मा. सर धन्यवाद . पण महेश मुकुंद सप्रे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व प्रवीण वरंडे व इतर -OA No ३५४/२०१५ हा निर्णय कोठे मिळू शकेल ?
kalam २५५/२५७ ची प्रकरणे अपर जिल्हाधिकारी यांचेकडे चालतात कि जिल्हाधिकारी यांचेकडे .
बी कर्मचारी ३ वर्ष पूर्ण न झाल्यामुळे महसूल अहर्ता परीक्षा देऊ शकत नाही .आंतर जिल्हा बदलीने सी कर्मचारी बी नंतर आलेला आहे आहे.बी नंतर सी chi जेष्टता आहे . सी अहर्ता परीक्षा उत्तीर्ण आहे .बी सिनियर आहे तरीही सी ला अव्वल कारकून पदी पदोन्नती देता येते का ? असेल तर कोणता नियम पाहावा लागेल ? कृपया मार्गदर्शन व्हावे.
महेश मुकुंद सप्रे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व प्रवीण वरंडे व इतर -OA No ३५४/२०१५
आर ओ आर प्रकरणात कोर्ट फी बाबत काही शासन निर्णय आहे का ? किंवा कार्यालयात अर्जदार यांचेकडून अर्ज घेताना किती रुपयांचे मुद्रांक त्या अर्जावर असावेत ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
आतियात कायद्यानुसार विरासतचे अपील उपविभागीय अधिकारी यांच्यानंतर अपर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करावे लागेल कि जिल्हाधिकारी यांचेकडे ?
वर्ग १ चे अधिकारी यांची शासन स्तरावर विभागीय चौकशी सुरु असल्यास त्यांना तात्पुरती पेन्शन किती दिवस देता येते .कृपया मार्गदर्शन व्हावे .
आरवोआर प्रकरणाचे कामकाज करण्यासाठी कोणते पुस्तक अभ्यासावे लागेल ?
अपर जिल्हाधिकारी यांना शहरी भागातील एन ए मंजूर करण्याचे अधिकार आहेत का ? कोणता शासन निर्णय आहे ? कृपया मार्गदर्शन व्हावे.
गौण खनिज अवैध्य उत्खननला मोक्का लावण्याची पद्धत कोणती आहे? कोणत्या नियमान्वये कृपया
मग्रारोहयो अंतर्गत तालुका कृषी अधिकारी यांचेकडून प्राप्त नॅडेप व वर्मी कंपोस्ट च्या कामास प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यपद्धती कोणती आहे.सदरील प्रशासकीय मान्यता देण्यासाठी कृती आराखडा असणे गरजेचे आहे काय ? कोणता शासननिर्णय पाहावा लागेल ?कृपया मार्गदर्शन व्हावे .
मग्रारोहयो अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यासाठी कोणत्या बाबींचा अभ्यास करावा लागेल ?
मग्रारोहयो विभागाचे कामकाज करण्यासाठी कोणते शासन निर्णय ,वेबसाईट पाहावी लागेल , कृपया मार्गदर्शन व्हावे .
वाटणी पत्राच्या आधारे फेर घेण्यात येऊ नये असे परिपत्रक आहे काय ?
एन ये आदेश रद्द करण्याची कार्य पद्धती कोणती आहे ? कोणत्या नियमानुसार ?
ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीचा एन ए उपविभागीय अधिकारी यांना मंजूर करता येतो का ?
तलाठी कर्मचारी यांना शासन सेवेत ६ महिन्यापेक्षा कमी कालावधी झालेला आहे . त्यांचे अपघाती निधन झाले आहे . तर त्यांचे कुटुंबातील इतर सदस्य यांना शासन सेवेत अनुकंपा तत्वावर घेता येते का ? कोणत्या शासन तरतुदीनुसार ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
कृपया तहसीलदार यांचे मासिक डायरी चे समीक्षण करण्याबाबतचा उद्दिस्त निहाय नमुना देण्यात यावा हि विनंती
मा. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले तलाठी यांचे निलंबन आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी रद्द केले आहेत . तर त्या तलाठी यांचे विभागीय चवकशी पण रद्द होऊ शकते का ? कृपया मार्गदर्शन व्हावे हि विनंती .
