जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by Vishal prabhakar kalinkar
05-12-2024
vihankalinkar097@gmail.com
महसुल विभागातील महसूल सेवक (कोतवाल )यांचे तलाठी साझा सोडुन तहसील कार्यालय येथे देखरेख करिता रात्र पाळी करिता 12 तास सेवा संलग्न करण्यात येतात , सदर रात्र पाळीचे संलग्न केलेल्या सेवा नियमबाह्य आहे किंवा कसे याबाबत माहिती देण्यात यावी, तसेच रात्र पाळी करिता सेवा संलग्न करणे बाबत चा शासन परिपत्रक/शासन निर्णय असल्यास त्याची प्रत देण्यात यावी
Question by शंकर
03-12-2024
ashuamol1986@gmail.com
सर नमस्कार
मृतूपत्र संबधी केस चालू आहे बनावट मृतूपत्र आधारे ७.12 ला नाव लाऊन प्रतिवादी यांनी सामाईक हिस्यातील वाटप पत्र न झालेल्या जमिनीची मन मानेल अश्या चतुर सीमा टाकून त्रयस्थ व्यक्तीला जमिनी विक्री केली आहे ,खरेदीदार कब्जा घेण्यासाठी येत आहेत , जमीन विकली त्यामध्ये आमचे घर व गोठा आहे तर खरेदी दस्त रद्द करता येईल का? ,मूळ केस अजून चालूच आहे ,कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
आपणाला खरेदीखत व मृत्युपत्र हे दोन्ही रद्द करून घ्यावे लागेल . त्यासाठी विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ अंतर्गत , दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल . दावा दाखल करताना ,खरेदी-दारांनी जमिनीचा ताबा घेण्यास , दाव्याचा निकाल लागेल पर्यंत मनाई करण्यात यावी असा अंतरिम आदेश हि घेणे आवश्यक .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by pramod bankar
02-12-2024
bankarpd@gmail.com
Shetjaminicha bandh Samayik Asto Kivha shetjaminichya bandhababt malki lagatchy donhi shetkari yanchi aste ka
मालकीहक्काबाबत , म. ज अ १९६६ च्या कलम १३८ नुसार दोन शेतामधील / भू-खंडामधील , सीमा रेषा याच्या आतील जमीन त्या त्या शेतकऱ्याच्या मालकीची असते . परस्पर संमतीने , वंश -परंपरागत पद्धतीमुळे शेताच्या बांधावरून जाण्याची / त्याचा वापर करण्याची पद्धत असते .
कायदेशीर रित्या शेताचा बांध हा एकत्रित मालकीचा नसतो . सीमा चिन्हामुळे ( baundary- mark) मुले , दोन्ही शेतकर्याची मालकी निच्छित केली जाते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश नारायणजी बडवाईक
30-11-2024
ganeshbadwaik40@gmail.com
मि १२वर्षाच्या आधी जमीन 0.32 आर जमीन खरेदी केली . या जमिनीचा गट १२५ हे.०.५८ / पैकी 0.32 आर जमीन खरेदी केली त्यात सात/बारा १२५/१ व सात/बारा १२५/ २ आहे. परंतु सहधारक पोट हिश्याची करण्या करिता समती पत्रावर सही करुण देत नाही. अशा प्रसंगी मला पोट मोजनी करता येत नाही. याबाबत मला मार्गदर्शन करावे.
आपल्या प्रश्नावरून भू क्र १२५ चे क्षेत्र ०.५८ ( हे - आर ) असल्याचे दिसून येते . भू क्र १२५ पैकी आपण ३२ आर क्षेत्र खरेदी केले त्यामुळे भू क्र १२५ चे १२५/१ क्षेत्र - ०.३२ ( हे-आर) व उर्वरित १२५/२ चे क्षेत्र ०.२६ ( हे आर ) दर्शवण्यात आल्याचे दिसून येते . त्यामुळे स्वतंत्र ७/१२ असल्यामुळे , या पेक्षा कोणता पोट-हिस्सा करावयाचा आहे . मी कथन केल्यापेक्षा आपला प्रश्न वेगळा आहे का ? तसे असल्यास या उत्तराचा संदर्भ देऊन पुन्हा प्रश्न मांडा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Kaunain Sahil Shaikh
23-11-2024
kaunainshaikh2780@gmail.com
आदिवासी शेत जमीनची विक्री जनरल व्यक्तीस करता येते का?
