‘गंजगोलाई’ बाजारपेठ,

लातूर लातूर
तहसीलदार, लातूर 02382-242962

प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पना आविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरत. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा रस्त्यावरील विराट हनुमानाची मूर्ती व पार्श्र्वनाथ मंदिर इत्यादी धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. लातूर-आंबेजोगाई रस्त्यावर लातूरपासून आठ कि.मी. अंतरावर मांजरा नदीकाठी महापूर येथे नमानंद महाराजंचा मठ आहे.

यादवकालीन भुईकोट किल्ला, देवणी जातीच्या वळूंसाठी प्रसिद्ध

लातूर उदगीर
तहसीलदार, उदगीर 02385-255567

येथील यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याभोवती असणारा ४० फूट खोलीचा खंदक आणि जमीन पातळीपासून ६० फूट खोलीवरील श्रीउदयगीर महाराजांची समाधी हे येथील मुख्य आकर्षण आहे. उदगीरचा जनावरांचा बाजार देवणी जातीच्या वळूंसाठी प्रसिद्ध आहे.येथून जवळच असणार्‍या देवर्जन येथे श्रीगंगाराम महाराजांची समाधी आहे.

नीलकंठेश्वराचे (महादेवाचे) मंदिर व स्वयंभू शिवलिंग ( ता. निलंगा ), रेणुकादेवीचे मंदिर आणि हलणारी दीपमाळ ( ता. रेणापूर )

लातूर निलंगा
तहसीलदार, निलंगा 02384-242024

येथील नीलकंठेश्वराचे (महादेवाचे) मंदिर व स्वयंभू शिवलिंग; तसेच येथील शाह पीर पाशा कादरी ह्यांचा दर्गा ; उजना येथील श्रीगणेशनाथ यांची समाधी;व रेणापूर येथील रेणुकादेवीचे मंदिर आणि या परिसरातील हलणारी दीपमाळ ही जिल्ह्यातील ठिकाणे जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकतात.

मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला, हिंदू व बौद्ध लेणी ( खरोसा )

लातूर औसा
तहसीलदार,औसा 02383-222026

औसा येथील मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. याशिवाय येथील श्रीबीरनाथ महाराजांचे देऊळ, श्रीमल्लिनाथ महाराजांचा मठ व औरंगजेबाने बांधलेली मशीद प्रसिद्ध आहे. औसा तालुक्यातील खरोसा या गावातील हिंदू व बौद्ध लेणी प्रसिद्ध आहेत.

हजरत ‘ख्वाजा शम्सुद्दीन गाझींचा दर्गा, ‘धाराशीव लेणी’

उस्मानाबाद उस्मानाबाद
तहसीलदार, उस्मानाबाद 02472-227882

उस्मानाबाद शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून शहरापासून ८ कि. मी. अंतरावर बालाघाट डोंगरात कोरीव लेणी आहेत. या लेण्यांना ‘धाराशीव लेणी’ असे म्हटले जाते. या ठिकाणी एकूण सात लेणी आहेत. येथे काही बौध्द ,तर काही जैन लेणी आहेत. येथील हजरत ‘ख्वाजा शम्सुद्दीन गाझींचा दर्गादेखील सुप्रसिद्ध आहे.

इब्राहिम आदिलशहा दुसरा याने बांधलेला ‘पाणी महाल’ ( नळदुर्ग )

उस्मानाबाद उस्मानाबाद
तहसीलदार, उस्मानाबाद 02472-227882

उस्मानाबादपासून ५० कि. मी. अंतरावर असणारे नळदुर्ग हे शहर बर्‍याच काळापर्यंत जिल्ह्याचे ठिकाण होते. बोरी नदीकाठी असणारे हे ठिकाण प्राचीन भुईकोट किल्ल्यामुळे प्रसिद्ध असून इब्राहिम आदिलशहा दुसरा याने बांधलेला ‘पाणी महाल’ हे नळदुर्गच्या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे. येथील खंडोबाचे मंदिरही प्रसिद्ध आहे.

श्री संत गोरोबा काका यांचे समाधी मंदिर, ( तेर ) ,

उस्मानाबाद उस्मानाबाद
तहसीलदार, उस्मानाबाद 02472-227882

तेर येथील श्री संत गोरोबा काका यांचे समाधी मंदिर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत गोरोबांचा जन्मही येथेच झाला होता. तेर व रोमन संस्कृतीचे थेट नाते सांगणारे अनेक पुरावे येथील उत्खननात सापडले आहेत. या ठिकाणचा बौद्धकालीन स्तूप व प्राचीन वस्तुसंग्राहलय प्रसिद्ध आहे. याशिवाय भूम येथील अलम प्रभूंचे मंदिर, येरमाळ्याचे येडेश्वरी देवीचे मंदिर ही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत

श्रीतुळजाभवानीचे मंदिर,

उस्मानाबाद तुळजापूर
तहसीलदार, तुळजापूर 02471-242027

महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणार्‍या श्रीतुळजाभवानीचे तुळजापूर येथील मंदिर हेमाडपंती शिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. मोठ्या प्रमाणावर असणार्‍या चिंचेच्या झाडांमुळे तुळजापूरला अगोदर चिंचपूर म्हणून ओळखले जाई, पुढे तुळजाभवानीमुळे याचे नामकरण तुळजापूर असे करण्यात आले.

भारती बाबांचा मठ, काशीकुंड, महंत बाकोजी बाबांचा मठ आणि तुळजापूर गावातील अरण्य

उस्मानाबाद तुळजापूर
तहसीलदार, तुळजापूर 02471-242027

शिवकालीन इतिहासात तुळजापूरचे संदर्भ आढळतात. श्री तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील भारती बाबांचा मठ, काशीकुंड, महंत बाकोजी बाबांचा मठ आणि तुळजापूर गावातील अरण्य गोवर्धन मठ व रामवर्धयानी कुंड इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत

श्री रामच्या बाणामूळेच तयार झालेले रामवर्धयानी कुंड

उस्मानाबाद तुळजापूर
तहसीलदार, तुळजापूर 02471-242027

सोमवारच्या दिवशी येणार्‍या अमावास्येच्या मध्यरात्री काशी कुंडामध्ये थेट गंगा नदीचे पाणी येते अशी आख्यायिका आहे. तर श्रीराम वनवासात असताना काही काळ तुळजापूरमध्ये आल्याचे व त्याच्या बाणामूळेच रामवर्धयानी कुंड तयार झाल्याचे मानले जाते.

