[Ctrl+G for Marathi/English]       Reset Page

आदरणीय किरण सर , मी आपणास खलील प्रश्न विचारला होता.
प्रश्न - आमच्या आजोबांनी सन 1984 मध्ये 3 एकर गुरे चरण जमीन खरेदी केली होती , & खरेदीखत व फेरफार नोंद आहे.नंतर 1994 साली आजोबा मयत झाले आणि माझे वडील , काका व आत्या असे एकूण 7 जने वारस म्हणून लागले अशी फेरफार नोंद आहे.सन 1996 साली एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या ह्या सात जणांचे नावे खोट्या साह्य करून स्वतःला संबंधित जमीन विकण्याचा अधिकार आहे असे नॉटरी कुल मुखत्यारपत्र करून घेतले व नंतर त्याच कुल मुखत्यारपत्र आधारे त्याने एका इतर व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खत करून ति जमीन 1996 विकून टाकली. ह्या खरेदी ची नोंद असून खरेदी घेणार यांचे नाव सात बारा सदरी लागले आहे.
सदर शेती ही आम्ही राहत असलेल्या गाव सोडून दुसरीकडे असल्याने आम्हाला या जमिनीचे माहिती नव्हती.आम्हला या वर्षी याची माहिती मिळाली व अत्ता त्या जमिनी वर सिटी सर्व्ह होउन प्लॉट पडले आहेत.
1.तर आज 23 वर्षांनी आम्ही आमची जमिन परत मिळावी या साठी दावा कोर्टात करू शकतो का?
2.आणि दावा टाकून जमीन आम्हास मिळेल का?.

त्याचे आपण दिलेले उत्तर -
एकतर गुरुचरण जमीन आपण खरेदी कशी केली व फेरफार नोंद मंजूर कशी झाली ? गुरुचरण जमीन हि शाशनानें गावातील गुरांना चारण्यासाठी दिलेली असते . ती जमीन शासकीय आहे . त्यामुळे अश्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही .
आपल्या म्हणण्यानुसार खोट्या कुल मुखत्यापत्राद्वारे जमिनीची विक्री झाली आहे . कुल मुखत्या पत्र खोटे आहे हे आपणास सिद्ध करावे लागेल त्यासाठी फौजदारी नायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र आपणास जमीन मिळणार नाही . मात्र ज्या व्यक्तीने खोटे विक्री खत केले त्याचे कडून आपणास जमिनीची किंमत , व्याजासह मिळू शकते . आपण आपले चीक वकील यांचा सल्ला घेऊन , पुढील कायदेशीर कारवाई/ कार्यवाही सुरु करू शकता.

त्याला अनुसरून च एक प्रश्न -
आपल्या माहिती नुसार मी काही वकीलाशी बोललो ,त्याचे मते limitation act नुसार आपली दावा करण्याची मुदत संपली आहे तर खरच limitation act नुसार आमचा दावा करण्याची मुदत संपली आहे.??? मार्गदर्शन करावे.

मी माझ्या वरील उत्तरात सुधारणा करतो . वास्तविक गुरुचरण जागा आपण खरेदी केली ती प्रक्रिया चुकीची आहे .आपली फसवणूक केली म्हणून आपणास नुकसान भरपाई मिळू शकते . मात्र जमिनीची किंमत व त्यावरील व्याज मिळणार नाही .
फसवणूक झाल्यापासून कालावधी खूप झालेला आहे .मात्र न्यायालयाने वाजवी कारणासाठी झालेला विलंब माफ करू शकते

