ताबेसाठेखाताची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात करता येते का येत असल्यास त्याबाबत काही नियमावली आहे काय अशी नोंद झाली असल्यास काय करावे
नोंद ठेवता येत नाही
नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत:
कायदा: भारतीय नोंदणी कायदा, कलम १७; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९ व १५०.
एखादा खातेदार दुसर्या. इसमास नोंदणीकृत दस्ताने स्वत:च्या मालकी हक्काच्या जमिनीचे नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत करून देतो. गाव कामगार तलाठी यांच्याकडे या संबंधीची कागदपत्रे प्राप्त झाल्यावर गाव नमुना नं. ६ मध्ये त्याची नोंद होते.
सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजवल्यानंतर सर्व हितसंबंधीत हजर राहून नोटीस पुस्तकावर संमतीदर्शक स्वाक्षरी करतात. १५ दिवसानंतर मंडलअधिकारी संबंधीत नोंदीवर योग्य तो निर्णय घेतात.
महत्वाचे: * काही ठिकाणी, विशेषत: सातारा जिल्ह्यात असे निदर्शनास आले आहे की, नोंदणीकृत ताबा गहाण खत/मुदत गहाण खत याची नोंद करतांना गाव कामगार तलाठी, गहाण देणार (जमिनीचा मूळ मालक) याचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरातून कमी करून ते इतर हक्कात नोंदवतात आणि जमीन गहाण घेणार्याच इसमाचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरी नोंदवतात. ही पध्दत अत्यंत चुकीची आणि बेकायदेशीर आहे. कब्जेदार सदरी नाव आल्यामुळे जमीन गहाण घेणारा इसम त्या जमिनीची विक्री करतो, जमीनीवर मोठ्या रकमेचे कर्ज काढतो. यामुळे पुढील कायदेशीर गुंतागुंत वाढत जाते.
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, कलम ५३ अ अन्वये ताबा गहाणखतामुळे जमीन गहाण घेणार्याण इसमास मालमत्ता ताब्यात ठेवण्याचा हक्क निर्माण होत असला तरीही त्यास 'मालकी हक्क' प्राप्त होत नाही. त्यामुळे ताबा गहाण खत/मुदत गहाण खतानुसार, जमीन गहाण घेणार्या' इसमाचे नाव ‘इतर हक्क’ सदरीच नोंदवणे कायदेशीर आहे. गहाण देणार (जमिनीचा मूळ मालक) याचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरीच ठेवावे.
* महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३ अ अन्वये शेतकरी नसलेल्या व्यक्तीला शेतजमीन विकता येणार नाही किंवा त्याच्याकडे शेतजमीन गहाण ठेवता येत नाही.