'' कुंथलगिरी '' जैन पंथाचे तीर्थक्षेत्र

उस्मानाबाद भूम
तहसीलदार, भूम 02478-272024

भूम तालुक्यात कुंथलगिरी हे जैन पंथाचे तीर्थक्षेत्र असून ही कुलभूषण व देशभूषण या जैन मुनींची निर्वाण भूमी आहे. येथे जैन लेणीही असून या ठिकाणी अनेक जैन मुनींनी साधना केली आहे.

परांडा येथील किल्ला सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध

उस्मानाबाद परंडा
तहसीलदार, परंडा 02477-232024

बहामनी राजाने बांधलेला परांडा येथील किल्ला सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे संतकवी हंसराज स्वामींचा मठ आहे. येथून जवळच डोणगाव येथे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याणस्वामी महाराजांचा मठ आहे.

श्री मोरेश्वराचे किंवा भालचंद्र गणेशाचे स्वयंभू व जागृत स्थान

बीड माजलगाव
तहसीलदार, माजलगाव 02443-234052

माजलगाव तालुक्यात गंगामसला येथील श्री मोरेश्वराचे किंवा भालचंद्र गणेशाचे स्वयंभू व जागृत स्थान प्रचलित आहे. माधवराव पेशवे यांनी हे मंदिर बांधल्याचे उल्लेख सापडतात.

सातवाहनकालीन भुईकोट किल्ला आहे

बीड धारूर
तहसीलदार, धारूर 02445-244186

धारूर येथे सातवाहनकालीन भुईकोट किल्ला आहे. शिवकाळात नेताजी पालकर यांस या किल्ल्यातील कारावासात ठेवण्यात आले होते. येथील अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले अंबादेवीचे मंदिर, हेमाद्रीपंतांनी बांधलेले धारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

कंकाळेश्वर, जटाशंकर मंदिर, खंडेश्र्वीर मंदिर आणि खरडोबा मंदिर

बीड बीड
तहसीलदार, बीड 02442-222204

बीड जिल्ह्यात अनेक प्रसिध्द मंदिरे व प्रेक्षणीय स्थळे आहेत. कंकाळेश्वर, जटाशंकर मंदिर, खंडेश्र्वीर मंदिर आणि खरडोबा मंदिर ही काही प्रमुख होत. जिल्ह्यातील इतर महत्त्वाची स्थळे म्हणजे बीड, अंबेजोगाई व परळी वैजनाथ ही होत.

सौताडा येथील धबधबा, श्री गहिनीनाथांचे मंदिर व नऊ गणेशमूर्तींचे स्थान

बीड पाटोदा
तहसीलदार, पाटोदा 02444-242521

विंचरणा नदीवरील सौताडा येथील धबधबा प्रसिद्ध आहे. राक्षसभुवन हे गेवराई तालुक्यातील गोदावरी काठचे गाव होय. येथील शनी मंदिर प्रसिद्ध आहे. पाटोदा तालुक्यातील चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण, येथीलच श्री गहिनीनाथांचे मंदिर व बीड तालुक्यातील नवगण - राजुरी येथील नऊ गणेशमूर्तींचे स्थान ... ही इतर प्रेक्षणीय स्थळेसुद्धा प्रसिद्ध आहेत.

श्री योगेश्र्वरी मातेच्या आणि खोलेश्वराचे प्राचीन मंदिर

बीड अंबाजोगाई
तहसीलदार, अंबाजोगाई 02446-247084

अंबेजोगाई हे श्री योगेश्र्वरी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे व येथे खोलेश्वराचे प्राचीन मंदिरदेखील आहे. संतकवी दासोपंत यांची समाधी अंबेजोगाई येथे आहे. दासोपंतांनी लिहिलेली (१२ मीटर लांब व १ मीटर रुंदीची) पासोडी, येथे पाहावयास मिळते.

कवी मुकुंदराज यांची समाधी , केदारेश्र्वराचे मंदिर

बीड अंबाजोगाई
तहसीलदार, अंबाजोगाई 02446-247084

ज्यांना मराठीतील आद्यकवी मानले जाते अशा कवी मुकुंदराज यांची अंबेजोगाईमध्ये समाधी आहे. याचबरोबर या तालुक्यातील धर्मपुरी येथील केदारेश्र्वराचे मंदिर देखील प्रसिद्ध व प्रेक्षणीय आहे.

१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी

बीड परळी
तहसीलदार, परळी 02446-222830

१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला.

संत सखाराम महाराज यांचे समाधीस्थान ( लोणी )

वाशीम रिसोड
तहसीलदार, रिसोड 07251-222316

लोणी - रिसोड तालुक्यातील हे ठिकाण आहे. येथे सुप्रसिद्ध संत सखाराम महाराज यांचे समाधीस्थान आहे. या साधुपुरुषाच्या स्मरणार्थ बांधलेल्या मंदिरात त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव साजरा केला जातो.

नाथ महाराजांचे व श्री ब्रह्मदेवाचे मंदिर ( डव्हा )

वाशीम मालेगाव
तहसीलदार, मालेगाव 07254-231373

डव्हा - जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात हे ठिकाण येते. येथे नाथ महाराजांचे व श्री ब्रह्मदेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे.

पद्मशेखर, बालाजी, राम, मध्यमेश्वर, गोदेश्वर, नारायण महाराज इ. प्रमुख मंदिरे , देवतळे ‘बालाजी तलाव’

वाशीम वाशीम
तहसीलदार वाशीम 07252-232008

वाशिम - येथे पद्मशेखर, बालाजी, राम, मध्यमेश्वर, गोदेश्वर, नारायण महाराज इ. प्रमुख मंदिरे आहेत. देवतळे ‘बालाजी तलाव’ या नावानेही प्रसिद्ध असून ते चौकोनी आकाराच्या दगडी कठड्याने बंदिस्त केले आहे. मध्यमेश्वराचे मंदिर हे प्राचीन असून त्याच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीस व वैकुंठ चतुर्दशीला मोठे उत्सव होतात. येथील पद्मावती तलावही प्रसिद्ध आहे.

पठाण लोकांचे पवित्र स्थान ( तर्‍हाळा )

वाशीम मंगरूळपीर
तहसीलदार, मंगरूळपीर 07253-230228

येथील तर्‍हाळा हे गाव पठाण लोकांचे पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंगरूळपीर बिरबलनाथाची यात्रादेखील प्रसिद्ध आहे.