प्रश्न - माझ्या आजोबांनी सन 1948 साली एकूण 94 गुंठे क्षेत्र असलेल्या गटापैकी उत्तरेकडील 47 गुंठे जमीन एका सखाराम नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केली होती.उर्वरीत दक्षिणेकडील 47 गुंठे ही सखाराम नावे च होती. सन 1968 साली सखाराम मयत झाले आणि त्याच्या मुलगा माधव यांचे नाव सातबाराच्या मुळ कब्जेदार व दोन मुलीचे नाव इतर हक्कात वारस नोंदीने लागले.पण इतर हक्कात नोंद करताना तलाठी यांनी मुलीचा हक्क हा दक्षिणेकडील 47 गुंठे मध्ये आहे असा केला नाही. सन 1992 रोजी माझ्या काकांनी उर्वरित दक्षिणेकडील 47 गुंठे माधव कडून एकत्र कुटुंब असताना खरेदी केली म्हणजे आत्ता सर्वं 94 गुंठे चा गट काकांच्या च्या नावे झाला मात्र त्या मुलीचा सही किंवा हक्क सोड न केल्याने त्याचे नावे आजही सातबारा इतर हक्कात आहे. सन 2015 रोजी माझे काका व आम्हीं विभक्त झालो तेंव्हा ह्या गटात माझ्या वडिलांच्या हिस्सास उत्तरेकडील 47 गुंठे जमीनिवर आला आहे पण काकांना ते माहीत नाही आहे तर 1.आम्ही तहसीलदार यांना मजमस 1966 , कलम 155 ने दुरूस्ती अर्ज करू शकतो का? 2.आम्ही जर सातबारा स्वतंत्र करून मुलींचे नावे कमी करू शकतो का?

कलम १५५ खाली मुलीची नावे कमी करता येणार नाहीत
आपले काकांनी सखारामच्या मुलाकडून केवळ उर्वरित जमीन खरेदी केली आहे . त्या जमिनीत त्याच्या बहिणीचा १/३ प्रत्येकी हिस्सा होता . त्या मुले त्यांनी नोंदणीकृत दस्त द्वारे त्यांचा हक्क सोडला पाहिजे

महोदय ,
Power of Attorney Act , 1882 नुसार 100 रु.पेक्षा जास्त मालमत्ताचे कुलमुखतीयार पत्र हे नोंदणीकृत असले पाहिजे पण त्रयस्थ व्यक्तीने जमीन हि जर नॉटरी कुलमुखतीयर खोट्या साह्य करून व नंतर त्याच नॉटरी कुलमुखतीयरच्या आधारे रजिस्टर खरेदी खत्ताने परस्पर विकली असेल तर Specific relief act खाली दावा टाकून खरेदी Null and Void करून मिळेल का?
किंवा आम्ही आमचा जमीन मोबदला व्याजा सकट मिळवू शकतो का?

प्रश्न - आमच्या आजोबांनी सन 1984 मध्ये 3 एकर गुरे चरण जमीन खरेदी केली होती , & खरेदीखत व फेरफार नोंद आहे.नंतर 1994 साली आजोबा मयत झाले आणि माझे वडील , काका व आत्या असे एकूण 7 जने वारस म्हणून लागले अशी फेरफार नोंद आहे.सन 1996 साली एका त्रयस्थ व्यक्तीने आमच्या ह्या सात जणांचे नावे खोट्या साह्य करून स्वतःला संबंधित जमीन विकण्याचा अधिकार आहे असे नॉटरी कुल मुखत्यारपत्र करून घेतले व नंतर त्याच कुल मुखत्यारपत्र आधारे त्याने एका इतर व्यक्तीस नोंदणीकृत खरेदी खत करून ति जमीन 1996 विकून टाकली. ह्या खरेदी ची नोंद असून खरेदी घेणार यांचे नाव सात बारा सदरी लागले आहे.
सदर शेती ही आम्ही राहत असलेल्या गाव सोडून दुसरीकडे असल्याने आम्हाला या जमिनीचे माहिती नव्हती.आम्हला या वर्षी याची माहिती मिळाली व अत्ता त्या जमिनी वर सिटी सर्व्ह होउन प्लॉट पडले आहेत.
1.तर आज 23 वर्षांनी आम्ही आमची जमिन परत मिळावी या साठी दावा कोर्टात करू शकतो का?
2.आणि दावा टाकून जमीन आम्हास मिळेल का?.