अशी परवानगी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत देण्यात येते की मंत्रालयामार्फत देण्यात येते ?
याविषयी माहिती देण्यात यावी ही विनंती.
आदिवासी जमातीतील व्यक्तीच्या मालकीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस शासनाच्या संमतीने व जिल्हाधिकारी यांच्या पूर्व-परवानगीने , म.ज.म.अ १९६६ च्या कलम ३६ अ अन्वये हस्तांतरित करता येऊ शकते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन गव्हाने
18-11-2024
ravindra171282@gmail.com
माननीय सर आपण केलेल्या मार्गदर्शना साठी धन्यवाद
प्रश्न असा आहे की, माझे वडील आणि मी कामा निमित्त शहरा मध्ये रहायला होतो त्या दरम्यान आमच्या गावातील घरा जवल आमचा जूना गोठा होता (गावठान जमीन), त्याची गावातील ग्रामपंचायत ऑफिस मधे नोंद वर्ष 2002 साली लावली होती पन कालांतरने वर्ष 2015 साली किंवा त्यानंतर भूमि अभिलेख विभागाने गावाचा सिटि सर्वे केला त्या दरम्यान आम्ही तेथे उपस्थित नव्हतों त्यामुले चौकशी दरम्यान आमच्या काका ने त्या जमीनी च्या सिटि सर्वे/मिलकत पत्रिके मधे त्यांच नाव वहीवाटदार म्हणून लावल आहे , वर्तमान स्थिति मध्ये काका वारले आहेत आणि मिलकत पत्रिकेवर त्यांच वहिवाटदार म्हणून नाव लागल आहे।
सध्या आमच जून मातीच घर पड़ायाला आले आहे त्यामुले आम्ही आमच्या गोठ्याच्या ठिकाणी गावठान मध्ये घर बांधयला घेत आहोत परंतु सदर मिलकत पत्रिके मधे वारलेले काका वाहिवाटदार आहेत ।
तर अश्या परिस्थिति मधे मिलकत पत्रिके मधे सुधार होवु शकतो का किंवा कुठल्या प्रकारे आम्ही त्या मिलकत पत्रिके मधे आमचे नाव लावू शकतो ।
आपल्या काकांचे नाव धारक म्हणून दाखल असेल . आपण या मिळकत पत्रिकेवरील नोंदिविरुद्ध , म.ज.म.अ. १९६६ च्या कलम २४७ अन्वये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अपील दाखल करू शकता . मात्र गोठा हा केवळ आपल्या वडिलांचे मालकीचा होता याचा पुरावा म्हणजे , ग्रामपंचायत करआकारणी पत्रक किंवा अश्याच प्रकारचा दस्तऐवज असणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन संभाजी लांडे
17-11-2024
sachinlande12@gmail.com
नमस्कार सर,
माझ्या आजीच्या नावावर एक जमीन आहे, परंतू 7/12 वर आजीच्या नावापुढे आजोबांचे दुसरे नाव(टोपण नाव) लागले आहे..(सखूबाई रामभाऊ ऐवजी सखूबाई सुंद्राजी )..तरी ते दुरुस्ती साठी काय करावे ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अन्वये लेखन प्रमाद दुरुस्तीसाठी , तहसीलदार यांचेकडे अर्ज करा .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन शिवाजी बिरादार
15-11-2024
sachinb6995@gmail.com
सन 1989 साली माझ्या वडीलाने माझ्या natewaikala 1 एकर जमीन विकली होती त्यासाठी खरेदी खत करत असताना चुलत्याने 1 एकर ऐवजी 7 एकर जमीन नावावर करून घेतली आहे, वडील अशिक्षित असल्याने त्यांना ही बाब 4 वर्षाने लक्षात आली. tyanchyashi वडील या विषयवार चर्चा केली असता दोघात वाद सुरू झाला. वडिलांची एक चूक झाली ते न्यायालयात गेले नाहीत. आज रोजी सदर विषय न्यायालयात अपील करता येतो का, व तो झालेला फसवणुकीचा व्यवहार रद्द करता येतो का.