विभागीय चवकशी सुरु करण्याची कार्य पद्धती कोणती आहे ?
ऐपत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत कि उपविभागीय अधिकारी यांना आहेत . कार्य पद्धती कोणती आहे ? कृपया मार्गदर्शन करावे .
अकृषी परवानगीसाठी अर्जदार यांनी दोन वर्षापूर्वी अर्ज केला . नाहरकत साठी कार्यालयाकडून इतर कार्यालयांना पत्र दिले आहे परंतु समन्धित कार्यालयाचे नाहरकत / अभिप्राय प्राप्त झालेले नाहीत . तर अर्जदार यांना नवीन अर्ज सदर करण्याची सूचना द्यावी लागेल का ?
मा. जिल्हाधिकारी यांनी अधिकारी / कर्मचारी यांचे विरुद्ध चे तक्रारीवर तपासणी करून अहवाल सदर करण्यास सुचित केले आहे . समजा तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांचेविरुद्ध तक्रार असेल तर सध्याचे उपविभागीय अधिकारी हे तपासणी करू शकतात का ? कृपया मार्गदर्शन करावे ...
एका कर्मचारी यांचे विभागीय प्रकरणातील दोष सिद्ध झाले . त्यांना शासन सेवेतून मुक्त करण्यासाठी कोणती कार्य पद्धती अनुसरावी लागेल . कृपया शासन तरतुदी सह मागदर्शन करावे ..
तलाठी यांचेविरुद्ध मा. न्यायालयाने निकाल दिला आहे . सदरील निकाल कार्यालयास अप्राप्त आहे . त्यांना शासन सेवेतून काढून टाकण्याची कार्य पद्धती कोणती आहे ? कोणत्या नियमाने कार्यवाही करावी लागेल ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
कोतवाल यांचा राजीनामा तहसीलदार मंजूर करतात कि उपविभागीय अधिकारी करतात ?
उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोणते विभाग कार्यरत असतात . विभागनिहाय कामाचे वाटप कसे असते ?
शासन सेवेत एखाद्या कर्मचारी यांना ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे . त्यांनी नोकरीला लागण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी साठी प्रस्ताव सदर केला आहे .परंतु अध्यापही त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सदर केले नाही .. कोणती कार्यवाही अनुसरावी ?
गायरान अतिक्रमण जमीन मंजूर करण्यासाठीची कार्यवाही कोणती ? कोणत्या शासन शासन निर्णयानुसार अतिक्रमण मंजूर करता येते ?
उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावरील विभागनिहाय जॉब चारत कोठे मिळेल ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
कार्यालयीन नसती हा कायदा कोठे मिळेल ? या कायद्यानुसार सद्या कार्यालयीन काम करता येते का ?
कार्यालयातील कामकाज वर्षानुवर्षे चाललेल्या पद्धतीवर आधारित असते .
या साठी कायदा नाही
नागरी सनद तयार करताना कोणत्या बाबींचा अभ्यास करावा लागतो. सनद तयार करताना कोणते नियमांचा वापर करावा लागतो ?
आदरणीय सर मार्गदर्शन केल्यामुळे धन्यवाद ...पण गावठाण हद्दीबाहेरील बांधकाम परवाना/परवानगी नगर रचनाकार यांनी द्यावी लागते का उपविभागीय अधिकारी यांनी हे समजत नाही .. कृपया मार्गदर्शन करावे .
तहसीलदार यांचे माषिक डायरीचे समीक्षण उपविभागीय अधिकारी करतात यासाठी त्यांचे उद्दिस्त / इस्तांकन बाबत नमुना कोठे मिळेल ?
मंडळ अधिकारी यांचे मासिक डायरीचे समीक्षण कोण करते ?
नवीन कर्मचारी यांना तीन वर्ष पूर्ण होईपर्यंत परावर्तीत , अर्धवेतनी रजा मंजूर करता येते का ?
ग्रामीण पेयजल योजनेतील टाकी बांधकाम करण्यास जागा मिळणेबाबत वस्तीवाधीसाठी संपादित केलेली जमीन इतर प्रयोजनासाठी देता येते का ? कृपया शासन तरतुदी सह मार्गदर्शन करावे हि विनंती .