एकतर गुरुचरण जमीन आपण खरेदी कशी केली व फेरफार नोंद मंजूर कशी झाली ? गुरुचरण जमीन हि शाशनानें गावातील गुरांना चारण्यासाठी दिलेली असते . ती जमीन शासकीय आहे . त्यामुळे अश्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही .
आपल्या म्हणण्यानुसार खोट्या कुल मुखत्यापत्राद्वारे जमिनीची विक्री झाली आहे . कुल मुखत्या पत्र खोटे आहे हे आपणास सिद्ध करावे लागेल त्यासाठी फौजदारी नायायालयात दावा दाखल करावा लागेल .
मात्र आपणास जमीन मिळणार नाही . मात्र ज्या व्यक्तीने खोटे विक्री खत केले त्याचे कडून आपणास जमिनीची किंमत , व्याजासह मिळू शकते . आपण आपले चीक वकील यांचा सल्ला घेऊन , पुढील कायदेशीर कारवाई/ कार्यवाही सुरु करू शकता

एक व्यक्ती त्याची सर्व 30 गुंठे वडिलोपार्जित शेत जमीन त्याच्या पत्नी व मुलं यांच्या संमतीने मला विकण्यास तयार आहे.त्याला जमीन विक्री तुन आलेल्या पैसा तुन शहरा मध्ये घर खरेदी करायचे आहे व शहरात राहून व्यावसाय करायचा आहे.जर त्याची शेत जमीन मी विकत घेतली तर तो भूमिहीन होईल व मला त्याचा काही त्रास होईल का? माझी खरेदी रद्द होईल का ?सदर व्यक्ती अनुसूचित जाती मधील आहे.

आपण जे खरेदी कराल त्यावर , अन्य त्याच्या वारसांची सही घ्या .
आपणास काही अडचण येण्याचे काही कारण नाही

नमस्कार सर ,
मला सख्या 4 बहीण व 4 सख्खे भाऊ आहेत.तसेच मला 3 चुलत बहिणी व 4 चुलत भाऊ आहेत.माझे वडिल व चुलते यांनी 10 एकर जमिनीचे कधी वाटप च केले नाही त्यामुळे आमच्या सर्वांचे (सख्खे + चुलत भाऊ बहीण) एकमेकांत वाईट संबंध असल्याने सातबारा सदरी सामाईक मालक म्हणून नाावे वारस नोंदीने लागली आहेत.ही 10 एकर शेती असून एकूण 8 गट आहेत.ह्या पैकी 4 गट हे राज्य महामार्ग ला लागून आहे व उर्वरित गाव शिवराकडे आहे.मी दिवाणी न्यायालयत दावा टाकला आहे तर..
१.तर न्यायलय कुठल्या अनुषंगाने वाटप करेल.
२.मी न्यायलयला मला सोयीस्कर असलेला गट देण्याची विनंती करू शकतो का ? व न्यायालय ते मान्य करेल का ?
३.तसेच प्रतिवादी कडून भरपाई मागू शकतो का?.

न्यायालय केवळ आपले हिस्से निश्चित करेल . प्रत्यक्ष वाटप , जिल्हाधिकरी यांचे आदेशाने उप अधीक्षक भूमी अभिलेख / तहसीलदार करतील . या वाटपसा सर्रास निरास वाटप असेच संबोधले जाते
प्रत्येकाला समान किंमत /उत्पादकता असलेली जमीन दिली जाते . जर असं करणे शक्य नसेल तर , ज्यांना जामी नेता येत नाही त्यांना नुकसान भरपाई दिली जाते

१.एखाद्या व्यक्तीला आपण पैसे उधार दिले आहे बिनव्याजी तर कुठल्या योग्य दस्त आपन समोरच्या कडून बनवून घेतला पाहिजे.
२.फक्त 100 रु स्टॅम्प वर लिहुन घेतलेले किती योग्य राहील?
३.नॉटरी दस्त किती दिवस valid असतो?
४.जमिनीचे गहाणखत करून सातबारा इतर हक्कात नोंद घेऊ शकतो का?

आपण पैसे धनादेशाद्वारे द्या .
सदरचे दिलेले पैसे हे loan समजले जातात .

नमस्कार सर.
जमीन सोयीनुसार अदलाबदल करावी या साठी आपण Exchange deed करावे असे सांगितले पण जर जमीन ही नवीन शर्त व सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवागीशिवाय हस्तातरस बंदी ह्या शेरा इतर हक्कात असेल तर मा. अप्पर जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल का..?

