[Ctrl+G for Marathi/English]       Reset Page

मा. श्री. पाणबुडे सर , तक्रार रजिस्टर भरल्यानंतर किती दिवसा मद्ये निकाल दिला पाहिजे , निकाल देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असेल तर कायकरावे संबधीत अधिकारी पुढची तारीख देत नाही व निकालही देत नाही कृपया आपले मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती.

कायदाची मर्यादा १ वर्षाची आहे .
मात्र शास्नानाने परिपत्रकाद्वारे ती मुदत कमी केली आहे
३ मानण्यात निकाल देणे आवश्यक आहे

आदरणीय सर , मृत्यूपत्रानुसार ग्रामसेवक घर नावावर करण्यास गेल्या आठ महिन्या पासून टाळाटाळ करीत आहे . तसेच काही उत्तर देखील देत नाही . त्याच प्रकारे मंडळ अधिकारी व तलाठी देखील जमीन नावावर करीत नाही. मृत्यूपत्र दिल्यानंतर घर व जमीन वर नांवे लावण्यास काय अडचण आहे याचे कारण सुद्धा सांगत नाही या बाबत कोणाकडे तक्रार करावी मार्गदर्शन करावे हि विनंती.

तलाठी / मंडळ अधिकारी यांचे बाबतीत , संबंधित तहसीलदार यांचेकडे तक्रार करू शकता
ग्रामसेवक बाबत आपण , गट विकास अधिकारी यांचेकडे अर्ज करू शकता

आदरणीय सर, आमच्या शेती जवळ एक पाझर तलाव आहे . शेजारच्या एका शेतकऱयाने त्या पाझर तलावाच्या दहा मीटरच्या अंतरावर एक विहीर खोदली आहे. अशी विहीर खोदण्यासाठी शासनाची परवानगी लागत नाही का ? जेणे करून मलाही पाझर तलाव जवळ विहीर खोदता येईल. कृपया मार्गदर्शन होणेस विनंती.

पाझर तलाव जर जिल्हा प्राधिकरणाने , Public Drinking Water Source म्हणून अधिसूचित केला असेल तर , The Maharashtra Ground Water ( Management and development ) Act 2009 च्या कलम २१ अन्वये , ५०० मित्राच्या आत विहीर खोदता येणार नाही . मात्र पाझर तलाव अधिसूचित नसेल तर , विहीर खोदण्यास कोणतीही कायद्याची बाधा नाही

आदरणीय सर , माझ्या शेजारच्या शेतकऱ्याने मला न विचारता माझ्या शेतातून पन्नास मीटरची पाईप लाईन टाकली आहे सदरची पाईप लाईन टाकतांना मला त्याने विचारले नाही या बाबत मला त्याच्यावर काय कार्यवाही करता येईल

तहसीलदार यांची कलम ४९ खाली ( म.ज. म.अ १९६६ ) खाली परवानगी घेतली नसेल तर , आपण pipe line काढून टाकू शकता

आदरणीय सर, एखादी व्यक्ती आपले जनरल मुखत्यारपत्र एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना करून देऊ शकते का ?

दोन किंवा त्या पेक्षा जाडा लोकांना नेमल्यास , दस्तामध्ये , दोघे एकत्र अथवा वेगवेगळे काम करणार याचा उल्लेख करणे आवश्यक

होय

आदरणीय सर; मयत व्यक्तीच्या मृत्युपत्राची नोंद दुय्यम निबंधक करू शकतात का; त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते

मृत्य पत्र नोंद करणे आवश्यक नाही .
दिवाणी न्यायालयाकडून probate घ्या

आदरणीय सर, वडिलांनी मोठ्या भावास त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे घर दिले आहे व त्यास इतर जणांची मंजुरी आहे. पण भावाने सर्व वारसांची घराच्या मिळकतीवर नोंद होण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केला आहे. भूमी अभिलेख विभागाने नोटीस द्वारे हजर राहून जबाब देण्यास सांगितले आहे. वारस नोंद होऊनये म्हणून हरकत घयावी किंव्हा नाही याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.

जर वडिलांनी भावास केवळ घर दिले आहे तर तो इतरांची नावे लावण्याचे कारण काय ?

