सावरकर कोठडी

रत्नागिरी रत्नागिरी
तहसीलदार, रत्नागिरी 02352-223127

रत्नागिरीतील जयस्तंभ चौकात विशेष कारागृह आहे. या कारागृहात १६ मे ,१९२१ ते ३ सप्टेंबर, १९२३ या दोन वर्षांच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांना बंदी करून ठेवले होते. ही कोठडी आता राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली आहे.

रत्नदुर्ग किल्ला (भगवती)

रत्नागिरी रत्नागिरी
तहसीलदार, रत्नागिरी 02352-223127

- हा किल्ला शिलाहार कारकीर्दीत गोव्याचा राजा विजयदेव ह्याचा मुलगा भोज देव(राजा भोज) याने इ.स. १२०५ मध्ये बांधला अशी माहिती मिळते. घोड्याच्या नालेसारखा आकार असलेला,१२० एकर क्षेत्रफळाचा हा किल्ला सुमारे १३०० मीटर लांबीचा व १००० मीटर रुंद आहे..

जयगड किल्ला

रत्नागिरी रत्नागिरी
तहसीलदार, रत्नागिरी 02352-223127

हा किल्ला विजापूरकरांनी बांधला. काही कारणामुळे किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होत नव्हते. कोणीतरी सुचवले, नरबळी द्यावा लागेल. जयबा ह्या तरुणाचा बळी देण्यात आला. त्याच्या इच्छेनुसार किल्ल्याला त्याचे नाव- म्हणजे जयगड असे नाव -देण्यात आले.- एकूण २० बुरूज असलेला हा किल्ला पुढे संगमेश्वरच्या नाईकांनी विजापूरकरांकडून जिंकून घेतला.

गणपतीपुळे

रत्नागिरी रत्नागिरी
तहसीलदार, रत्नागिरी 02352-223127

गणपतीपुळे - श्रीगणेश मंदिर, सागर किनारा, गर्द हिरवाई व कोकणी पाहुणचार यामुळे हे स्थान पर्यटकांचे विशेष आवडीचे केंद्र बनले आहे. समुद्राच्या विस्तीर्ण किनार्‍यावर म्हणजे पुळणीवर गणपती प्रकट झाला म्हणून गणपतीपुळे हे नाव पडले. २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या काळात सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट येथील गणेशमूर्तीवर पडतात. गणपतीपुळेपासून ४ कि.मी. अंतरावर पॅरासेलिंग हा प्रकल्प सुरू आहे. गणपतीपुळ्यापासून १ कि.मी. अंतरावर प्राचीन कोकण म्युझियम उभे राहिले आहे. संपूर्ण कोकणाची ५०० वर्षापूर्वीची समाज रचना, व्यवसाय, इतिहास, वेश भूषा, परंपरा यांचे दर्शन या ठिकाणी होते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटरनी याची उभारणी केली आहे. १३० वनस्पतींचा अनमोल खजिना येथे आहे.

स्वामी स्वरुपानंद यांचे समाधी मंदिर ( पावस )

रत्नागिरी रत्नागिरी
तहसीलदार, रत्नागिरी 02352-223127

पावस - येथे स्वामी स्वरुपानंद यांचे समाधी मंदिर आहे.

डेरवणची शिवसृष्टी

रत्नागिरी रत्नागिरी
तहसीलदार, रत्नागिरी 02352-223127

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्फूर्तिदायक प्रसंगांवर आधारित ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.

पन्हाळे काजी लेणी

रत्नागिरी रत्नागिरी
तहसीलदार, रत्नागिरी 02352-223127

दापोली-दाभोळ रस्त्यावर तेथे कोटजाई नदीच्या काठाने असलेल्या डोंगरामध्ये २९ गुहा खोदलेल्या आढळतात. सुमारे आठ ते दहाव्या शतकापर्यंत खोदल्या गेलेल्या गुहा १९७० साली उजेडात आल्या.

वेळणेश्र्वर येथील श्रीमहादेव मंदिर; उन्हाळे (राजापूर तालुका), उन्हवरे (दापोली तालुका) येथील गरम पाण्याचे झरे

रत्नागिरी राजापूर
तहसीलदार, राजापूर 02353-222027

राजापूरची ही गंगा ठरावीक काळानंतर ( साधारण तीन-चार वर्षांनी ) जमिनीवर अवतीर्ण होऊन सभोवतीच्या चौदा कुंडांमधून वाहू लागते. या वेळी भाविकांची मोठी गर्दी होते. वरील स्थानांबरोबरच वेळणेश्र्वर येथील श्रीमहादेव मंदिर; उन्हाळे (राजापूर तालुका), उन्हवरे (दापोली तालुका) येथील गरम पाण्याचे झरे; स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेले पतितपावन मंदिर - ही स्थाने प्रसिद्ध आहेत, याशिवाय वेळणेश्वर, मार्लेश्वर, हेदवी ही धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.

