अ.क्र. विषय लेखक दिनांक
1

संस्कार

View File

पु ल देशपांडे
2

स्वत:ला रिक्त करून प्रज्ञाशील बना..!

तुम्ही पुरेसे कणखर व परिपक्व नाहीत, याचे कारण म्हणजे तुम्ही अनेकदा निराश होता, चिडता आणि कमजोर लोकांवर तोंडसुख घेत, त्यांच्यावर आपला सगळा राग काढता. बरोबर आहे ना? तुमच्यातील उणिवा व अवगुण तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. इतकेच नव्हे, तर सार्मथ्याकडे जाणारा रस्ता तुम्हाला प्रकाशमान करता आला पाहिजे. साध्या, सोप्या जीवनासाठी नव्हे, तर सार्मथ्यशाली आणि प्रेरणादायी आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. सार्मथ्याकडे जाणार्‍या तरुण प्रवाशाची पहिली पायरी कोणती असावी? प्रथम हे समजून घ्या की, सर्वसाधारणपणे चार प्रकारची ऊर्जा वा चैतन्ये आपल्या आतच बंदिस्त असतात. हे चैतन्य आपल्याला बाहेर आविष्कृत करता आले पाहिजे. ती चैतन्ये पुढीलप्रमाणे..

-शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक चैतन्य
एका सखोल-चांगल्या सरावानिशी योग, प्राणायाम तसेच श्वासोच्छ्वासाचे आयाम, आपल्याला करता आले पाहिजेत. जेणेकरून आपल्या आतील शारीरिक चैतन्य मुक्त होऊ शकेल. तसेच संवेदनशील योग्य भावभावना, प्रेम व करुणा यासह भावनिक चैतन्यमयतेला मोकळे करा. मौलिक मूल्ये ओळखा आणि ती प्रत्यक्ष जीवनात उतरवा. ही तिन्ही चैतन्ये जेव्हा मोकळी होतील तेव्हा ती आध्यात्मिक ऊर्जेलाही बंदिस्ततेतून मुक्त करतील. या चारही प्रकारच्या चैतन्यमयतेसह कुठल्याही तरुणाचे जीवन सार्मथ्यशाली तर होईलच; पण असा तरुण मोठे वैभवशाली व सर्वाधिक यशस्वी जीवन जगू शकेल. मग तुम्ही तुमच्यातील अवगुणांवर सहज मात करू शकाल. खरे तर आमची जीवनविषयक मते वा विचारसरणी ही संकुचित आहे. पण, आता तुम्ही व्यक्त केलेल्या चैतन्याच्या दिशेने आजचे तरुण मुक्त होतील? यावर चिंतन करा.

एक जण मार्शल आर्ट्सचा बादशहा ‘ब्रुस ली’कडे गेला आणि त्याने त्याला मार्शल आर्ट्स शिकवण्याची विनंती केली. ‘ब्रुस ली’ने विचारले की ‘तुला यापूर्वीचा मार्शल आर्ट्सचा काही अनुभव आहे का?’ त्याने उत्तर दिले की, मला ‘ब्लॅक बेल्ट’ मिळाला आहे. मग त्या माणसाने ‘ब्रुस ली’ला मार्शल आर्ट्सच्या काही कसरती करून दाखवल्या. ते पाहून ‘ब्रुस ली’ त्याला म्हणाला, ‘तुला जर मार्शल आर्ट्स शिकण्यात खरोखरच रस असेल तर तू आतापर्यंत जे काही शिकला आहेस ते तुला प्रथम डोक्यातून काढावे लागेल आणि कोर्‍या पाटीसह माझ्याकडे यावे लागेल.’ त्या खेळाडूला ते ऐकून धक्काच बसला आणि त्याने त्याचे कारण ‘ब्रुस ली’ला विचारले. ‘ब्रुस ली’ने त्यावर त्याला एक गोष्ट सांगितली. वादविवादात जिंकण्यासाठी एक माणूस झेन गुरूंकडे गेला. त्या गुरूंनी त्याला चहाचा आग्रह केला आणि त्याच्या कपात ते चहा ओतू लागले. कप भरूनही ते गुरू चहा ओततच होते. त्यांनी त्या गुरूंना विचारले की ‘तुम्ही हे काय करता आहात?’ ते म्हणाले, ‘तू या चहाच्या कपाप्रमाणे अगोदरच भरलेला आहेस. प्रथम तू तुझ्या मन-बुद्धीचा कप रिकामा कर आणि मग मी तुला काही सांगू शकेन, शिकवू शकेन. दुसर्‍या भाषेत सांगायचे तर भरलेल्या कपात आणखी चहा ओतणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.’ प्रथम तुम्ही स्वत:ला निदरेष रिक्त करा आणि मगच त्या अवकाशात तुम्ही नवे काही शिकून प्रज्ञाशील बनाल. या निदरेष रिक्ततेसाठी प्रबळ आंतरिक इच्छाशक्ती हवी. जेव्हा तुम्हाला काही काम नसेल, तेव्हा विचारांच्या हालचालींशिवाय राहण्यास शिका.