मृत्युपत्र हा पवित्र दस्त मानला जातो. मरणार्या माणसाची ती इच्छा असते. त्याच्या विरोधात न जाणे अधिक चांगले.

आदरणीय सर, जमीनवाटपाचा दावा कोर्टात चालू असताना मा.तहसीलदार किंवा मा. प्रांत साहेब मृत्यूपत्र नुसार जमीन क्षेत्राची ज्याच्या त्याच्या क्षेत्राची नोंद गाव दप्तरी करतील काय किंवा दावा वाटपाचा चालू असताना मृत्यूपत्र नुसार गावी क्षेत्राची नोंद घेण्यासाठी काय करावे कारण मृत्यूपत्र उशिरा माहित पडले आहे गावी असलेल्या भावाने कोर्टात जमीन वाटप दावा दाखल केला आहे परंतु तो कोर्टात हजर झाला नाही आम्ही कोर्टात हजार झालो त्याने इतरांची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. कोर्टात केस चालू असताना मृत्यूपत्र नुसार वाटप करावयाची आहे ती कशी करावी या बाबत मार्गदर्शन करावे हि विनंती

दावा चालू असेल तर मा न्यायालयाचे निदर्शनास , मृत्य पत्राबाबत आणून द्या , न्यायालय योग्य तो आदेस देते

मा. आदरणीय सर, १० बिगे जमीन वडिलांनी ३० वर्षा पूर्वी विकत घेतली आहे. सदर जमिनीची आता मोजणी केली असता ती १० बिगे व १० आरं भरते रेकॉर्ड ला १० बिगे आहे रेकॉर्डला १० बिगे १० आरं करण्यासाठी काय करावे लागेल. मार्गदशन करावे हि विनंती.

क्षेत्र दुरुस्ती अर्ज , अधीक्षक भूमी अभिलेख / जिल्हाधिकारी यांचेकडे करा

आदरणीय सर, आमचे वडिलांनी सन २००३ मध्ये मृत्यूपत्र नोंदणीकृत न करता फक्त नोटरी केलेले आहे. नोटरी केलेले मृत्यू पत्र ग्राह्य धरले जाईलका कृपया मार्गदर्शन व्हावे हि नम्र विनंती.

नोंदणी अधिनियम १९०८ कलम १८ अन्वये ज्या दस्तांची नोंदणी करणे वैकल्पिक आहे त्यांच्या यादीत मृत्युपत्राचा समावेश होतो. त्यामुळे मृत्युपत्राची नोंदणी अनिवार्य नाही. तुमच्या वडिलांनी नोटरी केलेले मृत्युपत्र निश्चितच ग्राह्य धरले जाईल.

आदरणीय सर, आमचे आईचे नावे ६० आर जमीन आहे. सदरची जमीन ७ भावाचे हिस्से मध्ये समान वाटून घ्यावयाची आहे. तुकडेबंदी कायद्यानुसार काही अडचण येऊ शकते काय ?

हि जमीन jr रहिवासी/ औद्योगिक क्षेत्रात /झोन मध्ये असल्यास अडचण नाही
मात्र नसल्यास , जमीन वरकस अथवा एकपिकी असल्यास ६०/७= ८.५ R क्षेत्र प्रत्येकाचे वाट्यास येईल . त्यामुळे तुकडा निर्माण होईल .वाटप करता येणार नाही

वडिलोपार्जित जमिनीचे वाटप करावयाचे असून वाटप हे कलम ८५ प्रमाणे करावे कि नोंदणीकृत वाटप करावे.

.
नोंदणीकृत करा . मुद्रांक शुल्क लागेल मात्र ते कमी आहे

आदरणीय सर, वारस फेरफार नोंद अपील करण्यासाठी विहित नमुना आहे काय ? साध्या अर्जावर अपील चालत नाही काय ? अपील साठी वकील द्यावा लागतो का ? त्यासाठी कोणत्या कागद पत्राची आवश्यकता लागते कृपया मार्गदर्शन करावे.

अपीलाचा फाॉरमॅट ठरलेला असताो. अपीलासाठी वकील देणे याोग्‍य ठरेल. अपिलासाठी आवश्‍यक कागदपत्रे प्रकरण निहाय वेगवेगळी असतात. आपण वकीलाचे मार्गदर्शन घेणे याोग्‍य ठरेल.