ज्या विक्री द्स्तामुळे , १ एकर ऐवजी ७ एकर अशी चूक झाली आहे , तो विक्री दस्त रद्द करून मिळण्यासाठी , विनिर्दिष्ट अनुतोष अधिनियम १९६३ च्या कलम 31 खाली मा दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येऊ शकेल . परंतु मुदतीचा कायदा यानुसार विक्री दस्ताची माहिती झाल्यापासून त्याला केवळ ३ वर्षात आह्वणीत करता येऊ शकते . आपणाला विक्रीद्स्त आह्वणीत करण्यास झालेला विलंब मा दिवाणी न्यायालयाने प्रथम माफ करणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Manish yashwant shendre
14-11-2024
manishshendre59@gmail.com
माझ्या आईच्या आजीची शेती होती.ती कुळ कसण्यासाठी दिली होती. तथापि आईची आजी तसेच आईची आई वारले आहेत.जमीन मालक विधवा आहे.तसेच कुळयांचे निधन झाले आहे.त्याच्या मृत्यु पत्रानुसार त्याच्या वारसांचे नाव तलाठी यांनी लावलेले आहे. सदरचे शेतीवर माझ्या आजीचे वारस म्हणुन माझ्या आईचे नाव लावत येईल का तसेच इतर अधिकारात कुळाचे नाव लागलेले आहे. कुळाचे नाव कमी करता येईल का?
मी गृहीत धरतो की आपण , कोकण महसूल विभाग, पुणे महसूल विभाग किंवा नाशिक महसूल विभाग अंतर्गत आपले वास्तव्य आहे. हा भाग पूर्वी मुंबई राज्याचा भाग होता. व या भागाला महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम लागू आहे. मूळ जमीन मालकांचे वारस म्हणून आपले नाव विषयांकित जमिनीला , कुळाचे नावे विक्री किंमत निच्छित होत नाही व कुल विक्री किंमत शासन जमा करत नाही तोपर्यंत धारक म्हणून आपले नाव जमिनीच्या अधिकार हक्क पत्रकी लागू शकते.
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम यामधील उपबंधांचा विचार करता, कृषकदिनी म्हणजे ०१.०४.१९५७ पूर्वी पासून कुळ जमीन कसत असेल तर उपरोक्त अधिनियमाच्या कलम 32 नुसार कुळ मानव खरेदीदार झालेले आहे. केवळ या अधिनियमाच्या कलम 32 ग नुसार विक्रीची किंमत निश्चित न केल्याच्या कारणास्तव कुळाचे अथवा त्याच्या वारसांची नावे विषयांकित मिळकतीला दाखल नाहीत. सद्यस्थितीतील कुळाच्या वारसांनी महाराष्ट्र शेतजमीन व कुळ वहिवाट अधिनियमाच्या कलम 32 नुसार, विषयांकित मिळकतीची खरेदी किंमत निश्चित करण्यासाठी शेतजमीन न्यायाधीकरनाकडे अर्ज केल्यास कुलाचे नावे खरेदी किंमत निच्छित होऊन व अशी खरेदी किंमत कुलांनी शासनाकडे जमा केल्यास , त्यांची ( कुलाची ) नावे दाखल होतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Swapnil Malav
07-11-2024
swapnilm099@gmail.com
नमस्ते सर...