श्री नृसिंह-सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म, ऋषी तलाव

वाशीम कारंजा
तहसीलदार, कारंजा 07256-222170

येथे श्री नृसिंह-सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म झाला. कारंज्यातील नृसिंह-सरस्वती मंदिर व जैन मंदिरे दर्शनीय आहेत. समर्थ संप्रदयातील कल्याणस्वामींचा व भीमदासांचा मठ येथे आहे. शहरास जैनांची काशी म्हणतात. येथील ऋषी तलाव प्रेक्षणीय आहे. या शहरास लाडाचे कारंजे असेही म्हणतात. येथे एक प्राचीन व्यापारी पेठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली ह्या शहरावर स्वारी केली होती.

बंजारा समाजाचे पवित्रतम क्षेत्र ( पोहरादेवी )

वाशीम मानोरा
तहसीलदार, मनोरा 07253-233246

पोहरादेवी - मानोरा तालुक्यातील हे ठिकाण बंजारा समाजाचे पवित्रतम क्षेत्र असून येथे भव्य यात्रा भरते.

शिवरायांचा जन्म

पुणे जुन्नर
तहसीलदार, जुन्नर 02132-222047

शिवनेरी जुन्नर येथे शिवरायांचा जन्म झाला. गडावर शिवाई देवीचे प्राचीन मंदिर आहे

छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ( वढू ), खंडाळा, लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे

पुणे शिरूर
तहसीलदार, शिरूर 02138-222138

शिरूर तालुक्यातील वढू हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून, या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे.
या गड-कोटांबरोबरच, जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील घाटमाथ्यावरील खंडाळा, लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे पर्यटनासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. ही ग

महाराष्ट्राचे कुलदैवत 'श्री खंडोबा' ( जेजुरी )

पुणे पुरंदर
तहसीलदार, पुरंदर 02115-222331

श्री खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत! येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. लग्न झाल्यानंतर नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.‘खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. जेजुरी येथून अष्टविनायकांतील मोरगाव केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म

पुणे पुरंदर
तहसीलदार, पुरंदर 02115-222331

पुरंदर पुरंदर (सासवड) येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला.

सिंहगड

पुणे हवेली
तहसीलदार, हवेली 020-24472348

सिंहगड हवेली याचे पहिले नाव कोंढाणा. हा गड जिंकताना तानाजी मालुसरे हा सिंह धारातीर्थी पडला म्हणून याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले.

आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव)

पुणे पुणे
तहसीलदार, पुणे 020-24472850

आळंदी (संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी) व देहू (संत तुकारामांचे गाव) ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत.

अष्टविनायकांपैकी पाच गणपती

पुणे पुणे
तहसीलदार, पुणे 020-24472850

महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे. विविध जिल्ह्यांत असलेल्या या अष्टविनायकांचे दर्शन घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातून गणेशभक्त येतात. या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्हात आहेत:-

छत्रपतींची राजधानी

पुणे पुणे
तहसीलदार, पुणे 020-24472850

राजगड वेल्हा रायगडाआधी हीच छत्रपतींची राजधानी होती. आजही तितकाच भव्य व दुर्गम असा हा गड आहे.

शनिवारवाडा, वज्रगड (ता. पुरंदर), लोहगड (ता.मावळ),भुईकोट किल्ला (चाकण,ता.खेड), तुंग, तिकोणा (मुळशी)

पुणे पुणे
तहसीलदार, पुणे 020-24472850

पेशव्यांनी बांधलेली किल्लासदृश वास्तू म्हणजे शनिवारवाडा. याच वाड्यात पेशव्यांचे वास्तव्य होते. उपरोक्त किल्ल्यांबरोबरच वज्रगड (ता. पुरंदर), लोहगड (ता.मावळ),भुईकोट किल्ला (चाकण,ता.खेड), तुंग, तिकोणा (मुळशी) हे किल्लेदेखील प्रसिद्ध आहेत. शिवछत्रपतींच्या सैनिकाला मावळा असे संबोधले जात असे ते या जिल्ह्यातील मावळ प्रांतामुळेच.

श्रीराम मंदिर प्रसिद्ध, महानुभव संप्रदायाचे प्रमुख केंद्र ( फलटण )

सातारा फलटण
तहसीलदार, फलटण 02166-222210

वाई तालुक्यातील मांढरदेव हे गाव प्रसिद्ध असून येथे काळूबाईची मोठी यात्रा भरते. येथे हिंदू-मुस्लीम धर्मांचे भाविक गर्दी करतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील फलटण येथे संस्थानी वातावरणाच्या खुणा आढळतात. येथील श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहे. येथील श्रीकृष्ण मंदिर व चक्रधर स्वामींचे मंदिर प्रेक्षणीय आहे.

कोयना प्रकल्प (शिवाजीसागर), वेण्णा नदीवरील कन्हेर धरण व कृष्णेवरील धोम धरण, बौद्धकालीन लेणी

सातारा वाई
तहसीलदार, वाई 02167-227711

वाई हे सुंदर कृष्णाकाठ लाभलेले गाव असून येथे अनेक घाट नदीवर विकसित केलेले आहेत. वाईजवळ मेणवली येथे नाना फडणवीसांचा वाडा आहे, तसेच येथील गणपती मंदिरही प्रसिद्ध आहे. कोयना प्रकल्प (शिवाजीसागर), वेण्णा नदीवरील कन्हेर धरण व कृष्णेवरील धोम धरण ही सर्व ठिकाणे नैसर्गिकदृष्ट्या सुंदर आहेत. कोयना प्रकल्पाच्या परिसरात पंडित नेहरू स्मृती उद्यान विकसित करण्यात आले असून पर्यटक येथेही मोठ्या संख्येने भेट देतात. पालीचा खंडोबा, ठोसेघर धबधबा ही जिल्ह्यातील ठिकाणेही प्रसिद्ध आहेत. येथून जवळ असलेल्या आगाशिवा डोंगरात बौद्धकालीन लेणी सापडली आहेत.

अफझलखानाची कबर, शिखर शिंगणापूर ( माण ), वस्तुसंग्रहालय ( औंध ता.खटाव )

सातारा महाबळेश्वर
तहसीलदार, महाबळेश्वर 02168-260229

प्रतापगड महाबळेश्र्वर तालुक्यात असून शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अफझलखानाची कबर येथे आहे. शिखर शिंगणापूर हे स्थान जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. खटाव तालुक्यातील औंध हे पूर्वीचे संस्थान. संस्थानी वातावरणाच्या खुणा आजही येथे दिसतात. येथील वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध असून, येथील डोंगरावर यमाई देवीचे मंदिर आहे. यमाई देवी ही राज्यातील अनेकांची कुलदेवता आहे.