आदरणीय सर, मृत्यूपत्रा नुसार वारस फेरफार नोंद होण्यासाठी मा.प्रांतसाहेबांकडे अपील केले आहे. परंतु दोन महिने झाले त्या बाबत काहीच उत्तर आले नाही. साधारणपणे किती महिन्यात माझे अपील निकाली निघेल. कृपया मार्गदर्शन व्हावे नम्र विनंती.

aapan ma . prant sahebanna samaksh bheta . aapan prativadinna notice kadhanyasathi process fee bharli aahe ka naslyas ti bharavi . prativadinna notice kadhalyashivay prakaran chalu hot nahi . prakarnachi sadyasthiti karyalayatun mahiti karun ghya .

आदरणीय सर, वडिलांनी स्वकष्टित जमिनीमध्ये घर बांधले आहे. सदर घर मृतुपत्र द्वारे मला दिले आहे. मृतुपत्र वेळेवर सादर न केल्याने व तहसीलदार यांनी कोणतीही चोकशी न करता सर्व वारसांची नोंद ७/१२ वर केली. त्यानंतर तलाठी यांनी काही वर्षांनी सदर घराची नोंद ७/१२ वर आई व इतर ९ अशी सामाईक हिस्यात तलाठी यांनी नोंद परस्पर घेतली. तलाठी यांना परस्पर नोंदी घेता येतात का? सदर प्रकरणा बाबत तलाठी यांची तक्रार करता येईल का? तक्रार कोणाकडे करावी, कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

ज्या नोंदीद्वारे आई व ९ खातेदारांची नवे दाखल केली आहेत ती नोंद प्रांत अधिकारी यांचे कडे अपील करून आव्हानित करा
घराचे बाबतीत , गात विकास अधिकारी यांचे कडेअपीलकरा.

आदरणीय सर, मृतुपत्र नुसार वारस फेरफार घेण्यासाठी मी प्रांत साहेबांकडे अपील केले असता वेळेत अपील न केल्याने फेटाळले आहे. आता या पुढे काय करावे याचे मार्गदर्शन करावे. तसेच मृतुपत्राची राईट आफ़ रेकॉर्ड ला नोंद करता येते का नोंद करता येत असेल तर कोणत्या महसुल अधिकारयाकडे नोंदी साठी अर्ज करावा कृपया मार्गदर्शन करावे हि आग्रहाची विनंती.

अपील फेटाळले आहे तर अप्पर जिल्हाधिकारीकडे अपील करा. मृत्यूपत्राची नोंद रेकॉर्ड आफ़ राईट ला करता येते. तलाठी यांचेकडे अर्ज करावा

आदरणीय सर, एखादे अपील करण्यासाठी विलंब झाला असेल तर विलंब माफीचा अर्ज करावा लागतो का, असा विलंब अर्जाचा नमुना कोठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे

होय विलंब माफीचा अर्ज करावा लागेल.त्यासाठी कोणताही विहित नमुना नाही .

आदरणीय सर, नवीन वारस फेरफार घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे अपील करावयाचे आहे . परंतु तीन वर्ष वेळ मध्ये गेला आहे . त्यामुळे अपील आर.टी. एस अपील उपविभागीय अधिकारी स्वीकारतील कींवा नाही. नाही स्वीकारले तर काय करावे लागेल.

अपील करण्यासाठी लागलेला विलंब हा योग्य कारणामुळे लागला आहे याची खात्री पटल्यास अपिलीय अधिकारी विलंब माफी करून केस चालवू शकतात.

आदरणीय सर, आर.टी.एस अपिले बाबत माहिती टाकल्यास त्यातून महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमातील कलमांची बरीच माहिती मिळते. व अनेक प्रश्नांची उतरे मिळतात कृपया आर.टी.एस अपिले बाबत माहिती आपल्या साईट वर कोठे मिळेल

आर.टी.एस अपिले अनेक प्रकारची असतात. याबाबत अशी माहिती देत येणे अवघड आहे

मरण पावलेल्या व्यक्तीने मृतुपत्र तयार करून ठेवल्यास त्यांच्या वारसांना हिंदू वारस कायदा १९२५ प्रमाणे हिस्सा मिळतो कि हिंदू विल्स कायदा प्रमाणे हिस्सा मिळतो. हिंदू वारसा कायदा व हिंदू मृतुपत्र कायदा या दोन भिन्न व्याख्या आहे काय ?