सचिन (मयत व्यक्ती) च्या आई ने आधी (सचिन चे वडील मृत्यूनंतर) हक्क सोड पत्र केले असता , सचिनच्या मृत्यू नंतर त्याची पत्नी आणि मुली यांची नावे वारस म्हणून लागतील.
परंतु त्या अर्जाच्या आधी आईने सचिन च्या मृत्यू नंतर स्वतःलाही सचिनच्या पत्नी आणि मुली सोबत वारस म्हणून अर्ज केला आहे,
त्यास सचिनच्या पत्नी यांनी हरकत घेतली आहे.
या मध्ये काय नियम लागू होतो हे कळवावे.
आपल्या प्रश्नानुसार, वडील यांचे मृत्यू पश्यात , मुलगा सचिन व आई यांचे नाव वारस म्हणून निश्चित झाले. तदनंतर मुलाच्या मृत्यूपूर्वी ( मुलगा हयात असताना) आईने , हक्कसोड पत्रकाद्वारे , तिचा मिळकतीतील हक्क मुलाचे नावे , नोंदणीकृत द्स्ताद्वारे सोडला असेल तर मिळकतीला केवळ मुलाचे नाव राहील . परिणामी , मुलाचे मृत्यनंतर , त्याची पत्नी व मुलगी यांचे नाव हक्क - पत्रकी दाखल होईल . हक्क सोड पत्रक नोंदणीकृत असेल तर , केवळ मुलगा हा मिळकतीचा मालक आहे .
मात्र हक्क सोड पत्रक नोंदणीकृत नसेल तर , आईचा मिळकतीतील हक्क अबाधित आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by p landage
05-11-2024
landagep24@gmail.com
नमस्कार सर
माझी 5 एकर जमीन होती त्यातील वरच्या बाजूची 3 एकर जमीन मी रमेश ला विकली . माझ्या शिल्लक 2 एकर जमिनीला खाली येण्यासाठी अगोदर पासून वहिवाटीचा रस्ता अस्तित्वात होता. तर रमेश ने तो वहिवाटीचा रस्ता अडवला व त्यावर विजेचे खांब उभे केले आहेत.
आणि ती जमीन रमेशने आता अकृषिक केली आहे.
तर मी कोणत्या कलमान्वये अर्ज करावा.
१) म.ज.म. अ.1966 कलम 143 नुसार रस्ता मागावा ?
२) म. ज.म. अ.1906 कलम 5 नुसार रस्ता मागावा.
अकृषिक जमिनीतून रस्ता 1906 नुसार रस्ता मागता येत नाही ना.मग मी काय करावे.
आपण शिल्लक राहिलेल्या जमिनीचा वापर शेतीसाठीच करत असाल तर , आपणाला माम्लेतदार कोर्ट अधिनियम अंतर्गतच अर्ज करत येईल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Mahesh Madhukar Survase
30-10-2024
maheshsurvase109@gmail.com
सीलिंग कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीचे भोगवटा वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येते का?
Question by दिपा गुरव
30-10-2024
sanategp1989@gmail.com
सर...मी पोलीस पाटिल असून मला वारस दाखला देण्याचा अधिकार आहे.
Question by Sijauddin mujawar
29-10-2024
sijauddinm786@gmail.com
आपले मार्गदर्शन खुप मोलाचे आहे. मी आपला मना पासून आभारी आहे. माझा प्रश्न असा की एकाच व्यक्तीचे
व्यक्तिगत दोन खाती असू शकतात का,? भूमी अभिलेख च्या 9(3)9(4)ला एकाच व्यक्तीचे दोन खाती दिसून येतात. हे रद्द करता येतात का?
