील श्री तुळशीराम यांचे नाव का कमी करण्यात आले. हौसूबाई यांनी सदर जागा ९९ वर्षाकरिता दिली होती त्याचे करार पत्र आहे.

माहिती अधिकार अन्वये मालकाचे धारण करणारेचे नाव तानाजी यांचे नाव कसे घेण्यात आले व भोगवटा करणारे माझे वडील श्री तुळशीराम यांचे नाव का कमी केले याची माहिती विचारील असता ग्रामसेवक यांनी याबाबत कोणतेही दास्ववेज उपलब्ध नाही असे कळविले. सदर भोगवटादार नोद ही बे कायदेशीर कमी करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी यांना तक्रार केली परंतु कुठलेली प्रतिउत्तर नाही आहे.
नमस्ते सर, ए कु प ची नोंद आमचे चुलते याच्या नावे होती. त्यांच्या मृत्यू पक्षात त्यांच्या मुलांची नोंद त्या सातबारा सदरी झाली आहे. त्या 7/१२ सदरी ए कू प ची नोंद कमी करून इतर भावांच्या मुलांचे नोंद करता येईल का ?त्यामध्ये ए कू प असलेल्या चुलत्यांची मुलांची संमती घ्यावी लागते का? संमती देत नसल्यास काय करावे ?कृपया मार्गदर्शन करावे सर

Question by Vasant Kumbhar
15-08-2025
diliparmy@gmail.com

मी सांगली येथील आमच्या गावात सन 1998 साली नोंदणीकृत खरेदीखताने न.भू.क्र. 685 व 686 वर बांधलेले दगड मातीचे घर विकत घेतले होते. खरेदीखतात न.भू.क्र. 685 व 686 या मिळकती नमुद केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मी संबंधित गावाच्या मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयाकडे न.भू.क्र. 685 व 686 या मिळकतपत्रिकेवर माझे नाव दाखल होणेकामी नोंदणीकृत खरेदीखताची प्रत जोडून अर्ज सादर केला असता, दोन्ही मिळकतपत्रिकेच्या धारक सदरी सन 1977 च्या नोंदीने H- बिगर परवाना बिनशेती अशी नोंद असून खरेदी देणार याचे नाव धारक सदरी नसल्याने माझे नावाची नोंद मिळकतपत्रिकेवर करता येत नसल्याचे कळविण्यात आले आहे. खरेदी देणार याचे नाव गावाच्या सिटीसर्व्हे एन्क्वायरी (चौकशी) नोंदवहीत दि. 09/10/1977 रोजी नमुद आहे. व त्यास चा.नं. प्रमाणे बिनशेती सारा व दंड भरण्यास पात्र असे लिहीले आहे. तसेच खरेदी देणार याचे नाव सन 1997 मध्ये ग्रामपंचायत गाव नमुना नं. 8 यात दाखल आहे. आजरोजी खरेदी देणार मयत आहे. सन 1998 पासून ग्रामपंचायत गाव नमुना नं. 8 मध्ये खरेदी देणार यांच्या ऐवजी माझे नाव दाखल असून दरवर्षी मी ग्रामपंचायतीस कर भरतो आहे. आणि माझे नावे पावती मिळते. सबब आपणांस विनंती करण्यात येते की, वरील दोन्ही मिळकतपत्रिकेवर माझे नाव धारक सदरी कशा प्रकारे दाखल करता येईल? कृपया याची माहिती दयावी.
एकच तुकडा 7/12 , वर्ग दोन, सामायिक क्षेत्र 35 आहे. त्यामध्ये चार हिस्सेदार पैकी एक हिस्सेदार चे क्षेत्र 6 आर कुळ कायदा शर्त कमी करून अन्य तिघांची कुळ कायदा शर्त कायम ठेवणे नियमात आहे का? एक हिस्सेदार ने कुळ शर्त कमी करणे चा अर्ज करताना व इतर असे लिहिले नाही. त्याचे कारण लिपिकाने दिले आहे. तसेच ३५आर ची ४० पट आकारणी व ६ आर ची आकारणी रु ३०० असताना असे करणे योग्य आहे का?
शासकीय वसाहती मधील मोकळी जागा आपले सरकार केंद्र आणि ऑनलाईन सेवेसाठी केंद्र चालू करण्यासाठी भाडेतत्वावर भेटते का?
सर एका माजी सैनिक ला शासनाकडून मिळालेली जमीन मला 1990 मध्ये खरेदी खत करून दिले आहे.आता पर्यंत त्याची नोंद काही कारणास्तव 7/12 वर लावण्याची राहून गेली होती. सध्या 7/12 वर त्याचे नाव आहे.परंतु तो माजी सैनिक आता मयत आहे. ती जमीन वर्ग एक करण्यासाठी मला घेणाऱ्यास चलनाचे पैसे भरता येतील का त्याच्या नावावर वर्ग एक झाल्यावर 7/12 वर माझ्या नावाची नोंद होईल का?
आपण सन १९९० मध्ये जमीन खरेदी केली त्या वेळी विभागीय आयुक्त यांची परवानगी घेतली होती का ? जर परवानगी घेतली नसेल तर आपणास जे हस्र्तान्तरण करण्यात आले त्याला प्रथम नियमित करून घ्यावे लागेल. नियमित झाल्यावर आपण वर्ग २ ची जमीन वर्ग १ करावी .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महसूल तथा तहसिलदार व भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार आणि इतर निवेदने, स्मरणपत्रे देताना रु 5 कोर्ट फी स्टंप लावणे निमानुसार आहे का ? असल्यास किंवा नसल्यास त्या बाबत परिपत्रक किंवा नियम कलम ची माहिती द्यावी.
१९५५ मध्ये जात इंनाम खालसा केले. १९६३ मध्ये आमची ३२ ग/म प्रमाणे कबेजेदार सदरी नोंद झाली. न अ शर्तीने कु का 43 नोंद झाली. आज ४० पट आकारणी भरल्यावर ही जमीन वर्ग १ होऊन, " न अ शर्तीने " शेरा कमी होईल का ? १९५५ पासून इंनाम व वतन नोंद नाही.
आपल्या नावे ३२ म प्रमाणपत्र निर्गमित करून १० वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी झालेला असेल तर नझराणा चलन शासन जमा करा . वर्ग २ चा शेरा कमी होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by pawar machindra ukha
08-08-2025
mupawar@gmail.com