याच site वर अपलोड केलेला वारस कायदे आणि मृत्यू पत्र संबंधित माझा लेख वाचवा

मा.सर, एखाद्याने आपल्या जमिनीवर दंडेल शाहीने कब्जा केला असेल तर त्यास कसे घालवून देता येते. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ मध्ये काय तरतुदी आहे. सदर व्यक्तीशी दंडेलशाही न करता आपली जमीन त्याच्या कब्जातून कशी सोडवावी याबद्दल मार्गदर्शन करावे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५९ वाचावे
.

दिवाणी न्यायालय दाद मागावी.
फोजदारी तक्रार करावी

मा. सर, मी व चार भाऊ यांची ७/१२ वर वारस म्हणून नोंद आहे परंतु आणेवारी नाही. त्यासाठी काय करावे म्हणजे आणेवारी लागेल. आणेवारी नसल्याने सरकारी योजनाचा लाभ मिळत नाही.

आपण दुय्यम निबंधक कार्यालय येथे किंवा तहसिल कार्यालय येथे घरगुती जमिनीचे वाटप पत्र करून क्षेत्र वाटणी करून घेऊ शकता.

मा. सर, वडिलांनी केलेल्या मृतुपत्राची अंमलबजावणी करावयाची झाल्यास ती कशी करावी किंव्हा मृतुपत्राचा अंमल कसा करावा? कृपया मार्गदर्शन करावे.

तसेच आपण या संकेतस्थळावर दिलेल्या महसूल मित्र मोहसिन शेख ब्लॉग वरील मृत्युपत्र हा लेख वाचवा.अधिक संकल्पना स्पष्ट होईल .

मृत्यूपत्र करून दिलेला व्यक्ती मयत असेल तर मृत्युपत्र ज्या मिळकतीचे वर्णन असेल त्यानुसार अर्ज करावा .जर मृत्युपत्रातील वर्णन मिळकत जमीन या प्रकारात मोडत असेल तर तलाठी कार्यालयात अर्ज करावा.व मिळकत ग्रामपंचायत हद्दीतील असेल तर ग्रामपंचायत कार्यालय येथे अर्ज करावा.मृत्यूपत्राची सत्यप्रत सोबत जोडून अर्ज सादर करावा.परंतु हयात व्यक्तीचे मृत्युपत्र ची नोंद कोठेही करता येणार नाही. कारण व्यक्ती मरणा आधी कितीही मृत्युपत्र तयार करू शकतो पण कायद्यानुसार सर्वात शेवटचे मृत्युपत्र अधिकृत मानले जाते

मा. सर, मृतुपत्रा नुसार मला मिळालेल्या क्षेत्रा मध्ये भावाने अतिक्रमण केले असून त्या जागेवर घर देखील बांधले आहे. सदर अतिक्रमन बाबत दाद कोणाकडे मागावी. कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.

दिवाणी न्यायालय

आदरणीय भाऊसाहेब, पूर्वी सिलिंग कायदा असताना कमाल क्षेत्रा पेक्षा जादा जमीन वडिलांकडे होती म्हणून त्यांनी दोन मुलांच्या नावावर प्रत्येकी २० बिगे जमीन केली व तिसऱ्या मुलाच्या नावावर ७ बिगे जमीन केली सदर क्षेत्र वडिलोपार्जित असून वडील ह्यात नाही. ज्या मुलांच्या नावावर २० बिगे जमीन केली आहे. ते म्हणतात कि हि वाटणी पक्की असून वडिलांच्या शिल्लक जमिनी मध्ये वाटणी माघतात अशा वेळेस ७ बिगे जमीन मिळालेल्या सर्वात मोठ्या मुलाने काय करावे.