Question by वाल्मिक सुरसे
29-10-2024
sursevalmik@gmail.com
महोदय
माझी नगरपरिषद हद्दी मध्ये एक इमारत आहे, ती खूप जुनी झाली आहे म्हणून मला आता ती पाडावयाची आहे तर सदर इमारत पाडून मला कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम करायचे नाही फक्त ती इमारत पाडून जागा मोकळी करून ठेवायची आहे. तरी मला नागरपरिषदे कडून परवानगी घेण्याची आवश्यकता आहे का आणि असल्यास तसे प्रोव्हिजन कोणत्या कायद्या मध्ये दिले आहे. कृपया मला मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
कोणतीही इमारत किंवा संरचना ही भगनावस्थेत असेल किंवा ती पडण्याचा संभव असेल किंवा त्या इमारतीपासून धोका असेल तर मुख्याधिकारी अशी इमारत जमीनदोस्त करण्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 195 अन्वये परवानगी देऊ शकतात. आपण मुख्याधिकारी यांच्याकडे तसा अर्ज करावा आपणास परवानगी मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Aruna Halkare
25-10-2024
arunahalkare52@gmail.com
माझ्या वडिलांचे निधन 2012 साली झाले नंतर वारसाहक्काने सातबारा वर आई, माझे व तीन भावांचे सामाईक हिस्साने नाव शेतीला लागले. 2017 साली एका भावाने वडिलांचे मृत्यूपत्राचे प्रोबेट, माझा व इतर भावाचे कोर्टात खोट्या पत्त्यावर नोटिस पाठवून आम्हाला एक्सपार्टी ठरवून प्रोबेट बनवले व त्यात स्वत:ला व ईतर भावांना 2.15 एकर व स्वतः च्या मुलाच्या नावाने 3.16 एकर शेती तसेच राहते घर लिहून घेतले व कोर्टाने मान्य करून प्रोबेट दिले. सदर प्रोबेट मध्ये मला चोळी बांगडी दिले असे नमूद केले. सदर प्रोबेट विरुद्ध आम्ही अपील जिल्हा न्यायालयात केले असता सदर कोर्टाने आम्हास हायकोर्टात जाण्यास सांगितले कारण प्रोबेट रद्द करण्याचे अधिकार हायकोर्टाला आहेत त्यानूसार हायकोर्टाने सदर प्रोबेट रद्द केले. परंतु याआधी प्रलंबित असलेला फेर तलाठ्याने विना नोटीस ओढून प्रोबेट प्रमाणे नावे लावले. सदर फेर रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असल्याने तेथे अपिल केले तेथे ते मंजूर झाले. परंतु विरुद्ध पक्षाने जिल्हाधिकारी कडे अपील केले व ते अपील मंजूर झाले. आता विभागीय आयुक्ताकडे आम्ही अपील केले आहे अजून निकाल दिला नाही.
याबाबत माझा प्रश्न आहे कि "हायकोर्टाने प्रोबेट रद्द केल्यानंतर मी सदर जमीन वर शेती करू शकते का अथवा समोरील पक्षास शेती करण्यास रोखू शकते का? शेतीमालकीचे अधिकार ठरविण्याचे अधिकार ज्युडीशियल कोर्टाला आहेत का महसूल कोर्टाला हे स्पष्ट करावे.
शेतीची मालकी ठरवण्याचे अधिकार हे केवळ दिवाणी न्यायालयास आहेत . वास्तविक न्यायालयाने मृत्युप्त्रास देण्यात आलेले संप्रमान ( probet) रद्द ठरवले असताना तलाठी यांनी नोंद घेणे व मंडळ अधिकारी यांनी मंजूर करणे चुकीचे आहे . आपण शेती करू शकता . समोरील पक्षाने आपणास रोखल्यास आपण दिवाणी न्यायालयात जाऊन मनाई हुकुम त्यांचेविरुद्ध घ्या .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर
07-10-2024
sagar06731@gmail.com
महोदय
१९७० साली जमीनची (भोगवटदार वर्ग १) नोंद आहे की व्यवहारासाठी खरेदी विक्री ची परवानगी मिळणे पुर्वी जमिनीचा कब्जा घेतल्याने गट स्कीम विरूद्ध साठेखताचा बेकायदेशिर व्यवहार असा इ हक्कात दाखल ठेवला असे मे तहसीलदार यांचा कडील हुकूम आले वरून नोंद केली अशी नोंद आहे मात्र ही नोंद रद्द झाली आहे तरी अशी एखादी नोंद रद्द झाली असेल तर तिचे रेकॉर्ड व तिचे कारण आपणास कुठे मिळेल ?