वासोटा किल्ला ( व्याघ्रगड )

सातारा सातारा
तहसीलदार, सातारा 02162-230681

कोयना नदीच्या परिसरात वासोटा नावाचा दुर्गम किल्ला आहे. यास व्याघ्रगड असे म्हटले जाते. येथे मानवी वस्ती अतिशय कमी असून; वन्य श्र्वापदांचा येथे मुक्त संचार असतो.

अजिंक्यतारा किल्ला, छत्रपती वस्तुसंग्रहालय

सातारा सातारा
तहसीलदार, सातारा 02162-230681

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या खुद्द सातारा शहरात अजिंक्यतारा किल्ला आहे. हा किल्ला शिलाहार राजवटीत राजा दुसरा भोज याने बांधल्याची नोंद इतिहासात सापडते. सातार्‍यातील छत्रपती वस्तुसंग्रहालयही प्रसिद्ध आहे.

छत्रपती शाहू महाराजांची समाधी ( माहुली ), कास तलाव

सातारा सातारा
तहसीलदार, सातारा 02162-230681

शहराजवळील माहुली येथे कृष्णा-वेण्णा नद्यांचा संगम असून येथे छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे. सातार्‍यापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावरील कास तलाव हे ठिकाणदेखील अलीकडच्या काळात नैसर्गिक सुंदरता व शांताता यांमुळे प्रसिद्ध होत आहे. पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.

समर्थ रामदास स्वामींची समाधी ( सज्जनगड ),

सातारा पाटण
तहसीलदार, पाटन 02372-283022

सातार्‍याजवळील सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. रामदासी पंथाचे महाराष्ट्रातील हे एक प्रमुख केंद्र आहे. पाटण तालुक्यातील चाफळ या गावीही समर्थांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी दोन मारुतींची मंदिरे येथेच आहेत. याच मंदिराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट झाल्याचे मानले जाते.

अजिंठाच्या लेण्या

औरंगाबाद सोयगाव
तहसीलदार, सोयगाव 02438-234323

सोयगांव तालुक्यात औरंगाबादपासून सुमारे १०० कि.मी अंतरावरील अजिंठा येथे जगप्रसिद्ध कोरीव लेणी आहेत. ही लेणी रंगीत भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे एकूण तीस लेणी असून, इ.स. पूर्व २०० ते इ.स. ६५० या काळादरम्यान ही लेणी खोदली गेली आहेत. या लेणी बौद्धधर्मीय असून खडकांत कोरलेली बौद्धमंदिरे, गुंफा, विहार तसेच गौतम बुद्धाच्या जीवनावरील कोरलेले अनेक प्रसंग अतिशय रेखीव आहेत.

पितळखोरा येथील बौद्धकालीन लेणी,

औरंगाबाद कन्नड
तहसीलदार, कन्नड 02435-221024

कन्नड तालुक्यातील पितळखोरा येथील बौद्धकालीन लेणी भारतातील सर्वांत प्राचीन लेण्यांमध्ये गणली जातात. कन्नडपासून जवळच औरंगाबाद व जळगाव या दोन्ही जिल्ह्यांत पसरलेले गौताळा-औटरमघाट हे अभयारण्य आहे

दौलताबादचा किल्ला

औरंगाबाद औरंगाबाद
तहसीलदार, औरंगाबाद 0240-2334728

दौलताबाद येथे प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला असून, तो यादवांनी बांधल्याचे मानले जाते. याचे प्राचीन नाव देवगिरी होते. राजा रामदेवरायाच्या काळात दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने हा किल्ला जिंकला व यादवांचे राज्य संपुष्टात आले. महमद तुघलकाने काही महिन्यांसाठी दिल्लीहून भारताची राजधानी येथे आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद ठेवले. किल्ल्याभोवती भक्कम तटबंदी असून किल्ल्याच्या सभोवती खोल खंदक आहे.

बीबी-का-मकबरा, १७ व्या शतकातील पाणचक्की

औरंगाबाद औरंगाबाद
तहसीलदार, औरंगाबाद 0240-2334728

या शहरातील बीबी-का-मकबरा, ही इमारत औरंगजेबाच्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधली गेली, ह्याला छोटा ताज असेदेखील म्हटले जाते.
औरंगाबाद येथील १७ व्या शतकातील पाणचक्की ही अभियांत्रिकी क्षेत्रातील एक आश्चर्यच मानावे लागेल.
येथे भू-अंतर्गत कालव्यांद्वारे आणलेले पाणी ६ मी. उंचीवरून खाली सोडण्यात आले असून त्याच्या वेगाने चक्की फिरते. यावरूनच या स्थळास पाणचक्की म्हणतात.

पैठण हि दक्षिण काशी आणि सातवाहनाची राजधानी म्हणून प्रसिद्ध

औरंगाबाद पैठण
तहसीलदार, पैठण 02431-223051

गोदावरीच्या तीरावरील पैठण हे धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. याला दक्षिण काशी असे देखील संबोधले जाते. हा तालुका महाराष्ट्रातील आध्यात्मिक व सांस्कृतिक महापुरुषांचे जन्मस्थान आहे. इ. स.१२७५ मध्ये पैठण तालुक्यातील आपेगाव येथे संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते. तसेच संत एकनाथ यांचा जन्म इ.स.१५०४ मध्ये पैठण येथेच झाला असे मानले जाते. एकेकाळी सातवाहनांच्या राजधानीचे ठिकाण.

वेरूळ येथील कैलास लेणी, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर मंदिर

औरंगाबाद खुलताबाद
तहसीलदार, खुलताबाद 02437-241023

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील कैलास लेणी जगभर प्रसिद्ध आहेत. ८ व्या शतकातील राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याने ही लेणी खोदली असे म्हटले जाते.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर मंदिर वेरुळ येथील येलगंगा नदीकाठी आहे.

पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा आणि अभयारण्य.

नांदेड किनवट
तहसीलदार, किनवट 02469-222008

या तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. या भागात किनवट अभयारण्य आहे. येथे वाघ, चित्ते इ. प्राणी तसेच काही रंगीबेरंगी पक्षी आढळतात. (या अभयारण्यात यवतमाळ जिल्ह्याचाही काही भाग समाविष्ट आहे.)

साडेतीन पीठांपैकी एक श्री रेणुकामातेचे मंदिर

नांदेड माहूर
तहसीलदार, माहूर 02460-268521

या ठिकाणी श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील दत्तशिखरावर असणारे श्री रेणुकामातेचे मंदिर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते. येथून जवळच माहूरगड किल्ला आहे.