वडिलांच्या नावे शिल्लक असणाऱ्या मिळकतीसाठीच वारस नोंद होऊ शकेल

नमस्कार सर, दुष्काळ निधी वाटप बाबत शासनाचे कसे नियोजन असते ७/१२ वरील व्यक्तींना स्वतंत्र निधी दिला जातो का. किंव्हा ७/१२ वरील एकाच प्रमुख व्यक्तीला निधी दिला जातो ७/१२ वरील इतर व्यक्तीने हरकत घेतल्यास निधी दिला जात नाही तो निधी परत शासनाकडे जातो का या बाबत काही नियम असल्यास कृपया कळविण्यात येउन उचित मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

७/१२ वर एकापेक्षा अधिक व्यक्तींची नवे असल्यास , ती मिळकत सह्धाराकांची /सामायिक असते . ७/१२ वरील सर्व व्यक्तींना अशी मिळण्याचा हक्क असतो .
आपण आपला बँक खाते क्रमांक / आधार क्रमांक तलाठी यांचे द्या

आदरणीय सर, वडिलांनी त्यांचे मृतुपत्र मध्ये एका भावास चुकीने दोनदा हिस्सा एका गटात दिल्याचे दाखवले आहे. त्यास इतर भावानी आक्षेप घेतला आहे. वडील मयत असून त्यात बदल करता येणे शक्य आहे काय ? बदल करणे शक्य नसेल तर त्या भावास दोन हिस्से त्या गटात द्यावे लागतील का.

आता आक्षेप घेता येणार नाही

आदरणीय सर, माझे वडील मूळ गावी मयत जाले असता , आम्ही तीन भाऊ दुसरया गावी कामा करिता निघून गेलो आमच्या गावी वडिलोपार्जित जमीन होती. परंतु आमचे काका यांनी ती जमीन आम्ही परागंदा आहे अशी नोंद करून ती काकांनी त्याचे नावे केली. आता काकाही मयत आहे व ती वडिलोपार्जित जमीन तांच्या मुलांच्या नावे आहे. व त्यातील काही जमीन काकांच्या मुलांनी विकून टाकली आहे. आमच्या हिस्स्याची वडिलोपार्जित जमीन आम्हास आता मिळू शकेल काय? व आमच्या नावे ७/१२ नोंद होईल काय ?

तुम्ही परागंदा आहे अशी खोटी माहिती देऊन काकांनी नोंद करून ती त्याचे नावे केली असेल तर फौजदारी तक्रार दाखल करा किवा दिवाणी दावा करा

आदरणीय सर, माझे वडील मूळ गावी मयत जाले असता , आम्ही तीन भाऊ दुसरया गावी कामा करिता निघून गेलो आमच्या गावी वडिलोपार्जित जमीन होती. परंतु आमचे काका यांनी ती जमीन आम्ही परागंदा आहे अशी नोंद करून ती काकांनी त्याचे नावे केली. आता काकाही मयत आहे व ती वडिलोपार्जित जमीन तांच्या मुलांच्या नावे आहे. व त्यातील काही जमीन काकांच्या मुलांनी विकून टाकली आहे. आमच्या हिस्स्याची वडिलोपार्जित जमीन आम्हास आता मिळू शकेल काय? व आमच्या नावे ७/१२ नोंद होईल काय ?

आपणास जी जमीन अद्याप विल्क्लेली नाही ती परत मिळू शकते . त्या साठी आपणास दिवाणी न्यायालयात The Specific Relief Act खाली दावा दाखल करावा लागेल .
तसेच जी जमीन विकली आहे त्या साठी , याच कायद्या खाली , आपण जमिनीचे आपले हिस्स्या पुरते पैसे मागणी बाबत हि दावा दाख्जल करू शकता .

आदरणीय सर, फक्त बहिणीचे हक्क सोड करता येते का, भावाचे हक्क सोड करता यईल का ?

फक्त बहिणीचे हक्कसोड पत्र करता येते, भावाचे नाही अशी तरतूद नाही.