विजय दुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग कणकवली
तहसीलदार, कणकवली 02367-232025

मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे गावापासून ५२ कि.मी. वर विजय दुर्ग हा किल्ला आहे. तिन्ही बाजूंनी ह्यास तट आहे. सुमारे १८०० वर्षांपासून हे बंदर म्हणून प्रसिध्द आहे. अतिशय प्राचीन असा हा जलदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या आरमारातील मानाचं पान आहे.

शिव मंदिराला कोकणची काशी

सिंधुदुर्ग कणकवली
तहसीलदार, कणकवली 02367-232025

कुणकेश्वर - देवगडपासून १५ कि.मी. वर असलेल्या शिव मंदिराला कोकणची काशी असे म्हटले आहे. इ.स. ११०० मध्ये यादवांनी हे महादेवाचे मंदिर बांधले होते, ज्याचा पुढे जाऊन शिवरायांनी जिर्णोध्दार केला.

भोगवे बीच ( माडा-पोफळी )

सिंधुदुर्ग कणकवली
तहसीलदार, कणकवली 02367-232025

वेंगुर्ल्यापासून ३५ कि.मी. वर अतिशय निसर्गसंपन्न गाव. माडा-पोफळीच्या विळख्यात असलेले हे गाव व येथील स्वच्छ, अस्पर्श किनारा पर्यटकांना आकर्षित करतो.

निवती बीच

सिंधुदुर्ग कणकवली
तहसीलदार, कणकवली 02367-232025

भोगवे गावाजवळच असलेले सुंदर समुद्रकिनारा लाभलेला बीच म्हणजे निवती बीच. येथे डॉल्फिन माशांना बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक येतात.

सिंधुदुर्ग किल्ला,

सिंधुदुर्ग मालवण
तहसीलदार, मालवण 02365-252045

सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून अवघ्या १ कि.मी. अंतरावर कुरटे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे व हाताचे ठसे येथे पाहावयास मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे.

तारकर्ली

सिंधुदुर्ग मालवण
तहसीलदार, मालवण 02365-252045

तारकर्ली - मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. तंबूत निवास, नावेतून सफर व स्कूबा डायव्हिंगचा अनुभवदेखील येथे घेता येतो.

आंबोली थंड हवेचे ठिकाण.

सिंधुदुर्ग सावंतवाडी
तहसीलदार, सावंतवाडी 02363-272028

आंबोली - सावंतवाडी तालुक्यातील डोंगराळ भागातील, सह्याद्रीच्या रांगेतील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. आंबोली सुमारे १००० मीटर उंचीवर आहे. येथे पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो. हे जणू महाराष्ट्रातील चेरापूंजीच आहे.

सावंतवाडी शिल्पग्राम

सिंधुदुर्ग सावंतवाडी
तहसीलदार, सावंतवाडी 02363-272028

सावंतवाडी येथे पारंपरिक हस्तकला कौशल्याच्या वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन येथे उभारण्यात आलेले आहे. या शिल्पग्रामात विविध कलात्मक वस्तूंची विक्री केली जाते.

अंबाबाई, पिंगळाई व निंबाई देवीची हेमाडपंती शैलीची मंदिरे

भंडारा भंडारा
तहसीलदार, भंडारा 07184-252210

भंडारा शहरात अंबाबाई, पिंगळाई व निंबाई देवीची हेमाडपंती शैलीची मंदिरे प्राचीन काळापासून आहेत. येथील कोरंभी देवीच्या दर्शनासाठीही बरेच भाविक गर्दी करतात.

१०० वर्षे जुने राममंदिर ( रावणवाडी )

भंडारा भंडारा
तहसीलदार, भंडारा 07184-252210

रावणवाडी येथे १०० वर्षे जुने राममंदिर आहे. भंडार्‍यापासून २० कि.मी. अंतरावर मोहाडी या ठिकाणी चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. चौंडेश्र्वरी देवी भंडारा जिल्ह्यातील अंबागड येथे मध्ययुगीन किल्ला आहे. बख्त बुलंदशाह या गोंड राजाच्या कालावधीत, १८ व्या शतकात तो बांधला गेला असे इतिहास सांगतो. पूर्वी या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणूनच केला जात असे.

नृसिंह मंदिर

भंडारा भंडारा
तहसीलदार, भंडारा 07184-252210

वैनगंगा नदीच्या पात्रात माडगी हे बेट निर्माण झाले आहे. येथे प्राचीन नृसिंह मंदिर असून येथे कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.

गोमुखातून सतत पडणारी धार , कोका जंगलात सैबेरियामधून येणारे पक्षी

भंडारा भंडारा
तहसीलदार, भंडारा 07184-252210

गायमुख येथे अंबागड टेकडीवरील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्ध आहे. येथे गोमुखातून सतत पडणारी धार अति पवित्र समजली जाते. महाशिवरात्रीस येथे मोठी यात्रा भरते.कोका हे जंगलात वसलेले प्रसिद्ध स्थळ आहे. येथे डिसेंबर महिन्यात सैबेरियामधून येणारे पक्षी थंडीतील स्थलांतरादरम्यान येतात व जानेवारीच्या मध्यास परत जातात.