तसेच साठेखत हे १९६२ साली स्टॅम्प वर केले असून व ते महसूल दप्तरी तहसीलदार यांचा आदेश ला जोडून आहे तर आज ते खरेदी देणाऱ्याचा वारसांनी लागू पडेल का ?
तसेच एकत्रीकरण कायदा कलम ९(२)(३) काय आहे?
Question by Jitendra Kasar
01-10-2024
jitendrakasar.1984@gmail.com
प्राथमिक व माध्यमिक एका शाळेपासून दुसरी शाळा किती अंतरावर सुरु करू शकतो याची माहिती किवा GR सेंट करा
Question by Balaji
27-09-2024
balkrishnaabdare@gmail.com
नमस्कार., गावात नवीन जागा वडीलांनी घेतली 1986 मध्ये त्यांनी तलाठी कार्यालयात नोंदणी राहून गेली आता त्यावेळी सर्व नंबर होते आता गटनंबर घेता येत नाही, गट नंबरवर घेण्यासाठी आजरोजी काय करावे लागेल?
जर खरेदी केलेल्या जागेचा दस्त नोंदणीकृत नसेल तर आपणाला अशा जमिनीमध्ये कोणताही मालकी हक्क प्राप्त होत नाही. आपणाला तीच जमीन विकत घ्यायची असेल तर ती नोंदणीकृत दस्ताद्वारे विकत घ्यावी लागेल.
मात्र जर जी जमीन खरेदी केलेली आहे ती विकत घेतली असेल त्याची नोंदणी झालेली असेल मात्र केवळ तलाठी यांच्याकडे दस्त सादर न केल्यामुळे फेरफार मंजूर झालेला नाही आणि त्यामुळे अधिकार अभिलेख सदरील, 7/12 आपले नाव लागलेले नसेल, तर जरी त्या मिळकतीचा सर्वे नंबरची रूपांतर गट नंबर मध्ये झाले असेल तरीही जेवढे क्षेत्र नोंदणीकृत असतात नमूद केलेली आहे तेवढ्या क्षेत्राला आपले नाव लागू शकते.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sayyad Akhtar
24-09-2024
sayyedakhtar53130@gmail.com
एक व्यक्तीने जमीनीत प्लॉट पाडून बॉण्ड वर नोटरी खरेदी खत करुन दिले आहे.व आता त्या जमिनीचे त्याच्या मुलाला बक्षीसपत्र करुन दिले आहे.व तलाठी कार्यालय कडे 7/12 तयार करण्यासाठी बक्षीस पत्र दाखल केले आहे. त्याचा बक्षीसपत्रा आधारे नाव लागू नये या साठी मार्गदर्शन करा साहेब.