नमस्कार सर, आमचे वडिलांचे निधन झाले असून वडिलांचे नावे वडिलोपार्जित जमीन व स्वकष्टित जमीन आहे वडिलांनी २००3 मध्ये मृतुपत्र तयार केले आहे त्या मध्ये सात मुलांना जमीन दिली व दोन मुलीना जमीन दिली नाही शेत कसणाऱ्या भावाच्या मुलाने सात भाऊ आई व दोन बहिणीची वारस नोंद ७/१२ केली. आता बहिणीची वारस नोंद मृतुपत्राच्या आधारे रद्ध करता येईलका? व तशी वारस नोंद रद न झाल्यास बहिणींना हिस्सा द्यावा लागेल का? २००८ मध्ये वडिलाचे निधन होऊन अद्याप मृतुपत्रा नुसार मोठया भावाने जमीन वाटप केले नाही. मृतूपत्र कोणाकडे सादर केल्यास वाटणी होऊ शकेल. शेती कसणाऱ्या भावाच्या मुलाने त्याच्या वडिलांचे मुखत्यार पत्र करून बाकीच्या आमच्या सहा भावावर व बहिणीवर वाटपाची केस दाखल केली असून शेतातली सामाईक झाडे तोडणे बांद फोडणे असे प्रकार चालू आहे. . तसेच वाटप न झालेल्या जागेवर भावाने घर व संडास बांधले आहे. ज्याने दावा केला तोच जमिनीवर अतिक्रमण करत आहे. या बाबत पोलिसात तक्रार केली करावी का .या बाबत आपण सविस्तर मार्ग दर्शन करावे हि विनंती.

मृत्यूपत्र वेळेत सादर न केल्याने त्याची नोंद झाली नसावी. सात भाऊ आई व दोन बहिणीची वारस नोंद ७/१२ वर ज्या फेरफारने झाली त्या विरुद्ध अपील करा

नमस्कार सर , क्षेत्राची मोजणी करण्यासाठी खाजगी मोजणी आणावी कि सरकारी मोजणी आणावी खाजगी मोजणी केली तर कागदोपत्री तसेच कोर्ट कामासाठी ग्राह्याधारली धरली जाते काय ?

सरकारी मोजणी

आईच्या नावे सहा घुन्ठा प्लॉट आहे सदर प्लॉट एने असून आईकडून बकक्षिस पत्राने घ्यावा कि खरेदी करून घ्यावा कोणत्या व्यवहाराने सोयीस्कर होईल.

बक्षीस पत्र करून घ्या

आदरणीय सर, मुखात्यार्पत्राची नोंदणी करणे कायद्याने सक्तीचे आहे काय? कुलमुखत्यारपत्र व जनरल मुखत्यारपत्र यात काय फरक आहे.

नोंदणी महानिरक्षक यांचे नवीन सूचनानुसार , मुखत्यारपत्र नोंदणी करणे आवश्यक

भारतीय नोंदणी कायदा कलम ३३ प्रमाणे हि मुखत्यार पत्राची नोंदणी आवश्यक

मा. सर सन २००३ मध्ये वडिलोपार्जित मिळकतीची वाटणी मृतुपत्र द्वारे झालेली आहे. परंतु नवीन हिंदू वारसा सुधारणा कायदा २००५ नुसार मुली वडिलांची वडिलोपार्जित मिळकत मागू शकतील काय ?

मिळकतीची वाटणी मृत्य पत्र द्वारे २००३ मध्ये झाली आहे . त्या मुले हिंदू वारसा कायदा २००५ च्या कलम ६ (५) अन्वये , मुलीना आता हिस्सा मागता येणार नाही

मला एका ठिकाणी जमीन खरेदी करावयाची आहे. त्यासाठी ३० वर्षापासून सर्व फेराफार नोंदी तपासून घावायाच्या आहे ते बघण्यासाठी कोणत्या अधिकारीकडे जावे लागेल. ती जमीन त्या माणसाच्या नावावर कशी झाली. या बाबतीची खात्री कोणाकडे करता यईल. जमिनीमध्ये नाव न नोंदविलेले परंतु जमिनीत हिस्सा मागू शकतील असे काही कायदेशीर हिस्सेदार कसे शोधावे. जमिनीच्या इतर हक्का मध्ये बँकेचा किंव्हा अन्य वित्तीय संस्थेचा बोजा आहे काय? हे कसे शोधावे . खरेदीच्या व्यवहारामुळे प्रस्थापित कोणकोणत्या कायद्याचा भंग होतो का? हे कसे शोधावे कोणत्या अधिकार्यांकडे जावे लागेल या बाबत उचित मार्गदर्शन व्हावे हि विनंती.