विचार येतील आणि जातील. पण, तुम्ही त्या विचारांकडे अक्रिय सावधानतेने पाहा. कुठल्याही परिस्थितीत त्याच्याशी एकरूप होऊ नका. मग तुम्ही आत्मसुख व शांती यांची अनुभूती घ्याल. स्वत:ला निदरेष रिक्त करणे, विचारांच्या हालचालींशिवाय तसेच राहणे, यासाठी एका आंतरिक शिस्तीची मोठी आवश्यकता आहे. अर्थात हा आयुष्यभराचा प्रवास आहे. तुम्ही जर तुमच्या विचारांकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की विचार हे यांत्रिकतेतून घडत असतात आणि तुम्ही त्याच्या कृत्रिमतेतील घडणीला बळी पडता. त्यात परिवर्तन घडवून आणा.

26-03-2013
3

अध्यात्मिक…नामस्मरण अति मोलाचं!

*प्रपंच्यातले प्रश्न घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला दासगणू महाराज प्रामुख्याने एकच उपदेश करीत असत तो म्हणजे, “ईश्वरावर श्रद्धा ठेवां आणि नामस्मरण चालू द्या.” चौर्यांशी लक्ष योनीतून मार्ग क्रमण केल्यावर फक्त एकदा नरदेह प्राप्त होतो.तो अतिशय दुर्मिळ व क्षणभंगुर आहे, ईतकच नाही तर नरकाच कोठार हि आहे. पण अखेर याच नरदेहात ईश्वर प्राप्ती होणार आहे, ”ईश्वरप्राप्ती” हेच नरदेहाच अंतिम ध्येय आहे, ज्या अव्यक्तातून आपण आलो आहोत, त्याच अव्यक्तात, पुन्हा समरसून जायचं आहे. एवढ असूनही या जगण्याचं आपल्याला कोण कौतुक! आपण आपल्या या नश्वर देहावर किती प्रेम करतो, त्या देहाला केवढ जपतो. त्याला सुख मिलाव म्हणून किती धडपडतो. हे सर्व चूक आहे अस नाही, पण त्याची आसक्ती हे वाईट. हि आसक्ती मग या देहाला कायकाय करायला भाग पडते.सारी धडपड या देहाच्या सुखाकरिता. आधी आस, मग ध्यास, आणि मग हव्यास, अश्या तर्हेने ती वाढतच जाते.काम, रोध, लोभ, मोह, मत्सर हे षडरिपू या देहावर अधिराज्य गाजवतात आणि या सर्वांवर कडी करणारा ”अहंकार” किंवा”मीपणा ” हा जो ”मी” आहे ना, तोच जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे तो दिसत नाही पण ‘आहे’ तर खरा !….