सिंधपुरी बौद्धविहार, सांगडी किल्ला, चांदपूरचा तलाव

भंडारा पौनी
तहसीलदार, पौनी 07185-255241

जिल्ह्यातील पौनी हे ठिकाण ‘पदमावती नगरी’ म्हणून ओळखले जात असे. वैनगंगेच्या काठावर असलेले हे ठिकाण बौध्द धर्मीयांचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. तिथे बौध्दकाळातील स्तूप आहे. कर्‍हाडा आणि बालसमुद्र या नावाचे दोन तलावही आहेत. सिंधपुरी बौद्धविहार हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथील सांगडी किल्ला, चांदपूरचा तलावही प्रसिद्ध आहेत.

घोड्याची यात्रा ( अड्याळ )

भंडारा पौनी
तहसीलदार, पौनी 07185-255241

पवनी तालुक्यातील अड्याळ येथील श्रीहनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. चैत्र शुद्ध नवमीला येथे यात्रा भरते. ही यात्रा घोड्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प)

चंद्रपूर चंद्रपूर
तहसीलदार, चंद्रपूर 07172-250206

ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले. या उद्यानात मोर, धनेश, गरूड, नीळकंठ, चंडोल, सुगरणी इत्यादी साधारण २५० प्रकारचे पक्षी आहेत.याशिवाय ताडोबातले ‘मगरपालन केंद्र’ आशिया खंडातले एक महत्त्वाचे व उत्तम मगरपालन केंद्र आहे. सरोवराशिवाय अनेक लहान-लहान पाणवठे येथे आहेत. उद्यानात एका सुंदर झोपडीत वन्य प्राण्यांचे संग्रहालय आहे.

महाकाली व अचलेश्वराचे मंदिर

चंद्रपूर चंद्रपूर
तहसीलदार, चंद्रपूर 07172-250206

येथील गोंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे. गोंड राजा ‘खांडक्या बल्लरशहा’ याने हा किल्ला बांधला असे म्हणतात. तसेच येथे असलेले महाकाली व अचलेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध आहे. अलीकडे हे शहर औद्योगिकदृष्ट्याही विकसित होत आहे.

गोंड किल्ल्यातील राणीमहाल ( बल्लारपूर )

चंद्रपूर बल्लारपूर
तहसीलदार, बल्लारपूर 07172-241391

गोंड राजवटीत बल्लारपूर हे काही काळ राजधानीचे ठिकाण होते. वर्धा नदीच्या काठावर ४०० वर्षांपूर्वी बांधलेला येथील किल्ला प्रसिद्ध असून तो बांधण्याचे श्रेय गोंड राजा खांडक्या बल्लर शाह यास दिले जाते. या किल्ल्यातील राणीमहाल हा प्रेक्षणीय मानला जातो.

अपंग व कुष्ठरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी चालविला जाणारा बाबा ( सोमनाथ )

चंद्रपूर मुळ
तहसीलदार, मूळ 07174-220310

सोमनाथ हे मूळ तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असून येथे महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. अपंग व कुष्ठरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी चालविला जाणारा बाबा आमटेप्रणीत प्रकल्प येथे ही कार्यरत आहे.

घोडेझरी हा तलाव ( नागभीड )

चंद्रपूर नागभीड
तहसीलदार, नागभीड 07179-240050

येथील सातबहिनी, मुक्ताबाई व महादेव टेकड्यांवरील निसर्गरम्य वातावरणामुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. येथे जवळच घोडेझरी हा तलाव आहे. तलावाच्या शेजारीच पूर्वी तलावात सापडलेल्या घोड्याचे मंदिरही आहे.

भद्रनाथ मंदिर व पार्श्वनाथ मंदिर, बौद्धकालीन लेणी ( भद्रावती )

चंद्रपूर भद्रावती
तहसीलदार, भद्रावती 07175-265080

येथील भद्रनाथ मंदिर व पार्श्वनाथ मंदिर पाहण्यासारखे आहे. येथून जवळ असलेल्या विजासन टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत.

डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य

गोंदिया अर्जुनी मोरगाव
तहसीलदार, अर्जुनी मोरगाव 07196-220147

जिल्ह्यातील आणखी एक पर्यटन स्थळ म्हणून प्रचलित असणारे स्थान म्हणजे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. येथील पक्षी अभयारण्याचे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य असे नामकरण झाले असून, महाराष्ट्रातील ६०% पक्ष्यांच्या प्रजाती आपणास येथेच पाहावयास मिळतात. सुमारे १४० चौ. कि.मी क्षेत्रावर पसरले आहे.