हो
सक्षम अधिकारी यांची परवानगी आवश्यक

गट न.235 (भोगवटदार वर्ग - 2 ) हा 7 गुंठे + पोटखराबा 3 गुंठे असा एकूण 10 गुंठे चा असून त्याच्या इतर हक्कात नवीन अविभाज्य शर्त ,तुकडा व स.सा.कुळ म्हणून 8 व्यक्तीचे नावे हे जी 1988 रोजी वारसांनी लागेली होती.माझा स्वतःचा गट न.236(130 गुंठे) हा गट न.235 च्या शेजारी असून...
1. मी तुकडे बंदी कायद्या अधीन तो खरेदी करू शकतो का..? मूळ मालक मला विकण्यास तयार आहे.
2. कुळाची खरेदीसाठी परवानगी घ्यावी लागेल का..?
3.मागील 50 वर्षी पासून मूळ मालकच जमीन कसत असून पिकपेरे त्याचेच नावानी आहे तर जमीन वर कुळ असलेले व्यक्तीचे नाव तहसीलदार साहेब कमी करतील का ? कुळाच्या वडील चे कूळ म्हणून 1968 साली लागले आहे.

१. आपण लगतचे खातेदार असाल व सदर तुकडा पूर्वीचा असेल ( कायदा येण्यापूर्वीच ) तर आपण खरेदी करू शकता .
२. अविभाज्य शर्थ जमिनीस कुल कसा लागू शकतो . अविभाज्य शर्थ जमीन म्हणजे , एखाद्यास कसण्यासाठी दिलेली जमीन . कुल आहे म्हणजे त्या व्यक्तीने जमीन स्वतः कसलेली नाही , म्हणजे तो शर्थ भंग हि होऊ शकतो .
३. कदाचित जमीन vatan जमीनही असू शकते . असल्यास संबंधित vatan कायद्याच्या तरतुदीनुसार विक्री /खरेदी शक्य .
४. कुळाचे नाव कमी करणे सध्यस्थित अशक्य . तथापि कलम १४ , १५ अथवा ३१ चा आधार घेऊन काही शक्यता तपासू शकता

प्रश्न - 1.जमिन एकत्रीकरण योजने दरम्याम घेण्यात येणाऱ्या जंगल पाहणी (परिस्थिती) बद्द्दल सविस्तर माहिती द्यावी.2.भुतकाळ जमीन कसण्याच्या सोयीने अदलाबद्दल झाली असेल तर ती नोंद , ताबे पावती ,जबाब कुठे मिळतील?
3.आज रोजी जमिनीची सोयी नुसार अदलाबदल करू शकतो का खरेदीखत न करता?

जंगल पाहणी म्हणजे , जमाबंदी होण्यापूर्वी जी पाहणे भूमी अभिलेख खात्यामार्फत होते त्यास , जंगल पाहणी असे संभोधतात .
Exchange Deed करावे . मात्र ते नोंदणीकृत करावे लागते . म्हणहे मुन्द्रानक शुल्क भरावे लागेल

प्रश्न - माझ्या मालकीचा गट न.241/ब हा 4 एकर चा असून तो गाव नकाशा वर दिसत नाहीं. भूमिअभिलेख मधून गट स्कीम उतारा मिळाला त्यात हा गट सर्वे नंबर 75/3 पासून बनला आहे .माझा कब्जात ह्या सर्व्ह नंबर मध्ये 4 एकर जमीन आहे.भूमिअभिलेख मधून जुना सर्वे 75 चा नकाशा मिळाला असून त्यात सर्व्ह न.75/3 हा आज माझ्या ताब्यातील जमीन दाखवतो.पण भूमिअभिलेख कर्मचारी त्या वर शासनाचा स्टॅम्प मारून न देता बोलत आहे कि तुम्ही मोजणी टाका. तर
1.तर ही दुरुस्ती करण्यासाठी काय करावे.
2.आजूबाजूच्या सह हिस्सादाराची काही हरकत नसल्यास खाजगी मोजणी करून तो नकाशा सर्वांची संमतीने भूमिअभिलेख मध्ये दिला तर भूमी अधीक्षक त्याची दखल घेऊन दुरुस्ती करतील का?.