शीख पंथाचे दहावे (शेवटचे) गुरू गोविंदसिंहजी यांची समाधी

नांदेड नांदेड
तहसीलदार, नांदेड 02462-235769

नांदेडची भूमी पावन झाली ती शीख पंथाचे दहावे (शेवटचे) गुरू गोविंदसिंहजी यांच्या येथील वास्तव्याने! शिखांच्या पाच तख्तापैकी एक नांदेड हे गणले जाते. गुरू गोविंदसिंहाच्या ७ ऑक्टोबर, १७०८ रोजी झालेल्या निर्वाणानंतर, गोदावरी काठी १८३२-१८३७ या दरम्यान त्यांची समाधी बांधण्यात आली. हे स्थळ ‘तख्त सचखंद श्री हुजूर अबचलनगर साहिब’ या नावाने प्रचलित आहे. दुमजली अशा ह्या समाधी स्थानाचे बांधकाम, अमृतसरच्या सुवर्ण मंदिराशी साधर्म्य असणारे आहे.

घोड्यांचा बाजार ( मालेगाव )

नांदेड लोहा
तहसीलदार, लोहा 02466-242460

येथील खंडोबाची यात्रा प्रसिद्ध आहे. त्याचसोबत येथील घोड्यांचा बाजारही प्रसिद्ध आहे.

तीन नद्यांचा संगम ( त्रिधारा ), ‘हजरत तुराबुल हक शाह-दर्गा’ झुलता दगडी स्तंभ व प्राचीन कुंड

परभणी परभणी
तहसीलदार, परभणी 02452-222711

परभणी तालुक्यात त्रिधारा क्षेत्र प्रसिद्ध आहे. येथे पूर्णा, दुधना व कापरा या तीन नद्यांचा संगम झालेला आहे. खुद्द परभणी शहरात ‘हजरत तुराबुल हक शाह-दर्गा’ आहे. जिंतूरच्या टेकडीवरील हे जैनांचे प्राचीन स्थान असून येथे अनेक तीर्थंकारांच्या मूर्ती आहेत. एक मूर्ती अधांतरी असल्यासारखी दिसते. एका छोट्या दगडावर ह्या वजनदार मूर्तीचा संपूर्ण भार तोललेला आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील झुलता दगडी स्तंभ व प्राचीन कुंड हे प्रसिद्ध आहेत.

जनाबाईंची समाधी, तीनशे वर्षांपूर्वीचे बालाजीचे मंदिर,

परभणी गंगाखेड
तहसीलदार, गंगाखेड 02453-222023

गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे. हे मंदिर माधवराव पेशवे यांच्या कालखंडातील आहे. गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असून गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.

श्री नृसिंहाचे प्राचीन मंदिर, शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे जन्मस्थान

परभणी पाथरी
तहसीलदार, पाथरी 02451-255321

जिल्ह्यातील पाथ्री हे गाव शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. मुद्गल हे गाव पाथ्री तालुक्यात असून गोदावरी नदीच्या काठावरील हे स्थान मुद्गल ऋषींचे तपस्या स्थान असल्याचे मानले जाते. येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. परभणी तालुक्यातील पोखरणी येथे श्री नृसिंहाचे प्राचीन मंदिर असून मंदिरातील शिल्पे व मंदिराचे स्थापत्य प्रेक्षणीय आहे.

मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर

हिंगोली हिंगोली
तहसीलदार, हिंगोली 02456-221902

३०० वर्षांपूर्वीचे मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर जिल्ह्यात शिरड-शहापूर येथे आहे.

नृसिंहाचे मंदिर

हिंगोली हिंगोली
तहसीलदार, हिंगोली 02456-221902

नरसी येथील नृसिंहाचे मंदिर प्रसिद्ध आहे. जवळच बामणी येथील अन्नपूर्णा व सरस्वती देवीची मंदिरे प्रेक्षणीय आहेत. नरसी हेच संत नामदेवांचे जन्मगाव असल्याचे मानले जाते.

१२५ वर्षांपूर्वीचे तुळजादेवीचे (तुळजाभवानी) मंदिर, बारशिव हनुमान हे तीर्थस्थान

हिंगोली हिंगोली
तहसीलदार, हिंगोली 02456-221902

जिल्ह्यातील १२५ वर्षांपूर्वीचे तुळजादेवीचे (तुळजाभवानी) मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर स्वामी केशवराज यांनी बांधले आहे. हिंगोलीतील बारशिव हनुमान हे देखील प्रसिद्ध तीर्थस्थान आहे.

तुळजादेवीचे (तुळजाभवानी) मंदिर, बारशिव हनुमान

हिंगोली हिंगोली
तहसीलदार, हिंगोली 02456-221902

जिल्ह्यातील १२५ वर्षांपूर्वीचे तुळजादेवीचे (तुळजाभवानी) मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर स्वामी केशवराज यांनी बांधले आहे. हिंगोलीतील बारशिव हनुमान हे देखील प्रसिद्ध तीर्थस्थान आहे.

श्री महागणपती मंदिर ( राजूर )

जालना जालना
तहसीलदार, जालना 02482-22055

शहरापासून २५ कि.मी. अंतरावर राजूर येथे असलेले श्री महागणपती मंदिर स्वयंभू व जागृत म्हणून प्रसिद्ध असून दर अंगारकी चतुर्थीला मोठी यात्रा येथे आयोजित करण्यात येते. पुराणातील गणपतीच्या पीठांपैकी हे एक मानले जाते. चिमाजी अप्पांनी (थोरल्या बाजीरावांचे बंधू) या मंदिरास १०८ नंदादीप भेट दिल्याचा उल्लेख पेशवेकालीन इतिहासात आढळतो.

जनार्दन (मामा) नागपूरकर यांचा पुतळा, आनंदस्वामींचा मठ, मोती तलाव व मोती बाग

जालना जालना
तहसीलदार, जालना 02482-22055

मराठवाडा मुक्तिसंग्रमात रझाकारांविरुद्ध झुंज देताना हौतात्म्य पत्करलेले जनार्दन (मामा) नागपूरकर यांचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती भागात मुक्तिसंग्रमाच्या आठवणींना उजाळा देत उभा आहे. शहरातील आनंदस्वामींचा मठ, मोती तलाव व मोती बाग इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत.