धार्मिक स्थळे व हजरा धबधबा

गोंदिया अर्जुनी मोरगाव
तहसीलदार, अर्जुनी मोरगाव 07196-220147

गोंदिया जिल्ह्यात काही मोजकीच पण उल्लेखनीय अशी धार्मिक स्थळे आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्राचीन शिवमंदिर व सालेकसा येथील गढमातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. सालेकसा येथील २५,००० वर्षांपूर्वीची गुफा (काचरगड) आहे. तेथे पाषाणयुगातील काही हत्यारे सापडली आहेत. सालेकसा येथील हजरा धबधबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे

नागझिरा अभयारण्य

गोंदिया गोंदिया
तहसीलदार, गोंदिया 07182-222142

जिल्ह्यातील जवळजवळ ५०% क्षेत्र वनाच्छादित असून, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांसाठी गोंदिया पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

सुवासिक व औषधी, २०० प्रकारचे वृक्ष या अभयारण्यात आढळतात

गोंदिया गोंदिया
तहसीलदार, गोंदिया 07182-222142

आपली जैवविविधता जपत, हे अभयारण्य जिल्ह्यातील रहिवाशांसाठी जणू निसर्गाने प्रदान केलेल्या ‘हरित फुफ्फुसांचे’ काम करते. शोभेची झाडे, सुवासिक व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असे सुमारे २०० प्रकारचे वृक्ष या अभयारण्यात आढळतात

नवेगाव बांध ( तलाव )

गोंदिया गोंदिया
तहसीलदार, गोंदिया 07182-222142

नवेगाव बांध हा तलाव सुमारे ११ वर्ग कि.मी परिसरात पसरलेला आहे. गोंड राजा दलपतशहा याची राणी दुर्गावती हिने इ.स. १३०० मध्ये कोहाली जमातीच्या कोल्हू व चिमणा पाटील यांच्यावर हा तलाव बांधण्याची जबाबदारी सोपवली. कोहाली जमात ही पुरातन काळापासून खोदाईचे काम व दगडी बांधकामात विशेष नैपुण्य असणारी अशी समजली जाते. आपलतलाव, बंधारे व हौद बांधण्याचे काम दिले.

नवेगाव बांध ला ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हटले जाते.

गोंदिया गोंदिया
तहसीलदार, गोंदिया 07182-222142

तलावांनी संपन्न असलेल्या या जिल्ह्यात ‘नवेगाव बांध’ हा सर्वात मोठा तलाव आहे. सात टेकड्यांनी हा वेढला गेला आहे. या टेकड्यांना ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हटले जाते. या तलावाच्या मध्यभागी ‘मालडोंगरी’ नावाचे बेट आहे.तिरोडा तालुक्यातील बोदलकसा हा तलाव इंग्रजी ‘G’ आकाराचा आहे.

कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठ

नागपूर रामटेक
तहसीलदार, रामटेक 07114-255124

रामटेक येथे प्रभू श्रीरामचंद्राने काही काळ वास्तव्य केले होते अशी कथा आहे. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे काव्य येथेच लिहिले असे मानले जाते. प्राचीन साहित्य, शास्त्र यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. येथील रामसागर, अंबाला तलाव प्रसिध्द आहे.

नागार्जुन टेकडी, ड्रॅगन प्लॅनेट टेंपल ( कामठी ), शिवगड किल्ला ( पारशिवनी )

नागपूर परसिवणी
तहसीलदार, परसिवणी 07102-225139

कामठीमध्ये भव्य ड्रॅगन प्लॅनेट टेंपल आहे. येथील बुध्द मूर्ती जपानतर्फे भेट मिळाली असून मूर्ती पूर्ण चंदनाची व ८६४ किलो वजनाची आहे. जिल्ह्यातील नागार्जुन टेकडी हा आयुर्वेदीक औषध वनस्पतींनी संपन्न असलेला परिसर आहे. तसेच जिल्ह्यातील पारशिवनी येथील शिवगड हा किल्ला प्रसिध्द आहे.

सीताबर्डीचा किल्ला, आंबेडकरांचे भव्य स्मारक व बौद्ध स्तूप

नागपूर नागपूर शहर
तहसीलदार, नागपूर शहर 0712-2561975

नागपूर येथील सीताबर्डीचा किल्ला प्रेक्षणीय आहे. येथील दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्वीकार केला. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गाने घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. नागपूर हे बौध्द धर्मीयांचे आदराचे स्थान असून येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व बौद्ध स्तूप उभारण्यात आला आहे. येथील विठ्ठल मंदिरामुळे हे विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिध्द आहे.

पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान

नागपूर नागपूर शहर
तहसीलदार, नागपूर शहर 0712-2561975

पवनी गावापासून २० कि.मी. अंतरावर हा व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच नदीवर तोतला डोह या ठिकाणी विशाल धरण बांधण्यात आले आहे. या २५७. ९८ चौ. कि.मी. क्षेत्राच्या उद्यानास १४ नोव्हेंबर, १९९० मध्ये पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले. उद्यानात वाघ, बिबळ्या, रानगवे, रानम्हशी, रानडुकरे, अस्वले इत्यादी हिंस्र प्राणी

बोर अभयारण्य ( हिंगणी ),

वर्धा वर्धा
तहसीलदार, वर्धा 07152-240748

हिंगणी येथील ६१.१० चौ. कि . मी. क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य अनेक वन्य जीवांचे आश्रयस्थान आहे. वाघ, रानगवे, नीलगाई, चितळ, सांबर, मोर, चिंकारा, अस्वल आदी वन्यजीव येथील आकर्षणाचे केंद्र आहेत. एप्रिल व मे हे दोन महिने अभयारण्यास भेट देण्यास ऊचित असतात.