कोणतीही मालमत्ता ही नोंदणीकृत दस्ताशिवाय विकत घेता येत नाही तद्वतच आशा मिळकतीमध्ये कोणताही मालकी हक्क प्राप्त होत नाही. त्यामुळे अशा जमिनीचे जरी बक्षीस पत्र त्यांच्या मुलाला करून दिले तरी त्या मुलाला कोणताही मालकी हक्क प्राप्त होणार नाही. दस्ताची नोंदणी ही भारतीय नोंदणी कायदा 1908 प्रमाणे होणे अत्यंत आवश्यक आहे.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by shubham jaysing dange
24-09-2024
shubhamdange301@gmail.com
जि .सांगली ता.वाळवा गाव साखराळे मधील चालू न.35/ सी स 460/ प्लॉट न 52 सी सदर प्लॉट मी 2023 ला खरेदी केलासध्य स्थितीला सदर प्लॉटमध्ये अतिक्रमण असून त्या प्लॉट ची मोजणी मागवण्याकरता मी जिल्हा पुनर्वसन कार्यालय सांगली यांच्याकडे गेलो असता या प्लॉटचे सेपरेट नकाशा नाही त्यामुळे मोजणी करता येणार नाही असे उत्तर दिले त्यानंतर भूमी अभिलेख वाळवा इस्लामपूर या ठिकाणी गेलो असता त्यांनी पण सेपरेट प्लॉट चा नकाशा नसल्याने मोजणी करता येत नाही या साठी काय करावे लागेल
आपल्या प्रश्नावरून आपणाला पुनर्वसन कायद्यांतर्गत भूखंड मिळालेला आहे. आपल्याबरोबरच अन्य व्यक्तींनाही पुनर्वसनाखाली असे भूखंड मिळालेले आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून पुनर्वसन करावयाच्या व्यक्तींना ज्यावेळेस अशा भूखंडाची वाटप केले जाते त्यावेळेस अभिनयास म्हणजे लेआउट मंजूर केला जातो व त्या लेआउट मध्ये असे भूखंड क्रमांक देण्यात येतात. आपण संपूर्ण लेआउटची मोजणी भुमिअभिलेख खात्याकडून करून घ्या.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by sagar mahale
21-09-2024
sbmahale@gmail.com
सर, आमची एक जमीन आहे जी कि सन २००० मध्ये आमच्या वडिलांच्या मोठ्या भावाने त्यांच्या वाट्याला आल्याने बक्षिसपात्र करून दिली आहे. ७/१२ वर नाव लागलेले आहे . परंतु त्या जागेचे ओरिजिनल खरेदीखत आणि इतर कागदपत्र दिलेली नाहीत. तर त्याची कॉपी आम्हाला मिळू शकते का. ग्रामपंचायत हद्दीतील एन. ए. प्लॉट आहे. सिटी सर्वे झालेलं नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
हो आपणाला खरेदी खताची प्रत मिळू शकते . ज्या ठिकाणी अस्य खरेदी खताची नोंदणी झाली असेल त्याठीकानी आपणाला त्याची प्रत मिळू शकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अंकुश गोकुळ नंदवाळकर
20-09-2024
nandwalkar10@gmail.com
सहकारी गृहनिर्माण संस्थांना भोगावटादार वर्ग 2 चा धारणाधिकार वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी आदेश महसूल व वनविभाग दि. 16 मार्च 2024 अन्वये निर्गमित केले आहे. यासंदर्भातला जीआर pdf मिळावा. धन्यवाद.
Question by Ramkisan
18-09-2024
chatse1984@gmail.com
डोंगरी भागात असलेल्या गावाची यादी
Question by Vishnu Ramchandra Pawar
16-09-2024
pawarvishnu@rediffmail.com
माझ्या मृत चुलत आजोबाचे नाव साधे कुळ म्हणून सातबाराला आहे, त्यांच्या पश्चात माझे दुसरे चुलत आजोबा ती शेतजमीन कसत आहेत. परंतु मूळ मालक यांनी त्या शेतजमिनीचा साठेखत त्रयस्थ व्यक्तीसोबत केला आहे. तर मूळ मालक ती शेतजमीन त्रयस्थ इसमाला विकू शकतात का? माझ्या मयत चुलत आजोबांचे नाव अजूनही साधेकुल म्हणून सातबारावर आहे. तर आता काय करावे लागेल? कृपया मार्गदर्शन करावे.
चुलत आजोबा यांचे निधानन्ति त्यांच्या वारसांची नावे ७/१२ सदरी दाखल होणे आवश्यक आहे .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3374 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