प्रश्न - गट नंबर - 241/ब ही जमीन सखाराम नावाच्या व्यक्तीची होती.या गटावर 24 डिसेंबर 1957 रोजी अशी नोंद आहे की - 'सखाराम यांच्या जमिनीस विश्राम पाटील हे 1954 -55 पासून कुळ असल्याने इतर हक्कात स.सा. कुळ - विश्राम पाटील ही नोंद केली.' पण सदर जमिनीची पिकपहानी 1966 ते 1991 ही बापू नावाच्या व्यक्तीची आहे व 1991 साली ही जमीन मी बापू कडून खरेदी केली इतर हक्क कायम ठेवून .1991 ते 2018 पिकपहानी माझी च आहे.1988 साली विश्राम च्या वारसांनी वारस नोंद करून त्याची 9 नावे इतर हक्कात लावून घेतले व आज ही ती नावे कायम आहे.तर
1.जर मागील 52 वर्षी पासून कुळ हक्कातील व्यक्तीचा ही जमीन कसत नाही तर त्याचे नावे कमी होतील का?
2.जर आमची 1991 साल ची माझी खरेदी बेकायदेशीर ठरते का ? कारण कुळाची परवानगी घेतली नव्हती.
3.कुळाची नावे कमी करण्याचे प्रकरण दाखल केले तर तहसीलदार 27 वर्षाच्या माझ्या पिकपहानी वरून नावे कमी करतील का?

१. कुल जमीन कसत नसेल तर , जमीन मालकाने त्या बाबत पुढील कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे
२. आपणास जमीन अश्या ( पीक पाहणी सदरी ज्याचे नाव आहे ) त्या कडून जमीन खरेदी करता येत नाही . खरेदी निष्फळ आहे
३. ज्यांची नावे पीक पाहणी सदरी आहेत , ती योग्य पद्धत न अवलंबून , नोंदी केल्या असतील तर , रद्द होऊ शकतील

प्रश्न - गट नंबर 241 / अ हा 94 गुंठे उत्तर दक्षिण आयताकृती असून तो शंभू नावाच्या व्यक्तीचा होता. त्यातील 47 गुंठे (अर्धाहिस्सा उत्तरेकडील) शेती माझ्या आजोबांनी 1948 साली शंभू कडून खरेदी केली होती.उरलेली 47 गुंठे शेती ही शंभू चिंच होती.1972 साली शंभू मयत होउन त्याच्या नातू माधव चे व पत्नी हिराबाई चे नाव मूळ कब्जेदार सदरी व दोन मुली (मंदाबाई व गोदाबाई) ईतर हक्कात लागले.पण 7/12 पुनरलेखनात जालेल्या चुकांनि मंदाबाई व गोदाबाई चा हक्क हा संपूर्ण 94 गुंठे वर दिसू लागला.

1992 साली आम्ही एकत्र असताना ( माझे वडील + तीन काका) उर्वरित दक्षिणेकडील 47 गुंठे जमीन माधव कडून खरेदी केली मंदाबाई व गोदाबाई चे इतर हक्कातील नाव कायम ठेवून व संपूर्ण गटावर पिकपहानी आमचीच लागली .सन 2015 साली सदर जमीन प्रत्येकी 20-20 गुंठे अशी माझे वडील + तीन काका यांनी म. ज.म. अ. कलाम 85 प्रमाणे वाटून घेतली इतर हक्क कायम ठेवून.तर..
1.माझे वडील याना आलेली 20 गुंठे जमीन ही उत्तरेकडून असून त्या मध्ये मंदाबाई व गोदाबाई यांचा हक्क नाही हे सिद्ध करू शकतो का?
2.आम्ही 47 गुंठे चा स्वतंत्र 7/12 बनवू शकतो का उत्तर दिशेचा?
2.तसेच जमीन ची विक्री ही 20 डिसेंबर 2004 पूर्वी झाली आहे तर दोन्ही मंदाबाई व गोदाबाई चे नावे इतर हक्कातून कमी करू शकतो का प्रकरण दाखल करून.