मगन संग्रहालय

वर्धा वर्धा
तहसीलदार, वर्धा 07152-240748

जिल्ह्यात १९३८ मध्ये मगन संग्रहालय स्थापन करण्यात आले. खादी व इतर ग्रामोद्योगातील विविध वस्तू तयार करण्यासाठी लागणारी साधनसामग्री व या वस्तू तयार करण्याची पद्धती सर्व पाहावयास मिळते. वर्धा येथील ‘अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ’ ही संस्था राज्यात प्रसिद्ध आहे.

सेवाग्राम व परमधाम पर्यटनस्थळे

वर्धा वर्धा
तहसीलदार, वर्धा 07152-240748

जिल्ह्यातील इतर प्रेक्षणीय स्थळे: जपानच्या मदतीने बांधण्यात आलेला विश्वशांती स्तूप, आचार्य विनोबा भावे यांचे गीताई मंदिर, केळझर येथील वरद विनायकाचे मंदिर,वर्धा शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर, हिंगणघाट तालुक्यातील जैन मंदिर व मल्हारी मार्तंड मंदिर ही जिल्ह्यातील ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. सेवाग्राम व परमधाम ही तर आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे आहेतच.

अगस्ती आश्रम

अहमदनगर अकोले
तहसीलदार, अकोले 02424-221228

येथे अगस्ती ऋषींनी रामायण काळात कृषीविद्या शिकवल्याचे मानले जाते.

अकोले तालुक्यातील किल्ले,तसेच प्रवरा,मुला नदीचा उगम.

अहमदनगर अकोले
तहसीलदार, अकोले 02424-221228

या तालुक्यात रतनगड हा पुरातन किल्ला असून याच्या पायथ्याशी ११ व्या शतकात बांधलेले अमृतेश्र्वराचे मंदिर आहे. प्रवरा नदीचा उगम याच भागात झाला. तसेच हरिश्चंद्र गडावर हरिश्चंद्राचे मंदिर आहे. या गडावर मुळा नदीचा उगम झाला असून येथेच चांगदेवांनी तत्त्वसार हा ग्रंथ लिहिला.

चांदबीबीचा महालह, अंबरेला फॉल

अहमदनगर अकोले
तहसीलदार, अकोले 02424-221228

शहरातील चांदबीबीचा महालही प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य परिसरामुळे अकोले तालुक्यातील डोंगर रांगांमुळे व प्रवरा नदीवरील धरणामुळे भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. येथे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ' रंधा धबधबा ' निर्माण झाला आहे, तसेच या परिसरातील अंबरेला फॉलही प्रसिद्ध आहे.

शिर्डी येथे श्री साईबाबांचे समाधी मंदिर

अहमदनगर राहता
तहसीलदार, राहता 02423-242853

या मंदिराला आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीर्थक्षेत्र बनले आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात श्री साईबाबा येथे प्रकट झाल्याचे मानले जाते. शिर्डी येथे रोज हजारो लोक श्री साईबाबांचे दर्शन घेतात .

कन्याकुमारी आश्रम

अहमदनगर राहता
तहसीलदार, राहता 02423-242853

शिर्डी पासून ७ कि.म. अंतरावर साकुरी येथे कन्याकुमारी आश्रम आहे. साईबाबांचे शिष्य श्री उपासनी यांनी या आश्रमाची स्थापना केली. श्री उपासनी महाराज इ सती गोदावरी माताजी यांची समाधी एकमुखी दत्त मंदिर व शेवगावच्या झाडावरील स्वयंभू गणपती हि साकुरीतील स्थाने भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.

कोल्हारचे भगवती माता मंदिर

अहमदनगर राहता
तहसीलदार, राहता 02423-242853

हे मंदिर १३व्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिरात देवींची साडेतीन शक्तिपीठे एकवटल्याचे मानले जाते.

धामोरी

अहमदनगर कोपरगाव
तहसीलदार, कोपरगाव 02423-223059

येथे अड्बंगीनाथांच्या तपोभूमी जवळ ७५० वर्षापूर्वीचा गोरखचिंचेचा विराट वृक्ष आहे. या वृक्षाच्या नाऊ मोठ्या फांद्या म्हणजे नाऊ-नाथ असे मानले जाते.

शनि- शिंगणापूर

अहमदनगर नेवासा
तहसीलदार, नेवासा 02427-241225

हे स्थान नेवासा तालुक्यात असून भारतात प्रसिद्ध आहे. वैशिष्ट्य म्हणजे या गावातील घरांना दरवाजे नाहीत,कपाटा
ला पण
कुलुपे नाहीत ,तसेच या ठिकाणी चोरी सुधा होत नाही. येथे शनि अमावास्येला प्रचंड गर्दी हाते.

काशिकेदार

अहमदनगर पाथर्डी
तहसीलदार, पाथर्डी 02428-222332

( पाथर्डी-शेवगावच्या सीमेवर ) येथे भारतातील रसायनशास्त्राचा प्रवर्तक सिधनागार्जुन याची समाधी असून काशिकेदारजवलील सोनकडा दरीत हे स्थान आहे.