नवीनभू संपादन कायद्याच्या कलम ९९ नुसार , अन्य कारणासाठी जमिनीचा वापर अनुद्नेय नाही
बांधकाम परवानगी /परवाना देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना आहेत का ? असतील तर कोणत्या शासन तरतुदीनुसार कृपया मार्गदर्शन करावे .
प्रादेशिक योजना असेल तर - जिल्हाधिकारी नियोजन अधिकारी आहेत
कलम ११३ प्रमाणे Special Township असेल तर - अशे प्राधिकरण
तलाठी यांनी राजीनामा दिला आहे . तलाठी हे एक वर्षापासून परवानगी न घेता गैरहजर आहेत . तर राजीनामा मंजूर करता येईल का ? कोणत्या नियम आधारे ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
उपविभागीय अधिकारी यांना त्याचे उपविभागात महसुलशी निघडीत उपक्रम / कार्यक्रम राबवायचे असतील तर varisthanachi परवानगी घेणे गरजेचे आहे का ?
तलाठी हे नवीन नियुक्तीने १ आठवड्यापूर्वी रुजू झाले आहेत . त्यांना विभागीय दुय्यम सेवा परीक्षा पुढच्या महिन्यातील देत येईल का ?
अंतर जिल्हा बदलीने ताल्ठी रुजू झाले आहेत . पूर्वीच्या जिल्ह्यामध्ये तलाठी विभागीय दुय्यम सेवा परीक्षेतून ३ विषयात सुत मिळाली आहे . मग आता त्यांना पूर्ण पेपर द्यावे लागतील का ? सुत ग्राह्य धरवी ;लागेल का ? शासन तरतुदीसह कृपया मार्गदर्शन व्हावे.
एक कर्मचारी यांना एथदर्थ मंडळाकडील मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून ची सुट मिळाली आहे परंतु दहावीला हिंदी हा विषय नसल्यामुळे त्यांना सुट मिळाली नाही . परत sambhandit कर्मचारी यांनी बहिस्त वर्गातून यावर्षी दहावीला हिंदी हा विषय घेऊन उत्तीर्ण झाले आहेत . तर त्यांना हिंदी भाषा सुट मंजूर करता येईल का ? एथदर्थ मंडळाकडील हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे का ?
स्मशानभूमीसाठी जमीन प्रदान करावयाची कार्यपद्धती कोणती आहे ? कोणता शासन निर्णय आहे ?
बदली सुट्टी मिळणेबाबत चा शासन निर्णय कोणता आहे ? कृपया असेल तर देण्यात यावा .
जमीन अदला-बदलीचे आदेश काढण्यासाठी कोणती तरतूद आहे ? कोणत्या नियामानाव्ये आदेश काढता येतील ? karypadhati कोणती आहे ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
अर्जदार यांनी वाणिज्य व निवासी प्रयोजनासाठी akrashi परवानगीसाठी एकच अर्ज केला असेल तर वाणिज्य व निवासी प्रयोजनासाठी akrashi आदेश एकच काढता येतो का ? अर्जदार यांना वेगळे अर्ज करण्यास सुचित करावे लागेल का ?
तलाठी कर्मचारी यांचा राजीनामा कोणी मंजूर करावयाचा असतो ? मंजूर करण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत ? अटी व शर्ती कोणत्या आहेत ? कृपया मार्गदर्शन व्हावे .
नवीन karmchayari जर एक वर्ष होण्याआधी ६ ते ७ महिन्याच्या रजेवर गेला तर त्यास कोणती रजा मंजूर करता येईल ? कोणता नियम लागू होतो ?
कार्यालयीन कामकाज करताना jantechi kame / तक्रारींचा किती divasat niptara करणे आवश्यक आहे ? कोणत्या नियमानुसार ?
मात्र Maharashtra Government Servants Regulation of Transfers and Prevention of Delay in
Discharge of Official Duties Act, 2005.
मधील तरतुदी नुसार नागरिक सनद प्रत्येक कार्यालयाने तयार करणे आवश्यक
त्या नुसार , तक्रार निर्गती कधी होईल याचा कालावधी निच्छित करावा
अन्यथा , कार्यालयीन नस्ती, या कायद्याचे तरतुदी नुसार , ४५ दिवसात निर्गत करावा
तथापि , नागरिक तक्रार , शक्यतो लवकरात लवकर निर्गमित करावी