sir majhi jamin badarkhe ,tal.pachora.dist.jalgoan yethil gat kramank 36 hi kul kaydyane varg 2 jhaleli ahe tila varga 1 karne aahe tari mala najrana kiti bharave lagel
सर माझा प्रश्न असा आहे
3 आर जमीन राष्ट्रीय महामार्ग साठी A व B व्यक्तीच्या नावे संयुक्त रीत्या संपादित झाली. निवाड्यात, नोटीस , पेपर वर दोघांचे नाव आहे ते प्रकरण न्यायालयात चालू असताना तलाठीशी संगनमत करून B व्यक्तीने 7/12 वर त्याच्या क्षेत्रातून 3 आर जमीन कमी करून घेतली व ते पुरावा म्हणून न्यायालयात दाखल केले. माझ्या जमिनीतून 3 आर जमीन महसूल रेकॉर्ड मध्ये कमी केली आहे. त्याचा मावेजा मला मिळावा असे न्यायालयात दाखल केले. त्याचा निकाल त्या व्यक्तीच्या म्हणजे B च्या बाजूने आला.
A व्यक्तीला वरिष्ठ न्यायालयात अपील साठी जायचे आहे तर त्याने काय करावे. तलाठीच्या चुकीच्या नोंदी मुळे त्याच्या विरोधात निकाल गेला.
कृपया मार्गदर्शन करावे.
आता आपणाला उच्च न्यायालयात अपील दाखल करावे लागेल . तलाठी याचे कृती बद्दल अपील करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
सातबाऱ्यावर म.ज. म. अ 1966 कलम 36 व 36 अ ला आधीन आदिवासी खातेदार अशी नोंद तलाठी कोणत्या GR नुसार घेऊ शकतात. अशी नोंद घेण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार साहेबांचा यांचा आदेश लागतो का. अगोदर सातबाऱ्यावर आदिवासी खातेदार अशी कोणतीही नोंद नाही. नवीनच नोंद घ्यायची आहे.
आपल्या प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे , महसूल संहितेच्या कलम ३६ व ३६ -अ अन्वये अश्या नोंदी ७/१२ च्या इतर हक्कात घेतल्या जातात . अश्या नोंद घेण्यासाठी जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्या आदेशाची आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