आंतरराष्ट्रीय उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ( इंदेवाडी ), अवशेषांसाठी प्रसिद्ध ( भोकरदन )

जालना जालना
तहसीलदार, जालना 02482-22055

जालना जिल्ह्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, शहराजवळच ( इंदेवाडी ) या गावात आंतरराष्ट्रीय उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र (इंटरनॅशनल सॅटेलाईट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन) उभारण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्याला नवी ओळख प्राप्त झाली आहे.
हेमाडपंती शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे मंठा तालुक्यातील हेलस हे गांव होय. तसेच प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले भोकरदन हे स्थळ याच जिल्ह्यात आहे.

जांबुवंताचे अतिशय दुर्मीळ मंदिर ( अंबड ), बोहरी समाजातील मौलवी नरुद्दीन यांचा दर्गा. ( टाके डोणगाव )

जालना अंबड
तहसीलदार, अंबड 02483-22055

येथील प्राचीन मंदिर म्हणून मानले जाणारे श्री मत्स्योदरी देवीचे मंदिर जालना शहरापासून २१ कि.मी. अंतरावर असलेल्या अंबड येथे आहे. हे मंदिर ज्या टेकडीवर आहे त्याचा आकार माशासारखा असल्यामुळे ह्या देवीला मत्स्योदरी असे म्हटले आहे. रामायण काळातील जांबुवंताचे अतिशय दुर्मीळ (बहुधा भारतातील एकमेव) मंदिर अंबड तालुक्यातील जांबुवंतगड येथे आहे. अंबड तालुक्यातच टाके डोणगाव येथे बोहरी समाजातील मौलवी नरुद्दीन यांचा दर्गाही आहे.

जगातील सर्वांत मोठी हनुमानाची मूर्ती

बुलढाणा नांदुरा
तहसीलदार, नांदुरा 07265-220300

बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा येथे १०५ फूट उंच अशी हनुमानाची मूर्ती आहे. ही जगातील सर्वांत मोठी हनुमानाची मूर्ती आहे असे म्हणतात.

लोणार सरोवर

बुलढाणा बुलढाणा
तहसीलदार, बुलढाणा 07262-242283

पद्म व स्कंद पुराणात उल्लेख आहे असे हे सरोवर या जिल्ह्यात आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने तयार झालेल्या लोणार सरोवरामुळे बुलढाणा जिल्हा अनेकांना परिचित झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या सरोवरांपैकी दुसर्‍या क्रमांकाचे नैसर्गिक सरोवर म्हणून लोणारचे सरोवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. तसेच हे सरोवर जगातील तिसर्‍या क्रमांकाचे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे.

भिंगार व अंबाबरवा ही थंड हवेची ठिकाणे

बुलढाणा बुलढाणा
तहसीलदार, बुलढाणा 07262-242283

खुद्द बुलढाणा हे थंड हवेचे ठिकाण असून, जिल्ह्याच्या उत्तरेकडील गाविलगडच्या डोंगरांतील भिंगार व अंबाबरवा ही थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थान,नीळकंठेश्र्वर व रामेश्र्वर ही महादेवाची प्राचीन मंदिरे

बुलढाणा सिंदखेडराजा
तहसीलदार, सिंधखेड राजा 07269-234236

जिल्ह्यातील सिंदखेड राजा हा तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, जिजाऊसाहेब ह्यांचे जन्मस्थान. येथे जिजाऊंचे वडील लखूजी जाधव ह्यांची समाधी आहे. सिंदखेड राजा येथेच नीळकंठेश्र्वर व रामेश्र्वर ही महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत.

गजानन महाराजांची समाधी, ‘विदर्भाचे पंढरपूर’ म्हणून शेगावचा उल्लेख

बुलढाणा शेगाव
तहसीलदार, शेगाव 07265-252008

बुलढाणा जिल्ह्यात शेगाव या तालुक्यात गजानन महाराजांची समाधी आहे. ‘विदर्भाचे पंढरपूर’ म्हणून शेगावचा उल्लेख केला जातो.

मुद्गलेश्वराचे मंदिर, येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराला विदर्भातील पंढरपूर म्हणतात.

अमरावती भातकुली
तहसीलदार, भातकुली -2662124

भातकुली तालुक्यात ऋणमोचन या ठिकाणी पूर्णा नदीकाठी मुद्गलेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच भातकुली हे जैन धर्मियांचेही श्रद्धास्थान आहे.वर्धा नदीकाठचे कौंडिण्यपूर हे ठिकाण प्राचीन अवशेषांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरही प्रसिद्ध असून या स्थानाला विदर्भातील पंढरपूर म्हणतात.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

अमरावती अमरावती
तहसीलदार, अमरावती -2674360

हा प्रकल्प जिल्ह्यात १६७७ चौ. कि.मी. वर पसरलेला आहे. पट्टेरी वाघांची संख्या कमी होत चालल्यामुळे १९७४ साली मेळघाट हे वाघांसाठीचे विशेष असे राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आले.४१ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, पक्ष्यांच्या २५० प्रजाती, माशाच्या २४ प्रजाती, तर सरपटणार्‍या प्राण्यांच्या १६० प्रजातींनी मेळघाटचे जंगल समृद्ध आहे. झाडांच्या ७०० प्रजाती आपणास येथे पाहायला मिळतात. चांगल्या प्रतीचा साग, बांबू, मोह अशा मोठ्या वृक्षांनी आणि हिरडा, बेहडा, मुसळी, अशा औषधी वृक्षांनी मेळघाटचे जंगल नटले आहे.

अंबादेवीचे मंदिर

अमरावती अमरावती
तहसीलदार, अमरावती -2674360

अमरावती शहरात अंबादेवीचे मोठे मंदिर आहे त्याजवळच श्री एकवीरा देवीचेही मंदिर आहे. अंबादेवीचे मंदिर तत्कालीन अस्पृशांना खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सत्याग्रह केला होता. (१९२८)

श्री एकवीरा देवीचे मंदिर

अमरावती अमरावती
तहसीलदार, अमरावती -2674360

श्री एकवीरा देवीच्या मंदिराची स्थापना सुमारे ३७५ वर्षांपूर्वी (१७ व्या शतकात) श्री जनार्दन स्वामी यांनी केली. पूर्वी घनदाट जंगल असलेल्या या परिसरात जनार्दन स्वामींनी एकवीरा देवीची आयुष्यभर आराधना केली. या मंदिराच्या परिसरात त्यांनी समाधी घेतल्याचे इतिहासकार सांगतात

सालबर्डी येथील गुहेतील महादेवाचे मंदिर

अमरावती मोर्शी
तहसीलदार, मोर्शी -222236

मोर्शी तालुक्यात सालबर्डी येथील गुहेतील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध असून याच तालुक्यातील रिद्धपूर येथे महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे गुरू श्री गोविंदप‘भू यांची समाधी आहे. श्री गोविंदप्रभूंचे वास्तव्य असलेले रिद्धपूर महानुभव

थंड हवेचे ठिकाण,बैराट हे सातपुडा येथील सर्वात हे उंच शिखर आहे.