वृद्धेश्वर,कानिफनाथांची मढी आणि गाढवाचा बाजार

अहमदनगर पाथर्डी
तहसीलदार, पाथर्डी 02428-222332

नाथ संप्रदायाशी संबंधित अनेक पवित्र ठिकाणे नगर जिल्ह्यात आहेत. नाथ पंथाचे आदिपीठ वृद्धेश्वर (पाथर्डी तालुका), कानिफनाथांची समाधी असलेले मढी, नगरजवळ डोंगरगण येथील गोरक्षनाथांची समाधी ही ठिकाणे प्रसिद्ध आहे . मढीमध्ये यात्रेच्या काळात गाढवांचा बाजार भरतो.

श्री सिद्धिविनायक

अहमदनगर कर्जत
तहसीलदार, कर्जत 02489-222326

अष्टविनायका पैकी एका गणपतीचे- श्री सिद्धिविनायकाचे- स्थान कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आहे. उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक प्रसिद्ध आहे ,तसेच नगर शहराचे ग्राम दैवत म्हणून विशाल गणपती प्रसिद्ध आहे .

रेहेकरू येथील वन्यजीव अभयारण्य

अहमदनगर कर्जत
तहसीलदार, कर्जत 02489-222326

नगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात दाट जंगल आहे. येथे ठाकर व महादेव कुळी जमातीचे आदिवासी राहतात. या तालुक्यातील रेहेकरू येथेही अभयारण्य घोषित करण्यात आले आहे.

दुर्योधन मंदिर, दुर्गाव

अहमदनगर कर्जत
तहसीलदार, कर्जत 02489-222326

महाराष्ट्रातील एकमेव दुर्योधन मंदिर आहे.

सप्तशृंग गड ( वणी ), भुईकोट किल्ला (ता. मालेगाव )

नाशिक कळवण
तहसीलदार, कळवण 02592-221037

कळवण तालुक्यातील वणी येथे देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्ध्या पीठाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत म्हणून या स्थानाचे नाव सप्तशृंग! हा गड १४१६ मी. उंच असून येथील परिसर अत्यंत रमणीय आहे.जिल्ह्यातील मालेगाव हे शहर मोसम नदीच्या किनार्‍यावर वसले असून पेशव्यांचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला येथे आहे.

नाशिक मधील कुंभमेळा

नाशिक नाशिक
तहसीलदार, नाशिक 0253-2575663

नाशिक येथे सिंहस्थ पर्वात भरणार्‍या कुंभमेळ्यामध्ये गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी श्रद्धाळू भाविक प्रचंड संख्येने गर्दी करतात. नाशिक जिल्ह्यात साजर्‍या होणार्‍या धार्मिक उत्सवांपैकी हा सर्वात महत्त्वाचा व भव्य धार्मिक उत्सव! हा उत्सव १२ वर्षांनी एकदा साजरा होतो. नाशिक कुंभमेळ्याला धार्मिक मेळाव्यांमध्ये सर्वात पवित्र मेळावा म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.

काळाराम मंदिर

नाशिक नाशिक
तहसीलदार, नाशिक 0253-2575663

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता, ते काळाराम मंदिर नाशिक येथेच असून येथील नारोशंकर मंदिर, कपालेश्वर मंदिर, पंचवटी, सीताकुंड, तपोवन ही स्थळे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. येथून जवळच असलेली पांडव लेणीही प्रसिद्ध आहेत.

गोदावरी नदीचे उगम स्थान व बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे हे ठिकाण

नाशिक नाशिक
तहसीलदार, नाशिक 0253-2575663

त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगम स्थान व बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे हे ठिकाण असून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ज्योतिर्लिंगावर ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांच्या प्रतिमा हे येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य आहे.हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून उत्कृष्ट शिल्प व स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे.

‘महाराष्ट्राचे भरतपूर’ अभयारण्य

नाशिक नाशिक
तहसीलदार, नाशिक 0253-2575663

तात्या टोपेंसारख्या स्वातंत्र्यसेनानीचे हे जन्मगाव होय. याशिवाय भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान नाशिक तालुक्यात आहे. नांदूर-मध्मेश्वर हे गोदावरी व कादवा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले अभयारण्य ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखले जाते. (भरतपूर हे राजस्थानमधील प्रसिद्ध अभयारण्य आहे.) १०,००० हेक्टरवर पसरलेल्या ह्या अभयारण्यात पक्ष्यांच्या २२० प्रजाती, वनस्पतींच्या ४०० प्रजाती व माश्यांच्या २४ प्रजाती आढळतात.