What you are asking is a title search report of the property .
You need to visit the office of Sub Registrar ( Assurance/Registration ) . Search the register of the past transaction.
beside that give public notice inviting if any one have objection .
as suggested in earlier reply , local lawyer can do all this

शोध अहवाल स्थानिक वकील कडून देतील

आदरणीय श्री.शेखर गायकवाड साहेब, श्री.प्रल्हाद कचरे साहेब, श्री.किरण पाणबुडे साहेब, श्री.चंद्रकांत पूलकुंदवार साहेब, श्री.डुबे पाटील साहेब, श्री.व्ही . आर. थोरवे साहेब, श्री.संजय भागवत साहेब, श्री.श्रीधर जोशी साहेब, श्री.तरुण खत्री साहेब, श्री.कामराज चौधरी साहेब, श्री.शशिकांत जाधव साहेब, श्री. कुंडेटकर संजय साहेब, श्री.मगर विनायक साहेब, मोहसीन शेख साहेब व इतर महाराष्ट्र सिविल सर्व्हिस संकेत स्थळावरील महसुल अधिकारी,
सर्वाना दिवाळीच्या शुभेछ्या !

महसूल संवार्गातर्फे आपले आभार

आदरणीय श्री. मगर भाऊसाहेब मी दि. ३१/१०/२०१५ रोजी माझा प्रश्न मांडला होता. त्यास आपण प्रतिसाद दिलेला असून मला दिलेले उत्तर समजले नाही. मी पुन्हा माझा प्रश्न मांडतो कि, वडिलांनी वडिलोपार्जीत जमिनीचे मृतुपत्र केले आहे. त्यात त्यांनी फक्त मुलांना जमिनी मध्ये हिस्से दिले असून, मुलीना काहीच जमीन हिस्से दिले नाही. वडिलांचे निधन झाले असून मुलांना मृतुपत्र प्रमाणे वाटणी करावयाची आहे परंतु वडिलांच्या मुलींची ७/१२ वर वारस नोंद झाली आहे. आता मुलांना वाटणी करताना त्यांच्या बहिणीचे हक्क सोडपत्र घ्यावे लागेल का ? या बाबत मार्गदर्शन द्यावे हि विनंती.

होय.नोंदणीकृत हक्कासोद्पात्र करावे lagel

आपल्या रक्ताच्या नातेवाईकाला स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतर करतांना आता स्टम्पशुल्क द्यावे लागणार नाही असा जी .आर निघाला आहे काय ?

सर्व मुद्रांक शुल्क माफ केले नाही ... कायद्यातील नाते असेल तर २०० भरावे लागतात....इतरांना पूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागते .

२४ एप्रिल २०१५ रोजी मुद्रांक शुल्क कायद्यात तसा बदल केला आहे , पण तो ठराविक नात्यानाच आहे याची कृपया नोंद घ्यावी.

वडिलांचे वडिलोपार्जित जमिनीचे मृतुपत्र असून त्यात त्यांनी मुलीना जमिनी मध्ये काहीही हिस्सा दिलेला नाही. परंतु त्यांची नावे ७/१२ वरती वारस नोंद लागली आहे. मृतुपत्र प्रमाणे वाटणी करताना बहिणीचे हक्क सोड पत्र घ्यावे लागेल का ? किंवा बहिणींनी हक्क सोड पत्र नाही दिले तर चालेल का.

मालमत्ता हस्तांतरण कायद्या नुसार केवळ आपल्या हिस्स्या इतक्या वाट्या चे मृत्यूपत्र करता येयील.हक्क्सोद्पात्र करावे लागेल.

सर, वाटणी न झालेल्या जमिनीमध्ये २५ आंब्याची झाडे आहे. त्यातील ८ झाडे मृत झाली आहे. त्यातील काही झाडे माझ्या घराच्या छपरावर पडण्याच्या स्थितीत आहे. वाटणी न झाल्याने भाऊ सदरची झाडे तोडण्यास हरकत घेत आहे. या बाबत कोणाकडे दाद माघावी.

वृक्ष तोड परवानगी , तहसीलदार यांचे कडून घ्या

माझ्या शेती जवळ पाझर तलाव आहे. मला माझ्या शेतीमध्ये विहीर खोदावयाची आहे. पाझर तलाव पासून किती अंतरावर विहीर खोदावी असे काही नियम आहे का?