अमरावती चिखलदरा
तहसीलदार, चिखलदरा -230223

जिल्ह्यातील चिखलदरा हे एक थंड हवेचे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे. विदर्भातील हे डोंगराळ भागातील निसर्गरम्य असे एकमेव स्थान असून याला विदर्भाचे नंदनवनही म्हटले जाते. बैराट हे सातपुडा रांगेतील उंचावरील ठिकाण असून येथून जवळच गाविलगड हा सुमारे १४ व्या शतकात बांधलेला किल्ला आहे.

पारशी लोकांचे पवित्र ( उदवाडा ), मत्स्यव्यवसाय,

ठाणे डहाणू
तहसीलदार, डहाणू 02528-221182

डहाणू - डहाणूला स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. मत्स्यव्यवसायासाठी डहाणू प्रसिद्ध असून येथे लहान होड्या बनवण्याचा उद्योग चालतो. डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे उदवाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळ आहे.

जव्हार ( ठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर’ )

ठाणे जव्हार
तहसीलदार, जव्हार 02520-222046

- ‘ठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर’ अशी या थंड हवेच्या ठिकाणाची प्रसिद्धी आहे. तसेच येथील जयविलास राजवाडा प्रेक्षणीय आहे. येथेही पर्यटक ‘मावळतीच्या सूर्याचा’ देखावा पाहण्यास गर्दी करतात.

पोर्तुगीजांनी बांधलेला भव्य किल्ला,

ठाणे वसई
तहसीलदार, वसई 02520-2322007

उल्हास नदीच्या मुखाजवळ पोर्तुगीजांनी बांधलेला भव्य किल्ला येथे आहे. चिमाजी अप्पांनी (थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू) हा किल्ला १७३९ साली पोर्तुगिजांकडून हस्तगत केला. या किल्ल्यात चिमाजी अप्पांचे भव्य स्मारक आहे. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला असल्यामुळे या किल्ल्याला नैसर्गिक सुंदरता लाभली आहे.

जीवदानी मातेचे जागृत स्थान

ठाणे वसई
तहसीलदार, वसई 02520-2322007

विरार - येथे जीवदानी गडावर जीवदानी माता या देवीचे जागृत स्थान आहे. हे एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक स्थान आहे. डोंगरावर सुमारे१४०० पायर्‍या चढून जावे लागते. देवीच्या मूर्तीजवळ सुपारी लावून कौल मागण्याची प्राचीन परंपरा आहे.

प्राचीन लेण्यांचा समूह ( लोनाड )

ठाणे भिवंडी
तहसीलदार, भिवंडी 02522-257353

भिवंडीच्या पूर्वेला लोनाड येथे प्राचीन लेण्यांचा समूह आहे. येथे रामेश्र्वराचे भव्य पुरातन मंदिर आहे.

माळशेज घाट

ठाणे मुरबाड
तहसीलदार, मुरबाड 02524-222225

हा मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील घाट असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. येथे गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्षी ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध व विकसित झाले आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात पर्यटक येथे गर्दी करतात.

श्रीमहागणपतीचे जागृत स्थान ( टिटवाळा ),

ठाणे ठाणे
तहसीलदार, ठाणे -25331164

टिटवाळा - येथील काळू नदीच्या काठी श्रीमहागणपतीचे जागृत स्थान आहे. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते. म्हणून ह्या गणपतीस विवाहविनायक असेही म्हणतात.

श्रीनित्यानंद महाराजांची समाधी ( वज्रेश्वरी ), गरम पाण्याचे झरे ( अकलोली व गणेशपुरीतील )

ठाणे ठाणे
तहसीलदार, ठाणे -25331164

वज्रेश्वरी - हे स्थळ तानसा नदीकाठी वसलेले असून येथे श्रीनित्यानंद महाराजांची समाधी आहे. येथे चिमाजी अप्पांनी बांधलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिरही प्रसिद्ध आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे अकलोली व गणेशपुरीतील गरम पाण्याचे झरे. या झर्‍यांतून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहत असल्याचे मानले जाते.

कुंडेश्र्वराचा धबधबा ( कुंडेश्र्वर ),

ठाणे ठाणे
तहसीलदार, ठाणे -25331164

कुंडेश्र्वर - बदलापूरपासून जवळच डोंगररांगांत, निसर्गरम्य परिसरात कुंडेश्र्वराचा धबधबा आहे. येथे प्राचीन गिरीजाशंकर मंदिरही आहे.

मलंगगड, मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिरही

ठाणे ठाणे
तहसीलदार, ठाणे -25331164

मलंगगड - हाजी मलंग ह्या नावाने हे स्थान ओळखले जाते. येथे हाजी मलंग ह्या मुस्लीम धर्मीय साधूची कबर (दर्गा) आहे. येथील किल्ला शिलाहार राजाने बांधला. तसेच येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिरही आहे.

अर्नाळा किल्ला

ठाणे ठाणे
तहसीलदार, ठाणे -25331164

वैतरणा नदीच्या मुखावर समुद्र किनार्‍यालगत हा किल्ला आहे. आजही याचे बहुतांश बांधकाम सुस्थितीत आहे. अर्नाळा किल्ला

डोंगरी किल्ला ( कर्नाळा ), महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य

रायगड पनवेल
तहसीलदार, पनवेल 0222-2452399

पनवेल जवळ सुमारे १० किमी. अंतरावर कर्नाळा हा प्रचंड डोंगरी किल्ला वसलेला आहे. ५०० मीटरहून अधिक उंच असलेला हा किल्ला पर्यटकांचे व गिर्यारोहकांचेही मुख्य आकर्षण आहे. येथे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. किल्ल्याच्या सभोवती साडेचार किमी. क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे.

माथेरान थंड हवेचे ठिकाण

रायगड कर्जत
तहसीलदार, कर्जत 02148-222037

माथेरान हे कर्जत तालुक्यात असून सह्याद्रीच्या पश्र्चिम घाटात ८०० मी. उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. घनदाट वने व नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे पोहोण्यासाठी धावणारी नेरळ-माथेरान ही ‘नॅरोगेज’ रेल्वे सुद्धा अकर्षक असून, ही रेल्वे निसर्गाचा वेगळाच अनुभव आपल्याला देते.