श्री चांगदेव यांचे (दुर्मिळ) मंदिर ( चांगदेव )

जळगाव जळगाव
तहसीलदार, जळगाव 0257-2229634

चांगदेव हे ठिकाण योगीराज चांगदेव यांचे स्थान म्हणून ओळखले जाते. येथे श्री चांगदेव यांचे (दुर्मिळ) मंदिरही आहे. जिल्ह्यातील अंमळनेर येथे संत सखाराम महाराजांची समाधी व एक तत्त्वज्ञान मंदिर आहे

अनेर धरण ( जळगाव ), ताम्र-पाषाणयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध ( बहाळ )

जळगाव जळगाव
तहसीलदार, जळगाव 0257-2229634

जळगाव जिल्ह्यातील अनेर धरणाचा परिसर निसर्गरम्य असून येथे वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. या अभयारण्याचा आनंद घेण्यासाठी अलीकडच्या काळात पर्यटक येथे गर्दी करतात.चाळीसगावच्या उत्तरेस सुमारे ३० कि.मी अंतरावर गिरणा नदीकाठी वसलेले बहाळ हे गाव ताम्र-पाषाणयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.

१७२७ मधील भुईकोट किल्ला, राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर ( पारोळा )

जळगाव पारोळा
तहसीलदार, पारोळा 02597-222230

येथील १७२७ मध्ये बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे हे माहेर होय.पारोळा येथील भुईकोट किल्ला

खजाना प्रसिध्द विहीर, मोरांसाठीचे अभयारण्य

जळगाव एरंडोल
तहसीलदार, एरंडोल 02588-244221

शहराजवळील टेकडीवर श्री खंडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. शहरापासून जवळच खजाना ही प्रसिध्द विहीर आहे. या विहीरीस बाराही महिने पाणी असते. शहरात पीर बालाशहा व मंसूरशहा यांचे दर्गे आहेत.बीड तालुक्यातील नायगांव येथील मोरांसाठीचे अभयारण्य हे राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्य होय.

उजव्या व डाव्या सोंडेचे एकत्रित गणपती ( एरंडोल ), महाराष्ट्रातील एकमेव अशी त्रिविक्रमाची स्वयंभू मूर्ती ( शेदुर्णी, ता. जामनेर.)

जळगाव एरंडोल
तहसीलदार, एरंडोल 02588-244221

एरंडोल तालुक्यातील पद्मालय हे गणेशाचे प्राचीन जागृत स्थान आहे. उजव्या व डाव्या सोंडेचे एकत्रित गणपती फक्त याच देवस्थानात पाहावयास मिळतात. जिल्ह्यातील शेदुर्णी (ता. जामनेर.) येथे महाराष्ट्रातील एकमेव अशी त्रिविक्रमाची स्वयंभू मूर्ती आहे. या स्थानास ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते.

पांडववाडा ( एरंडोल ), झुलते मनोरे ( फरकांडा )

जळगाव एरंडोल
तहसीलदार, एरंडोल 02588-244221

एरंडोल येथे पर्शियन भाषेतील शिलालेख सापडला असून, याच ठिकाणचा पांडववाडा प्रसिद्ध आहे. एरंडोल तालुक्यातीलच फरकांडा येथील झुलते मनोरे आश्र्चर्यकारक असून, पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेत.

पाटणादेवी येथे देवीचे मंदिरात गणित-तज्ज्ञ भास्कराचार्य यांनी आपला ‘लीलावती’ ग्रंथ लिहिला

जळगाव चाळीसगाव
तहसीलदार, चाळीसगाव 02589-222831

चाळीसगाव येथील पाटणादेवी येथे देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी प्राचीन काळातील गणित-तज्ज्ञ भास्कराचार्य यांनी आपला ‘लीलावती’ ग्रंथ लिहिला असे म्हटले जाते.

श्रीमहालक्ष्मी मंदिर,बिनखांबी गणपती मंदिर, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, शालीनी पॅलेस

कोल्हापूर आजरा
तहसीलदार, आजरा 02323-246131

कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिपीठ तर आहेच, शिवाय ते स्थापत्य शास्त्रातील व कलेतील एक उत्तम प्रतीचा नमुना म्हणून गणले जाते. श्री तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे येतातच.खुद्द कोल्हापूर शहरात बिनखांबी गणपती मंदिर, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, शालीनी पॅलेस ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

नेसरीच्या खिंडीत सात मराठे वीर धारातीर्थी

कोल्हापूर गडहिंगलज
तहसीलदार, गडहिंगलज 02327-222252

येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांची समाधी आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या कुसुमाग्रजांच्या कवितेत वर्णन केलेला प्रसंग येथेच घडला. प्रतापराव केवळ सहा सरदारांसह, बहलोलखानाच्या सैन्यावर त्वेषाने चालून गेले. ही लढाई नेसरीच्या खिंडीत झाली, या लढाईत सात मराठे वीर धारातीर्थी पडले

पन्हाळगड, विशाळगड, भूदरगड, व गगनगड हे जिल्ह्यातील प्रमुख किल्ले ( कोल्हापूर ), हेमाडपंती मंदिर, ( शिरोळ ), थंड हवेचे ठिकाण ( पन्हाळा )