भू जल कायद्या नुसार , सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतापासून ५०० मीटर , अंतराच्या आत , विहित खोदता येत नाही .
पाझर तलावाची , सार्वजनिक पाण्याचा उद्भव म्हणून , नोंद आहे का पहा ?
जर सार्वजनिक उद्भव नसेल तर , आपणास ५०० मीटरचे आत विहीर खोदता येयील . अन्यथा ५०० मीटर चे बाहेर विहित कोह्दा

फक्त स्वकष्टित मिळकतीचे मृतुपत्र करता येते कि? वडिलोपार्जित व स्वकष्टित मिळकतीचे दोन्हीचे मृतुपत्र तयार करता येते ?

donhiche करता येयील.परंतु वडिलोपार्जित एस्तते मध्ये जितका share असेल त्या शहरे तितकेच भाग purta

donhiche करता येयील.परंतु वडिलोपार्जित एस्तते मध्ये जितका share असेल त्या शहरे तितकेच भाग purta

वडिलोपार्जित मिळकती मधील अविभक्त हिस्सा मृतुपत्राने तबदील करता येतो का ? मिळकती मधील अविभक्त हिस्सा व पोटाहीस्सा म्हणजे काय ?

हो

मिळकत जमीन वर्ग १ व मिळकत जमीन वर्ग २ या बाबत सविस्तर माहिती द्या.

वर्ग १ जमीन म्हणजे - या जमिनीचे विक्रीस कोणतेही निर्बंध नसतात

वर्ग २ जमीन म्हणजे - या जमिनीचे विक्री करण्या साठी , सक्षम अधिकारी यांची परवानगी आवश्यक
उदा शासन प्रदान जमीन, कुल वहिवाट कायद्याखाली प्राप्त झालेली जमीन ( विक्री किंम्मत निच्छित होऊन १० वर्ष कालावधी झालेला नाही )

एखाद्या व्यक्तीचे ७/१२ वर नाव आले म्हणजे ती व्यक्ती त्या जमिनीचा खरा मालक बनते काय !

7/१२ हा , जमीन महसूल वसूल करण्यासाठी कोण जबाबदार आहे , हे दाखवणारे अभिलेख आहे . It is fiscal document .
त्या मुले , ७/१२ वर नाव आहे म्हणजे , ती व्यक्ती कायदेशीर मालक आहे , असे म्हणता येणार नाही
मात्र व्यहारात , मालकी पाहणे साठी ७/१२ पहिला जातो
आपण मिळकतीचे Title Search करा
मागील ३० वर्षाचे दुय्यम निबंदक ( मुन्द्रांक ) यांचे अभिलेख पहा

माझ्या काही प्रश्नाची आपण उत्तरे दिल्या बद्धल प्रथम श्री. किरण पाणबुडे साहेब आपले धन्यवाद! माझा पुढील प्रश्न असा आहे. तहशिलदार यांना भावाने मृतुपत्र न दाखवता वारस नोंद मंजूर करून घेतली. व त्याप्रमाणे रेकॉर्डला वारस नोंदी झाल्या आहे. आत्ता मृतू पत्र दाखून वारस नोंद फेरफार करण्या करिता ताशिलदार याचेकडे अर्ज करू कि उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करू त्याचा काही प्रिंटेड फ़ॉर्म आहे. याबाबत मार्गदर्शन करावे हि विनंती.

आपणास अपील करावे लागेल

१] मृतुपत्राच्या आधारे सध्याच्या वारस नोंद मध्ये फेराफार वारस नोंद करता येईल का २] मृत्यू पत्रात वडिलांनी मुलीला जमीन हिस्सा दिला नाही [ वडिलोपार्जित स्वकष्टित ] तर मुलीला जमीन हिस्सा मिळूशक्तो का ३] जमिनीची वाटप होण्यासाठी भावाने कोर्टात दावा दाखल केला व त्याच जमिनीत घर व संडास बांधले आहे तक्रार कोणाकडे करावी

१. होय
२. मृत्य पत्राने जर हिस्सा दिला नसेल तर , काही करता येणार नाही .
३.मृत्य पत्राने , भावाचे नवे जमीन झाली आहे . भाऊ जमिनीचा मालक आहे . त्याचे मालीकीचे जमिनीत तो बांधकाम करू शकतो