घारापुरी (एलिफंटा) लेणी, ‘एलिफंटा गुंफा’

रायगड उरण
तहसीलदार, उरण 02227-222352

घारापुरी हे ठिकाण मुंबईपासून जवळ आहे, परंतु ते प्रशासकीयदृष्ट्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे. ‘एलिफंटा गुंफा’ या समुद्रात असलेल्या हरितबेटावर सातव्या शतकापासून अस्तित्वात आहेत. येथे शिवाची कातळामधील, प्राचीन जगप्रसिद्ध महेशमूर्ती पाहायला मिळते. येथेच वनोद्यानही विकसित करण्यात आले आहे.

श्री कनकेश्वर मंदिर

रायगड अलिबाग
तहसीलदार, अलिबाग 02141-222054

श्री परशुरामाने निर्माण केलेल्या कनकडोंगरी या उंच टेकडीवर सुंदर कोरीव काम केलेले शंकराचे मंदिर आहे. कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे निसर्गाची पार्श्र्वभूमी लाभलेले प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे.

साळावचे बिर्ला मंदिर ( साळाव )

रायगड अलिबाग
तहसीलदार, अलिबाग 02141-222054

रेवदंड्यापासून जवळच साळाव या गावात बिर्ला ग्रुपने बांधलेले श्री गणपतीचे भव्य मंदिर आहे. येथे मंदिराच्या बाजूने खास तयार केलेली हिरवळ, आणि मंदिरातील प्रकाशयोजना भारावून टाकणारी आहे.

फणसाडचे अभयारण्य

रायगड अलिबाग
तहसीलदार, अलिबाग 02141-222054

नबाब काळातील केसोलीचे जंगल म्हणजेच आत्ताचे फणसाडचे अभयारण्य. एका बाजूला अरबी समुद्र व दुसर्‍या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगर प्रदेश असलेले हे अभयारण्य ५२.७१ चौ.किमी. क्षेत्रात पसरलेले आहे. शेकडो प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, औषधी वनस्पती, विविध प्राणी या सगळ्यांनी हे अभयारण्य परिपूर्ण आहे.

काशीद बीच

रायगड मुरुड जंजिरा
तहसीलदार, मुरुड 02144-274026

काशीद बीच - मुरूडहून १८ किमी. अंतरावर गोव्यामधील बीचची (किनार्‍याची) आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ-सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

जंजिरा किल्ला

रायगड मुरुड जंजिरा
तहसीलदार, मुरुड 02144-274026

अरबी समुद्रावरील अजिंक्य व बलाढ्य किल्ला म्हणून जंजिरा किल्ला प्रसिद्ध आहे. मुरूडपासून जवळच राजापुरी खाडीत हा जलदुर्ग उभा आहे. स्वराज्याच्या काळात सिद्दींच्या वर्चस्वाखाली हा किल्ला जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.

सोमजाई मंदिर, जीवनेश्वर मंदिर, राम मंदिर, कुसुमादेवी मंदिर

रायगड श्रीवर्धन
तहसीलदार, श्रीवर्धन 02147-222226

श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव होय. येथील पेशवे मंदिरातील चौथर्‍यावर पेशवे स्मारक बांधण्यात आले आहे. या ठिकाणी सोमजाई मंदिर, जीवनेश्वर मंदिर, राम मंदिर, कुसुमादेवी मंदिर अशी अनेक मंदिरे पाहायला मिळतात.

श्रीशंकराचे प्राचीन मंदिर, दक्षिण काशी

रायगड श्रीवर्धन
तहसीलदार, श्रीवर्धन 02147-222226

श्रीवर्धनला जोडूनच पर्यटकांच्या तोंडी हे नाव येते. हे श्रीशंकराच्या प्राचीन मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले ठिकाण श्रीवर्धन तालुक्यात आहे. येथील समुद्रकिनाराही पर्यटकांचे आकर्षण आहे. हे जागृत स्थान दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते.

दिवे आगर, रूपनारायण मंदिर

रायगड श्रीवर्धन
तहसीलदार, श्रीवर्धन 02147-222226

श्रीवर्धन तालुक्यातील शिलाहारांची प्राचीन राजधानी असलेले दिवेआगर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे तांब्याच्या पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडल्याने ह्या स्थानास धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील श्री रूपनारायण मंदिर हे देखील दर्शनीय आहे. याच ठिकाणी मराठी भाषेचे उल्लेख असलेले प्राचीन अवशेष सापडले आहेत.

रायगड किल्ला

रायगड महाड
तहसीलदार, महाड 02152-222142

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा व राज्यकारभाराचा खरा साक्षीदार असा हा रायगड किल्ला! महाडपासून २५ कि.मी. वर असलेला हा दुर्ग गांधारी व काळ अशा दोन नद्यांच्या उगमस्थानाजवळ वसलेला आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर इ. स. १६७४ मध्ये संपन्न झाला.

अष्टविनायकांपैकी श्री वरदविनायक गणेशाचे मंदिर

रायगड महाड
तहसीलदार, महाड 02152-222142

महड - येथेही अष्टविनायकांपैकी श्री वरदविनायक गणेशाचे मंदिर प्रसिद्ध आहे. महड हे स्थान खालापूर तालुक्यात आहे.

शिवथर घळ

रायगड महाड
तहसीलदार, महाड 02152-222142

महाड तालुक्यात वरंधा घाटात हे स्थान आहे. येथे श्री समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला असे मानले जाते. येथे श्री समर्थ रामदासांचे दहा वर्षे वास्तव्य होते. येथील धबधबा, घनदाट जंगल, नैसर्गिक घळ व पवित्र शांतता यांमुळे पर्यटक येथे गर्दी करतात. येथील निसर्ग सुंदरतेचे वर्णन दासबोधामध्येही लिहिलेले आढळते.

१९२७ सालचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, क्रांतिस्तंभ

रायगड महाड
तहसीलदार, महाड 02152-222142

महाड येथील १९२७ सालचा चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. चवदार तळे तत्कालीन अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनामुळे चवदार तळ्यास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आंदोलनाची आठवण म्हणून येथे क्रांतिस्तंभ उभारण्यात आला आहे.

परशुरामाचे मंदिर ( चिपळूण )

रत्नागिरी चिपळूण
तहसीलदार, चिपळूण 02355-252044

येथून जवळ निसर्गरम्य परिसरात श्री क्षेत्र परशुराम हे परशुरामाचे मंदिर आहे.