जय हिंद सर माझे पंजोबा 19951 च्या आधी पासून संरक्षित कुळ शेत जमीन कसत होते एकूण क्षेत्र 54.23 1951 पासून काबिज आहे त्यात त्यांच्या नावे 24. एकर जमीन 38E प्रमाणे नावे लागली होती सातबाऱ्यावर नोंद पण आहे आजोबांना प्रमाणपत्र दिले असेल पण आमच्या कडे नाही सर्व जमीन आमच्या ताब्यात होती त्यातून 33 एकर जमीन डायरेक्ट एका इसमाने नावे लाऊन घेतली आहे त्याचे म्हणणे आहे की आमच्या कडे 38E चे प्रमाण पत्र नाही म्हणून मी जमीन मूळ मालक कडून विकत घेतली असे म्हणत आहे नोंद कशी केली जाते सातबाऱ्यावर खंड भरून का भरण्याच्या आधी सर आता आम्हाला भेटल का 38E प्रमाण पत्र निघत असेल तर प्रोसेस सांगा ना
३८ E प्रमाणपत्र आपल्या पणजोबा यांना केवळ २४ एकर जमिन पुरते मिळाले आहे . म्हणजे २४ एकर पुरतेच आपल्या आजोबांचे व नंतर आपले नाव दाखल होणे आवश्यक . जे उर्वरित क्षेत्र आहे त्याची विक्री किंमत आपल्या आजोबांच्या नावे निच्छित झाली नसावी . आपण आपल्या तालुक्याच्या शेत जमीन न्यायाधिकरणाकडे , उर्वरित ३३ एकरची विक्री किंमत निच्चीत झाली होती का ? याची खात्री करा . जर विक्री किंमत निच्छित झाली असेल तर , 38E प्रमाप्त्रासाठी अर्ज करा . प्राप्त प्रमानपत्राच्या आधारे त्या दुसर्या माणसाने जे खरेदी केले आहे ते रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

३८ E प्रमाणपत्र आपल्या पणजोबा यांना केवळ २४ एकर जमिन पुरते मिळाले आहे . म्हणजे २४ एकर पुरतेच आपल्या आजोबांचे व नंतर आपले नाव दाखल होणे आवश्यक . जे उर्वरित क्षेत्र आहे त्याची विक्री किंमत आपल्या आजोबांच्या नावे निच्छित झाली नसावी . आपण आपल्या तालुक्याच्या शेत जमीन न्यायाधिकरणाकडे , उर्वरित ३३ एकरची विक्री किंमत निच्चीत झाली होती का ? याची खात्री करा . जर विक्री किंमत निच्छित झाली असेल तर , 38E प्रमाप्त्रासाठी अर्ज करा . प्राप्त प्रमानपत्राच्या आधारे त्या दुसर्या माणसाने जे खरेदी केले आहे ते रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा करावा लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

सर , मी सन 2000 मध्ये 2हेक्टर 83 आर जमीन दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणीकृत खरेदी केली . त्याची नोंद 7/12 वर 2000 मध्ये लगेच लागली.पण आता 7/12 वर 2 आर जमीन कमी दाखवत आहे. म्हणजे 2 हेक्टर 81 आर दाखवत आहे. ते 2 आर क्षेत्र ची चौकशी केली असता, जुने सातबारा, फेर, काढले असता असे समजले की मला जमीन दिलेल्या शेतकऱ्याने तलावात शिल्लक पेक्षा जास्तीचे क्षेत्र त्याच्या नावे संपादित झाले आहे. तलाव 2004 मध्ये झाले आहे. व 2008 मध्ये तलावाचे फेर झाले आहे. मी जमीन घेतल्याच्या नंतर 4 वर्षांनी तलाव झाले आहे.मला दुरुस्ती करता येईल का? अर्ज कोठे करावे लागेल.
आता दुरुस्त करता येणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.43 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3374
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3