या अहंकारात किंवा आसक्तीत, आपण गुरफटून जातो. मग केव्हा तरी मृत्यूचा विळखा पडतो. आणि हा साडेतीन हाताचा देह संपुष्टात येतो. तरीही आपण ”अमरपट्टा” घेऊन आल्या सारखे वागतो. फायद्याच आहे ते मिळवायचचं, ते मिळवल्या नंतर मला समाधान लाभेल या कल्पनेन, मृगजळा मागे धावत राहतो. स्वार्थासाठी धडपडताना परमार्थाची साघी आठवनही होत नाही:आणि झाली तर ती आपली ईच्छापुर्ती करण्यापुरती! … यामुळे पापं आणि वासना नको तेवढ्या वाढत जातात. आणि माणूस शाश्वत आनंदाला कायमचा मुकतो. यातून वृद्धी होते ती चिंता, क्लेश, काळजी, ताणतणाव, आजारपण अनेक आपत्ती यांचीच! मग या सर्वांना तोंड देता आपल्या नाकीनव येतात.तेव्हा परमार्थ आठवूच शकत नाही, तर तो आठवावा, यासाठीच ” महाराज दासगणू” आग्रहाने प्रतिपादन करतात, कि नामस्मरण करून या सर्वांच्या बाहेर पडता येतं ” ऐहिक गोष्टींची अभिलाषा धरलीच पाहिजे का? मग ईश्वराचीच का धरु नये. त्यासाठी सर्वच संतांनी नामस्मरणाला खूपच महत्व दिले आहे. सर्वं संतांच्या मुखी आपल्या साठी एकच आग्रहाच प्रतिपादन असते, अखंड नामस्मरण! पण आपण वारंवार समजावूनही नको त्याच मार्गाने जात असतो, आणि अध:पतित होत असतो, दासगणू महाराज म्हणत “नामस्मरण करण्यात कठीण काय आहे?” त्यात सोवळ्या ओवळ्याच, जातीधर्मांच, उच्चनीच्चतेच, स्थळकाळाच, कश्याचच बंधन नाही. हा मार्ग आचरायला एकदम सोपा आहे. मात्र त्यासाठी काही पत्थ्य आपणही पाळावी लागतात, ते म्हणतात ”नामस्मरण” हि काही नुसती कवायत नव्हे, तोंडाने राम, राम आणि मन मात्र दुसरीकडेच भरकटलेल. नामस्मरण हे अंत:करणा पासून व्हायला हवं आणि त्यात ”सातत्य” हि हवं. ‘भगवंत आपल्या जवळ आहे हि भावना हवी. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना विवेक शाबूत राहतो. आपल आचरण भगवंत पाहतो आहे, याची जाणीव असली की, नीती आणि सदाचार वेगळे राहत नाही. भक्ती हा नीतीचा गाभा आहे, सदाचार हि त्याची परिणीती आहे. चांगल्या वाईटातला फरक तरी आपल्या सदविवेकबुद्धीला करता यायला हवा. संत चरित्रात आपण पाहतो कि विवेका बरोबर ”वैराग्य”हि महत्वाचं प्रपंच्यात राहून पूर्ण वैराग्ययुक्त होण फार फार कठीण, पण आसक्ती वर बर्यापैकी ताबा मिळवता आला, तरी परमार्थाची वाटचाल सुकर होईल, यात शंका नाही.

आपण मात्र सारखा परिग्रह करीत राहतो. कसला ना कसला लोभ, [पैशाचा,प्रसिद्धीचा] धरत राहतो. हे फार वाईट आहे, आणि त्याचा ”ईश्वराशी नाहक संबंध हि जोडतो”. त्यातून ईश्वराला घूस देण्याचा प्रयत्न देखील करतो, हे फारच वाईट आहे, त्याला द्यायचं आहे तर प्रेम द्या. तो भावाचा, भक्तीचा भूकेला आहे हे विसरू नका. परमांत्म्यात सतत ”अनुसंधान” हवं. त्याच्या साठी वेळ, आणि वयाचे हि बंधन नाही. संतांच्या या शिकवणीच पालन करणे हे आपलें नैतिक कर्तव्य आहे.

थोडक्यात म्हणजे ईश्वरावर निष्ठा ठेवून आणि विवेक बुद्धी शाबूत ठेवून नामस्मरण करीत राहीलं, तर प्रपंच्यात राहूनही सहज पणे परमार्थ साधता येतो, आणि या नश्वर, क्षणभंगुर देहाचं सार्थक करून घेता येत. ज्यांनी हे ज्ञानामृत जनमानसात भरभरून वाटल आणि जनतेला त्या साठी सक्रीय केलं त्या महापुरुश्यांना कोटी कोटी प्रणाम!