कोल्हापूर पन्हाळा
तहसीलदार, पन्हाळा 02328-235026

तालुक्यातील खिद्रापूर या कृष्णेकाठच्या गावात श्रीकोप्पेश्र्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असून शिल्पकला व स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट उदाहरण असलेले हेमाडपंती मंदिर आहे. पन्हाळगड, विशाळगड, भूदरगड, व गगनगड हे जिल्ह्यातील प्रमुख किल्ले आहेत. पन्हाळा किल्ला बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत दुसर्‍या भोजराजाने बांधला असा उल्लेख इतिहासात आढळतो. थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

जैन धर्मीयांचे बाहुबली हे तीर्थस्थान ( कुंभोज ),लिंगायत पंथाच्या पाच जगद्गुरूंपैकी एल जगद्गुरुचे माठ ( कणेरी, ता. करवीर )

कोल्हापूर हातकणंगले
तहसीलदार, हातकनंगले 0230-2483128

संपूर्ण भारतातील जैन धर्मीयांचे तीर्थस्थान असलेले बाहुबली हे ठिकाण हातकणंगले तालुक्यात कुंभोज येथे आहे. येथे सुमारे ३०० वर्षांपूर्वी बाहुबली यांनी तपश्र्चर्या केल्याचे मानले जाते. करवीर तालुक्यातील कणेरी हे गाव लिंगायत पंथासाठी महत्त्वाचे गाव आहे. कणेरीमध्ये लिंगायत पंथाचा कडसिद्धेश्र्वर मठ पूर्वीच्या काळात स्थापन केलेला आहे. या मठातील सिंहासनावर बसणारा गुरू म्हणजे लिंगायत पंथाच्या पाच जगद्गुरूंपैकी एक होय.

भुईकोट किल्ला,

सांगली मिरज
तहसीलदार, मिरज 0233-2722682

येथे भव्य भुईकोट किल्ला असून येथील १०० फूट रुंदीचा व२५ फूट खोलीचा सदैव पाण्याने भरलेला किल्ल्याभोवतीचा खंदक प्रेक्षणीय आहे.
कंधारजवळ मानसपुरी येथील उत्खननात वास्तुपुरुषाचे अवशेष सापडले आहेत. भारतात मिळालेले वास्तुपरुषाचे हे पहिलेच अवशेष प्राचीन काळात कंधारला खंदार नावाने ओळखले जाई.

श्री विष्णुचे मंदिर ( बार्शी ),नीरा नदीच्या काठी प्रेक्षणीय किल्ला, भुईकोट किल्ला ( सोलापूर )

सोलापूर उत्तर सोलापूर
तहसीलदार, उत्तर सोलापूर 0217-2731020

भारतात श्री विष्णुचे मंदिर अतिशय कमी ठिकाणी आहे. या जिल्ह्यात ते बार्शी येथे आहे. अकलूज येथे नीरा नदीच्या काठी प्रेक्षणीय किल्ला असून करमाळा येथेही प्रसिद्ध भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर आहे. मध्ययुगीन काळात बहामनी राजवटीत सोलापुरात बांधला गेलेला भुईकोट किल्ला. दुसरा बाजीराव पेशवा यांचा निवास या किल्ल्यावर होता. इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला. ( इंग्रज आणि मराठे यांच्यातील शेवटची लढाई जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे १८१८ मध्ये झाली आणि मराठेशाहीचा अंत झाला.)

माळढोक पक्षी अभयारण्य जाहीर

सोलापूर उत्तर सोलापूर
तहसीलदार, उत्तर सोलापूर 0217-2731020

१९७९-८० मध्ये नान्नज (उत्तर सोलापूर तालुका) येथे माळढोक पक्षी अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. तीन फुटी उंची व २० ते २५ कि. वजनाचे माळढोक आज जगात फक्त सुमारे ५०० संख्येनेच उरलेले आहेत. त्यातील सुमारे २५ माळढोक नान्नज येथे आढळतात. जिल्ह्यातील माढा, मोहोळ व करमाळा हे तीन तालुके या अभयारण्यांतर्गत येतात.

माळढोक पक्षी अभयारण्य व धर्मवीर संभाजी उद्यान तलाव (कंबर तलाव),

सोलापूर दक्षिण सोलापूर
तहसीलदार, दक्षिण सोलापूर 0217-2731033

अभयारण्ये - जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य व धर्मवीर संभाजी उद्यान तलाव (कंबर तलाव) पक्षी अभयारण्य - ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत. कंबर तलाव हा सोलापूरचे एक फुफ्फुस आहे. येथे ६५ प्रकारचे पाणपक्षी असून, हिवाळ्यात येथे १४ जातींची रानबदके परदेशातून येतात. मध्य आशिया, सैबेरिया, चीन, युरोप येथून ही रानबदके येतात. ढोक, ढिबरा, कव्हेर जातीचे मासेही या तलावात मुबलकपणे आढळतात. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ कै. सलीम अली यांचे हे आवडते ठिकाण होते.

दक्षिणेची काशी ( पंढरपूर )

सोलापूर पंढरपूर
तहसीलदार, पंढरपूर 02186-223556

धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात महत्त्वाचा ठरतो तो प्रामुख्याने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरपूरमुळेच! आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. हे पूर्ण महाराष्ट्राचेच प्रमुख धार्मिक उत्सव आहेत.